✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 02 ऑगस्ट 2025💠 वार - शनिवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1XtQS8ETGz/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📜 इतिहासात आजचा दिवस:• १८५८ – ब्रिटीश संसदेमध्ये "गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट" मंजूर, ज्यामुळे भारतात ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार संपवून ब्रिटीश सरकारने थेट प्रशासन सुरु केले.• १८७६ – व्हाईल्ड वेस्ट शोचे जनक "वाईल्ड बिल हिकॉक" याचा मृत्यू.• १९३२ – महात्मा गांधींनी "हरिजन" या शब्दाचा वापर पहिल्यांदा केला.• १९८० – भारतात राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम सुरु करण्याचा निर्णय.🎖️ जन्म :• १९२४ – जेम्स बाल्डविन, अमेरिकन लेखक आणि सामाजिक कार्यकर्ता.• १९७५ – सनी देओल, बॉलिवूड अभिनेता आणि राजकारणी.🕯️ पुण्यतिथी :• १९२२ – सर एडवर्ड हेनरी, भारतीय पोलिस सेवेतील "फिंगरप्रिंट सिस्टीम"चे जनक.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*विद्यार्थी अप्रगत का राहतो...?*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पुणे - रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यखंडांचे प्रकाशन, अण्णा भाऊंच्या जीवनावर चित्रपट बनवण्यासाठी निधीची कमतरता पडणार नाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कोल्हापूरकरांच्या गेल्या 40 वर्षांच्या लढ्याला यश मिळालं असून कोल्हापूरमध्ये उच्च न्यायालयाचे खंडपीठ कार्यरत होणार, नोटिफिकेशन जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *लाडक्या बहिणींना मिळणार रक्षाबंधनची खास भेट, जुलै महिन्याचा हप्ता लवकरच होणार जमा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राणी मुखर्जी सर्वोत्तम अभिनेत्री तर शाहरुख खान आणि विक्रांत मेस्सी यांना सर्वोत्तम अभिनेतेचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अकोला - घरोघर येणाऱ्या घंटागाडी चालकाला द्यावा लागेल आता 50 रुपये महिना, महानगर पालिकेचा दरमहा लाख रुपयांचा खर्च वाचणार‎*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पाचव्या कसोटी सामान्यात दुसऱ्या दिवशी भारत 224 धावावर सर्वबाद तर इंग्लंड सर्वबाद 247 धावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 जी. पी. मिसाळे, पत्रकार संघटना अध्यक्ष, धर्माबाद 👤 दिगंबर वाघमारे, संपादक, कंधार 👤 आनंद पाटील धानोरकर 👤 दयानंद भूत्ते 👤 दुर्गा डांगे 👤 प्रतिक गाडे 👤 शिलानंद गायकवाड 👤 रवींद्र वाघमारे 👤 काशिनाथ उशलवार, धर्माबाद 👤 कैलास बी. चांदोड, धर्माबाद *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 42*रंग आहे माझा काळा**उजेडात मी दिसते**अंधारात मी लपते**ओळखा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - टेबल, खुर्ची, पलंग ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चांगले काम शेवटास नेण्यासाठी वाईट उपाय योजू नयेत, नाहीतर त्या कामाच्या चांगुलपणाला बट्टा लागतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) हरित क्रांतीचे प्रणेते भारतरत्न एस. स्वामीनाथन यांचा जन्मदिवस कोणत्या नावाने साजरा होणार आहे ?२) भारत कोणत्या वर्षापर्यंत आपले स्वतःचे अवकाश स्थानक स्थापन करणार आहे ?३) राष्ट्रीय सहकार धोरण - २०२५ कधी जाहीर करण्यात आले ?४) 'लोकांचा आवडता' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) ब्रह्मपुत्रा नदीची लांबी किती किमी आहे ? *उत्तरे :-* १) शाश्वत शेती दिन २) सन २०३५ ३) २४ जुलै २०२५ ४) लोकप्रिय ५) २९०० किमी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••परागफुलझाडांच्या [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] व प्रकटबीज वनस्पतींच्या अनुक्रमे फुलातील व शंकुतील [शंकूच्या आकाराच्या प्रजोत्पादक इंद्रियातील;⟶ कॉनिफेरेलीझ] केसरदलावर (पुं-केसरावर) असलेले परागकेश (प्रजोत्पादक सूक्ष्म घटक-बीजुके-पराग निर्माण करणारे भाग) पक्व झाल्यावर त्यांतून बाहेर पडणाऱ्या पांढरट किंवा पिवळट रंगाच्या भुकटीसारख्या सूक्ष्म कणांना पराग म्हणतात [⟶ फूल].पराग हा मूळचा संस्कृत शब्द ‘धूळ’ या अर्थी वापरला जातो व परागाचे कण धुळीच्या कणांसारखेच सूक्ष्म आकारमानाचे असतात. श्रीशिवांनी श्रीविष्णूंना⇨ बाहव्याच्या परागांनी प्रथम स्नान घालून नंतर गंगाजलाने स्नान घातल्याचा उल्लेख पुराणात आला आहे. संस्कृत वाङ्मयात परागांचा (पुष्परेणुंचा) अनेकदा उल्लेख केलेला आढळतो.बीजी वनस्पतींतील [⟶ वनस्पति, बीजी विभाग] परागकण वस्तुतः अबीजी वनस्पतींतील लघुबीजुकेच असून त्यांपासून पुं-गंतुकधारी (नर किंवा पुं-जननेंद्रिये धारण करणारी पिढी) व पुं-गंतुके (प्रजोत्पादक नर-कोशिका म्हणजे पेशी) तयार होतात; म्हणजेच ते प्रजोत्पादक घटक आहेत.एका फुलातील (किंवा शंकूतील) पराग त्याच फुलातील (किंवा शंकूतील) अथवा त्याच जातीतील दुसऱ्या वनस्पतीच्या फुलातील (किंवा शंकूतील) स्त्री-केसरावर पडल्या शिवाय [⟶ परागण] प्रजोत्पादनाच्या कार्यास आरंभ होत नाही. फुलझाडांत पराग किंजदलाच्या (स्त्री-केसराच्या) टोकावर (किंजल्कावर) आणि प्रकटबीज वनस्पतींत (उदा., चीड, सायकस, गिंको, देवदार इ.) प्रत्यक्ष बीजकाच्या टोकावर (बीजकरंध्रावर) पडावे लागतात.परागांचा प्रजोत्पादनातील महत्त्वाचा तपशील अलीकडेच पूर्णपणे माहीत झाला असला, तरी त्याची मोघम कल्पना सु. ५००० वर्षांपूर्वी अॅसिरियन पुरोहितांना होती, हे खात्रीलायक पुराव्याने सिद्ध झाले आहे. ते आपल्या हातांनी खजुराच्या नर-वृक्षावरील फुलोरे स्त्री-वृक्षा-वरच्या स्त्री-फुलोऱ्यांवर शिंपीत, कारण त्याशिवाय फळे धरत नाहीत हे त्यांना माहीत होते. आता अन्नोत्पादनाच्या प्रक्रियेत हे ‘हस्तपरागण’ महत्त्वाची कामगिरी बजावीत आहे [⟶ परागण] ; संकरज (दोन भिन्न वंश, जाती वा प्रकार यांपासून निर्माण झालेली) धान्ये, फळे, फुले ही सर्व या प्रक्रियेची आधुनिक देणगी आहे.परागकणप्रत्येक परागकण अतिसूक्ष्म असून त्याचा सरासरी ध्यास २४-५० μ (१μ= १ मायक्रॉन = १० -³ मिमी.) असतो; द्विदलिकित वनस्पतींता तो २-२५० μआणि एकदलिकितांत १५ - १५० μ असतो. विद्यमान प्रकटबीजींत १५-१८० μ व जीवाश्म (शिळाभूत झालेल्या पुरातन) जातींत ११-३०० μअसा व्यासांचा पल्ला आढळतो.एखाद्या कुलातील वनस्पतींच्या जातींत परागकणांचे आकारमान सारखे असतेच असे नाही; त्यात अनेकदा बराच फरक आढळून येतो. पक्व परागकणाचे वजन ०.०००००३५ ते ०.००००७ मिग्रॅ. या पल्ल्यात असते.प्रत्येक सामान्य फुलातून शेकडो परागकण बाहेर पडतात व कित्येक वनस्पतींतून बाहेर पडणाऱ्या अशा परागकणांची संख्या कित्येक सहस्र किंवा लक्ष इतकीसुद्धा भरते (उदा., सायकस, पाइन, खडशेरणी, गवते, पाणकणीस इ.). सूक्ष्मदर्शकातून पाहिल्यावर असे कळून येते की, प्रत्येक परागकणाचा आतला भाग सूक्ष्म थेंबासारख्या (ठिपक्याएवढ्या) जीवद्रव्याचा ( सजीवाच्या कोशिकेतील जिवंत द्रव्याचा; प्राकलाचा) असून त्यात प्रकल (कोशिकेतील प्रक्रियांवर नियंत्रण ठेवणारा जटिल गोलसर पुंज), संचित स्टार्च व तेल असतात. त्याभोवती दोन संरक्षक वेष्टने असतात; आतील पातळ वेष्टनाला ‘आलेप’ आणि बाहेरच्या जाड उपत्वचायुक्त किंवा मेणासारख्या पदार्थाने बनलेल्या वेष्टनाला ‘अधिलेप’ म्हणतात.अधिलेपामुळे बहुतेक अम्ले व सु. ३००° से. पर्यंतचे तापमान यांपासून संरक्षण मिळते. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकामुळे आलेप व अधिलेप यांची अतिसूक्ष्म रचना समजून येते व त्याचा उपयोग परागकणांची विविधता व त्यांतील सूक्ष्म फरक समजून घेण्यास करतात.त्यांचे आकार, आकारमान व अधिलेपाचे स्वरूप यांत बरीच विविधता असते; परंतु कोणत्याही एकाच कुलातील, जातीतील किंवा वंशातील वनस्पतींचे परागकण मात्र वरील बाबतीत सारखेच असतात. उदा., गवताचे आणि सूर्यफुलाचे परागकण वाटोळे, खजुराचे लंबगोल व गुलाबाचे त्रिकोणी असतात.चौरस, अर्धगोल इ. भिन्न आकारांचे परागकणही आढळतात. झोस्टेरा या पाण्यातील वनस्पतीचे परागकण लांब व बारीक केसासारखे (२,५५० x ३.७μ) असतात. परागकण सामान्यतः हलके असल्यामुळे वाऱ्याबरोबर वाहत दूर जातात; मूळ ठिकाणापासून सहाशे किमी. पेक्षा अधिक दूर गेलेल्या परागकणांची उदाहरणे आहेत. एफेड्रा व नोथोफॅगस यांचे पराग द. अमेरिकेहून पूर्वेकडे सु. ३,८५० किमी. (ट्रिस्टन द कुना) आणि सु. २,२५० किमी. (द. जॉर्जिया बेट) दूरच्या पीटयुक्त प्रदेशात गेलेले आढळतात.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संगदेवाजीच्या व्दारी आज रंगला अभंग …. || धृ ||दरबारी आले रंक आणि रावझाले एकरूप नाही भेदभावगाऊ नाचू सारे या हो, होऊनी नि:संग …. || १ ||जन सेवेपायी काया झिजवावीघाव सोसुनिया मने रिझवावीताल देऊनिया बोलतो मृदुंग …. || २ ||हरीभजनाचे सुख मी लुटावेगात गात माझे डोळे मी मिटावेनका करू कोणी माझ्या समाधीचा भंग …. || ३ ||ब्रह्मनंदि देह बुडोनिया जाईएक एक खांब वारकरी होईकैलासीचा राणा, झाला पांडुरंग …. || ४ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या विचाराने माणसं जुळतात तर आपल्या विचारानेच माणसं दूर जातात पण, माणसं तेव्हा जास्त तुटतात जेव्हा आपले विचार परखड, ज्वलंत तसेच सत्य असतात. त्याक्षणी आपण दु:खी होऊ नये.कारण गोड बोलून स्वतः चा स्वार्थ साधण्यासाठी जेव्हा आपला वापर केला जातो तीच आपली खरी फसवणूक असते. पण, आपल्या परखड, ज्वलंत आणि सत्य विचाराने एखाद्या माणसात जेव्हा परिवर्तन होते तेव्हा खऱ्या अर्थाने तेच परिवर्तन इतरांना दिशा सुद्धा दाखवत असतात आणि त्यातूनच विकास होत असतो.म्हणून समाजात विचारांची पेरणी करताना समाजाचे भले झाले पाहिजे असेच विचार पेरण्याचा आपण प्रयत्न करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*नक्कल म्हणजे अनुकरण नव्हे* सातवीतला तनिष हा नकला चांगल्या करायचा. मित्रांच्या बोलण्याच्या लकबी, शिक्षकांच्या बोलण्याच्या लकबी तो सहज करत असे. शिक्षकांना त्याच्यातील हा गुण माहिती होता ,त्यामुळे त्याला शिक्षकांनी सांगितले होते की, तू नकला चांगल्या करतोस हे ठीक आहे ; पण नक्कल करण्यापेक्षा एखाद्या व्यक्तीचे अनुकरण करावे .नक्कल ह्याचा अर्थ म्हणजे एखाद्या व्यक्तीचे हुबेहूब वर्तन ,त्याचे हावभाव जसेच्या तसे व्यक्त करणे होय, पण अनुकरण म्हणजे एखाद्या व्यक्तीतील चांगले गुण स्वत: रुजवून आपला विकास करणे होय . तनिषने शिक्षकांचे हे म्हणणे काही ऐकले नाही .नक्कल करणेच त्याला योग्य वाटले .एकदा शिक्षकदिनाच्या दिवशी सगळी मूले वेगवेगळ्या वर्गात शिक्षकांचे काम करणार होते .थोडक्यात त्यांना वर्गावर शिक्षकांच्या ऐवजी शिकविण्यासाठी जायचे होते. तनिषही पाचवीच्या वर्गावर शिकवण्यासाठी गेला. त्याला वाटले आपण एखाद्या शिक्षकांची नक्कल करून तास संपवू या. फारसे अवघड काही नाही. असा विश्वास ठेवून तो वर्गावर गेला .विषयांशी निगडित असलेल्या शिक्षकांची त्याने अचूक नक्कल केली .पण शिकवताना त्याला एका विद्यार्थ्याने पाठासंबंधी प्रश्न विचारला .तनिषला केवळ नक्कलच माहित होती. विचारलेल्या प्रश्नाचे काय उत्तर द्यावे, याचा विचारच त्याने केला नव्हता. सगळी मुले हसायला लागली त्याची थट्टा करू लागली.तात्पर्य - नक्कल करण्यापेक्षा अनुकरण करणे अधिक फायदेशीर ठरू शकते. कारण त्यामुळेच आपल्या व्यक्तिमत्वाचा बुद्धीचा विकास होऊ शकतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 31 जुलै 2025💠 वार - गुरुवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1F1vqeYeP5/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या वर्षातील 212 वा दिवस 🚩 महत्वाच्या घटना :- १४९८: पश्चिम गोलार्धात तिसरा प्रवास करताना ख्रिस्तोफर कोलंबस हे त्रिनिदाद बेटांचा शोध लावणारे पहिले युपोपीय ठरले.• १६५७: मुघलांनी विजापूरचा कल्याणी किल्ला जिंकला.• १६५८: औरंगजेब मुघल सम्राट बनले.• १९३७: के. नारायण काळे यांनी दिग्दर्शित केलेला वहाँ हा प्रभातचा चित्रपट मुंबईतील मिनर्व्हा टॉकीजमधे प्रदर्शित झाला.• १९५६: कसोटी सामन्यातील एका डावात सर्व १० गडी बाद करण्याचा विक्रम करणारा जिम लेकर हा पहिला गोलंदाज बनला.• १९६४: रेंजर ७ अंतराळ यानाने चंद्राचे पहिले स्पष्ठ छायाचित्रे काढले.• १९९२: जॉर्जियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.१९९२: सतार वादक पं. रविशंकर यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रदान.• २०००: वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. रघुनाथ माशेलकर आणि प्रगत तंत्रज्ञान केंद्राचे डॉ. डी. डी. भवाळकर यांना एच. के फिरोदिया पुरस्कार प्रदान.• २००१: दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना राजर्षी शाहू महाराज समता पुरस्कार प्रदान.• २०१२: मायकेल फेल्प्स यांनी ऑलिम्पिकमध्ये जिंकलेल्या सर्वाधिक पदक जीकाण्याचा विक्रम मोडला.🎂 जन्म :- • १८७२: संतसाहित्याचे अभ्यासक, चरित्रकार लक्ष्मणरामचंद्र पांगारकर• १८८०: हिन्दी साहित्यिक मुन्शी प्रेमचंद यांचा • १९०२: व्यंगचित्रकार आणि लेखक केशवा तथा के. शंकर पिल्ले• १९०७: प्राच्यविद्या पंडित, गणितज्ञ, विचारवंत व इतिहासकार दामोदर धर्मानंद कोसंबी• १९१२: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ मिल्टन फ्रिडमन• १९१८: संस्कृत पंडित डॉ. श्रीधर भास्कर तथा दादासाहेब वर्णेकर • १९१९: भारतीय क्रिकेटपटू हेमू अधिकारी• १९४१: गुजरातचे माजी मुख्यमंत्री अमरसिंग चौधरी • १९४७: हिंदी चित्रपट अभिनेत्री मुमताज• १९५४: भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक मनिवंनान• १९६५: हॅरी पॉटर च्या लेखिका जे. के. रोलिंग🌹 मृत्यू :- • १७५०: पोर्तुगालचा राजा जॉन (पाचवा)• १८०५: भारतीय सैनिक धीरान चिन्नमलाई• १८६५: आधुनिक मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेट • १८७५: अमेरिकेचे १७वे राष्ट्राध्यक्ष अँड्रयू जॉन्सन• १९४०: भारतीय कार्यकर्ते उधम सिंग• १९६८: चित्रकार, संस्कृत पंडित पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर • १९८०: पार्श्वगायक मोहंमद रफी • १९२४ – कोटला सुलतान सिंग, पंजाब• २०१४: भारतीय पत्रकार आणि लेखक नबरुण भट्टाचार्य• २०२२: अल-कायदाचा दुसरा अमीर, दहशतवादी अयमान अल-जवाहिरी••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *छडी लागे ( ना ) छम छम*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *भारतावर तब्बल 25 टक्के टॅरिफ लादण्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज 31 जुलै रोजी निकाल लागण्याची शक्यता; तब्बल 17 वर्षानंतरही घटनेच्या आठवणी आजही ताज्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *आजपासून मान्सून तीव्र, कोकणासह 17 राज्यांत 6 दिवस मुसळधार पाऊस, कमी दाबामुळे बळकटी, परिणाम दिल्लीपासून केरळपर्यंत*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *170 तास भरतनाट्यम सादरीकरण ! मंगळुरूच्या रेमोना एव्हेट परेराची 'गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पीएम किसानचे 2000 रुपये 02 ऑगस्ट रोजी येणार, सरकारकडून मोठी अपडेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *तुळजाभवानी मंदिरात 10 दिवस गाभाऱ्यातील दर्शन बंद; मंदिर समितीचा निर्णय, भाविकांना केवळ मुखदर्शन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पाचव्या कसोटी सामन्यातून जसप्रीत बुमराह बाहेर; टीम इंडियाला धक्का, आकाश दीपला संघात स्थान दिले जाणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 बालासाहेब कच्छवे, समुपदेशक तथा मुख्याध्यापक, जि प. हा. चौफाळा, नांदेड👤 मनोज बुंदेले, संपादक, विष्णुपुरी एक्सप्रेस 👤 प्रशिक नंदुरकर, शिक्षक, उमरखेड 👤 प्रीतमकुमार नावंदीकर 👤 दिलीप सोळंके 👤 कैलास श्याम गायकवाड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 40*मी आहे अशी भाजी* *ज्यात लपलेले आहे एका प्रसिद्ध शहराचे नाव* *सांगा पाहू मी कोण आहे…*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - वेणी ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अनुभवांच्या कमानी प्रत्येकाने आपल्या जीवनात स्वतः बांधून त्याखालून जाणेच उचित असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'प्रिन्स' या नावाने प्रसिद्ध असलेला भारतीय क्रिकेटपटू कोण ?२) इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या ( इग्नू ) इतिहासात प्रथमच महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?३) तिबेट ओलांडल्यानंतर यारलुंग सांगोपा नदी भारतात कोणत्या नावाने ओळखली जाते ?४) 'लिहिता वाचता येणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) चीनचे पंतप्रधान कोण आहेत ? *उत्तरे :-* १) शुभमन गिल २) प्रा. उमा कांजीलाल ३) ब्रह्मपुत्रा ४) साक्षर ५) ली कियांग*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🦇 *वटवाघूळ* 🦇 एखाद्या ओसाड गुहेत कधी गेलात, तर प्रथम स्वागत होईल, ते फडफडणाऱ्या वटवाघळांच्या पंखांच्या फटक्यांनी. तुमची चाहूल लागल्याने निवांत अंधारात गुहेच्या सर्व भागांत लटकून झोपलेली वटवाघळे सैरावैरा उडू लागतात. पंखांची लांबी इतकी अस्ताव्यस्त असते की त्यांचा आवाज व एखादा फटका तुम्हाला स्पर्शूनच जाणार. गावाबाहेरच्या झाडांवरही ही वटवाघळे उलटी टांगून दिवसभर विश्रांती घेताना आढळतीलच. विजेच्या ताराही त्यांना त्यासाठी चालतात.सस्तन प्राणीवर्गातील उडणारा हा एकमेव प्राणी. उडणारा म्हणजे खऱ्या अर्थाने पंख पसरून उडणारा. पण त्याच्या पंखांची रचना मात्र मोठी वेगळीच असते. पक्षांचे पंख पिसांचे बनतात. वटवाघळाचे पंख म्हणजे कोवळ्या नाजुक पापुद्र्यासारख्या कातडीची दुहेरी अस्तराची हाडांवरची सलग पांघरलेली शालच म्हणा ना. जशी हाडे जवळ घेतली जातील, मिटतील, तशी ही पंखांची पसरणही मिटत जाते. मग वटवाघुळ एखाद्या मोठ्या उंदराप्रमाणेच दिसू लागते. त्याच्या कानाची ठेवणही तशीच असते.वटवाघळे साधारण वीस वर्षे जगतात. किरकोळ आकाराच्या लहानखुऱ्या वटवाघळांपासुन प्रचंड आकाराच्या उडत्या कोल्ह्याप्रमाणे दिसणाऱ्या वटवाघळांपर्यंत विविध साडेनऊशे जाती साऱ्या जगभर आढळतात. त्यांची संख्या इतकी प्रचंड आहे की, जगातील एकूण सस्तन प्राण्यांपैकी एक चतुर्थांश वटवाघळेच भरतील. मोठ्या जातीचे वजन दहा ते पंधरा किलो असू शकते. तर छोट्या जातीत ते एक दोन किलोंवरच राहते. मोठ्या जातीच्या पंखांची लांबी उडताना सहा फुटांपर्यंत जाते, तर लहानांची फुटभरावरच संपते.वटवाघळे काय खातात, याची यादी मात्र आश्चर्यजनक आहे. मध पिण्यापासून मासे खाण्यापर्यंत, उंदीर पकडण्यापासून इतर वटवाघळांनाच खाण्यापर्यंत त्यांना कसलेही अन्न चालते. मुख्यतः लहान किडे हे त्यांचे प्रमुख अन्न. उडते पतंग, किडे उडता उडताच मटकावणे हे कौशल्य वटवाघळांचेच. तोंडाने चित्कार काढत वटवाघूळ उडते व हा आवाज भक्षावर आदळून त्याच्या परत येणाऱ्या लहरी ग्रहण करून त्याची नेमकी जागा हा प्राणी शोधून काढतो. याच तत्त्वाचा वापर रडार यंत्रणेत मानवाने केला आहे.पक्ष्यांचे उडणे व वटवाघळांचे उडणे यात खूपच फरक आहे. कमी वेग, पाहिजे तेथे थांबणे, दिशा सहजगत्या व अगदी थोड्या जागेत बदलणे, उंची खालीवर सहज करता येणे या बाबतीत वटवाघळे पक्ष्यांना मागे टाकतात. अतिथंड प्रदेशातील वटवाघळे काही काळ सुप्तावस्थेतही काढून जीव जगवू शकतात.वटवाघळांच्या दोन-तीन जाती पक्षीही खातात व इतर सस्तन प्राण्यांच्या रक्तावरही जगतात. काही दंतकथांत वटवाघळांना भरपूर स्थान दिले जाण्याचे हेही कारण असावे. वटवाघूळ उलटे लटकले आहे, असे जरी आपल्याला वाटत असले, तरी त्याचे संपूर्ण शरीर मात्र एकाच पातळीवर पण जमिनीला समांतरच असते. रात्रीच्या वेळी मोठ्या संख्येने उडणारी वटवाघळे ज्याने पाहिली आहेत, तो ते दृश्य सहसा विसरणार नाही.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुझे रूप पाहता देवासुख झाले माझ्या जीवा || धृ ||हे तो वाचे बोळवेनाकाय सांगू नारायणा || १ ||जन्मो जन्मीचे सुकृततुझे वाई रम्मे चित्त || २ ||जरी योगाचा अभ्यासतेव्हा तुझा निजध्यास || ३ ||तुका म्हणे भक्तगोड गाऊ हरीचे गीत || ४ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपण केलेल्या चांगल्या कार्याची प्रशंसा होते तेव्हा, मन गहिवरून येतं. खऱ्या अर्थाने समाजाकडून आपल्याला मिळालेली आपल्या नि:स्वार्थ कार्याची ही पावती असते. कर्तुत्ववान लोक स्वतःचा कधीच उदोउदो करत नाही. हेच त्यांच्यातील महान गुण असतात आणि ज्यांना दुसऱ्याचे चांगले झालेले कधीच बघवत नाही ते फक्त, त्या व्यक्तीमधील वाईट शोधून दुसऱ्याच्या मनात नकारात्मकतेचे विष भरतात. अशांची या समाजात कमतरता नाही. म्हणून अशा लोकांकडे लक्ष देऊ नये. त्यांचे ते काम करतात, आपण आपले काम करावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जनसेवा हीच माझी ईश्वरसेवा महात्मा गांधीजींना अनेक लोक भेटायला येत. गांधीजींच्या नुसत्या सहवासातूनच लोकांना कितीतरी गोष्टी सांगण्याची गांधीजींची पद्धत अतिशय प्रभावी होती. त्यामुळे त्यांच्या भेटीला येणारा प्रत्येक माणूस तेथून निघतांना प्रेरणा घेऊनच निघत असे. एकदा एक गृहस्थ गांधीजींना भेटायला आले. नेहमी काही वेळ ते त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर बोलत असे. पण त्या दिवशी गांधीजी त्यांना म्हणाले, ' क्षमा करा, पण आता माझी मंदिरात जाण्याची वेळ झाली आहे. त्यामुळे मी आता तुमच्याशी बोलू शकत नाही.' यावर ते गृहस्थ म्हणाले, 'हो का ? मलासुद्धा येथून मंदिरातच जायचे होते त्यामुळे आता आपण सोबतच मंदिरात जाऊ आणि पूजा करू.' हे उद्गार ऐकून गांधीजी किंचित हसले आणि म्हणाले, 'परंतु मला तुम्ही जात असलेल्या मंदिरात जायचे नाही. माझे मंदिर वेगळे आहे. म्हणजे काय हे त्याला कळलेच नाही. तरीही त्या व्यक्तीने गांधीजींसोबत येण्याचा आग्रह केला. गांधीजी म्हणाले, 'ठीक आहे, तुमचा हट्ट आहे तर चला माझ्याबरोबर.' असे म्हणून ते त्या गृहस्थाला आपल्यासोबत घेऊन गेले. गांधीजी ज्या ठिकाणी गेले ते ठिकाण बघून त्या गृहस्थाला मोठा धक्का तर बसलाच ; पण मनापासून गांधीजींचे पाय धरावेसे वाटले. कारण गांधीजी एका वृद्धाश्रमात गेले होते आणि तेथील वृद्धांची ते सेवा करत होते. ते म्हणाले ,'हेच माझे मंदिर आहे आणि जनसेवा हीच माझी ईश्वरसेवा आहे.' त्या गृहस्थांच्या मनात गांधीजीबद्दलचा आदर कित्येक पटींनी वाढला.तात्पर्य - जनसेवा हीच ईश्वरसेवा•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 30 जुलै 2025💠 वार - बुधवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/19VxVDfzhq/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या वर्षातील २११ वा दिवस 🚩 महत्वाच्या घटना :-• १८७१ - ब्रिटिश लायब्ररीचा (British Library) एक भाग असलेली Public Records Act लागू.• १९५६ - In God We Trust हे वाक्य अमेरिकेच्या अधिकृत राष्ट्रीय ब्रीदवाक्य म्हणून स्वीकारले.• १९७१ - अपोलो १५ मोहिमेतील अंतराळवीरांनी चंद्रावर Lunar Roving Vehicle वापरला.• २०१४ - पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळून १५० पेक्षा अधिक ठार, सुमारे १०० बेपत्ता🎂 जन्म :-• १८६३ - हेन्री फोर्ड, अमेरिकन उद्योजक व Ford Motor Company चे संस्थापक.• १९२४- एस. एन. गोयंका भारतीय विपश्यना ध्यानाचे शिक्षक पद्म भूषण• १९४७ - आर्नोल्ड श्वार्झनेगर, ऑस्ट्रियाचा अभिनेता व कॅलिफोर्नियाचा गव्हर्नर.• १९७३ - सोनू निगम, पार्श्वगायक.• १९८० - जेम्स अँडरसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.🌹 मृत्यू :-• १९९४ - शंकर पाटील, मराठी लेखक.२००७ - मिंटो हॉल, प्रसिद्ध भारतीय अभिनेते उत्पल दत्त••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शिक्षकांचे शिक्षकांसाठी असलेले व्यासपीठ : शिक्षण परिषद*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 'जगातील कोणत्याही नेत्याने भारताला ऑपरेशन सिंदूर थांबवण्यास सांगितले नाही'.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये, उमेद मॉल उभारण्यात येणार असल्याचा निर्णय राज्याच्या ग्राम विकास मंत्रालयाच्यावतीने घेण्यात आला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सर्पमित्रांना मिळणार सरकारी ओळखपत्र, १० लाखांचा अपघात विमा; महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *इस्रो-नासाची महत्त्वाकांक्षी ‘निसार’ मोहीम श्रीहरीकोट्टा येथून आज प्रक्षेपित होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *29 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान देशातील अनेक राज्यांत अतिवृष्टीचा हवामान विभागाचा इशारा. राजस्थान, मध्यप्रदेश, ईशान्य भारतात मुसळधार पावसाची शक्यता, नागरिकांनी सतर्क रहावे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पिंपरीत समता परिषदेची आढावा बैठक संपन्न, ओबीसी जनगणनेचे महत्त्व घरोघरी जाऊन सांगणार - समीर भुजबळ*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉलवर संवाद साधून बुद्धिबळ विजेती दिव्या देशमुखचे केले अभिनंदन*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 विजय कुऱ्हाडे, शिक्षक, बिलोली 👤 नागनाथ इळेगावे, पदोन्नत मुख्याध्यापक, बिलोली 👤 प्रियांका घुमडे👤 निलेश कोरडे 👤 साईनाथ वाघमारे 👤 शेख नवाज 👤 सचिन गादेवार, नांदेड *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 39*मी काळी आहे पण कोकिळ नाही**लांब आहे पण काठी नाही**दोरी नाही पण बांधली जाते**माझे नाव सांगा पाहू .......?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - डोंगर ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपले कर्तव्य योग्य प्रकारे पार पाडणाऱ्यास ईश्वर योग्य फळ देतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतात किती जागतिक वारसा स्थळे आहेत ?२) सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे असणारा देश कोणता ?३) जागतिक वारसा स्थळे कोणत्या कारणांमुळे धोक्यात आली आहेत ?४) 'लाखो रुपयांचा धनी' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) त्सुनामी कशामुळे निर्माण होते ? *उत्तरे :-* १) ४४ स्थळे २) इटली ( ५५ स्थळे ) ३) युद्ध, अतिक्रमण, भूकंप, पर्यटकांचे प्रचंड लोंढे, हवेचे प्रदूषण, आम्लवर्षा ४) लक्षाधीश ५) भूगर्भीय हालचाली*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🐶 *कुत्रा चावल्यावर चौदा इंजेक्शने घेणे आवश्यक असते का ?* 🐶 *************************सामान्यपणे रोगप्रतिबंधक लस ही रोगाची लागण होण्यापूर्वीच दिली जाते; परंतु पिसाळलेले कुत्रे चावल्याने होणारी 'पिसाळी' व 'हायड्रोफोबिया' हा रोग टाळण्यासाठी कुत्रे चावल्यानंतर रोगप्रतिबंधक लस देतात. या रोगाचा अधिशयन काळ जास्त असल्यामुळे असे करता येते. कुत्रा चावला कि लगेच चौदा इंजेक्शनची भीती मनात निर्माण होते. तुमच्यातील काहींनी तो दु:खदायक अनुभव घेतलाही असेल.पण प्रत्येकवेळी कुत्रे चावले की इंजेक्शन घ्यावेच लागेल, हे मात्र खरे नाही. येथे एक गोष्ट लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे व ते म्हणजे पिसाळलेले कुत्रे चावले तरच माणसाला 'पिसाळी' हा रोग होतो. चांगले कुत्रे चावल्यास नाही. प्रश्न असा आहे की चांगले व पिसाळलेले कुत्रे यातील फरक कसा ओळखायचा ? वर्तणुकीतील बदल, दिसेल त्या गोष्टी चावणे, या काही गोष्टी पिसाळलेल्या कुत्र्यात सापडू शकतील; परंतु हे जरी ओळखता आले नाही तरी हरकत नाही. अशा कुत्र्याला जर पिसाळी हा रोग झालेला असेल तर ते दहा दिवसांत मरते. याचाच अर्थ तुम्हाला चावल्यापासून दहा दिवसांच्या आत कुत्रे मेले नाही, तर ते चांगले आहे. अशावेळी तुम्हाला इंजेक्शन घ्यायची गरज पडणार नाही. दुसरे म्हणजे जर कुत्र्याला ते पिसाळु नये यासाठी रोगप्रतिबंधक लस दिली असेल तरीही आपल्याला काळजीचे कारण राहणार नाही. त्यामुळे कुत्रे पाळणाऱ्या सर्वांनी त्यांच्या कुत्र्यांना लसी देणे आवश्यक आहे. अन्यथा घरातील प्रत्येक व्यक्तीला केव्हा न केव्हा तरी ही इंजेक्शने घ्यावी लागतील.कुत्रे चावल्यावर त्याच्या गांभीर्यानुसार शरीराच्या कोणत्या भागावर चावले आहे व व्यक्तीचे वय काय आहे यावरून किती इंजेक्शने घ्यायची हे ठरते. सध्या लक्ष ठेवण्याजोगे चांगले कुत्रे चावले तर तीन व पिसाळलेले कुत्रे चावल्यास जास्तीत जास्त बारा इंजेक्शने दिली जातात. शासकीय दवाखान्यांमध्ये मोफत मिळणाऱ्या लसीखेरीज औषधी कंपन्यांनी तयार केलेल्या व्हेरोरॅव किंवा रेबीपूर या लसीही बाजारात उपलब्ध आहेत. यांची फक्त सहा इंजेक्शने द्यावी लागतात. हे खरे असले तरी ती बरीच महाग आहेत. काही महिन्यांपासून पोटात द्याव्या लागणाऱ्या लसीचे भारतातील उत्पादन बंद करण्यात आले आहे. त्यामुळे चौदा इंजेक्शने घेणे हा प्रकार आता इतिहासजमाच झाला आहे !डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षितयांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••रूप सावळे सुंदरगळा शोभे तुलसी हार || धृ ||तो हा पंढरीचा राणानकळे योगियांच्या ध्याना || १ ||पिवळा पितांबर वैजयंतीमाया मुकुट शोभे किती || २ ||एका जनार्दनी ध्यानविठे पाऊले समान || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••निसर्गाने प्रत्येकालाच तोंड नावाची अनमोल संपत्ती दिली आहे. त्या संपत्तीचा योग्य रितीने वापर केला तर ती संपत्ती अजरामर होऊन जाते. अन् चुकूनही एक शब्द जरी तिच्यातून बाहेर पडल्यावर एखाद्याचे मन तर दुखतोच पण, त्याचे परिणाम सुद्धा स्वतःला ही तेवढेच भोगावे लागतात. म्हणून म्हणतात की, तोंड सांभाळून बोलावे. कदाचित हे खरे असावे म्हणून कोणासोबत किंवा कोणाच्या बाबतीत बोलताना जरा विचार करून बोलावा. कारण चांगले बोलण्याने आपलेही वाईट होणार नाही. अन् नको त्या शब्दात बोलल्याने आपलाही पाहिजे तेवढ्या प्रमाणात सन्मान होणार नाही. कारण ऐकणारे प्रत्येक माणसं बुध्दीहीन नसतात.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*ज्योतिष्याची फजिती* एका नगरात एक भामटा ज्योतिषी दररोज एका रस्त्याच्या कडेला बसून लोकांचे भविष्य सांगत असायचा. दररोज तो समोर जन्मकुंडल्या घेऊन एक महान ज्योतिषी आणि हस्तरेखा तज्ञ असल्याचे लोकांसमोर सांगत असायचा. लोकही त्याला आपले भविष्य विचारत. मग तो त्यांचे भविष्य सांगून त्यांना खुश करीत असायचा. अशा प्रकारे त्याने अमाप धनदौलत कमावली. एके दिवशी तो लोकांचे भविष्य सांगण्यात गुंतला असताना एक व्यक्ती त्याच्याकडे पळत-पळत येतो आणि म्हणतो की, तुमच्या घरामध्ये चोरी झाली आहे. त्यावर तो आपल्या घराकडे जात असताना मध्येच त्याला एक व्यक्ती अडवतो आणि अशाप्रकारे धावण्याचे कारण विचारतो. यावर तो ज्योतिषी स्वत:च्या घरी चोरी झाल्याचे सांगतो. यावर तो व्यक्ती म्हणतो, ही गोष्ट अतिशय आश्चर्यकारक आहे की, जो व्यक्ती दुसऱ्या लोकांचे दुर्भाग्य ओळखतो. त्याला स्वत:च्या दुर्भाग्याबद्दल माहित नाही. यावर तो ज्योतिषी शरमेने मान खाली घालतो आपला घमंडी, भामटेपणा लोकांसमोर व्यक्त करत असतो. तात्पर्य - ज्योतिष, भविष्य सांगणाऱ्यवर विश्वास ठेऊ नये.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 29 जुलै 2025💠 वार - मंगळवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1EJ9RubCDj/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या वर्षातील २१० वा दिवस 🚩 महत्वाच्या घटना - • १९७५- इंडियन नॅशनल थिएटर निर्मित ती फुलराणी या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिर येथे झाला.• १९९६ - फ्रान्सने अणुचाचण्या बंद केल्याचे जाहीर केले.• २००६ - इरफान पठाणने पहिल्याच ओव्हरमध्ये तीन बळींची हॅट ट्रिक करून कसोटी क्रिकेटमध्ये नवा विक्रम केला🎂 जन्म -• १२७४ - श्री निवृत्तीनाथ महाराज ज्येष्ठ गुरू संत• १८५३ - मधुसूदन राव ओडिया साहित्यिक• १८७१ - कवी चंद्रशेखर गोऱ्हे• १८८३ - बेनितो मुसोलिनी, इटलीचा हुकुमशहा.• १९०४ - जे.आर.डी. टाटा, भारतीय उद्योगपती• १९२२ - बळवंत मोरेश्वर पुरंदरे, मराठी इतिहाससंशोधक, लेखक.• १९२२ - रज्जू भैय्या - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ४थे सरसंघचालक• १९२५ - शिवराम दत्तात्रेय फडणीस, मराठी व्यंगचित्रकार.• १९५९ - संजय दत्त, हिंदी चित्रपट अभिनेता • १९७० - नेमबाज राजवर्धन सिंग राठोड• १९७५ - लंका डिसिल्वा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.🌹 मृत्यू -• १९६३- सदाशिव आत्माराम जोगळेकर लेखक व संपाद‌क• १९८७ - बिभूतीभूषण मुखोपाध्याय, बंगाली लेखक.• १९९३- रँग्लर गोपाळकृष्ण लक्ष्मण चंद्रात्रेय - गणितज्ञ• १९९५- रुपेश कुमार - खलनायक, निर्माते व दिग्दर्शक• २०००- देवेन्द्र मुर्डेश्वर - बासरीवादक• २००१- राम मेघे - महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री• २००८ - इश्मीत सिंग सोधी, भारतीय पार्श्वगायक.• २०१९- जॉर्ज फर्नांडिस भारतीय पत्रकार आणि राजकारणी पद्मा विभूषण••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*नागपंचमी निमित्ताने सर्पमित्र क्रांती बुद्धेवार यांची मुलाखत* ..... पूर्ण मुलाखत वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महायुती सरकारचा हिंदी भाषा सक्तीला ब्रेक, तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर, अखेर त्रिभाषा सूत्र रद्द*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आज दुपारी एक वाजता दहाव-बारावी पुरवणी परीक्षाचा निकाल होणार जाहीर ...!!*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *CAT 2025 नोंदणी अधिसूचना जारी, 170 शहरांमध्ये होणार परीक्षा; अर्ज भरण्यास 1 ऑगस्टपासून सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शिक्षण वाचवा - विद्यार्थी वाचवा, छत्रपती संभाजीनगरात हजारो विद्यार्थ्यांची भरपावसात महारॅली, शिक्षणाचे बाजारीकरण रोखण्याची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुण्यात श्रवणबाधित विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक शाळेचे उद्घाटन, डॉ. सायरस पूनावाला यांच्या हस्ते 1976 पासून कार्यरत असलेल्या शाळेच्या नव्या इमारतीचे लोकार्पण*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *प्रतिभावंत साहित्यिक ज्येष्ठ कादंबरीकार शुभांगी भडभडे यांचे नागपूरमध्ये निधन; तब्बल 82 पुस्तके प्रसिद्ध, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *नागपूरची बुद्धिबळपटू दिव्या देशमुखची ऐतिहासिक कामगिरी, 2025 महिला वर्ल्ड कप विजेतेपदावर कोरले नाव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संजय पंचलिंग, शिक्षक, बरबडा 👤 सुदीप दहिफळे👤 दलित सोनकांबळे, बिलोली*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 38*तुम्ही जेवढे त्याच्या जवळ जाल**तेवढा तो मोठा होत राहील..**सांगा पाहू कोण .....?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - चप्पल ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नशिबाचे चक्र सतत फिरत असते, म्हणूनच कोणी हरखून जाऊ नये किंवा हतबलही होऊ नये.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'ग्रामसेवक' या पदाचे नवीन नाव काय आहे ?२) 'मॉर्निंग कन्सल्ट' या अमेरिकेतील संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार 'जगातील सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल स्थान' कोणी पटकावले ?३) वीज पडण्याच्या वेळी कोणते ठिकाण सुरक्षित असते ?४) 'लढण्याची विद्या' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) 'पेशी' हे नाव प्रथम कोणत्या शास्त्रज्ञाने वापरले ? *उत्तरे :-* १) ग्राम पंचायत अधिकारी २) नरेंद्र मोदी, भारत ३) बंद इमारत ४) युद्धकला ५) रॉबर्ट हूक*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *वडस म्हणजे काय ?* 📕वडस हा डोळ्यांचा विकार आहे. तुम्ही काही लोकांच्या डोळ्यात पांढुरका पडदा पाहिला असेल. डोळ्यांच्या नाकाजवळच्या भागापासून बुबुळापर्यंत असणाऱ्या या पडद्याला वडस असे म्हणतात. वडस होण्याचे मुख्य कारण म्हणजे वयोमानानुसार डोळ्यातील श्लेष्मल आवरणाच्या खालील पेशी व उतींमध्ये होणारे हानिकारक बदल हे होय. सामान्यतः प्रौढ पुरुषांना हा रोग होतो.वडस म्हणजे डोळ्यातील श्लेष्मल आवरणाची एक त्रिकोणाकृती घडीच असते. ती बुबुळापर्यंत व कधीकधी बाहुलीच्या वरच्या वाजूपर्यंत वाढते. बाहुलीवर या पडद्याची वाढ झाल्यास दिसायला त्रास होतो. डोळ्यांच्या हालचालींवर मर्यादा आल्याने क्वचित एकाऐवजी दोन वस्तू दिसायला लागतात.वडसाचा आकार जर वाढत नसेल व त्यामुळे दिसायला त्रास होत नसेल, तर उपचार करण्याची आवश्यकता नसते. वडसाचा आकार जर वाढत असेल वा दिसायला त्रास होत असेल, तर मात्र उपचार करणे गरजेचे असते. यात शस्त्रक्रिया करावी लागते. ही सोपी शस्त्रक्रिया असून यात वाढलेला पडदा कापून टाकतात. वडस उपचाराने नक्कीच बरे होते.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••देखोनिया तुझ्या रूपाचा आकारउभा कटीकर ढवोनिया || धृ ||तेणे माझ्या चित्ती झाले समाधानवाटते चरण न सोडावे || १ ||मुखी नाम गातो वाजवितो टाळीनाचत राहुली प्रेमे सुख || २ ||तुका म्हणे मज तुझ्या नामा पुढेतुच्छे हे बा पुढे सकळही || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बाळ लहान असतो तेव्हा त्याच्या रडण्याचा आवाज सुद्धा वेगळा असतो. तसेच त्याच्या वाढत्या वयाबरोबर त्याच्या बोलण्यात, विचारात, हसण्यात सुद्धा बदल झालेला बघायला मिळत असतो.कारण दिवसेंदिवस त्याच्यात परिवर्तन होत असते. म्हणून योग्य तो परिवर्तन होत असेल तर त्याचे कौतुक करावे व त्याच्यात वेगळ्या प्रकारचे बदल आढळून आल्यास त्याची मनस्थिती बघून समजावून सांगणे गरजेचे आहे कारण त्या वयापेक्षा आपले अनुभव व मार्गदर्शन महत्वाचे असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *ठकास महाठक* एकदा एक सिंह आजारामुळे खूप दुबळा झाला. तेव्हा त्याची विचारणा करायला जंगलातील प्राणी, पक्षी येत-जात असत. तेव्हा एक लांडगासुद्धा सिंहाच्या भेटीला तेथे आला .त्याने सिंहाची विचारपूस केली व सिंहाचे कान भरायला सुरुवात केली ती अशी. लांडगा सिंहाला म्हणाला, महाराज क्षमा असावी, पण एक गोष्ट विचारायचे धाडस करू काय ? तेव्हा सिंहाने लांडग्याला लगेच परवानगी दिली व म्हणाला , विचार काय विचारायचे ते ? तेव्हा लांडगा म्हणाला ,महाराज आपल्या आजाराची विचारण करायला जंगलातील सर्व प्राणी आले पण ...! पण काय .....? सिंह म्हणाला . महाराज या प्राण्यांमध्ये मला कोल्हा दिसला नाही . नाही मी सहज विचारलं या कोल्ह्याला महाराजांबद्दल बिलकुल आदर नाही, असे मला वाटते. नाहीतर तो एकदा तरी येऊन गेला असता . कोल्हा तेवढ्यातच तेथे येऊन उभा झाला. लांडग्याचे शेवटचे शब्द कोल्ह्याच्या कानावर पडले होते .तेव्हा कोल्हा शांतपणे म्हणाला , महाराजांनी एकदा माझे बोलणे शांतपणे ऐकून घ्यावे नंतर काय ते बोलावे. महाराज आजपर्यंत एवढे पशु आपल्या भेटीला आले ,पण कोणी आपल्या आजाराचा उपाय शोधला ? या उपायासाठी मी आजपर्यंत खटपट करत होतो व ते औषध शोधल्यावरच मी आपल्याजवळ आलो.सिंह म्हणाला,सांग मग काय उपाय शोधला तू ! महाराज औषध एकदम रामबाण शोधल आहे. सांग बाबा लवकर काय ते औषध आहे , सिंह म्हणाला .कोल्हा म्हनला ते औषध असे आहे की एका जिवंत लांडग्याचे कातडे सोलून ते गरम असतानाच तुम्ही अंगावर घेतले म्हणजे झालं . त्याच क्षणी लांडगा तेथे मारला गेला तात्पर्य- कोणाचे कान भरण्यापेक्षा त्यांच्यातला सद्भावना जागृत करणे केव्हाही उत्तम !•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28 जुलै 2025💠 वार - सोमवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/15tzvPrXJk/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या वर्षातील २०९ वा दिवस 🚩 महत्वाच्या घटना :-• १८२१: पेरू देशाला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले.• १९३४: पं. मदनमोहन मालवीय आणि बापूजी अणे यांनी काँग्रेस राष्ट्रीय पक्षाची स्थापना केली.• १९७९: भारताच्या ५व्या पंतप्रधानपदी चौधरी चरणसिंग यांची नियुक्ती• १९९९: भारतीय धवल क्रांतीचे शिल्पकार डॉ. वर्गीस कुरियन यांना पालोस मार ग्रेगोरिओस पुरस्कार प्रदान.• २००१: आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान🎂 जन्म :-• १९३६: वेस्ट इंडीजचे क्रिकेट कर्णधार आणि फलंदाज सरगॅरी सोबर्स• १९४५: अमेरिकन व्यंगचित्रकार जिम डेव्हिस• १९५४: व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष ह्युगो चावेझ • १९७०: झिम्बाब्वेचे क्रिकेट खेळाडू पॉल स्ट्रँग• १९३२: भारतीय कवी आणि लेखक - साहित्य अकादमी पुरस्कार विजेते हिरेन भट्टाचार्य • १९०९: आंध्र प्रदेशचे ३रे मुख्यमंत्री के. ब्रह्मानंद रेड्डी🌹 मृत्यू :-• १९६८: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ ऑटो हान • १९७५: चित्रपट दिग्दर्शक राजाराम दत्तात्रय तथा राजा ठाकूर • १९७७: गायक आणि अभिनेते पंडित राव नगरकर • १९८१: नाटककार बाबूराव गोखले • १९८८: राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग ८ वेळा विजेतेपद मिळवणारे सैद मोदी • २०२०: भारतीय तेलगू अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक रवी कोंडाला राव • २०१६: भारतीय बंगाली लेखक, सामाजिक-राजकीय कार्यकर्त्या - पद्म विभूषण, पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या महाश्वेता देवी••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आईचे पत्र हरवले .......!*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मराठवाड्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ, छत्रपती संभाजीनगरसह 44 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी, हिंगोलीत सर्वाधिक 52.4 मिमी पाऊस*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *PM मोदी तामिळनाडूतील गंगाईकोंडा चोलापुरम मंदिरात पोहोचले, चोल राजाच्या 1000 व्या जयंतीनिमित्त म्हणाले- जेव्हा ओम नमः शिवाय ऐकतो तेव्हा अंगावर काटा उभा राहतो*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *लाडकी बहीण योजनेतून 26 लाख बहिणी अपात्र, जूनपासूनचे पैसे येणे बंद होणार, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *आषाढ वारीनंतर श्रीक्षेत्र निवृत्तीनाथाची पालखी 48 दिवसाच्या पायी वारीनंतर त्र्यंबकेश्वरला दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *AI सक्षम अंगणवाडीची सुरुवात, नागपूरमध्ये मिशन बालभरारी उपक्रमाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाट्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अकलूज :- शंकरनगर येथे नागपंचमी महोत्सव, 25 हजार महिला येणार:28 व 29 जुलै रोजी आयोजन, पारंपारीक खेळांचे होणार सादरीकरण‎*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत वि. इंग्लंड सामना अनिर्णीत, कर्णधार शुभमन गिल, के एल राहुल, रवींद्र जडेजा आणि वॉशिंगटन सुंदरने दिली कडवी झुंज*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 दिगंबर जैरमोड, समराळा👤 बालाजी गुट्टे 👤 अंकुश शिंदे👤 चंद्रकांत पिलाजी 👤 बालू उपलंचवार *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 37*संपूर्ण गावभर मी फिरते**पावसात-उन्हात रक्षण करते**तरीही मंदिरात जायला मी घाबरते**सांगा पाहू मी आहे तरी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - सायकल••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वृद्धांना खूप कमी गरजा असतात, पण कुटुंबीयांनी त्याकडे खूप कमी लक्ष देऊन चालत नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) सरपंच पदासाठी किमान वयाची अट किती वर्षे आहे ?२) आमदार होण्यासाठी वयाची किती वर्षे पूर्ण असावी लागतात ?३) खासदार होण्यासाठी वयाची किती वर्षे पूर्ण असावी लागतात ?४) पंतप्रधान होण्यासाठी वयाची किती वर्ष पूर्ण असावी लागतात ?५) राष्ट्रपती, उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीचे किमान वय किती वर्षापेक्षा जास्त असावे ? *उत्तरे :-* १) २१ वर्षे २) विधानसभा - २५, विधान परिषद - ३० वर्षे ३) लोकसभा - २५, राज्यसभा - ३० वर्षे ४) लोकसभेचा सदस्य असल्यास २५ किंवा राज्यसभेचा सदस्य असल्यास ३० वर्षे ५) ३५ वर्षे*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *लोखंड व पोलाद* 📙भारताची आधुनिक तीर्थस्थाने म्हणून भिलई, जमशेदपूर यांचा उल्लेख केला जातो. एखाद्या देशात दरवर्षी किती पोलाद निर्माण होते, यावर त्या देशाची औद्योगिक प्रगती मोजली जाते. एवढेच नव्हे, तर देशाची सुबत्ता व मूलभूत तंत्रज्ञान अवगत करण्याचे ते एक परिमाणच मानले जाते.लोखंड कित्येक शतके वापरात आहे. अनेक लोखंडी अवजारे व हत्यारेसुद्धा माणूस वापरत आला आहे. प्रत्येक छोट्या मोठ्या गावात लोहार काम चालतेच, पण लोखंड तयार करणे व त्यापासून पोलाद बनवणे हे मात्र अत्यंत खर्चिक व जोखमीचे काम आहे. खनिज लोहापासून प्रथम लोहरस बनवला जातो. हे काम प्रचंड आकाराच्या उंच भट्ट्यांमध्ये केले जाते. विटांनी खास बांधलेल्या भट्ट्यांत खनिज लोह वितळवुन शुद्ध लोखंडाच्या रसाचा थर वेगळा बाहेर काढला जातो. तळाशी राहिलेल्या चिकट थराचा डांबरासारखा वापर करतात.खनिज, लोह, कोक, चुनखडी यांचे बारीक केलेले मिश्रण तप्त वायूंच्या झोताने भट्टीत तापवून शुद्ध लोखंड तयार केले जाते. याला काठिण्य नसते. याला 'पिग आयर्न' असेही म्हटले जाते. हा तप्त रसच अनेकदा पोलाद बनवण्यासाठी वापरला जातो. दुसऱ्या भट्टीत शुद्ध लोखंडाचा रस घेऊन त्यात चुनकळी मिसळले जाते. त्यानंतर लगेच शुद्ध प्राणवायू या भट्टीत सोडला जातो. सर्व प्रकारच्या अशुद्ध कणांचे त्यात ज्वलन होऊन जाते व मोजके कार्बन व लोखंड यांचे मिश्रण असलेले कणखर पोलाद द्रवस्वरूपात शिल्लक राहते. जेव्हा स्टेनलेस स्टील बनवायचे असेल, तेव्हा त्यातच क्रोमियम घातले जाते. गंज न धरणे व चकचकीत दिसणे हे गुण त्यामुळे स्टीलमध्ये येतात. सर्वात महत्त्वाचा भाग यानंतरचा असतो. पोलादाच्या तप्त रसापासून पाहिजे त्या वस्तू, पाहिजे ते आकार देणे हे एक कौशल्याचे काम असते. त्यासाठी रोलिंग स्टील मिल हा प्रकार वापरला जातो. यामध्ये गरम म्हणजे जवळपास पांढरेशुभ्र तप्त पोलाद सरकत्या चाकांवरुन सरकवत पाहिजे त्या जाडीचे, आकाराचे होईतोवर हलवले जाते. या पद्धतीने पोलादी तक्ते, पत्रे बनतात, तर रूळ, गर्डर्स हे साच्यांमध्ये ओतुन बनवले जातात. ज्यावेळी पोलादी सळ्या बनवायच्या असतात, त्यावेळी लहान भोकातून ओघळणारा पोलादी रस ठराविक पद्धतीत खेचून सळ्या बनवल्या जातात.पोलाद बनवण्यासाठी जुन्या लोखंडी वस्तू, लोखंडी भंगार सामान यांचाही वापर केला जातो. या स्वरूपाचे काम छोटे कारखाने छोट्या प्रमाणात काम करू शकतात; पण खनिज लोहापासून लोखंड व पोलाद बनवणारे कारखाने मात्र मोठ्या प्रमाणावरच उभारावे लागतात. या सर्व प्रकारात अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तापमान नियंत्रण. यांमध्ये थोडीफार जरी गडबड झाली, तरीही पोलादाच्या गुणधर्मात लगेच फरक पडतो. जगभर पोलादनिर्मिती ही अधिकाधिक यांत्रिक पद्धतीने होत चालली आहे. कमीत कमी माणूसबळ व जास्तीत जास्त यांत्रिक मानव (रोबो) वापरून या भट्टय़ांचे काम चालते. जेथे मानवी आरोग्याला धोका आहे, तेथे आता यंत्रमानवाचा वापर केला जातो. या बाबतीत मात्र आपण खूपच मागे आहोत.जपानमध्ये आज घटकेस पोलादनिर्मितीसाठी व मोटारउद्योगात सर्वात जास्त यंत्रमानव वापरात आले आहेत. अद्ययावत तांत्रिक ज्ञानाचा फायदा माणशी वा दर कामगारामागे जास्त पोलाद निर्माण होण्यामध्ये मिळत जातो. यासाठी सुरुवातीला जरी मोठी गुंतवणूक करावी लागली, तरी ती फायद्याची ठरते.आकडेवारी व एकूण पोलादनिर्मिती या घोळात जास्त न शिरता एका ढोबळ पाहणीनुसार जपान : कोरिया : भारत या आशियाई देशांतील पोलादनिर्मिती कारखान्यात असलेले कामगार व त्यांची पोलादनिर्मितीची क्षमता यांचे गुणोत्तर १ : ३ : १९ असे व्यक्त होते. यंत्रमानवांचा वापर जपानमध्ये सर्वात जास्त झाल्यानेच हे शक्य झाले आहे.जगातील पोलाद व्यवसायावर भारतीयांचे वर्चस्व २००९ साली निर्माण झाले आहे. टाटा समूहाने रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली पोलादनिर्मिती करणारी 'कोरस' ही मोठी कंपनी विकत घेतली. टाटा स्टील या त्यांच्या कंपनीचे स्थान त्यामुळे पहिल्या पाचांत जाऊन पोहोचले आहे. भारतीय वंशाचे पण लंडनचे रहिवासी लक्ष्मी मित्तल यांचे सत्तर देशांत पोलादनिर्मितीचे कारखाने होतेच, पण त्यांनीही 'आर्सेलर' नावाची फार मोठी कंपनी ताब्यात घेऊन पहिल्या क्रमांकवर झेप घेतली आहे.असे असले, तरी दरमाणशी पोलादाचा वापर करण्यात मात्र आपण खूपच मागे आहोत.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आवडे हे रूप गोजिरे सगुणपाहता लोचन सुखावले || धृ ||आता द्रूष्टी पुढे एसाची तू राहेजो मी तुज पाहे वेळोवेळा || १ ||लाचावले मन लागलीस गोडीते जीव न सोडी ऐसे झाले || २ ||तुका म्हणे आम्ही मागावे लडिवाळीपुरवावी आळी माय बाप || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सौंदर्य मानव प्राण्याला मिळालेली निसर्गाची विशेष देणगी आहे. त्या सौंदर्याला प्रत्येकाने जपले पाहिजे. पण,त्या सौंदर्याचे प्रदर्शन केल्याने त्या सौंदर्याचे महत्व कमी होते.वाईट वागल्याने किंवा एखाद्याचे वाईट केल्याने शेवट त्याचा वाईटच होत असतो. म्हणून जे काही मिळालेले आहे त्यातच समाधान मानून आनंदात राहण्याचा प्रयत्न करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *ज्ञानाचा गर्व* आगगाडीचा प्रवास करीत असताना, एका प्राध्यापकाला आपल्या शेजारी एक आडाणी शेतकरी बसला असल्याचं आढळून आलं. स्वत:च्या ज्ञानाची घमेंड बाळगणारा तो प्राध्यापक थोडय़ाच वेळात त्या आडाणी शेतकर्‍याची थट्टा करून आजूबाजूच्या बसलेल्या प्रवाशांची करमणूक करू लागला. थोडा वेळ ती थट्टा निमूटपणे सहन केल्यावर तो शेतकरी त्या प्राध्यापकाला म्हणाला, साहेब, काही झालं तरी तुम्ही ज्ञानी आणि मी अज्ञानी. तरीसुद्धा आपला गाडीतला वेळ चांगला जावा, म्हणून आपण एकमेकांना कोडी घालूया. मी आडाणी व गरीब असल्याने कोडं सोडवण्यात जर मी हरलो, तर मी तुम्हाला फक्त पाच रुपये द्यायचे आणि जर तुम्ही हरलात, तर तुम्ही मात्र मला पंचवीस रुपये द्यायचे. आहे कबूल? हे ऐकून तो प्राध्यापक आनंदला आणि अवतीभवतीच्या सहप्रवांशावर छाप मारायलाही सुसंधी आपल्याकडे आपणहून चालून आली आहे असा विचार करून त्या शेतकर्‍याला म्हणाला, तुझी कल्पना मला मान्य आहे. पहिलं कोड, तू मला घाल.शेतकर्‍यानं विचारलं, ज्याला उडताना तीन पाय, चालताना दोन पाय आणि बसला असता फक्त एक पाय असतो, असा पक्षी कोणता ? या कोडय़ाचं उत्तर देता न आल्यानं प्राध्यापक काहीसा ओशाळून म्हणाला, बाबा रे, मी हरलो. हे घे पंचवीस रुपये, आणि या कोडय़ाचं उत्तर तू मला सांग. प्राध्यापकानं दिलेल्या पंचवीस रुपयांपैकी वीस रुपये स्वत:च्या खिशात टाकून, उरलेले पाच रुपये त्या प्राध्यापकाच्या हाती देत तो शेतकरी म्हणाला, मला सुद्धा या कोडय़ाचं उत्तर देता येत नाही, म्हणून मी हरल्याचे पाच रुपये तुम्हाला देत आहे एक आडाणी शेतकर्‍याने हातोहात चकविल्यामुळे फजिती पावलेला तो प्राध्यापक झटकून तिथून उठला व दुसर्‍या डब्यात गेला.तात्पर्य - ज्ञानाचा गर्व करू नये.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 26 जुलै 2025💠 वार - शनिवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1Azu9jW9NP/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या वर्षातील २०७ वा दिवस 🚩 महत्वाच्या घटना :-1999 – कारगिल विजय दिवस, भारतीय सैन्याने कारगिल युद्धात पाकिस्तानवर विजय मिळवला. दरवर्षी 26 जुलै हा "कारगिल विजय दिवस" म्हणून साजरा केला जातो.2008 – अहमदाबाद बॉम्बस्फोट, गुजरातमधील अहमदाबाद शहरात अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट झाले, यामध्ये अनेक निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला.🎂 जन्म :- • 1874 – जयकर एम.आर. (माधवराव जयकर):स्वातंत्र्यसैनिक, कायदेपंडित आणि शिक्षणतज्ज्ञ. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू🌹 मृत्यू :-• २००९ - भास्कर चंदावरकर, मराठी संगीतकार••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्वयंशिस्त हाच सर्वोत्तम उपाय*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीच्या दौऱ्यात अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या घेतल्या भेटी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मी पदावरून रिटायर झाल्यानंतर कुठलंही शासकीय पद स्वीकारणार नाही; सरन्यायाधीश भूषण गवईंचं मोठं विधान*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *काँग्रेस नेते माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा लवकरच भाजप प्रवेश होण्याची शक्यता; काँग्रेसवर नाराजी उघड, शेरोशायरीतून संकेत, म्हणाले, बस बिखरना है मुझे*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबई, ठाणे, रायगडसह कोकणला ऑरेंज अलर्ट, विदर्भात पावसाचा जोर, तर मराठवाड्यातील अनेक जिल्हे मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सरकारने आता सर्व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सलग 30 दिवसांची अर्जित रजा घेण्याची दिली परवानगी, राज्यसभेत कार्मिक राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी यासंदर्भात घोषणा केली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने डॉ.नीलम गोऱ्हे सन्मानित, हा पुरस्कार समाजातील प्रत्येक महिलेसाठी आहे - विधान परिषद उपसभापती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडू वेदा कृष्णमूर्ती हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संतोष वाघमारे, तंत्रस्नेही शिक्षक, धर्माबाद 👤 रमेश मस्के, नांदेड👤 वैभव भोसले, नांदेड *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 36*नसते मला कधी इंजीन**नसते मला कसलेही इंधन**आपले पाय चालवा भरभर**तरच धावणार मी पटपट**सांगा मी आहे तरी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - टोपी ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••यशाकडे वाटचाल करण्यासाठी सदवर्तन हा पहिला टप्पा असतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'तलाठी' या पदाचे नवीन नाव काय आहे ?२) कृत्रिम पावसाचे जनक कोण ?३) लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने २०२५ चा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' कोणाला जाहीर झाला आहे ?४) 'रोग्यांची सुश्रुषा करणारी' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांची सीमा रेषा कोणती नदी ठरविते ? *उत्तरे :-* १) ग्राम महसूल अधिकारी २) व्हिन्सेंट जोसेफ शेफर, अमेरिकन शास्त्रज्ञ ३) नितीन गडकरी ४) परिचारिका ५) वैनगंगा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🧠 *वेड्या माणसाच्या मेंदूत काय बिघाड होतो ?* 🧠 वेडा म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर कपडे फाडणारी, दगड मारणारी, असंबद्ध बडबड करणारी व्यक्ती उभी राहते. एक तर आपल्याला तिची भीती वाटते किंवा किळस वाटते. आपण पाहिलेल्या अशा व्यक्ती म्हणजे वेडातील एक प्रकार आहे.मनोविकाराचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी काही व्यक्तींनाच वरील लक्षणे असतात. इतर प्रकारांमध्ये भ्रमिष्टपणा, उन्माद, अतिनैराश्य हे गंभीर आजार; तर तणावग्रस्त मानसिकता, नैराश्य, हिस्टेरिया हे कमी गंभीर आजार यांचा समावेश होतो. याशिवाय सदोष व्यक्तिमत्त्व - जसे संशयी स्वभाव, घुमेपणा, आत्मकेंद्रीपणा, हट्टीपणा, परावलंबित्व, तसेच समाजविघातक कृत्य करण्याची प्रवृत्ती; हे देखील सौम्य प्रकारचे मनोविकार समजले जातात. काही व्यक्ती घराला कुलूप लावल्यानंतर तीन तीनदा ओढून तर पाहतातच, पण थोडे अंतर गेल्यावर परत येऊन पाहतात. हा सुद्धा एक प्रकारचा मनोविकारच आहे. अंगात येणे, लैंगिक विकृती व व्यसनाधीनता; हे देखील मनोविकारच आहेत.वरील मनोविकार पाहिल्यावर आपल्याला साहजिकच असा प्रश्न पडतो की, या व्यक्तींच्या मेंदूत काही बदल होत असतील का ?आपल्या मेंदूमध्ये कोट्यवधी पेशी असतात. त्या पेशी अनेक धाग्यांसारख्या तंतूंनी एक दुसऱ्याशी जोडलेल्या असतात. एका पेशीतील संदेश दुसऱ्या पेशीपर्यंत जाण्यासाठी तर तंतूत असणारे रासायनिक द्रव्य व त्यातून जाणारा विद्युतसंदेश यांचा महत्त्वाचा वाटा असतो. या रासायनिक पदार्थांचे प्रमाण कमी जास्त झाले किंवा विद्युतसंदेशात बिघाड झाला, तर मेंदूचे कामकाज बिघडते. अर्थात मेंदूच्या रचनेत काही बदल होत नाही.मानसिक विकारांची कारणे बघितल्यास त्यात अनुवांशिकता (विशेषत: गंभीर मानसिक विकार), मातापित्याचे प्रेम व वागणूक, घरातील वातावरण, सामाजिक आर्थिक परिस्थिती, व्यसने व शारीरिक आजार, मेंदूच्या आवरणाचा दाह, गुप्तरोग, अपघातात मेंदूला इजा होणे; यांचा समावेश होतो.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आता बोला मुखाने हरि नाम जय जय रामआता बोला मुखाने जय जय राम, जय जय राम जय जय रामआता तरी बोला मुखाने जय जय राम || धृ ||राम नामाने वाल्या कोळी तरला, वाल्याचा वाल्मीकी झालाऐसे हरिनामाचे काम…. जय जय || १ ||राम नामाने आवडीत घडले, पाण्यावरती पाषाण तरलेऐसे हरिनामाचे काम…… जय जय || २ ||एकाजनार्दनी राम नाम, उद्धरिले भाविकातऐसे हरिनामाचे काम ….. जय जय || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मनाला चंचल म्हणतात कारण ते एका विचारावर किंवा एका भावनेवर जास्त काळ लक्ष केंद्रित करू शकत नाही. ते सतत विचार, भावना आणि इच्छांमध्ये बदलत राहते. चंचल मन कुठं जाऊन स्थिरावेल हे सांगता येत नाही. चंचल मनामुळे नको त्या गोष्टी आपल्याकडून घडतात आणि अडचणी वाढायला सुरूवात होते म्हणून प्रत्येकाने अंतर्मनाचा विचार करावा.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *श्रेष्ठ कोण ?* ‍‍ एक माणूस अरण्यात फिरत असता तेथे त्याची एका सिंहाशी भेट झाली. त्यावेळी त्या दोघांनी निरनिराळय़ा विषयांवर बर्‍याच गप्पा मारल्या व त्यामुळे ते दोघे एकमेकांस आवडू लागले. शेवटी मात्र ते 'माणूस श्रेष्ठ की, सिंह श्रेष्ठ?' या विषयावर बोलू लागले व त्याचे वादात रूपांतर झाले. ते दोघेही भांडू लागले. नुसत्या बोलण्याने माणसाचे श्रेष्ठत्व त्या माणसास सिध्द करता येईना, तेव्हा त्याने आपल्याजवळ असलेले चित्र त्याला दाखविले. सिंहाची आयाळ हातात धरून त्याच्या पाठीवर एक माणूस आहे असे ते चित्र होते. ते पाहून सिंह त्याला म्हणाला, 'ज्याने हे शिल्प तयार केले तो मनुष्य होता, तोच जर सिंह असता तर माणसाच्या छातीवर बसून सिंह त्याला मारतो आहे, असे त्याने दाखविले असते.'तात्पर्य - प्रत्येक जण वाद घालताना स्वत:ला अनुकूल असतील अशीच प्रमाणे पुढे मांडतो. दुसर्‍या बाजूची प्रमाणे समजून घेण्याचा प्रयत्न करीत नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 24 जुलै 2025💠 वार - गुरुवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9?mode=ac_t••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔹 महत्वाच्या घटना :• 1911 – अमेरिका आणि जपान दरम्यान व्यापार करार झाला.• 1927 – बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अ‍ॅन्ड ट्रामवेज कंपनीने मुंबईत पहिली डिझेल बस सेवा सुरू केली.• 1969 – अपोलो 11 अंतराळ मोहिमेतील नायक पृथ्वीवर परतले. नील आर्मस्ट्राँग, बज़ ऑल्ड्रिन आणि मायकल कॉलिन्स यांचे यशस्वी आगमन.🎉 जन्मदिवस :•|1899 – गोविंद तळवलकर, विख्यात मराठी पत्रकार आणि लेखक.• 1951 – लिंडा कार्टर, अमेरिकन अभिनेत्री (Wonder Woman साठी प्रसिद्ध).🕯️ पुण्यतिथी :• 1980 – पीटर सेलर्स, प्रसिद्ध ब्रिटिश विनोदी अभिनेता.• 2000 – अर्जुन सिंह, भारतीय राजकारणी🛰️ वैज्ञानिक/सांस्कृतिक माहिती :"सायन्स फिक्शन डे" काही ठिकाणी 24 जुलै रोजी साजरा केला जातो, कारण याच दिवशी विज्ञानकथांवर आधारित अनेक चित्रपटांची किंवा पुस्तकांची सुरुवात झाली होती.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••..... समूहात join होण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना २०२५ चा प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *क्रीडा सुधारणा, डोंपिंग कायदा आणि बुलेट ट्रेन प्रकल्प बाबत महत्वाची विधेयक आज लोकसभेत सादर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *भारतीय मजदूर संघाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त मोहन भागवत यांचं मार्गदर्शन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *तुळजाभवानी देवीच्या भक्तांसाठी गोड बातमी, 25 जुलैपासून मिळणार चितळे बंधूचा लाडूचा प्रसाद*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कोळसा आयातीत देशाचे 60,000 कोटी रुपयांचे परकीय चलन वाचले; मंत्री किशन रेड्डी यांची राज्यसभेत माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पाऊस पुन्हा सक्रिय, मुंबईसह कोकणातसुद्धा पावसानं लावली जोरदार हजेरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *चौथ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी भारताची धावसंख्या 4 बाद 264*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गोविंद शेठ कोकूलवार, सामाजिक कार्यकर्ते, नांदेड 👤 संतोष मुलकोड, LBS कॉलेज, धर्माबाद👤 शरयू देसाई, साहित्यिक, मुंबई 👤 राजेश पाटील मनुरकर, शिव व्याख्याते, नांदेड 👤 विष्णू रामोड, धर्माबाद👤 सचिन टेकाळे, माहूर 👤 संतोष लवांडे, शिक्षक, रायगड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 34*दिवसा झोप काढुनी मी**फिरतो बाहेर रात्रीला मी**आहे असा प्रवासी मी**पाठीला दिवा बांधून मी**ओळखा कोण आहे मी ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - लाल मिरची ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सूर्यदेखील सूर्यास्तानंतर दिसेनासा होतो, परंतु बुद्धिवंताच्यासारखे तारे कायम दैदीप्यमान असतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पाण्यासोबत कार्बन डायऑक्साइडची अभिक्रिया करून कोणते आम्ल तयार होते ?२) महाराष्ट्रातील सर्वात मोठे नाट्यगृह कोणते ?३) कोतवालाची नेमणूक कोण करतो ?४) 'रात्रीचा पहारेकरी' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) 'नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट' ही संस्था कोठे आहे ? *उत्तरे :-* १) कार्बोनिक आम्ल ( Carbonic acid ) २) षन्मुखानंद सभागृह, मुंबई ३) तहसीलदार ४) जागल्या ५) भोसरी, पुणे *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *केस का गळतात ?* 📕केस निरोगी, चमकदार, दाट असण्यासाठी त्यांचे पोषण होणे आवश्यक असते. हे पोषण आहारातील स्निग्धांश, प्रथिने यांद्वारे होत असते. प्रथिनांचा उपयोग केसातील केरॅटीन, मेलॅनिन या प्रथिनांची झालेली झीज भरून काढण्यासाठी होतो. जीवनसत्त्व अ, इ, प्रथिने, स्निग्धांश यांमुळे तेथील त्वचेचे पोषण होऊन मुळे मजबूत राहण्यास मदत होते.तसे दररोजच आपले केस थोड्या प्रमाणात गळत असतात. ते नैसर्गिक असते; परंतु समतोल आहार न घेतल्यास, त्वचेचे काही आजार झाल्यास, केसात कोंडा झाल्यास, विंचरताना ओढाताण झाल्यास केस गळतात. वर सांगितल्याप्रमाणे आजारानंतर केस गळण्याचे कारण पोषण न होणे हे असते. आजारात आहार योग्य प्रकारे घेतला जात नाही. त्यासोबतच आजाराच्या प्रतिकारासाठी शरीरातील पोषक घटक वापरले जाऊन त्यांची कमतरता निर्माण होऊन केसांचे पोषणही खालावते व त्यांची मुळे सैल होऊन ते गळावयास लागतात. लहान मुलांमध्ये प्रथिनांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या क्वाशिओस्कार या आजारात केस भुरकट होतात आणि थोडे ओढले तरी पटकन उपटले जातात.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नाम घेता उठाउठी,होय संसाराची तुटी || धृ ||ऐसा लाभ बांधा गांठीविठ्ठल पायी मिठी || १ ||नामापरते साधन नाहीजें तू करिसी आणिक कांही || २ ||हाकरोनी सांगे तुकानाम घेता राहो नका || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्यापेक्षा वयाने लहान असलेली व्यक्ती जर चांगले कार्य करत असेल तर त्याला प्रोत्साहन देणे मोठ्यांचे कर्तव्य आहे. पण,असे न होता त्याच्या वाटेत अडथळे निर्माण करून गंमत बघणारे असतील तर त्यांना मोठे म्हणता येणार नाही. माणसाचे विचार हे उच्च दर्जाचे तसेच एखाद्याला प्रोत्साहन देणारे असावेत. एखाद्याच्या जीवनात अडथळे निर्माण करणारे नसावेत. कारण या प्रकारची विचारसरणी असलेल्यांना लहान तर काय मुर्ख माणूस सुद्धा जवळ करत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" मी " चा त्याग करा*एका विख्‍यात संताला भेटण्‍यासाठी एक राजा आला आणि म्‍हणाला,’’ तुम्‍ही मला त्‍या स्थितीमध्‍ये घेऊन जा, ज्‍या स्थितीमध्‍ये तुम्‍ही आहात.’’ संताने म्‍हटले,’’ महाराज मी तुम्‍हाला त्‍या अवस्‍थेत निश्र्चित घेऊन जाईन, पण माझी एक अट आहे. उद्या पहाटे चार वाजता तुम्‍ही एकटे माझ्या कुटीवर या.’’ राजा म्‍हणाला,’’ ठीक आहे.’’ दुस-या दिवशी पहाटे राजा कुटीवर आला, राजाने कुटीच्‍या दारापाशी येताच संताच्‍या नावाने हाक मारली. त्‍याबरोबर आत जागे असणा-या संतांनी विचारले की कोण आले आहे, राजाने सांगितले,’’ मी राजा आलो आहे’’ संतांनी सांगितले की उद्या या. राजाला विचित्र वाटले पण तो तेथून निघून गेला. दुस-या दिवशी पहाटे चार वाजता राजा एकटा पुन्‍हा कुटीपाशी गेला, त्‍याने हाक मारली, संतांनी तोच प्रश्र्न विचारला, राजाने यावेळी उत्तरात सुधारणा केली कारण मी राजा आलो आहे हे वाक्य संतांना आवडले नसेल म्‍हणून राजाने सांगितले,’’ मी आलो आहे’’ संतांनी सांगितले, उद्या या. तिसरे दिवशी राजा पुन्‍हा गेला, दोन दिवसांप्रमाणेच घडले यावेळी राजाने उत्तर दिले, ‘’मी आहे’’ संतानी पुन्‍हा उद्या या असे सुनावले. राजा चौथ्‍या दिवशी मात्र विचारात पडला आता जावे की नको कारण संत काहीही उत्तर दिले हाकलून देतात, त्‍यापेक्षा न जाणेच बरे या विचारात होता. मात्र आता तीन दिवस हाकलून दिले आहे, आता चौथ्‍या दिवशी जाऊन बघु. चौथ्‍या दिवशी पण राजा गेला, त्‍याने संतांच्‍या नावाने हाक मारली, संतांनी आतूनच विचारले, कोण आहे, मात्र यावेळी राजाला काय उत्तर द्यावे हे सुचले नाही. तो गप्प राहिला. मग काही क्षणातच आतून संत बाहेर आले, त्‍यांनी राजाला जवळ घेतले, घट्ट मिठी मारली आणि म्‍हणाले, ‘’राजन तुम्‍ही परीक्षेत उत्तीर्ण झालात, पहिले तीन दिवसात तुमच्‍या उत्तरात तुम्‍ही ‘मी’ आलो असे उदगार काढले पण मी तर तुम्‍हाला एकट्यानेच बोलावले होते. तुम्‍ही तुमच्‍या मी पणाला बरोबर घेऊन आलात. मानवीजीवनात या मी पणाला काहीही स्‍थान नाही. मी पणा सोडला की खूप काही शिकावयास मिळते’’ तात्‍पर्य - मानवाने ‘’मी’’ पणा सोडल्‍यास खूप काही प्राप्त होते. ‘ मी’ पणाचा मृत्‍यू ज्‍यादिवशी मानवातून होतो तो त्‍यादिवशी संतत्‍वाकडे वाटचाल करू लागतो. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~