✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28 नोव्हेंबर 2023💠 वार - मंगळवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील ३३२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०००:तेलगू भाषेतील महाकवी गुर्रम जाशुवा यांच्या नावाने दिला जाणारा साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वे यांना जाहीर**१९७५:पूर्व तिमोरला (पोर्तुगालपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९६७:जोसेलिन बेल बर्नेल आणि अँटनी हेविश यांनी 'पल्सार’ तार्‍यांचे अस्तित्त्व सर्वप्रथम सिद्ध केले.**१९६४:नासा (NASA) चे मरीनर-४ हे अंतराळयान मंगळाच्या मोहिमेवर निघाले.**१९६०:मॉरिटानियाला (फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१८२१:पनामाला (स्पेनपासुन) स्वातंत्र्य मिळाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८८:यामी गौतम-- हिंदी चित्रपट आणि मालिकांची अभिनेत्री**१९७८:मिलिंद कपाळे -- लेखक* *१९६७:प्रा.डॉ.प्रेमा लेकुरवाळे - लेखिका, कवयित्री* *१९६७:डॉ.धनंजय राजाराम गभणे -- लेखक* *१९६५:प्राचार्य डॉ.अरविंद देशमुख-- लेखक* *१९५९:विश्वास महिपती पाटील-- सुप्रसिद्ध कादंबरीकार,कथाकार,निवृत्त सनदी अधिकारी**१९५५:प्रा.अशोक राणा -- प्रसिद्ध इतिहास संशोधक व लेखक**१९५१:डॉ.शुभदा दीपक शेळके-- लेखिका* *१९५०:गोपाळ दत्तात्रय पहिनकर -- कवी, लेखक तथा निवृत्त उपशिक्षणाधिकारी* *१९४४:मधु पोतदार -- मराठी लेखक. त्यांनी अनेक मराठी संगीत दिग्दर्शकांची चरित्रे लिहिली(मृत्यू:८ ऑक्टोबर २०२०)**१९४०:रमेश महिपतराम दवे-- तत्त्वज्ञानाचे अभ्यासक व व्याख्याते**१९३८:मल्लेशप्पा मदिवलप्पा कलबुर्गी -- कन्नड भाषेतील वचन साहित्याचे भारतीय अभ्यासक आणि कन्नड विद्यापीठाचे कुलगुरू(मृत्यू:३० ऑगस्ट २०१५)**१९३७:प्रतिभा कुलकर्णी - प्रसिद्ध लेखिका* *१९३६:संभाजीराव सखाराम पाटणे-- लेखक* *१८७२:रामकृष्णबुवा वझे – गायक नट, बलवंत संगीत मंडळी आणि ललित कलादर्श या नाटक कंपन्यांमधे त्यांनी गायनगुरु म्हणून काम केले. (मृत्यू:५ मे १९४३)**१८५७:अल्फान्सो (बारावा) – स्पेनचा राजा (मृत्यू:२५ नोव्हेंबर १८८५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१२:झिग झॅगलर – अमेरिकन लेखक (जन्म:६ नोव्हेंबर १९२६)**२००५: गजानन बाळकृष्ण पळसुले-- आधुनिक संस्कृत महाकवी(१ नोव्हेंबर १९२१)**२००३:शंकर पांडुरंग रामाणी-- आधुनिक मराठी कवी (जन्म:२६ जून १९२२)**१९९९:हनुमानप्रसाद मिश्रा – १९८८ चा संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते बनारस घराण्याचे सारंगीवादक (जन्म:१९१३)**१९८०:बिरेंद्रनाथ(बी.एन.सरकार) सिरकार-- भारतीय चित्रपट निर्माता आणि न्यू थिएटर्स कलकत्ता चे संस्थापक(जन्म:५ जुलै १९०१)**१९७८:लक्ष्मीबाई केळकर (मावशी केळकर)-- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्त्री-शाखेच्या संस्थापिका(जन्म:६ जुलै १९०५)**१९६८:एनिड ब्लायटन – बालसाहित्यासाठी प्रसिद्ध असलेल्या इंग्लिश लेखिका (जन्म:११ ऑगस्ट १८९७)**१९६७:पांडुरंग महादेव तथा ’सेनापती’ बापट – सशस्त्र क्रांतिकारक, तत्त्वचिंतक व लढाऊ समाजसेवक (जन्म:१२ नोव्हेंबर १८८०)**१९६३:त्र्यंबक शंकर शेजवलकर – इतिहासकार व लेखक (जन्म:२५ मे १८९५)**१९६२:कृष्ण चंद्र तथा’के.सी.’