✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 30 सप्टेंबर 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~समूहात join होण्यासाठी Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9?mode=ems_copy_t••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :- • १९६१: दुलीप करंडकचा पहिला सामना मद्रास (चेन्नई) येथे खेळला गेला.• १९९३: किल्लारी ( लातूर ) भूकंपात सुमारे १०,००० लोक ठार, हजारो लोक बेघर.• १९९४: गीतकार मजरुह सुलतानपुरी यांनादादासाहेब फाळके पुरस्कार.• १९९८: डॉ. के. एन. गणेश यांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर.• २०००: ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना केमटेक फाउंंडेशनतर्फे हॉल ऑफ फेम हा विशेष पुरस्कार जाहीर.🎂 जन्म :- • १९००: न्यायाधीश, मुत्सद्दी आणि केंद्रीय मंत्री एम. सी. छागला यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९८१)• १९२२: चित्रपट दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑगस्ट २००६)• १९३४: भारतीय-अमेरिकन अभिनेत्री ऍन्ना काश्फी जन्म. (मृत्यू: १६ ऑगस्ट २०१५)• १९४१: ५वे राष्ट्रकुल सचिव सरचिटणीस कमलेश शर्मा यांचा जन्म.• १९६१: क्रिकेटपटू चंद्रकांत पंडित यांचा जन्म.• १९३३: संगीतकार व व्हायोलिनवादक प्रभाकर पंडित यांचा जन्म. (मृत्यू: २८ डिसेंबर २००६)• १९७२: पार्श्वगायक शंतनू मुखर्जी ऊर्फ शान यांचा जन्म.• १९३३: संगीतकार व व्हायोलिनवादक प्रभाकर पंडित यांचा जन्म (मृत्यू : २८ डिसेंबर २००६)🌹 मृत्यू :- • १९९२: लेखक व चरित्रकार गंगाधर खानोलकर यांचे निधन. (जन्म: १९ ऑगस्ट १९०३)• १९९८: भूदान चळवळीतील कार्यकर्त्या चंद्राताई किर्लोस्कर यांचे निधन.• २००१: केंद्रीय रेल्वे मंत्री, नागरी हवाई वाहतूक मंत्री माधवराव शिंदे यांचे निधन. (जन्म: १० मार्च १९४५ – मुंबई)• २०१४: भारतीय पाद्री आणि राजकारणी मोलिवि इफ्तिकार हुसैन अन्सारी यांचे निधन. (जन्म: २६ एप्रिल १९४३)••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आजची विचारधारा ....कपड्याना अत्तराने सुंगधित करता येते, त्यामुळे आपल्या अंगाचा वास येत नाही असा विचार करून आपण अधुनमधून वास घेत असतो. म्हणजे आपल्या मनात कुठे तरी शंका येत राहते.पण दूसरा एक व्यक्ती असतो ज्याच्या अंगावरचे कपडे सुंगधित तर नाहीत शिवाय खुप महागडे सुध्दा नाहीत तरी लोक त्यांच्या मागे धावतात कारण त्यांच्या कर्तबगारीचा सुगंध इतराना आकर्षित करीत असतो.आपल्या कामाचा सुगंध दूरवर पसरला की आपण आपल्याकडे कधीच पाहत नाही की, मी आज कोणता पोशाख घातला आहे. चांगले काम केल्याने आपले ही चांगले होते आणि इतरांचे देखील. - नासा येवतीकर धर्माबाद, 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! पूर स्थितीमुळे परीक्षा अर्ज भरण्यास 20 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *वेळप्रसंगी निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत करू, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे आश्वासन, नागपुरात पूरग्रस्त भागाची पाहणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *34 आगार प्रमुखांवर होणार कारवाई:परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश; मुख्यालयात हजर नसल्याचा ठपका*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुणे येथे 1,111 शंखवादकांचा विश्वविक्रम सोहळा, केशव शंखनाद पथकाद्वारे 5 ऑक्टोबर रोजी आयोजन, वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियामध्ये होणार नोंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *लाडक्या बहिणींना ई-केवायसीसाठी अडचणी, वेबसाइटच्या तांत्रिक बिघाडामुळे गैरसोय, महिलांमध्ये चिंतेचे वातावरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *कुलदीप आशिया कपचा टॉप विकेट टेकर, अभिषेकचे सर्वात जलद 50 सिक्स, यावर्षी 15 नवे विक्रम, भारताने नवव्यांदा आशिया कपचे विजेतेपद पटकावले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *महिला वनडे वर्ल्डकप आपासून सुरू होतोय, 34 दिवसांत 31 सामने; भारत यजमान, पण पाकिस्तानचे सामने श्रीलंकेत होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 प्रमोद रत्नाळीकर, उच्चश्रेणी पदोन्नत मुख्याध्यापक, किनवट 👤 अनुराग वानरे, अकोला 👤 विशाल जारे पाटील 👤 संतोष भालके👤 महेश घुगरे 👤 पोतन्ना डेबेकर 👤 आकाश आंबोरकर 👤 सचिन दमकोंडवार, नांदेड 👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 88*अंगावर बटनं आहेत पण शर्ट नाही**ओळखा पाहू मी कोण*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - नदी••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चिंता म्हणजे मानवी जीवनाला चढलेला गंज आहे. हा चिंतारुपी गंज मनुष्याच्या जीवनातील झळाळी नष्ट करतो व मनुष्याला दुर्बल बनवतो.- ट्रॉयन एडवर्डस*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'आंतरराष्ट्रीय भाषांतर दिवस' केव्हा साजरा केला जातो ?२) आशिया क्रिकेट चषक - २०२५ चा किताब कोणी जिंकला ?३) भारताचे 'स्टील मॅन' असे कोणाला म्हटले जाते ?४) केंद्रीय मंत्रिमंडळाचे नेतृत्व कोण करतात ?५) महाराष्ट्रात भक्ती पंथ कोणाच्या शिकवणीमुळे पसरला आहे ? *उत्तरे :-* १) ३० सप्टेंबर २) भारत ३) मार्शल आर्टिस्ट विस्की खराडी ४) पंतप्रधान ५) संत ज्ञानेश्वर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌺 *फुलं रंगीबेरंगी का असतात ?* 🌺अनेक झाडांची फुलं तर्हेतर्हेचे मनोहारी रंग धारण करतात. ते रंग बघायलाही आपल्याला आवडतं. अशा रंगेबिरंगी फुलांनी नटलेली आपली बाग सुंदर दिसते. कित्येक फुलांना अतिशय चांगला सुगंधही असतो. तोही आपला आनंद द्विगुणित करतो. तरीही आपल्या आनंदासाठी फुलांना रंग आणि सुगंध असतो, असं आपल्याला म्हणता येईल का ? कारण जिथं मानववस्ती नाही अशा ठिकाणच्या झाडांनाही रंगेबेरंगी व सुगंधी फुलं असतात. रानावनात वाढणाऱ्या झाडांची शोभाही अशा फुलांनी बहरून येते. याचा अर्थ निसर्गानं दुसऱ्याच कोणत्या तरी कारणांसाठी रंग आणि गंध बहाल केला असणार.ती कारणं समजून घेण्यासाठी फुलांचं मुख्य निसर्गदत्त काम काय असतं, याचा विचार करायला हवा. प्रत्येक सजीवाच्या अंगी आपलं पुनरुत्पादन करण्याची यंत्रणा असते. पुनरुत्पादनाशिवाय तो सजीव तगून राहू शकत नाही. एवढेच काय पण पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेशिवाय नवनव्या प्रजातींचा उगमही अशक्य झाला असता. त्यामुळे प्रत्येक सजीव पुनरुत्पादनाला अतिशय महत्त्व देतो. वनस्पतींच्या पुनरुत्पादनात फुलं कळीची भूमिका बजावतात.फुलांच्या अंतर्गत रचनेकडे लक्ष दिल्यास त्यातील दोन अवयव आपलं लक्ष वेधून घेतात. स्टॅमेन किंवा पुबीजांडातून पुंकेसर बाहेर पडतात. ते पिस्टिल किंवा स्त्रीबीजांडातील स्त्रीकेसरांवर पडले की त्यांच्या समागमातून पुढील पिढीची नांदी म्हटली जाते. पुंकेसर आणि स्त्रीकेसर यांचं मिलन होणं त्या वनस्पतीच्या पुनरुत्पादनासाठी आवश्यक असतं. कित्येक फुलांमध्ये हे मीलन स्वयंपूर्णरित्या होत असलं, तरी बहुतांश वनस्पतींच्या फुलांमध्ये या प्रक्रियेसाठी दुसर्या कोणीतरी मध्यस्थाच्या मदतीची आवश्यकता भासते. वारा ही कामगिरी पार पाडत असला तरी तो पूर्णांशाने हे काम करू शकत नाही. त्यासाठी मग पक्षी किंवा मधमाश्यांसारख्या कीटकांची गरज भासते. ते काम करावं म्हणून मग पक्षी आणि मधमाशा यांना उद्युक्त करणं जरुरीचं असतं. त्यांना काहीतरी मधाचं बोट लावल्याशिवाय ते तरी या कामगिरीसाठी का तयार व्हावेत ? मधमाशांना तर अक्षरश: मधाचं बोट लावलं जातं. फुलांमध्ये असलेला मधुरस शोषून घेऊन मधमाशा त्याचं मधात रूपांतर करतात. तरीही आपल्याकडे अशा मधुरसाचे कोण आहेत, हे मधमाश्यांना कळावं कसं ? त्यांना आपल्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी मग ही फुलं रंगीबेरंगी परिवेष धारण करतात. त्यातही मध्यस्थ कोण आहे यावर फुलांचा रंग निर्धारित केला जातो. मधमाशांना निळा रंग आवडतो, तर हमिंगबर्डसारख्या पक्ष्यांना लाल, गुलाबी किंवा जांभळ्या रंगांचं आकर्षण असतं. फुलपाखरं पिवळ्या, नारिंगी रंगांकडे ओढली जातात. काही फुलं दिवसाउजेडी फुलत असली तरी काही सूर्यास्तानंतरच फुलतात. त्या वेळी मग त्यांचा रंग पक्षांना वा कीटकांना दिसावा कसा ? त्यासाठी मग रंगांशिवाय या फुलांना सुगंधही दिला जातो. त्याच्या दरवळापायी मग हे फलनाला मदत करणारे मध्यस्थ त्याच्याकडे खेचून आणले जातात. त्यांना मधुरस मिळता मिळता त्यांच्याकडून पुंकेसराचा शिडकावा स्त्रीकेसरांवर होतो. पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेला चालना मिळते.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आई ग अंबे माते तुझा सोनियाचा झुबातुझ्या ग दर्शनाला राजा कोल्हापूरचा उभा || धृ ||कोल्हापूरचा राजा राजा फिरतो जत्रेतफिरतो जत्रेत फुले पडती पदरात… आई || १ ||आई ग अंबे माते केस सोनियाच्या ताराकेस सोनियाच्या तारा वैरी कापे थरथरा…. आई || २ ||ढोल वाले दादा ढोल वाजव जोरातढोल वाजव जोरात आई हसते गालात…. आई || ३ ||टाळ वाले दादा टाळ वाजव जोमानटाळ वाजव जोमान अंग भिजल घामान…. आई || ४ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकाला आपुलकी देण्यासाठी दुसऱ्याला नको त्या शब्दात विनाकारण बोलून त्याचा अपमान करणे हा माणुसकी धर्म नाही. कारण ज्याला आपुलकी देणाराही माणूसच असतो, ज्याचा अपमान होतो तोही माणूसच असतो आणि हे दोन्ही कर्म घडवून आणणाराही बोलता, चालता माणूसच असतो. म्हणून असे कोणतेही काम करू नये. ज्याच्यामुळे एखाद्या माणसाचे मन दुखावेल आणि उगाचच त्याच्या मनातून उतरण्याची आपल्यावर वेळ येईल. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *तृप्तता .....* प्राचीन काळी एका देशात एक राजा राज्य करत होता. त्याचा असा एक नियम होता की जोपर्यंत तो अगणित संन्याशांना दान करीत नाही तोपर्यंत तो भोजन ग्रहण करत नसे. एके दिवशी दानासाठी निश्र्चित केलेल्या वेळेच्याआधीच एक संन्याशीबुवा आपल्या हातात एक छोटेसे भिक्षापात्र घेऊन राजवाड्याच्या द्वाराशी हजर झाले. राजाला हे पाहून आश्र्चर्य वाटले. संन्याशाने राजाला पाहिले व तो म्हणाला, '' हे राजन, जर तुम्हाला शक्य असेल तर माझ्या या छोट्याशा भिक्षापात्रात काही ना काही दान टाका.'' राजाला त्याच्या बोलण्याचा रागही आला आणि आश्र्चर्यही वाटले. राग यासाठी की राजाला तो तुम्हाला शक्य नाही असे सुचवित होता आणि भिक्षापात्राचा आकार खूपच लहान होता याचे आश्र्चर्य वाटले. राजाने आपल्या सेवकांना आज्ञा केली की या भिक्षुकाचे लहानसे भिक्षापात्र आताच्या आता सोन्याच्या मोहोरांनी भरून टाकावे व सन्मानाने याचकाची बोळवणी करावी. सेवकांनी पहिल्यांदा ताट भरून सोन्याच्या मोहोरा आणल्या आणि भिक्षापात्रात टाकल्या पण भिक्षापात्र मात्र मोकळेच. परत परत सेवक ताटे भरून सोन्याच्या मोहोरा आणत होते पण भिक्षापात्रात मात्र जागा होतच होती. राजाला व सेवकांना हा प्रकार काही कळेना की हे निश्र्चित काय होते आहे की आपण टाकलेल्या मोहोरा जातात कुठे आणि हे लहानसे भिक्षापात्र अजूनही मोकळे कसे दिसते. शेवटी सोन्याच्या मोहोरा संपल्या, राजाचा खजिना रिता झाला तरी भिक्षापात्रात थोडी जागा शिल्लक होतीच. मग राजाला समजून चुकले की हा काही तरी दैवी प्रकार आहे. त्याने संन्याशापुढे लोटांगण घातले आणि माफी मागितली व म्हणाला,''हे साधूमहाराज, मला क्षमा करावी, मी संपत्ती व सत्तेच्या गर्वात तुम्हाला व तुमच्या भिक्षापात्राला लहान समजलो. मी दान करतो हा माझा गर्व आता पूर्णपणे नष्ट झाला आहे. पण या भिक्षापात्राचे रहस्य काय आहे हे कृपया मला सांगावे.'' संन्याशी उत्तरला,'' राजा, हे भिक्षापात्र म्हणजे आपल्या हृदयाचे प्रतिक आहे. या संसारातील कोणतीच वस्तू पूर्णपणे आपले हृदयात जागा बनवू शकत नाही. मनुष्याने कितीही नाव कमावले, शक्ति मिळविली, धन प्राप्ती केली, सौंदर्य पाहिले किंवा उपभोगले, सुख प्राप्त केले तरी हृदयातून कुठेतरी असे वाटत राहतेच की अजून मिळाले पाहिजे. पूर्ण तृप्तता कधीच मिळत नाही. फक्त ईश्र्वरी कृपेचा एक किरण आपल्या हृदयाला भरू शकतो पण मनुष्य तो मिळविण्याचा कधीच प्रयत्न करत नाही. तात्पर्य :-*तृप्तता हि खरी मानवाची गरज आहे पण ती मिळत नाही हे एक दुःख आहे.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment