✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 08 सप्टेंबर 2025💠 वार - सोमवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~खालील link वर क्लिक करून जरूर ऐका क्षमावाणी दिवस https://drive.google.com/file/d/1JTesGDuSc9pWkiEgaPM-Wv9ArFYBtgQD/view?usp=drivesdk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना - • २०२२: नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा २८ फूट उंच पुतळा इंडिया गेट, दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनावरण केला.• २००१: लेग स्पिनर सुभाष गुप्ते व कर्णधार मन्सूर अली खान (टायगर) पतौडी यांची सी. के. नायडू पुरस्कारासाठी निवड.• २०००: दूरचित्रवाणी वाहिन्यांवर सिगारेट, तंबाखू आणि मद्याच्या जाहिरातींवर बंदी लागू करणारा कायदा अस्तित्वात.• १९९१: मॅसेडोनिया युगोस्लाव्हियापासून स्वतंत्र झाले.• १९६६: प्रसिद्ध टीव्ही मालिका स्टार ट्रेकचे प्रसारण सुरू झाले.• १९५४: साऊथ-ईस्ट आशिया ट्रिटी ऑर्गनायझेशन (SEATO) ची स्थापना झाली.• १९४४: दुसऱ्या महायुद्धात लंडनवर पहिल्यांदा V-2 बॉम्बने हल्ला.• १९००: अमेरिकेतील गॅल्व्हेस्टनमध्ये आलेल्या हरिकेनमुळे सुमारे ८,००० लोकांचा मृत्यू.• १८५७: रंगो बापूजी गुप्ते यांच्या मुलासह १८ क्रांतिवीरांचे साताऱ्याच्या गेंडा माळावर फाशी 🎂 जन्म :• १९३३: आशा भोसले – सुप्रसिद्ध पार्श्वगायिका; पद्म विभूषण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त.• १९२६: भूपेन हजारिका – भारतीय संगीतकार व गायक; भारतरत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त.• १९३८: केनिची होरी – पहिला जपानी यॉट्समन ज्याने पॅसिफिक महासागर एकट्याने गाठला, तसेच वयाच्या ८३व्या वर्षी ते करताना सर्वात ज्येष्ठ.• १९१८: डेरेक हॅरोल्ड रिचर्ड बार्टन – ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ; नोबेल पुरस्कारप्राप्त.• १९०१: हेन्ड्रिक व्हेरवोर्ड – दक्षिण आफ्रिकेचे पंतप्रधान.• १८८७: स्वामी शिवानंद सरस्वती – योगी व आध्यात्मिक गुरू.• १८४८: व्हिक्टर मेयर – जर्मन रसायनशास्त्रज्ञ.• १८४६: पॉल चेटर – भारतीय-हॉंगकॉंग उद्योजक व राजकारणी 🌹 निधन:• ७०१: पोप सर्गिअस प्रथम यांचे निधन.• १९६०: फिरोझ गांधी (इंदिरा गांधी यांचे पती) यांचे निधन.• १९९१: वामन कांत – भारतीय कवी यांचे निधन.• १९९७: कमला सोहोनी – पहिली भारतीय महिला शास्त्रज्ञ यांचे निधन.• २०१०: मुरली – तामिळ अभिनेता यांचे निधन.• २०२२: कमल नारायण सिंग – भारताचे २२वे सरन्यायाधीश यांचे निधन.• २०२२: एलिझाबेथ द्वितीय – इंग्लंडची राणी यांचे निधन.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*08 सप्टेंबर - क्षमावाणी दिवस*क्षमा मागणे व क्षमा करणे दोन्ही गोष्टी खूप महत्वाचे आहे. याविषयी audio जरूर ऐका ..... पूर्ण माहिती ऐकण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मराठा आरक्षण देताना ओबीसींना कोणताही धक्का नाही, तुम्ही मागत रहा, आम्ही शक्य तेवढे देत राहू ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन आणि ईद मेळावा एकत्र येऊन कायदा-सुव्यवस्थेची अडचण निर्माण होऊ नये यासाठी मुंबईत 5 सप्टेंबर ऐवजी आज 8 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलादची सुट्टी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *काशी विश्वनाथ मंदिराच्या पुजाऱ्यांना मिळणार राज्य कर्मचाऱ्यांचा दर्जा; 200 टक्के पगारवाढीसह वेतन होणार 90 हजार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *ढोल- ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि भक्तांचा उत्साह; मुंबई-पुण्यात जल्लोषात गणरायाला निरोप*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *निवडणूक आयोग देशभरात मतदार पडताळणी करणार, 10 सप्टेंबर रोजी दिल्लीत बैठक; वर्षाच्या अखेरीस सुरू होऊ शकते प्रक्रिया*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अखेर दीड वर्षानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न मार्गी, हिंगोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांचा पुढाकार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *बेलारूसची 27 वर्षीय आर्यना सबालेंका हिने अमेरिकन खेळाडू अमांडा अनिसिमोवा हिला पराभूत करून सलग दुसऱ्यांदा यूएस ओपनचे विजेतेपद पटकावले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 एल. एन. गोडबोले, गटशिक्षणाधिकारी, अर्धापूर 👤 मधुकर गिरी 👤 प्रशांत चौधरी 👤 कृष्णा हंबर्डे 👤 बालाजी वारले👤 योगेश जंगले 👤 शंकर सारगोड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 68*पाय आहेत पण चालू शकत नाही**पोट आहे पण खाऊ शकत नाही**झोपल्यासारखा दिसतो पण घराला उठवून ठेवतो…*ओळखा पाहू मी कोण? 🤔*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - वेळ time••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जेव्हा क्रोध नम्रतेचे रूप धारण करतो तेव्हा अभिमानही त्याच्यापुढे नतमस्तक होतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस' केव्हा साजरा केला जातो ?२) आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस २०२५ ची थीम काय आहे ?३) जागतिक साक्षरता दिनाचे ब्रीदवाक्य काय आहे ?४) किमान किती वय असलेली व्यक्ती विधानसभेसाठी मतदान करू शकते ?५) खेडेगावाचे प्रथम नागरिक कोणाला म्हटले जाते ? *उत्तरे :-* १) ८ सप्टेंबर २) डिजिटल युगात साक्षरतेला प्रोत्साहन देणे ३) मन सक्षम करा, जीवन बदला: जागतिक साक्षरता दिन साजरा करा! ४) १८ वर्षे ५) सरपंच*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 त्से त्से माशी म्हणजे काय ? 📕तुम्ही म्हणाल काय बुवा हे नाव! त्से त्से माशी ही घरात नेहमी दिसणाऱ्या माशीसारखीच एक प्रकारची माशी आहे. त्से त्से माशी व घरातील माशी ह्यांच्यात बरेच साम्य आहे. त्से त्से माशी अर्धा इंच लांब असते व तिचा रंग पिवळसर किंवा गडद तपकिरी असतो. कात्रीच्या पात्यांसारखे पंख असलेल्या या माशीची सोंड खूप तीक्ष्ण व मजबूत असते. या सोंडेनेच ही माशी चावते व त्वचेला छिद्र पाडून रक्त प्राशन करते. आपल्या सुदैवाने ही खतरनाक माशी आफ्रिका खंडात आढळते. आपल्याकडे ती दिसून येत नाही. त्से त्से माशी सुमारे १०० दिवस जगते. ती अंडी न घालता सरळ अळ्यांनाच जन्म देते. त्से त्से माशा माणसांना, पक्ष्यांना किंवा प्राण्यांनाही चावतात. या माशा प्रामुख्याने दिवसाच चावे घेतात. या माशांमुळे 'स्लिपींग सिकनेस' ह्या रोगाचा प्रसार होतो. 'ट्रिपॅनोसोमा ब्रूसी' नावाचे या रोगाचे जंतू त्से से माशीमुळे निरोगी माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. अशा व्यक्तीला सुरुवातीला ताप येतो. तापासोबत शरीरातील लसिकाग्रंथी मोठ्या होतात, सूजतात. कालांतराने मेंदूवर परिणाम होतो. हा रोग झालेली व्यक्ती अशक्त होत जाते व वर्ष-दीड वर्षात मरण पावते. ह्या गंभीर रोगाचे त्यामुळेच दूरगामी, सामाजिक व आर्थिक परिणाम होतात. " चेहेऱ्यावरची माशीदेखील उडत नाही!" असे आपण गंमतीने म्हणतो. पण जर देश आफ्रिकेतला असेल आणि माशी 'त्से त्से' असेल तर मात्र खैर नाही. कारण अशी माशी आपल्या प्राणावरच बेतू शकते. त्से त्से माशा राहतात ती झाडेझुडपे नष्ट करून व डी.डी. टी., डायएल्ड्रीनसारख्या कीटकनाशकांचा वापर करून या माशीचा बीमोड करता येतो.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कांदा-मुळा-भाजी । अवघीं विठाबाई माझी ॥१॥लसुण-मिरची-कोथिंबिरी । अवघा झाला माझा हरीं ॥२॥ऊस-गाजर-रातळू । अवघा झालासें गोपाळू ॥३॥मोट-नाडा-विहींर-दोरी । अवघीं व्यापिली पंढरी ॥४॥सावता ह्मणें केला मळा । विठ्ठल पायीं गोविंला गळा ॥५॥ - सावता माळी ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••घरातील भांडं व्यवस्थितपणे ठेवल्यावर त्याचा आवाज फक्त, घरातच राहत असतो. पण, त्याच तोडांतून निघणाऱ्या शब्दरुपी भांड्याचा आवाज जर जास्तच झाला तर मात्र त्याचा आवाज कोसोदूर जात असतो आणि नंतर नुकसान शेवटी आपलेच होण्याची शक्यता असते.म्हणून बोलताना जरा जिभेवर ताबा ठेवणे गरजेचे आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कृतघ्नता एक गाढव मोठा सहनशील होता. त्याचा धनी त्याजकडून त्याच्या शक्तिपलीकडे काम करून घेत असे व त्यास पोटभर खाऊही घालत नसे. अशा स्थितीत त्या गाढवाने आपल्या धन्याची नोकरी पुष्कळ वर्षे केली. तो गाढव म्हातारा झाला असता, एके दिवशी त्याच्या धन्याने त्याच्या पाठीवर एवढे ओझे लादले की त्याच्या भाराने तो अगदी खचून गेला. रस्ता अवघड व खांचखळग्यांचा असल्यामुळे थोडयाच वेळाने त्याच्या पाठीवर लादलेली मातीची भांडी फुटून त्यांचे तुकडे तुकडे झाले. हे पाहताच धनी त्याला निर्दयपणाने मारू लागला. त्यावेळी तो गाढव पडल्यापडल्याच आपली मान वर करून त्यास म्हणाला, ‘अरे कृतघ्न माणसा! हे सगळे नुकसान होण्यास तुझाच दुष्टपणा कारण आहे. तू पहिल्यापासूनच मला कधीही पोटभर खाऊ घातले नाहीस व माझ्या सामर्थ्यापलीकडे ओझे माझ्या पाठीवर लादलेस, त्याचा हा परिणाम.’तात्पर्य :- कित्येक लोक असे कृतघ्न आणि निर्दय असतात, की आपली सेवा प्रामाणिकपणाने करणाऱ्या लोकांसही छळण्यास ते कमी करीत नाहीत.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment