✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 27 सप्टेंबर 2025💠 वार - शनिवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/17c1Uv23QX/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *जागतिक पर्यटन दिन*🚩 महत्वाच्या घटना :- • १९२५: डॉ. केशव हेडगेवार द्वारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरएसएसची स्थापना.• १९८०: जागतिक पर्यटन दिन• २००३: SMART-1 - उपग्रह प्रक्षेपित झाला.🎂 जन्म :- • १९०७: भारतीय क्रांतिकारी भगत सिंग यांचा जन्म.• १९०७: संगीत समीक्षक वामनराव देशपांडे यांचा जन्म.• १९३३: चित्रपट निर्माते व दिग्दर्शक यश चोप्रा यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑक्टोबर २०१२)• १९५३: भारतीय धर्मगुरू माता अमृतानंदमयी यांचा जन्म.• १९८१: भारतीय क्रिकेट खेळाडू लक्ष्मीपती बालाजी यांचा जन्म.• १९३२: भारतीय दिग्दर्शक, पटकथालेखक आणि निर्माते - पद्म भूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते यश चोप्रा यांचा जन्म (मृत्यू : २१ ऑक्टोबर २०१२)• १९४६: भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते रवी चोप्रा यांचा जन्म (मृत्यू : १२ नोव्हेंबर २०१४)🌹 मृत्यू :- • १८३३: समाजसुधारक व ब्राह्मो समाजाचे जनक राजा राममोहन रॉय यांचे निधन. (जन्म: २२ मे १७७२)• १९२९: लेखक व पत्रकार शि. म. परांजपे यांचे निधन. (जन्म: २७ जून १८६४)• १९७२: भारतीय गणितज्ञ एस. आर. रंगनाथन यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १८९२)• १९९२: पद्मश्री पुरस्कृत समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांचे निधन. (जन्म: १७ मार्च १९१०)• २००४: शास्त्रीय गायिका शोभा गुर्टू यांचे निधन. (जन्म: ८ फेब्रुवारी १९२५)• २००८: पार्श्वगायक महेन्द्र कपूर यांचे निधन. (जन्म: ९ जानेवारी १९३४ – अमृतसर)• २०१२: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक संजय सूरकर यांचे निधन. (जन्म: १९ ऑगस्ट १९५९)• २०१५: भारतीय लेखक आणि राजकारणी सय्यद अहमद यांचे निधन. (जन्म: ६ मार्च १९४५)• २०१५: भारतीय कार्यकर्ते आणि लेखक कॉलन पोकुकुडन यांचे निधन.• २०२०: भारताचे माजी अर्थमंत्री मेजर जसवंत सिंग जासोल यांचे निधन (जन्म: ३ जानेवारी १९३८)• २०१८: भारतीय लेखिका आणि अनुवादक कविता महाजन यांचे निधन (जन्म: ५ सप्टेंबर १९६७)• २०१८: भारतीय राजकारणी, गुजरातचे आमदार मनोहरसिंहजी प्रद्युम्नसिंहजी यांचे निधन (जन्म: १८ नोव्हेंबर १९३५)••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सरकारी मराठी शाळेची दुरावस्था*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन नांदेड जिल्ह्यात शाळा व महाविद्यालयांना आज सुट्टी, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पंतप्रधान महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठीशी; अतिवृष्टीच्या संकटावर पंतप्रधानांचे फडणवीसांना आश्वासन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *द पुणे फाउंटन पेन शोचे उद्घाटन, लेखणीच्या प्रवाहाने जगात अनेक बदल घडवले, निवृत्त न्यायाधीश दिलीप कर्णिक*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नागपूर :- संत्रा गुणवत्ता वाढीसाठी नर्सरी कायद्यात बदल, नितीन गडकरी मुख्यमंत्री, कृषी मंत्र्यांशी चर्चा करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *MPSC ची 28 सप्टेंबरची परीक्षा अखेर रद्द, आता 9 नोव्हेंबर रोजी होणार पेपर; राज्यातील पूरस्थितीमुळे आयोगाने घेतला निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सायबर सुरक्षा नियंत्रण प्रणालीत महाराष्ट्राचा पुढाकार, मंत्री आशिष शेलार यांचे प्रतिपादन; ‘रिंग द बेल फॉर सिक्युरिटी’ मोहिमेचा शुभारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशिया चषक 2025 - बांगलादेशला हरवून पाकिस्तान फायनलमध्ये दाखल, भारताशी होणार अंतिम सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 डॉ. प्रतिभा जाधव, साहित्यिक, जळगाव 👤 अनिल आर्य, धर्माबाद 👤 सद्दाम दावणगीरकर, देगलूर 👤 नरेश केशववार👤 अजित कड *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 86*कान आहेत पण ऐकत नाही**तोंड आहे पण बोलत नाही**शिजवतो पण खात नाही**सांग बरं मी कोण आहे ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - बाहुली ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सौंदर्यदृष्टी मौनाचे रूपांतर शब्दात करते. दयाद्रदृष्टी विरोधाला अनुकूल करून घेते आणि क्रोधांधदृष्टी सौंदर्यास कुरूपता आणते. - ॲडिसन*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'जागतिक पर्यटन दिवस' केव्हा साजरा केला जातो ?