✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 16 सप्टेंबर 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2022_09_11_archive.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :- • १९३५: इंडियन कंपनीज अॅक्ट अन्वये बँक ऑफ महाराष्ट्रची नोंदणी.• १९६३: झेरॉक्स ९१४ या प्रतिमुद्रक यंत्राचे पहिले प्रात्यक्षिक.• १९९७: आय. टी. सी. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राजीव बालकृष्णनचा १०० मीटर धावण्याचा १०.५० सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम.• १९९७: निवृत्त शिक्षक पं. गुलाम दस्तगीर अब्बास अली बिराजदार यांना राष्ट्रीय संस्कृत पंडित हा पुरस्कार जाहीर.• १९५९: झेरॉक्स ९१४, या पहिल्या झेरॉक्स मशीनचे प्रात्यक्षिक, न्यू यॉर्क अमेरिका येथे देण्यात आले.🎂 जन्म :- • १८५३: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन डॉक्टर आल्ब्रेख्त कॉसेल यांचा जन्म.• १९०७: जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक वामनराव सडोलीकर यांचा जन्म. (मृत्यू: २५ मार्च १९९१)• १९१३: रुचिरा या पुस्तकाच्या लेखिका कमलाबाई ओगले यांचा जन्म. (मृत्यू: २० एप्रिल १९९९)• १९१६: विख्यात शास्त्रीय गायिका एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर २००४)• १९२३: सिंगापूरचे पहिले पंतप्रधान ली कुआन यी यांचा जन्म. (मृत्यू: २३ मार्च २०१५)• १९२५: आयर्लंडचे पंतप्रधान चार्ल्स हॉगे यांचा जन्म.• १९४२: निसर्ग कवी व प्रयोगशील शेतकरी ना. धों महानोर यांचा जन्म.• १९५४: सतारवादक संजय बंदोपाध्याय यांचा जन्म.• १९५६: अमेरिकन जादूगार डेव्हिड कॉपरफिल्ड यांचा जन्म.• १९३०: भारतीय शास्त्रीय गायक - पद्मश्री विजय किचलू यांचा जन्म (मृत्यू : १७ फेब्रुवारी २०२३)• १९१६: भारतीय उद्योगपती, गोगटे कंपनीचे संस्थापक रावसाहेब गोगटे यांचा जन्म (मृत्यू : २६ फेब्रुवारी २०००)🌹 मृत्यू :- • १९३२: हिवतापाच्या जंतुंचा शोध लावल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे शास्त्रज्ञ सर रोनाल्ड रॉस यांचे निधन. • १९७३: पर्वती संस्थानचे विश्वस्त, संगीतज्ञ, इतिहासाचे अभ्यासक गंगाधरराव नारायणराव तथा आबासाहेब मुजुमदार यांचे निधन.• १९७७: हिंदूस्तानी शास्त्रीय गायिका केसरबाई केरकर यांचे निधन. (जन्म: १३ जुलै १८९२)• १९९४: साहित्यिक, नाटककार व पत्रकार जयवंत दळवी यांचे निधन. (जन्म: १४ ऑगस्ट १९२५)• २०२२: भारतीय चित्रपट निर्माते आणि पटकथा लेखक के.डी. शोरे यांचे निधन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *कोलकाता येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संयुक्त कमांडर्स परिषदेचे उद्घाटन, एका महिन्यात दुसरा बंगाल दौरा; परिषदेत राष्ट्रीय सुरक्षेवर चर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे अजित पवारांकडून गिफ्ट, बीड जिल्ह्यातील रेल्वे प्रकल्पासाठी 150 कोटींची भर, 17 सप्टेंबरपासून बीड-नगर रेल्वेसेवा होणार सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *१ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, IRCTC शी आधार link असणाऱ्या प्रवाश्याना होणार मोठा फायदा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्या. ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने हंगामी निर्णय दिला*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात विशेष कार्यक्रम, पुण्यात बुधवारी होणारा एक हजार ड्रोन लाईट शो, पावसामुळे एक दिवस पुढे ढकलला*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरू; शेवटची तारीख ३ ऑक्टोबर, परीक्षा २३ नोव्हेंबरला*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कवी वीरा राठोड यांच्या 'ब्लेस अस ऑल' कविता संग्रहाचे प्रकाशन, कुमार केतकर यांच्या हस्ते प्रकाशन, म्हणाले- कविता जगातल्या सर्व दुःखाशी नाळ जोडणारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 पंकजकुमार पालीवाल, शिक्षक, शहापूर 👤 शेख अहमद, मुख्याध्यापक, धर्माबाद 👤 पंकज दमकोंडवार, नांदेड 👤 गणेश सोळुंके, साहित्यिक, जालना 👤 प्रसाद मुत्यनवाड👤 लक्ष्मणराव भवरे 👤 👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 76*लाल लाल पोशाख माझा**गोलमटोल हा आकार**भाजीपासून सॉसपर्यंत**मी करतो सगळ्यांना भार**ओळखा पाहू कोण आहे मी ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - डस्टर••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनाचा साक्षात्कार स्वप्नाळू कल्पनेने कधीच होत नाही, जीवनाचे साफल्य नुसत्या गोड आभासात नाही, ते आलेल्या अनुभवात आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'ओझोन संरक्षण दिवस' केव्हा साजरा केला जातो ?२) ९९ वे मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित होणार आहे ?३) रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय संस्था कोणती ठरली आहे ?४) कोणत्या ठिकाणी देशातील पहिला खासदार क्रीडा महोत्सव होणार आहे ?५) वनस्पती कोणत्या वायूच्या सहाय्याने अन्न तयार करतात ? *उत्तरे :-* १) १६ सप्टेंबर २) सातारा ३) एज्युकेट गर्ल्स ४) पुणे ५) कार्बन डाय-ऑक्साइड*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *मेहंदीने हात कसे रंगतात ?* 📙 मुलीचे हात पिवळे केले की सुटलो. असं पूर्वीचे वधुपिते म्हणत असत. कारण पारंपारिकरित्या लग्नाच्या आधी नवऱ्या मुलीला आणि मुलालाही हळद लावून स्नान घालण्याचा प्रघात आहे. अजूनही तो चालू आहे. पण आजकालच्या लग्नात नवर्या मुलीचे आणि तिच्या बरोबर इतर महिलांचेही हातपाय मेहंदीने रंगून काढण्याची प्रथा वाढीला आलेली आहे. अनेक बारीक बारीक नक्षीदार मेहंदींनं हात पावलं आणि कपाळ किंवा गालही रंगवण्यासाठी खास कलाकारांना आमंत्रण दिलं जातं. या मेंदीचा लालसर रंग गोऱ्या आणि सावळ्याही कातडीवर खुलून दिसतो. पण ही किमया नेमकी साध्य होते कशी?लाॅसोनिया इनर्मिस या वैज्ञानिक नावांनं ओळखल्या जाणाऱ्या झुडपांची पानं यासाठी वापरली जातात. मध्यपूर्वेत याला हिना म्हणतात आणि भारत उपखंड वगळल्यास इतरत्र हेच नाव जास्त प्रचलित आहे. ही पानं इतर पत्री सारखी हिरवी असली तरी त्यांच्यामध्ये लाॅसोनिया या नावाचं लाल शेंदरी रंगाचं रंगद्रव्य असतं. नेपाळच्या जातकुळीतला या रसायनाचा रेणू अमिनो आम्लापेक्षा थोडासा मोठा आणि ग्लुकोज सारख्या प्राथमिक शर्करेच्या रेणूपेक्षा थोडासा लहान असतो.मेहंदीच्या झुडपांच्याही वेगवेगळ्या जाती आहेत. प्रत्येक जातीतील रंगद्रव्यात थोडाफार फरक असल्याने त्या रंगांचा छटेमध्येही फरक आढळतो. सामान्यत: हा रंग लाल नारिंगी असला तरी बुर्गुडी मद्दयासारखा दालचिनी सारखा तपकिरी, काळसर चॉकलेटी चेरी सारखा गडद लाल, अशा वेगवेगळ्या रंगांची मेंदी मिळते. आपल्या कातडीच्या वरच्या थरातल्या पेशींच्या बाह्य आवरणामधील फाॅस्फोलिपीड रसायनाच्या किंवा त्या पेशीला प्रथिनांच्या रेणूपेक्षा या रसायनाचे रेणू लहान असतात. व सहजगत्या त्यांच्यात मिसळून जातात. प्रथिनांच्या रेणूंना ते मिठी मारून बसतात. केसांमधल्या कॅरॅटीन या प्रथिनाशी त्यांची प्रक्रिया होते. जर केसांमध्ये कॅरेटीनचं प्रमाण जास्त असेल तर लाॅसोनियाही जास्त प्रमाणात तिथं रुतून बसतो व केसांचा रंग लक्षणीयरित्या पालटतो. साधारणत: अठ्ठेचाळीस तासानंतर तो काळसर होऊ लागतो. पानांमधला रंग उतरून कातडी मध्ये किंवा केसांमध्ये जिरावा यासाठी त्या पानांच्या वाटण्यात लिंबाचा रंग मिसळला जातो. त्यातला सायट्रिक आम्ल रंग अधिक गडद करतं. तळहातावरच्या किंवा तळपायावरच्या कातडीत शिरलेल्याल्या लाॅसोनियाला जर वाफेचा स्पर्श झाला तर त्याचा रंग गडद तपकिरी किंवा काळसर बनतो.*बाळ फोंडके यांच्या 'कसं' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••करितो वंदना गजाननातुम्ही हासत नाचत या अंगणा ||१||चौदा विद्येचे तुम्हीच करतातुम्हीच आधी तुम्हीच अंतापूर्ण करिशी आमची मनोकामनाकरितो वंदना गजानना ||२||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणी आपल्या मताने कसेही बोलत असतील आणि त्यांच्या प्रत्येक शब्दाला हो ला हो असं प्रतिसाद देत राहिल्याने त्यांना आनंद होतो आणि ते, आपल्याला जवळ करत असतात. पण, एखाद्या वेळी त्यांचे बोलणे आपल्या मनाला पटले नाही की लगेच आपला विरोध करायला सुरूवात करतात. कदाचित या विषयी आपल्याला अनुभव आला असेलच. म्हणून जे कोणी चांगले सांगत असतील त्यांचे विचार आवर्जून ऐकून घ्यावे. पण,काही विचार पटत नसतील तर एकदाचे बाजूला झालेले बरे कारण, बरेचदा असं होतं की, हो ला हो लावल्याने कधी काळी अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *सिंह आणि लांडगा* ━━━━━━━━━━*एक सिंह आणि लांडगा असे दोघे वनातून फिरत असताना त्‍यांच्‍या कानी काही मेंढ़यांचा आवाज आला. तो आवाज ऐकून मोठ्या बढाईने लांडगा सिंहाला म्‍हणाला,'' महाराज, तुम्‍ही आता चालून चालून दमला असाल, तेव्‍हा तुम्‍ही इथेच बसा. मी तुमच्‍यासाठी दोन-चार मेंढ्या मारून आणतो. याप्रमाणे बोलून लांडगा मेंढ्यांच्‍या आवाजाच्‍या रोखाने गेला असता त्‍याला त्‍या मेंढ्यांच्‍या कळपाजवळ मेंढ्यांचा धष्‍टपुष्‍ट मालक आणि चार शिकारी कुत्रे असल्‍याचे दिसले. त्‍याबरोबर तो लांडगा परतपावली सिंहाकडे आला व सिंहाला म्‍हणाला,'' महाराज तुम्‍ही तर या जंगलाचे राजे आहात आणि तिकडे उभ्‍या असलेल्या मेंढ्या रोगट आणि अशक्त आहेत. इतक्‍या सा-या मेंढयामध्‍ये एकही मेंढी चांगली नाही तेव्‍हा आपण दुसरी कोणती तरी शिकार करणेच बरे होईल.'' सिंहानेही शिकारी कुत्र्यांचा आवाज ऐकला होता त्‍यामुळे सिंहाला लांडग्‍याचा धूर्तपणा लक्षात आला.**तात्‍पर्य :- आपली असहाय्यता लपविण्‍यासाठी काही ना काही सबबी पुढे करणे हा प्राणीमात्रांचा स्‍वभाव आहे.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment