✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 13 सप्टेंबर 2025💠 वार - शनिवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - गौरव गाथा ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :- १८९८: हॅनीबल गुडविन यांनी सेल्यूलॉइड फोटोग्राफिक फिल्म चे पेटंट घेतले.〉 १९२२: लिबियातील अझिजिया येथे ५७.२° सेल्सियस ही जगातील आजवरच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.〉 १९४८: ऑपरेशन पोलो – विलीनीकरणासाठी भारतीय सैन्याने हैदराबादवर चढाई केली.〉 १९८५: सुपर मारियो गेम जपान मध्ये प्रकाशित झाला.〉 १९८९: आर्च बिशप डेस्मंड टुटू यांनी वर्णद्वेषी धोरणाला विरोध करण्यासाठी दक्षिण अाफ्रिकेत विशाल मोर्चा काढला.〉 १९९६: श्रीमती जानकीदेवी बजाज पुरस्कार ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती इंदुमती पारिख यांना दिला.〉 २००३: ज्येष्ठ गायक पं. दिनकर कैकिणी यांना तानसेन यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर.〉 २००३: मेंडोलिन वादक यू. श्रीनिवास यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर.〉 २००८: दिल्लीतील बॉम्बस्फोटांत ३० ठार, १३० जण जखमी झाले.〉 १९९३: ऑस्लो करार - इस्रायल आणि पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन यांच्यात हा करार झाला.〉 १९६८: शीतयुद्ध - अल्बेनियाने वॉर्सा करार सोडला.〉 १९६२: जेम्स मेरेडिथ - या पहिल्या आफ्रिकन-अमेरिकन विद्यार्थ्याला विभक्त विद्यापीठात प्रवेश देण्याचे आदेश एका अपील न्यायालयाने मिसिसिपी विद्यापीठाला दिले.〉 १९४८: मार्गारेट चेस स्मिथ - यांची युनायटेड स्टेट्स सिनेटर म्हणून निवड झाली, यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि युनायटेड स्टेट्स सिनेट या दोन्ही ठिकाणी सेवा देणाऱ्या पहिल्या महिला बनल्या.〉 १९४४: दुसरे महायुद्ध - मेलिगालासची लढाई: ग्रीक पीपल्स लिबरेशन आर्मी (ईएलएएस) च्या ग्रीक प्रतिकार शक्ती आणि सहयोगी सुरक्षा बटालियन यांच्यात लढाईची सुरुवात.〉 १९४२: दुसरे महायुद्ध - एडसन रिजची लढाई: दुसरा दिवस- अमेरिकन सैन्याने जपानी सैन्याच्या मोठ्या नुकसानासह जपानी हल्ल्यांचा यशस्वीपणे पराभव केला.〉 १९३३: एलिझाबेथ मॅककॉम्ब्स - न्यूझीलंड संसदेवर निवडून आलेल्या पहिल्या महिला ठरल्या.〉 १९१४: पहिले महायुद्ध - आयस्नेची लढाई: जर्मनी आणि फ्रान्समध्ये लढाई सुरू झाली.〉 १८९९: बॅटियन शिखर - मॅकेंडर, ऑलियर आणि ब्रोचेरेल यांनी केनिया पर्वतरांगेमधील सर्वोच्च शिखरावर (५१९९ मी - १७०५८ फूट) पहिल्यांदा चढाई केली.〉 १७५९: अब्राहमच्या मैदानात सात वर्षांच्या युद्धात ब्रिटीशांनी फ्रेंचांचा पराभव केला, हे युद्ध अमेरिकेत फ्रेंच आणि भारतीय युद्ध म्हणून ओळखले जाते.🎂 जन्म :- 〉 १९३२: शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचा जन्म.〉 १९६७: अमेरिकन धावपटू मायकेल जॉन्सन यांचा जन्म.〉 १९६९: ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर शेन वॉर्न यांचा जन्म.〉 १९७१: क्रोएशियाचा लॉन टेनिसखेळाडू गोरान इव्हानिसेव्हिच यांचा जन्म.〉 १९७६: न्झीलंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू क्रेग मॅकमिलन यांचा जन्म.〉 १९८०: भारतीय हॉकी खेळाडू वीरेन रास्किन्हा यांचा जन्म.🌹 मृत्यू :- 〉 १८९३: पत्रकार, प्रार्थना समाजाचे एक संस्थापक मामा परमानंद यांचे निधन. (जन्म: ३ जुलै १८३८)〉 १९२८: सुप्रिसद्ध हिंदी कवी श्रीधर पाठक यांचे निधन. (जन्म: ११ जानेवारी १८५८)〉 १९२९: क्रांतिकारक जतीनद्र दास यांचे तुरुंगातील जुलमाचा निषेध म्हणून केलेल्या उपोषणात ६३ व्या दिवशी निधन. (जन्म: २७ ऑक्टोबर १९०४)〉 १९७१: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते केशवराव त्र्यंबक दाते यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १८८९ – अडिवरे, रत्नागिरी, महाराष्ट्र)〉 १९७३: भारतीय कवी आणि तत्त्ववेक्षक सज्जाद झहिर यांचे निधन. (जन्म: ५ नोव्हेंबर १९०५)〉 १९७५: भारतीय गायक आणि संगीतज्ञ मुदिकॉन्दाम वेंकटरम अय्यर यांचे निधन. (जन्म: १५ ऑक्टोबर १८९७)〉 १९९५: प्रख्यात आसामी साहित्यिक आणि इतिहासकार, पद्मश्री (१९७४), आसाम साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. महेश्वर नियोग यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर १९१५ – कमरफादिया, शिवसागर, आसाम)〉 १९९७: प्रसिद्ध गीतकार लालजी पांडेय तथा अंजान यांचे निधन. (जन्म: २८ ऑक्टोबर १९३०)〉 २००४: गर्भनिरोधक गोळी चे संशोधक लुइस ई. मिरमोंटेस यांचे निधन. (जन्म: १६ मार्च १९२५)〉 २०१२: भारताचे २१ वे सरन्यायाधीश रंगनाथ मिश्रा यांचे निधन. (जन्म: २५ नोव्हेंबर १९२६)〉 २०२२: भारतीय क्रिकेटपटू जसवंत बक्रानिया यांचे निधन〉 २०२२: भारतीय राजकारणी, केरळचे आमदार एन. एम. जोसेफ यांचे निधन (जन्म: १८ ऑक्टोबर १९४३)〉 २०२१: अमेरिकन पियानोवादक आणि निर्माते, न्यूपोर्ट लोक महोत्सवाचे सहस्थापना जॉर्ज वेन यांचे निधन (जन्म: ३ ऑक्टोबर १९२५)〉 २०२०: भारतीय चित्रपट अभिनेते अजित दास यांचे निधन (जन्म: २० जानेवारी १९४९)〉 २००५: कोलंबियाचे २५वे राष्ट्राध्यक्ष ज्युलिओ सीझर टर्बे आयला यांचे निधन (जन्म: १८ जून १९१६)〉 १९१०: भारतीय कवी आणि संगीतकार रजनीकांत सेन यांचे निधन (जन्म: २६ जुलै १८६५)••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गौरव गाथा मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील थोर स्वातंत्र्य सेनानी भाऊराव पाटील मतसागर यांची माहिती जरूर पहा आणि शाळेतील विद्यार्थ्यांना दाखवा. ..... पूर्ण माहिती पाहण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी आजमणिपूर दौऱ्यावर ! अनेक प्रकल्पांचे करणार उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्याला 'राज्याच्या प्रमुख महोत्सवाचा' दर्जा, शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, पर्यटन विभागाने जारी केले परिपत्रक*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पुणे - सीओईपी अभिमान पुरस्कार वितरण सोहळा रविवारी, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सात माजी विद्यार्थ्यांचा होणार सन्मान*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *34 जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण सोडतीची अधिसूचना जाहिर, विषय समित्यांच्या सभापतींचेही आरक्षण जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *स्टाफ सिलेक्शन - सर्व सत्रांमधील गुणांची तुलना समान आधारावर होणार; भरती परीक्षांमध्ये मूल्यांकनासाठी गुण सामान्यीकरणाची नवीन पद्धत लागू*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सरकारकडून मराठवाडा बेदखल, मुक्तिसंग्रामदिनी संभाजीनगरात होणारी मंत्रिमंडळाची बैठक सलग दुसऱ्या वर्षी रद्द*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया यांच्या यशामागील आधारस्तंभ त्यांचे वडील बलवान पुनिया यांचे निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 दीपश्री वाणी, केंद्रप्रमुख तथा साहित्यिक, पुणे 👤 कबीरदास गंगासागरे, मा. शिक्षक, जारीकोट, धर्माबाद 👤 अनिता देशमुख, साहित्यिक, बुलढाना👤 योगेश रघुनाथराव वाघ, साहित्यिक, नाशिक 👤 नवीन रेड्डी, धर्माबाद *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 73*रंग माझा आहे काळा* *मी शाळेची आहे शान**सगळ्यांना मी देतो ज्ञान**सांगा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - टोपी, Cap••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अपयशाची कारणे आहेत पण कमी आत्मविश्वास म्हणजेच खरे अपयश होय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२५ मध्ये देशात अव्वल क्रमांक कोणत्या शहराने पटकावला ?२) 'स्मायलींग बुद्धा ( आणि बुद्ध हसला ) हे कशाचे सांकेतिक नाव आहे ?३) अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम पुरुष टेनिस स्पर्धा २०२५ चे जेतेपद कोणी पटकावले ?४) पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात जास्त टक्केवारी कोणत्या वायूची आहे ?५) राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे ? *उत्तरे :-* १) अमरावती, महाराष्ट्र २) पोखरण अणुचाचणी - १ ३) कार्लोस अल्काराज, स्पेन ४) नायट्रोजन ५) डॉ. मेधा कुलकर्णी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *चक्रीवादळे का येतात ?* 📙 *************************उन्हाळ्याचे दिवस चालू असतात. भर दुपारी उन्हाचा कडाका अंगाची लाहीलाही करत असतो. जमीन अगदी चटके बसतील, अशी तापलेली व हवा अजिबात पडलेली. झाडाचे तर पानही हलत नाही आणि बघता बघता लांबवर कुठेतरी जमिनीवरची पडलेली पाने वाऱ्याने गोलगोल भिरभिरताना दिसू लागतात. बघता बघता तीच पाने उंचावर उचलली जातात. त्यांच्याबरोबरच धुळीचा लोटही उफाळताना, गरगरताना दिसतो. काही सेकंदातच वाऱ्याची वावटळ आपल्यालाही घेरून टाकते. हेलकावणारी झाडे, वाऱ्याचा सोसाट्याचा आवाज, नाकातोंडात जाणारी धूळमाती यांमुळे सारेच कसे भीषण वाटत असते. ही असते चक्रीवादळाची सुरुवात.चक्रीवादळ म्हणजे वातावरणातील एखाद्या विवक्षित ठिकाणी हवेचा दाब आसपासच्या काही मैलांच्या परिसरापेक्षा कमी अथवा जास्त झाल्याने दिसून येणारे वातावरणातील बदल. हे बदल फार मोठ्या वेगाने घडतात, त्यात वाऱ्याची फार मोठी ताकद सामावलेली असते. त्या विवक्षित ठिकाणी हवेचा दाब कमी होतो वाह वाढतो. तो चक्रीवादळाचा केंद्रबिंदूच असतो. दाब कमी झाल्यास तेथील हवेची पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न म्हणून वातावरणातील हवेत एक प्रकारचे भोवरे तयार होतात. याउलट दाब वाढला असल्यास त्या पट्टय़ातील हवा दाबामुळे केंद्राकडे खाली दाबली जात असते. याही क्रियेमध्ये वारे वाहणे वेगाने सुरू होते, पण त्यांची तीव्रता खूपच कमी असते. बहुतेक चक्रीवादळांचा केंद्रबिंदू समुद्रावरच सुरू होतो. कसलाही अडथळा वाटेत नसल्याने हे वादळ स्वतःभोवती फिरत वेगाने घोंगावत इकडे तिकडे हेलकावत राहते. पण समुद्री वार्यांमुळे हलके हलके जमिनीकडे येऊ लागते. सुरुवातीला जमिनीवरचा मोठा पट्टा त्यामुळे त्याच्या तडाख्यात सापडतो, पण त्याचबरोबर त्याचा वेग हळूहळू कमी होत पसरत जातो व काही काळाने ते संपूनही जाते. समुद्रपातळीपेक्षा जमिनीची वाढलेली उंची, वाटेत येणारे अडथळे व जमिनीवरील बरेचसे स्थिर तापमान यांमुळे या चक्रीवादळांचा वेग मंदावतो. चक्रीवादळ बहुधा स्वतःबरोबर सोसाटयाचा पाऊसही आणते. खूप मोठ्या आकारमानात हे पसरलेले असल्याने (चारशे ते सहाशे किलोमीटर) या सर्व भागातील निरनिराळे ढग यात ओढले गेलेले असतात. या ढगांचे एकत्रीकरण होताच त्यातील बाष्पही एकत्र येऊन त्यापासून पाऊस पडेल, असे मोठे बाष्पकण तयार होतात. सुरुवातीला प्रचंड वेगाने वाहणारे वारे, धुळीचे वातावरण व नंतरच्या पावसाचे तडाखे ही चक्रीवादळाची खासियतच म्हणायला हवी. चक्रीवादळांचा वेग जमिनीवर पोहोचल्यावर अनेकदा ताशी साठ ते ऐंशी किलोमीटर इतका असतो. समुद्रावरील वेग मोजण्याची पद्धत नाही, पण तो कदाचित यापेक्षाही जास्त असू शकतो. समुद्रावरील बोटी या वादळात सापडल्यास अनेकदा त्यांचे गंभीर नुकसान होण्याइतका त्यांना तडाखा बसलेला असतो. वादळाचा पट्टा ओलांडण्यास त्यांना एक ते चार दिवस लागत असल्याने तोवर राक्षसी लाटांचे तांडव असहाय्यपणे बघणे एवढेच त्यांच्या हातात असते. अनेकदा या लाटांची उंची तीस ते पस्तीस फुटांपर्यंतही असू शकते. ही वादळे सागरी अपघात व दुर्घटना यांचे एक मुख्य कारण असल्याने या वादळी टापूंची सतत माहिती घेऊन त्याप्रमाणे मार्ग आखणे, बदलणे बोटीच्या कप्तानाने कामच राहते. किनाऱ्यावर जेव्हा ही वादळे येतात, तेव्हा उंच झाडे उन्मळून पडणे, सागरी लाटा खोलवर घुसून त्यामुळे नुकसान होणे, घरांचे पत्रे उडणे या गोष्टी होतात. चक्रीवादळांची सूचना हल्ली उपग्रहांमुळे खूपच लवकर मिळू शकते. उपग्रहांमधून या सर्व वादळांचा नेमका प्रवास, हवेतील घडत जाणारे बदल यांचे फोटो मिळतात. या खेरीच एक मोठी विलक्षण पद्धत चक्रीवादळांच्या अभ्यासासाठी गेली २० वर्षे वापरली जात आहे. अत्यंत धोकादायक अशा पद्धतीत लष्करी जेट विमानातून संशोधक या चक्रीवादळाच्या केंद्रबिंदूकडेच प्रवास सुरू करतात. थेट केंद्रबिंदूचा वेध घेऊन विमान वर न्यावयाचे व त्या दरम्यान विविध शास्त्रीय निरीक्षणे करायची, अशी ही पद्धत आहे. निष्णात वैमानिक व जिवावर उदार झालेले संशोधक यांचा चमू हे काम करतो. या प्रकारात विमान पार वेडेवाकडे होऊन दोन तीन हजार फूट लांबवर एखाद्या खेळण्याप्रमाणे भिरकावलेही गेले आहे. तरीही सुखरूप उतरल्यावर नवीन चक्रीवादळाची सूचना कधी मिळते, इकडेच या चमूचे लक्ष असते. धाडस व जिज्ञासा यांचा संगम काय करू शकतो, याचे हे एक थरारक उदाहरण आहे.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आह्मीं जावें कवण्या - संत जनाबाई आह्मीं जावें कवण्या ठायां । न बोलसी पंढरीराया ॥१॥सरिता गेली सिंधूपाशीं । जरी तो ठाव न दें तिसी ॥२॥जळ कोपलें जळचरासी । माता न घे बालकासी ॥३॥जनी ह्मणें आलें शरण । जरी त्वां धरिलेंसे मौन्य ॥४॥••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••घरातील भांडं व्यवस्थितपणे ठेवल्यावर त्याचा आवाज फक्त, घरातच राहत असतो. पण त्याच तोडांतून निघणाऱ्या शब्दरुपी भांड्याचा आवाज जर जास्तच झाला तर मात्र त्याचा आवाज कोसोदूर जात असतो आणि नंतर नुकसान शेवटी आपलेच होण्याची शक्यता असते. म्हणून बोलताना जरा जिभेवर ताबा ठेवणे गरजेचे आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 📗 *तीन माशांची गोष्ट*📗 ━━━━━━━━━━━━━*स्वच्छ पाणी असलेल्या एका तळ्याचा एक पाट एका नदीला मिळाला होता. त्या तळ्यात तीन मासे होते. त्यांपैकी एक मासा दूरदर्शी होता, दुसरा शहाणा व तिसरा अगदीच मुर्ख होता. एके दिवशी दोन कोळी त्या तळ्याजवळ आले व आत पाहात असता त्यांना ते तीन लठ्ठ मासे दिसले. तेव्हा त्यांना धरण्यासाठी ते आपली जाळी आणायला गेले. त्या कोळ्यांचा बेत त्या माशांच्या लक्षात येताच ते बिचारे भिऊन गेले. त्यांपैकी जो दूरदर्शी मासा होता तो पाटातून पळून जाऊन नदीत शिरला. थोड्या वेळाने ते कोळी आले व माशांनी पाटातून पळून जाऊ नये म्हणून त्यांनी पाटाचे तोंड बंद केले. ते पाहून त्या शहाण्या माशास आपण पळून न गेल्याबद्दल पश्चात्ताप झाला. पण तितक्यात त्याला एक युक्ती सुचली. मेल्यासारखा उताणा होऊन तो पाण्यावर तरंगू लागला. कोळ्यांनी त्याला वर काढले व तो मेला असे समजून त्याला पुन्हा पाण्यात फेकून दिले. तिसरा मूर्ख मासा पाण्याच्या तळाशी जाऊन इकडूनतिकडे पळत राहिला व शेवटी बिचारा त्या जाळ्यात सापडून कोळ्याच्या हाती सापडला.**तात्पर्य - एखादे संकट येणार असे दिसताच त्याच्या प्रतिकाराची तयारी न करणे मूर्खपणाचे आहे*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment