✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 03 ऑक्टोबर 2025💠 वार - शुक्रवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~फ्रेश मॉर्निंग बुलेटिन समूहात join होण्यासाठी Link - https://chat.whatsapp.com/GgeQRfsgyQ18yrKVK0a44a?mode=ems_copy_t••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :- • १६७०: शिवाजी महाराजांनी दुसर्‍यांदा सुरत लुटली.• १७७८: ब्रिटिश दर्यावर्दी कॅप्टन जेम्स कूक अलास्का येथे पोहोचले.• १९३२: इराकला युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.• १९३५: जनरल डी. बोनोच्या नेतृत्त्वाखाली इटलीने इथिओपिया पादाक्रांत केले.• १९५२: युनायटेड किंग्डमने यशस्वीरित्या अण्वस्त्र शस्त्रांची चाचणी करून जगातील तिसरे परमाणु ऊर्जा सशस्त्र राष्ट्र बनले.• १९९०: पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनीचे एकत्रीकरण झाले.• १९९५: ओ.जे. सिम्पसनची आपल्या भूतपूर्व पत्‍नी निकोल सिम्पसन व तिचा मित्र रोनाल्ड गोल्डमनच्या खूनाच्या आरोपातून सुटका.🎂 जन्म :- • १९०३: हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते, समाजसुधारक आणि शिक्षण तज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांचा जन्म. (मृत्यू: २२ जानेवारी १९७२)• १९०७: निबंध, लघुकथा, कादंबरी, कविता आदी साहित्यप्रकार हाताळणारे लेखक नरहर शेषराव पोहनेरकर यांचा जन्म. (मृत्यू: २ सप्टेंबर १९९०)• १९१४: टीकाकार म. वा. धोंड यांचा जन्म. (मृत्यू: ५ डिसेंबर २००७)• १९४९: चित्रपट दिग्दर्शक जे. पी. दत्ता यांचा जन्म.🌹 मृत्यू :- • १९५९: विनोदी लेखक, विडंबनकार व स्तंभलेखक दत्तात्रय तुकाराम तथा दत्तू बांदेकर ऊर्फ सख्याहरी यांचे निधन. (जन्म: २२ सप्टेंबर १९०९)• १९९५: भारतीय लेखक व राजकारणी मा. पो. सी. यांचे निधन. (जन्म: २६ जुन १९०६)• १९९९: सोनी कार्पोरेशनचे संस्थापक अकिओ मोरिटा यांचे निधन. (जन्म: २६ जानेवारी १९२१)• २००७: सलमान खान आणि त्याचा बॉडीगार्ड यांच्या विरुद्ध एफआयआर नोंदविणारे रवींद्र पाटील यांचे टी. बी. रोगामुळे निधन.• २००७: भारतीय पत्रकार, लेखक, आणि शैक्षणिक एम. एन. विजयन यांचे निधन. (जन्म: ८ जून १९३०)• २०१२: सिक्कीमचे राज्यपाल, दिल्लीचे महापौर केदारनाथ सहानी यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर १९२६)• २०१२: भारतीय धर्मशास्त्रज्ञ आणि विद्वानअब्दुल हक अन्सारी यांचे निधन. (जन्म: १ सप्टेंबर १९३१)• २०२२: भारतीय राजकारणी, गोव्याचे आमदार पांडुरंग राऊत यांचे निधन (जन्म: १३ जुलै १९४६)••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चांगले शिक्षण आत्मविश्वास वाढवते. ते आपल्याला स्वप्न पाहण्याची शक्ती देते आणि ती स्वप्ने साध्य करण्याचे धाडस देते. ते आपल्याला भविष्याला तोंड देण्यासाठी आणि मजबूत, स्वतंत्र व्यक्ती बनण्यासाठी तयार करते. शिक्षणाविषयी अजून माहिती वाचण्यासाठी nasayeotikar ह्या नावाने google search करावे आणि वाचनाचा आनंद घ्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नागपूर - डॉ. हेडगेवार आणि बाबासाहेबांच्या विचारांमध्ये आश्चर्यकारक साम्य, RSS च्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे वक्तव्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *कोल्हापुरातील शाही दसरा मेळावा प्रमुख मान्यवर उपस्थित संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन 8 ऑक्टोबर रोजी होणार आहे. अशातच आता ठाणे ते नवी मुंबई विमानतळाला जोडणाऱ्या नव्या उन्नत (एलिव्हेटेड) रस्त्याला अंतिम मंजुरी देण्यात आली*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *प्रिसिक्रिप्शन वाचता येईल अशा मोठ्या अक्षरात लिहा, डॉक्टरांना हायकोर्टाचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुणे जिल्ह्यात मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भारत ‘अ’ संघाने पहिल्या  एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाचा 171 धावांनी केला पराभव, ज्यामध्ये श्रेयस अय्यर आणि प्रियांश आर्य यांच्या शतकांचा समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अहमदाबाद - पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी वेस्ट इंडिजचा संघ 162 धावावर सर्व बाद तर भारताने दोन गडी च्या मोबदल्यात 121 धावा केल्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 साईनाथ राचेवाड, तंत्रस्नेही शिक्षक, बिलोली 👤 विश्वनाथ अरगुलवार, धर्माबाद 👤 नागनाथ लाड 👤 शिवाजी पांडुरंग मुटकुले👤 नागेश क्यातमवार, तंत्रस्नेही शिक्षक, हिमायतनगर 👤 शंकर दरंगे👤 मारोती नरवाडे 👤 पांडुरंग यलमलवाड 👤 संदीप कडलग👤 सचिन लाडे, विशेष शिक्षक, धर्माबाद *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 90*चार खंडांचा एक शहर**चार विहीरी बीना पानी**18 चोर त्या शहरी 1 राणी**आला 1 शिपाई**सगळ्यांना मारुन मारून विहीरीत टाकी…*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - पेन ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भयाने व्याप्त असणारे या विश्वात दयाशील वृत्तीचा मनुष्यच निर्भयपणाने राहू शकतो.- भगवान बुद्ध*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) गुजरात राज्यातील एकूण जिल्हे किती ?२) गुजरात राज्याची राज्यभाषा कोणती ?३) गुजरात राज्यातील सर्वात उंच शिखर कोणते ?४) गुजरात राज्यातील सर्वात लांब नदी कोणती ?५) गुजरात राज्यातील नृत्य प्रकार कोणता ? *उत्तरे :-* १) ३४ जिल्हे २) गुजराती ३) गिरनार ४) नर्मदा ५) गरबा, दांडिया*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *आपल्याला भूक का लागते ?* 📙 आपलं शरीर सतत काम करत असतं. जेव्हा आपण विश्रांती घेत असतो किंवा झोपेत असतो तेव्हाही श्वसन, रक्ताभिसरण, हृदयाची धडधड यांसारख्या प्रक्रिया चालूच असतात. त्यामुळे शरीराला सतत ऊर्जेची गरज भासते. हिचा पुरवठा अखंड असण्यासाठी शरीराला वेळोवेळी पोषण मिळणं आवश्यक असतं. आपण जेव्हा अन्न खातो तेव्हा हे पोषण मिळतं. ते साठवूनही ठेवलं जातं. पण तो साठा संपला की परत पोषक पदार्थ शरीराला मिळण्याची गरज असते. याचीच जाणीव आपल्याला करून देण्यासाठी भुक लागण्याची भावना निर्माण होते.आपल्या मेंदूमधील हायपोथॅलॅमस या अवयवामध्ये भुकेवर नियंत्रण ठेवणारं केंद्र असतं. त्याला संदेश मिळाला की ते कार्यरत होतं आणि भुकेची भावना जागृत करतं. त्या केंद्राला मिळणारे संदेश विविध प्रकारचे असतात. त्यातले काही शरीराच्या आतून उत्पन्न होतात. म्हणजेच ते अंतर्गत असतात, तर काही बाहेरून येणारे असतात.शरीराला ऊर्जा मिळते ते ग्लुकोजच्या ज्वलनातून. त्यामुळे रक्तात ग्लुकोजचं प्रमाण एका निर्धारित पातळीवर नेहमी राहील याची व्यवस्था केलेली असते. ते जर त्या पातळीपेक्षा फारच चढलं तर ते आरोग्याला बाधक असल्यानं इन्सुलीन या संप्रेरकाचा पाझर सुरू होतो. ते संप्रेरक ग्लुकोजची निर्धारित पातळी राखण्यात मदत करतं. जर ग्लुकोजची पातळी या निर्धारित प्रमाणापेक्षा फारच घसरली तर तो संदेश मिळून भुकेचं केंद्र जागृत होतं. त्यावेळी आपण पुरेसं अन्न पोटात टाकलं तर मग भुक मिटल्याची भावनाही याच केंद्रातून निर्माण केली जाते.आपल्या पोटाचं आकारमानही विशिष्ट पातळीवर ठेवण्याची व्यवस्था केली जाते. तसंच ते काही विविक्षित प्रमाणात भरलेलं असेल हेही बघितलं जातं. पोट जर रिकामं झालं तर ते आकुंचन पावून त्याचं आकारमान घटतं. भुकेचं केंद्र जागृत करायला तोही एक संदेश पुरतो. अशा वेळी पाणी पिऊन आकारमान वाढवलं तरीही भुक भागल्याची भावना निर्माण होते.आज जरी आपल्याला हवं तेव्हा अन्न उपलब्ध होत असलं तरी आदिमानवाच्या काळात जेव्हा रानावनात कंदमुळे गोळा करून किंवा शिकार करून मनुष्यप्राणी आपली पोषणाची गरज भागवत होता. तेव्हा अन्न केव्हा मिळेल याची शाश्वती नव्हती. त्यामुळे असं ते मिळालं की प्रत्यक्ष पोषणाची आवश्यकता असो-नसो, त्याच्या दर्शनाने किंवा गंधानंही भुकेची भावना चाळवली जात असे. उत्क्रांतीच्या ओघात हा गुणधर्म टिकून राहिला आहे. त्यामुळे स्वादिष्ट अन्न दिसलं किंवा त्याचा दरवळ नाकपुड्यांना चाळवून गेला म्हणजेही आपल्याला भूक लागते.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पायो जी मैंने राम रतन धन पायोपायो जी मैंने राम रतन धन पायोपायो जी मैंनेवस्तु अमोलिक दी मेरे सतगुरुवस्तु अमोलिक दी मेरे सतगुरुकृपा कर अपनायोपायो जी मैंने कृपा कर अपनायोपायो जी मैंने राम रतन धन पायोपायो जी मैंने राम रतन धन पायोजन्म जन्म की पूंजी पाईजन्म जन्म की पूंजी पाईजग में सबी खुमायोपायो जी मैंने जग में सबी खुमायोपायो जी मैंने राम रतन धन पायोपायो जी मैंने राम रतन धन खर्च ना खूटे चोर ना लूटेखर्च ना खूटे चोर ना लूटेदिन दिन बढ़त सवायोपायो जी मैंने दिन दिन बढ़त सवायोपायो जी मैंने राम रतन धन पायोपायो जी मैंने राम रतन धन पायोसत की नाव खेवटिया सतगुरुसत की नाव खेवटिया सतगुरुभवसागर तऱयायोपायो जी मैंने भवसागर तऱयायोपायो जी मैंने राम रतन धन पायो मीरा के प्रभु गिरिधर नागरमीरा के प्रभु गिरिधर नागरहर्क हर्क जस गायोपायो जी मैंने हर्क हर्क जस गायोपायो जी मैंने राम रतन धन पायो••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत संघर्ष करावाच लागतो. कारण संघर्ष हे मानवाच्या जन्मतापासून असते. आणि याच संघर्षाला आपला गुरु मानून जे जगतात त्यांचे जगणे इतरांपेक्षा वेगळे असते. सर्वच जर सहजपणे मिळाले तर त्याचे फारसं महत्व राहत नाही पण, संघर्षाच्या वाटेवर चालत मिळालेले असते.त्याचे महत्व कधीच कमी होत नाही. म्हणून जीवन जगत असताना संघर्षाला कधीही घाबरू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *अधिक चतुर**बिरबलच्या चातुर्याची कीर्ती सर्व दूर पसरली होती. तेव्हा त्याला पाहण्यासाठी दरबारात एक पंडित आला होता. बादशहाच्या परवानगीने त्याने दोन प्रश्न बिरबलाला विचारले.**पंडित : खरा ज्ञानी कोण व अज्ञानी कोण ?**बिरबल : ज्याच्याशी केलेली चर्चा फलदायी ठरते, तो ज्ञानी आणि निरर्थक ठरते तो अज्ञानी असतो.**पंडित : सर्वांत उत्तम ऋतू आणि सर्वात वाईट ऋतू कोणती?**बिरबल : पोटभर खायला, अंगभर ल्यायला आणि आपली जवळची माणसे प्रेम करायला असतील, तर सर्वच ऋतू उत्तम असतात. परंतु खायला अन्न नाही, ल्यायला वस्त्र नाही आणि कोणी प्रेम करणारेही नाही, अशी ज्याची स्थिती असेल, त्याला सर्वच ऋतू वाईट असतात.* *बिरबलाने दिलेली अशी उत्तरे ऐकताच तो पंडित बादशहाला म्हणाला, ''खाविंद, मला वाटले होते, त्यापेक्षा कितीतरी पटींनी बिरबलजी अधिक चतुर आहेत.''*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment