*गुरुमाऊली चित्र चारोळी स्पर्धा*
1)
तुझी आठवण येते तेव्हा
एकांतात मी उभी राहते
तुझ्याच विचारात मी मग
नजर माझी वाटेकडे लावते
2)
एकांतात उभी राहून शांत
मनमीत डोळ्यात पाहते
तव स्वप्नरंग मनीचे माझ्या
माझं काळीज अंतरी कापते
3)
सडपातळ बांधा गोड चेहरा
रंग गुलाबी शोभतोय छान
शब्द तिच्या ओठी लपलेले
नाही तिला कोणतेच भान
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*
No comments:
Post a Comment