✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 22 सप्टेंबर 2025💠 वार - सोमवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2024/10/tulajabhavani.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :- • १४९९: बेसलचा तह झाला आणि स्वित्झर्लंड स्वतंत्र राष्ट्र बनले.• १६६०: शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून पन्हाळगड सिद्दी जौहरच्या ताब्यात देण्यात आला.• १८८८: द नॅशनल जिऑग्रॉफिक मासिकाचा पहिला अंक प्रकाशित.• १९३१: नेपाळचे राजपुत्र हेमसमशेर राणा आणि वीर सावरकर यांची भेट.• १९६५: दुसरे काश्मीर युद्ध – संयुक्त राष्ट्रसंघाच्या युद्धबंदी आदेशानंतर भारत पाकिस्तान मधील दुसरे काश्मीर युद्ध थांबले.• १९८०: इराकने इराण पादाक्रांत केले.• १९८२: कलावैभव निर्मित, जयवंत दळवी लिखित व रघुवीर तळाशिलकर दिग्दर्शित पुरुष या नाटकाचा पहिला प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिर येथे झाला.• १९९५: नागरिकानां घरात अथवा कार्यालयात राष्ट्रध्वज फडकाविण्याचा अधिकार असण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय.• १९९५: श्रीलंकेच्या हवाई दलाने नागरकोवेल येथे एका शाळेवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात कमीतकमी ३४ जण ठार झाले.• १९९८: सुनील गावसकर यांना महाराष्ट्र भूषण सन्मान जाहीर.• २००३: नासाच्या गॅलिलिओ या अंतराळ यानाने गुरूच्या वातावरणात प्रवेश करीत प्राणार्पण केले.• १९४१: युक्रेन होलोकॉस्ट - जर्मन युक्रेनमधील विनितसिया येथे किमान ६ हजार ज्यूं लोकांची हत्या केली.• १९३९: दुसरे महायुद्ध - पोलंडवरील यशस्वी आक्रमण साजरे करण्यासाठी संयुक्त जर्मन-सोव्हिएत लष्करी परेड आयोजित करण्यात आली.• १९३१: नेपाळचे राजपुत्र हेमसमशेर राणा आणि वीर सावरकर यांची भेट.• १९१४: जर्मन पाणबुडीने ब्रिटीश क्रूझर जहाजे बुडवले, त्यात किमान १५०० दर्यावर्दी लोकांचे निधन.• १८९१: फिनलंड या देशातील पहिला जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित झाला🎂 जन्म :- • १८६९: कायदेतज्ञ, सूक्ष्मबुद्धीचे राजकारणी, भारत सेवक समाजाचे अध्यक्ष व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल १९४६)• १८७६: फ्रांसचे पंतप्रधान आंद्रे तार्द्यू यांचा जन्म.• १८७८: जपानचे पंतप्रधान योशिदा शिगेरू यांचा जन्म.• १८८५: ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान बेन चीफली यांचा जन्म.• १८८७: थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा कुंभोज कोल्हापूर येथे जन्म. (मृत्यू: ९ मे १९५९)• १९०९: विनोदी लेखक, विडंबनकार दत्तू बांदेकर ऊर्फ सख्याहरी यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑक्टोबर १९५९)• १९१५: मराठी चित्रपटसृष्टतील ख्यातनाम दिग्दर्शक अनंत माने यांचा जन्म. (मृत्यू: ९ मे १९९५)• १९२२: नोबेल पारितोषिक विजेते चिनी भौतिकशास्त्रज्ञ चेन निंग यांग यांचा जन्म.• १९२३: ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व उद्योगपती रामकृष्ण बजाज यांचा जन्म.• १९६४: भारतीय फुटबॉलपटू नरेंदर थापा यांचा जन्म (मृत्यू : ५ ऑगस्ट २०२२)• १९२८: भारतीय राजकारणी विठ्ठलराव गाडगीळ यांचा जन्म• १९१६: कंबोडियाचे जनरल आणि राजकारणी, कंबोडियाचे २६ वे पंतप्रधान इन तम यांचा जन्म (मृत्यू : १ एप्रिल २००६)🌹 मृत्यू :- • १९२०: भारतीय चित्रपट अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन (जन्म: २ जुलै १९४१)• १९३३: भारतीय बंगाली कवियत्री, समाजसुधारक, ब्रिटीश भारतात पदवीधर होणाऱ्या पहिल्या महिला कामिनी रॉय यांचे निधन (जन्म: १२ ऑक्टोबर १८६४)• १९५६: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ विल्हेल्म ऑस्टवाल्ड यांचे निधन (जन्म: २ सप्टेंबर १८५३)• १९६५: जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिजचे रचनाकार ओथमर अम्मांन यांचे निधन (जन्म: २६ मार्च १८७९)• १९६९: मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष ऍडोल्फो लोपे मटियोस यांचे निधन.• १९७०: बंगाली लेखक शरदेंन्दू बंदोपाध्याय यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १८९९)• १९९१: हिन्दी व मराठी चित्रपटातील अभिनेत्री दुर्गा खोटे यांचे निधन. (जन्म: १४ जानेवारी १९०५)• १९९४: भावगीतगायक व संगीतकार जी. एन. जोशी यांचे निधन. (जन्म: ६ एप्रिल १९०९)• २००२: डंकिन डोनट्सचे स्थापक विल्यम रोसेनबर्ग यांचे निधन (जन्म: १० जून १९१६)• २००७: ब्राझिलचा फुटबॉल खेळाडू बोडिन्हो यांचे निधन.• २०११: भारतीय क्रिकेट कप्तान आणि पतौडी संस्थानचे शेवटचे नबाब मन्सूर अली खान पतौडी यांचे निधन. (जन्म: ५ जानेवारी १९४१)• २०११: केप व्हर्दे देशाचे पहिले अध्यक्ष अरिसिदास परेरा यांचे निधन (जन्म: १७ नोव्हेंबर १९२३)• २०२२: भारतीय-कॅनेडियन विद्वान पाल सिंग पुरेवाल यांचे निधन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नवरात्र विशेष *तुळजापूरची तुळजाभवानी* ..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधानांनी 20 मिनिटे देशाला संबोधित करताना म्हणाले, उद्यापासून जीएसटी बचत महोत्सव, फक्त तेच खरेदी करा ज्यामध्ये देशाचे परिश्रम आहेत*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अकोल्यातील 248 शेतकऱ्यांना दिलासा, तीन महिन्यांत 2017 मधील कर्जमाफी देण्याचे उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात सलग 2 वेळा भूकंप, 2.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, धोलावीराच्या पूर्व-आग्नेय दिशेने 24 किलोमीटर अंतरावर नोंदवला गेला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *5 वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना 2023 चा सर्वोत्कृष्ट दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर, *•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव, 5 ऑक्टोबरपासून तीन दिवस ग्रामसफाई, कीर्तन, भजन आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मिथुन मनहास यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड जवळपास निश्चित*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशिया कप 2025 - सुपर 4 च्या पहिल्या सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेला 4 विकेटने हरविले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 आनंद दुड्डे, धर्माबाद 👤 श्याम सुरणे 👤 सुनील फाळके👤 गंगाधर चिमटलवार *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 81*छोटेसे घर, छत नाही* *आत खूप आठवणी* *परंतु देव नाही**सांगा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - प्रतिमा ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मौन म्हणजे असे तत्व आहे की, ज्यांत महान गोष्टी एकाच वेळी निर्माण होतात व शेवटी त्या जीवनाच्या प्रकाशात संपूर्ण व भव्य बनवून साकार होतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) गटविकास अधिकाऱ्याची ( BDO ) नेमणूक कोणाकडून केली जाते ?२) ATM या शब्दातील M चा अर्थ काय आहे ?३) त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाला काय म्हणतात ?४) समुद्राच्या पाण्यापासून शुद्ध पाणी कोणत्या पद्धतीने काढता येते ?५) AI मंत्रीची निवड करणारा जगातील पहिला देश कोणता ? *उत्तरे :-* १) राज्यशासन २) Machine ३) परिवर्तुळ ४) उर्ध्वपातन पद्धती ५) अल्बेनिया*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💉 *रक्त केव्हा गोठतं ?* 💉जेव्हा जेव्हा एखादी रक्तवाहिनी तुटते तेव्हा तेव्हा तिच्यातला रक्त बाहेर वाहू लागतं. रक्तस्राव सुरू होतो. हे अपघातापोटी घडतं किंवा शस्त्रक्रिया करताना जाणून बुजून केलेलं असतं. असा रक्तस्त्राव अनिर्बंधरित्या होऊ देणं शरीरात परवडणारं नाही. त्यामुळे शल्यविशारद चिमटा लावून लगेच त्या रक्तवाहिन्यांची उघडी तोंड बंद करतात, रक्तस्रावाला अटकाव करतात. पण अपघातांमुळे जखम होते तेव्हा काय होतं ? तेव्हा निसर्गच मदतीला धावतो. अश्या रक्तस्रावाचा बंद बंदोबस्त करणारी शरीरातली निसर्गदत्त प्रणाली कामाला लागते.रक्तामध्ये असलेल्या प्लेटलेट्स या नावांना ओळखल्या जाणाऱ्या इटुकल्या पेशींची या रक्त गोठण्याच्या क्रियेत कळीची भूमिका असते. त्या तुटलेल्या रक्तवाहिनीच्या तोंडाजवळ तातडीनं धावून जातात. त्याच वेळी एका रासायनिक प्रक्रियेनं या पेशींच्या बाह्य आवरणात बदल होऊन त्या चिकट होतात. रक्तवाहिनीच्या आतल्या भागाला त्या चिकटुन बसतात. तसंच एकमेकींशी चिकटून एक गुठळी बनवतात. पण ही गुठळी स्थिर करण्यासाठी फायब्रिन या प्रथिनाचं एक जाळंही तयार होतं. रक्तातल्या द्रव पदार्थात असलेलं प्रोथ्राॅम्बिन नावाचं प्रथिन कामाला लागतं. त्याच्या पासुन थाॅम्बिन नावाचं प्रथिन तयार होतं आणि त्याच्यापासुन पायरी पायरीनं फायब्रीन या धाग्यासारख्या प्रथिनाची निर्मिती होते.या सगळ्यात क्लाॅटिन्ग फॅक्टर्स या नावानं ओळखल्या जाणार्या नऊ घटकांचीही महत्वाची भुमिका असते. हे नऊ घटक एका विशिष्ट क्रमानं काही जीव रासायनिक प्रक्रिया घडवुन अाणतात. पहिल्या घटकानं कार्यान्वित केलेली प्रक्रिया पार पडेपर्यंत दुसर्या पायरीवरची प्रक्रिया सुरूच होऊ शकत नाही. तिच्याशिवाय तिसरी नाही. अशा आखुन दिलेल्या क्रमानंच या प्रक्रिया पार पडतात. त्यातली सर्वात शेवटची प्रक्रिया पार पडल्याशिवाय रक्ताची गूठळी तयार होत नाही. यापैकी कोणत्याही पायरीवरची घटना व्यवस्थित पार पडली नाही तर त्यांची साखळी तुटते आणि रक्त गोठत नाही. रक्तगळीचा म्हणजेच हिमोफेलियाचा विकार झालेल्या व्यक्तिंच्या शरीरात आठव्या क्रमांकाचा घटक तयारच होत नाही. तो तयार करण्याचा आराखडा ज्या जनुकाजवळ असतो ते जनुकच त्यांच्या शरीरातुन बेपत्ता असतं. त्यामुळे मग जराशी जखम झाली तरी त्यांचं रक्त जे वाहायला लागतं ते थांबतच नाही. आता कृत्रिमरित्या हा आठवा घटक तयार करण्याची पद्धती विकसित झालेली असल्यामुळे तो बाजारात मिळू शकतो. त्याच्या मदतीने या विकाराने ग्रस्त झालेल्या व्यक्तींना दिलासा देता येतो.आवश्यकता नसताना रक्त गोठणे हेही शरीराला घातक असतं. त्यासाठी यकृतातून हेपॅरीन नावाच्या रसायनाचा पाझर होत असतो. ते रक्ताची गुठळी न होता त्याचा प्रवाह व्यवस्थित होत राहील याची दक्षता घेतं. पण ज्यावेळी जखम होते त्यावेळी रक्तप्रवाहातून वाहणारं थ्राॅम्बोकायनेज हे विकर हॅपेरीनच्या कामात तात्पूरती बाधा आणून रक्त गोठवायला मदत करतं.*बाळ फोंडके यांचा 'केव्हा ?' या पुस्तकातून*👆🏼*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••किती आनंदी आनंद याझोपडीत माझ्या || धृ ||भूमीवरी पडावे आकाश पांघरावे |पायाकडे पहावे या झोपडीत माझ्या || १ ||पेट्या आणि तिजोऱ्या त्यातुनी होती चोऱ्या |दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या || २ ||येत जरी सुखे या जाता तरी सुखे जा |तुकड्या वरी बसाया या झोपडीत माझ्या || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणालाही शब्द देताना किंवा बोलताना थोडा विचार करूनच बोलावे किंवा शब्द द्यावे काही अडचणींमुळे किंवा दुर्लक्षित पणामुळे तो दिलेला शब्द पूर्ण करता आला नाही तर, समोरच्या व्यक्तीच्या दृष्टीतून उतरण्याची शक्यता असते. काम कोणतेही असो ते करताना अडचणी येतात. पण,त्याच अडचणीवर मात करून ते कार्य पूर्ण करायचे असतात त्यामुळे दुसऱ्याला दिलेल्या शब्दाचा मान तर राहतोच सोबतच स्वतःलाही विशेष समाधान मिळतो. म्हणून कोणालाही शब्द देताना थोडा विचार करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *माणसातील देव* *एका गावात एक चर्च होते. एक दिवस नदीला पूर आला. पाणी गावात गुडघ्यापर्यंत आले. चर्चच्या फादरना न्यायला एक जीप आली. माणसे म्हणाली, फादर चला. बहुतेक पाण्याने सगळे वाहून जाईल. फादर म्हणाले, 'मला माझा येशूच येऊन वाचवेल.' जीप निघून गेली. नंतर पाणी वाढल्यानंतर एक बोट आली. बोटीतील लोक फादरना न्यायला आले. फादरनी नकार दिला. पाणी इतके वाढले की फादरना चर्चच्या छप्परावर जावे लागले. मग एक हेलिकॉप्टर वरतून घिरट्या घालू लागले. त्यातून एक दोर आला. हेलिकॉप्टरमधले लोक म्हणाले, 'फादर आता तरी दोर पकडा आणि जीव वाचवा.' फादर म्हणाले, 'माझा येशूच मला येऊन वाचवेल.' यानंतर एकच मोठी लाट आली आणि फादर मृत्यमुखी पडले. स्वर्गात गेल्यावर त्यांनी येशूला विचारले, 'मी इतकी प्रार्थना केली, पण तू मला वाचवले नाहीस.' येशू म्हणाले, 'मी प्रथम जीप घेऊन आलो होतो. नंतर बोट आणि नंतर हेलिकॉप्टर. पण तूच मला काही ओळखले नाहीस.'**तात्पर्य :- देव काही प्रत्यक्ष येऊन मदत करत नाही. तो माणसातच शोधावा लागतो.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment