कविता - थडग्याची व्यथा
थडग्याची व्यथा नाही कोणी जाणली
परस्परांबद्दल आपुलकी आता नाही राहिली
जीवन गरिबीचे कसे असते?
भुकेल्या पोटी अन्न मिळत नसते
घाम गाळून ,अश्रू शोषून
दारिद्र्याचे जीवन त्यांच्या नशिबी असते
स्मशानात जाई गोवऱ्या त्यांच्या तरीही
कष्टा त्यांचे कमी नसते
मृत्यू आवळेल मग फासे ,
मृत्यू हसेल साक्षात
परंतु त्यांच्यात काही फरक नसे
गरीबीत जीवन जगणे हे असेच असे
ध्येय जगण्याचे सार्थकी लावूया
थडग्याची व्यथा जाणून घेऊया
मनी ठेवूनी भावना सहकार्याची
शिदोरी बांधून नेऊया सत्कर्माची
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड
No comments:
Post a Comment