*सुट्टीतील - उपक्रम* *विषय - मराठी* दिनांक ३१ जुलै 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ http://www.pramilasenkude.blogspot.com ---------------------------------- *📚वाचा. व वहीत लिहा.✍* *🌺वाक्प्रचार व अर्थ🌺* *धर्मावर सोमवार - पदरचे काही एक न घालता पुण्य पदरी पाडून घेणे.* *धारातीर्थी पडणे - शूराचे मरण येणे.* *धरम धक्का बसणे - कार्य सफल न होता व्यर्थ हेलपाटे करावे लागणे.* *धिंडवडे काढणे - फजिती करणे.* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *🌺म्हणी व अर्थ🌺* *न कर्त्याचा वार शनिवार - ज्याला आपले काम करायचे नसेल तर तो सबबी सांगत राहतो.* *नवी विटी नवे राज्य - सगळीच परिस्थिती नवीन असणे.* *पाचामुखी परमेश्वर - सगळे बोलतात ती गोष्ट खरी मानावी.* *पदरी पडले पवित्र झाले - कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली तिला नावे ठेवू नये.* ---------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शाळा गोजेगाव* *ता.हदगाव जि.नांदेड.*
कविता - तपस्या जीवन प्रत्येकाचे नसते सुखी संकट आणि संघर्षाचे असते भोग भोगावे लागतात त्यांच्या खडतर आयुष्यात दुःख असते जरी दुःख आणि कष्ट असले तरी संघर्ष ते मात्र करतात जीवनाची तपस्या असली तरी जीवन आनंदात जगतात आयुष्यात मोठे संकट आले तरी, प्राण पणाला लावून दूर त्याला सारतात, जीवनाच्या कठीण तपस्यात मार्ग काढतात. 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*
*सुट्टीतील - उपक्रम* *विषय - मराठी* दिनांक ३० जुलै 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ http://www.pramilasenkude.blogspot.com ---------------------------------- *📚वाचा. व वहीत लिहा.✍* *🌺वाक्प्रचार व अर्थ🌺* *टक्के टोणपे खाणे - चांगल्या-वाईट अनुभवाने शहाणे होणे* *टिवल्या बावल्या करणे - कसातरी वेळ घालविणे.* *टाहो फोडणे - मोठ्याने आकांत करणे* *ठगबाजी करणे - फसविणे* *ठाण मांडून बसणे - निश्चय करणे* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *🌺म्हणी व अर्थ🌺* *तेरड्याचा रंग तीन दिवस - गोष्टीचा ताजेपणा वा नवेपणा अगदी कमी वेळ टिकणे* *थोरा घराचे श्वान त्याला सर्व देती मान - मोठ्या माणसाचा आश्रय हा प्रभावी ठरतो* *दे माय धरणी ठाय - पुरेपुरे होणे.* *दुधाने तोंड भाजले की ताक पण फुंकून प्यावे लागते - एखाद्या बाबतीत अद्दल घडली की माणूस प्रत्येक बाबतीत सावधगिरी बाळगतो* *दैव देते आणि कर्म नेते - दैवामुळे आपला उत्कर्ष होतो, पण स्वतःच्या कृत्यामुळे नुकसान होते.* ---------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शाळा गोजेगाव* *ता.हदगाव जि.नांदेड.*
*सुट्टीतील - उपक्रम* *विषय - मराठी* http://www.pramilasenkude.blogspot.com ---------------------------------दिनांक २९ जुलै *वाचा. वहीत लिहा.* *वाक्प्रचार व अर्थ* *झुरनीला लागणे - शरीराच्या किंवा मनाच्या व्यथेने झिजणे* *झळ लागणे -परिणाम भोगावा लागणे* *झोपेत असणे - काहीही कल्पना नसणे* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *🌺म्हणी व अर्थ🌺* *टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येतं नाही - श्रम केल्याशिवाय मोठेपणा प्राप्त होत नाही* *डोळ्यात केर आणि कानात फुंकर - रोग एक आणि उपाय निराळाच* *ढवळ्या शेजारी बांधला पवळा वाण नाही पण गुण लागला - वाईट माणसाच्या संगतीने चांगला मनुष्यही बिघडतो* ---------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शाळा गोजेगाव.* *ता.हदगाव जि.नांदेड.*
कविता - सुखाची सावली किती कष्टात जीवन त्यांनी काढले किती श्रमाचे भार त्यांनी सोसले उन्हातान्हाची त्यांनी नाही केली परवा जीवनास त्यांनी दिला आमच्या गारवा आई -वडील माझे सुखाची सावली तेच माझे पंढरीची विठू माऊली आयुष्याचा सार आई -वडील माझे सुखदुःखाचा आधार तेच माझे आई-वडील माझे वात्सल्याचा झरा तप्त उन्हातील माझ्या मंद गार वारा आई -वडील माझे सुखाची सावली तेच माझे पंढरीची विठूमाऊली क्षणोक्षणी येती प्रेमाचीआठवण भाव काळजातले तव फुलविती अंतरंगातील दुःखास मग होती स्पर्शुनी जाती मायेची साठवण आई वडील माझे सुखाची सावली तेच माझे पंढरीची विठूमाउली रानावनात स्वतः जाऊनी मग धडे शिक्षणाचे दिले आम्हास दुःख सोसुनी स्वतः माञ सुखाची सावली दिली आम्हास आई-वडील माझे सुखाची सावली तेच माझे पंढरीची विठू माऊली 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.*
गुरुमाऊली चित्र चारोळी कट्टा स्पर्धेसाठी 1) स्नेहाने तुझ्या नेत्रात पाहतांना कधी हरवले कळलेच नाही तुझ्या बासुरीच्या सुराने मग प्रेमधुंद मी झाले कळलेच नाही 2) डोळ्यात पाहिले,कौमुदित नाहले तुझ्या भावस्पर्शाने तृप्त कर कृष्णा स्वप्नरंग मनीचे स्वरा स्वरात पाहले अंतरंगातील वलयास तृप्त कर तृष्णा 3) प्रीतीचे बोल तुझे अबोल राधे ऐकू येतात काळजात मला शब्द तुझ्या त्या ओठातले सूर बासरीचे सांगतात मला 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे* *ता. हदगाव जि. नांदेड.*
कविता - सावर रे घन निळ्या निळ्या आकाशात पावसाचे थेंब थेंब बरसती तव सावर रे माझ्या मना ओथंबूनी मन माझे जाती बळीराजाचा आहे तुझ्यावर विश्वास, तूच आहेस त्याचा जगण्याचा श्वास आणि ध्यास तुझ्या आगमनाचे करतो स्वागत रूप तुझे किती रे पावसा कधी अंतःकरण सुखावते तर कधी पुरात कुणाचे मग आयुष्य सारे संपते थैमान घालती पावसाचे पाणी आभाळ गर्जूनी भयभीत करती तुफान वादळ वारा सुटून मग प्राणीजीवन विस्कळीत करती 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*
*सुट्टीतील - उपक्रम* *विषय - मराठी* दि.२७ जुलै ---------------------------------- http://www.pramilasenkude.blogspot.com 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *वाचा. वहीत लिहा.* *वाक्प्रचार व अर्थ - (च)* *चकार शब्द न काढणे - काहीही न बोलणे* *चतुर्भुज करणे - अटक करणे* *चंग बांधणे - निश्चय करणे* *चौपदरी घेणे - हाती झोळी घेण्याचा प्रसंग येणे* *चांदी उडणे - नाश होणे* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *म्हणी व अर्थ - (च)* *चोराची पावले चोरालाच ठाऊक - वाईट माणसांनाच वाईट माणसाची लक्षणे कळतात.* *चढेल तो पडेल - गर्विष्ट माणसाचा गर्व उतरल्याशिवाय राहत नाही* *चालत्या गाडीला खीळ - व्यवस्थित चालणाऱ्या कामात अडचण निर्माण करणे* ---------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शाळा गोजेगाव* *ता.हदगाव जि.नांदेड.*
कविता - श्रावणसरी येती श्रावणसरी श्रावणसरी ऊन-पावसाचा खेळ खेळती प्रतिबिंब दिसे इंद्रधनुचे नभात सप्तरंगी कमान घेऊन संगती येती श्रावणसरी श्रावणसरी ओलीचिंब होई रानमाती नदी-नाले,तळे तुडुंब भरती गीत समृद्धीचं मग गाती येती श्रावणसरी श्रावणसरी सासुरवाशीण वाट पाहती झोके बांधू झाडावरती नागोबाच गाणं गाती येती श्रावणसरी श्रावणसरी मन नाचे माझे मोरा परी बहिण भावास बांधूनी राखी रक्षाबंधनाचा सण साजरा करी येती श्रावणसरी श्रावणसरी हर्ष तनमनी माझ्या दाटती ओल्या काळजात धून वाजती सौदामिनी बिन वाजवती 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
कविता - सौदामिनी पृथ्वीच्या अंतरंगात खोलवर उकळणारा लाव्हा आहे उष्णतेची लाट पोटात घेऊन उफाळणारा प्रलयकार आहे संकटे जशीजशी अग्रेसर होतात अनेक संकटं निर्माण होतात सौदामिनी बनून लढत राहतात त्याच्यांशी दोन हात करावे लागतात धोका नाहीसा व्हावा म्हणून लढत जात असतो आम्ही त्याला संपविण्याच्या नादात पर्यावरणाचे रक्षण करत नाही आम्ही जपूया पर्यावरणास, लावून झाडे भूगर्भातील उष्णता होईल कमी प्राणीजीवन सर्व सुरक्षित होईल प्रदूषणमुक्त होण्याची मिळेल हमी 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे नांदेड
*सुट्टीतील - उपक्रम* *विषय - मराठी* http://www.pramilasenkude.blogspot.com ---------------------------------- *वाचा. वहीत लिहा.* दि.२५ जुलै *वाक्प्रचार व अर्थ - (घ)* *घडा भरणे -,शेवटचा परिणाम भोगण्याची वेळ येणे* *घरावर तुळशीपत्र ठेवणे - घरादाराची अशा सोडणे* *घर-घर होणे --एकच विचार परत परत येणे* *घोडे पेंड खाणे - अडचण निर्माण होणे* *घोडे पुढे ढकलणे - स्वतःच्या फायद्यासाठी पुढे सरसावणे* *म्हणी व अर्थ - (घ)* *घोडा मैदान जवळ आहे - कसोटीची वेळ जवळच आहे.* *घर फिरले म्हणजे घराचे वासे फिरतात - वाईट दिवस एकदा आले की मग आपले म्हणणारे लोक सुद्धा मदत करीत नाहीत* *घटका पाणी पिते , घड्याळ टोले खाते - वेगवेगळ्या माणसांना* *आपल्या कर्मानुसार सुख दुःख भोगावे लागते* ---------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शाळा गोजेगाव* *ता.हदगाव जि.नांदेड.*
गुरुमाऊली चित्र चारोळी स्पर्धा 1) सुख दुःखाच्या वाटेवर एकमेकांची साथ देऊ आयुष्यातील संकटांना दोघे मिळून तोंड देऊ 2) साथ तुझी मला मिळावी जीवन सुखाचे आपण जगावे माझी साथ तुला मिळावी हेच मागणे आपले असावे 3) जीवनातील सुखदुःखात तुझीच साथ हवी मला त्यावर मात करण्यासाठी तुझीच प्रीत हवी मला 4) घाम गाळून, कष्ट करून जीवन आपण जगु आयुष्यातील अडचणी दोघे मिळून सोडवू 5) डोळ्यातल्या पाण्याला आपण स्वतः पुसून घेऊ हृदयातल्या वेदनेला आनंदाचे रूप देऊ 6) कष्ट किती केले तरी वेदना जीवास होत नाही खांद्यावर ठेवुनी डोकं तुझ्या दुःख मजला बोचत नाही 7) साथ तुझ्या प्रेमाची असू दे मला अशी जवळ तुझ्या बसुनी निवांत राहू दे अशी 8) दोघं मिळून कष्ट करू संसार सुखाचा थाटवु ऊन सावल्यांचा खेळ हा असा आनंदाने घालवू ९) दुःख वेचिता वेचिता सुखही मी वेचीले तुझ्या सोबतीने मग स्वप्न सुखाचे पाहिले 10) कितीही वेदना झाकले तरी कळते मला काळजातल दुःख आयुष्य जगायचं ठरवल मी वाटू सोबतीने एकमेकांच सुखदुःख 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे* *ता.हदगाव जि. नांदेड.*
कविता - समानता स्त्री - पुरुष समानता फक्त म्हणायलाच आहे बंधनात बांधून तिला सार काही सोसण्यासाठी आहे घरातलं हव-नको ते सारं काही मग तीनच बघायचं धाकटयांना प्रेम, आणि थोरल्यांचा आदर करायचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत तीनच राबराब राबायचं पै - पाहुण्यांचं स्वागतही मग माञ तीनच करायचं घरादाराची मानमर्यादा तीनच सार सांभाळायच अगदी जीवावर बेतल तरी कपाळाच कुंकू जपायचं पुरुष कितीही पतीत असला तरी तोच नेहमी वर असतो समानतेच्या नावाखाली मात्र स्त्रीजन्मअग्निदिव्यासम असतो. 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*
*सुट्टीतील - उपक्रम* *विषय - मराठी* http://www.pramilasenkude.blogspot.com ---------------------------------- *📚वाचा. वहीत लिहा.✍* *वाक्प्रचार व अर्थ - (ग)* *गहजब होणे - बोभाटा होणे* *गगन ठेंगणे होणे - खूप आनंद होणे* *गळ्याला तात लागणे - प्राणघातक संकटात सापडणे* *गुळणी फोडणे - स्पष्ट शब्दात सांगणे* *गळ्यात धोंड पडणे - जबाबदारी अंगावर येणे* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *म्हणी व अर्थ - (ग)* *गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाल्ली - एखादी गोष्ट सिद्धीस गेली तर ठीक नाही तरी नुकसान नाही.* *गुळ नाही पण गुळाची वाचा तरी असावी - गरिबीमुळे आपण काही करू शकत नसलो तरी गोड बोलणं शक्य असल्यास गोड तरी बोलावे* *गरजवंताला अक्कल नसते - गरजेमुळे अडणार्याला दुसऱ्याचे निमूटपणे ऐकून घ्यावे लागते* ---------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शाळा गोजेगाव* *ता.हदगाव जि.नांदेड.*
कविता - अर्पण जीवनात माझ्या सुखदुःखात तुझीच साथ हवी मला अर्पण करून माझे जीवन स्वप्नातही तुझेच प्रेम हवे मला तुझ्या त्या मधुर वाणीमुळे तुझ्या त्या स्मितहास्यामुळे दुःख मी माझे विसरून जाते मग जगण्यावर मी मात करते तुझी आठवण येताच मला मन माझे गहीवरुन येते तुझ्या त्या अबोल प्रीतीमुळे मग मीच मला सावरते 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड
*सुट्टीतील - उपक्रम* *विषय - मराठी* http://www.pramilasenkude.blogspot.com ---------------------------------- *📚वाचा. व वहीत लिहा.✍* *🌺वाक्प्रचार व अर्थ - (ख)*🌺 *🔹खळीस येणे - हट्ट धरून बसणे* *🔸खडे चारणे - पराभव करणे* *🔹खो घालणे - विघ्न निर्माण करणे* *🔸खिळवून ठेवणे - स्थिर करून ठेवणे* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *🌺म्हणी व अर्थ - (ख)*🌺 *🔹खर्चणाराचे खर्चते आणि कोठावळ्याचे पोट दुखते - काम करणारास झीज सोसणारेच नुकसान होते. काही न करणाराचे निष्कारण पोट दुखते.* *🔸खायला काळ भुईला भार - निरूपयोगी मनुष्य* *🔹खाई त्याला खवखवे - जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते* *🔸खोट्याच्या कपाळी गोटा - खोटेपणा अथवा वाईट काम करणाऱ्या माणसाचे नुकसान होते* *🔹खऱ्याला मरण नाही - खरे कधी लपत नाही ते कधी तरी उघडकीस येते* ---------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शाळा गोजेगाव* *ता.हदगाव जि.नांदेड.*
*सुट्टीतील - उपक्रम* *विषय - मराठी* http://www.pramilasenkude.blogspot.com ---------------------------------- *📚वाचा. वहीत लिहा.✍* *🌺वाक्प्रचार व अर्थ - (क)*🌺 *🔹कंठशोष करणे - ओरडून गळा सुकविणे.* *🔸कंठस्नान घालणे - ठार मारणे.* *🔹कोंबडे झुंजविणे - भांडण लावून देऊन मजा पाहणे.* *🔸कान लांब होणे - अक्कल कमी होणे.* *🔹कुंपणाने शेत खाणे - विश्वासू माणसाने घात करणे.* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *🌺म्हणी व अर्थ - (क)*🌺 *🔹कुडी तशी पुडी - देहाप्रमाणे आहार.* *🔸काडी चोर तो माडी चोर - क्षुल्लक अपराध केलेल्या माणसाचा घडलेल्या एखाद्या मोठ्या अपराधाशी संबंध जोडणे.* *🔹काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता बरोबर होत नाही - थोड्याशा अधिकाराने जे काम होते ते पुष्कळशा पैशाने होत नाही.* *🔸कोरड्या बरोबर ओले जळते - ज्याची काही चूक नाही असा माणूस चूक असणाऱ्या बरोबर निष्कारण गुन्हेगार धरला जातो.* *🔹कधी गाडीवर नाव कधी नावेवर गाडी - सर्वांचे दिवस येतात समान स्थिती कधीच राहत नाही.* ---------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शाळा गोजेगाव* *ता.हदगाव जि.नांदेड.*
गुरुमाऊली चारोळी कट्टा शब्द चारोळी स्पर्धा - यशाची चांदी चमकते 1) अपयश या शब्दातच यशाची चांदी चमकते सोसावे लागतात कष्ट तेव्हाच यश झळकते 2) यश नेहमी लांब राहत कळत नाही माणसाला यशाची चांदी चमकते तेव्हा केलेल्या प्रयत्नाला 3) समर्थन माझ्या विचारांचं जेव्हा मीच मला विचारतो यशाची चांदी चमकते तेव्हा क्षितिज गाठायचंच म्हणतो 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे* *ता. हदगाव जि. नांदेड.*
कविता - नवचेतना नवचेतना ठेवून अंगी जसा, अंतःकरणात तरंग उठावा डोह मनाचा नितळसा असा स्पष्ट खोल तळाशी दिसावा थोपवून नेत्रातील अश्रू पापण्यासही व्हावे जड काळजास करुनी कठोर स्वप्न असे का? अवघड आठवणीतल्या सागरतळाशी मन अचानक गुंता करती अलगद सोडविता यावा गुंता अवघड स्वप्न साकार करती 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे.*
*सुट्टीतील - उपक्रम* *विषय - मराठी* 〰️〰️〰️〰️〰️〰️ http://www.pramilasenkude.blogspot.com ---------------------------------- *📚वाचा. वहीत लिहा.✍* *🌺वाक्प्रचार व अर्थ - (क)*🌺 *🔹कळस होणे - शिखर गाठणे* *🔸करार मदार करणे - आपसात एखादी गोष्ट ठरविणे* *🔹करुणा भाकणे - दयेची याचना करणे* *🔸काट्याचा नायटा करणे - क्षुल्लक कारणावरून अनर्थ ओढवणे* *🔹काळावर नजर ठेवणे - भविष्यकाळ जाणून घेणे* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *🌺म्हणी व अर्थ - (क)*🌺 *🔸केळीवर नारळी अन् घर चंद्रमौळी - अत्यंत गरीब स्थिती असणे* *🔹काकडीची चोरी फाशीची शिक्षा - अपराध खूप लहान पण त्याला दिली गेलेली शिक्षा मात्र खूप मोठी असणे.* *🔸कुठे जाशी भोगा तर तुझ्यापुढे उभा -* *जे संकट येऊ नये अशी आपली मनोमन इच्छा असते तेच संकट पुढे येणे* *🔹कर नाही त्याला डर कशाला - जर आपण एखादी गोष्ट केली नाही तर त्याबद्दल भीती बाळगण्याची काही गरज नाही* ---------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.
कविता - दूरदृष्टी माणसाच्या वागण्याची रीत इथे कशी आहे बघा न्यारी खर्याला असते पुराव्याची गरज अन् खोट्याचा तोलअसतो भारी दूरदृष्टी ठेवून करावी कामे स्वार्थाची परिभाषा नसावी मनी सत्याचाही दिवस उगवतो हीच आशा ठेवून जगावे जीवनी श्वास अन् निःविश्वास निरर्थक भासू लागे मजला जरीही, काळजाचा स्पंदनास न भेदावे दुःख मजला तरीही 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.*
*सुट्टीतील - उपक्रम* *विषय - मराठी* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ http://www.pramilasenkude.blogspot.com ---------------------------------- *📚वाचा.व वहीत लिहा.✍* *🌺वाक्प्रचार व अर्थ*🌺 *🔹इकडचा डोंगर तिकडे करणे - फार मोठे काम करणे.* *🔸उदक सोडणे - अशा सोडणे* *🔹उचल बांगडी करणे - जबरदस्तीने हलविणे* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *🌺म्हणी व अर्थ*🌺 *🔹इकडे आड तिकडे विहीर - दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती* *🔸ओळखीचा चोर जीवे न सोडी - ओळखीचा शत्रु हा अनोळखी शत्रु पेक्षा भयंकर असतो* *🔹एकाची जळते दाढी, दुसरा त्यावर पेटवू पहातो विडी - दुसऱ्याच्या अडचणींचा विचार न करता, स्वतःचा फायदा पाहण्याची दृष्टी ठेवणे* ---------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शाळा गोजेगाव* *ता.हदगाव जि.नांदेड.*
*सुट्टीतील - उपक्रम* *विषय - मराठी* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ http://www.pramilasenkude.blogspot.com ---------------------------------- *📚वाचा. वहीत लिहा.✍* *🌺वाक्प्रचार व अर्थ - (अ)*🌺 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *🔸अंकित करणे - पूर्ण ताब्यात घेणे* *🔹आयत्या पिठावर रेघोट्या ओढणे - कष्टाशिवाय चैन करणे* *🔸अभय देणे - सुरक्षितपणाची हमी देणे* *🔹अंतर्धान पावणे - गुप्त होणे* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *🌺म्हणी व अर्थ (अ)*🌺 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *🔹आलिया भोगासी असावे सादर - आपल्या कर्मात जे काही लिहिले आहे त्यानुसार भोगावे लागते. म्हणून त्याला कुरकुरू नये* *🔸आपले दात आणि आपले ओठ - शिक्षा करणारे आपणच आणि ज्याला शिक्षा करावयाची तोही आपल्यातलाच अशी अडचणीची परिस्थिती* *🔹आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार ? - जे मुळातच नाही त्याची थोडीदेखील अपेक्षा करणे व्यर्थ होय.* ---------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शाळा गोजेगाव* *ता.हदगाव जि.नांदेड.*
*कविता - परिवर्तन* अज्ञानाचा करून नायनाट उगवून ज्ञानमय पहाट परिवर्तन असे घडवून आणले फुले दांपत्य स्त्रीशिक्षणास झिजले शिक्षणा वाचून नाही उद्धार शिक्षण हेच प्रगतीचे द्वार संघर्ष त्यांनी करून जीवनभर शिक्षणाचे महत्व सांगितले वारंवार शिक्षण हे सत्य चिरंतन जाणले घराघरातून ज्ञानदीप उजळवीले ध्येय ठेवून सदा सुनिश्चित भविष्यातील सुजान घडविले 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
*सुट्टीतील - उपक्रम* *विषय - मराठी* ---------------------------------- http://www.pramilasenkude.blogspot.com 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *📚वाचा वहीत लिहा.✍* *🌺वाक्प्रचार व अर्थ - (अ)*🌺 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *🔹अंतरीचा तळीराम गार होणे - मनातील इच्छा पूर्ण होणे.* *🔸असंगाशी संग होणे - वाईट माणसाशी संबंध येणे.* *🔹अनुग्रहण करणे - उपदेश करणे* *🔸अंकित करणे - पूर्ण ताब्यात घेणे* *🔹अमर होणे - कायमची कीर्ती प्राप्त होणे.* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *🌺म्हणी व अर्थ - (अ)🌺* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *🔹आजा मेला नातू झाला - एखादे नुकसान व्हावे आणि त्याच बरोबर दुसऱ्याची फायद्याची गोष्ट होणे.* *🔸आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी - गरज असलेल्या माणसाला मदत न करता ज्याला गरज नाही त्याला मदत करणे.* *🔹आगीतून फुफाट्यात पडणे - लहान संकटातून अधिक मोठ्या संकटात सापडणे.* *🔸अर्थीदान महापुण्य - गरजू माणसाला दान दिल्याने पुण्य मिळते* *🔹आपला हात जगन्नाथ - मनुष्याचा उत्कर्ष त्याच्या स्वतःच्या कर्तृत्वावर अवलंबून असतो.* ---------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शाळा गोजेगाव.* *ता.हदगाव जि.नांदेड.*
*🌺सुट्टीतील - उपक्रम* *विषय - मराठी🌺* ---------------------------------- *📚वाचा. व वहीत लिहा.✍* *वाक्प्रचार व त्याचा अर्थ -(अ)* *〰️〰️〰️〰️〰️〰️〰️* *🔹१)अग्निदिव्य करणे - फार मोठ्या संकटातून बाहेर पडणे.* *🔸२)अटकेवर झेंडा लावणे - खूप पराक्रम करणे* *🔹३)अत्तराचे दिवे लावणे - भरपूर उधळपट्टी करणे* *🔸४)अळंटळं करणे - टाळाटाळ करणे* *🔹५)अक्कल पुढे धावणे - बुद्धीचा भलताच उपयोग करणे.* *〰️〰️〰️〰️〰️〰️〰️* *म्हणी व त्याचा अर्थ - (अ)* *🔹१)अडली गाय फटके खाय - एखादा माणूस अडचणीत सापडला की मग त्याला हैराण केले जाते.* *🔸२)असेल त्या दिवशी दिवाळी,नसेल त्या दिवशी शिमगा - अनुकूलता असताना चैन आणि नसेल तेव्हा उपास काढण्याची पाळी.* *🔹३)अगं अगं म्हशी, मला का नेशी ? - चूक आपण करावयाची व आपली चूक मान्य न करता दुसऱ्याचे शिरावर मारून मोकळे व्हायचे* *🔸४)अळी मिळी गुप चिळी - आपले रहस्य उघडे पडू नये म्हणून गप्प बसणे* *🔹५)आपल्याच पोळीवर तूप ओढणे - फक्त स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे.* ---------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शाळा गोजेगाव* *ता.हदगाव जि.नांदेड.*
* कविता - मृत्युपत्र* स्वतः घेऊन स्वतः भोवती जगणे इतके सोपे नाही संपत्तीसाठी नाती तुटती वाटते तितके सोपे नाही भाऊ भावाचा वैरी इथे हत्या करण्यास तयार होतो करून ठेवलेल्या मृत्युपत्राचा लालसा त्याच्या मनात शिरतो आईवडील जिवंत असताना जिव्हाळा त्यांचा एकमेकात असतो,नंतर मात्र क्षणाक्षणाला किंकाळी अन् दहशतीचा वनवा असतो संपत्तीच्या लालसेपायी कसलीही खंत त्यांना वाटत नाही, माणूस माणसाचा जीव घेतो, ही लाज त्यांना वाटत नाही जमीन- जूमल्याचा वाद इथे साधेपणाने मिटता मिटत नाही कोर्टकचेरीची चढून पायरी मग प्रश्न लढल्याशिवाय सुटत नाही असा प्रश्न इस्टेटीचा जीवनात उभा कोणी निर्माण करू नये गरजेपुरती असावी संपत्ती जास्त हव्यास कोणी करू नये 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.*
*सुट्टीतील उपक्रम* *विषय - मराठी* ---------------------------------- *📚वाचा. व वहीत लिहा.✍* *🌻शब्दसमूहाबद्दल किंवा अनेक शब्दांबद्दल एक शब्द*🌻 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *🔹ज्याची कशाशी तुलना करता येणार नाही असे - अतुलनीय* *🔸धर्मार्थ फुकट जेवण मिळण्याचे ठिकाण - अन्नछत्र ,सदावर्त* *🔹ज्याचा विसर पडणार नाही असा - अविस्मरणीय* *🔸स्वतः लिहिलेले स्वतःचे चरित्र - आत्मवृत्त ,आत्मचरित्र* *🔹जे प्रत्यक्षात नाही ते आहे असे वाटणे - आभास* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *🌺आलंकारिक शब्द🌺* *🔹काडी पहिलवान - हडकुळा माणूस* *🔸चालता काळ - वैभवाचा काळ* *🔹गर्भश्रीमंत - जन्मापासून श्रीमंत* *🔸कळीचा नारद - कळ लावणारा* *🔹उंटावरचा शहाणा - मूर्खपणाचा सल्ला देणारा* ---------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शाळा गोजेगाव* *ता.हदगाव जि.नांदेड.*
चित्रचारोळी - स्पर्धेकरिता 1) निळ्या निळ्या आभाळात तारा कसा लुकलुकतो तुझे पाऊल पडता खाली जीव माझा झूरझुर झुरतो. 2) तुला हसतांना पाहतांना तुझ्या हस्यावर वेडा मी झालो पाऊल पडता जमिनीवर तुझे तुझ्या नजरेत कैद मी झालो. 3) जीवनातील सुखदुःखात तुझीच साथ ,अशीच मला लाभू दे पावलोपावली तुझं हे प्रेम असंच मला आयुष्यभर लाभू दे 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ प्रमिलाताई सेनकुडे ता. हदगाव जि.नांदेड.
*कविता - आनंदाचा झरा* अंगणी काढता सुंदर रांगोळी अंगण दिसते सुंदर प्रातःकाळी आनंदाचा झरा वाहती, अशा सुंदर पहाट सोनसकाळी कृष्णतुळस दारात अंगणी प्राजक्ताचा गंध भोवताली सुसंस्कृत सदनाचे प्रतीक जसे गृहलक्ष्मीचे हर्षित सौख्य असे नातं जडतं अंगणी असं जन्म जन्मांतरीचे पहिलं पाऊल, पडत इथ बालपणाच फुलत अंगण बागडन्याच सरती बालपण,होता मोठे अंगणी हिरवा मंडप छान माता पिता करती इथे मग आनंदाने लेकीचे कन्यादान रुसण्या बागडन्याचे दिवस जाती, मनात झुलतो मग अंगणीचा झोका, हृदयात माझ्या हेलकावणारा ठोका 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.*
*उपक्रम -विषय - मराठी* ---------------------------------- *📚वाचा.वहीत लिहा.✍* *🌻शब्दसमूहाबद्दल किंवा अनेक शब्दांबद्दल एक शब्द🌻* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *🔹नाणी पाडण्याचा कारखाना - टाकसाळ* *🔸जाणून घेण्याची इच्छा असणारा - जिज्ञासु* *🔹सैन्याची केलेली कोड्यासारखी रचना - चक्रव्यूह* *🔸तिन्ही बाजूंनी पाणी असलेला प्रदेश - द्वीपकल्प* *🔹दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा - कनवाळू* *🌺आलंकारिक शब्द🌺* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *🔹अकरावा रुद्र - अतिशय तापट माणूस* *🔸गंडांतर - भितीदायक संकट* *🔹कूपमंडूक - संकुचित वृत्तीचा* *🔸बृहस्पति - बुद्धिमान* *🔹अष्टपैलू - सर्वगुणसंपन्न* ---------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शाळा गोजेगाव*
कविता - तारांबळ बिगी बिगी निघाली ती उपाशी पोटी घरातूनी डोईवर गाठोड घेऊनी चालती माळरानातूनी बाळ पाठीशी बांधुनी लगबग चालती ती तारांबळ तिच्या जीवाची वेदना असे गरिबीची पोट भराया निघती ती ना ऊन ,ना पाऊस बघती किती कष्ट सोसुनी ती मुलांचा जीव जपती ना थकनार कधीही ती ना हरणार कधीही ती राब राब राबूनी बाळासाठी जीव तिचा ओतणार ती 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*
*उपक्रम -विषय - मराठी* ---------------------------------- *📚वाचा.व वहीत लिहा.✍* *🌻शब्दसमूहाबद्दल किंवा अनेक शब्दांबद्दल एक शब्द*🌻 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *🔹आधी जन्मलेला - अग्रज* *🔸अग्नीची पूजा करणारा - अग्निपूजक* *🔹ज्याला कोणीही शत्रू नाही असा - अजातशत्रू* *🔸कोणीही जिंकू शकत नाही असा - अजिंक्य* *🔹विशिष्ट मर्यादा ओलांडून जाण्याचे केलेले गैरकृत्य - अतिक्रमण* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *🌺आलंकारिक शब्द🌺* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *🔹मायेचा पूत - पराक्रमी मनुष्य , मायाळू* *🔸रामबाण औषध - अचूक गुणकारी* *🔹स्मशानवैराग्य - तात्कालिक वैराग्य* *🔸ओ🔓नामा - सुरुवात , प्रारंभ* *🔹पांढरा कावळा - निसर्गात नसलेली वस्तू* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ ---------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.
कविता - दर्याचा राजा इवलेसे सुंदर विश्व माझे सागरी उसळत्या लाटा शांत निळाईत रंगलेला समुद्रकाठच्या पहाट वाटा वास्तव्याच्या आयुष्यातला संकटाचा सामना करणारा मी तुझ्या विश्वात बागडणारा आकाशाची साथ असणारा मी जगावेगळे नाते असे आपले डोळ्यात अश्रू सोबत घेऊन मी तुझा अफाट पसारा पाहत सागरा दर्याचा राजा आहे मी 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे.
*उपक्रम -विषय - मराठी* *📚वाचा.व वहीत लिहा.✍* ---------------------------------- *🌻श🔶ब्दसमूहाबद्दल किंवा अनेक शब्दांबद्दल एक शब्द🌻* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *🔹ज्याला कशाचीच उपमा देता येणार नाही असे - अनुपम,निरूपण* *🔸कार्यात गढून गेलेला - कार्यमग्न, कार्यरत* *🔹शिकारीसाठी किंवा निरीक्षण करण्यासाठी रानात बांधलेला सुरक्षित उंच माळा - मचाण* *🔸विशिष्ट ध्येय गाठण्याची जबरदस्त इच्छा असणारा - महत्त्वाकांक्षी* *🔹कायम टिकणारे - शाश्वत* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *🌺आलंकारिक शब्द🌺* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *🔹खडाष्टक - जोरदार भांडण* *🔸मृगजळ - केवळ आभास* *🔹चौदावे रत्न - मार* *🔸अंधेर नगरी - अव्यवस्थितपणाचा कारभार* *🔹घोरपड - चिकाटी धरणारा* ---------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे
चारोळी - स्पर्धेकरिता जग हे बंदी शाळा 1) जीवनाचे अर्घ्य तुला तेव्हाच मी दिले होते जग हे बंदी शाळा आहे तेव्हाच मला कळले होते. 2) मनातील भावना ओठाशी येतात भावनांचे हिंदोळे मनी झुलतात जग हे बंदिशाळा आहे म्हणून नयनधारा आपोआप वाहतात 3) आठवणींचा गहिवर होताच मन माझं पाणावत....... जग हे बंदी शाळा आहे हेच नजरेनं तुला खुणावतं...... 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे
कविता - आयुष्याचा मध्यबिंदू काळजाच्या अंतरंगात माझ्या दडलंय खुप काही तुझ्या सहवासाने मी अनुभवलंय खूप काही तुझी आयुष्यभराची साथ ही आयुष्यभराचा मध्यबिंदू म्हणून जीवनात राहून गेली हीच खंत मनात मज राहिली नयनातूनी अश्रू ओसंडले तरीही तुझेच स्वप्न पडले तळहातावर किती जपले तरी जगण्याचे स्वप्न माझे दुभंगले.... 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे.
*उपक्रम -विषय - मराठी* ---------------------------------- *📚वाचा. व वहीत लिहा.✍* *🌻शब्दसमूहाबद्दल किंवा अनेक शब्दांबद्दल एक शब्द.🌻* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *🔹आकाशातील तार्यांचा पट्टा - आकाशगंगा* *🔸एकाच वेळी अनेक गोष्टींत लक्ष ठेवणारा - अष्टावधानी* *🔹रोग्यांची शुश्रुषा करणारी - परिचारिका* *🔸हाताने केलेली खाणाखुणांची भाषा - करपल्लवी* *🔹कमळाप्रमाणे डोळे असणारी - कमलाक्षी, कमलनयना* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *🌺आलंकारिक शब्द🌺* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *🔹त्रिशंकू - धड ना इकडे, धड ना तिकडे* *🔸वामनमूर्ती - ठेंगू किंवा बुटका माणूस* *🔹भगीरथ प्रयत्न - आटोकाट प्रयत्न* *🔸कर्दनकाळ - भीती निर्माण करणारा* *🔹बोकेसंन्यासी - ढोंगी मनुष्य* ---------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन /लेखन प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शाळा गोजेगाव.
कविता - श्वास माझा रीत आभाळ, सुंदर पहाट जगण्याची जाणीव आहे जीवनातील उणीव आहे माझी ती सखी श्वास माझा नदीचा किनारा, सागरी लाटा प्रीतीचा पसारा, नयनी साठा माझी अभिलाषा,तिचा प्रतिसाद माझ्या नाद, तिचा आवाज मोहक फुलांची माळ जशी सुरेख माझी सखी तशी माझं काव्य तिचा साज जिवलग माझी सखी अशी 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.*
*उपक्रम - विषय -मराठी* ---------------------------------- *✍वाचा.व वहीत लिहा.📚* *🔹शब्दसमूहाबद्दल एक शब्द🔹* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *आकाशात गमन करणारा - खग, खेचर* *आकाशाचा भेद करणारे - गगनभेदी* *तांब्याच्या पत्रयावर लिहिलेला लेख - ताम्रलेख* *हळूहळू घडून येणारा बदल - उत्क्रांती* *कोणत्याही क्षेत्रात एकाएकी होणारा मोठा बदल - क्रांती* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *🔸आलंकारिक शब्द🔸* *गोगलगाय - गरीब निरूपद्रवी मनुष्य* *अकरावा रुद्र - अतिशय तापट माणूस* *मृगजळ - केवळ आभास* *पर्वणी - अतिशय दुर्मिळ योग* *अकलेचा खंदक - अत्यंत मूर्ख माणूस* ---------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन* *प्रमिलाताई सेनकुडे.
कविता- जांगडगुत्ता भावनांचा जांगडगुत्ता होतो जेव्हा बांध सुटता अश्रूंचा तेव्हा तेव्हा अश्रूंची ही जेव्हा माळ सरकते नयनातुनी तेव्हा धारा ओघळते बांध सुटताच नयनातील मनमुराद त्या उसळतील जणू टपोरे हे दवबिंदूचे थेंब ओघळते अलगद गालावरून हळूच थबकते अश्रूंचे हे माळेतील मोती विरती पुन्हा परत कधीच न दिसती 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे
कविता - मन पाखरू वृक्षांनी किती मुकुट घातले डोईवर सोनेरी अन् चंदेरी कुरणावर रानात पसरला जसा गुलाल भडक चौफेरी हिरवे हिरवेगार सुंदर हे शेत मन पाखरू होऊन पिंगा घाली चहूकडे, झाडावरील भुंगे फिरती इकडेतिकडे किती सुंदर अचल फुलपाखरे इकडून तिकडे उडती सारे नयनास भावते रंग तयांचे तर्हेतर्हेचे कितीतरी साजिरे पिवळे ,तांबूस ऊन संपताच पाखरे झाडावरती होती गोळा सांजसमयी पिलास भेटण्यास आतुरती मग मायेचा लळा 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे.
*उपक्रम - प्रश्नमंजुषा* *आजची विज्ञान विषयावरील प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे.* ---------------------------------- http://testmoz.com/4260580 ---------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- *टीप :- submit केल्यानंतर सर्व प्रश्न-उत्तर आपल्या वहीत लिहून ठेवावे.* 📚📚📚📚📚📚 *वाचा. व वहित लिहा.* *आलंकारिक शब्द* *🔸सुळावरची पोळी - जीव धोक्यात घालणारे काम* *🔹वाटाण्याच्या अक्षता - नकार* *🔸गुरुकिल्ली - मर्म ,रहस्य* *🔹पाताळयंत्री - कारस्थान करणारा* *🔸सव्यसाची - उलटसुलट काम करणारा* ---------------------------------- *संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे.जि.प.प्रा.शाळा गोजेगाव ता.हदगाव जि.नांदेड.*
*कविता- चिखलमाती* व्याकुळ होई भुकेने खायला अन्न मिळेना गरिबीची जाणीव कुणास का? कळेना.. कुणास हवी झोपडी भू असे निवारा घेऊनी झोप सुखाने चिखलमातीचा पसारा गो राही उपाशी वासरे चाटती पान्हा भांडे राही रिकामे घरात नसे दाना धावत्या वाटेच्या कडेला आसवे घेई विसावा झोपडीतला गरिबीला थाट स्वप्नीही नसावा.. आटती रक्त नसा नसांतून तरी कष्टतात हातपाय बलदंड बाहूतनी घाम गाळुनी श्रमतेही काया 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.*
*चित्र चारोळी - स्पर्धेसाठी* 1) लखलखती दुर्बीण घेऊन हाती कणाकणाने शहानिशा करी उभी राहुनी वरी ताठ ती ज्ञानबिंदू ने तर्कही करी 2) विज्ञानाची धरुनि कास अवकाशाचा करिते ती अभ्यास सत्यधारित ज्ञान हे सांगते तिचे स्वीकारा विज्ञान आणि तंत्रज्ञानास 3) आत्मविश्वासाचे लेवून पंख घेत आहे ती उत्तुंग भरारी प्रगतीपथावर नेऊनी स्वतःस दावीते नारीशक्तीची करारी 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ प्रमिलाताई सेनकुडे
गुरुवर्य गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर प्रत्येकाच्या मनातील पावित्र्यांचा मांगल्य जागवणाराअपूर्णातून पूर्णत्वास नेणारा गुरु एक आदर गुरु म्हणजे ज्ञानाची ज्योत तेवत ठेवणारा, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र झटणारा समाजाच्या कल्याणाचा पालनहार गुरु म्हणजे यशाची वाटचाल दाखविणारा, शिष्याच्या मनातील संवेदना जोपासणारा, मूल्यांची रुजवण करून ध्येयपूर्तीकडे वळवणारा गुरु म्हणजे भावी कर्तव्यदक्ष नागरिक निर्माण करणारा, संस्काराची आणि ज्ञानाची शिदोरी घेऊन विद्यार्थी घडविणारा एक शिल्पकार गुरु म्हणजे संकटात नेहमीच शिष्यास तारणारा, आत्मकल्याणाचा मार्ग दाखविणारा, निष्काम कर्मयोगी मातीच्या गोळ्यास आकार देऊन विद्यार्थ्यांची प्रगती साधणारा गुरु म्हणजे आधारस्तंभ देशाचा विद्यार्थ्यास मार्गदर्शन करुनी, ज्ञानाचा प्रकाश देऊनी देश घडविणारा एक दीपस्तंभ गुरु म्हणजे माणुसकीची,सर्वधर्म समभावाची शिकवण देणारा, भावी पिढी घडविणारा,एक कल्याणकार 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे.
कविता - क्षणोक्षणी देवा तुझा महिमा अगाध आहे क्षणोक्षणी नाम तुझे मनात आहे पंढरीचा विठ्ठल उभा तू विटेवरी तुझ्याच नामस्मरणाने तल्लीन होतात भक्त वारकरी देवा तुझे अवतार अनेक आहेत दृष्ट जनांचा करुनी संहार तू भक्तासाठी धावून येतोस तू तुझे या सृष्टीवर उपकार अनंत आहेत देवा तुझी लीला अपरंपार आहे तुझ्या अदृश्य शक्तीचा पगडा आम्हावरी आहे , सारे तुझ्या भक्तीत होतात तल्लीन, करूनि तुझ्या नामाचा गजर अखंड दीप जळो हृदयी माझ्या तुझ्याच नामाचा, महिमा तुझी अगाध आहे, शांती रक्षणा नांदो विश्वात, असू दे कृपा आम्हावरी तुझीच देवा 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे.
कविता - टिपूस माझा देह जळून जाऊन त्या देहाच्या धुराचा आकाशी ढग तरी व्हावा,अन् त्या ढगातील पाऊस टिपूस टिपूस तुझ्याच अंगणात पडावा बरसलेल्या पावसाचा थेंबाने अंगणातील मातीतल्या ओलाव्यातून निस्वार्थी प्रेमाचा गंध यावा, मग त्या धुराचा मज पश्चाताप न व्हावा भिजलेल्या तुझ्या या देहाचा हळुवार स्पर्श मज व्हावा जळून गेलेल्या चितेचा मग विसर तुजला पडावा... 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ प्रमिलाताई सेनकुडे नांदेड
शुर शिवबा राजे राजे तुमच्या धाडसाचे ,कर्तृत्वाचे गुणगानाचे गाऊन पोवाडे मिळवितो आम्ही सन्मान सगळीकडे शुर शिवबा राजे तुम्ही जन्मास यावे एकदागडे विश्वास होता तुमच्या नेहमी मनी शत्रुस जिंकायचे तुम्ही गनिमी काव्यानी नेहमी नेहमी स्वराज्याची शपथ घेऊन रयतेच्या सुखासाठी झिजलात तुम्ही ताकद होती तुमच्यात तलवारीची शिकवण होती तुम्हास आऊसाहेबांची शुर शिवबा राजे आहात तुम्ही कर्तुत्ववान मराठी अस्मितेच्या महाराष्ट्राची शान 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ प्रमिलाताई सेनकुडे.
*उपक्रम - सामान्यज्ञान* *प्रश्नमंजुषा* *online test* आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे. ---------------------------------- http://testmoz.com/4191192 ---------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- *टीप :- submit केल्यानंतर सर्व प्रश्न-उत्तर आपल्या वहीत लिहून ठेवावे.* 📚📚📚📚📚📚 *वाचा व लिहा.* *🌺आलंकारिक शब्द🌺* *🔸नवकोट नारायण - खूप श्रीमंत* *🔹पांढरा परीस - लबाड* *🔸अळवावरचे पाणी - फार काळ न टिकणारे* *🔹टोळभैरव - कामात नासाडी करणारे लोकं* *🔸लंबकर्ण - बेअकली* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे.जि.प.प्रा.शाळा गोजेगाव ता.हदगाव जि.नांदेड.*
कविता - पांढरा परीस (लबाड) पांढऱ्या परीसापरी खोटी प्रतिष्ठा न जपण्या बरी, आत कोंडीता भावना द्वेष ,मत्सर , राग ,लोभ प्रेम, हेवा ,माया ,ममता सल पोखरीतो मना द्वेष मनात साठता, भग्न करी मनास प्रसन्नता मिळत नाही काळजास जिवंतपणी नाही मिळत सुख त्यास चिंता करित संपतो असा माणूस पांढरा परीस जगणे असे सोडून द्यावे, करुनी सत्कर्म जीवन सार्थकी लावावे, ऐसे जीवन आपुले जगावे प्रत्येक हृदयात मिळवावी जागा निर्माण करावा ओलावा मायेचा गुज मनाचे सांगता सोडून द्यावा हेवा ओठी आणावा भाव प्रेमाचा.... 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ प्रमिलाताई सेनकुडे नांदेड
कविता - प्राण्यांची शाळा जंगलात भरली प्राण्यांची शाळा सारे प्राणी झाले गोळा माकड आली उड्या मारत मारत हत्ती आला डुलत डुलत खारुताई आली झाडावरून हरिण आले धावून धावून बगळा कोकीळ सारे जमले तुणंतुण घेऊन नाचू लागले तास खेळाचा सुरू झाला मोर पिसारा फुलवू लागला असा सर्वांचा जमला मेळा जंगलात भरली प्राण्यांची शाळा 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे.
Subscribe to:
Posts (Atom)