✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 30 नोव्हेंबर 2023💠 वार - गुरुवार Link - https://nasayeotikar.blogspot.com/2016/11/a-i-d-s.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील ३३४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• _विजयी झाल्यावर दोन बोटांनी ’V' दाखवण्याची पद्धत इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी सर्वप्रथम लोकप्रिय केली. दुसर्‍या महायुद्धाची घोषणा झाल्यानंतर विन्स्टन चर्चिल यांनी संसदेत ऐतिहासिक भाषण केले. त्यात इंग्लंडचे अंतिम ध्येय फक्त विजय असेल हे सांगताना त्यांनी आवेशात दोन बोटे उंचावून 'V' हे विजयचिन्ह दर्शविले._ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०००:पाच अंतराळवीर आणि महाकाय सौरपंखे घेऊन ’एन्डेव्हर’ या अंतराळयानाने फ्लोरिडातील केप कॅनव्हेरॉल येथून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या दिशेने उड्डाण केले.**१९९६:ख्यातनाम साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना महाराष्ट्र सरकारचा पहिला ’महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ प्रदान.**१९९५:’ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म’ संपल्याची अधिकृत घोषणा**१९६६:बार्बाडोसला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९१७:कलकत्ता येथे ’आचार्य जगदीश चंद्र बोस इन्स्टिट्युट’ची स्थापना**१८७२:हॅमिल्टन क्रिसेंट,ग्लासगो येथे स्कॉटलंड व इंग्लंड यांच्यामधे जगातील पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना खेळण्यात आला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९६७:राजीव दीक्षित – सामाजिक कार्यकर्ता (मृत्यू:३० नोव्हेंबर २०१०)**१९६४:अर्चना धनंजय देव-- प्रसिद्ध लेखिका**१९५५:संजीव परळीकर-- प्रसिद्ध लेखक**१९५२:चंद्रकांत भास्कर मेहेर-- लेखक**१९५२:अविनाश खर्शीकर-- ज्येष्ठ अभिनेते(मृत्यू:८ऑक्टोबर२०२०)**१९४१:प्रभाकर दत्तात्रय मराठे-- कादंबरीकार**१९४०:शुभदा भानुदास कुलकर्णी- लेखिका* *१९३९:डॉ.कल्याण इनामदार- मराठीतील सुप्रसिद्ध लेखक आणि बालकवी(मृत्यू:१९ नोव्हेंबर २०१३)**१९३६:सुधा मल्होत्रा-- ​​भारतीय पार्श्वगायिका* *१९३५:आनंद यादव – मराठी लेखक काव्य, कथा,कादंबरी,समीक्षा,ललित अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केले आहे (मृत्यू:२७ नोव्हेंबर २०१६)**१९३०:गीता बाली तथा हरिकीर्तन कौर-- १९५० आणि १९६० च्या दशकांतील हिंदी चित्रपट अभिनेत्री(मृत्यू:२१ जानेवारी १९६५)**१९१०:कविवर्य बा.भ.बोरकर ऊर्फ ’बाकीबाब’--मराठी आणि कोंकणी भाषांत कविता करणारे पद्मश्री पुरस्कारविजेते प्रसिद्ध कवी (मृत्यू:९ जुलै १९८४)**१८९८:वासुदेव दामोदर गोखले- कोशकार, चरित्रकार,संपादक (मृत्यू:१२ जून १९६४)**१८७४:विन्स्टन चर्चिल – दुसर्‍या महायुद्धकाळातील ब्रिटनचे पंतप्रधान, साहित्यिक,वृत्तपत्रकार,थोर राजकारणी आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू:२४ जानेवारी १९६५)**१८५८:जगदीशचंद्र बोस – नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ, वनस्पतींमधील प्रतिक्षिप्त क्रियांवर मूलभूत संशोधन (मृत्यू:२३ नोव्हेंबर १९३७)**१८३५:मार्क ट्वेन – विख्यात अमेरिकन विनोदकार आणि कादंबरीकार (मृत्यू:२१ एप्रिल १९१०)**१७६१:स्मिथसन टेनांट – हिरा हा कार्बनच असतो हे प्रयोगावरुन सिद्ध करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ.(मृत्यू:२२ फेब्रुवारी १८१५)**१६०२:ऑटो व्हॉन गॅरिक – वातावरणाबाबत मूलभूत सिद्धांत मांडणारे जर्मन पदार्थवैज्ञानिक (मृत्यू:२१ मे १६८६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२:नागनाथ लालूजीराव कोत्तापल्ले-- प्रसिद्ध लेखक,कवी,व समीक्षक आणि भारतीय शिक्षणतज्ज्ञ (जन्म:२९ मार्च १९४८)**२०१२:इंदर कुमार गुजराल – भारताचे १२ वे पंतप्रधान (जन्म:४ डिसेंबर १९१९)**२०१०:राजीव दीक्षित – सामाजिक कार्यकर्ता (जन्म:३० नोव्हेंबर १९६७)**१९७०:निना रिकी – जन्माने इटालियन असलेल्या फ्रेंच फॅशन डिझायनर (जन्म:१४ जानेवारी १८८३)**१९००:ऑस्कर वाईल्ड – आयरिश लेखक व नाटककार (जन्म:१६ आक्टोबर १८५४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जागतिक एड्स निर्मूलन दिवस निमित्ताने प्रासंगिक लेख*खबरदारी हाच सर्वोत्तम उपायसंपूर्ण जगात 1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स निर्मूलन दिवस म्हणून साजरा केला जातो. ‘एड्स’ हा शब्द उच्चारताना किंवा ऐकताना काळीज धस्स करते. हा रोग कुणाला झाला असे कळाले की, अंगावर काटे उभे राहतात आणि त्या रुग्णला वेगळ्या नजरेने पाहिले जाते. पूर्वी कर्करोग म्हणजे कॅन्सर हा सर्वांत भयानक रोग असे मानले जात असे. कॅन्सर म्हणजे माणूस कॅन्सल असे बोलले जायचे. मात्र जसे ही ‘एड्स’ विषयी लोकांना कळायाला लागले तसे मोठ्या रोगाच्या यादीत वरच्या क्रमांकावर एड्सला पाहण्यात येऊ लागले. विज्ञानाच्या प्रगतीमुळे कॅन्सरवर आता इलाज शक्य झाले आहे. समाजात अनेक रुग्ण यातून वाचले आहेत असे आढळून येतात. वैद्यकीय उपचार किंवा शस्त्रक्रिया करून कॅन्सर बरा होऊ शकतो. मात्र एड्सचे तसे नाही त्यामुळे ...............पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील लिंकवर क्लीक करावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्रावर अवकाळीचे संकट, शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, 3 हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई देण्यात येईल*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यातील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या विकासासाठी मंत्रिमंडळाने 500 कोटींच्या निधीला दिली मान्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान. शाळांचे मूल्यांकन करणार. पहिल्या टप्प्यात ४७८ शाळा, पहिले पारितोषिक ५१ लाख, अभियानासाठी २० कोटी ६३ लाखांच्या खर्चास मान्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *हिंगोलीत अवकाळी पावसामुळे 500 मेट्रिक टन साखर भिजली; तब्बल दोन कोटींचे नुकसान*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *ISRO ची नव्या अंतराळ मोहिमेसाठी सज्ज! अंतराळात तिरंगा फडकणार! 2024 मध्ये भारतीय अंतराळवीर स्पेस स्टेशनवर पाठवण्याची तयारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जगातील सर्वात श्रीमंतांची यादी ब्लूमबर्गनं केली जाहीर, यादीत भारतातील सर्वातं श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी हे 13 व्या क्रमांकावर तर उद्योजक गौतम अदानींचा श्रीमंतांच्या  20 नावांमध्ये समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविडच; बीसीसीआयकडून शिक्कामोर्तब*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *डॉ. जगदीशचंद्र बोस*पूर्व बंगालमधील डाक्का जिल्ह्यातील राणीखल या खेडेगावात ३० नोव्हेंबर १८५८ रोजी जगदीशचंद्र बोस यांच्या जन्म झाला. त्यांचे वडील भगवानचंद्र बसू हे सरकारी नोकरीत सब डिव्हिजनला आॅफिसर होते. त्या काळी इंग्रजीत जसे ठाकूरचे टागोर झाले, राय आडनावाचे रे झाले तसेच बसू आडनावाचे इंग्रजी स्पेलिंग बोस झाले.जगदीशचंद्रांचे घराणे हे बंगाल प्रांतातील एक खानदानी घराणे होते. त्यांची आई साध्वी व सुशील होती. लहानपणापासूनच जगदीशचंद्र आजूबाजूचा निसर्ग पहायचे, त्याचे निरीक्षण करायचे. निसर्गातील अनेक गोष्टी पाहून त्या अशाच का, असा प्रश्न त्यांना पडे. भगवानचंद्र सुद्धा न कंटाळता छोट्या जगदीशने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत असे. सर्व झाडेएकाच वेळी का फुले देत नाहीत? एखाद्या झाडाची पालवी पोपटी हिरवी पण दुसर्‍याची तांबूस? असा फरक का पडतो असे त्यांना वाटे. झाडे, फुले, फुलपाखरे, भोवतीचा निसर्ग यांचे निरीक्षण करणे हा त्यांचा आवडता छंद होता.डॉ. जगदीशचंद्र बोस कोलकाता येथील सेंट झेवियर शाळा आणि त्याच नावाच्या महाविद्यालयात शिकले. त्यानंतर इंग्लंडच्या ख्राईस्ट चर्च महाविद्यालयातून भौतिकी, रसायन वनस्पतिशास्त्र आणि निसर्गविज्ञानाचा अभ्यास पुरा करून ते भारतात परत आले. या काळात त्यांना भौतिकशास्त्रज्ञ लॉर्ड रॅली यांचे मार्गदर्शन लाभले.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'मिरचीचे आगार'* म्हणून कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते ?२) नेपाळमधील जगप्रसिद्ध पशुपतीनाथ मंदिर कोणत्या नदीच्या तीरावर वसले आहे ?३) घटना समितीची शेवटची सभा केव्हा झाली ?४) केवोलादेव राष्ट्रीय उद्यान भरतपूर कोणत्या राज्यात आहे ?५) 'सरोवरांचा देश' असे कोणत्या देशाला म्हटले जाते ? *उत्तरे :-* १) नंदूरबार २) बागमती नदी ३) २५ नोव्हेंबर १९४९ ४) राजस्थान ५) फिनलँड*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 राजेश दरेकर, सहशिक्षक, गडचिरोली👤 राजेश्वर येवतीकर, येवती👤 विलास वाघमारे, भैसा, तेलंगणा👤 रवी बुगावार, धर्माबाद👤 देविराज पिंगलवार, भोकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विधीकारणे जाहला मत्स्य वेगीं।धरी कूर्मरुपे धरा पृष्ठभागी। जना रक्षणाकारणे नीच योनी। नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥१२०॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🎯 विचारवेध.........✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जेव्हा घराच्या दाराची कडी आतून लावलेली असते तेव्हा माणसाच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात.पण जेव्हा बाहेरुन दाराला कडी लावलेली असते तेव्हा त्याचा सरळ सरळ अर्थ माणूस समजून घेतो की,कुठेतरी बाहेर गेले असतील.अशा परिस्थितीत माणसाने जे डोळ्यासमोर दिसते ते सत्य आहे हे ठामपणे सांगायला हवे आणि डोळ्यांच्या माघारी जे काही आहे ते ठामपणे कुणालाही सांगता येत नाही.म्हणून सत्य परिस्थिती काय आहे हे पाहूनच निर्णय घ्यायला शिकले पाहिजे.व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद : ९४२१८३९५९०🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *ही कथा आहे विन्स्टन चर्चिलची*लहानपणी विन्स्टन एकदा विहिरीत पडला. त्याने ‘वाचवा वाचवा’ असा धावा केला. एका शेतकर्‍याने त्याला विहिरीतून बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचवला. एका अपघातातून आपण वाचलो म्हणून त्याने नि:श्‍वास तर टाकला, पण त्याला विहिरीतील जीव वाचवण्यासाठीची धडपड सदैव लक्षात राहिली. आयुष्यभर यशाशी संघर्ष करताना वडिलांनी शिकवलेले तत्त्व आठवायचे. त्या वेळेस विन्स्टनने मनोमन आपल्या वडिलांचे आभार मानले, कारण त्याच्या वडिलांनी त्याला एक अविरत प्रयत्न करण्याचे व कधीही माघार न घेण्याचे तत्त्व शिकवले होते. ते त्याला नेहमी आपल्या राजवाड्यासमोरील राजहंस दाखवायचे आणि म्हणायचे- ‘‘हा राजहंस पाण्यावर शांतपणे तरंगताना दिसतो. पण तेव्हाच तो पाण्याखाली तितक्याच जलद गतीने पायांची हालचाल करत असतो. लोकांना वरवर शांत दिसणारा राजहंस पाण्याखाली एखाद्या यंत्राप्रमाणे झपाटल्यासारखा काम करतो. तूही असाच झंझावात हो. जनसमुदायाला तू वरून जरी शांत दिसलास तरी त्यांच्या अपरोक्ष वादळासारखं काम करत राहा. आतून पेटून ऊठ आणि कार्याला लाग.’’ पुढे जीवनात अविरत काम करण्याचे तत्त्व बाळगल्यामुळे विन्स्टन चर्चिल इंग्लंडचे पंतप्रधान झाले. एकदा त्यांना ऑक्सफर्ड विद्यापीठात पदवी प्रदान सोहळ्यासाठी निमंत्रित केले होते. जेव्हा त्यांना व्यासपीठावर भाषणासाठी बोलावले तेव्हा ते त्या जनसमुदायासमोर ३० सेकंद नि:शब्द उभे राहिले. सभागृहात एकच शांतता पसरली. नेहमी उत्कृष्ट भाषण देणारे व्यक्तिमत्त्व बोलत का नाही, असा फ्रश्‍न सर्वांना पडला. तितक्यात विन्स्टन चर्चिलच्या तोंडातून शब्द बाहेर पडले- ‘‘माघार घेऊ नका. कधीही माघार घेऊ नका.’’ त्यांनी भाषणाला सुरुवात करताच प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. तेव्हा ते पुन्हा ३० सेकंदांसाठी नि:शब्द झाले आणि पुन्हा उद्गारले- ‘‘माघार घेऊ नका, कधीही माघार घेऊ नका.’’ क्षणभर त्यांनी सर्व प्रेक्षकांवर एक कटाक्ष टाकला. सर्वांशी ते नजरेने बोलले आणि धन्यवाद म्हणून त्यांनी व्यासपीठ सोडले. लोकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले आणि एका महान नेत्याचे सर्वात लहान, पण अत्यंत प्रभावी •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment