✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 02 सप्टेंबर 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/16dfbAeQDr/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :- ● १९९९ : भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ही इंग्लिश खाडी दोनदा पोहणारी आशियातील पहिली महिला ठरली.● १९४६ : भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.● १९२० : कोलकाता येथे महात्मा गांधींनी ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन सुरू केले.● १९१६ : पाटणा उच्‍च न्यायालयाची स्थापना🎂 जन्म :-◆ १९४१ : साधना शिवदासानी ऊर्फ ’साधना’ चित्रपट अभिनेत्री◆ १८८६ : प्रा. श्रीपाद महादेव तथा श्री. म. माटे, साहित्यिक, विचारवंत व अस्पृश्यता निवारणासाठी सतत प्रयत्‍न करणारे कृतिशील समाजसुधारक. ◆ १८७७ : फ्रेडरिक सॉडी, नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ 🌹 मृत्यू / ● २०११ : संगीतकार श्रीनिवास खळे● २००९ : आंध्र प्रदेशचे १४ वे मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचे विमान अपघातात निधन ● १९९९ : डी. डी. रेगे, विलक्षण बोलक्या आणि जिवंत व्यक्तिचित्रण चित्रकार व लेखक, लोकसभा व विधानसभेतील अनेक राष्ट्रपुरुषांची चित्रे त्यांनी काढलेली आहेत.● १९९० : नरहर शेषराव पोहनेरकर, निबंध, लघुकथा, कादंबरी, कविता लेखक ● १९७६ : विष्णू सखाराम तथा ’वि. स.’ खांडेकर, मराठी लेखक, कादंबरीकार, लघुनिबंधकार व समीक्षक, त्यांच्या ’ययाति’ या कादंबरीसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार (१९७४) मिळाला आहे. ● १९६० : डॉ. शंकर पुरुषोत्तम आघारकर, वनस्पतीतज्ञ, ’विज्ञानवर्धिनी महाराष्ट्र’(MACS)या संस्थेचे संचालक ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जागरूक पालक .......!*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मराठा आरक्षणावर वर्षा निवास स्थानी मुख्यमंत्र्याची उच्चस्तरीय बैठक संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *शिक्षकांना TET परीक्षा बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचा निर्णय, सेवानिवृत्तीला पाच वर्षे शिल्लक असणाऱ्या शिक्षकांना सुट*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *अफगाणिस्तानमध्ये भीषण भूकंप, 800 हुन अधिक लोकांचा मृत्यू, उत्तर भारतात देखील जाणवले धक्के*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचा दुसरा टप्पा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *बिहार - मतदार यादीत नावे समाविष्ट करण्याची अंतिम मुदत वाढवली जाणार नाही, आयोगाने म्हटले-, 1 सप्टेंबरनंतर आलेल्या हरकतींवरही विचार करू*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *तेल कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत तब्बल 51.50 रुपयांची केली कपात, सलग तिसऱ्यांदा व्यावसायिक सिलेंडर झाले स्वस्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *Women's World Cup 2025: महिला एकदिवसीय विश्वचषकासाठी बक्षीस रकमेची घोषणा; 2022 च्या तुलनेत बक्षीस रकमेत चार पट वाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अनुजा देशमुख, साहित्यिक, नाशिक 👤 किशोर तळोकार, शिक्षक तथा साहित्यिक, अमरावती 👤 शरद शेलकांडे, पुणे 👤 प्रवीण इंगळे 👤 रवी भलगे 👤 हणमंत भोसके *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 64*माझ्या अंगात छिद्रं हजार, तरी मी पाणी धरून ठेवतो. दाबलं कुणी मला की मी गळतो, सांगा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - लाईट ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सावधपण, उत्तम निर्णयशक्ती, स्वावलंबन आणि दृढ विश्वास, निश्चय हे गुण यशासाठी आवश्यक असतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारताच्या सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण ?२) मोबाईलच्या संदर्भात GB म्हणजे काय ?३) 'श्यामची आई' या पुस्तकाचे लेखक कोण ?४) 'हरिणासारखे डोळे असणारी' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) वाघाच्या पिल्लाला काय म्हणतात ? *उत्तरे :-* १) राष्ट्रपती २) Giga Byte ३) साने गुरुजी ४) मृगाक्षी, मृगनयना, कुरंगनयना, हरिणाक्षी ५) छावा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *महाडचा वरद विनायक*• स्थान : वरदविनायक मंदिर महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील महाड (कोळवण) गावाजवळ आहे. अष्टविनायक गणपतींपैकी चौथा गणपती महाडचा वरद विनायक आहे.• इतिहास : हे मंदिर 1725 साली पेशव्यांचे मंत्री श्री. मोरया गोसावींचे शिष्य रामजी महादेव बिवलकर यांनी बांधले.मूळ मूर्तीचे तोंड पूर्वेकडे आहे, पण सध्याची पूजनीय मूर्ती पश्चिमाभिमुख (प्रवेशद्वाराकडे) आहे.• मूर्तीचे वैशिष्ट्य : गणपतींच्या कपाळावर नागराज कोरलेला आहे.ही मूर्ती स्वयंभू मानली जाते.• विशेषता : भक्तांना मंदिराच्या गर्भगृहात जाऊन थेट मूर्तीला स्पर्श करून दर्शन घेण्याची परवानगी आहे.येथे एक पवित्र सरोवर (तळे) आहे, जे शुद्धिकरण व स्नानासाठी पवित्र मानले जाते.• पालखी सोहळा : दरवर्षी भव्य मिरवणुका आणि उत्सव येथे साजरे होतात.• महत्व🙏 वरदविनायक म्हणजे सर्व मनोकामना पूर्ण करणारा गणपती. भक्तांचा विश्वास आहे की येथे दर्शन घेतल्याने इच्छित कार्य सिद्ध होते.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गजानना गजानना गणरायामुखाने गाऊ या मोरया…. || धृ ||फळे फुले वाहू या पूजन करू यालाडू मोदकांचा नैवेद दावूयाभक्ती भावाने गणेशाला वंदूया, मुखाने …. || १ ||हे मोरेश्वरा हे विघ्नहरागुण किती वर्णू तुझे लंबोदराचौदा विघेचा देवा असे तू पाथा, मुखाने ….. || २ ||देव देवतांच्या हे महाराजानाम तुझे राहो सदा मुखी माझ्यासारे मिळून गणपतीचा घोष करूया, मुखाने…. || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वयाने लहान असलेल्यांकडून जेव्हा छोटीशी चूक होते तेव्हा सर्वजण त्याला नको त्या शब्दात बोलत असतात.पण तीच चूक जेव्हा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीकडून होते त्यावेळी वयाने लहान असणारा समजावून सांगतो अशावेळी त्याला शहाणपणा शिकवू नको म्हणून हाकलून लावतात.बरेचदा वयाने मोठा असलेला माणूस समजदार असतोच असे नाही तर वयाने लहान असणारा सुद्धा अनुभवी असू शकतो म्हणून एखाद्याला कमी लेखून त्याचा अपमान करू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कावळा आणि घडा*एका गावात एक कावळा राहात होता. उन्हाळ्याच्या दिवसात खूप उकाडा पडला होता. कावळ्याला प्रचंड तहान लागली. तो इकडे-तिकडे उडू लागला, पण त्याला पाणी कुठेच मिळत नव्हते.थोड्या वेळाने त्याला एका झाडाखाली ठेवलेला घडा दिसला. कावळा आनंदाने त्या घड्याकडे गेला. पण आतले पाणी खूपच खाली होते. त्याची चोच तेथे पोहोचत नव्हती.कावळ्याने हार मानली नाही. त्याला एक युक्ती सुचली. त्याने जवळचे छोटे-छोटे दगड चोचीत उचलून घड्यात टाकायला सुरुवात केली. हळूहळू पाण्याची पातळी वर आली. शेवटी कावळ्याने आपली तहान भागवली.बोध :- अडचणीत हार मानू नये. हुशारीने विचार केला, तर उपाय नेहमी सापडतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment