✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 17 सप्टेंबर 2025💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1Ch6CPKLug/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌺 मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस 🌺🚩 महत्वाच्या घटना :- • १६३०: बाेस्टन शहराची स्थापना झाली.• १९४८: हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले.• १९५७: मलेशियाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.• १९८३: वनीसा विल्यम्स १ ली कृष्णवर्णीय मिस अमेरिका.• १९८८: दक्षिण कोरियातील सेऊल येथे २४ व्या ऑलिम्पिक स्पर्धां सुरू.• २००१: सप्टेंबर ११ च्या अतिरेकी हल्ल्यांनंतर न्यूयॉर्कस्टॉक एक्स्चेंज पुन्हा सुरू झाले.🎂 जन्म :- • १८७९: स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि द्रविड चळवळीचे प्रणेते पेरियार ई. व्ही. रामस्वामी यांचा जन्म. (मृत्यू: २४ डिसेंबर १९७३)• १८८२: महात्मा गांधीच्या पट्टशिष्या, चरित्रकार, परिचारिका व हिंद महिला समाज च्या संस्थापिका अवंतिकाबाई गोखले यांचा जन्म.• १८८५: पत्रकार, समाजसुधारक, लेखक, वक्ते केशव सीताराम तथा प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्म. (मृत्यू: २० नोव्हेंबर १९७३)• १९१४: बाटा शू कंपनीचे संस्थापक थॉमस जे. बाटा यांचा जन्म. (मृत्यू: १ सप्टेंबर २००८)• १९१५: चित्रकार व दिग्दर्शक मकबूल फिदा हुसेन यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून २०११)• १९२९: अमर चित्र कथा चे जनक अनंत पै ऊर्फ अंकल पै यांचा जन्म. (मृत्यू: २४ फेब्रुवारी २०११)• १९३०: व्हायोलिनवादक, संगीतकार व गायक लालगुडी जयरामन यांचा जन्म. (मृत्यू: २२ एप्रिल २०१३)• १९३२: भारतीय-इंग्लिश पत्रकार इंद्रजीत सिंग यांचा जन्म.• १९३७: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ओडिया कवी सीताकांत महापात्र यांचा जन्म.• १९३८: लेखक, कवी आणि टीकाकार दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचा जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर २००९)• १९३९: गीतकार रविंद्र सदाशिव भट यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर २००८)• १९४५: भारतीय धार्मिक गुरु भक्ति चारू स्वामी यांचा जन्म.• १९५०: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म.• १९५१: समाजसेविका डॉ. राणी बंग यांचा जन्म.• १९८६: भारतीय क्रिकेटपटू रवीचंद्रन अश्विन यांचा जन्म.🌹 मृत्यू :- • १९९९: हिंदी चित्रपट गीतकार हसरत जयपुरी याचं निधन. (जन्म: १५ एप्रिल १९२२)• २००२: कवी, वक्ते, कलावंत, संपादक वसंत बापट याचं निधन. (जन्म: २५ जुलै १९२२)• २०२२: भारतीय राजकारणी, खासदार माणिकराव होडल्या गावित यांचे निधन (जन्म: २९ ऑक्टोबर १९३४)••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त रचना ..... पूर्ण कविता वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात विशेष उपक्रम, 1200 दिव्यांगांना 1750 कृत्रिम अवयव आणि सहाय्यक साहित्यांचे होणार वाटप*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *जरांगे पाटलांच्या मुंबई आंदोलनाचं यश, पहिलं प्रमाणपत्र आज होणार वितरीत; हिंगोलीत 50 मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *महाराष्ट्रातील साताऱ्या जिल्ह्यातील पाटण तालुक्यात पाथरपुंज या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या गावाची सर्वाधिक पावसाची नोंद झाली*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *केंद्र सरकारतर्फे महिलांच्या आरोग्याची तपासणी, जनजागृती आणि पोषण सेवांचा प्रसार करण्यासाठी “स्वस्थ नारी – सशक्त परिवार अभियान” आजपासून देशभर राबवले जाणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *हॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते रॉबर्ट रेडफोर्ड यांचे निधन; वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या दैनंदिन निर्वाह भत्ता तसेच विद्यार्थींनीसाठीच्या स्वच्छता प्रसाधन भत्त्यात सुमारे दुपटीने वाढ, हजारो विद्यार्थ्यी - विद्यार्थिनींना दिलासा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 महेश एम. राखेवार, नांदेड👤 जितेंद्र टेकाळे, माहूर 👤 किसन कोनापुरे👤 केमशेट्टे प्रवीण 👤 अक्षय वानोळे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 77*पिवळं पिवळं दिसते**भाजीत जागा खास असते**तिच्याशिवाय रंग नाही**भाजी काही ढंग नाही*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - टमाटे ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एका कामात तुम्हाला यश मिळाले की, तुम्ही त्याहून मोठे कार्य हाती घ्याल, तेही तडीस न्याल.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) सातारा येथे १ ते ४ जानेवारी दरम्यान होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली ?२) केसर, नीलम, लंगडा, हापूस या कोणत्या फळाच्या जाती आहेत ?३) भारताने बनवलेल्या पूर्णपणे स्वदेशी चीपचे नाव काय आहे ?४) भारतात मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे पहिले राज्य कोणते आहे ?५) अन्न सुरक्षा कायदा पारित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ? *उत्तरे :-* १) विश्वास पाटील २) आंबा ३) विक्रम ४) पश्चिम बंगाल ५) छत्तीसगड*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *घर कसे असावे ?* 📕तुम्ही म्हणाल, राहणार्याला आवडेल असे असावे. कोणी म्हणेल सुंदर असावे, कोणी म्हणेल मजबूत असावे; पण चांगले घर कसे असते याचे काही निकष असतात. घरामुळे ऊन, वारा, पाऊस, यापासून संरक्षण होते; ही तर मूलभूत बाब आहे. घरात स्वयंपाक करणे, जेवणे, धुणे व मलमूत्र विसर्जन करणे इत्यादीसाठी सोयी असायला हव्यात. सांसर्गिक रोगांचा प्रसार कमी होईल, अशा प्रकारे घर बांधण्यात यावे. आगीसारख्या आपत्तीपासून रक्षण होण्याची सोय असावी. असे असल्यासच त्या घराला आरोग्यदायी घर असे म्हणतात येईल.अशा घरात दोन व्यक्तींना राहायला कमीत कमी ११० चौरस फूट जागा असावी. तीन खोल्यांत ५ लोक, तर पाच खोल्यांत १० लोक राहू शकतील. घराभोवती मोकळी जागा असावी, घरात फरशा वा टाइल्स असाव्या, भिंती मजबूत असाव्या, छत निदान १० फूट उंचीवर असावे, दर व्यक्तीला कमीत कमी ५०० घनफूट इतकी जागा असावी. प्रत्येक खोलीला दोन खिडक्या असाव्यात. त्या जमिनीपासून तीन फुटाच्या वर नसाव्या. खिडकीचा भाग चटई क्षेत्राच्या १/५ इतका तर दार व खिडक्या मिळून २/५ इतका असावा. प्रत्येक घराला मलमूत्र विसर्जनासाठी संडास व न्हाणीघराची सोय असावी. पिण्याच्या पाण्याचा पुरेसा पुरवठा असावा.घर आरोग्यपूर्ण असेल तर क्षयरोग, इन्फ्ल्यूएझा, गोवर, घटसर्प, खरूज, कुष्ठरोग, प्लेग इत्यादी रोगांचा प्रसार होत नाही. घरातील व्यक्तींचे आरोग्य नीट राहते. आजच्या काळात घर कसे असावे, हे पैसे किती आहेत यावर अवलंबून असते. ही गोष्ट जरी खरी असली, तरी आहे त्या पैशांत आरोग्याच्या दृष्टीने सुयोग्य असे घर बांधण्याचा प्रयत्न करावा.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सुंदर ते ध्यान पहा जाऊनीभक्त जन सांभाळितो विटे उभा राहोनी || धृ ||कर ठेवुनी कटेवरी, उभा आहे विटेवरीकानी कुंडल मकराकार, गळा शोभे तुळशीहारकौस्तुभ मनीविराज, कंठी दिसे शोभुनीभक्त जन सांभाळितो विटे उभा राहोनी || १ ||विठू उभा ना बैसला, जिकडे तिकडे दाटीयेलाचराचर व्यापून सारे, विटेवर उभा राहिलानेसला तो पितांबर दिसे शोभुनीभक्त जन सांभाळितो विटे उभा राहोनी || २ ||सत्यानंद म्हणे विठ्ठला, डोळे भरुनी पहिले तुजलाअंतर्भाह्य तोची भरला, कुठे नाही जागा उरलाविठ्ठल दर्शनाने पंढरी, दिसे शोभुनीभक्त जन सांभाळितो विटे उभा राहोनी || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या आयुष्यात जे काही आपल्यासोबत चांगले, वाईट घडून गेले आहे ते, कधीच विसरता येत नाही. उलट त्या प्रसंगाची आठवण काढून आपण सांगत असतो.पण, आपल्याच आयुष्यात पुढे काय होणार आहे या विषयी मात्र आपण सांगू शकत नाही हे सुद्धा तेवढेच सत्य आहे. म्हणून जे, काही आपल्यासोबत चांगले, वाईट घडून गेले आहे त्यातूनही शिकण्याचा प्रयत्न करावा. कारण समोर काय होणार आहे या विषयी पूर्णपणे कोणीच सागू शकत नाही म्हणून डोळे झाकून कोणावर विश्वास ठेवू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *सरळ रस्ता*एकदा एका अरब व्यापार्याने वाळवंटातून प्रवास करण्याकरिता आपल्या उंटावर बरेच सामान लादले. ते नीट घट्ट बांधून उंटाला जागेवरून उठवले. उंट मोठ्या कष्टाने उभा राहिला. व्यापार्याने उंटाचे तोंड गोंजारले आणि प्रेमाने विचारले:''बोल मित्रा, आपण कोणत्या वाटेने जाऊया? टेकडीकडे चढण असलेल्या रस्त्याने की, टेकडीवरून उतार असलेल्या रस्त्याने?'' उंट मालकाच्या कानाला लागून म्हणाला:''मालक आपण न्याल त्या रस्त्याने मला यायलाच हवे. परंतु आपण प्रेमानेच विचारता आहात म्हणून सांगतो. आपण आपले सरळ मार्गानेच जाऊया. सरळ मार्ग लांबचा असतो. परंतु त्या मार्गावर धोके कमी असतात.''उंटाचे बोलणे खरोखरच शहाणपणाचे होते. अरब व्यापार्याने प्रेमाने त्याच्याकडे पाहिले आणि त्याचे म्हणणे मान्य करून तो उंटासोबत चालू लागला.*तात्पर्यः जो सरळ मार्गाने साधेपणाने चालतो तिथे धोके कमी असतात.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment