कविता - मानवसेवा
सत्कर्माची सर्वत्र पेरून बीजे
एकमेका आपण सहाय्य करू
मानवसेवा हा धर्म बाळगून
मानवता आपण दाखवू
सत्याची आपण कास धरु
नाती माणुसकीची सांभाळू
विसरून जाऊ द्वेषभावना
प्रेमाने जगी सारे आपण राहू
आई-वडिलांचा सांभाळ करू
कधीच त्यांचे मन नाही दुखवू
करून सेवा त्यांची आपण
आशीर्वाद त्यांचा मिळवू
पर्यावरणाचे संरक्षण करू
वृक्षारोपण आपण सारे करू
मातीशी नाती घट्ट बांधून आपुले
निसर्गावर आपण प्रेम करू
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.*
No comments:
Post a Comment