✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 20 सप्टेंबर 2025💠 वार - शनिवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1B19GDpWto/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩महत्वाच्या घटना :- • १६३३: पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्याचे प्रतिपादन केल्याबद्दल गॅलिलिअो यांच्यावर खटला चालवण्यात आला.• १८५७: १८५७ चा राष्ट्रीय उठाव – ब्रिटिश (ईस्ट इंडिया कंपनीच्या) सैन्याने दिल्ली परत ताब्यात घेतली.• १९१३: वीर वामनराव जोशी यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईत झाला.• १९४६: पहिले कान्स फिल्म फेस्टिव्हल आयोजित केले गेले.• १९७३: टेक्सास येथे बिली जीन किंग या महिलेने बॉबी रिग्ज या पुरुषाचा लॉन टेनिस मध्ये पराभव केला.• १९७७: व्हिएतनामचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.• २००१: अमेरिकेने दहशतवादाविरुद्ध युद्ध पुकारले.• २०१७: मारिया चक्रीवादळ - या वादळामुळे पोर्तो रिकोमध्ये किमान २,९७५ लोकांचे निधन.• १९९०: दक्षिण ओसेशिया - देशाने जॉर्जियापासून आपले स्वातंत्र्य घोषित केले.• १९६५: बुर्कीची लढाई - १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान भारतीय सैन्याने डोगराई ताब्यात घेतले.• १९४२: युक्रेनमधील होलोकॉस्ट - दोन दिवसांत किमान ३ हजार ज्यूं लोकांची हत्या केली.• १९४१: लिथुआनियामधील होलोकॉस्ट - लिथुआनियन नाझी आणि स्थानिक पोलिसांनी ४०३ ज्यूं लोकांची सामूहिक हत्या केली.• १८९३: चार्ल्स ड्युरिया - यांनी त्याच्या भावासोबत पहिल्या अमेरिकन-निर्मित गॅसोलीन-चालित ऑटोमोबाईलची रोड-चाचणी केली.• १८५४: क्रिमियन युद्ध: - अल्माची लढाई: ब्रिटीश आणि फ्रेंच सैन्याने रशिय सैन्याचा पराभव केला.🎂 जन्म :- • १८९७: मराठी पत्रकार सकाळ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष नानासाहेब परुळेकर तथा नारायण भिकाजी परुळेकर यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी १९७३)• १९०९: गुजराती लेखक व समीक्षक गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर यांचा जन्म.• १९११: भारतीय तत्त्वज्ञानी आणि कार्यकर्ते श्रीराम शर्मा यांचा जन्म (मृत्यू: २ जून १९९०)• १९१३: कवी वा. रा. कांत यांचा जन्म.• १९२१: क्रिकेटपटू पनानमल पंजाबी यांचा जन्म.• १९२२: चरीत्र वाङ्मयाचे संशोधक द. ना. गोखले यांचा जन्म.• १९२३: भारतीय अभिनेते आणि निर्माते अक्किनेनी नागेश्वर राव यांचा जन्म (मृत्यू: २२ जानेवारी २०१४)• १९२५: थायलँडचा राजा आनंद महिडोल तथा राम (सातवा) यांचा जन्म (मृत्यू: ९ जून १९४६)• १९३४: इटालियन चित्रपट अभिनेत्री सोफिया लाॅरेन यांचा जन्म.• १९३४: भारतीय व्यंगचित्रकार आणि पत्रकार राजिंदर पुरी यांचा जन्म. (मृत्यू: १६ फेब्रुवारी २०१५)• १९४४: क्रिकेटपटू रमेश सक्सेना यांचा जन्म.• १९४६: भारतीय वकील आणि न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांचा जन्म.• १९४९: चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांचा जन्म.• १९०९: गुजराती लेखक व समीक्षक, पद्मश्री गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर यांचा जन्म. (मृत्यू: १० जून १९०६ – पुणे)• १९४९: भारतीय राजकारणी, केरळचे आमदार प्रयार गोपालकृष्णन यांचा जन्म (मृत्यू : ४ जून २०२२)• १९४२: भारतीय क्रिकेटपटू, रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे राजिंदर गोयल यांचा जन्म (मृत्यू : २१ जून २०२०)• १६०८: फ्रेंच धर्मगुरू, सोसायटी ऑफ सेंट सल्पिसचे संस्थापक जीन-जॅक ऑलिअर यांचा जन्म (मृत्यू : २ एप्रिल १६५७)• १४८६: वेल्सचे राजकुमार आर्थर यांचा जन्म (मृत्यू : २ एप्रिल १५०२)🌹 मृत्यू :- • १८१०: ऊर्दू शायर मीर तकी मीर यांचे निधन.• १९१५: विदर्भातील सतपुरुष गुलाबराव महाराज यांचे महानिर्वाण. (जन्म: ६ जुलै १८८१)• १९२८: केरळमधील समाजसुधारक नारायण गुरू यांचे निधन.• १९३३: विख्यात थिऑसाॅफिस्ट आणि भारतीय राजकारण, धर्म, शिक्षण व समाजसुधारक अ‍ॅनी बेझंट यांचे निधन. (जन्म: १ ऑक्टोबर १८४७)• १९७९: चेकोस्लोव्हेकियाचे राष्ट्राध्यक्ष लुडविक स्वोबोदा यांचे निधन.• १९९६: कवी, कथाकार, सामिक्षक, विचारवंत दगडू मारुती पवार उर्फ दया यांचे निधन.• १९९७: चित्रपट अभिनेते कल्याण कुमार गांगुली तथा अनुप कुमार यांचे निधन. (मृत्यू: ९ जानेवारी १९२६ - खांडवा, मध्य प्रदेश)• २०१५: भारतीय उद्योजक जगमोहन दालमिया यांचे निधन. (जन्म: ३० मे १९४०)• २०१४: भाषाशास्त्रज्ञ तसेच साहित्य समीक्षक - पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कार अशोक केळकर यांचे निधन (जन्म: २२ एप्रिल १९२९)• १९९६: झांबिया देशाचे १ले उपाध्यक्ष, सैनिक आणि राजकारणी रुबेन कामांगा यांचे निधन (जन्म: २६ ऑगस्ट १९२९)••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भीक मागणे एक दुष्क्रूत्य*कुणापुढे ही हात पसरणे आणि भीक मागणे हा एक सोपा धंदा झाला आहे. ..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *शीख समुदायाच्या शिष्टमंडळाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *उत्कृष्ट जिल्हा परिषदाना मिळणार 5, 3, 2 कोटींची पारितोषिके, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घोषणा, म्हणाले- गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना देणे हा मुख्य उद्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *'मृत्युंजय'कार शिवाजीराव सावंत स्मृती पुरस्काराने इतिहास अभ्यासक डॉ. केदार फाळके यांचा गौरव*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सोलापूर-मुंबई व सोलापूर-बंगळूरू विमानसेवा 15 ऑक्टोबर पासून होणार सुरु*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *रोहित जैन यांना टॅक्स लॉयर ऑफ द इयर पुरस्कार, लंडन येथे झाला सन्मान; इकॉनॉमिक्स लॉज प्रॅक्टिसचे संस्थापक रोहित जैन मूळचे हिंगोलीचे*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *प्रसिद्ध तामिळ अभिनेते रोबो शंकर यांचे निधन, कमल हसन ने व्यक्त केलं दुःख*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ऑलिम्पिक असोसिएशनवर कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा आरोप, मनमानी कारभाराविरोधात क्रीडा संघटनांचे 23 सप्टेंबरला आंदोलन*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संगीता देशमुख, मा. शिक्षिका तथा साहित्यिक, वसमत👤 पांडुरंग कोकरे, शिक्षक तथा साहित्यिक, सोलापूर👤 शीतल प्रभू, प्रिन्सिपल, इंग्लिश स्कुल, मुंबई 👤 उमेश वडजे पाटील 👤 संतोष पटणे, धर्माबाद *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 80*"नाक आहे पण वास घेत नाही**तोंड आहे पण काही खात नाही**पाय आहेत पण चालत नाही**सांगा बरं मी कोण आहे ?"*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - आग ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••खरोखर महान तोच की जो कोणावर वर्चस्व गाजवत नाही व त्याच्यावर कोणी वर्चस्व गाजवू शकत नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) देवी दुर्गा आणि महिषासुर यांच्या नऊ दिवसांच्या युद्धात देवीच्या विजयाचे प्रतीक म्हणून नवरात्रीच्या काळात कोणता खेळ खेळला जातो ?२) राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती कितव्या कलमाद्वारे करतात ?३) 'घोडखिंड' कोणत्या नावाने इतिहासात अजरामर झाली ?४) DBT चा फुल फॉर्म काय आहे ?५) कापसाच्या पानावर काळे ठिपके कशामुळे पडतात ? *उत्तरे :-* १) गरबा २) कलम १५५ ३) पावनखिंड ४) Direct Benefit Transfer ५) जिवाणू*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *जायरोस्कोप म्हणजे काय ?* 📙 **************************होकायंत्र ज्यावेळी स्थिर राहू शकत नाही, हेलकावे, वळणे, हिंदकळणे यांमुळे त्याचा लोहचुंबक दिशा नीट दाखवायला जेव्हा असमर्थ ठरू लागतो, त्या वेळी जाइरोस्कोप वापरावा लागतो. जमिनीला समांतर स्वरूपात होकायंत्र स्थिर असेल, तेव्हा त्यावरून नेमकी दिशा ज्ञात करून घेता येते. पण पाण्यावर जेव्हा एखादे जहाज वादळात सापडून सतत हेलकावू लागते, तेव्हा आपण पकडलेली दिशा कोणती, असा प्रश्न उद्भवतो. अशीच काहीशी स्थिती विमानात येते.जायरोस्कोप म्हणजे एक जड, स्वतःभोवती फिरणारे चक्रच असते. एका विशिष्ट अक्षाभोवती हे चक्र अत्यंत वेगाने फिरू शकते. या अक्षाची दिशा त्याभोवती असलेल्या मोजपट्टीवर पाहिजे त्या ठिकाणी स्थिर करून मग हे चक्र फिरवायला सुरुवात करतात. थोडक्यात म्हणजे होकायंत्रावरून प्रवासाचे अक्षांश रेखांश पक्के ठरले की सुकाणूची दिशा पकडण्यासाठी जायरोस्कोप स्थिर करून त्याचे चक्र फिरवायला सुरुवात केली जाते. एकदा का चक्र वेगाने फिरू लागले की, याची दिशा हलवणे व त्याचा फिरणारा चक्राचा पृष्ठभाग अक्ष बदलून फिरणे ही जवळपास न होणारी गोष्ट बनते.चक्राने घेतलेला स्वतः भोवतीचा वेग केंद्रीभूत होऊन अशी काही अक्षाभोवती पकड घेतो की ती पकड हलणे व्यवहारत: अशक्य असते. यालाच जायरोस्कोपिक इनर्शिया' किंवा 'जडत्व' असे म्हणतात. यासाठी एकाच गोष्टीची आवश्यकता असते, ती म्हणजे चक्राचा फिरण्याचा वेग अबाधित राखणे. हा वेग जर काही कारणाने कमी होऊ लागला, तर मात्र ज्या आधारावर जायरोस्कोप उभा केलेला, आधारलेला असतो, त्यालाच तो संथपणे गोलाकार फेरी घालू लागतो.जायरोस्कोपचा वापर होकायंत्राच्या जोडीला सर्व प्रकारच्या लांब पल्ल्याच्या जल व हवेतील प्रवासासाठी केला जातो. होकायंत्र वाचणे व त्याचा वापर करणे हे तल्लख खलाशाचे व अधिकाऱ्याचे काम; पण या ऐवजी जाइरोस्कोप दाखवेल ती दिशा पकडणे ही मात्र कोणाही माणसाला जमणारी गोष्ट असू शकते. हाही महत्त्वाचा उपयोग नाही काय ? अंतराळ प्रवासात होकायंत्र बिनकामी ठरते; पण जाइरोस्कोप वापरता येतो.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••रूप पाहता लोचनीसुख झाले वो साजणी || १ ||तो हा विठ्ठल बरवातो हा माधव बरवा || २ ||बहुत सुकृतांची जोडीम्हणून विठ्ठले आवडी || ३ ||सर्व सुखांचे आगरबाप रखुमादेवी वर || ४ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणालाही शब्द देताना किंवा बोलताना थोडा विचार करूनच बोलावे किंवा शब्द द्यावे काही अडचणींमुळे किंवा दुर्लक्षित पणामुळे तो दिलेला शब्द पूर्ण करता आला नाही तर, समोरच्या व्यक्तीच्या दृष्टीतून उतरण्याची शक्यता असते. काम कोणतेही असो ते करताना अडचणी येतात. पण,त्याच अडचणीवर मात करून ते कार्य पूर्ण करायचे असतात त्यामुळे दुसऱ्याला दिलेल्या शब्दाचा मान तर राहतोच सोबतच स्वतःलाही विशेष समाधान मिळतो. म्हणून कोणालाही शब्द देताना थोडा विचार करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 📗 *बिरबलची मांजर*📗 ━━━━━━━━━━━━━━*बऱ्याच दिवसानंतर बादशाहाला आपल्या सरदाराची विचित्र परीक्षा घेण्याची लहर आली. त्याने आपल्या सरदाराना मांजरीची गोजिरवाणी पिल्लू दिली. तो म्हणाला आजपासून बरोबर सहा महिन्यांनी हि पिल्लू घेऊन दरबारात यायच आहे. ज्याचे मांजर श्रेष्ठ ठरेल त्याला बादशाह कडून मोठ बक्षीस दिल जाईल. प्रत्येक सरदार आपल्याला मिळालेले मांजराचे पिल्लू घेऊन घरी गेले. घरातल्या माणसाना त्यांनी बादशहा नि लावलेल्या बक्षीसाबद्दल सांगितले. मांजराला चांगली मिठाई व दुध खाऊ पिऊ घाला अशी घरातल्या माणसांना सूचना दिली. प्रत्येक सरदाराच्या घरी मांजराना खुराक चालू झाला. हळू हळू मांजराच्या अंगावर तेज येऊ लागलं ती चांगली गुबगुबीत दिसू लागली. मात्र बिरबलाने आपल्याला मिळालेला असा खुराक दिला नाही.* *घरातल्या साध्या अन्नावर त्याला वाढवीले, उंदीर पकडायला शिकवलं, बिरबलाचे मांजर उंदीर पकडण्यात तरबेज झाले. मात्र ते हडकुळे राहिले. अकबर बादशाहने एक चांगला दिवस ठरवून सर्व सरदारांना आपआपली मांजर दरबारात घेऊन यायला सांगितले. प्रत्येक जन आपआपली मांजर घेऊन दरबारात आला. अकबरान सर्व मांजरा वरून नजर फिरवली. बिरबलाच्या हातातील हडकुळे मांजर पाहून बादशाहाला हसू आले. आपले हसू दाबीत बादशहा म्हणाला "बिरबल सर्व सरदाराची मांजर गुबगुबीत दिसत असताना तुझे मांजर हडकुळे का ? बिरबल आपल्या मांजरी वरून हात फिरवत म्हणाला "खाविंद आपण मांजराची परीक्षा तर घ्या. उंदीर पकडन हे मांजराचे काम आहे. त्यात ते पटाईत असायला हवे. बादशाहने मान हलवली आणि नोकराला दरबारात उंदीर सोडायला सांगितले पंधरा वीस उंदीर दरबारात धाऊ लागले. प्रत्येक सरदाराने त्या दिशेने आपली मांजर सोडली. बिरबलाच्या मांजराने तर बिरबलाच्या हातातून उडी मारली. ते उंदराच्या मागे सुसाट धावत सुटले. तिने दोन तीन उंदीर मारले देखील इतर गलेलठ मांजरे फक्त आपल्या गोंडेदार शेपट्या फुगवून तशाच जागेवर बसून पाहून लागली. त्यांनी फक्त आपल्या मिशा फेंदारल्या होत्या आणि अंग फुगविले होते. सरदार त्यांना पुढे ढकलत होते. परंतु जागेवरून हलण्याची तयारी नव्हती. बादशाहने बिरबलच्या मांजराला श्रेष्ठ ठरवून बिरबलाला भले मोठ बक्षीस दिल.* •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment