✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 01 जुलै 2025💠 वार - मंगळवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1C7UfZaw8K/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वर्षातील 182 वा दिवस 🏛️ इतिहासातील घटना : • १८७९: इंग्लंडमध्ये पहिल्यांदा विद्युत प्रकाश वापरून रस्त्यावर दिवे लावण्यात आले.• १९६३: अमेरिकन पोस्टल सर्व्हिसने ‘झिप कोड’ प्रणाली लागू केली.👤 जन्म :• १८८२: बिडी महाजन, भारतीय स्वातंत्र्यसैनिक.• १८८२: डॉ. बिधान चंद्र रॉय – भारताचे प्रसिद्ध डॉक्टर आणि पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री.• १९१३ - वसंतराव नाईक, हरितक्रांतीचे आणि रोज गार हमी योजनेचे जनक, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री• १९३८ - पंडित हरिप्रसाद चौरासिया, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बासरीवादक.• १९४७ - शरद यादव खासदार• १९४९ - व्यंकय्या नायडू भाजपा नेते• १९६१ - कल्पना चावला, अंतराळवीर• १९६१: डायना स्पेन्सर – वेल्सची राजकुमारी, समाजसेविका आणि जागतिक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व.⚰️ मृत्यू :-• १९७२: श्रीपाद कृष्ण कोल्हटकर – मराठी नाटककार व विनोदी लेखक.• १९९९: माधवराव सिंधिया – भारतीय राजकारणी व केंद्रीय मंत्री.🌍 जागतिक/राष्ट्रीय दिन• महाराष्ट्र कृषी दिन • राष्ट्रीय डॉक्टर दिन• जागतिक युएफओ दिन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्री वसंतराव नाईक जयंती निमित्ताने रचना ..... पूर्ण कविता वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सलग दुसऱ्या वर्षी अमूल बनले भारतातील नंबर 1 फूड ब्रँड तर मदर डेअरीला दुसरे स्थान*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *भाजपला मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष, रवींद्र चव्हाण यांचे नाव निश्चित, केंद्रीय निरीक्षकांकडे भरला अर्ज, आज होणार घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *एसटी तिकीट बुक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, प्रवाशांना तिकीट दरात 15 टक्के सूट मिळणार, परिवहन मंत्री सरनाईकांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन, भाजपकडून संविधानाची गळचेपी, समृद्धी महामार्गावरून नदी वाहते आहे, टाळ कुटत विरोधक सरकारविरोधात आक्रमक*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *हिंगोलीत आरोग्य विभागाचे कामकाज ठप्प, समायोजनाच्या मागणीसाठी आरोग्य अभियानाच्या ५५० कर्मचाऱ्यांचे असहकार आंदोलन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *'शब्दांचीच शस्त्रे' पुस्तकाचे प्रकाशन, महाराष्ट्रातील संत परंपरेमध्ये सामाजिक सुधारणावादाची बीजे - डॉ. राजन हर्षे*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पाऊले चालती पंढरीची वाट, हरी नामाच्या गजरात माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन; मंत्री गोरेंनी धर्मपुरीत केले स्वागत*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 श्रीमती प्रमिला सेनकुडे, उपक्रमशिल शिक्षिका, हदगाव 👤 चंद्रकांत कदम, शिक्षक तथा साहित्यिक, नांदेड 👤 बाबासाहेब डोळे 👤 अशोक कांबळे, सेवानिवृत्त शिक्षक धर्माबाद 👤 व्यंकटेश बत्तूलवार, शिक्षक धर्माबाद 👤 गजानन कवळे, शिक्षक, उमरी 👤 विजय निलंगेकर, पत्रकार नांदेड 👤 सय्यद इलियास जुक्कलकर 👤 मधुसूदन पांचाळ, शिक्षक, धर्माबाद 👤 संजीव वाठोरे, शिक्षक, हदगांव 👤 हणमंतू देसाई, संपादक, धर्माबाद 👤 भाग्यश्री चलाख, साहित्यिक 👤 गणेश गोंटलेवार 👤 मोरेश्वर गायधने, शिक्षक, भंडारा 👤 बालाजी डाके पाटील 👤 नागोराव रायखोड 👤 श्रीकांत चरलेवार, मुख्याध्यापक धर्माबाद 👤 लक्ष्मण पाटील मुपडे, शिक्षक, धर्माबाद 👤 भूमन्ना आबूलकोड, LIC, धर्माबाद 👤 विशाल कान्हेरकर, साहित्यिक 👤 मारोती कांडले, शिक्षक, बिलोली 👤 डॉ. प्रा. हनुमंत भोपाळे, समुपदेशक, नांदेड 👤 तुकाराम मुंगरे, मुख्याध्यापक, नांदेड 👤 मारोती आर भुसेवार 👤 विलास नंदुरकर 👤 दिगंबर नागलवाड 👤 बालाजी भगनुरे, शिक्षक, देगलूर *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 14*मी तरुण असतो तेव्हा उंच असतो आणि जेव्हा मी म्हातारा होतो तेव्हा मी ठेंगणा होतो, ओळखा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - पेन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शिक्षणाचे उद्दिष्ट संवादी व्यक्तिमत्त्वाचे निर्भय स्त्री- पुरुष निर्माण करणे हे आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक ठोकणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटर कोण ?२) मधुमेह ( डायबेटीस ) हा कोणत्या कारणामुळे होतो ?३) भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू कोणता ?४) 'पाण्यात राहणारे प्राणी' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) अर्थशास्त्राचे जनक कोणाला मानले जाते ? *उत्तरे :-* १) स्मृती मानधना २) इन्सुलिनची कमतरता ३) कमाल नफा मिळवणे ( उदा. जर्मनी, जपान, अमेरिका ) ४) जलचर ५) ॲडम स्मिथ*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *शिंका का येतात ?* 📙हिवाळ्यात किंवा गार वाऱ्यात फिरून आल्यावर तुम्हाला फटाफट शिंका आल्या असतील. काहीतरी बोलायला तोंड उघडावे आणि तेवढ्यात शिंका येऊन बोलता येऊ नये, असेही कधी झाले असेल. सर्दी पडसे झाल्यावर शिंका येतात. विशेषत: वावड्यामुळे सर्दी आली असेल, तर शिंका जास्तच येतात. धुळीत गेल्यास, विशिष्ट फूल हुंगल्यास, किंवा अत्तराचा, उदबत्तीचा वास आल्यास वावडे असलेल्या लोकांना शिंका येतात आणि सर्दी होते. काय म्हणता तुम्हाला शिंका येत नाहीत ? मग एक काम करा. आजोबांच्या कोटाच्या खिशातली तपकिरीची डबी घ्या आणि एक चिमूटभर नाकात सोडा! काय आता आल्या का शिंका ? शिंका येणे शुभ की अशुभ ? काहीजण म्हणतात एक शिंक येणे वाईट, पण दोन शिंका येणे चांगले. अर्थात या सर्व अंधश्रद्धा बरं का ! पण शिंका का येतात, ते पाहू.खोकला आणि शिंका यात बरेच साधर्म्य आहे. आपल्या श्वसन नलिकेत काही त्रासदायक पदार्थ आला तर खोकला येतो. आपण खोकतो म्हणजे काय करतो ? सर्वात आधी आपण दीर्घ श्वास घेतो. त्यानंतर एपिग्लाॅटीस नावाचा पडदा श्वासनलिकेवर दाबला जातो. त्यानंतर आपण जोराने श्वास सोडतो. सहाजिकच खोकताना हवा दाबाखाली बाहेर पडते व श्वास नलिकेतील घाण, जिवाणू बेडक्याच्या रूपाने बाहेर टाकले जातात. आता शिंकेविषयी नाकातील हवा जाण्याच्या मार्गात जर काही अपायकारक, त्रासदायक असे पदार्थ आले तर शरीर खोकल्याप्रमाणेच प्रतिसाद देते. नाकातील ही संवेदना मेंदूपासून निघणाऱ्या पाचव्या नसेमार्फत मेंदुच्या मेड्युला या भागात जाते. येथील पेशींमध्ये संवेदनेचे विश्लेषण होऊन शिंक येण्याची प्रक्रिया होण्याचा आदेश दिला जातो. यात सुरुवातीचे दीर्घ श्वास, नंतर एपिग्लाॅटीसचे श्वासनलिकेवर येणे व नंतर जोरात उच्छवास हे खोकल्याप्रमाणेच असते, मात्र जोरात श्वास सोडताना पडजीभ खाली पडते व त्यामुळे हवा तोंडातून बाहेर न पडता नाकातून बाहेर पडते. नाकातील अपायकारक पदार्थ यामुळे बाहेर पडतो.वावड्यामुळे वा जंतूसंसर्गामुळे नाकातील आवरण हुळहुळे होते व त्यामुळे वारंवार शिंका येतात. एव्हीलसारखी गोळी देऊन वावड्यामुळे येणाऱ्या शिंका कमी करता येतात. तसेच ज्या पदार्थांमध्ये आपल्याला वावडे आहे त्यापासून दूर राहून स्वतःचे संरक्षण करणे जास्त योग्य होय.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जनार्दनाचा गुरु हो, स्वामी दत्तात्रय माझा || धृ ||त्याने उपदेश केला, केला … स्वानंदाचा बोध दिला || १ ||पतित सुखाचा अनुभव, दाखविला स्वयंमेव || २ ||एका जनार्दनी दत्त दत्त, बसे माझ्या हृदयात || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चुका माणसाच्याच हातून न कळत सुद्धा होत असतात. पण, त्या चुकांविषयी समजावून सांगण्याच्या काही पद्धती असतात. म्हणून कोणालाही का असेना त्याची चूक जर लक्षात आणून द्यायची असेल तर आपणही तेवढेच प्रामाणिक असले पाहिजे. तेव्हाच कुठेतरी आपल्या विषयी विचार केला जातो.पण, बोलणे वेगळे, वागणे वेगळे आणि विचार वेगळे असतील तर मात्र आपल्याकडे ही बघणारे अनेकजण असतात. म्हणून एकाकी कोणालाही चुकीचे ठरवू नये.बरेचदा असं होतं की एखाद्याला न वाचता चुकीचे ठरविल्याने त्याच्या स्वाभिमानाला किंवा त्याच्या चरित्राला डाग लागत असते. त्या वेळी भलेही तो माणूस बोलत नसेल पण, त्याचे मन जेव्हा दुखते तेच दुखावलेले मन अनेक पिढ्यांना सुखाने जगू देत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*वेळेचे महत्व*एक स्वार आपल्या घोड्याला खरारा करून त्याच्यावर खोगीर घालत असता घोड्याच्या एका पायाच्या नालाचा एक खिळा सुटून पडला आहे असे त्याला दिसले. पण तेथे दुसरा खिळा बसविण्याचे काम त्याने मागे टाकले. काही वेळाने लढाईवर जाण्याचे इशारे देण्याचे शिंग वाजू लागताच तो स्वार आपल्या घोड्यावर बसून लढाईच्या जागेकडे निघाला. त्या फौजेच्या सेनापतीने हुकूम सोडला की, ‘सर्वांनी आपले घोडे भरधाव सोडून शत्रूंवर तुटून पडावे व त्यांचा पाठलाग करावा.’ हुकमाप्रमाणे तो स्वार आपला घोडा उडवीत चालला असता खिळा पडल्यामुळे सैल झालेला घोड्याचा नाल गळून पडला व त्यामुळे घोडा लंगडत लंगडत चालू लागला. लंगडताना एका दगडावर त्याचा पाय आपटल्यामुळे स्वार घोड्यावरून खाली पडला व तो शत्रूच्या हाती सापडताच शत्रूने लगेचच त्याला मारले.तात्पर्य :- जेव्हाचं काम तेव्हा न करता ते आळसाने पुढे ढकलणे ही सवय वाईट व घातक आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 30 जून 2025💠 वार - सोमवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/197XC49VmY/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वर्षातील 181 वा दिवस 📜 इतिहासातील घटना:• १८५९ – फ्रेंच अकादमीने पहिल्यांदाच चार्ल्स डार्विनच्या 'ऑरिजिन ऑफ स्पिशिज' या ग्रंथाचा स्वीकार केला.• १९०५ – अल्बर्ट आइन्स्टाईनने ‘स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी’ (सापेक्षतावाद सिद्धांत) याचा पहिला संशोधन निबंध प्रसिद्ध केला.• १९०८ – तुंगुस्का स्फोट (रशिया) – सायबेरियामध्ये उल्कापाताने मोठा स्फोट झाला, २००० चौरस किमी परिसरातील झाडे नष्ट.• १९९७ – हाँगकाँग या ब्रिटिश वसाहतीचा चीनकडे अधिकृत ताबा सोपवण्यात आला.🎉 महत्त्वाच्या व्यक्तींच्या जयंती / पुण्यतिथी:• १९१७ – सुप्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माता व्ही. शांताराम यांचा जन्मदिवस.• १९३६ – मराठी लेखक आणि समीक्षक शं. ना. नवरे यांचा जन्म.• २००३ – हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते दादा मुनि – अशोक कुमार यांचे निधन.🌍 जागतिक / राष्ट्रीय दिवस:🌐 आंतरराष्ट्रीय लिपा दिन (International Asteroid Day)→ हा दिवस तुंगुस्का स्फोटाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.→ यामागील हेतू: मानवजातीस धोका असणाऱ्या उल्का आणि अंतराळातील वस्तूंबद्दल जनजागृती करणे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लॉकडाऊन नंतरचे जीवन*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सरकारकडून हिंदीचा GR रद्द, ठाकरे बंधूंचाही मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *हिंदी संदर्भातील शासनाचे दोन्ही निर्णय रद्द, राज्य सरकारची मोठी घोषणा, डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनास आजपासून प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अहिल्यानगर, जळगावात बनावट नोटांचे रॅकेट उघड:दोन्ही घटनांत सुमारे 67 लाखांच्या बनावट नोटा जप्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *जनगणना 2027- पहिला टप्पा 1 एप्रिल 2026 पासून सुरू होणार, घरांची यादी केली जाईल; राज्यांना सूचना- 31 डिसेंबर 2025 पर्यंत सीमांकन पूर्ण करा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *गडचिरोलीतील 1000 शाळांमध्ये भिंतीवरील पुस्तकालय, रत्ननिधी ट्रस्टकडून 50 हजार पुस्तकांचे योगदान, 1 लाख विद्यार्थी होणार लाभार्थी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन, सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते भूमिपूजन; 500 कोटींच्या इमारतीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 नागोराव तिप्पलवाड, साहित्यिक, बरबडा👤 शिवाजी नाईकवाडे, विस्तार अधिकारी, नांदेड 👤 विष्णू सोरते, मुख्याध्यापक, नांदेड 👤 स्नेहल आयरे, शिक्षिका, मुंबई 👤 विठ्ठल जाधव, शिक्षक तथा साहित्यिक, बीड 👤 सतिश गादेवार, शिक्षक, धर्माबाद *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 13*दोन अक्षरी नाव आहे, नेहमी सर्दी असते नाकावर, कागद माझा रुमाल आहे, माझे नाव काय आहे ते सांगा…?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - तोंड ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रगती व्हायला हवी असेल तर मिळणाऱ्या अनुभवातून योग्य शहाणपण घेतच पुढे जात राहिले पाहिजे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) देशातील पहिल्या संविधान उद्देशिका ( प्रास्ताविका ) पार्क कोठे उभारण्यात आला आहे ?२) आचार्य श्री विद्यानंद महाराज यांच्या शताब्दी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणती पदवी प्रदान करण्यात आली ?३) पुरी येथील रथयात्रेत कोणत्या तीन देवी - देवतेचे रथ सजविले जातात ?४) 'पाण्याखालून चालणारी बोट' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) सिंधू नदीचा उगम कोठे होतो ? *उत्तरे :-* १) नागपूर २) धम्मचक्रवर्ती ३) श्री जगन्नाथ, भगवान बलभद्र, देवी सुभद्रा ४) पाणबुडी ५) मानसरोवर जवळ, कैलास पर्वतरांग*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 आपण झोपतो म्हणजे काय ? 📙 झोप झाल्यावर माणूस ताजातवाना होतो. रोज आपण दिवसभराच्या परिश्रमानंतर झोपी जातो व सकाळी उठून परत कामाला लागतो. झोप न मिळाल्यास काय होते हे तुम्ही आहे अनुभवले असेल. आपण चिडचिडे होतो, कामात लक्ष लागत नाही, डुलक्या येतात, कधी कधी चक्कर येते यावरून झोप घेणे ही अपरिहार्य गोष्ट आहे हे आपल्या लक्षात येईल. लहान मुले १६ ते १८ तास झोपतात या काळात अपचयाचा दर कमी असतो व मुलांची वाढ होते. हळूहळू झोप कमी होते. तरुण व्यक्तींना सात ते आठ तास झोप आवश्यक असते. वृद्धावस्थेत मात्र पाच ते सहा तास झोपही पुरते. सहसा दुपारी झोपू नये.नुसते पडून राहणे म्हणजे झोप नव्हे हे तुम्हाला माहित आहे. झोपेचे इलेक्ट्रो एनकेफॅलोग्रॅम वा मेंदूच्या कार्याच्या आलेखाद्वारे विश्लेषण केले तर असे लक्षात येते की या काळात मेंदूच्या येणाऱ्या लहरी कमी होतात; पण त्यांची उंची वाढते. नंतरच्या अवस्थेत डोळ्यांच्या जलद हालचाली होतात व मेंदूतून येणाऱ्या लहरींची संख्या वाढते. या लहरींची उंची कमी असते. झोपेच्या एका चक्रात डोळ्यांची जलद हालचाल न होणारी झोप व डोळ्यांची जलद हालचाल होणारी झोप अशा दोन अवस्था असतात. एकदा प्रौढ माणूस झोपल्यावर अशी चार ते पाच चक्र त्यात असतात. या प्रत्येक चक्राचा कालावधी दीड तासांचा असतो. झोप ही लंबमज्जेतील चेतातंतूंवर अवलंबून असते. त्यामुळे या भागाला इजा झाल्यास वा त्यावर परिणाम झाल्यास खूप झोप येते वा येतच नाही. हे जरी खरे असले तरी सामान्यतः जास्त झोप हा सवयीचा परिणाम असतो. त्यामुळे योग्य सवय लागल्यास झोप कमी होते. झोप ही जीवनासाठी आवश्यक असते कारण या काळात शरीराला विश्रांती मिळते. श्वसन व रक्ताभिसरणाचे कार्य मंदावते. अशी ही झोप जास्त झाली तर मात्र झोपाळूपणाचा आरोप येतो आणि खूप कमी झाली तरी चिंता वाटते.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ब्रम्हा विष्णू आणि महेश, सामोरी बसलेमला हे दत्त गुरु दिसले || धृ ||माय उभी हि गाय होवुनी, पुढे वासरू पाहे वळूनीकृतज्ञेतेचे श्र्वान बिचारे पायावर झुकले || १ ||चरण शुभंकर फिरता तुमचे, मंदिर बनले उभ्या घराचेघुमटा मधुनी हृदय पाखरू, स्वानंद फिरले || २ ||तुम्हीच केली सारी किमया, कृतार्थ झाली माझी कायातुमच्या हाती माझ्या भवती, औदुंबर बसले || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जे आपल्याला हवे असते तेच मिळविण्यासाठी आपण रात्रंदिवस धावपळ करत असतो आणि एकदा ते मिळाले की, मनाला विशेष समाधान मिळत असते. पण ज्यांना माणसाची व त्याकडून मिळणाऱ्या मदतीची खरी गरज असते, त्यांच्याकडे मात्र आपली लक्ष जात नाही. ही आजची वास्तविकता आहे. म्हणून स्वतः साठी जगण्याआधी जरा आजूबाजूला ही थोडी लक्ष देऊन बघण्याचा प्रयत्न करून बघावा. जेणेकरून आपल्या एका सहकार्याने आणि माणुसकीच्या नात्याने एखाद्याला खूप मोठी मदत मिळू शकते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सकारात्मक दृष्टिकोन**एक बेडूक डोंगराच्या टोकावर चढण्याचा विचार करतो आणि पुढे सरकतो, तेंव्हा इतर सर्व बेडूक जोरजोरात ओरडायला लागतात, "हे अशक्य अाहे.... आजपर्यंत कोणीच चढू शकला नाही... हे संभव नाही....नाही चढू शकणार"*मात्र, कोणाचेही न ऐकता शेवटी तो बेडूक डोंगराच्या टोकावर पोहचतोच.... *तुम्हाला माहिती आहे याचे कारण काय आहे ते??**कारण, तो बेडूक "'बहिरा"' होता... आणि सर्व बेडकांना ओरडताना पाहून त्याला वाटत होते की, ते माझा उत्साह वाढवत आहेत.**म्हणूनच जर तुम्हाला तुमचे "'ध्येय"' गाठायचे असेल तर, नकारात्मक लोकांच्या प्रति "'बहिरे" व्हा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले ध्येय गाठा. ..!*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28 जून 2025💠 वार - शनिवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/165bv8yyKZ/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :-• १९४० - रोमेनियाने मोल्दोव्हा रशियाच्या हवाली केले.• १९५० - कोरियन युद्ध - उत्तर कोरियाने सोल जिंकले.• 2005 -कॅनडात समलिंगी लग्नाला मुभा💥 जन्म :-• १९२१ - माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव• १९२६ - मेल ब्रूक्स, अमेरिकन चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता.• १९३० - इतमार फ्रँको ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.💥 मृत्यू :-• १९१३ - मनोएल फेराझ दि कॅम्पोस सॅलेस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.• १९१४ - आर्चड्युक फ्रांझ फर्डिनांड, ऑस्ट्रियाचा राजकुमार.• १९१४ - काउन्टेस सोफी चोटेक, आर्चड्युक फ्रांझ फर्डिनांडची पत्नी.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन - शिक्षण अंकात प्रसिद्ध झालेला लेख *पालक नव्हे मित्र बना*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यभरातील 51 IPS अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. *•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई : 61 व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने तसेच तांत्रिक आणि बालकलाकार विभागातील पुरस्कारांची सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *ठाकरे बंधूंच्या 5 तारखेच्या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीर पाठिंबा, जयंत पाटील यांचं ट्विटद्वारे आवाहन.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत पुणे येथे 'हेजिंग डेस्क' सुरू, या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाच्या भावातील चढ-उतारांपासून संरक्षण मिळेल.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *काटेवाडीत संत तुकारामांची पालखी दाखल, धोतराच्या पायघड्यांनी पालखीचे स्वागत, डोळ्यांचे पारणे फेडणारा मेंढ्यांचा रिंगण सोहळा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *'काँटा लगा' गर्ल शेफाली जरीवालाचे वयाच्या ४२ व्या वर्षी हृदयविकाराने निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अकरावी प्रवेशाची ऑनलाईन पहिली यादी आता सोमवारी होणार जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 मार्तंड भुताळे, सेवानिवृत्त अधिकारी, देगलूर👤 प्रभाकर लखपत्रेवार, पत्रकार, नायगाव👤 दीपक ईबीतवार👤 रामदास कदम👤 शुभम पाटील👤 अभिषेक लकडे👤 सय्यद खदीर पटेल👤 रवी जयंते*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 12*आटंगण पटंगण, लाल लाल रान, अन् बत्तीस पिंपळांना एकच पान*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - पोपट ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भाग्याची दारे सर्वत्र आहेत प्रयत्नाने प्रगती करणाऱ्या प्रत्येकाच्या मार्गात ती लागतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणारे पहिले भारतीय कोण ?२) पर्यावरण समतोल राखण्यासाठी एकूण भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के भूभाग वनाच्छादित असणे आवश्यक आहे ?३) शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याचा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील कितवे राज्य आहे ?४) 'पाहण्यासाठी आलेले लोक' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) कोणत्या वर्षापर्यंत भारत नक्षलमुक्त करण्याचे उद्दिष्ट गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केले आहे ? *उत्तरे :-* १) शुभांशू शुक्ला २) ३३ टक्के ३) पहिले ४) प्रेक्षक ५) ३१ मार्च २०२६*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *माणूस का घोरतो ?* 📙नातेवाईक, मित्र, शेजारी यांना आपल्या घोरण्याने त्रस्त करणारी व्यक्ती स्वतः मात्र सुखाने घोरत झोपलेली असते आणि अशा व्यक्तींचा आपण घोरतच नाही, असा पक्का विश्वास असतो.घोरण्याची अनेक कारणे आहेत. घोरण्याची सवय प्रौढ पुरुषांमध्ये अधिक आढळते. त्यातही लठ्ठ व्यक्ती जास्त घोरतात. झोपल्यावर स्वरयंत्रामधील आणि घशातील स्नायू शिथिल झाल्याने श्वासोच्छ्वासात अडथळा निर्माण होतो आणि अशा अडथळ्यामुळे व्यक्ती घोरावयास लागते.वरील कारणांशिवाय घशातील टाॅन्सील, लहान मुलातील नाकाच्या मागच्या बाजूचे टॉन्सिल (अॅडेनॉइड्स) वाढलेले असणे, पडजीभ मोठी होणे, घशातील स्वरयंत्रातील ट्यूमर, नाकातील हाड वाकडे असणे; यांमुळेही माणूस घोरतो. तसेच काही झोपेची औषधे, झटक्यांवरची औषधे यांच्यामुळेही माणूस घोरू शकतो. खूप दारू पिणाऱ्या व्यक्तींमध्येही घोरण्याची सवय आढळून येते. अशा या घोरण्यावर उपाय करता येतो. नाकाच्या, घशाच्या व्याधी असतील तर त्यावर उपचार करणे; दारूचे व्यसन बंद करणे, लठ्ठपणा कमी करणे, ज्या औषधांमुळे घोरतो ती औषधे बंद करणे; असे उपाय केले जातात. तसेच गरज पडल्यास औषधे दिली जातात. घोरण्यावर उपाय करून घेणे चांगले ; कारण घोरण्यामुळे फुप्फुसाचे, हृदयाचे आजार होऊ शकतात. काही घोरणाऱ्या व्यक्तींना झोपेत श्वास बंद होण्याची सवय असते. यामुळेही हृदयावर घातक परिणाम होतो. म्हणून घोरणे जसे दुसऱ्याला त्रासदायक ठरते तसे घोरणाऱ्या व्यक्तीलाही हानी पोहोचवू शकते.डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून, मनोविकास प्रकाशन *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दत्त दर्शनाला जायचं जायचंआनंद पोटात माझ्या मावेना || धृ ||गेलो गाणगापुरी थेट घेतली दत्ता ची भेटया या डोळ्याची हौस पुरी होईना होईना || १ ||रूप सावळे सुंदर गोजिरवाणी मनोहरया या नजरेस आणि काही येईना || २ ||रुती नाथ पांडुरंग दत्त गारुडी अभंगया भजनाची हौस पुरी होईना होईना || ३ ||नजर बंदीचा हा खेळ, खेळे सदगुरू प्रेमळखेळ खेळीता खेळ पुरा होईना || ४ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुसऱ्याची वाट लावून आनंद घेण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. जो पर्यंत अंगात ताकद आणि हातात पैसे, धनसंपत्ती भरभरून असते तो पर्यंत ह्या सर्वच गोष्टी करायला ही जास्त वेळ लागत नाही. पण, जेव्हा ह्या सर्वच व्यर्थ गोष्टी हळूहळू कमी व्हायला लागतात तेव्हा मात्र मुखातून एक शब्द सुद्धा बाहेर पडत नाही. कारण असा एक कोणीतरी असते तो दिसत नाही मात्र योग्य वेळ आल्यावर त्याची चालते त्यावेळी कितीही शक्तीशाली माणूस असेल तरी त्याच्यासमोर कोणाचे चालत नाही. म्हणून कोणाची वाट लावून आनंद घेण्यात किंवा समाधान मानण्यात सुंदर असे आयुष्य गमावू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*प्राप्त परिस्थितीत समाधान मानने.*एकदा एक भुंगा गुंजारव करत फिरत होता. तेव्हा त्याला एक चिमणी म्हणाली, 'मूर्खा, तू जो एकसारखा एकच आवाज काढत बसतो तो कशासाठी? वसंतऋतूत गाणारी कोकिळा, हिरव्यागार झाडाच्या फांदीवर बसून गाणारा तो पक्षी बघ यांची बरोबरी तुला कधीतरी करता येईल का? तसे जमत नाही तर भिकार सूर एकसारखा काढून तू लोकांना कंटाळा का आणतोस?' भुंगा म्हणाला, 'अगं चिमणे, परमेश्वराने या जगात प्रत्येक व्यक्तीत निराळेपणा ठेवला आहे. वैचित्र्य असणे हा जगाचा नियम आहे, दुसर्याचा हेवा न करता ज्याने त्याने आपापल्या शक्तीचा उपयोग केला तर त्यात वाईट काय? जेव्हा कोकिळेचे गाणे बंद पडते तेव्हा एखाद्या सुंदर बागेत निर्जनता भासू न देण्यात माझ्या गरीबाचा उपयोग होतो.'*तात्पर्य :- सर्व मनासारखे होत नाही, तर जे असेल त्यात समाधानी असावे. प्राप्त परिस्थितीत समाधानी राहणे हेच उत्तम.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 27 जून 2025💠 वार - शुक्रवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/16ZEi27xdj/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :-• १९९१ - युगोस्लाव्हियाने स्लोव्हेनियावर आक्रमण केले.• १९९८ - कुआलालम्पुर विमानतळ खुला.💥 जन्म :-• १८६९ - हान्स श्पेमान, जर्मन प्राणीशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.• १९१७ - खंडेराव रांगणेकर, भारतीय क्रिकेट खेळाडू.• १९३० - रॉस पेरो, अमेरिकन उद्योगपती व राजकारणी.• १९५१ - मेरी मॅकअलीस, आयरिश राष्ट्राध्यक्ष.• १९६३ - मीरा स्याल, ब्रिटीश लेखिका, अभिनेत्री.💥 मृत्यू :-• १९९९ - जॉर्ज पापादुपॉलस, ग्रीसचा हुकुमशहा.• २००८ - सॅम माणेकशा, भारताचे फिल्ड मार्शल.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*दृष्टी तशी सृष्टी*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *Axiom 4 : ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्यासह इतर अंतराळवीरांसहा स्पेसएक्स ड्रॅगन कॅप्सूल आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनला जोडलं गेलं*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 30 जून ते 18 जुलै दरम्यान, हिंदी सक्ती, शक्तिपीठ महामार्ग, शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यांवर वादळी ठरण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यभरात पावसाची रिपरिप वाढली, मराठवाड्यात 65 महसूल मंडळात अतिवृष्टी; विदर्भात पुढील 5 दिवस तीव्र अलर्ट, IMD चा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मंत्रिमंडळाने भूसंपादनाला मंजुरी दिली पण शक्तिपीठ महामार्गामुळे राज्य कर्जबाजारी होणार, वित्त खात्याचा धक्कादायक अहवाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मराठवाडा आणि दुष्काळी भागाचं चित्र बदलणारा शक्तिपीठ महामार्ग असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राज ठाकरेंनी हिंदी सक्तीविरोधातील मोर्चाची तारीख बदलली, 6 ऐवजी 5 जुलैला निघणार मोर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्यात बुमराहच्या जागी अर्शदीप सिंगला भारताच्या संघात स्थान मिळण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुशील कापसे👤 अनुपमा जाधव👤 हिरालाल पगडाल, एस बी सी नेते, पुणे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 11*पाणी नाही, पाऊस नाही, तरी रान कसं हिरवं, कात नाही, चुना नाही, तरी तोंड कसं रंगलं …?*ओळखा पाहू मी कोण ?उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - सावली ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मन आशावादी हवे, बरेचदा काम केले तरी यश मिळत नाही तरीही तुम्ही काम सोडू नका.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) अँक्झीऑम - ४ मोहिमेअंतर्गत कोणत्या भारतीय अंतराळवीराने अंतराळात झेप घेतली आहे ?२) १९८४ मध्ये राकेश शर्मा यांनी कोणत्या देशाच्या अंतराळ यानातून अंतराळात प्रवास केला होता ?३) रामोशी बांधवांना संघटित करून इंग्रजाविरुद्ध कोणी बंद केले ?४) 'पायात जोडे न घातलेला' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) हिमरू शालीसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते ? *उत्तरे :-* १) शुभांशू शुक्ला २) रशिया ३) उमाजी नाईक ४) अनवाणी ५) छत्रपती संभाजी नगर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌎 *पृथ्वीचा जन्म केव्हा झाला ?* 🌎आपण कोणालाही त्याची जन्मतारीख विचारतो तेव्हा अप्रत्यक्षपणे आपण त्यांचं वय किती आहे, हेच विचारात असतो. पृथ्वीचा जन्म केव्हा झाला हे विचारताना पृथ्वीचं आजमितीचं वय काय आहे हेच आपल्याला जाणून घ्यायचं असतं. ते आता वैज्ञानिक प्रणालींच्या मदतीने जवळजवळ अचूकपणे सांगणे शक्य झालं आहे.पहिली प्रणाली ज्याला भूगर्भशास्त्रज्ञ स्ट्रॅटिग्राफिक अॅनॅलिसिस म्हणतात त्याची आहे. भूगर्भात आणि धरतीच्या पृष्ठभागावरही निरनिराळे कातळांचे थर सापडतात त्यांची चिकित्सा करून ते किती पुरातन आहेत याचा छडा लावण्याची प्रक्रिया या प्रणालीत अंतर्भूत आहे. त्यासाठी उपयोगात आणलेले बहुतेक कातळ रूपांतरित म्हणजेच मेटॅमाॅर्फिक जातीचे आहेत. या कातळांच्या रूपांचं तसंच त्यांच्या वेगवेगळ्या थरात सापडलेल्या जीवाश्मांचं परीक्षण करून त्या कातळांचं वय ठरवलं जातं. ते साधारण साडेतीन अब्ज वर्षे एवढं असल्याचं निदान केलं गेलं आहे. म्हणजेच पृथ्वीचं वय किमान तेवढं असलं पाहिजे. परंतु रूपांतरित खडक अग्निजन्य तसंच गाळांच्या खडकांचं रूपांतर होत होत तयार होत असतात. याचाच अर्थ असा की पृथ्वीचं वय त्याहीपेक्षा जास्त असलं पाहिजे.त्यासाठी रेडिओमेट्रिक डेटिंग प्रणालीचा अवलंब केला गेला. रेडिओकार्बन डेटिंगमध्ये कोणत्याही पदार्थातील कार्बनच्या बारा अणुभाराच्या आणि चौदा अणुभाराच्या अशा दोन समस्थानकांचं एकमेकांशी असलेलं प्रमाण तपासलं जातं. यापैकी चौदा अणुभाराचं समस्थानक किरणोत्सारी आहे. निसर्गात या दोन रुपांचं एकमेकांशी असलेलं प्रमाण निश्चित आहे. जेव्हा वनस्पती हवेतून कार्बनडायआॅक्साईड शोषून घेतात तेव्हा या दोन रुपांचं वनस्पतींमधील प्रमाणही निसर्गात जेवढं असतं तेवढंच भरतं. पण एकदा का वनस्पती मृत झाली की त्यात त्या वेळी असलेल्या किरणोत्सारी कार्बनच्या रूपाचं प्रमाण घटत जातं. त्यामुळे वनस्पतींच्या किंवा प्राण्यांच्या अवशेषांमधील या दोन रूपांचं एकमेकांशी असलेलं प्रमाण मोजून त्या जीवाश्मांचे वय निश्चित करता येते. याच तत्त्वावर आधारित पण कोट्यवधी वर्षे पुरातन असलेल्या वस्तूंचं, खडकांचं वय निश्चित करण्यासाठी युरेनियम शिसं, थोरियम शिसं, रुबिडियम स्ट्रॉन्शियम यासारख्या मूलतत्त्वांच्या जोड्यांचं एकमेकांशी असलेलं प्रमाण मोजण्याची पद्धत विकसित केली गेली आहे.तिसरी प्रणाली भूगर्भातील शिशाचं निरनिराळ्या ठिकाणी असलेल्या तसंच सौरमालिकेत इतरत्र असलेल्या त्याचं प्रमाण मोजण्याची आहे. या पद्धतीनुसारही पृथ्वी किमान साडेचार अब्ज वर्षांपूर्वी प्रस्थापित झाल्याचं निदान झालं आहे. म्हणजेच पृथ्वीचा जन्म साडेचार अब्ज वर्षांपूर्वी झाला असं आपण म्हणू शकतो.*बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••निघालो घेवून दत्ताची पालखीआम्ही भाग्यवान आनंद निधान, डुलते हळूच दत्ताची पालखी || धृ ||रत्नाची आरास साज मखमलीचीत्यावरी सुगंधी फुले गोड ओळी, झुळूक कोवळी चंदना सारखी || १ ||सात जन्माचि हो लाभली पुण्याईम्हणुनी जाहलो पालखीचे भोई, शांतमय मूर्ती पाहते सारखी || २ ||वात वळणाची जवालागे ओढीदिसते समोर नरसोबाची वाडी, दोलीयात गंगा जाहली बोलकी || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपण कोणाचे वाईट करत नाही किंवा त्यांच्याविषयी चुकीचे विचार करत नाही त्यावेळी आपले वाईट होईल ह्या प्रकारची भीती आपल्याला वाटत नसते. म्हणून कोणाविषयी का असेना त्यांच्याप्रती आपल्या मनात आदराचीच भावना असायला पाहिजे. भीती मुळात वाटणार नाही. जरी त्यावेळी कोणी आपला मुद्दामहून जरी अनादर करत असतील तरी तो आपला अपमान होत नाही कदाचित त्यांच्यात असलेल्या विचाराचा व वागणुकीचा अपमान होत असतो. फरक एवढेच की त्याविषयी त्यांना वेळेत, कळत नाही. म्हणून या प्रकारची वागणूक किंवा विचार आपल्यात नसायला पाहिजे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *जंगलचा राजा*एका अरण्यात एक सिंह राहात होता. त्या अरण्यात तो एकटाच शक्तीशाली असल्यामुळे वाटेल तसा वागत असे व तेच योग्य असे म्हणत असे. एकदा सर्व प्राण्यांना एकत्र बोलावून तो म्हणाला, 'प्रत्येकाने मला आपल्या शक्तीप्रमाणे खाद्य पुरवावं म्हणजे रोज शिकार करण्याचा माझा त्रास वाचेल.' सगळ्यांनी ही गोष्ट मान्य केली. पण हा कर कोणत्या धोरणाने बसवावा याबद्दल निश्चित पद्धति ठरे ना. वाघ उभा राहून म्हणाला, 'मला वाटतं, कोणी किती पाप केलं ते पाहून त्या मानाने त्याच्यावर कराची आकारणी करावी, प्रत्येकाने आपल्या शेजार्यावरील कराची आकारणी करावी म्हणजे फसवेगिरीला जागा राहणार नाही.' त्यावर हत्ती लगेच म्हणाला, 'छे, छे, वाघोबाची ही युक्ती निरुपयोगी आहे. त्यामुळे द्वेष, जुलूम वाढतील. माझ्या मते प्रत्येकाचे सद्गुणावर कर बसवावा व तो ज्याचा त्यानेच द्यावा. अशा योजनेने सरकारी तिजोरीत पुष्कळ भर पडेल.'*तात्पर्य - आपले दुर्गुण असतील तर ते झाकून ठेवायचे व थोड्याशा सद्गुणाचे मोठे प्रदर्शन करायचे असा प्रत्येकाचा स्वभाव असतो.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 26 जून 2025💠 वार - गुरुवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/19VPhMPCpW/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••• जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन• सामाजिक न्याय दिन💥 ठळक घडामोडी :-• १८१९ - सायकलचा पेटंट देण्यात आला.• १९६० - सोमालियाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.• १९६० - मादागास्करला फ्रांसपासून स्वातंत्र्य. • १९९९-नांदेड तालुक्यातील किनवट तालुक्याचे विभाजन करून माहूर हा नवीन तालुका तयार करण्यात आला. 💥 जन्म :-• १८७४ - राजर्षी शाहू महाराज• १८८८ - नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व, मराठी रंगभूमीवरील अभिनेते, गायक.• १८९२ - पर्ल बक, अमेरिकन लेखिका.💥 मृत्यू :-• १९४४ - प्रफुल्लचंद्र रे, भारतीय रसायनशास्त्रज्ञ.• २००१ - वसंत पुरुषोत्तम काळे, मराठी साहित्यिक.• २००४ - यश जोहर, भारतीय चित्रपट निर्माता.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*महाराजांचे महाराज*आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांन जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..... पूर्ण कविता वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *CBSE चा मोठा निर्णय, 2026 पासून दहावीच्या परीक्षा दोन वेळा, नव्या नियमांना मंजुरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *Axiom-4 मिशन - शुभांशूसह चार अंतराळवीर अंतराळ स्थानकाकडे झेपावले*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *माळेगाव सहकारी साखर कारखान्यात अजित पवार यांनी मारली बाजी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *येत्या एक जुलैपासून रेल्वेकडून प्रवाशांना एसएमएस, पोर्टल, स्टेशन डिस्प्ले आणि सार्वजनिक सेवा देण्यात येणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी, 3626 कोटींच्या खर्चाला मान्यता *•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *खरीप पेरण्यांच्या तोंडावर राज्यात युरिया अन् डीएपी खतांचा तुटवडा, पेरण्यांपूर्वीच शेतकऱ्यांची दमछाक*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *नवी दिल्ली :- आशिया चषकासाठी सूर्यकुमार यादवकडेच राहणार भारताचे नेतृत्व*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 रमेश इटलोड, शिक्षक नेते, नांदेड 👤 नारायण ईबीतवार👤 राजेश पाटील उमरेकर👤 संतोष रेड्डी बोमीनवाड👤 सुरेश यादव👤 अनिल पाटील भुसारे👤 गणेश आरटवार👤 कैलास स्वामी👤 शेख बाशू👤 मनीष अग्रवाल👤 कृष्णा भोरे👤 बालाजी सावंत👤 लक्ष्मण नोमुलवार बाभळीकर👤 अंकुश कामगोंडे👤 पुरुषोत्तम रेड्डी चाकरोडs*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 10*रंगाने काळी आहे, ती प्रकाशात दिसते पण अंधारात दिसत नाही, मला सांगा की ते काय आहे ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - गरम मसाला ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्ञानाची तळमळ असणाराच वेगळे कार्य करून समाजधर्म पाळतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २०२५ मधील जगातील सर्वात सुंदर महिलेचा किताब कोणी पटकावला ?२) पुणे येथील शनिवारवाडा कोणी बांधला ?३) ज्योतिबांना सावित्री कोणत्या नावाने हाक मारीत असे ?४) 'खूप मोठा विस्तार असलेले' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) पहिले बाजीराव पेशवे यांचे मूळ नाव काय होते ? *उत्तरे :-* १) डेमी मूर, अमेरिकन हॉलीवुड अभिनेत्री, वय ६२ वर्षे २) पहिले बाजीराव पेशवा ( सन १७३६ ) ३) शेठजी ४) विस्तीर्ण, ऐसपैस ५) विसाजी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••😴 *आपण केव्हा घोरतो ?* 😴 तसंच पाहिलं तर सर्वच जण घोरतात. पण कोणी ते कबूल करायला तयार नसतो. तसा सबळ पुरावा दाखवून ते कबूल करून घेणंही सोपं नसतं. कारण माणूस घोरतो ते झोपेत. त्या वेळी त्याला आजूबाजूच्या जगाचं भानच नसतं. त्याला उठवलं तर तो घोरत होता याचा पुरावाच नष्ट होतो. तरी बरं अलीकडे अँड्रॉइड वगैरे प्रकारच्या मोबाइल फोनवर कोणाचाही साग्रसंगीत व्हिडिओ घेण्याची सोय आहे. त्याचा वापर करून माणूस घोरी घराण्याचा सदस्य असल्याचं सिद्ध करता येतं.माणूस गाढ झोपलेला असताना घोरतो हे तर स्पष्टच आहे. तरीही नेमकी कोणती परिस्थिती त्याच्या घोरण्याला कारणीभूत होते हेही समजून घेतलं, तर तो केव्हा घोरतो हे स्पष्ट होईल. झोपेत असताना आपले स्नायू शिथिल पडलेले असतात. आपल्या घरातील अवयवांचं नियंत्रण करणाऱ्या स्नायूंचीही तीच स्थिती असते. त्यामुळे मऊ टाळू, जीभ, पडजीभ वगैरे अवयवांची या नियंत्रणापासून सुटका होते. त्याच वेळी श्वासनलिकाही सुस्तावल्यामुळे अरुंद झालेली असते. ज्या वेळी आपण श्वास घेतो तेव्हा तो या अरुंद श्वासनलिकेतून आत जाण्याचा प्रयत्न करतो. त्याला अर्थात त्या अरुंद नलिकेकडून विरोध होतो. त्याचा परिणाम जवळच्या मृदू अवयवांवर पडून ते फडफडू लागतात. त्यांचाच जोराचा आवाज होतो. तोच आपल्याला घोरण्याच्या स्वरूपात ऐकू येतो. कधीकधी सर्दीमुळे किंवा अशाच काही कारणांमुळे नाक चोंदलेलं असतं. त्यातून वाट काढणाऱ्या श्वासालाही विरोध होतो. त्यावर मात करण्यासाठी हवेला जास्त जोर लावावा लागतो. परिणामी हवेचा प्रवाह सुरळीत होण्याऐवजी खळबळल्यासारखा होतो. त्या खळबळीपोटी घशातल्या मृदू अवयवांची फडफड होते. माणूस घोरायला लागतो.घोरण्याचा केवळ इतरांना त्रास होतो असं नाही. तर घोरणाऱ्या व्यक्तीलाही त्याचा त्रास होत असतो. कारण घोरण्यामुळे बर्याच वेळा झोप चाळवली जाते. काही वेळा तर जागही येते. परत झोप लागणं कठीण होतं. व्यवस्थित झोप न मिळाल्यामुळे उठल्यावर माणूस तेवढा ताजातवाना राहू शकत नाही.जसा खोकला हा आजार नाही तर ते केवळ लक्षण आहे, तसंच घोरणंही हा आजार नाही. तेही एक गंभीर ठरू शकणाऱ्या आजाराचं लक्षण आहे. कधीकधी झोपेत असताना श्वासोच्छ्वासाला अडथळा होतो. याला अाॅब्स्टक्ट्रिव्ह स्लीपअॅंप्निया म्हणतात. झोपेत असल्यामुळे या अडथळ्याचं रूपांतर श्वासोच्छ्वास थांबण्यात कधी होतं ते कळतही नाही. तसं झाल्यास जीवघेणी परिस्थिती उद्भवू शकते. त्यावर वेळीच उपाय करणं आवश्यक असतं. त्यामुळे अतिघोरणं होत असेल व त्यातून झोप वरचेवर चाळवली जात असेल तर डॉक्टरी तपासणी करून घेणं हिताचं ठरतं.बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून 👆🏼*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माऊली च मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा || धृ ||काय तुझी माया सांगू श्रीरंगा, संसाराची पंढरी तू केली पांडुरंगाडोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, अमृताची गोडी आज आलीया अभंगा विठ्ठला $...$..$..$..$अभंगाला जोड टाळ चिपळ्याची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाची || १ ||लेकरांची सेवा केलीस तू आई, आs आs आs लेकरांची सेवाकस पांग फेडू कस होवू उतराई, तुझ्या उपकारा जगी तोड नाहीओवाळीन जीव माझा सावळे विठ्ठाई, जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची || २ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• आपल्या डोक्यावर असलेल्या केसांमध्ये किती मळ आहे ते, आपल्याला माहीत नसते त्यासाठी आधी ते केस धुतल्यावरच कळत असते. तसेच दुसऱ्याच्या मनात काय सुरु आहे या विषयी सुद्धा आपल्याला काहीच माहीत नसते. म्हणून जसे आपण, आपले केस धुत असतो तसंच दुसऱ्याला ओळखण्यासाठी आपले विचार सुद्धा तेवढेच सकारात्मक असणे आवश्यक आहे. कारण बरेचदा असं होतं की, चांगले माणसं आपण ओळखू शकत नाही अन् चुकीचे माणसं जवळ करताना आनंद मिळत असतो पण,तोच मिळणारा आनंद एक दिवस आपल्या आयुष्याची वाट लावत असते म्हणून आपण थोडी सावधगिरी बाळगायला हवी. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*विठ्ठलाने स्वतः ज्ञान न देता गुरूंकडे पाठवणे*एकदा सर्व संत मंडळी जमली होती. तेव्हा मुक्ताबाईने गोरा कुंभारांना सांगितले की, 'सर्व संतांची परीक्षा घ्या'. त्यांनी एक लाकूड घेतले आणि लाकडाने सगळ्यांच्या डोक्यावर एक-एक थापटी मारली. जेव्हा नामदेवांच्या डोक्यावर थापटी बसली, त्या वेळी ते काहीच बोलले नाहीत; पण रागाने त्यांचे तोंड फुगले. त्यांनी अहंकाराने विचार केला, ‘मातीच्या भांड्यासारखी माझी परीक्षा होऊ शकते का ?' नंतर गोरा कुंभारांनी सांगितले, ‘‘नामदेव सोडून सगळ्यांची मडकी पक्की आहेत. हे ऐकून नामदेव विठ्ठलाजवळ आले आणि घडलेली सर्व घटना त्याला सांगितली. देवाने सांगितले, ‘मुक्ताई आणि गोरोबा म्हणत आहेत की, तुझे डोके कच्चे आहे, तर तू खरोखरीच कच्चा आहेस; कारण तू सद्गुरूंचा आश्रय घेतला नाहीस. माझा विसोबा खेचर म्हणून एक भक्त आहे. त्याच्याकडे तू जा. तो तुला ज्ञान देईल'. संत नामदेव विसोबा खेचरांकडे आले. तेव्हा विसोबा खेचर महादेवाच्या पिंडिकेवर पाय ठेवून झोपले होते. हे पाहिल्यावर नामदेवांनी विसोबांना सांगितले, ‘‘शिवलिंगावरून आपले पाय बाजूला काढून ठेवा". त्या वेळी विसोबांनी नामदेवांना सांगितले, ‘‘ज्या ठिकाणी शिवाचे अस्तित्व नाही, अशा ठिकाणी तू माझे पाय काढून ठेव". नामदेव जिथे जिथे पाय ठेवायचे, तिथे तिथे शिवलिंग प्रकट होत असे. त्यामुळे सगळा गाभारा शिवलिंगांनी भरून गेला. हे पाहून नामदेवांना आश्चर्य वाटले. त्या वेळी विसोबा खेचरांनी सांगितले, ‘‘भगवंत सर्वत्र आहे; पण या इंद्रियांनी आपल्याला त्याची जाणीव होत नाही". नामदेवांच्या ठिकाणी भक्ती होती. गुरुकृपेमुळेच ‘सर्वत्र ब्रह्म आहे', याचे त्यांना ज्ञान झाले. संत नामदेव परमेश्वराच्या सगुण रूपाशी एकरूप होते. केवळ गुरुकृपेनेच त्यांना निर्गुण रूपाशी एकरूप होता आले.*तात्पर्य :- गुरूचे कार्य महान असते. गुरुकृपा ही सर्वश्रेष्ठ असते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 25 जून 2025💠 वार - बुधवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1CqZJ9v6V1/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जागतिक कोड त्वचारोग दिन*💥 ठळक घडामोडी :-• १९७५ - भारताचे राष्ट्रपती श्री.फक्रुद्दीन अली अहमद यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या शिफारशीवरून देशात अंतर्गत आणीबाणी जाहीर केली• १९८३ - क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत वेस्ट इंडिजचा पराभव करून भारत विजेता💥 जन्म :-१९०० - लुई माउंटबॅटन, इंग्लंडचा भारतातील व्हाइसरॉय.१९३१ - विश्वनाथ प्रताप सिंग, भारतीय पंतप्रधान.१९७४ - करिश्मा कपूर, हिंदी चित्रपट अभिनेत्री.१९७८ - आफताब शिवदासानी, हिंदी चित्रपट अभिनेता.💥 मृत्यू :-१९९७ - जाक-इवेस कूस्तू, फ्रेंच संशोधक.२००९ - फाराह फॉसेट, अमेरिकन अभिनेत्री.२००९ - मायकेल जॅक्सन, अमेरिकन गायक.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अभ्यासाशिवाय पर्याय नाही*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *हिंदी भाषेबाबत अंतिम निर्णय सात दिवसात, त्रिभाषा सूत्राला विरोध करणाऱ्यांशी दादा भुसे चर्चा करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यात 1071 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; तीन लाख शेतकऱ्यांना होणार फायदा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांचा विजय, विरोधी उमेदवाराचा सुपडा साफ, दादांना 101 पैकी 91 मते*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *आंध्रप्रदेशातील डांगेती जान्हवी नासाचे प्रशिक्षण पूर्ण करणारी पहिली भारतीय, 2029 मध्ये अंतराळ प्रवास करणार; स्कूबा डायव्हिंग, चित्रकला यांचा छंद, चंद्रावर जाण्याचे स्वप्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पाच जेष्ठ पत्रकारांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार *•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भारताचे माजी क्रिकेटपटू दिलीप दोशी यांचे निधन, क्रिकेट विश्वात शोककळा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा 5 विकेटने पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 प्रल्हाद कापावार, स.शि. विद्यानिकेतन प्रा. विद्यालय, बिलोली👤 योगेश कात्रे👤 सुभाष लाखे👤 प्रल्हाद कापावार👤 ओम पालकृतवार👤 सुरेश कात्रे👤 रुपेश पांचाळ👤 श्रेयश इंगळे👤 संदेश कोडगिरे👤 नागेश पाटील👤 आदर्श गव्हाणे👤 राजेश अलगुंडे👤 रमाकांत गोणे👤 नादयाप्पा स्वामी👤 अशोक तनमुदले👤 दीपक जायवाड👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 09*अशी कोणती वस्तू आहे, जी फ्रीज मध्ये ठेवूनही गरमच राहते.*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - तहान ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पुस्तकप्रेमी मनुष्य अत्यंत श्रीमंत व सुखी असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोणत्या वनस्पतीला 'फ्लेम ऑफ दि फॉरेस्ट / फ्लेम ऑफ दि ट्री / जंगलाची ज्योत' असे संबोधले जाते ?२) धाबेपवनीचे 'जिम कार्बेट' असे कोणाला म्हणतात ?३) कसोटीच्या दोन्ही डावात शतक झळकावणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक फलंदाज कोण ?४) 'पाऊस मुळीच न पडणे' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची गरज असते ? *उत्तरे :-* १) पळस २) माधवराव डोंगरवार पाटील ३) ऋषभ पंत ४) अवर्षण, अनावृष्टी ५) लोह*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌗 *दिवस व रात्र केव्हा सामान होतात ?* 🌗हा प्रश्न सिंगापुरात कधीच विचारला जाणार नाही. विषववृत्तापासून अतिशय जवळ असल्यामुळे तिथे वर्षभर दिवस व रात्र समान असतात. उत्तर आणि दक्षिण, दोन्ही ध्रुवांजवळ हा प्रश्न विचारला जाणार नाही. कारण तिथं एक तर चोवीस तास रात्र तरी असते किंवा चोवीस तास दिवस. त्यामुळे दिवस आणि रात्र समान होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. इतरत्र मात्र दिवस आणि रात्र यांचे अवधी वर्षभरात सतत बदलत राहतात. कधी दिवस जास्त मोठे होतात तर कधी रात्र. त्यातही उत्तर गोलार्धात जेव्हा दिवस मोठे असतात तेव्हा दक्षिण गोलार्धात रात्री मोठ्या असतात.वास्तविक दिवस आणि रात्र ही एका 'दिवसा'ची कृत्रिम विभागणी आहे. पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतानाच स्वतःभोवतीही गिरकी घेत राहते. त्यामुळे पृथ्वीवरच्या कोणत्याही भागावर दिवसभर सूर्य तळपत नाही राहत नाही. म्हणूनच जोवर सूर्यप्रकाश आहे तोवर दिवस आणि सूर्यप्रकाश मिळणे बंद होऊन अंधाराचं साम्राज्य पसरलं की रात्र अशी विभागणी करण्यात आली आहे.तसंच पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा लंबवर्तुळाकार आहे. त्यामुळे त्या दोघांमधील अंतर कमी जास्त होत राहतं. कललेल्या अासापायी सूर्याचे किरण पृथ्वीवर सरळ न पडता एका कोनातून पडतात. त्यामुळे गोलाकार पृथ्वीच्या निरनिराळ्या भागात सूर्यप्रकाश असण्याच्या वेळात फरक पडला पडत जातो. उत्तरायणाच्या काळात उत्तर गोलार्धात दिवस मोठे असतात. तर दक्षिण गोलार्धात रात्री. जसजसा सूर्य दक्षिणायनाला प्रारंभ करतो तसतशी ही परिस्थिती उलट होत जाते. या परिस्थिती सतत उलट होण्याच्या प्रक्रियेमुळे दिवस मोठे होत जातात, कमाल पातळी गाठतात, परत लहान होत जातात, किमान पातळी गाठतात. रात्रीचीही हीच परिस्थिती असते. या उलटापालटीत दोन दिवस असे येतात की त्या दिवशी रात्र आणि दिवस यांचा कालावधी सारखाच म्हणजे बारा बारा तासांचा असतो. याला संपात म्हणतात. वसंत ऋतूची सुरुवात करणारा वसंत संपात तर शरद ऋतूची सुरुवात करणारा शरद संपात. हे दोन दिवस २१ मार्च व २३ सप्टेंबर या तारखांना येतात. म्हणजेच या दोन तारखांना दिवस व रात्र समसमान व्हायला हवेत. प्रत्यक्षात मात्र ते या दिवसांच्या आसपास होतात. याचं कारण म्हणजे सूर्य हा काही बिंदुवत नाही. त्याला निश्चित आकारमान आहे. आणि सूर्याची वरची कडा क्षितिजावर आली की दिवस सुरू होतो तर ती क्षितिजाखाली गेली की रात्र. यामुळेच दिवस व रात्र समान होण्याच्या तारखा २१ मार्च व २३ सप्टेंबरच्या आसपास येतात.*बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कानडा राजा पंढरीचावेदानाही नाही कळला अंत पार यांचा …. || धृ ||निराकार तो निर्गुण ईश्वरकसा प्रगटला असा विटेवरउभय ठेविले हात कटीवरपुतळा चैतन्याचा … || १ ||परब्रह्म हे भक्तांसाठीउभे थकले भिमेसाठीउभा राहिला भाव सांवयवजणू कि पुंडलिकाचा … || २ ||हा नाम्याची खीर चाखतोचोखोबाची गुरे राखतोपुरंदराचा हा परमात्मावाली दामाजीचा … || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जे आपल्याला हवे असते तेच मिळविण्यासाठी आपण रात्रंदिवस धावपड करत असतो. आणि एकदा ते मिळाले की, मनाला विशेष समाधान मिळत असते.पण, ज्यांना माणसाची व त्याकडून मिळणाऱ्या मदतीची खरी गरज असते, त्यांच्याकडे मात्र आपली लक्ष जात नाही. ही आजची वास्तविकता आहे. म्हणून स्वतः साठी जगण्याआधी जरा आजूबाजूला ही थोडी लक्ष देऊन बघण्याचा प्रयत्न करून बघावा. जेणेकरून आपल्या एका सहकार्याने आणि माणुसकीच्या नात्याने एखाद्याला खूप मोठी मदत मिळू शकते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *युक्तिच सर्वश्रेष्ठ*नदीच्या तिरावर एक कोळी मासे धरायला गेला. फार मोठे मासे नदीत सापडतील असे त्याला वाटले नाही म्हणून त्याने मोठे जाळे बरोबर घेतले नाही. एका काठीच्या टोकाला एक बारीक दोरी बांधून गळ वर ओढू लागला, पण मासा बराच मोठा असल्याने गळ लवकर ओढला जाईना. कोळ्याने विचार केला की, गळ लवकर ओढला तर मासा आपल्या वजनाने व चळवळीने आपली बारीक दोरी तोडून पळून जाईल तेव्हा त्याने बराच वेळपर्यंत गळ पाण्यात राहू दिला व नंतर अगदी हळूहळू तो पाण्याच्या बाहेर काढला. तोपर्यंत मासा धडपड करून अगदी निर्बळ झाला होता. त्यामुळे दोरी तोडण्याची शक्ती त्यात उरली नव्हती.तात्पर्य :- युक्तीने सर्व प्रकारच्या अडचणीतून मार्ग काढता येतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 24 जून 2025💠 वार - मंगळवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1QgLd6g8JK/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📜 इतिहासातील घटना:• १८५९ – सोल्फेरिनोची लढाई झाली. या लढाईनंतर रेड क्रॉस स्थापनेची प्रेरणा मिळाली.• १९०१ – पहिले संगणकीय संगणक आकडेमोडीचे पेटंट मिळाले.• १९८७ – लीबियन हवाई दलाने अमेरिकन सैन्याविरोधात मिसाइल हल्ला केला.• २०१० – विंबलडन टेनिस स्पर्धेतील सर्वात लांब चाललेला सामना (११ तास ५ मिनिटे) अमेरिकन जॉन इस्नर आणि फ्रान्सचा निकोला महूत यांच्यात झाला.🎂 जन्म:• १३०० – इब्न बतूता, प्रसिद्ध अरब प्रवासी आणि भूगोलज्ञ.• १९११ – जुआन मॅन्युएल फॅन्गिओ, अर्जेन्टिनाचा सुप्रसिद्ध फॉर्म्युला १ रेसिंग ड्रायव्हर.• १९२७ – मार्टिन विंटरकोर्न, जर्मन उद्योगपती.• १९८७ – लिओ मेसी, अर्जेन्टिनाचा जागतिक कीर्तीचा फुटबॉलपटू.🕯️ मृत्यू:• १९०८ – ग्रोव्हर क्लीव्हलँड, अमेरिकेचे २२वे व २४वे राष्ट्राध्यक्ष.• १९९७ – ब्रायन किट्सन, प्रसिद्ध इंग्लिश शिक्षणतज्ज्ञ.• २००० – नवाजिश लाहोटी, हिंदुस्थानी शास्त्रीय गायक.📅 विशेष दिन:• सैनिक दिन (पेरू)• इंटरनॅशनल फेरी डे (काही देशांमध्ये)••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*पावसाशी मारलेल्या गप्पा*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *अमेरिकेच्या इराणवरील हल्यानंतर संयुक्त राष्ट्रात आपत्कालीन बैठक, गुटेरेस यांचे शांततेचे आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *विठू नामाच्या गजरात संत जनाबाई यांची पालखी वारीसाठी मार्गस्थ, गंगाखेडहून पंढरपूरकडे रवाना *•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्य सरकारचा मोठा निर्णय, राजकीय आणि सामाजिक चळवळींशी संबंधित फौजदारी खटले मागे घेणार, शासन आदेश जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *लोकशाही ही भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *ST महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर, दरवर्षी 5000 नव्या बस; महामंडळाच्या शाश्वत प्रगतीसाठी श्वेतपत्रकात महसूल वाढवणे, खर्च कमी करणे व प्रवाशांच्या सुरक्षिततेसह सोयी-सुविधा वाढवण्यावर भर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुणे स्टेशनला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे नाव द्या, संभाजी ब्रिगेडची मागणी, मेधा कुलकर्णींच्या प्रस्तावाला विरोध*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *इंग्लंडसमोर 371 धावाचे लक्ष्य, ऋषभ पंत व के. एल. राहुल यांची शतकीय खेळी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सचिन रेनगुंटवार👤 कल्पना डेव्हिड बनसोड👤 कवी अनिल रेड्डी👤 सदानंद कोडगळे👤 लक्ष्मण सुरकार👤 संदीप शंभरकर👤 लक्ष्मीकांत गोपाळराव कुलकर्णी👤 रवी गंगाधर भोरे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 08*अशी कोणती गोष्ट आहे, जी पाणी पिल्याबरोबर नष्ट होते.*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - चष्मा ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विद्यार्थी हा विद्येवर चरणारा राजहंस आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'पाखरं म्हणजे अरण्याचा उडता आत्मा' असे कोण म्हणाले होते ?२) नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाचे जनक कोणाला म्हटले जाते ?३) भारतीय संस्कृतीत मोराला कशाचे प्रतीक मानले जाते ?४) 'नाटकात किंवा चित्रपटात काम करणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) प्राचीन भारतातील पहिला कीटकशास्त्रज्ञ कोणाला म्हटले जाते ? *उत्तरे :-* १) पद्मश्री मारुती चितमपल्ली २) माधवराव डोंगरवार पाटील ३) वैभव व पवित्रता ४) नट, अभिनेता ५) मांडव्य ऋषी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *आधुनिक मानवाचा उदय केव्हा झाला ?* 📙वैज्ञानिक भाषेत आधुनिक मानवाचं नाव होमो सेपियन्स असं आहे. पण हा आधुनिक मानव एकाएकी अकस्मात जन्माला आला नाही. डार्विननं सांगितल्याप्रमाणे वानर प्रजातींपासून हळूहळू उत्क्रांती होत होत त्याचा उदय झाला. म्हणून होमो या प्रजातीच्याही काही जाती आधुनिक मानवाच्या आधी उदयाला येऊन अस्ताला गेल्या. त्यांचेही पूर्वसुरी होमिनिड या नावानं आणि त्यांचेही पूर्वज होमोनाॅइड या नावाने ओळखले जातात.आफ्रिकेच्या जंगलात राहणारे होमिनाॅईड प्रजातीचे वानर साधारण ५० ते ८० लाख वर्षांपूर्वी वावरत होते. त्या कालखंडात पडलेल्या दुष्काळापोटी तिथल्या वनराजीला ग्रहण लागलं. त्यामुळे झाडांवर राहणाऱ्या या वानरांना आपलं बस्तान दुसरीकडे तर हलवावं लागलंच, पण अन्नाच्या शोधासाठी तसंच वास्तव्यासाठीही झाडांचा आश्रय सोडून जमिनीवर उतरावं लागलं. आफ्रिकेतल्याच सॅव्हॅन्ना या गवताळ जंगलांमध्ये ज्यांनी आश्रय घेतला, त्या वानरांचे वंश टिकून राहिले. ही वानरं दिवसा जमिनीवर उतरून अन्नाचा शोध घेत, पण रात्र झाली की परत आपल्या झाडांवरच्या मुक्कामी परतत.जमिनीवरचं मिळालेलं अन्न परत आपल्या झाडांवरच्या मुक्कामस्थळी हलवायचं तर ते पुढच्या दोन पायांमध्ये म्हणजेच हातांमध्ये धरून आणावं लागे. ते करण्याची क्षमता ज्यांनी मिळवली त्या जातींना तगून राहण्यास मदत झाली. त्यातूनच हळूहळू दोन पायांवर उभे राहणारे नवीन होमिनिड प्राणी उदयाला आले. हे मानवसदृश असले तरी त्यांनी वानरजातीचे गुणधर्म संपूर्णपणे त्यागलेले नव्हते. झाडांचा आश्रय त्यांनी संपूर्ण सोडलेला नव्हता. या प्रजातीतही उत्क्रांती होत गेली. आणि त्यातूनच पहिले होमो प्रजातीतले प्राणी उदयाला आले. यांना होमो हॅबिलिस म्हणतात. पुढचे दोन पाय म्हणजेच हात मोकळे झाल्यामुळे त्यांचा अधिकाधिक उपयोग करायला हे प्राणी शिकले होते. ते काही आयुधं आणि अस्त्रं बनवून त्यांचा वापर शिकारीसाठी किंवा घरटं खोदण्यासाठी करायला शिकले होते. पण अजूनही ते संपूर्णपणे दोन पायांवर उभे राहू शकत नव्हते. थोडे डगमगत होते. शिवाय त्यांचा मेंदूचाही फारसा विकास झालेला नव्हता. ही झाली १५ ते ३० लाख वर्षांपूर्वीची गोष्ट. त्यानंतर उदयाला आले ते होमो इरेक्ट्स. हे दोन पायांवर ताठ उभे राहू शकत होते. त्यांच्या मेंदूचीही चांगलीच वाढ झाली होती. परंतु ते अजूनही वन्य प्राण्यांप्रमाणे गुहांमध्ये राहून गोळा करून आणलेल्या कंदमुळांवर व शिकार करून आणलेल्या मांसावर गुजराण करत होते. अग्नीचा शोधही त्यांनी लावला होता. त्यांची आयुधंही जास्त प्रभावी होती.त्यांचीच उत्क्रांती होत होमो सेपियन्स म्हणजे बुद्धिमान होमोचा किंवा आधुनिक मानवाचा उदय झाला. त्याच्या मेंदूचा झपाट्याने विकास झाला होता. बुद्धिमत्तेत वाढ झाल्यामुळे शेती किंवा सांस्कृतिक विकास यांचाही प्रवाह सुरू झाला होता. होमो सेपियन्सचा उदय साधारण ३५००० ते १०००० वर्षांपूर्वी झाला यावर सर्वांचंच एकमत आहे.*बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नाम घेता उठाउठी,होय संसाराची तुटी || धृ ||ऐसा लाभ बांधा गांठीविठ्ठल पायी मिठी || १ ||नामापरते साधन नाहीजें तू करिसी आणिक कांही || २ ||हाकरोनी सांगे तुकानाम घेता राहो नका || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• व्यक्ती मग कोणीही असो मनाने निर्मळ आणि स्वभावाने प्रेमळ असते सोबतच कोणाकडेही लक्ष न देता आपले कार्य नित्यनेमाने करत असते ती व्यक्ती स्वप्नात सुद्धा कोणाचा अपमान करण्याचा प्रयत्न करत नाही. तर ती प्रत्यक्ष सुद्धा असे कधीच वागू शकत नाही अशा व्यक्तीला सज्जन म्हटले जाते. म्हणून अशाच व्यक्तीच्या आपण सहवासात रहावे. भलेही अशा सज्जन व्यक्तीकडून काही मिळत नसेल तरी कधी न मिटणारी संपत्ती मिळते. त्या संपत्तीचा कधीही अंत होत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *स्वार्थीवृत्ती*एका कोळ्याने आपले जाळे नदीत टाकले आणि माशांना घाबरवून जाळ्यात आणावे म्हणून एका लांब काठीने तो नदीचे पाणी गढूळ करू लागला. शेजारी काही लोक राहात होते.त्यांपैकी एक म्हणाला, 'अरे, तू जर अशी पाण्यात खळबळ केलीस तर आमचं पिण्याचं पाणी गढूळ होईल ना ?' तेव्हा कोळी म्हणाला, 'मित्रा, मला फक्त एवढंच माहीत आहे की, हे पाणी गढूळ केल्याशिवाय मला मासे मिळणार नाहीत, म्हणून मला हे केलंच पाहिजे.'तात्पर्य - काही लोक इतके स्वार्थी असतात की, स्वतःच्या फायद्यासाठी दुस-याचे नुकसान झाले तरी ते पर्वा करीत नाहीत.फक्त स्वतःचाच फायदा पाहतात.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Posts (Atom)