✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 29 सप्टेंबर 2025💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/19mEmp9ioG/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :- • १९१७: मुंबईतील दादर येथे इंडियन एज्युकेशन सोसायटीची पहिली शाळा किंग जॉर्ज हायस्कूल सुरू झाली.• १९६३: बिर्ला तारांगण हे आशियातील पहिले तारांगण कोलकाता येथे सुरू.• २०१२: अल्तमस कबीर भारताचे ३९ वे सरन्यायाधीश झाले.• २०२२: भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने गर्भधारणेच्या २४ व्या आठवड्यापर्यंत सर्व महिलांसाठी गर्भपात शस्त्रक्रिया कायदेशीर केली आहे.• २००७: काल्डर हॉल - हे जगातील पहिले व्यावसायिक अणुऊर्जा केंद्र नियंत्रित स्फोटात पाडण्यात आले.• १९७१: ओमान हा अरब लीगमध्ये सामील झाला.🎂 जन्म :- • १८९०: पंचांगकर्ते ल. गो. तथा नानाशास्त्री दाते यांचा जन्म.• १८९९: बॉलपोइंट पेनचे संशोधक लस्झो बियो यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर १९८५)• १९२५: समाजसेवक डॉ. शरदचंद्र गोखले यांचा जन्म. (मृत्यू: १५ जानेवारी २०१३)• १९२८: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रजेश मिश्रा यांचा जन्म. (मृत्यू: २८ सप्टेंबर २०१२)• १९३२: विनोदी अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते मेहमूद यांचा जन्म. (मृत्यू: २३ जुलै २००४)• १९३२: मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे अध्वर्यू हमीद दलवाई यांचा जन्म. (मृत्यू: ३ मे १९७७)• १९४७: भारताचे ३८वे सरन्यायाधीश एस. एच. कपाडिया यांचा जन्म. (मृत्यू: ४ जानेवारी २०१६)• १९७०: भारतीय अभिनेत्री आणि निर्माता खुशबू सुंदर यांचा जन्म🌹 मृत्यू :- • १९१३: डिझेल इंजिनचे संशोधक रुडॉल्फ डिझेल यांचे निधन. (जन्म: १८ मार्च १८५८)• १९९१: आग्रा घराण्याच्या ११व्या पिढीतील गायक उस्ताद युनूस हुसेन खाँ यांचे निधन. (जन्म: १५ नोव्हेंबर १९२७)• २०१७: भारतीय अभिनेते - पद्मश्री टॉम अल्टर यांचे निधन (जन्म: २२ जून १९५०)• २०१३: भारतीय विपश्यना ध्यानाचे शिक्षक - पद्म भूषण एस. एन. गोयंका यांचे निधन (जन्म: २९ जानेवारी १९२४)• २००४: भारतीय कवी आणि लेखक बाल्मनी अम्मा यांचे निधन (जन्म: १९ जुलै १९०९)••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आधार कार्डचा इतिहास*दिनांक 29 सप्टेंबर 2010 रोजी महाराष्ट्रात टेंबली या गावात सर्वात पहिल्यांदा एका महिलेला आधार कार्ड देण्यात आले. त्याचा पूर्ण इतिहास वाचा खरोखरच रंजक आहे .......! ..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला मराठवाड्यातील पूरस्थितीचा आढावा, जिल्हाधिकाऱ्यांशी साधला संवाद, सरसकट पंचनामे करण्याच्या दिल्या सूचना*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अतिवृष्टीचा अंदाज घेऊन पालघर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *करूर दुर्घटना - थलपती विजयकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २० लाख, जखमींना २ लाख मदत जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा, पुणे विद्यापीठात व्यंगचित्रकार शि.द. फडणीस यांच्या नावाने अध्यासन सुरू होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अमरावती - मेळघाटात आता दर आठवड्याला आरोग्य तपासणी शिबिर, जिल्हा परिषदेचा 'मेळघाट परिक्रमा' उपक्रम सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *लातूर, धाराशिव, जालना, नांदेड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये शनिवारी पुन्हा मुसळधार पाऊस*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दिल्लीचे माजी कर्णधार मिथुन मन्हास यांची BCCI च्या अध्यक्षपदी तर राजीव शुक्ला यांची उपाध्यक्ष पदी निवड*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 इंजि. प्रथमेश ( नासा ) येवतीकर 👤 राजेश सामला👤 अजय मिसाळे👤 अब्रार पटेल 👤 गणेश पेटेकर 👤 संदेश जाधव *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 87*मी धावतो पण पाय नाहीत**गातो पण तोंड नाही**बोलतो पण शब्द नाहीत**ओळखा पाहू कोण आहे मी ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आजच्या सूर्याला उद्या येणाऱ्या ढगाआड लपवणे याचेच नाव चिंता होय.- कॅम्प*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) रेल्वे गाडीत बसविलेल्या मोबाईल लॉन्चरवरून 'अग्नी प्राईम' या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करणारा भारत कितवा देश ठरला आहे ?२) जागतिक हृदय दिन केव्हा साजरा केला जातो ?३) 'फकीरा' या कादंबरीचे लेखक कोण ?४) विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात एकूण किती मतदारसंघ आहेत ?५) 'आवरण' ( दहा आवृत्ती फक्त पाच महिन्यात ) या कादंबरीचे लेखक कोण ? *उत्तरे :-* १) चौथा ( रशिया, चीन, उत्तर कोरिया, भारत ) २) २९ सप्टेंबर ३) अण्णाभाऊ साठे ४) २८८ ५) एस. एल. भैरप्पा, कन्नड लेखक*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 विद्युतचुंबकीय उत्सर्जन 📙 प्रकाश म्हणजे काय ? क्ष - किरण कशाला म्हणतात ? रेडिओलहरी कुठून येतात ? या सर्वांचे उत्तर म्हणजे या सर्व विद्युतचुंबकीय लहरी आहेत. त्यांची तरंगलांबी वेगवेगळी असते. तरंगलहरींनुसार या विद्युतचुंबकीय लहरींचा एक पट्टाच तयार करता येतो. या पट्ट्याच्या एका लहान भागातील लहरीच डोळ्याला दृश्य प्रकाशाच्या रूपाने दिसतात. पण एक गम्मत सर्वांचा अवकाशातील वेग सारखाच असतो. क्ष - किरणांची तरंगलांबी दृश्य प्रकाशाच्या तरंगलांबीच्या ५० पट कमी असते. तर रेडिओलहरींची दशलक्ष पटींहून मोठी असते. दर सेकंदाला १,८६,००० मैल किंवा ३,००,००० किलोमीटर या वेगाने या लहरी प्रवास करतात. प्रचंड वेगामुळेच वैश्विक परिमाणे या लहरींच्या वेगात सांगायची पद्धत पडली आहे. या लहरींच्या वेगाचे फायदे अनेक. अमेरिकेमध्ये चालू असलेल्या खेळाचे प्रक्षेपण उपग्रहाद्वारे आपण घरातील टीव्हीवर बघत असतो. जवळपास ज्या क्षणी खेळाडू हालचाल करतो त्याच क्षणी आपण डोळ्यांनी ती टिपतो. एका सेकंदात या विद्युतचुंबकीय लहरींनी अख्ख्या पृथ्वीला सात वेळा प्रदक्षिणा घातलेली असते. जगभरची रेडिओस्टेशने, जगभरचे टीव्ही कार्यक्रम, लांबवर पाठवलेली अंतराळयाने या सर्वांचे संदेश ग्रहण करून ते योग्य ठिकाणी पोहोचवण्याचे काम अक्षरश: काही सेकंदात पार पडते, ते यामुळेच.सूर्यापासूनचा प्रकाश पृथ्वीवर आठ मिनिटांत पोहोचतो. (सूर्यापासूनची उष्णता इन्फ्रारेड किरणांच्या स्वरूपात येथे पोहोचते) जवळच्या तार्यांचा प्रकाश येथे काही वर्षांनंतर येऊन पोहोचतो. विद्युतचुंबकीय लहरींमध्ये विद्युत व चुंबकीय अशा दोन्ही क्षेत्रांची परस्परांना लंबरूप अशी आंदोलने होत असतात. म्हणूनच त्यांना 'विद्युतचुंबकीय' म्हणतात. या लहरी इलेक्ट्रॉनसारख्या विद्युतभारित कणांच्या त्वरणामुळे, हालचाली व आंदोलनामुळे उत्पन्न होतात. त्यांच्या द्वारा विद्युतचुंबकीय ऊर्जा एका ठिकाणाहून दुसरीकडे जाते. या सर्व लहरींचा मिळून विद्युतचुंबकीय (ऊर्जेचे) उत्सर्जन असा उल्लेख केला जातो.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विठ्ठल नामाची शाळा भरलीशाळा शिकताना तहान-भूक हरली ||धृ||हेची घडो मज जन्माजन्मांतरीमागणे श्री हरी नाही दुजे || १ ||मुखी नाम सदा संताचे दर्शनजनी जनार्दन ऐसा भाव || २ ||नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारीकीर्तन गजरी सप्रेमाचे || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकमेकांची काळजी घेतली पाहिजे असे बरेचजण म्हणत असतात. हा एक समाजसंकेत आहे. पण त्याच वेळेला आपण आपल्याच घरातील माणूस आजारी असताना त्याची का बरं काळजी घेत नाही. ..? हा एक प्रश्नच आहे. एकदा तो माणूस बरा झाल्यावर मात्र वेळात, वेळ काढून दिखावूपणा करुन काळजी घेण्यात काय अर्थ...? म्हणून काळजी करायची असेल किंवा सेवा करायची असेल तर आपल्या मनात आपुलकी व त्या माणसासाठी वेळ असणे आवश्यक आहे आणि आज ती अत्यंत काळाची गरज आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *सुई आणि कैची**एक दिवस शाळेला सुट्टी असल्याची घोषणा गुरूजींनी केली म्हणून एका शिंप्याचा मुलगा आपल्या वडीलाच्या दुकानवर गेला. तिथे गेल्यानंतर तो लक्षपूर्वक आपल्या वडीलाच्या कामाच निरीक्षण करु लागला. त्याने पाहीले की त्याचे वडील कैचीने कपडे कापतात व कैचीला पायाखाली दाबुन ठेवतात व नंतर सुईने कापलेले कपडे शिवायचे व नंतर सुईला आपल्या टोपीला टोचुन ठेवायचे. जेव्हा त्याने चार पाच वेळा हे पाहीले तेव्हा आश्चर्याने त्याने वडीलांना एक गोष्ट विचारु का असे म्हटले वडीलानी होकार देताच तो म्हणाला बाबा तुम्ही जेव्हा ही कपडा कापता तेंव्हा कैची पायाखाली ठेवता व सुईने जेंव्हा कपडा शिवता तेंव्हा सुई टोपीला लावता. असं का? याचे उत्तर त्याच्या वडीलांनी दोन ओळीत दिले त्यात पूर्ण जीवनाचे सार सांगितले ते म्हणाले "बेटा कैची कापायचे काम करते आणि सुई जोडायचे काम करते कापणाऱ्याची जागा नेहमी खाली असते तर जोडणा-याची जागा नेहमी वर असते यामुळेच मी सुई टोपीवर लावतो व कैचीला पायाखाली ठेवतो. म्हणूनच......**◆तात्पर्य◆* *_जीवनात उंची गाठायची असेल तर सुईसारखे जोडण्याचे काम करा, कैचीसारखे तोडण्याचे नाही_*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment