जीवन विचार

🔰🌸🔰🌸🔰🌸🔰🌸
*🌷🌷 जीवन विचार*🌷🌷
〰〰〰〰〰〰〰
*〰〰〰〰〰〰〰〰*
*धैर्य* म्हणजे मनुष्याजवळ असणारे खरे शौर्य आहे.ज्याच्याजवळ धैर्य आहे म्हणजे आशावादी जीवनाची कला आहे अशी व्यक्ती कोणत्याही संकटाला , संघर्षाला घाबरत नाही.ज्यांना जीवनात काही ठोस करून दाखवायचे अशा व्यक्ती धैर्याने आपली वाटचाल करतात.

    धैर्य हे एक माणसाच्या हातातील एक मोठे साधन आहे.त्या जोरावरच मनुष्य समर्थपणे आपले जीवन जगू शकतो.जीवनातील संकटाचा समुद्र पार करण्यासाठी धैर्याच्या जहाजातूनच प्रवास करावा लागतो.जी व्यक्ती ध्येयध्यास सोडून मध्येच थांबते अशी व्यक्ती संपते.आपल्या सर्व इच्छा सफल व्हायचा असेल तर आपल्यात धैर्य आणि चिकाटी असली पाहिजे . धाडसी माणसाच्या श्रमापासून निर्माण होत असलेल्या प्रत्येक घामाच्या थेंबापासून कीर्तीरुप मोती तयार होतात.मशालीचे तोंड खाली केले तरी तिच्या ज्वाळा कधीही खाली जात नाहीत.तसेच धैर्यवान व्यक्ती
धैर्य असले की ञैलोक्यावर विजय मिळवू शकतो.

〰〰〰〰〰〰〰〰
🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸
*✍शब्दांकन /संकलन*

No comments:

Post a Comment