कविता - वादळ वारा
ऋतूंवर सगळ्या वार झाले
कट्यारीचे, अचानक सुटता वादळ वारा
क्षणीच नुकसान झाले प्राणिमात्रांचे
अन् शेतातील पिकांचे
संकटे अशी येई प्राणीमात्रावर
वादळ वाऱ्यासंगे मग कोपेल
निसर्ग आपल्यावर , बिघडेल
मग पृथ्वीचे सारे संतुलन
नका तोडू वृक्ष आणि जंगले
करूया रक्षण पर्यावरणाचे
निमंत्रण देऊ नका प्रलयास
जीवन जगा आपले चांगले
प्रमिलाताई सेनकुडे.
No comments:
Post a Comment