कविता - लाजलेली फुले
गडद काळोख्या अंधाऱ्या रात्रीत
लाजलेली फुले उमलती पहाटे
सुगंधी फुले येऊन तव वेली
निशाचर मनी मग हर्षुनी दाटे
लाजलेली अशी ही फुले
कौमुदीत मन हे तव नाहे
अंतरंगीत भावगीत खुले
स्वरास्वरात ओठी मग वाहे
नेत्राच्या अंतरंगात माझ्या
मन माझे अंतरी जव डुले
स्वप्न रंग मनीचे माझ्या मग
भावचकोर होऊनी तव फुले
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड
No comments:
Post a Comment