२) नुकतेच डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांना बिल गेट्स यांच्या गेट्स फाउंडेशनतर्फे कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?३) चलनी नोटा रद्द करण्याची घोषणा पहिल्यांदा भारतात कधी झाली ?४) भारताचे पहिले परदेशातील अटल इनोव्हेशन सेंटर कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे ?५) गीर, साहिवाल, थारपारकर या कशाच्या प्रजाती आहेत ? *उत्तरे :-* १) २७ सप्टेंबर २) गोलकीपर्स चॅम्पियन्स ३) सन १९४६ ४) अबुधाबी ५) गाय *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*काही पालेभाज्यांचे औषधी उपयोग पुढीलप्रमाणे आहेत.*११.] *मायाळू* :-  अंगावर पित्त उठले असताना याच्या पानांचा रस आंगाला चोळल्यास पित्त कमी ह्प्ते. लहानमुलांना थंडी खोकला झाला असताना मायाळूच्या पानाचा रस चमचाभर देतात. १२.] *तांदुळजा* :-  बाळंतीणीला दूध वाढवण्यास ही भाजी उपयोगी ठरते. १३.] *मेथी* :-  सारक व पथ्यकर असलेल्या या भाजीमध्ये लोहाचे प्रमाण बरेच आहे. याचे बी वातहारक व शक्तिकारक असते म्हणून बाळंतपणात याचा उपयोग केला जातो. दूधवाढीसाठीही त्याचा उपयोग होतो. मेथ्यांचे पीठ तोंडाला लावल्यास चेहर्‍यावरील सुरकुत्या नष्ट होतात व चेहरा तजेलदार दिसतो. १४.] *शेपू* ;-  वातनाशक व पोटदुखी कमी करणारी अशी ही भाजी आहे. १५.] *शेवगा* ;-  ही भाजी वातनाशक व पित्तनाशक आहे. हृदय व रुधिराभिसरण क्रिया यामुळे सुधारतात. १६.] *सॅलड* :-  या भाजीमध्ये लेसीथीन नावाचे द्रव्य असते. मजासंस्थेचे कार्य सुधारण्यास त्यामुळे मदत होते. मेंदूवर जास्त ताण पडणार्‍यांनी नियमित सॅलड खावे*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पाहताची होती दंग आज सर्व संतविठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत ||धृ||युगे अठ्ठावीस उभा विठु विटेवरीधन्य झाली चंद्रभागा धन्य ती पंढरीअनाथांच्या नाथ हरी असे कृपावंत ||१||कुठली ती होती माती कोण तो कुंभारघडविता उभा राहे पहा विश्वंभरतिच्यामुळे पंढरपूर झाले किर्तीवंत ||२||पाहुनिया विटेवरी विठू भगवंतदत्ता म्हणे मन माझे होई तेथे शांतगुरुकृपे साधियेला मी आज हा सुपंथ ||३||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्षेत्र कोणतेही असो त्या क्षेत्रात कार्यरत असताना इतरांचे हित व माणसाचा जन्म मिळाला त्यासाठी काहीतरी देणं लागतं हीच भावना आपल्या मनात ठेवून कार्यरत राहिल्याने मनाला विशेष समाधान मिळेल. पण या ऐवजी दुसरीच नको ती भावना आपल्या मनात असेल तर मात्र त्या कार्याचे रूपांतर प्रसिद्धीत होते. आणि ती प्रसिद्धी फक्त, स्वतः पुरते मर्यादित असते अशाने इतरांना काहीच मिळत नाही. म्हणून कार्यरत असताना प्रसिद्धी मिळविण्यासाठी धावण्यापेक्षा इतरांच्या मनावर परिवर्तन झाले पाहिजे यासाठी कार्यरत राहिले पाहिजे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*..... आणि क्रिकेट संघ तयार होतो*राजू उद्यानात उदास बसला होता, आज त्याचे मित्र खेळायला आले नाहीत. राजूकडे बॉल होता, पण ना बॅट ना मित्र. तो एकटाच बॉलशी निराश होऊन खेळत होता. इतर मुलंही उद्यानात क्रिकेट खेळत होती, पण राजू त्यांना ओळखत नव्हता. म्हणूनच तो कधी एकटाच चेंडूशी खेळायचा तर कधी बसून पोरांना खेळताना पाहायचा. काही वेळाने समोर खेळणाऱ्या मुलांचा चेंडू शेजारच्या एका बंद घरात पडला. तेथून चेंडू परत येणे अशक्य होते आणि एकही मूल तो गोळा करायला आत जाऊ शकत नव्हते. आता त्या मुलांनीही खेळणे बंद केले आहे. आता त्यांनाही क्रिकेट खेळता येत नसल्याने ते सर्व दुःखी झाले. त्या मुलांची नजर बॉल असलेल्या राजूवर गेली. मग काय, त्या लोकांनी राजूला खेळायला बोलावलं. राजू खेळण्यात चांगला होता. म्हणूनच तो खूप चांगला शॉर्ट टाकू शकला असता. चेंडू पकडण्यासाठी आणखी मुलांची गरज होती. त्यावर उद्यानात खेळणारी मुलंही त्यांच्यात सामील झाली. आणि काही वेळातच दोन पक्ष तयार झाले. अशा प्रकारे राजूची नवी क्रिकेट टीम तयार झाली.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment