कविता - देहभान
शोधण्यास तुझं नयन
करिती सदैव भिरभिर
असे कसे वेड लाविले
मनी दाटे माझ्या हुरहूर
वाटेकडे नयन असता
देहभान माझे हरपते
हृदय गुंतलेली ही नाती
कधी ना मज उमजते
स्वप्न पाहिले मी लोचनी
होऊनी मी तुझी राधिका
मन तडपत माझे उदास
मी तुझीच आहे रे प्रेमिका
कळली तुला रे माझी प्रीत
पण तू गेलास अकस्मात
पोकळी या जीवनाची माझ्या
अंतरी आठवणी राहील तुझ्या
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*
No comments:
Post a Comment