जीवन विचार

🔰🌸🔰🌸🔰🌸🔰🌸
*🌷🌷 जीवन विचार*🌷🌷
〰〰〰〰〰〰〰
〰〰〰〰〰*
*आजच्या वैज्ञानिक युगात मानवाचे प्रश्न फार व्यापक आणि कठीण झाले आहेत.प्रश्न हा सामाजिक असो,  व्यापाराचा असो की आणखी कोणता प्रश्न असो , त्यावर जलद निर्णय घेण्याची गरज उत्पन्न होते.अशावेळेस आपल्याला अचूक निर्णय घ्यावे लागतात. आपल्या जीवनात अचूक वेळेचं आणि कामातील कौशल्याचं महत्त्व  फार मोठ असतं.म्हणूनच कँनन फरार नावाचा एक विचारवंत सांगतो की, ' माणूस जे काम करतो त्यात अचूकता नसेल तर अपयश येणार.'*

    *आपल्या जीवनात यश मिळवायचे असेल तर आपण आपलं काम सर्व ताकद आणि कौशल्य पणाला लावून केल पाहिजे.कारण प्रत्येक काम हे जीवनमरणाइतकं महत्त्वाच समजून केल तर यश नक्कीच आपल्या वाट्याला येणार.कोणत्याही कामातील अचूकता , सुक्ष्मता आणि एकाग्रता हे ञिसूञ  जीवनात फार महत्त्वाचे आहे.अचूकता तर कामाचा आत्मा असतो.आणि स्वतःच्या अंतरात्म्याच्या आवाजानुसार आपण आपले वर्तन केले तर यश सहजतेने प्राप्त होते.*
〰〰〰〰〰〰〰〰
🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸
*✍शब्दांकन /संकलन*

No comments:

Post a Comment