कविता - हसरी सकाळ
काळोख्या रात्रीत, मिटल्या प्रकाशात
अंधारात नाहली, निशाचर मनी हर्षली
हसरी सकाळ कशी घेऊन ती
रात्रीच्या गर्भातुनी उगवली
रानावनात किलबिल झाली
पक्षी घरट्यात विसावली
झाडे वेली छान बहरली
बागेमध्ये फुलं रंगबेरंगी उमलली
सडा-सारवण पडती अंगणी
रांगोळी दिसे शोभुनी तुळशी वृंदावनी
हसरी सकाळ रोज येती
मुलं बाळ अंगणात खेळती
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*
No comments:
Post a Comment