✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 06 सप्टेंबर 2025💠 वार - शनिवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - गणेश विसर्जन करताना एक संकल्प करू या .......http://nasayeotikar.blogspot.com/2025/09/ganpati-bappa-morya.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :- • १५२२: फर्डिनांड मॅगेलनच्या मोहिमेतील व्हिक्टोरिया हे जगप्रदक्षिणा करणारे पहिले जहाज स्पेनला पोहोचले.• १८८८: चार्ल्स टर्नरचा एकाच मोसमात २५० क्रिकेट बळीचा विक्रम.• १९३९: दुसरे महायुद्ध – दक्षिण अफ्रिकेने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.• १९५२: कॅनडातील पहिले दूरचित्रवाणी केंद्र माँट्रिअल येथे सुरू झाले.• १९६५: पहिल्या भारत पाकिस्तान युद्धाची सुरुवात झाली.• १९६६: दक्षिण आफ्रिकेच्या पंतप्रधान हेन्ड्रिक व्हेरवोर्डची संसदेत भोसकून हत्या.• १९६८: स्वाझीलँड हा देश स्वतंत्र झाला.• १९९३: ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांची कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्कारासाठी निवड.• १९९७: अमेरिकेच्या नॅशनल एन्डाऊमेंट फॉर द आर्टस संस्थेची सरोदवादक अमजद अली खाँ यांना नॅशनल हेरिटेज फेलोशिप मिळाली.• २०२२: कोविड-१९ महामारी - भारताने कोविड-१९ अनुनासिक (Nasal Vaccine) लस मंजूर केली आणि चीननंतर असे करणारा दुसरा देश बनला.• २०२२: लिझ ट्रस - युनायटेड किंगडमच्या पंतप्रधान बनल्या.🎂 जन्म :- • १७६६: इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ जॉन डाल्टन यांचा जन्म. (मृत्यू: २७ जुलै १८४४)• १८८९: स्वातंत्र्यसेनानी, सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू बॅ. शरदचंद्र बोस यांचा जन्म. (मृत्यू: २० फेब्रुवारी १९५०)• १८९२: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ सर एडवर्ड ऍपलटन यांचा जन्म.• १९०१: भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले यांचा जन्म. (मृत्यू: १८ मे १९९७)• १९२१: बार-कोड चे सहसंशोधक नॉर्मन जोसेफ व्हाउडलँड यांचा जन्म. (मृत्यू: ९ सप्टेंबर २०१२)• १९२३: युगोस्लाव्हियाचे राजा पीटर (दुसरा) यांचा जन्म.• १९२९: हिंदी चित्रपट निर्माते यश जोहर यांचा जन्म. (मृत्यू: २६ जून २००४)• १९५७: पोर्तुगालचे पंतप्रधान जोशे सॉक्रेटिस यांचा जन्म.• १९६८: पाकिस्तानी फलंदाज सईद अन्वर यांचा जन्म.• १९७१: भारतीय क्रिकेट खेळाडू देवांग गांधी यांचा जन्म.• १९१५: बव्हेरियन लेफ्टनंट आणि राजकारणी, बव्हेरिया देशाचे मंत्री अध्यक्ष फ्रांझ जोसेफ स्ट्रॉस यांचा जन्म (मृत्यू : ३ ऑक्टोबर १९८८)🌹 मृत्यू :-• १९३८: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच लेखक सली प्रुडहॉम यांचे निधन.• १९६३: कन्नड कवी व श्रेष्ठ भाषा संशोधक मंजेश्वर गोविंद पै यांचे निधन. (जन्म: २३ मार्च १८८३)• १९७२: जगप्रसिद्ध सरोदवादक व संगीतकार अल्लाउद्दीन खाँ यांचे निधन.• १९९०: इंग्लिश क्रिकेटपटू सर लिओनार्ड तथा लेन हटन यांचे निधन. (जन्म: २३ जून १९१६)• २००७: इटालियन ऑपेरा गायक लुसियानो पाव्हारॉटी यांचे निधन.• २०२२: भारतीय राजकारणी, उत्तर प्रदेशचे आमदार अरविंद गिरी यांचे निधन (जन्म: ३० जून १९५८)• २०२२: भारतीय राजकारणी, कर्नाटकचे आमदार उमेश कट्टी यांचे निधन (जन्म: १४ मार्च १९६१)• २०१९: झिम्बाब्वे देशाचे २रे राष्ट्रपती रॉबर्ट मुगाबे यांचे निधन (जन्म: २१ फेब्रुवारी १९२४)• १९७९: ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे अध्यक्ष पी. के. मुकिया तेवर यांचे निधन (जन्म: ४ एप्रिल १९२३)• १९७८: ऍडिडासचे संस्थापक अडॉल्फ डॅस्लर••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••संकल्प - गेली अकरा दिवस गणपती बाप्पाच्या सहवासात दिवस कसे आनंदात गेले आहेत. पण आपल्या या सामाजिक कार्यातून काही विधायक काम करता आले असते .....! याचा विचार देखील केला नाही. म्हणून एक संकल्प करू या.... मंडळाच्या माध्यमातून एक तरी विधायक कार्य करू या......