✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 24 सप्टेंबर 2025💠 वार - बुधवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/14JNEstB31K/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :- • १८७३: महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.• १९३२: पुणे करारावर महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पं. मदनमोहन मालवीय, बॅ. मुकुंदराव जयकर आदींच्या सह्या.• १९४८: होंडा मोटार कंपनीची स्थापना.• १९६०: अणुशक्तीवर चालणाऱ्या यू. एस. एस. एंटरप्राइझ या जगातील पहिल्या विमानवाहू नौकेचे जलावतरण झाले.• १९९५: मृत्यूंजय कादंबरीसाठी शिवाजी सावंत यांना भारतीय ज्ञानपीठ या संस्थेतर्फे मूर्तिदेवी पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच मराठी लेखक आहेत.• २००७: कर्णधार धोनीच्या नेतृवाखाली भारताने टी-२० विश्वकप जिंकला.🎂 जन्म :- • १५३४: शिखांचे ४ थे गुरू गुरू राम दास यांचा जन्म. (मृत्यू: १ सप्टेंबर १५८१)• १५५१: प्रचंड कवी दासो दिगंबर देशपांडे ऊर्फ दासोपंत यांचा जन्म. (मृत्यू: २८ जानेवारी १६१६)• १८६१: भारतीय क्रांतिकारक मॅडम भिकाजी रुस्तुम कामा यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट १९३६)• १८७०: नीऑन लाईट चे संशोधक जॉर्जेस क्लॉड यांचा जन्म. (मृत्यू: २३ मे १९६०)• १८८९: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते, नाट्यशिक्षक केशवराव त्र्यंबक दाते यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर १९७१ – मुंबई)• १८९८: प्राच्यविद्यापंडित अनंत सदाशिव अळतेकर यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९६०)• १९१५: चित्रपट व रंगभूमीवरील कलावंत प्रभाकर शंकर मुजूमदार यांचा जन्म.• १९२१: लेखक, समीक्षक व संपादक डॉ. सखाराम गंगाधर मालशे यांचा जन्म. (मृत्यू: ७ जून १९९२)• १९२२: सोबत साप्ताहिकाचे संस्थापक, संपादक व साहित्यिक गजानन वासुदेव तथा ग. वा. बेहेरे यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १९८९)• १९२४: अकाली दलाचे नेते आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष गुरू चरणसिंग तोहरा यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मार्च २००४)• १९२५: भारतीय विज्ञान आणि शैक्षणिक लेखक ऑटो सिंग पेंटल यांचा जन्म. (मृत्यू: २१ डिसेंबर २००४)• १९३६: भारतीय उद्योजिक शिवती आदितन यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल २०१३)• १९४०: इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतणपटू आरती साहा यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑगस्ट १९९४)• १९५०: क्रिकेटपटू आणि समालोचक मोहिंदर अमरनाथ यांचा जन्म.• १९६६: भारतीय आवाज अभिनेते राजेश खट्टर यांचा जन्म• १९५९: बांगलादेशी पत्रकार आणि सिनेमॅटोग्राफर मिशुक मुनीर यांचा जन्म (मृत्यू : १३ ऑगस्ट २०११)🌹 मृत्यू :-• १९९२: १३वे सरन्यायाधीश सर्वमित्र सिकरी यांचे निधन. (जन्म: २६ एप्रिल १९०८)• १९९८: बालरंगभूमीचे खंदे पुरस्कर्ते, दिग्दर्शक वासुदेव पाळंदे यांचे निधन.• २००२: लेखक, शब्दकोशकार व अनुवादक श्रीपाद जोशी यांचे निधन.• १९८१: भारतीय तत्त्वज्ञानी आणि कवी ब्रह्मारीश हुसैन शा यांचे निधन (जन्म: ९ सप्टेंबर १९०५)••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*देशेच्या सेवेसाठी माझे योगदान काय ?*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मराठवाड्यात अतिवृष्टीमुळं मोठं नुकसान ; 8 जणांचा मृत्यू,150 जनावरे दगावली, मालमत्तांचे नुकसान, 67 गावाचा संपर्क अद्याप तुटलेला, मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, राज्यात दि. २६ ते २८ सप्टेंबर यादरम्यान काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी दिली*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्व मिळून 2215 कोटी रुपयांची मदत केली जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *लवकरच योगप्रमाणे आयुर्वेद दिवस जगभरात साजरा केला जाईल - गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! पी एम उज्वला योजनेतून 25 लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नवी दिल्ली :- भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते श्यामची आई सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार अमृता अरुणराव यांना प्रदान करण्यात आला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी पूर्वी भारतीय अ संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर वैयक्तिक कारणामुळे बाहेर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 डॉ. तौफिक खान पठाण, धर्माबाद👤 सारंग दलाल, नांदेड 👤 विरेश भंडारे 👤 सतिश आरेवाड 👤 राजू यादव *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 83*मी आकाशात आहे**मी जमिनीत आहे**मी आत-बाहेर सर्वत्र आहे**माझे दुसरे नाव जीवन आहे**ओळखा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जी सौंदर्याला सजीव बनवते व भीषणतेला निर्जीव बनवते तीच खरी कला होय. - मैथिलीशरण गुप्त*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्रातील एकूण जिल्हे किती ?२) महाराष्ट्र राज्याचा नृत्य प्रकार कोणता ?३) महाराष्ट्र राज्याची राज्यभाषा / राजभाषा / मातृभाषा कोणती ?४) महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती ?५) महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांब नदी कोणती ? *उत्तरे :-* १) ३६ जिल्हे २) लावणी ३) मराठी ४) मुंबई ५) गोदावरी ( लांबी - १४६५ किमी )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌸 नवरात्र विशेष माहिती 🌸नवरात्र हा हिंदू धर्मातील अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे. ‘नऊ रात्र’ असा याचा अर्थ आहे. या नऊ दिवसांत आदिशक्ती दुर्गामातेच्या नऊ स्वरूपांची पूजा केली जाते.📜 नवरात्राचे महत्त्व - नवरात्र हा शक्तीची उपासना करण्याचा काळ आहे. या काळात भक्त देवीला प्रसन्न करण्यासाठी जप, ध्यान, व्रत, उपवास करतात. दुर्गामातेने महिषासुरासारख्या राक्षसांचा वध करून धर्माचे रक्षण केले, त्याची आठवण म्हणून हा उत्सव साजरा केला जातो. नवरात्र हे पवित्रता, संयम आणि साधना यांचे प्रतीक आहे.🙏 देवीचे नऊ रूपे (नवरात्रातील प्रत्येक दिवस)१. शैलपुत्री – पर्वतराज हिमालयाची कन्या२. ब्रह्मचारिणी – तपश्चर्येचे स्वरूप३. चंद्रघंटा – शौर्याचे प्रतीक४. कूष्मांडा – सृष्टीची अधिष्ठात्री५. स्कंदमाता – कार्तिकेयाची माता६. कात्यायनी – महिषासुरमर्दिनी७. कालरात्रि – भय नष्ट करणारी८. महागौरी – शांती व करुणेचे स्वरूप९. सिद्धिदात्री – सिद्धी व मोक्ष प्रदान करणारी🎉 नवरात्र साजरी करण्याची पद्धत - घटस्थापना करून देवीला आमंत्रित केले जाते.नवरात्र उपवास ठेवून साधना केली जाते.गावोगावी गरबा, दांडिया आणि भजन-कीर्तनाचे कार्यक्रम होतात.दहाव्या दिवशी विजयादशमी (दसरा) साजरा केला जातो, जो सत्प्रवृत्तीच्या विजयाचा दिवस मानला जातो.🌼 नवरात्रातील संदेशवाईटावर चांगल्याचा विजयस्त्रीशक्तीचे पूजन आणि सन्मानसत्प्रवृत्तीने जीवन जगणे*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••असा कसा गं बाईदेवाचा देव ठकडादेव एका पायाने लंगडा ||धृ||गवळ्या घरी जातो | दही दुध खातोकरी दहया दुधाचा रबडा ||१||शिंकेचि तोडीतो मडकेची फोडीतो |पाडी नवनिताचा सडा ||२||वाळवंटी जातो कीर्तन करितोलावी साधुसंतांचा झगडा ||३||एका जनार्दनी | भिक्षा वाढ मायीदेव एकनाथाचा बछडा ||४||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अनेकदा वादळ वारा येत असते. आणि नुकसान करून जाते. पण जे काही नुकसान झाले असते त्याला व्यवस्थितपणे करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. पण, अचानक जेव्हा जीवनात वादळ वारे न सांगता येतात तेव्हा मात्र तेच वादळ वारे जगणेच नकोसे करून टाकत असते अशा प्रसंगी एका चांगल्या व्यक्तीची गरज असते. कारण ती व्यक्ती त्या वादळातून बाहेर काढण्यासाठी मदत करत असते म्हणून अशा भयानक प्रसंगी चुकीचे पाऊल उचलू नये तर चांगल्या विचारी माणसाच्या सहवासात रहावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*माणसातील देव* *एका गावात एक चर्च होते. एक दिवस नदीला पूर आला. पाणी गावात गुडघ्यापर्यंत आले. चर्चच्या फादरना न्यायला एक जीप आली. माणसे म्हणाली, फादर चला. बहुतेक पाण्याने सगळे वाहून जाईल. फादर म्हणाले, 'मला माझा येशूच येऊन वाचवेल.' जीप निघून गेली. नंतर पाणी वाढल्यानंतर एक बोट आली. बोटीतील लोक फादरना न्यायला आले. फादरनी नकार दिला. पाणी इतके वाढले की फादरना चर्चच्या छप्परावर जावे लागले. मग एक हेलिकॉप्टर वरतून घिरट्या घालू लागले. त्यातून एक दोर आला. हेलिकॉप्टरमधले लोक म्हणाले, 'फादर आता तरी दोर पकडा आणि जीव वाचवा.' फादर म्हणाले, 'माझा येशूच मला येऊन वाचवेल.' यानंतर एकच मोठी लाट आली आणि फादर मृत्यमुखी पडले. स्वर्गात गेल्यावर त्यांनी येशूला विचारले, 'मी इतकी प्रार्थना केली, पण तू मला वाचवले नाहीस.' येशू म्हणाले, 'मी प्रथम जीप घेऊन आलो होतो. नंतर बोट आणि नंतर हेलिकॉप्टर. पण तूच मला काही ओळखले नाहीस.'**तात्पर्य :- देव काही प्रत्यक्ष येऊन मदत करत नाही. तो माणसातच शोधावा लागतो.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment