✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 01 ऑक्टोबर 2025💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2022/09/mahatma-gandhi.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :- • १८३७: भारतातील पहिले टपाल कार्यालय सुरू झाले.• १८८०: थॉमस एडिसनने विद्युत दिव्यांचा कारखाना सुरू केला.• १८९१: स्टॅनफोर्ड विद्यापीठाची स्थापना झाली.• १९४९: संगीत रंगभूमीवरील गायक,अभिनेते जयराम शिलेदार यांनी स्वत:ची मराठी रंगभूमी नाट्यसंस्था स्थापन केली.• १९५८: भारतात दशमान (मेट्रिक) पद्धत वापरण्यास सुरूवात झाली.• १९५९: भुवनेशप्रसाद सिन्हा यांनी भारताचे ६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.• १९९२: कार्टून नेटवर्क सुरु झाले.• १९५३: आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती झाली🎂 जन्म :- • १८८१: बोईंग विमान कंपनीचे संस्थापक विल्यम बोईंग यांचा जन्म. (मृत्यू: २८ सप्टेंबर १९५६)• १९०६: संगीतकार व गायक सचिन देव बर्मन यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑक्टोबर १९७५)• १९१९: गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते गजानन दिगंबर तथा ग. दि. माडगूळकर यांचा जन्म. (मृत्यू: १४ डिसेंबर १९७७)• १९१९: दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते शायर, गीतकार आणि कवी मजरुह सुलतानपुरी यांचा जन्म. (मृत्यू: २४ मे २०००)• १९२८: दाक्षिणात्य अभिनेते विझुपुरम चिन्नया तथा शिवाजी गणेशन यांचा जन्म. (मृत्यू: २१ जुलै २००१)• १९३०: कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री जयदेवप्पा हलप्पा तथा जे. एच. पटेल यांचा जन्म. (मृत्यू: १२ डिसेंबर २०००)• १९८४: भारतीय कन्नड चित्रपट अभिनेते चिरंजीवी सर्जा यांचा जन्म (मृत्यू : ७ जून २०२०)• १९५१: भारतीय वकील आणि राजकारणी, लोकसभेचे १२वे अध्यक्ष जी. एम. सी. बालयोगी यांचा जन्म (मृत्यू : ३ मार्च २००२)• १९४७: भारतीय वकील आणि न्यायाधीश - पद्म भूषण दलवीर भंडारी यांचा जन्म• १९४५: भारता देशाचे १४वे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा जन्म🌹 मृत्यू :- • १९३१: नाट्यछटाकार शंकर काशिनाथ गर्गे तथा दिवाकर यांचे निधन. (जन्म: १८ जानेवारी १८८९)• २०२२: भारतीय राजकारणी, केरळचे आमदार कोडियेरी बालकृष्णन यांचे निधन (जन्म: १६ नोव्हेंबर १९५३)• २०२२: भारतीय अक्षय ऊर्जा कार्यकारी, सुझलॉनचे संस्थापक तुलसी तंती यांचे निधन (जन्म: २ फेब्रुवारी १९५८)••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता - महात्मा गांधी*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारचा मोठा निर्णय, जिल्हा वार्षिक निधीतील पैसे खर्च करण्यास सरकारची मंजुरी, शासन निर्णय जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *शिर्डी - साईबाबा संस्थानकडून अतिवृष्टी बाधितांच्या मदतीसाठी 5 कोटी रुपयांची मदत जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *यंदा 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार ऊस गाळप हंगाम ; पूरग्रस्तांसाठी प्रतिटन 5 रुपये कपात जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सर्वसामान्यांचा दिवाळीचा प्रवास महागला, ST महामंडळाची 15 ऑक्टोबरपासून 10% भाडेवाढ; AC शिवनेरी व शिवाई बस वगळल्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *लस निर्मितीसाठी हाफकिनला 25 कोटी, सर्पदंशावरील दीड लाख लसी महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाने खरेदी कराव्यात; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बिहारची अंतिम SIR यादी जाहीर, 69 लाख नावे वगळली, 21 लाख नवीन नावे जोडली; एकूण मतदारांची संख्या 74.2 कोटी झाली*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *हार्दिक पांड्याच्या दुखापतीने भारतीय संघ चिंतेत; ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 व्यंकटेश काटकर, कवी व लेखक, नांदेड 👤 अर्जुन वाकोरे, नांदेड 👤 माधव शिंदे, शिक्षक, बिलोली👤 नारायण अवधूतवार, बिलोली👤 श्रीकांत भोसके 👤 ऍड. विशाल मस्के 👤 निलेश पंतमवार 👤 व्यंकट रेड्डी मुडेले *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 89*कधी लिहितो, कधी गप्प बसतो**शाई पोटात घेऊन फिरतो**डोकं त्याचं टोचतं असे**ओळखा बघू सांगतोय कसे ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - रिमोट ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन हा हास्य आणि अश्रू यांचा सुरेख संगम आहे - वि. स.खांडेकर.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'वन्यजीव सप्ताह' केव्हा साजरा केला जातो ?२) बीसीसीआयचे ३७ वे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली ?३) सोनम वांगचुक हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत ?४) नुकतेच निधन झालेले लोकप्रिय गायक झुबिन गर्ग कोणत्या राज्याचे होते ?५) लोकसभा अध्यक्ष आपल्या पदाचा राजीनामा कधी देतात ? *उत्तरे :-* १) १ ते ७ ऑक्टोबर २) मिथुन मन्हास ३) पर्यावरण ४) आसाम ५) नवीन लोकसभेच्या पहिल्या बैठकीपूर्वी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भारताचे नऊ सर्वोत्कृष्ट कमांडो फोर्स---------------***-----------------आज आपण ओळख करुन घेणार आहोत भारताचे महत्त्वाचे कमांडो फोर्स, ज्यांच्यासमोर शत्रू गुडघे टेकतात, अशा नऊ सर्वात घातक, शानदार आणि इंटेलिजंट कमांडो पथकांची ज्यांची गणना जगातील सर्वोत्तम सुरक्षा दलांमध्ये केली जाते.१) एनएसजी (नॅशनल सिक्युरिटी गार्ड) किंवा ब्लॅक कॅट्सएनएसजी हे भारताचं प्रमुख दहशतवादविरोधी दल आहे. यांच्या काळ्या रंगाच्या गणवेशामुळे त्यांना ‘ब्लॅक कॅट्स’ असं सुद्धा म्हणतात. एनएसजीची स्थापना 1968 मध्ये करण्यात आली होती. एनएसजीची निवड प्रक्रिया एवढी खडतर असते की ७०-८० टक्के उमेदवार नापास होतात. निवड झालेल्या जवानांना ९ महिने अत्यंत कठीण प्रशिक्षण पूर्ण करावं लागतं. एनएसजीमध्ये निवड झालेले कमांडो हे सैन्यदल, पोलिस आणि पॅरामिलिटरीमधील सर्वोत्कृष्ट जवान असतात. भारतीय पोलीस दलाचे महासंचालक एनएसजीचे प्रमुख असतात. एनएसजीकडे व्हीआयपी सुरक्षा आणि घातपाती कारवाया रोखण्याची जबाबदारी असते.२) एसपीजी म्हणजे स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप हे कमांडो आपण पंतप्रधानांच्या आसपास पाहिले असतीलच. एसपीजीची स्थापना १९८८ मध्ये झाली होती. एसपीजी कमांडोकडे पंतप्रधान, माजी पंतप्रधान आणि कुटुंबियांच्या सुरक्षेची जबाबदारी असते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर एसपीजीची स्थापना करण्यात आली होती. हे जवान अतिशय चपळ आणि सजग असतात तसेच अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असतात.३) मार्कोस कमांडो काळी वर्दी, चेहरा काळ्या कपड्याने झाकलेला चेहरा आणि गॉगल असलेले मार्कोस कमांडो. मार्कोस हे भारताच्या नौदलाचे स्पेशल आणि सर्वात घातक कमांडो आहेत. 1987 मध्ये मार्कोसची स्थापना करण्यात आली होती. मार्कोसना अतिरेकी ‘दाढीवाला फौज’ म्हणून ओळखतात. मार्कोस कोणत्याही परिस्थितीचा मुकाबला करण्यास सज्ज असतात पण समुद्री सुरक्षेमध्ये ते विशेष पारंगत असतात. या कमांडोंकडे हवेतून समुद्रात उडी मारणं तसेच पाण्यातून डोकं बाहेर काढून गोळीबार करण्याची क्षमता असते. त्यांचं प्रशिक्षण हे अत्यंत खडतर असतं. यासाठी अर्ज केलेले जवळपास ८०टक्के उमेदवार चाचणी फेरीतचं अयशस्वी होतात. मार्कोस कमांडो पूर्वी मरीन कमांडो फोर्स म्हणजेच एमसीएफने ओळखले जात होते. 26/11 मुंबई हल्ल्याच्या ऑपरेशनमध्ये मार्कोस कमाडोंना बोलवण्यात आलं होतं. ४) गरुड कमांडोहे भारतीय हवाई दलाचं विशेष पथक आहे. गरुड पक्षाच्या आधारावर या फोर्सचं नाव ठेवण्यात आलं आहे. एनएसजी आणि मार्कोसच्या धर्तीवर 2004 मध्ये या दलाची स्थापना करण्यात आली होती. ‘गरुड’मध्ये जवळपास २००० जवानांचा समावेश आहे. हवाई हल्ले, रेस्क्यू ऑपरेशन, दहशतवादविरोधी कारवाया, हवाई शोध मोहिमेत, गरुड कमांडोंचा वापर केला जातो. यांचं प्रशिक्षण साधारण तीन वर्ष चालतं जे इतर सर्व सुरक्षा दलांपेक्षा जास्त आहे. ५) पॅरा कमांडोपॅरा कमांडोंची स्थापना १९६६ मध्ये करण्यात आली होती. ते भारतीय लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटचा भाग आहेत. त्यांचं मुख्य उद्दिष्ट असतं, शत्रूवर मागून वार करून त्याची पहिली फळी उद्ध्वस्त करणे. जगातील अत्यंत कठीण प्रशिक्षण या कमांडोना दिलं जातं, जसं की ६०किलो वजन घेऊन रोज २०किमी धावणं. एलीट पॅरा कमांडोंना हवेत मारा करण्यासाठी खास प्रशिक्षण देण्यात आलं आहे. हे कमांडो 30 ते 35 हजार फुटांच्या उंचीवरुन उडी मारण्यात तरबेज असतात. १९७१चं युद्ध, कारगिल युद्ध आणि ‘ऑपरेशन ब्लूस्टार’ मध्ये पॅरा कमांडोंचा वापर करण्यात आला होता. भारतीय सैन्यातील हे एकमेव दल आहे ज्यांना अंगावर टॅटू काढण्याची मुभा असते. ६) फोर्स वन’मुंबईवर झालेल्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर एनएसजीच्या धर्तीवर महाराष्ट्रात `फोर्स वन’ या कमांडो पथकाची 2010 मध्ये स्थापना करण्यात आली होती. यांच्याकडे मुंबईच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. 'फोर्स वन' पथक घटनास्थळी अवघ्या १५ मिनिटांत पोहोचते, जी जगातील सर्वात जलद वेळ आहे. सलाम... ३००० अर्जदारांपैकी २१६ जणांची निवड करून हे पथक बनवलं आहे. या जवानांना इस्राईली ‘मोसाद’ सैन्याने विशेष प्रशिक्षण दिलं आहे. ७) कोब्रा म्हणजे कमांडो बटालियन फॉर रिझॉल्यूट अॅक्शनकोब्राची स्थापना 2008 मध्ये झाली होती. कोब्रा बटालियन CRPF चाच एक भाग आहे या कमांडोंना गोरिला तंत्राचं ट्रेनिंग दिलं जातं. कोब्रा कमांडो जंगलात वेश बदलण्यापासून दबा देऊन हल्ला करण्यात तरबेज असतात. यांचा वापर मुख्यत्वे नक्षलविरोधी मोहिमेत केला जातो. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असं हे पोलिसांचं सर्वोत्तम दल आहे. तसेच कोब्रा स्नायपर युनिटची गणना देशातील सर्वोत्तम सुरक्षा रक्षकांमध्ये होते.८) घातक कमांडोनावाप्रमाणेच हे कमांडो अतिशय घातक असतात. भारतीय लष्कराच्या प्रत्येक बटालियन मध्ये साधारण २० 'घातक' कमांडोंचा समावेश असतो. यांची मुख्य जबाबदारी म्हणजे बटालियनच्या पुढे राहून शत्रूच्या मुख्य ठिकाणांवर थेट हल्ला करणे, तेथून महत्त्वाची माहिती गोळा करणे, शत्रूच्या हालचालींवर करडी नजर ठेवणे, अपह्रत व्यक्तीला सोडवणे. शत्रूशी थेट सामना करावा लागत असल्याने या कमांडोना विशेष प्रशिक्षण दिलं जातं. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम जवानांचीच घातक कमांडो म्हणून निवड केली जाते.९) स्पेशल फ्रंटियर फोर्स एस एफ एफ ची स्थापना १९६२ साली भारत-चीन युद्धानंतर करण्यात आली होती. एसएफएफचं मुख्यालय उत्तराखंडमधील चक्रता येथे आहे. ही फोर्स संरक्षण खात्याच्या अंतगर्त नसून ती भारतीय गुप्तचर खात्याच्या (रॉ) च्या अखत्यारीत काम करते आणि कॅबिनेट सचिवांना उत्तरदायी असते. या जवानांना प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्यासाठी गोरिला तंत्र, पर्वत, जंगलातील कारवाया आणि पॅराशूट मधून उडी मारण्याचं प्रशिक्षण दिले जाते. एसएफएफने १९८५च्या सियाचीन युद्धात ऑपरेशन मेघदूत मध्ये प्रमुख भूमिका बजावली होती. ---------------------------*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अर्पोनिया सुमना शिव गौरीच्या गणा तोडोनिया भव बंधनाअंबाबाई तुला वंदनायेडामाई तुला वंदना ||धृ||पहीले नमन गणपतीला गणपतीच्या शारदेलातोडोनिया भव बंधना ||1||दुसरे नमन शंकरालाशंकराच्या पार्वतीलातोडोनिया भव बंधना ||2||तिसरे नमन खंडोबाला खंडोबाच्या म्हाळसाईलातोडोनीया भव बंधना ||3||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणी आपल्या मताने कसेही बोलत असतील आणि त्यांच्या प्रत्येक शब्दाला हो ला हो असं प्रतिसाद देत राहिल्याने त्यांना आनंद होतो आणि ते, आपल्याला जवळ करत असतात.पण, एखाद्या वेळी त्यांचे बोलणे आपल्या मनाला पटले नाही की लगेच आपला विरोध करायला सुरूवात करतात. कदाचित या विषयी आपल्याला अनुभव आला असेलच. म्हणून जे कोणी चांगले सांगत असतील त्यांचे विचार आवर्जून ऐकून घ्यावे. पण,काही विचार पटत नसतील तर एकदाचे बाजूला झालेले बरे कारण, बरेचदा असं होतं की, हो ला हो लावल्याने कधी काळी अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *एकीचे बळ*एक गरीब शेतकरी असतो. त्याला चार मुले असतात.ती आपसात नेहमी भांडत असतात. एकमेकांचे हेवेदावे करत असतात. गरीब शेतकरी त्यांचे भांडण पाहून खूप कंटाळला. त्यांना बोध करण्यासाठी शेतकऱ्यांने एक आयडिया केली.एक दिवस शेतकऱ्यांने एक मोळी भर काड्या आणल्या. आपल्या चारही मुलांना बोलावले. एक-एक काडी त्यांच्या हातात दिली. त्यांना ती हाताने मोडायला सांगितली. त्या चारही मुलांनी त्या एक-एक काडीचे दोन-दोन तुकडे केले. त्यानंतर शेतकऱ्यांने नवीन काड्याच्या मोळीचा भारा आणला. तो एकत्र घट्ट बांधून त्या मुलांना तो भारा हाताने मोडायला सांगितला. तेव्हा एकाही मुलाला ती काड्याची मोळी हाताने मोडता आली नाही. तेव्हा त्या शेतकऱ्याने आपल्या मुलांना समजून सांगितले की एकीचे बळ खूप जास्त असते. त्या मोळीप्रमाणे तुमच्यात एकी ठेवा .एकजूट ठेवा.तेव्हा तुमचा पराभव जगातील कोणतीच शक्ती करणार नाही.🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓तात्पर्य - एकीचे बळ खूप मोठे असते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment