✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 23 सप्टेंबर 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2024/10/mahalaksami.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २६६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००२:’मोझिला फायरफॉक्स’ या ब्राउजरची पहिली आवृत्ती प्रकाशित करण्यात आली.**१९८३:’सेंट किट्स आणि नेव्हिस’चा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश**१९०८:कॅनडातील ’युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टा’ ची स्थापना**१९०५:आधी एकत्र असलेल्या नॉर्वे व स्वीडन यांनी 'कार्लस्टॅड’ कराराद्वारे अलग होण्याचा निर्णय घेतला.**१८७३:महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.**१८४६:अर्बेन ली व्हेरिअर व त्याच्या २ सहकार्‍यांनी नेपच्यून ग्रहाचा शोध लावला. गणिती आकडेमोड करुन शोध लागलेला हा पहिला ग्रह आहे.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७९:रवींद्र सीताराम कानडजे --लेखक**१९७८: प्रवीण शेषराव वानखेडे-- कवी* *१९७१:अर्जुन तुकाराम ताकाटे -- लेखक* *१९६८:रवींद्र जवादे -- प्रसिद्ध कवी लेखक**१९६७:डॉ.सुजाता शेणई-- लेखिका, संपादिका* *१९६५:अलका कुबल(आठल्ये)-- मराठी-हिंदी चित्रपटांतून काम करणाऱ्या एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री**१९६४:विठ्ठल रामभाऊ कुलट-- प्रसिद्ध कवी, लेखक,संस्थापक अध्यक्ष,प्रतिभा साहित्य संघ* *१९५७:कूमार सानू– पार्श्वगायक**१९५६:प्रा.डॉ.ईसादास भडके -- कवी, लेखक* *१९५३: मुकुंद वामन कांत -- कवी* *१९५३:विवेक कृष्णाजी घळसासी-- सुप्रसिद्ध विचारवंत,वक्ते,कवी,लेखक,ज्येष्ठ निरुपणकार**१९५२:प्रा.डॉ.रोहिणी केतकर-- लेखिका संस्कृत विषयाच्या तज्ज्ञ* *१९५२:अंशुमान गायकवाड – क्रिकेटपटू**१९५०:डॉ.अभय बंग-- महाराष्ट्रातील सामाजिक आरोग्य क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व,लेखक**१९४३:तनुजा मुखर्जी, पूर्वाश्रमीची तनुजा समर्थ,तनुजा - चित्रपट अभिनेत्री**१९४३:रा.सू.बच्चेवार निवृत्त विशेष पोलिस महानिरीक्षक महा.रा. (मृत्यू:१७ एप्रिल २०२०)**१९४१:प्राचार्य योगानंद वासुदेव काळे-- प्रसिद्ध लेखक* *१९३५:प्रेम चोप्रा --हिंदी आणि पंजाबी चित्रपटांमधील प्रसिद्ध भारतीय अभिनेता* *१९३५: चित्रा हरी वझे-- लेखिका* *१९३४:चिंतामण शंकर जोशी-- कादंबरीकार कथाकार* *१९३३:रघुनाथ माधव पाटील(कवी आरेम)--कवी, लेखक* *१९२०:प्रा.भालचंद्र वामन तथा ’भालबा’ केळकर – लेखक व अभिनेते (मृत्यू:६ नोव्हेंबर १९८७)**१९१९:देवदत्त दाभोळकर – पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, शिक्षणतज्ञ, गांधीवादी व समाजवादी (मृत्यू: १७ डिसेंबर २०१०)**१९१८:पंढरीनाथ बलवंत रेगे – साहित्यिक, बाल / कुमार कथा लेखक(मृत्यू:१९९९)**१९१५:राजा मेहदी अली खान -- भारतीय कवी,लेखक आणि चित्रपट गीतकार(मृत्यू:२९ जुलै १९६६)**१९०८:रामधारी सिंह ’दिनकर’ – देशभक्त व हिन्दी साहित्यिक (मृत्यू:२४ एप्रिल १९७४)**१९०३:युसूफ मेहेर अली – समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक व मुंबईचे महापौर (मृत्यू: २ जुलै १९५०)**१९०३:शंकर धोंडो क्षीरसागर(मामा क्षीरसागर)-- संस्थापक,विचारवंत(मृत्यू:६ एप्रिल १९८१)**१८६१:रॉबर्ट बॉश – जर्मन अभियंते आणि उद्योजक (मृत्यू: १२ मार्च १९४२)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८कल्पना लाजमी--भारतीय चित्रपट दिग्दर्शक,निर्माता(जन्म:३१ मे १९५४)**२०१४:शंकर वैद्य -- प्रसिद्ध मराठी कवी आणि लेखक(जन्म:१५ जून १९२८)**२०१२:कांतिलाल गिरीधारीलाल व्होरा ऊर्फ के.लाल – जादूगार (जन्म:१९२४)**२००४:डॉ.राजा रामण्णा – शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे ४ थे अध्यक्ष (जन्म:२८ जानेवारी १९२५)**१९८७:राजेंद्र कृष्ण दुग्गल -- राजेंद्र कृष्णन म्हणून ओळखले जाणारे भारतीय कवी, गीतकार आणि पटकथा लेखक(जन्म:६ जून १९१९)**१९६४:भार्गवराम विठ्ठल तथा ’मामा’ वरेरकर – नाटककार (जन्म:२७ एप्रिल १८८३)**१९३९:सिग्मंड फ्रॉईड – ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ,आधुनिक मानसशास्त्राचा जनक (जन्म:६ मे १८५६)**१८८२:फ्रेडरिक वोहलर – जर्मन रसायनशास्त्रज्ञ (जन्म:३१ जुलै १८००)**१८७०:प्रॉस्पर मेरिमी – फ्रेंच कथालेखक, नाटककार,इतिहासकार आणि पुरातत्त्वज्ञ (जन्म: २८ सप्टेंबर १८०३)**१८५८:ग्रँट डफ – मराठ्यांचा इतिहास लिहीणारा ब्रिटिश अधिकारी (जन्म: ८ जुलै १७८९)*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नवरात्र विशेष *कोल्हापूरची अंबाबाई*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आई राजा उदो उदो, तुळजाभवानीची मूळ सिंहासनावर चल प्रतिष्ठापना; अंबाजोगाई, माहूर, वणी, कोल्हापुरात शारदीय नवरात्रोत्सव उत्साहात सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यात 20 नवे जिल्हे आणि 81 तालुके निर्मितीचा प्रस्ताव, महसूलमंत्र्यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार असल्याची घोषणा कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलीय. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *जागतिक पातळीवर सोन्याचा व चांदीचा नवा उच्चांक, चांदीत १४ वर्षातील सर्वाधिक वाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *बार्शीत ढगफुटी, 4 नद्यांना पूर, बळीराजाच्या डोळ्यात अश्रू; पीकांसह शेती पाण्यात, नेतेमंडळी शेतात*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अकरावी प्रवेशासाठी 25 सप्टेंबर पर्यंत विशेष फेरीचे आयोजन, शिक्षण संचालनालयची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशिया कप 2025 - सुपर फोर च्या दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा सहा विकेटने केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुरेश येवतीकर, सेवानिवृत्त बँक अधिकारी, नांदेड👤 रवींद्र जवादे , साहित्यिक, अकोला👤 कल्पना बोधने , शिक्षिका, बिलोली👤 संगीता क्षीरसागर , शिक्षिका, नाशिक👤 आडवोकेट विशाल मानवर , यवतमाळ👤 वीणा खानविलकर , पुणे👤 प्रदीप माळगे , धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 82*काश्मीरचा राजा**गोल गोल त्याचे अंग**आंबट गोड चवीचे**बाहेरून लाल रंग*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - फोटो फ्रेम ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्याप्रकारे प्रकाश अंधार नाहीसा करतो त्याप्रकारे विद्येच्या प्रकाशाने अज्ञानरूपी अंधार नष्ट होतो.- भगवान शंकराचार्य*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) नुकताच २०२३ सालचा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?२) 'पृथ्वीज्ञानराजाच्या' या शब्दात किती जोडाक्षरे आहेत ?३) 'आधारकार्ड'चे नोंदणीकरण कोणती संस्था करते ?४) आग लागली असता कोणत्या इमर्जन्सी नंबरशी संपर्क साधावा लागतो ?५) सूक्ष्मदर्शकाचा शोध प्रथम कोणी लावला ? *उत्तरे :-* १) मोहनलाल, मल्याळम अभिनेते २) तीन ३) UIDAI ४) १०१ ५) झकॅरियस जॉन्सन*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *गाईच्या दुधाचे महत्व..*दूध पिणे आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आजही कित्येक घरांमध्ये आई-वडील आपल्या मुलांच्या नाश्तामध्ये एक ग्लास दुधाचा सक्तीनं समावेश करतात. कारण मुलांचा मेंदू आणि हाडांची योग्य पद्धतीनं वाढ होण्यासाठी दुधातील पोषक घटक उपयुक्त आहेत. साधारणतः शहरी भागामध्ये लोक डेअरीतील दुधाचे सेवन करतात. तर काही जण आपल्या घराशेजारी असणाऱ्या गायीचा गोठ्यातील दूध किंवा दूध विक्रेत्याकडून दुधाची पिशवी विकत घेतात. हे दूध गाय किंवा म्हैशीचे असते. बहुतांश लोकांना गाईचे दूध पिणं अधिक पसंत असते. गायीच्या दुधामुळे आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात पोषक तत्त्वांचा पुरवठा होतो.गायीच्या दुधाचे फायदे१) गायीच्या दुधामुळे हृदय, मधुमेह, कर्करोग, टीबी, कॉलरासारखे आजार दूर राहतात.२) गायीचे दूध मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी फायदेशीर मानले जाते.३) गाईच्या दुधात आढळणारा पिवळा पदार्थ कॅरोटीन आहे, यामुळे डोळ्यांचा प्रकाश वाढतो.४) गायीच्या दुधाला गोडपणा आल्याने पित्त आणि वायूचा त्रासही दूर होतो. आणि गायीचं दूध सहज पचते.५) टीबीच्या रूग्णांना दररोज गायीचे दूध पिऊन फायदा होतो.६) मूत्राशयाशी संबंधित आजार असल्यास गायीच्या दुधात गूळ टाकून पिने फायद्याचे आहे.७) कच्च्या गायीच्या दुधाने चेह मसाज केल्याने त्वचा गोरे आणि चमकदार बनते.८) ​रोगप्रतिकारक शक्ती वाढते.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नको वाजवू श्री हरी मुरलीतुझ्या मुरलीने तहान भूक हरली रे ||धृ||घरी करीत होते मी कामधंदातेथे मी गडबडली रे || १ ||घागर घेवूनी पानियाशी जातादोही वर घागर पाजरली || २ ||एका जनार्दनी पूर्ण कृपेनेराधा गवळण घाबरली || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समाजात राहणाऱ्या प्रत्येक माणसाचे विचार वेगवेगळे असतात तसेच त्यांचे काम सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जसे,की निंदा करणे,लावालावी करणे, कटकारस्थान रचने व आपण मस्त पैकी मज्जा बघत राहणे ... पण, ते, जसे करतात तसे आपण कधीही करू नये. कारण इतरांचे वाईट केल्याने आपले कधीच भले होत नाही व स्वतः पेक्षा दुसऱ्यांचा विचार करून मदत केल्याने जो, समाधान आपल्याला मिळत असते त्याची किंमत कोणी मोजू शकत नाही म्हणून आपल्यात चांगले विचार ठेवून चांगलेच कार्य करण्याचा प्रयत्न करत रहावे .🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्वच्छतेसाठी मुकेशचे चित्र*मुकेश साधारण सहा-सात वर्षांचा असेल. त्याला चित्रकला आणि क्रिकेट खेळण्याची आवड आहे. मोकळ्या वेळात तो क्रिकेट खेळायचा आणि रंगरंगोटी करत असे. शाळेत कुठलीही चित्रकला स्पर्धा असली की त्यात तो प्रथम क्रमांक मिळवायचा. मुकेशच्या चित्रकलेचे शाळेतही कौतुक झाले. मुकेश जेव्हा कधी शाळेत जायचे तेव्हा त्याला वाटेत डस्टबिनमधून जावे लागत असे. लोक रुळांवर कचरा टाकायचे आणि भिंतीसमोर लघवीही करायचे, त्यामुळे प्रचंड दुर्गंधी येत होती. मुकेशला हे सर्व आवडले नाही. एकेकाळी पंतप्रधान सर्व विद्यार्थ्यांना स्वच्छता कार्यक्रमासाठी सहकार्य करण्यास सांगत होते. मुकेशला कल्पना आली, त्याने डस्टबीनजवळ जाऊन भिंतीवर बरीच पेंटिंग्ज काढली. ते पेंटिंग इतके सुंदर होते की तिथून जाणारा माणूस. त्या चित्रकलेचे कौतुक करायचे. हळू हळू लोकांनी तिथून कचरा फेकणे बंद केले आणि भिंतीवर इतके सुंदर पेंटिंग होते की आता तिथे उभे राहून कोणीही लघवी करत नव्हते. काही वेळातच मार्ग मोकळा झाला. मुकेशला आता शाळा आणि घर यांच्यामध्ये कोणतीही घाण दिसली नाही. हे पाहून त्याला खूप आनंद झाला.नैतिक – काहीतरी मोठं करून पार करण्याचं वय नसतं. तुमच्या प्रतिभेने समाजही बदलता येतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment