✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 09 सप्टेंबर 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/v/16BVNm75X3/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :- • १८३९: जॉन हर्षेल याने जगातील पहिले छायाचित्र घेतले.• १८५०: कॅलिफोर्निया हे अमेरिकेचे ३१वे राज्य बनले.• १९३९: प्रभात कंपनीचा माणूस हा चित्रपट प्रदर्शित झाला.• १९४५: दुसरे चीन जपान युद्ध, जपानने चीनसमोर शरणागती पत्करली.• १९८५: मूकबधिर जलतरणपटू तारानाथ शेणॉय याने तिसऱ्यांदा इंग्लिश खाडी पोहून पार करून विक्रम केला.• १९९०: श्रीलंकन सैन्याने बट्टिकलोआ येथे १८४ तामिळींची हत्या केली.• १९९१: ताजिकिस्ता देश सोविएत युनियनपासून स्वतंत्र झाला.• १९९७: ७ वेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळवलेल्या प्रवीण ठिपसेना बुद्धिबळातील ग्रँडमास्टर किताब मिळाला.• २००१: व्हेनिसच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मीरा नायरच्या मॉन्सून वेडिंग चित्रपटाला गोल्डन लायन पुरस्कार मिळाला.• २००९: ठीक ९ वाजुन ९ मिनिटे व ९ सेकंदांनी दुबई मेट्रोचे उद्घाटन झाले.• २०१२: भारतातील स्पेस एजन्सीने यशस्वीरित्या २१ पीएसएलव्ही प्रक्षेपण केले.• २०१५: एलिझाबेथ (दुसरी) युनायटेड किंग्डम वर सगळ्यात जास्त काळ राज्य करणारी राणी बनली.• २०१६: उत्तर कोरियाने पाचवी अण्वस्त्र चाचणी पूर्ण केली आहे.• २०२२: उत्तर कोरिया या देशाने नवीन कायदा मंजूर करून औपचारिकपणे स्वतःला "आण्विक राज्य" घोषित केले.🎂 जन्म :- • १८२८: रशियन लेखक लिओ टॉलस्टॉय यांचा जन्म. (मृत्यू: २० नोव्हेंबर १९१०)• १८५०: आधुनिक हिन्दी साहित्याचे जनक भारतेंदू हरिश्चंद्र यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी १८८५)• १८९०: केंटुकी फ्राईड चिकन चे संस्थापक कर्नल सँडर्स यांचा जन्म. (मृत्यू: १६ डिसेंबर १९८०)• १९१०: गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती नवलमल फिरोदिया यांचा जन्म. (मृत्यू: २६ मार्च १९९७)• १९०४: भारतीय-पाकिस्तानी हॉकी खेळाडू फिनोझ खान यांचा जन्म. (मृत्यू: २१ एप्रिल २००५)• १९०५: भारतीय तत्त्वज्ञानी आणि कवी ब्रह्मारीश हुसैन शा यांचा जन्म. (मृत्यू: २४ सप्टेंबर १९८१)• १९०९: अभिनेत्री लीला चिटणीस यांचा जन्म. (मृत्यू: १४ जुलै २००३)• १९४१: अष्टपैलू क्रिकेटपटू अबीद अली यांचा जन्म.• १९४१: सी प्रोग्रामिंग लँग्वेज चे निर्माते डेनिस रिची यांचा जन्म. (मृत्यू: १२ ऑक्टोबर २०११)• १९५०: संगीतकार श्रीधर फडके यांचा जन्म.• १९७४: कारगिल युद्धात शहीद झालेले परमवीरचक्र प्राप्त विक्रम बात्रा यांचा जन्म.• १९४८: पाकिस्तानी चित्रपट अभिनेते रशीद नाझ यांचा जन्म (मृत्यू : १७ जानेवारी २०२२)• १९१०: गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती नवलमल फिरोदिया यांचा जन्म (मृत्यू : २६ मार्च १९९७)• १९०९: अमेरिकन शिक्षक, पहिल्या कृष्णवर्णीय महिला महाविद्यालयाच्या अध्यक्षा विला बीट्रिस प्लेयर यांचा जन्म (मृत्यू : २९ ऑगस्ट २००३)• ३८४: रोमन सम्राट माननीय यांचा जन्म (मृत्यू : १५ ऑगस्ट ०४२३)🌹 मृत्यू :- • १४३८: पोर्तुगालचा राजा एडवर्ड यांचे निधन. (जन्म: ३१ ऑक्टोबर १३९१)• १९४२: स्वातंत्र्यसैनिक शिरीष कुमार यांचा गोळी लागून मृत्यू. (जन्म: २८ डिसेंबर १९२६)• १९६०: उर्दू कवी व शायर अली सिकंदर ऊर्फ जिगर मोरादाबादी यांचे निधन. (जन्म: ६ एप्रिल १८९०)• १९७६: आधुनिक चीनचे शिल्पकार माओ त्से तुंग यांचे निधन. (जन्म: २६ डिसेंबर १८९३)• १९७८: वॉर्नर ब्रदर्स चे सहस्थापक जॅक एल. वॉर्नर यांचे निधन. (जन्म: २ ऑगस्ट १८९२)• १९९४: लावणी सम्राज्ञी सत्यभामाबाई पंढरपूरकर यांचे निधन.• १९९७: युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचे पहिले अध्यक्ष आर. एस. भट यांचे निधन.• १९९९: नाटककार व लेखक पुरुषोत्तम दारव्हेकर यांचे निधन.• २००१: अफगणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष व परराष्ट्रमंत्री अहमदशाह मसूद यांची हत्या. (जन्म: २ सप्टेंबर १९५३)• २०१०: समाजवादी कामगारनेते, लेखक वसंत नीलकंठ गुप्ते यांचे निधन. (जन्म: ९ मे १९२८)• २०१२: भारतीय दुग्धोत्पादनातील धवल क्रांतीचे जनक, अमूल कंपनीचे संस्थापक व्हर्गिस कुरियन यांचे निधन. (जन्म: २६ नोव्हेंबर १९२१ – कोहिकोड, केरळ)• २०१२: बार-कोडचे सहसंशोधक नॉर्मन जोसेफ व्हाउडलँड यांचे निधन (जन्म: ६ सप्टेंबर १९२१)• १९८१: भारतीय अभिनेते आणि निर्माते बिपीन गुप्ता यांचे निधन (जन्म: २१ ऑगस्ट १९०५)• १८९१: फ्रेंच प्रजासत्ताक देशाचे ४थे अध्यक्ष, वकील आणि राजकारणी ज्युल्स ग्रेव्ही••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गौरव गाथा मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांचीभाग पहिलाक्रमशः ..........! ..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राजस्थानातील 8 जिल्ह्यांमध्ये शाळा बंद, पंजाबमधील 2 हजार गावे पाण्याखाली, 296.4 मिमी जास्त पाऊस; हिमाचलमध्ये 824 रस्ते बंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानं उपराष्ट्रपती निवडणूक जाहीर झाली, उपराष्ट्रपती पदासाठी मतदान आज सकाळी 10 वाजता सुरु होईल आणि 5 वाजता संपेल.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *बेळगावचे बासरीवादक पं.राजेंद्र कुलकर्णी यांना भीमसेन जोशी पुरस्कार, 12 ते 14 सप्टेंबरला औंध येथे भीमसेन जोशी संगीत महोत्सव*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *हिंगोली बाजार समिती बरखास्त, संचालकांची जिल्हा उपनिबंधकांना दमदाटी, १० जणांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचे पैसे एकत्र, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्याचे 3 हजार याच महिन्यात जमा होण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुण्याच्या अश्विनी केदारीचा दुर्दैवी मृत्यू, 2023 च्या PSI परीक्षेत राज्यात अव्वल, पण आयुष्याची झुंज ठरली अपयशी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *जागतिक तिरंदाजीच्या कम्पाउंड स्पर्धेत भारताने पहिल्यांदाच सांघिक सुवर्ण पदक जिंकले. दक्षिण कोरियातील ग्वांगजू येथे झालेल्या स्पर्धेत भारताने फ्रान्सवर 235-233 असा निर्णायक विजय मिळवला, प्रथमेश फुगेची तुफान कामगिरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 महेश ठाकरे, राज्याध्यक्ष, प्रहार शिक्षक संघटना 👤 श्रीकांत पाटील, SBI, धर्माबाद 👤 गणेश कल्याणकर, बिल्डर, नांदेड 👤 पंढरीनाथ डोईफोडे लोणारकर 👤 उमाकांत कोटूरवार, धर्माबाद 👤 मारोती ताकलोर👤 आकाश गाडे, येवती 👤 रमेश पेंडकर 👤 किशन मटकर *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 69*डोके वळवले की बोलतो**क्षणात थंड, क्षणात गरम होतो**बोलणं मात्र थेंबथेंबचं**नाव ओळखा या मित्राचं.*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - घड्याळ ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अभ्यास आणि कष्ट यामुळे असाध्य गोष्टी सहजसाध्य करता येतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) नुकत्याच कोणत्या जगविख्यात आध्यात्मिक गुरूला महाराष्ट्र सरकारकडून 'राज्य अतिथी दर्जा' देण्यात आला ?२) 'भारताचे प्रवेशद्वार' असे कोणत्या स्मारकाला म्हटले जाते ?३) गेटवे ऑफ इंडिया हे स्मारक कोणाच्या भारतभेटीच्या स्मरणार्थ बांधण्यात आले होते ?४) सर्वप्रथम अस्तित्वात आलेले भाषिक राज्य कोणते ?५) 'शिक्षणाचा झिरपता सिद्धांत' कोणी मांडला ? *उत्तरे :-* १) संत मोरारीबापू, कथावाचक २) गेटवे ऑफ इंडिया ३) ब्रिटिश राजा पाचवा जॉर्ज व राणी मेरी ४) आंध्र प्रदेश ( १ ऑक्टोबर १९५३ ) ५) लॉर्ड मेकॉले*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 शैवाल/शेवाळ (अल्गी) 📙 सर्वात साधा वनस्पतीचा प्रकार म्हणजे शैवाल. मुख्यत: अपुष्प व बीजहीन या प्रकारात ही वनस्पती मोडते. गोड्या वा खाऱ्या पाण्यात वाढणारी ही वनस्पती आहे. जेथे मुबलक पाणी आहे, तेथे शैवाल असणारच. एखादा खडबडीत आधार शोधून या वनस्पतीची वाढ सुरू होते. गोड्या पाण्यातील शैवालाचा रंग हिरवा असतो, तर समुद्र शेवाल लालसर तपकिरी रंगावर असते.हरितद्रव्याचा वापर करून सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने ही वनस्पती स्वतःचे अन्न बनवते. त्यावरच तिची वाढ व पोषण अवलंबून असल्याने पाण्यात जेथवर सूर्यप्रकाश पोहोचतो, तेथेवरच शेवाळाची वाढ झालेली दिसून येते. अतिसूक्ष्म सागरी शेवाळाच्या खाद्यावर छोटे मासे वाढतात. प्लांक्टन वनस्पती या नावाने ती ओळखली जाते.साचलेल्या गोड्या पाण्यावर अनेकदा या वनस्पतीचा थर साचलेला आढळून येतो. एकात एक धागे व तंतू गुंतत जाऊन हा सलग थर एखादा गालीचा पसरावा, तसा पसरलेला असतो. विविध तापमानाच्या पाण्यात तगून राहणे हे तिचे प्रमुख वैशिष्ट्य मानता येईल. जवळपास शून्याची रेंगाळणारे बर्फाळ पाणी असो किंवा एखाद्या उष्ण झर्यामुळे गरम झालेले पाणी असो, दोन्हींमध्ये शैवाल असणारच. एवढेच काय, पण एखादा डोंगरकड्यावरून वाहणारा प्रवाह असेल, तर त्याच्या संपूर्ण उतारावरही ही वनस्पती आढळते.साऱ्या जगातील विविध समुद्रांतील समुद्रशैवालाचे ७००० विविध प्रकार आजवर सापडले आहेत. पाण्याचे व शैवालाचे अतूट नाते आहे, असे समजावयास हरकत नाही.निळे व हरित शैवाल पृथ्वीतलावरील अगदी पुरातन स्वरूपाचे सजीव अवशेष मानले जातात. साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी सापडलेल्या अश्मीभूत अवशेषात शैवाल सापडले असून त्याआधीचे सजीव आज तरी ज्ञात नाहीत.पृथ्वीच्या अगदी सुरुवातीच्या काळाकडे वळले तर पाण्यात सजीवांची सुरुवात झाली. त्यांतील पाण्याबाहेर पडलेली पहिली वनस्पती म्हणजे शेवाळे. पाण्यातील शेवाळाची एक जात म्हणजे प्लांक्टन. जमिनीवर आली की तिला शेवाळे वा मॉस म्हणतात. अशी ही अगदी पुरातन पण प्राथमिक स्वरूपाची वनस्पती बुरशीपेक्षा वेगळी असते. सहसा शेवाळाचे एकच रोप सापडणार नाही; कारण एकाच वेळी हवेतून, पाण्यातून, वाऱ्याद्वारे पसरलेल्या असंख्य स्पोअर्सद्वारे ही वनस्पती अन्य ठिकाणी पसरते व रुजते. त्यामुळे एका जागी पडलेली डझनावारी स्पोअर्स पडून तशीच ओलाव्याची वाट पाहत राहतात. जेव्हा पाऊस, ओल, पाण्याचा पुरेसा पुरवठा मिळेल, तेव्हा ती लगेच रुजतात. त्यांची मुळे थोडय़ाशाही खडबडीत भागात झटकन पकड घेतात. खरे म्हणजे मुळे म्हणण्यापेक्षा त्यांच्या केसाइतक्या बारीक केशवाहिन्या खडबडीत भागाच्या अगदी छोटय़ाशा भोकातही पकड मिळवतात.शेवाळाची वाढ फार झपाट्याने होते. आठवड्याभरापूर्वी स्वच्छ दिसणारा एखादा खडक पावसाळय़ात बघताबघता हिरवट दिसू लागतो. महिन्याभराने त्याच्यावरचा बोटभर जाडीचा हिरवागार गालीचा मन मोहून टाकतो. पावसाळा संपता संपता त्यालाच छोटे छोटे दांडे येऊन त्याच्या टोकाला असलेल्या पिशवीतून पुन्हा स्पोअर्स बाहेर पडतात. काही वेळा पावसाचे थेंब या पिशव्या उघडण्याचे काम करतात. आता मूळ वनस्पती वाळून गेली व ती वाळल्यामुळे करड्या रंगाचे तुकडे पडले, तरी पुढच्या पुनरुत्पादनाची सोय झालेली असते.पर्जन्यवनांमध्ये शेवाळे सर्वत्र आढळते. दाटच्या दाट थर असलेले शेवाळे हे झाडांवरही खूप उंचापर्यंत पसरलेले असते. वाळलेले ओंडके तर शेवाळलेलेच असतात. शेवाळ्यावरून पाय घसरून आपटी खाल्ल्याची आठवण नसलेले मूल क्वचितच आढळते, नाहीत का ?‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समयासी सादर व्हावे l देव ठेविले तैसे राहावे llकोणे दिवशी बसून हत्तीवर lकोणे दिवशी पालखी सुभेदार lकोणे दिवशी पायांचा चाकर l चालून जावे llकोणे दिवशी होईल सद्गुरूची कृपा lकोणे दिवशी चुकती जन्माच्या खेपा lकोणे दिवशी सावत्याचा बापा l दर्शन द्यावे ll - सावता माळी ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जगात जर सर्वजण सुखी असते तर दु:ख,वेदना, पिडीत, अडीअडचणी दिसले नसते.माणसाचे जीवन हे सुख, दु:खाने भरलेले आहे. म्हणून कोणी दु:खात असेल तर त्यांच्याकडे बघून पाठ फिरवू नये.व कोणी सुखात असतील तर त्यांनी अती माजू नये.परिस्थिती बघून त्या प्रकारे जगण्याचा प्रयत्न करावा. व एकमेकांना साथ देऊन या मानवी जीवनाचे सार्थक करावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*राजा जनक आणि ऋषि अष्टावक्र*राजा जनक राजा असूनही त्यांना राज वैभवात आसक्ती नव्हती. लोभ मोहापासून ते सदैव दूर राहत. विनम्रता त्यांच्या स्वभावात होती. त्यामुळे ते आपले दोष दूर करण्याचा प्रयत्न करत असत. आत्मशोध घेण्याचा त्यांचा सदैव प्रयत्न सुरुच असे. एकदा ते नदी काठावर एकांतात बसून ‘सोऽहम’ चा जप करत होते. मोठ्या आवाजात त्यांचा जप सुरु होता. तेवढ्यात तेथून अष्टावक्र ऋषि चालले होते. ते परमज्ञानी असल्याने त्यांना राजा जनकाचा जप ऐकून ते जागेवरच थांबले व एका हातात छडी घेऊन थोडे दूर अंतरावर उभे राहिले. मग मोठ्याआवाजात तेही बोलू लागले,’’माझ्या हातात कमंडलू आहे आणि माझ्या हातात छडी आहे’’ राजा जनकाच्या कानात ऋषींच्या बोलण्याचा आवाज गेला पण त्याने आपला जप सुरुच ठेवला. अष्टावक्रही ही गोष्ट जोरजोरात बोलत राहिले. शेवटी जनकाने जप थांबवून विचारले,’’मुनिवर, हे तुम्ही मोठमोठ्याने काय सांगत आहात’’ अष्टावक्र जनकाकडे पाहून हसले आणि म्हणाले,’’माझ्या हातात पाण्याचा कमंडलू आहे, माझ्या हातात छडी आहे’’ राजा जनक आश्चर्यात पडला व विचारू लागला,’’ महाराज अहो हे तर मलाही दिसत आहे की तुमच्याजवळ छडी आणि कमंडलू आहे पण हे दिसत असतानासुद्धा तुम्ही मोठ्याने ओरडून का सांगत आहात.’’ तेव्हा अष्टावक्रांनी जनक राजांना समजाविले,’’ राजन, माझ्याजवळ असणारा कमंडलू आणि छडी दिसत असतानासुद्धा ओरडून सांगणे हे जसे मूर्खपणाचे आहे तसेच तुमचे सोऽहम उंचआवाजात म्हणणे आहे. मंत्राला घोकण्याने काहीच फळ मिळत नाही. मंत्र आत्मसात करणे किंवात्याला आतल्या चेतनेशी जोडल्यावरच त्याचे फळ मिळते.’’*तात्पर्य :- कोणतेही ज्ञान घोकंपट्टी करून मिळवण्यापेक्षा ते आत्मसात करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. कोरडे पाठांतर काहीच कामाचे नसते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment