कविता - प्रेमास रंग यावे
तू अबोल असते तेव्हा
माझ्या प्रेमास रंग यावे
तू बोलतेस तेव्हा
प्रेम माझे फुलून यावे
तुझा हसरा चेहरा पाहुनी
जिव माझा ओवाळून
टाकावासा वाटे मनी
तुला साद घालावीशी वाटे
अलगद येऊन तुझ्या कानातुनी
तू पाहतेस मज जेव्हा
अनोळखी नजरेने
क्षणात सारे संपते तेव्हा
प्रीतीचे या रंग तराने
माझ्या हृदयाच्या स्पंदनाला
तुझ्या प्रतिसादाची वाट आहे
तुझी आठवण काढत मी
भाव माझे लिहित आहे
〰️〰️〰️〰️〰️〰️
*✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.*
No comments:
Post a Comment