✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 15/12/2022 वार - गुरूवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷   🎇 .  *दिनविशेष .  🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :- ◆ १९९१ - चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांना ऑस्कर पारितोषिक जाहीर💥 जन्म :-◆ १९३२ - टी.एन. शेषन, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त.◆ १९३५ - उषा मंगेशकर, भारतीय पार्श्वगायिका व संगीतकार.◆ १९७६ - बैचुंग भुतिया, भारतीय फुटबॉलपटू.💥 मृत्यू :- ◆ १७४९ : छत्रपती शाहू महाराज◆ १९५० : सरदार वल्लभभाई पटेल – स्वातंत्र्य सेनानी, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व पहिले गृहमंत्री, भारताचे लोहपुरुष, भारतरत्‍न (मरणोत्तर - १९९१)*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *सीमाप्रश्नाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सरपंचपदाच्या महिला उमेदवाराचा चक्क 100 रुपयाच्या स्टॅम्पवर जाहीरनामा, अनोख्या जाहीरनाम्याची भंडारा जिल्ह्यात चर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कर्नाटकचा FRP पॅटर्न, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना इथेनॉल विक्रीचाही मिळणार लाभ, प्रतिटन पन्नास रुपयांचा वाढीव भाव, देशात पहिलाच प्रयोग*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात X-Ray फिल्मचा तुटवडा, रुग्णांच्या मोबाईलमध्येच ट्रान्सफर करुन द्यावा लागतो एक्स-रेचा फोटो*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *दहावी-बारावी परीक्षेत सवलतीच्या गुणांसाठी 50 रुपयांऐवजी आता 25 रुपये शुल्क; विद्यार्थी, पालकांच्या विरोधानंतर बोर्डाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जानेवारी महिन्यात शासकीय लिपीक आणि टंकलेखक पदाची भरती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन 1 ते 12 जानेवारी या कालावधीत पार पडणार असल्याचे क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केलं*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••*P V Sindhu-An Icon of success👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/LV2ug9x3P04~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *एक कप चहा*जगभरातील काही देशात 15 डिसेंबर हा दिवस जागतिक चहा ( World Tea Day ) दिवस म्हणून साजरा केला जातो. मात्र, चहाचा व्यापार आणि चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी 21 मे रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिवस ( International Tea Day ) साजरा केला जातो. जागतिक चहा दिनाच्या निमित्ताने काही आठवणी .......http://nasayeotikar.blogspot.com/2022/12/world-tea-day.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      📙 *मरूउद्यान (Oasis)* 📙अफाट पसरलेल्या वाळवंटात अचानक एखादा हिरवागार टापू आढळतो. खजुराची झाडे, खुरटी हिरवी झुडपे, थोडीफार शेती व त्याला धरुन असलेली वस्ती माणसे आणि पाळीव प्राणी यांनी तेथे सुखाने वस्ती केलेली आढळते. या सगळ्याचे मोठे आश्चर्य येथे प्रथमच आलेल्याला वाटत राहते. पण तेथे राहत असलेल्यांना हे सारे नैसर्गिकच वाटत असते. त्यांच्या दृष्टीने या जागी त्यांना पाणीपुरवठ्याची कधीच अडचण वाटत आलेली नसते. या जागांना मरूउद्याने किंवा ओअॅसिस असे म्हणतात. वाळवंटातील हिरवळीचा भाग असेही याचे वर्णन करता येईल.येथील पाणीपुरवठा हा पावसावर अजिबात अवलंबून नसतो. दूरवरून येणारे पाण्याचे खोलवरचे प्रवाह येथे एक तर तळ्याच्या स्वरूपात वर येतात किंवा विहिरीच्या स्वरूपात पारंपरिकरित्या ज्ञात असतात. त्यामुळे या आसमंतात अजिबात पाऊस न पडला, तरीही येथील पाण्याचा साठा कायम राहतो. अर्थात याला मर्यादा आहेच. पण ही मर्यादा आपोआपच पाळली जाते. कारण येथील वस्तीत वाढ फारच क्वचित होते. शेती हे येथील उत्पन्नाचे व जीविताचे साधन सहसा नसल्याने पाण्याचा वापर त्याही कारणाकरता फार केला जात नाही. कापूस, फळभाज्या, बाजारी यांचे थोडेफार उत्पन्न या भागात घेतले जाते.मरूउद्यानांचे महत्त्व आजकालच्या यांत्रिक युगात तितकेसे जाणवणार नाही. कारण संपूर्ण वाळवंट काही तासांमध्ये यांत्रिक पद्धतीने पार करता येते. पण जेमतेम गेल्या शतकापर्यंत हा भाग पार करणे म्हणजे एक जीवावरचीच कसरत असे. महिनोनमहिने प्रवास करत वाळूची वादळे, विषम हवामान याला तोंड देत जाताना बव्हंशी रस्ते मरूउद्यानांना जोडत पार केले जात. भारतातील कच्छच्या रणात वा थरच्या वाळवंटात अशी अनेक छोटी छोटी मरूउद्याने सापडतात. जैसलमेर, जोधपूर, बिकानेर ही शहरेही अशा पाण्याच्या आधारानेच वसत गेली आहेत. सहारा वाळवंटातही अशी मरूउद्याने आहेतच. काही ठिकाणी तर विश्वास बसू नये, अशी विस्तीर्ण तळी पाण्याचा साठा राखून आहेत.मरूउद्याने आटण्याचे प्रकार घडतात, ते यांत्रिक पद्धतीने पाणी उपसा केल्याने. एकाच वेळी ठिकाणी अनेक विंधनविहिरी घेऊन यांत्रिक पाणी उपसा केल्याने हा प्रकार गेल्या पाच पंचवीस वर्षांत घडत आहे. दुसरे कारण म्हणजे झाडांची वाढती संख्या. यावर नियंत्रण न ठेवल्यामुळे खोलवर जाऊन पाणी तेथेच शोषू लागतात. वाळूची वादळे फार मोठ्या प्रमाणावर झाल्यास येथील पाणवठ्याच्या जागेत त्याचे थर जमू शकतात. या थरांची वेळीच देखभाल होऊ शकली नाही, तरीही मरुउद्याने धोक्यात येतात.जीवनातही खडतर प्रवासात ज्यावेळी एखादा आनंदाचा, विसाव्याचा क्षण मिळतो, तेव्हा त्याला आपण ओअॅसीसची उपमा सहजपणे देतो. दूरवरून उन्हातून आलेला, तहानलेला प्रवासी गरम बाजारीची भाकरी, ताजी भाजी, खजूर व दूध यांचा आस्वाद सावलीला बसून घेतो, तेव्हा त्यालाही अगदी अशीच अंतीव आनंदाची भावना होते.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) देशाची पहिली वंदे भारत एक्स्प्रेस केव्हा धावली ?२) कोणत्या क्रिकेटपटूला 'पॉकेट डायनामाइट' असे संबोधल्या जाते ?३) भारतात राष्ट्रीय पक्ष किती आहेत ?४) वजनमापाची प्रमाणित पद्धत कोणी सुरू केली ?५) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या गावाचे नाव काय आहे ?*उत्तरे :-* १) १५ फेब्रुवारी २०१९ २) ईशान किशन, भारत ३) सात ४) नंद राजा ५) मानसा, गुजरात *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 बालाजी सुंकेवार, कलाशिक्षक, देगलूर👤 साईनाथ सायबलू, मुख्याध्यापक, धर्माबाद👤 रामकृष्ण लोखंडे👤 शिवाजी रामदिनवार, सहशिक्षक👤 ऋषिकेश गरड, उस्मानाबाद👤 दीपक चावरे, सहशिक्षक👤 श्रीधर काटेगर, आरमुर, तेलंगणा👤 अनिल जाधव शिरपूरकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*ज्या महापुरूषांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केले आहे, ज्यांनी समाजासमोर आपले आदर्श उभे केले आहेत, ज्यांच्या विचारांनी समाजाला दिशा आणि गती मिळाली. अशा महापुरूषांचे पुतळे आपण उभे करतो किंवा केले आहेत. त्यांच्या विचारांची एक रेष पुसण्यासाठी ताकद न काळात असते न व्यवस्थेत. अर्थात, या पदापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी त्यांच्या आयुष्याची पुरेपूर किमंत मोजलेली असते. शाळा-महाविद्यालय तथा विद्यापीठीय पदव्यांची भेंडोळी त्यांनी मिळवलेली नसते. त्यांनी ज्या परिक्षा दिलेल्या असतात; जे पेपर सोडवलेले असतात; ते सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे असतात.**त्यांचा व्यासंग, त्यांची साधना, त्यांचा त्याग, त्यांची सेवा, त्याचं कर्तृत्व यामुळे त्यांनी गगनाएवढी उंची गाठलेली असते. मात्र, त्यांना एका झटक्यात आपण दगडाचा पुतळा करून खुजं करून टाकतो. याचं भान जसं आपल्याला नसतं, तसंच त्यांनी उभ्या केलेल्या मूल्यांचा न आपला अभ्यास असतो न तपास केलेला असतो. जयंती-पुण्यतिथीत मिरवणूक काढून डीजेच्या तालावर नाचून घेणे. ही त्यांच्या कार्याप्रती आपण परत केलेली पावती आपल्या स्वत:लाच वाटत असते. हाच मोठा विनोद आहे. ज्यांनी समाजाच्या उद्धारासाठी आपली संपूर्ण हयात खर्ची घातली, अशा महापुरूषांचे विचार आपल्या मनात रूजविण्याऐवजी आपण अतिशय उथळ कृतीत रममाण झालो आहोत. त्यांनी त्यांचे जे विचार इथल्या मातीत पेरलेले असतात, त्यांचे दरसाल उगवून येणे महत्वाचे असते. आपण थेट कोंभानाच खुरपं लावतो.*      ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••   🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱          *संजय नलावडे, मुंबई*        *मोबाइल- 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    जीवनात सुंदरतेला अधिक महत्व आहे.सुंदरता ही दोन प्रकारची आहे. एक म्हणजे बाह्यस्वरुपाची आणि दुसरी आंतरिक स्वरुपाची. तुम्ही कसेही असा तुम्हाला जे काही नैसर्गिक जन्माबरोबर शारीरिक सुंदरता मिळाली आहे ते आपल्याला जसे आहे तसे स्वीकारणे आवश्यक आहे. त्यात आपल्याला बदल करता येत नाही. काहीजण बदलण्यासाठी खूप प्रयत्न करायला पाहतात. त्यासाठी विविध प्रकारची सुंदरतेची सौंदर्य प्रसाधने, पेहराव वापरतात. परंतू त्यात काही बदल घडून येत नाही. फक्त त्यात बाह्यस्वरुपात राहणीमान बदलल्याचा फरक दिसून येतो. यामुळे आपण कसे आहोत हे जगासमोर बाह्यस्वरुपात काही काळ दिसू शकतो पण जास्त काळ त्यांच्या मनावर राज्य करु शकत नाही. त्यावर कितीही पैसा खर्च करुनही वाया जाणारच..! त्यापेक्षा आंतरिक सुंदरतेचा जर अधिक विचार केला तर आपलेही स्वत:चे कल्याण तर होईलच त्याचबरोबर इतरांचेही. कारण तुमच्या आंतरिक सुंदरतेला अधिकाधिक सुंदर बनविण्यासाठी जास्त काही धन अर्थात पैसा खर्च करायची गरज नाही. गरज आहे ती चांगल्या लोकांच्या सहवासात राहण्याची. चांगल्या लोकांच्या सहवासाने आपल्या मधील असणारे दोष काय आहेत ते स्वत:ला ओळखता येतात आणि त्यात बदल घडवून आणता येतात. चांगल्याच्या संगतीत सदैव राहिले तर आपले संकुचित असलेल्या विचारांना पायबंद घालून चांगल्या विचारांची वाढ करता येईल. अशासाठी धन किंवा पैसा खर्च करण्याची काही गरज नाही. यासाठी हवी आहे फक्त तुमच्या मनाची तयारी. तुम्ही जर आंतरिक सौंदर्याने समृद्ध झालात तर जग तुमच्या सोबत नक्कीच राहील आणि एक दिवस तुमचे नक्कीच अनुयायी बनतील. हे केवळ तुमच्या आंतरिक सुंदरतेच्या झालेल्या बदलामुळे. तुमच्या बाह्य सुंदरतेपेक्षा आंतरिक सुंदरता तुम्ही व तुमचे सुंदर जग बनवण्यासाठी अधिक मोलाचे किंवा महत्वाचे ठरु शकते. हे मात्र विश्वासाने सांगता येते.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद..९४२१८३९५९०.🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *लालसेपायी प्राण गेले*जय आणि विजय यांच्‍यात घनिष्‍ट मैत्री होती. दोघेही पट्टीचे पोहणारे होते. नदीच्‍या पाण्‍यात भरपूर मस्‍ती केली. तितक्‍यात स्‍थानिक प्रशासनाकडून बंधा-याकडून पाणी सोडण्‍यात येत असल्‍याची सूचना देण्‍यात आली. त्‍यामुळे दोघेही नदीच्‍या बाहेर आले. जेव्‍हा बंधा-यातील पाणी सोडण्‍यात आले तेव्‍हा नदीला पूर आल्‍यासारखी स्थिती निर्माण झाली. जय आणि विजय सुरक्षित स्‍थळी थांबले होते. नदीच्‍या पाण्‍याचा ओघ पाहत असतानाच नदीच्‍या प्रवाहात एक घोंगडी तरंगत येत असल्‍याचे दोघांच्‍याही दृष्‍टीस पडतील. विजयला ती घोंगडी ओढून आणावीशी वाटली. जयने त्‍याला थांबविण्‍याचा प्रयत्‍न केला. परंतु विजयने तोपर्यंत पाण्‍यात उडी मारली होती. तो घोंगडीजवळ गेला आणि तिला ओढत असतानाच त्‍याचे संतुलन बिघडले. विजय जितका जोम लावून किना-यावर येण्‍याचा प्रयत्‍न करत असतानाच पाण्‍यात उठणा-या लाटा त्‍याला दूर लोटत असत. मित्र असा संकटात सापडलेला पाहून जय ओरडला,''अरे मित्रा, घोंगडी सोड आणि परत निघून ये'' पण विजय म्‍हणाला,'' अरे जय मी घोंगडी सोडण्‍याचा खूप प्रयत्‍न करतो आहे पण घोंगडीनेच मला धरून ठेवले आहे.'' जयला कळून चुकले की विजयला त्‍या घोंगडीची लालसा निर्माण झाली आहे. विजयने घोंगडीसह किना-यावर येण्‍याचा खूप प्रयत्‍न केला पण तो अयशस्‍वी ठरला. शेवटी तो पाण्‍यात मृत्‍युमुखी पडला.त्याच्या लालसेने त्याचा जीव घेतला.तात्‍पर्य- कोणत्‍याही प्रकारची लालसा प्रसंगी आपल्‍या जीवाशी खेळू शकते.आणि त्यामध्ये आपले प्राणही जाते.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment