✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 26 सप्टेंबर 2025💠 वार - शुक्रवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••Link https://www.facebook.com/share/p/1BBTNXaw2C/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🚩 महत्वाच्या घटना :-*〉 १९९०: रंगनाथ मिश्रा यांनी भारताचे २१ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.〉 १९९७: गरुडा इंडोनेशियाचे विमान मेदान शहराजवळ कोसळले, २३४ लोक ठार.〉 २००१: सकाळ वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संपादक – संचालक प्रताप पवार यांची इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड.*🎂जन्म :-*〉 १८२०: पं. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा बंगाल मध्ये जन्म. (मृत्यू: २९ जुलै १८९१)〉 १८४९: नोबेल पारितोषिक विजेते रशियन शास्त्रज्ञ इव्हान पेट्रोव्हिच पाव्हलॉव्ह यांचा जन्म. (मृत्यू: २७ फेब्रुवारी १९३६)〉 १८५८: लेखक मणिलाल नथुभाई त्रिवेदी यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑक्टोबर १८९८)〉 १८७६: भारतीय कवी, वकील, आणि राजकारणी गुलाम कबीर नैयरंग यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑक्टोबर १८५२)〉 १८९४: प्रज्ञावंत भाष्यकार आणि तत्वचिंतक आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर यांचा मलकापूर कोल्हापूर येथे जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर १९५५)〉 १९०९: नासकार चे संस्थापक बिल फ्रान्स सीनियर यांचा जन्म. (मृत्यू: ७ जून १९९२)〉 १९१८: मिस वर्ल्ड चे संस्थापक एरिक मॉर्ली यांचा जन्म. (मृत्यू: ९ नोव्हेंबर २०००)〉 १९२३: भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक देव आनंद यांचा जन्म. (मृत्यू: ३ डिसेंबर २०११)〉 १९३१: भारतीय क्रिकेट खेळाडू विजय मांजरेकर यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑक्टोबर १९८३)〉 १९३२: भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जन्म.〉 १९४३: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू इयान चॅपल यांचा जन्म.*🌹 मृत्यू :-*〉 १९५६: भारतीय, मराठी उद्योगपती लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचे निधन. (जन्म: २० जून १८६९)〉 १९७७: भारतीय नर्तक उदय शंकर यांचे निधन. (जन्म: ८ डिसेंबर १९००)〉 १९८८: रूद्रवीणा वादक शिवरामबुवा दिवेकर यांचे निधन. (जन्म: १ एप्रिल १९१२)〉 १९८९: गायक, संगीतकार आणि निर्माता हेमंतकुमार यांचे निधन. (जन्म: १६ जून १९२०)〉 १९९६: मराठी नाटककार, पत्रकार विद्याधर गोखले यांचे निधन. (जन्म: ४ जानेवारी १९२४)〉 २००२: मराठी संगीतकार, गायक राम फाटक यांचे निधन. (जन्म: २१ ऑक्टोबर १९१७)〉 २०२२: भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि संगीतकार एस. व्ही. रामनन यांचे निधन〉 २०२०: भारतीय अर्थशास्त्र इशर जज अहलुवालिय यांचे निधन (जन्म: १ ऑक्टोबर १९४५)••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सुपरस्टार अमिताभ बच्चन*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील link वर क्लिक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *गोंदियाच्या सृष्टी पाटीलने देशाची मान उंचावली ; टायटन स्पेस अँड इंडस्ट्रीजची आर अँड डी अंतराळवीर म्हणून निवड*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *27 सप्टेंबर ला BSNL ची 4G नेटवर्क देशभर होणार सुरु*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *भारताची ऐतिहासिक झेप ! ‘अग्नी-प्राईम’ क्षेपणास्त्राची रेल्वेवरून यशस्वी चाचणी, संरक्षणमंत्र्यांनी दिली माहिती; 2000 किमीची मारक क्षमता, शत्रूंचं टेन्शन वाढणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पूरग्रस्तांच्या मदतीला गणपती बाप्पा, लालबागचा राजा मंडळाकडून 50 लाख रुपयांचा चेक; राज्यातील शिक्षकही देणार 1 दिवसाचा पगार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्यातील पूरग्रस्त भागात मृतांच्या वारसांना 4 लाख, जनावरासाठी 37 हजार, शेळी-मेंढी 4 हजार, सरकारकडून तातडीने मदत देण्यास सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भाजपने 3 राज्यांसाठी निवडणूक प्रभारी नियुक्त केले, धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे बिहार, भूपेंद्र यादव बंगाल, तर बैजयंत पांडांकडे तमिळनाडूची जबाबदारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशिया कप 2025 - बांगलादेशला हरवून भारताचे फायनलमध्ये प्रवेश, श्रीलंका स्पर्धेच्या बाहेर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 85*"कान आहेत पण ऐकत नाही**तोंड आहे पण खात नाही**नाक आहे पण श्वास घेत नाही**लहान लेकरांची आवडती आहे*सांग बघू मी कोण?"*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - घंटी ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*काही पालेभाज्यांचे औषधी उपयोग*१.] *कोथिंबीर* :- उष्णता कमी करणारी, पित्तनाशक असते. हृदरोगावर अतिशय उपयुक्त आहे.२.] *कढीलिंब* ;- पित्तनाशक व कृमीनाशक म्हणून याचा उपयोग होतो. ३.] *पालक* :- मूत्रसंस्था, पचनसंस्था यांच्या आतील सूजेला मऊपणा आणण्यास उपयुक्त असून दमा व खोकला कमी करणारी आहे. ४.] *माठ* :- हृदयाच्या कार्याला उपयोगी असून ही भाजी खाल्यावर शौचाला साफ होते. ५.] *चाकवत* :- ही पचण्याला सुलभ असून ज्वरनाशक आहे. त्वचेला कांती देणारी अशी ही भाजी आहे. ही भाजी कृमीनाशक असून यकृताच्या सर्व विकारांवर उपयुक्त आहे. ६.] *हादगा* :- खोकला, पित्त, हिवताप कमी करणारी ही भाजी आहे. या भाजीच्या फुलाच्या रसाचे दोन थेंब काही दिवस डोळ्यात घातल्यास रातआंधळेपणा नाहीसा होतो असे म्हणतात. हा फुलांचा रस मधातून घेतल्याने छातीतील कफ लवकर सुटतो. ७.] *अळू* :- याच्या पानांचा व दांड्यांचा रस जंतुनाशक आहे. त्यामुळे शरिराच्या कापलेल्या भागावर याचा रस लावून पट्टी बांधल्यास जखमा लवकर भरून येतात. याचा रस साखरेबरोबर दिवसातून दोन-तीन वेळा घेतल्यास मूळव्याध कमी होते. ८.] *अंबाडी* :- मीरपूड व साखर यांच्याबरोबर अंबाडीचा रस प्राशन केल्यास तो पित्तनाशक ठरतो. ९.] *घोळ* :- मूळव्याध कमी करण्यास ही भाजी उपयुक्त आहे. शिवाय ती खाल्ल्यामुळे लघवीला साफ आणि भरपूर होते. १०.] *टाकळा* :- सर्वांगाला येणारी खाज ही भाजी खाल्याने कमी होते. या भाजीच्या बियांच्या पीठ अशक्तपाणा कमी करण्यास उपयुक्त आहे. संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मोठी स्वप्ने पाहणारेच,मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.*संकलन :- प्रमिला सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्रामध्ये पोलीस पाटलाची नियुक्ती कोणत्या कायद्यानुसार केली जाते ?२) MLA चे विस्तारित रूप काय आहे ?३) संसदेच्या सभागृहाची सभा भरण्यासाठी किमान किती सदस्यांची उपस्थिती अनिवार्य असते ?४) भारतातील पहिली दुमजली रेल्वे गाडी कोणती ?५) 'मनोरी खाडी' कोणत्या जिल्ह्यात आहे ? *उत्तरे :-* १) महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम - १९६७ २) मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंबली ३) १/१० ४) सिंहगड एक्सप्रेस ५) मुंबई उपनगर*संकलन :- जैपाल ठाकूर *जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार , ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुनील आलूरकर, तंत्रस्नेही शिक्षक, नांदेड 👤 विश्वनाथ होले👤 अजय मिसाळे 👤 सोनाजी बनकर *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कारे देवा उशीर पारकेलातुझ्या साठी जीव माझा जडला || धृ ||तुझ्यासाठी सोडीला घरदार मोडीला संसार जीव माझा जडला || १ ||तुझ्यासाठी होईन भिकारी करीन तुझी वारी जीव माझा जडला || २ ||तुझ्या साठी राहीन उपवासी करीन एकादसी जीव माझा जडला || ३ ||जनी मनी होईन तुझी दासी येईन चरणासी जीव माझा जडला || ४ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वारंवार कोणाच्या विषयी नको त्या शब्दात बोलून आपला अनमोल वेळ वाया घालविण्यापेक्षा जरा स्वतःकडे बघण्यासाठी थोडा वेळ काढावा. कारण आपण जेव्हा दुसरी कडे बघत असतो किंवा बोलत असतो त्यावेळी आपल्याकडेही बघणाऱ्यांच्या अनेक नजरा असतात. म्हणून दुसऱ्या विषयी बोलताना ताळतंत्र ठेवूनच बोलावे.जर अशीच वेळ निघून गेली तर आपल्या जवळ पाहिजे तेवढा वेळ उरणार नाही म्हणून आपल्याकडे असलेल्या वेळेचा पूर्णपणे फायदा घेऊन चांगले कार्य करून दाखवावे जेणेकरून इतरही त्यातून शिकू शकतील.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलालमु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*दयेचा स्ट्राईक*अब्दुलकडे एक बकरी होती, त्या शेळीला एक लहान पिल्लू होते. अब्दुलने त्या दोघांवर प्रेम केले आणि त्यांच्यासाठी शेतातून मऊ मऊ गवत आणले. दोन्ही शेळ्या गवत खाऊन आनंदी झाल्या. अब्दुलला दुरून पाहून ती लगेच त्याच्याकडे धावत असे. अब्दुल चौथीत शिकत असे. एके दिवशी तो शाळेत गेला होता. त्याच्या आई आणि वडिलांनी बकरीचे पिल्लू सलीमला विकले. सलीम जेव्हा त्या मुलाला घेऊन जाऊ लागला तेव्हा त्याला ती बकरी समजली. हे लोक तिच्या मुलाला घेऊन जात आहेत. शेळी जोरात रडू लागली. त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. ती खूप प्रयत्न करत होती, पण तिला दोरीने बांधले होते. सलीम मुलाला घेऊन खूप दूर गेला. मूलही जोरात रडत होतं. तो आईला हाक मारत होता. आईची ममता अश्रूंनी वाहत होती, पण ती असहाय होती. शेळीने शेवटचा विचार केला, जर तिने आता प्रयत्न केले नाहीत तर ती आपल्या मुलाला कधीही भेटू शकणार नाही. असा विचार करून एकदा प्रयत्न केला. शेळीच्या गळ्यातून दोरीचा फास तुटला. ती बकरी जीव घेऊन सलीमकडे धावली. तिचे पिल्लू पाहून शेळीने सलीमवर जोरदार हल्ला केला. सलीमने बराच वेळ धडपड केली, पण शेळीचा हल्ला थांबवता आला नाही. अचानक शेळी अनेक आघात करत राहिली. शेवटी सलीमने हार मानली आणि बकरीचे पिल्लू तिथेच सोडले. अम्मी-अब्बूकडून पैसे घेऊन अब्दुल परतला. अब्दुल परत आल्यावर शेजाऱ्यांनी त्याला सर्व प्रकार सांगितला. यानंतर तो आई-वडिलांवर रागावला. आई-वडिलांनी खूप समजावले पण त्याने कोणाचेच ऐकले नाही. कारण त्याला ज्या बकऱ्या विकायच्या होत्या त्याच्यासाठी त्या शेळ्या अनमोल होत्या.नैतिक - आईच्या करुणेच्या हल्ल्याने मोठ्या शक्तींचा पराभव होतो. आई आपल्या मुलासाठी आपला जीव पणाला लावते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment