✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04 सप्टेंबर 2025💠 वार - गुरुवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - शिक्षक दिन विशेष https://nasayeotikar.blogspot.com/2025/09/teachers-day-special.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :- • १८८२: थॉमस एडिसन यांनी इतिहासातील पहिल्या व्यावसायिक विद्युत ऊर्जा प्रकल्प चालु केले वीजयुगाची सुरुवात म्हणून हा दिवस ओळखला जातो.• १८८८: जॉर्ज इस्टमन याने कोडॅक फिल्म कॅमेऱ्याचे पेटंट घेतले.• १९०९: लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या स्काऊटचा पहिला मेळावा झाला.• १९३७: प्रभातच्या संत तुकाराम या चित्रपटाची जगातल्या तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणून निवड झाली.• १९७२: मार्क स्पिटझ हा एकाच ऑलिम्पक स्पर्धेत ७ सुवर्णपदके मिळवणारा पहिला खेळाडू बनला.• १९९८: स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लॅरी पेज व सर्गेइ ब्रिन या दोन विद्यार्थ्यांनी गुगलची स्थापना केली.• २००१: हेवलेट पॅकर्ड या कंपनीने संगणक क्षेत्रातील कॉम्पॅक कॉर्पोरेशन ही बलाढ्य कंपनी २५ अब्ज डॉलर्सला विकत घेतली.• २०१३: रघुराम राजन यांनी रिझर्व्हबँक ऑफ इंडियाचे २३वे गव्हर्नर म्हणून पदभार हाती घेतला.🎂 जन्म :-• १२२१: महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी • १८२५: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय पितामह दादाभाई नौरोजी • १९०१: जॅग्वोर कार चे सहसंस्थापक विल्यम लियन्स जॅग्वोर • १९०५: मिनॉक्स चे शोधक वॉल्टर झाप • १९१३: प्रशासक व मुत्सद्दी, पंतप्रधानांचे मुख्य सचिव पी. एन. हक्सर • १९२३: भारतीय वकील आणि राजकारणी राम किशोर शुक्ला • १९३७: साहित्यिक व समीक्षक शंकर सारडा • १९४१: केंद्रीय गृहमंत्री व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे • १९५२: अभिनेता ऋषी कपूर• १९६२: यष्टीरक्षक किरण मोरे • १९६४: भारतीय गायक-गीतकार आदेश श्रीवास्तव • १९७१: दक्षिण अफ्रिकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू लान्स क्लूसनर यांचा जन्म.🌹 मृत्यू :- • १९९७: हिन्दी लेखक, कवी, नाटककार, पत्रकार व धर्मयुग साप्ताहिकाचे २७ वर्षे संपादक डॉ. धर्मवीर भारती • २०००: खळाळून हसवणारे विनोदी कलाकार मोहम्मद उमर मुक्री• २०१२: भारतीय लेखक सय्यद मुस्तफा सिराज • २०१२: भारतीय गायक-गीतकार हांक सूफी • २०१५: भारतीय सर्जन आणि राजकारणी विल्फ्रेड डी डिसोझा • २०२२: भारतीय व्यापारी, उद्योगपती सायरस पालोनजी मिस्त्री • २०२२: भारतीय रंगमंच अभिनेते रामचंद्रन मोकेरी • २०२२: भारतीय राजकारणी, उत्तर प्रदेशचे आमदार राम नरेश रावत••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस 05 सप्टेंबर संपूर्ण भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने काही खास कथा, लेख, कविता, ई बुक आणि भाषण वाचण्यासाठी वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पाक-अफगाण-बांगलादेशातून 2024 पर्यंत आलेले अल्पसंख्याक भारतात राहू शकतील, यापूर्वी 2014 पर्यंत आलेल्यांना परवानगी होती, CAA अंतर्गत केंद्राचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मराठा आरक्षणाचा निर्णय होताच ओबीसींसाठीही मंत्रिमंडळ उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष तर छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मनोज जरांगेंची प्रकृती स्थिर, पुढील काही दिवस त्यांना वैद्यकीय देखरेखेखाली ठेवणार; उपोषण सोडल्यानंतर छत्रपती संभाजीनगरात उपचार सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *गृह विभागात खात्यांतर्गत PSI होण्याचा मार्ग मोकळा, फौजदार पदासाठी 25 टक्के आरक्षणासह विभागीय परीक्षा पुन्हा सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *लंडनमध्ये मराठी भाषिकांसाठी एक महत्त्वाचे केंद्र उभारण्याचा निर्णय - उदय सामंत यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मेट्रो प्रकल्प, लोकल ट्रेन, विमानतळ विकासाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला 7 विकेटने हरविले, एडन मार्करमचा नवा विक्रम, 23 चेंडूत केले अर्धशतक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सायारेड्डी सामोड, मा. शिक्षक, शारदा विद्यालय, धानोरा बु. ता. उमरी जि. नांदेड 👤 संगमेश्वर नळगिरे, सहशिक्षक, नांदेड 👤 प्रा. मुकेश धर्मले, नांदेड 👤 सुनील अस्वले, पदवीधर शिक्षक, कोल्हापूर 👤 संतोष पेंडकर, सहशिक्षक, धर्माबाद 👤 विशाल गंगुलवार 👤 मुकेश पाटील *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 66*लुक लुक करतो रात्रीला**गायब होतो दिवसाला**लाखो मैलांचा माझा प्रवास**निर्माण करतो स्वतः प्रकाश*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - बी / बियाणे••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भाषा ही मनुष्याच्या मनोवृत्तीचा व हृदयवृतीचा उदगार होय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ६७ वा रॅमन मॅगसेसे पुरस्काराने भारतातील कोणत्या संस्थेला सन्मानित करण्यात येणार आहे ?२) SCO ची बैठक नुकतीच कोणत्या देशात झाली ?३) आशिया खंडाचा सर्वोच्च सन्मान कोणता ?४) 'हिंडून करायचा पहारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) २०२१ मध्ये केंद्र सरकारने 'राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार' याचे नामकरण कोणत्या नावाने केले ? *उत्तरे :-* १) एज्युकेट गर्ल्स, स्वयंसेवी संस्था, भारत २) तियानजिन, चीन ३) रॅमन मॅगसेसे पुरस्कार ४) गस्त ५) मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••लेण्याद्री गणपती ज्यांना 'गिरिजात्मज' गणपती असेही म्हणतात, हे अष्टविनायकांपैकी एक आहेत आणि ते महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळ डोंगरावर वसलेल्या एका लेण्यांमध्ये कोरलेले आहेत. या मंदिरात, मध्ययुगीन काळात दोन निवासकक्ष एकत्र करून भिंतीमध्ये गणपतीची मूर्ती कोरण्यात आली होती. हा गणपती गिरिजात्मज (गिरीजाचा आत्माज) म्हणून ओळखला जातो, कारण तो पर्वतावर (लेण्यांमध्ये) जन्मलेला आहे, असे मानले जाते. • लेण्याद्री गणपतीची वैशिष्ट्ये :लेण्याद्री गणपती हा महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी एक असून, त्यांचे दर्शन घेणे हे एक पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते. हे गणपती मंदिर एका डोंगरामध्ये कोरलेल्या लेण्यांमध्ये आहे. लेण्यांमध्ये एक गणपती कोरलेला असल्यामुळे या स्थळाला लेण्याद्री असे नाव पडले. 'गिरिजात्मज' या नावाने हा गणपती प्रसिद्ध आहे, ज्याचा अर्थ "पर्वतावर जन्मलेला" किंवा "गिरीजाचा पुत्र" असा होतो. या मंदिरातील मूर्ती मध्ययुगातील १७व्या शतकात कोरलेली असून, दोन निवासकक्ष एकत्र करून भिंतीत गणपतीचा आकार देण्यात आला आहे. अष्टविनायकांमधील सर्व देवतांप्रमाणेच लेण्याद्री गणपतीसुद्धा जागृत मानले जातात, म्हणजेच ते भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात. *संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *श्री गणेश गाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सभा रंगणी गण-गौवरी चा |नाचत नाचत आला,आला हो वरद विनायक आला || धृ ||प्रथम नमोया विघ्नराया |मंगल मूर्ती या यश द्याया |कार्यारंभी वंदू कृपाळा || १ ||सकल गुणांचा शास्त्र कलांचा |खेळ मांडीला शुभशकूलांचा |श्रुत वर्ग हा तल्लीन झाला || २ ||तू सुखकर्ता – तू दुखहर्ता |तूच करता आणि करवितामोरया मोरया मंगलमूर्ती मोरयामोरया मोरया गणपती बाप्पा मोरयामोरया मोरया मयुरेश्वर मोरयामोरया मोरया भालचंद्र मोरयामोरया मोरया एकदंत मोरयामोरया मोरया गजानन मोरयामोरया मोरया बल्लाळेश्वर मोरयामोरया मोरया वरदविनायक मोरयामोरया मोरया चिंतामणी मोरयामोरया मोरया गिरिजात्मज मोरयामोरया मोरया विघ्नेश्वर मोरयामोरया मोरया अष्टविनायक मोरयामोरया मोरया लंबोदर मोरयामोरया मोरया महागणपती मोरयामोरया मोरया सिद्धिविनायक मोरयामोरया मोरया वक्रतुंड मोरया || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या व्यक्तीची व त्याच्या मागे निंदा करण्याची आपल्यात आवड असेल तर एखाद्या गुणवान व्यक्तीची त्याच्यासमोरच स्तुती करण्याची आवड ठेवावी. जर अशी स्तुती करण्याची वारंवार आपल्यात आवड निर्माण झाली तर आपले मान ही वाढेल व एक चांगली व्यक्ती म्हणून आपल्याकडे बघितले जाईल. या प्रकारचे मान कमविण्यासाठी आपल्यातही तसे गुण असावे लागते. तेव्हाच असे विचार आपल्या मनात येतात. कारण निंदा ही कधीही मागे केली जाते. अन् स्तुती समोरच केली जाते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मातेचा उपदेश**एका बाईला एक मुलगा व एक मुलगी होती. देवाने मुलाला रूप, तर मुलीला गुण दिले होते. आईचे दोन्ही मुलांवर खूप प्रेम होते. एकदा भाऊ आरशासमोर उभा राहून गर्वाने आपल्या बहिणीला म्हणाला, "ताई गं मी बघ किती सुंदर, नाही तर तू!' भावाचे हे बोलणे बहिणीच्या मनाला लागले. ती आपल्या आईकडे गेली व भावाची तक्रार केली. यावर आईने दोघांनाही जवळ बोलावले, प्रेमाने समजूत काढली. आई पहिल्यांदा मुलाला म्हणाली, अरे बाळा, नुसते रूप काय कामाचे? नुसत्या रूपाला या जगात किंमत नाही. तेव्हा तू जसा दिसायला सुंदर आहेस, तसा गुणानेही सुंदर हो' त्यानंतर आई आपल्या मुलीला म्हणाली, हे बघ बाळे, तू गुणी तर आहेसच. देवाने तुला रूप दिले नाही म्हणून वाईट वाटू नकोस. छान नीटनेटकी रहा, सर्वांशी इतकी चांगली वाग की तुझ्या रूपाकडे कुणाचेच लक्ष जाणार नाही.**तात्पर्य :- जगात पुढे जाण्यासाठी नुसते चांगले रूप असून चालत नाही, तर त्याला सद्गुणांची जोड द्यावी लागते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment