*कविता - वाट कर्तव्याची*
संकटाला घाबरून न जाता
वाट कर्तव्याची दाखवत जावे
जबाबदारीने राहून सर्वजण
सहकार्याने वागतं जावे
सत्कर्माचे काम सदोदित
हसतमुखाने करत जावे
जबाबदारी असो कोणतीही
कर्तव्ये सदा पार पाडावे
वाट कर्तव्याची दाखवून
माणुसकी आपली जपावी
मदतीचा हात देऊन इतरांना
माणुसकी अंगी बाळगावी
〰️〰️〰️〰️〰️〰️
*✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*
No comments:
Post a Comment