*चित्र चारोळी - स्पर्धेसाठी*
१) अंगणी आहे तुळशी वृंदावन
मन माझे गेले भारावून
प्रज्वलित झाल्या पणती
तेजोमय सर्वत्र दिसती
२) सण दीपावलीचा आला
अंगणी प्रकाश पसरला
दिसे शोभून तुळशीमाय
स्नेहाचा सुगंध दरवळला
३) थकल्या जीवास विसावा सांजेचा
तेजोमय प्रकाश पडती पणत्यांचा
उगवेल दिस नव्या उमेदीचा
आशीर्वाद मिळे तुळशी मायेचा
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*
No comments:
Post a Comment