गणपती बाप्पा मोरया ............ पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यातील 6 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मान; शिक्षकांचे योगदान भारताला सुपर पॉवर बनवेल -राष्ट्रपती*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अनंत चतुर्दशी - राज्यभरात गणेश विसर्जनाची लगबग, मुंबईत 18 हजार पोलीस, 10 हजार कॅमेरे, ड्रोनद्वारे नजर अन् पहिल्यांदाचा AI चा वापर; गणपती विसर्जनासाठी मुंबई पोलीस सज्ज*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सोलापुरातील महिला IPS अधिकाऱ्याला झापलं, आता व्हायरल व्हिडिओवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्पष्टीकरण, म्हणाले, बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी मी कटिबद्ध*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यातील एक लाख होमिओपॅथी डॉक्टरांना दिलासा, CCMP कोर्स केलेल्या डॉक्टरांची MMC मध्ये नोंद होणार; सरकारच्या निर्णयाविरुद्ध IMA ची याचिका न्यायालयाने फेटाळली*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे टेस्ला मॉडेल वाय कारचे बनले पहिले मालक*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *त्रिभाषा सूत्र लागू करण्यासंदर्भात राज्य सरकारकडून समितीची स्थापना, ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे समितीच्या अध्यक्षपदी तर डॉ. सदानंद मोरे, वामन केंद्रे यांच्यासह एकूण सात सदस्यांचा समितीत समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ऑस्ट्रेलियाचा महिला एकदिवसीय विश्वचषक संघ जाहीर, एलिसा हिली संघाचे नेतृत्व करणार; स्पर्धा 30 सप्टेंबरपासून सुरू होईल*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुनील ठाणेदार, शिक्षक, देगलूर 👤 रितेश पोकलवार 👤 विकास डुमणे👤 अनिल सोनकांबळे 👤 आनंद गायकवाड 👤 सचिन पाटील 👤 जयेश वाणी 👤 विठ्ठल तुकडेकर, धर्माबाद *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 67*हात नाही, पाय नाही तरीही मी रोज धावतो.**थांबायला नाव नाही, सतत पुढेच सरकतो.**सांगा पाहू कोण आहे मी ? 🤔*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - तारा star••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••"आयुष्यातील सर्वात मोठी शिक्षा म्हणजे स्वतःला समजून घेणे." *संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'आशियाचा नोबेल पुरस्कार' असे कोणत्या पुरस्काराला म्हटले जाते ?२) आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?३) संविधानानुसार केंद्राचे घटनात्मक प्रमुख कोण ?४) 'हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) भारतामध्ये चहाची लागवड सर्वप्रथम कोणत्या राज्यामध्ये झाली ? *उत्तरे :-* १) रॅमन मॅगसेसे पुरस्कार २) उर्जित पटेल, आरबीआयचे माजी गव्हर्नर ३) राष्ट्रपती ४) आसेतुहिमालय ५) आसाम*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अष्टविनायकांपैकी सातवा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नेश्वर गणपती*थोडक्यात माहिती :स्थान – ओझर, जुन्नर तालुका, पुणे जिल्हा, महाराष्ट्र.नाव – श्री विघ्नेश्वर गणपती.• कथा –महादैत्य विघ्नासुराने सर्व जगात विघ्न निर्माण केले. तेव्हा गणपतीने त्याला पराभूत करून "विघ्न" ही शक्ती आपल्या अधीन केली. म्हणून येथे गणपतीला विघ्नेश्वर म्हटले जाते.• मंदिर वैशिष्ट्ये –हे मंदिर अत्यंत सुंदर व सुसज्ज आहे. सोन्याचा कळस, दीपमाळा व भव्य सभामंडप आहेत. मंदिराभोवती दगडी तटबंदी आहे.• मूर्ती स्वरूप –गणपतीचा सोंड डावीकडे वळलेला आहे. रत्नजडित डोळे व नाभीवर हिरेजडित दागिना आहे.👉 अष्टविनायक यात्रेत लेण्याद्रीचा गिरिजात्मक पाहिल्यानंतर पुढचा सातवा गणपती ओझरचा विघ्नेश्वर असाच मानला जातो.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हा देवांचा देव गणपती सर्वाहुनी वेगळावाहतो दुर्वाकुर कोवळा….. || धृ ||सिद्धी विनायक तू हेरंबा, मंगल दायक तू आरंभचिंतामणी तू जय सुख दाता, विषाल देही वैराग्याच्यारंग तुझा सोवळा …… || १ ||पशाकुंश करी विघ्नहरया, उभय करावी देशी अभयाअन्न ब्रम्ह परी मोदक माया, तुझ्या कृपेने मुका बोलतोचालतसे पांगळा ….. || २ ||गजमस्तक तू असीम बुद्धी, रिद्धी सिद्धीची समृद्धीसाहित्याची अमृत सिद्धी, प्रथम पाठीवर तुझा गणेशाॐ कार गिरविला …. || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्यांचे विचार सकारात्मक असतात अशी माणसे त्याच सकारात्मक विचारांना आत्मसात करून नित्यनेमाने कार्य करत असतात. कारण त्यांना वेळेचे भान असते सोबतच आपण इतरांसाठी काय केले पाहिजे यासाठी ते प्रयत्नशील असतात. अशा विचारी माणसांना कशाचीही अपेक्षा नसते किंवा कोण काय म्हणतील याकडे लक्ष देण्यासाठी त्याच्याकडे वेळ नसतो. तीच माणसे अभिमानाचे दुसरे नाव असतात. म्हणून जे कोणी चांगले कार्य करत असतील त्यांचे गुणगान करता येत नसेल तर त्यांना नाव ठेवून स्वतः च्या नावाची प्रसिद्धी करू नये. माणसाचे जीवन एकदाच मिळते त्या मानवी जीवनाचे महत्व जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *📗वक्ता आणि श्रोते📗*━━━━━━━━━━━━━━━━*एक विद्वान वक्ता एका अतिशय महत्वाच्या विषयावर तळमळीने भाषण देत होता. मात्र श्रोत्यांची चुळबुळ सुरु होती. काहीजण इकडे बघ तर काहीजण रस्त्यावर खेळणा-या लहानमुलांकडे बघत होते. तेव्हा श्रोत्यांचे आपल्या व्याख्यानाकडे अवधान खेचून आणण्यासाठी वक्त्याने एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. कथेची सुरुवात होताच जादूची कांडी फिरल्याप्रमाणे सर्व श्रोते अतिशय सावधपणे गोष्ट ऐकू लागले. वक्ता म्हणाला, एकदा एक देव, एक पाणसर्प आणि एक चिमणी हे तिघे एकत्रितरित्या प्रवासाला निघाले. चालता चालता त्यांना वाटेत एक नदी लागली. चिमणीने उडून पैलतीर गाठला. पाणसर्प पाण्यातून पोहत पोहत पलीकडे पोहोचला.'' बस्स इतकेच असे सांगून वक्त्याने आपले अर्धवट राहिलेले भाषण चालू केले. श्रोते आता जोरजोराने ओरडू लागले,'' अहो वक्तेमहाशय, देवाचे पुढे काय झाले, त्याने कशी काय नदी पार केली. त्या तिघांचे पुढे काय झाले.'' वक्त्याने शांतपणे उत्तर दिले,''देवच तो; तेव्हा ती नदी पार करून जाण्याचे सामर्थ्य त्याच्याठायी असणे सहाजिकच आहे. तो पाण्यावरूनही चालत गेला असेल किंवा पाण्याला बाजूला सारून जाण्याचीही त्याच्यात ताकत होती पण तो अलिकडच्याच तीरावर थांबला.'' श्रोत्यांनी मोठ्या उत्कंठेने विचारले की देवाने असे अलिकडेच थांबण्याचे कारण काय. यावर वक्ता म्हणाला,'' ज्या मूर्खाना महत्वाच्या विषयावरचे असणारे व्याख्यान न आवडता मनोरंजक गोष्टी आवडतात त्या मुर्खांचा विचार करत देव नदीकिनारी बसून आहे. जर तुम्ही या महत्वाच्या विषयाबद्दल माझे विचार ऐकून त्यावर काही उपाय केले व आपल्या राज्याला वाचविले तर देव निश्र्चित पलीकडच्या तीरावर निघून जाईल'' वक्त्याचा चतुरपणा कामी आला व श्रोत्यांनी पुढील व्याख्यान शांतपणे ऐकून घेतले.**तात्पर्य :- काहीवेळेस आपल्या चांगल्या व देशहिताच्या योजना लोकांच्या गळी उतरविण्यासाठी युक्तीप्रयुक्तीचा वापर करावाच लागतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment