कविता - मले काही सांगू नको
धनी म्या सांगते तुमास्नी
पोरगी वयात आलिया
यंदा तिचं लगीन आपण
उरकून मात्र टाकूया
मले काही सांगू नको
म्या पोरीला शिकविणार
उच्च शिक्षण देऊन तिला
कलेक्टर म्या माञ करणार
पोरीची मले बी हाय काळजी
असं समजू नको तु मले
धनी तुवा हाय निष्काळजी
पण समजून घे तू पोरीले
घरदार, शेतसार विकून म्या
लेकरांना शिकून मोठ करीन
आपण राहिलो अडाणी पण
भविष्य त्यांचे म्या घडवीन
चुकलं धनि माह्य सार
इचार नव्हता केला मी
शिक्षणाचं मोल हे सार
समजून घेतल आता मी
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*
No comments:
Post a Comment