डे – गायक, संगीत संयोजक व अभिनेते (जन्म:ऑगस्ट १८९३)**१९५४:एनरिको फर्मी – न्यूट्रॉन कणांवरील संशोधनासाठी १९३८ चे पदार्थविज्ञानातील नोबेल पारितोषिक विजेते इटालियन अमेरिकन-भौतिकशास्त्रज्ञ (जन्म:२९ सप्टेंबर १९०१)**१८९३:सर अलेक्झांडर कनिंगहॅम – भारतातील पुरातत्त्व संशोधनाची मुहूर्तमेढ करणारे ब्रिटिश अधिकारी (जन्म:२३ जानेवारी १८१४)**_१८९०:जोतिराव गोविंदराव फुले ऊर्फ ’महात्मा फुले’ – श्रेष्ठ समाजसुधारक, विचारवंत, लेखक ,क्रांतिकारक (जन्म:११ एप्रिल १८२७)_*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *गोरगरीबांचे कैवारी : महात्मा फुले*भारतीय समाजसुधारणेत व स्वातंत्र्य चळवळीत ज्यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते ती व्यक्ती म्हणजे जोतीराव गोविंदराव फुले. जोतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी त्याना ‘महात्मा’ ही उपाधी दिली. त्यामुळे ज्योतिबा फुले हे महात्मा फुले या नावाने सर्वत्र ओळखले जाऊ लागले. महात्मा फुले यांच्या वडिलांचे नाव..........वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_26.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *दिवाळी सुट्ट्यानंतर आजपासून शाळांना प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यातील १५ लाख भाविकांना श्रीराम दर्शनासाठी अयोध्येत नेणार; चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *अवकाळी पावसाने पुन्हा फुटला शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध; विदर्भासह राज्यभरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *हिवाळ्यात पावसाळा,अधिवेशनातही घोषणांचा पाऊस, आंदोलनं आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारची विशेष तयारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *देशात 80 कोटी जनता ऐतखाऊ, रेशन व्यवस्था बंद करा; सदाभाऊ खोत यांची वादग्रस्त मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अखेर नाशिकच्या धरणातून जायकवाडीत पाणी सोडले, मराठवाड्याच्या 25 दिवसांच्या लढ्याला यश*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL - कॅप्टन गिल! शुभमन गिल गुजरात टायटन्सचा नवा कर्णधार, हार्दीक पांड्या मुंबई संघात परत*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*थंड हवेचे ठिकाण - चिखलदरा*चिखलदरा हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यातील एक हिल स्टेशन व एक नगर परिषद आहे.महाभारतच्या महाकाव्यात वैशिष्ट्यपूर्ण, या ठिकाणी अशी भीती होती की भीमा यांनी एका भयंकर चढाओवातील खलनायक किचकचा वध केला आणि नंतर त्याला खोऱ्यात फेकून दिले. अशा प्रकारे कोच्चरदा-चिखलदरा हे त्याचे भ्रष्टाचार आहे म्हणून ओळखले जाऊ लागले.परंतु चिखलदराला अजून बरेच काही आहे. विदर्भातील एकमात्र हिल रिसॉर्ट, हे 1118 मीटरच्या उंचावर सर्वोच्च व्हॅरेट पॉईंट 1188 मीटर असून हे महाराष्ट्रातील एकमात्र कॉफ़ी-वाढविणारे क्षेत्र असण्याचे जोडलेले आहे. चिखलदराचे वार्षिक पाऊस 154 सेंमी आहे. उन्हाळ्यात तापमान 39 से हिवाळ्यात 5 से बदलते. भेट सर्वोत्तम महिने ऑक्टोबर ते जून पर्यंत आहेतहे वन्यजीवन-व्याघ्र, पेंटर, आळशीपणा अस्वल, सांबर, जंगली डुक्कर आणि अगदी क्वचितच पाहिलेले जंगली कुत्री आहे. जवळील प्रसिद्ध मेळघाट टायगर प्रकल्प आहे ज्यामध्ये 82 वाघ आहेत.चिखलदराचे निसर्गरम्य सौंदर्य चक्रीवादळ, प्रॉस्पेक्ट पॉईंट, आणि देवी पॉईंट मधून आनंद घेऊ शकतात. इतर मनोरंजक मोहिमा गव्हिल्गड आणि नारनला किल्ला, पंडित नेहरू बोटॅनिकल गार्डन्स, आदिवासी संग्रहालय आणि सेमादोह लेक यांचा समावेश आहे.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्रातील पहिले गिधाड संवर्धन व प्रजनन केंद्र कोठे उभारण्यात येणार आहे ?२) घटना समितीची पहिली सभा केव्हा झाली ?३) कर्नाटक राज्यात 'म्हशींच्या शर्यत' हा खेळ कोणत्या नावाने ओळखला जातो ?४) दिवाळीच्या दिवशी २२ लाखांहून अधिक मातीचे दिवे जाळण्याचा विश्वविक्रम कोणत्या शहराने केला आहे ?५) जगात हॉकीचे एकूण प्रकार किती आहेत ? *उत्तरे :-* १) अंजनेरी, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक २) ९ डिसेंबर १९४६ ३) कंबाला ४) अयोध्या ५) पाच - मैदानी, आईस, रोलर, स्लेज, स्ट्रीट हॉकी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 राम चव्हाण, नांदेड👤 भैय्या कांबळे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गजेंदु महासंकटी वास पाहे।तयाकारणे श्रीहरी धांवताहे॥ उडी घातली जाहला जीवदानी।नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥११८॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जेव्हा रोज सकाळ ही नवीन सकाळ होऊन या जगात प्रवेश करते तेव्हा प्रत्येक सजीवांसाठी नवीन आशा पल्लवित करण्यासाठी.ती म्हणते काल जे काही चांगले-वाईट झाले त्यातील चांगले लक्षात ठेऊन त्याला सोबत घेऊन पुढे अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करा आणि जे काही तुमच्या जीवनात वाईट घडून गेले त्याला विसरुन जा.त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घ्या आणि आनंदाने जीवन जगा.ती म्हणते मी कधीच भूतकाळाला धरुन वर्तमानात जगत नाही आणि वर्तमानात जे काही जगते ते भविष्यकाळातही त्याचा  विचार करत नाही.त्यामुळेच मी रोजच्यारोज टवटवीत, प्रसन्न आणि प्रफुल्लीत असते.असा जर मी तुमच्यासारखा विचार करायला लागले असते तर  सगळ्या जीवसृष्टीला आवडले असते का ? नाही. म्हणून झाले गेले विसरा नि रोज तेवढ्याच प्रसन्न मनाने,प्रसन्न मुद्रेने माझ्यासारखं आनंदी रहायला शिका मग माझ्याप्रमाणेच रोज तुमचंही स्वागत करतील, तुमच्याबद्दल इतरांना आवड निर्माण होऊन तुमच्यावर प्रेम करायला लागतील.© व्यंकटेश काटकर, नांदेड.संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *प्रामाणिक लाकूडतोड्याची गोष्ट*एका गावामध्ये एक लाकूडतोड्या राहत होता. लाकूडतोडून आपला संसार चालत होता. एके दिवशी तो झाड शोधत एका नदीकाठी गेला त्याला एक मोठे झाड सापडले तो त्या झाडावर फांदी तोडण्यासाठी चढला आणि फांदी तोडू लागला.अचानक त्याच्या हातातून कुऱ्हाड खाली नदीत पडली.त्याच्याजवळ दुसरी कुराड घेणे इतपत ही पैसे नव्हते तो खूप निरास झाला आणि नदीकाठी येऊन रडू नदी उर्फ सरिता देवी त्याचे रडणे ऐकून प्रकट झाली आणि त्याला विचारू लागली की का रे तू रडत आहेस. लाकूडतोड्या सरिता देवीला आपली कुऱ्हाड नदीत पडली असे सांगतो.सरिता देवी लगेच नदीत बुडी घेऊन हातात सोन्याची कुऱ्हाड घेऊन प्रकट होते आणि लाकूडतोड्याला विचारते ही आहे का तुझी कुऱ्हाड. लाकूडतोड्या नम्रपणे म्हणतो देवी ही माझी कुऱ्हाड नाही मग देवी त्याला चांदीची खुराक दाखवणे तो परत मान हलवून ही देखील नाही कुऱ्हाड माझी देवीला सांग.आता देवी पुन्हा बुडी घेऊन नदीत जाते व लोखंडाची खुराक घेऊन प्रकट होते इतक्यात लाकूडतोड्या म्हणतो होय हीच माझी कुऱ्हाड आहे देवी. देवी म्हणते तू खूप प्रामाणिक आहे या प्रामाणिकपणामुळे या तीनही कुऱ्हाडी तुलाच बक्षीस स्वरूपात ठेव.*तात्पर्य:- नेहमी खरे बोलावे.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment