कविता - गळून पडलो तर?
अभास मज असा होई
मी गळून पडलो तर?
झुळझुळणार्या वाऱ्यासंगे
सुंदर मोरपिसारा फुलवीन
निळ्या निळ्या आभाळातील
लुकलुकणारा तारा होईल
मी गळून पडलो तर ?
चमकून तुला मी पाहीन
ऊन कोवळे झेलीत मी
विहंगा सारखे उडीन
डोंगर रांगा दरी जाऊन
गीत आनंदाने गाईन
आभास मज असा होई
पारिजातका सारखे फुलोनि
मी गळून पडलो तर?
सुगंध सर्वत्र दरवळी
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*
No comments:
Post a Comment