✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 18 सप्टेंबर 2025💠 वार - गुरुवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://kathamaala.blogspot.com/2023/11/ek-tarikh.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :- • १९२४: गांधीजींचे हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी २१ दिवसांचे उपोषण सुरू.• १९२७: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना.• १९४८: निझामाच्या सैन्याने पराभव स्वीकारल्यामुळे ऑपरेशन पोलो स्थगित करण्यात आले.• १९९७: महाराष्ट्रात कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना.• १९९९: साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर.• २००२: दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.🎂 जन्म :- • १९०६: हिन्दी हास्यकवी प्रभूलाल गर्ग ऊर्फ काका हाथरसी यांचा जन्म. (मृत्यू: १८ सप्टेंबर १९९५ – हाथरस, उत्तर प्रदेश)• १९१२: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते व दिग्दर्शक राजा नेने यांचा जन्म. (मृत्यू: २१ फेब्रुवारी १९७५)• १९५०: भारतीय अभिनेते विष्णुवर्धन यांचा जन्म. (मृत्यू: ३० डिसेंबर २००९)• १९६८: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि राजकारणी उपेंद्र राव यांचा जन्म.• १९५६: भारतीय राजकारणी, महाराष्ट्राचे आमदार अनंत गाडगीळ यांचा जन्म🌹मृत्यू :- • १९९२: भारताचे सहावे उपराष्ट्रपती मुहम्मद हिदायतुल्लाह यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १९०५ – लखनौ, उत्तर प्रदेश)• १९९३: विनोदी अभिनेते व दिग्दर्शक असित सेन यांचे निधन.• १९९५: हिन्दी हास्यकवी, पद्मश्री प्रभूलाल गर्ग ऊर्फ काका हाथरसी यांचे निधन. (जन्म: १८ सप्टेंबर १९०६)• १९९९: मराठी चित्रपट दिग्दर्शक अरुण वासुदेव कर्नाटकी यांचे निधन.• २००२: साहित्यिक शिवाजी सावंत यांचे निधन. (जन्म: ३१ ऑगस्ट १९४०)• २००४: दलित साहित्याचे समीक्षक डॉ. भालचंद्र दिनकर फडके यांचे निधन.• २०१३: भारतीय राजकारणी वेलियाम भरगवण यांचे निधन.• २०२२: भारतीय अभिनेत्री रश्मी जयगोपाल यांचे निधन• २०२२: भारतीय अभिनेत्री निशी सिंग यांचे निधन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लघुकथा - एक तारीख*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ **•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *लोकल ट्रेनच्या तिकीटाच्या दरातच एसी लोकलचं तिकीट मिळणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मनोज जरांगे पाटलांनी दिला 'चलो दिल्ली'चा नारा, मराठा समाजाचे अधिवेशन राजधानीत घेण्याची केली घोषणा, लवकरच तारीख होणार जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यात 394 शहरांमध्ये 'नमो उद्यान' उभारण्याची उपमुख्यमंत्र्यांची घोषणा ; प्रत्येक बागेवर होणार एक कोटींचा खर्च*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *हरियाणा सरकारच्या लाडो लक्ष्मी योजनेत आतामहिलांना मिळणार 2100 ₹ आर्थिक मदत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने बीड ते अहिल्यानगर मार्गावर बीडमधून पहिली रेल्वे सेवेला प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *महिलांच्या वन डे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वात जलद शतक झळकवणारी स्मृती मानधना ठरली पहिली खेळाडू*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 किरण इंदू केंद्रे, संपादक, kishor 👤 सुदर्शन वाघमारे, पत्रकार, धर्माबाद 👤 सचिन महाजन, कोचिंग, टीचर, नांदेड 👤 योगेश सुधाकर मुक्कावार 👤 साईनाथ वाघमारे 👤 सुनील पाटील बोंबले 👤 रामकृष्णा काकाणी👤 देवेनरेड्डी गडमोड, सामाजिक कार्यकर्ते, येताळा 👤 योगेश शंकरोड *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 78*वीज गेली आठवण झाली**मोठी असो किंवा लहान**डोळ्यातून हिच्या गळते पाणी*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - हळद ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••महान बनवून महानतेच्या अहंकाराने एकाकी राहण्यापेक्षा मानव बनवून नम्रतापूर्वक मनुष्याचे दुःख दूर करण्याच्या सेवेमध्ये मनुष्य जीवनाची सार्थकता आहे. - टॉलस्टॉय*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत ?२) राज्यपालाला राज्यपालपदाची शपथ कोण देतात ?३) वटवाघुळ कोणत्या ऊर्जेचा वापर करून मार्ग शोधतो ?४) कोणत्या भारतीय क्रिकेटपटूची ऑगस्ट महिन्याचा आयसीसीच्या सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड झाली ?५) पदार्थ स्थायू अवस्थेतून वायू अवस्थेत रूपांतरीत होण्याला काय म्हणतात ? *उत्तरे :-* १) आचार्य देवव्रत २) मुख्य न्यायाधीश, उच्च न्यायालय ३) ध्वनी ४) मोहम्मद सिराज, वेगवान गोलंदाज ५) संप्लवन ( उदा. कापूर )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *स्त्रियांना दाढी का नसते ?* 📙 प्राचीन इजिप्तमध्ये हातशेपसुत नावाची एक राणी होती. ती हनुवटीवर एक खोटी दाढी लावून वावरत असे. आपलं स्त्रीत्व लपवण्यासाठी तिनं हा खटाटोप केला होता. कारण राजगादीवर पुरुष वारसांनीच बसावं, असा प्रघात होता. त्यामुळे तिच्या गादिवरच्या हक्काला सहजासहजी मान्यता मिळणार नव्हती. तेव्हा आपणही पुरुष आहोत असं दाखवण्यासाठी तीनं या खोट्या दाढिचा आधार घेतला होता. तसा तिनं करावं याचं राजकीय कारण जरी स्पष्ट झालं असलं तरी तिला किंवा एकंदरीतच स्त्रियांना दाढी का नसते, हा प्रश्न उरतोच. पुरुषांनाही दाढी वयात आल्यानंतरच येते. त्यामुळे या नैसर्गिक आविष्कारात वयात येताना सर्वांच्याच शरीरात जो संप्रेरकांच्या पाझराचा खेळ सुरू होतो त्याचा सहभाग असावा, हे निश्चित. जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा त्याच्या अंगावर लव असते. काहींच्या अंगावर तशी ती जास्तच असते. अशा केसाळ मुलाच्या अंगावरची लव घालवण्यासाठी आई आणि दाई त्याला अंघोळ घालताना हळदीचा लेप चोळत असतात. वास्तविक त्याची काहीच गरज नसते. कारण मूल मोठं होत जातं तशी ही लव हळूहळू नाहीशी होत जाते.तिच्यात मोठा फरक होतो तो ते मूल वयात येताना. त्या वेळी त्या मुलाच्या लिंगानुसार वेगवेगळ्या लैंगिक संप्रेरकांचा पाझर मोठ्या प्रमाणावर सुरू होतो. मुलींच्या शरीरात स्त्रैण संप्रेरकांचा स्त्राव सुरू होतो. त्यांच्या प्रभावाखाली शारीरिक तसंच शरीरक्रियाविषयक गुणधर्मांमध्ये मोठे बदल घडून येतात. स्त्रियांच्या शरीराला गोलाई येते. स्तनांची वाढ होऊ लागते. जननेंद्रियांचीही वाढ होते. मासिक पाळी सुरू होते. या सर्वांबरोबरच अंगावरची लव कमी कमी होऊ लागते आणि डोक्यावरच्या केसांची वाढ सुरू होते. चेहऱ्यावरच्या केसांच्या वाढीलाही विरोध होतो. त्यांची वाढ दाबली जाते. अर्थात काहीजणींच्या बाबतीत ही प्रक्रिया संपूर्णपणे सुरळीत पार पडत नाही. त्यामुळे काही मुलींच्या हनुवटीवर थोडेफार केस दिसू लागतात; पण त्यांचा बंदोबस्त करणं सहज शक्य असतं. मुलांच्या शरीरात याच वेळी पुरुषी संप्रेरकांच्या स्त्रावाला सुरुवात होते. त्यांच्या प्रभावापोटी त्यांच्याही शारीरिक आणि शरीरक्रियाविषयक गुणधर्मांमध्ये बदल होतात. जननेंद्रियांची वाढ होते. छाती रुंदावते, भरदार होऊ लागते. उंचीतही वाढ होते. आवाज फुटतो. त्याचबरोबर मिसरूडं आणि दाढीही फुटते. कारण त्या संप्रेरकांच्या स्त्रावापोटी अंगावरची लव केसांमध्ये बदलते. चेहऱ्यावरच्या केसांचीही वाढ होऊ लागते. डोक्यावरच्या केसांची वाढ मात्र मंदावते. ती अति मंदावली तर मग टक्कलही पडतं. त्या मंदावण्याच्या वेगावर टक्कल केव्हा पडेल हे ठरतं. काही जणांना लहान वयातच ते पडतं, तर काही जण सत्तरीतही केसांचा फुगा पाडू शकतात.स्त्री आणि पुरुष यांच्या शारीरिक आणि शरीरक्रियाविषयक गुणधर्मांमध्ये निसर्गानं जे काही फरक केले आहेत त्यांच्या परिपाकापोटी स्त्रियांना दाढी येत नाही, तर पुरुषांनाच टक्कल पडतं.*बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कृपाळू हा पंढरीनाथवडिलांचे दैवत | माझ्या वडिलांचे दैवत | माझ्या वडिलांचे दैवत || धृ ||पंढरीसी जावू चलाभेटू रखुमाई विठ्ठला || १ ||पुंडलिके बरवे केलेकैसे भक्तीने गोविले || २ ||एका जनार्दनी नीटपायी जडलीसे विट || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कागद आणि पेनीचे नाते हे जगावेगळ असते त्यांच्या आधाराने कितीही लिहिले तरी ते, दोघे कधीच कंटाळत नाही हीच त्यांच्यातील खरी महानता आणि त्याग असते. म्हणून या दोघांकडे बघून माणसाने जगण्याचा प्रयत्न केले पाहिजे. ते, दोघेही एकदाचे संपून जातात मात्र त्यांचे मोलाचे योगदान, सहनशीलता अनेक पिढ्यांना मार्गदर्शक बनून नव्याने जगायला प्रेरणा देत असतात. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 📗 *गाणारा पोपट*📗 ━━━━━━━━━━━━━━*एकदा एका फकिराने बादशाहाला एक पोपट भेट दिला. पोपट चांगल्या गाणाऱ्या जातीचा होता. बादशाहाने पोपटा कडून पुराणातील काही महत्वाचा भाग, उर्दू कविता आणि काही सुंदर वाक्य पाठ करवून घेतली होती. पोपटाच्या सेवेसाठी खास एका सेवकाची नेमणूक केली होती. पोपट सोनेरी पिंजऱ्यातल्या झोक्यावर झोके घेत असलेला पाहून बादशाहाला खूप आनंद होई. त्याच्या कडून उर्दू कविता ऐकण्यात बादशाहाला काही वेगळीच मजा वाटे. पोपट बादशाहाचा अतिशय आवडता होता. पोपटाला काही दुखले खुपलेले किंवा त्याच्या सेवेत काही कमी पडलेले बादशाहाला मुळीच आवडत नसे. लगेच तो सेवकाला दम भरीत असे.* *एका दिवसाची गोष्ट सेवक बादशहाला पोपटाची प्रकृती बरी नसल्या बद्दल सांगू लागला. बोलणे पूर्ण होण्याच्या आत त्याच्या मुस्काटीत भडकावली आणि तो म्हणाला " हे बघ पोपटाची देखभाल करण्यासाठी मी तुला नेमले आहे. पोपटाला काही होता काम नये पोपट मेला असे सांगण्यासाठी आला तर मी तुझे डोके उडवू टाकेल ...समजल ! ".* *सेवक घाबरला. तो पोपटाची चांगली काळजी घेऊ लागला परंतु पोपटाला काही न काही होत असे. सेवक मात्र घाबरून जाई. असेच दिवस जात होते एक दिवस पोपट आजारी पडला आणि त्याच्या घशातून आवाज निघेना. त्याने आपले पंख शरीर भोवती लाप्तून घेतले त्याची चोच वाकडी झाली. सेवक त्याला औषधे देत होता. तरी पण पोपट बरा होत नव्हता बादशाहाही आपल्या काही महत्वाच्या कामात मग्न होता. त्याचे पोपटाकडे लक्ष नाही बघता बघता पोपट पिंजऱ्यात उताणा पडला. त्याने आपले पंख ताणून पसरले. कच उघडली गेली. पोपट मेला असल्याचे सेवकाच्या लक्षात आले. परंतु पण राजाला हे सांगणे शक्यच नव्हते. सेवक घाबरला त्याने बिरबलाची भेट घेऊन सर्व हकिकत सांगितली. बिरबलाने सेवकाला धीर दिला. त्याने स्वत: पोपटाची परिस्थिती पाहिली.* *सेवकाच्या पाठीवर थोपटून तो म्हणाला ठीक आहे. मी बघतो सगळ तू घाबरू नकोस बिरबल बादशहाकडे आला आणि म्हणाला सरकार आपला गुणी पोपट अलीकडे गुणी झाला आहे. पहावा तेव्हा परमेश्वराचे ध्यान करत असतो. अहो आज तर केव्हापासून तो परमेश्वरच्या चिंतनात मग्न आहे चला आपण तरी एकदा बादशहा बिरबला समोर पोपटाच्या पिंजऱ्याजवळ आला पाहतो तर काय पोपट मरून पडलेला तो बिरबलाकडे वळून म्हणाला बिरबल तू तरी किती मूर्ख आहे अरे हा पोपट तर मरून पडला आहे नाही सरकार पोपट मेलेला नाही परमेश्वरच्या चिंतन करता करता त्याचा आत्मा परमेश्वराकडे कायमचा निघून गेला सेवकाला त्याला झाडाच्या बुंध्याशी पुरून गाढायला सांगा म्हणजे त्याच्या आत्मेला शांती भेटेल. बादशहाला बिरबलाची युक्ती लक्षात आली पोपट मेल असं सांगायला आलास तर तुझं डोक उडवीन असं सेवकाजवळ बोलल्याच त्याला आठवलं बिरबलान युक्तीने सेवकाचे प्राण वाचविले. बादशहा गालातल्या गालात हसला आणि बिरबल बरोबर निघून गेला.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment