✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15 ऑक्टोबर 2025💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/17AkzM1QSd/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :- • १८८८: गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक पत्राची सुरूवात केली.• १९६८: हरगोविंद खुराणा यांना नोबेल पारितोषिक प्रदान.• १९९७: भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांच्या द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज या कादंबरीला साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा बुकर पुरस्कार मिळाला.• १९९९: जागतिक फ्रेड डेव्हिस पुरस्कार भारताच्या गीत सेठी यांना प्रदान.🎂 जन्म :- • १९२६: कवी नारायण गंगाराम सुर्वे यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑगस्ट २०१०)• १९३१: वैज्ञानिक आणि भारताचे ११ वे राष्ट्रपती अवुल पाकिर जैनुलब्दीन उर्फ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै २०१५)• १९३४: कर्नाटिक शैलीचे बासरीवादक एन. रामाणी यांचा जन्म.• १९४६: भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक व्हिक्टर बॅनर्जी यांचा जन्म.• १९४९: पत्रकार, एन. डी. टी. व्ही. चे संस्थापक प्रणोय रॉय यांचा जन्म.• १९५५: भारतीय फील्ड हॉकी खेळाडू कुलबुर भौर यांचा जन्म.• १९५७: भारतीय वंशाच्या अमेरिकन चित्रपट निर्मात्या व दिग्दर्शिका मीरा नायर यांचा जन्म.• १९६९: मेवाती घराण्याचे शास्त्रीय गायक पं. संजीव अभ्यंकर यांचा जन्म.• १९५४: भारतीय अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचा जन्म (मृत्यू : ३ ऑगस्ट २०२२)• १९३४: भारतीय राजकारणी, खासदार माया थेवर यांचा जन्म (मृत्यू : ९ ऑगस्ट २०२२)• १९३२: भारतीय चित्रपट समीक्षक आणि पत्रकार जी. एस. वरदाचारी यांचा जन्म (मृत्यू : ३ नोव्हेंबर २०२२)• १८९७: भारतीय गायक आणि संगीतज्ञ मुदिकॉन्दाम वेंकटरम अय्यर यांचा जन्म (मृत्यू : १३ सप्टेंबर १९७५)🌹 मृत्यू :- • १९१८: भारतीय गुरू आणि संत शिर्डीचे साई बाबा यांचे निधन.• १९४४: ओगले काच कारखान्याचे एक संस्थापक गुरुनाथ प्रभाकर ओगले यांचे निधन.• १९६१: हिन्दी साहित्यिक सूर्यकांत त्रिपाठी निराला यांचे निधन. (जन्म: २१ फेब्रुवारी १८९६)• १९९७: मराठी चित्रपटसृष्टीतील छायालेखक दत्ता गोर्ले यांचे निधन.• २००२: प्रसिद्ध एेतिहासिक कादंबरीकार ना. सं. इनामदार यांचे निधन.• २००२: लेखक व पटकथाकार वसंत सबनीस यांचे निधन. (जन्म: ६ डिसेंबर १९२३)• २०२२: भारतीय अभिनेत्री वैशाली टक्कर यांचे निधन (जन्म: १५ जुलै १९९२)• २०२२: भारतीय अभिनेते जितेंद्र शास्त्री यांचे निधन• २०२२: भारतीय चित्रपट निर्माते के. मुरारी यांचे निधन (जन्म: १४ जून १९४४)• २०२०: वेशभूषा डिझाईनर - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार भानु अथैया यांचे निधन (जन्म: २८ एप्रिल १९२९)••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वाचन प्रेरणा दिन निमित्ताने.........!*वाचाल तर वाचाल*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 71 उमेदवारांची पहिली यादी जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई - खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास वारसांना 6 लाख तर जखमींना 2.5 लाखपर्यंतची मदत; हायकोर्टाचे सरकारला आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *भारत-मंगोलिया संबंध अधिक दृढ ! मंगोलियाच्या विकासात भारत विश्वासार्ह भागीदार ; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वक्तव्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *स्वच्छ भारतात महाराष्ट्र अग्रस्थानी ! महिला गट, संस्था घेणार पुढाकार : राज्यमंत्री मेघना बोर्डीकर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गडचिरोली जिल्ह्यात तब्बल ६१ नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण, सरकारला मोठं यश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *हिंगोली - पोलिसांची अतिवृष्टीग्रस्तांना २३ लाखांची मदत, जिल्हाधिकाऱ्यांकडे मुख्यमंत्री सहाय्यता योजनेसाठी दिला धनादेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताचा वेस्ट इंडिजला व्हाईटवॉश, दिल्ली कसोटी जिंकत मालिका 2-0 ने घातली खिशात*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🄷🄰🄿🄿🅈 🄱🄸🅁🅃🄷 🄳🄰🅈 *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 मोहन भुसेवार, शिक्षक, नायगाव 👤 फारुख शेख, शिक्षक, लोहा 👤 संतोष दौण्ड👤 संजय कदम, धर्माबाद 👤 पृथ्वीराज राहेरकर *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 100*चार खंडांचा एक शहर**चार विहीरी बीना पानी**18 चोर त्या शहरी आणि 1 राणी**आला 1 शिपाई, सगळ्यांना मारुन मारून विहीरीत टाकी…*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - प्लेट व चमचा ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आज्ञापालन करण्याचा गुण अंगी बाणावा, पण आपल्या श्रद्धेचा त्याग करू नका.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**जि. प. प्रा. शाळा झरी ता. लोहा जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'जागतिक हात धुवा दिवस' केव्हा साजरा केला जातो ?२) 'वाचन प्रेरणा दिवस' केव्हा साजरा केला जातो ?३) 'जागतिक विद्यार्थी दिवस' केव्हा साजरा केला जातो ?४) 'वृत्तपत्र विक्रेता दिवस' केव्हा साजरा केला जातो ?५) 'राष्ट्रीय नवोन्मेष ( नवकल्पना/ शोध ) दिवस' केव्हा साजरा केला जातो ? *उत्तरे :-* १) १५ ऑक्टोबर २) १५ ऑक्टोबर ३) १५ ऑक्टोबर ४) १५ ऑक्टोबर ५) १५ ऑक्टोबर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🦂 विंचु 🦂 'विंचवाचे बिर्हाड पाठीवर', अशी म्हण नेहमीच कानांवर पडते. प्रत्यक्ष मादी जरी पाहिली, तर ही म्हण शब्दश: खरी असल्याचे लगेच लक्षात येते. विंचवाची मादी अंडी घालत नाही. अंडी तिच्या शरीरातच उबवते. पिल्ले बाहेर पडतात, ती आईच्या पाठीवरच मुक्काम ठोकतात. त्यांची वाढ होऊन अन्न मिळवण्याइतपत ती मोठी झाल्यावरच आईची पाठ सोडतात. हे दृश्यच मोठे गमतीदार असते. कांगारूंच्या पिल्लाची नवालाई आपल्या सर्वांना वाटते, पण हे दृश्य मात्र सहसा लक्ष देऊन कधी पाहिले जात नाही. कारणही तसेच आहे. विंचु दिवसा क्वचितच दृष्टीला पडतो. विंचु दिवसा वळचणीच्या, अडगळीच्या, दगडातल्या आडोशानेच मुक्काम ठोकून असतो. रात्र झाली की, मग भक्षाच्या शोधार्थ त्याची हालचाल सुरू होते.विंचू संधिपाद प्राण्यांच्या संघातील अॅरकनिडा या वर्गात येतात. या वर्गातच कोळी, गोचिड इत्यादींचा समावेश होतो. विंचवाच्या जाती सातशेच्या आसपास आहेत. उबदार प्रदेशात विंचवाचे वास्तव्य भरपूर. त्यातही जिथे दगडगोटे, उतार व खडबडीत प्रदेश आहेत, तेथे विंचवाचा वापर जास्त. माळरानावर सहज एखादा मोठा दगड हलवला, तर एखादा विंचू आढळेलच. कोकणात विंचू भरपूर आढळतात. विंचवाचा आकार जेमतेम इंचभरापासून फूटभरापर्यंत आढळतो. अर्थात हा आकार म्हणजे त्याची नांगी ते त्याचे पुढचे दोन नांगीवजा पकडीचे पाय यांची लांबी धरून असतो. मोठ्या आकाराचे विंचू वाळवंटी प्रदेशात आढळतात, तर छोटे छोटे विंचू जंगली भागात सापडतात.विंचू छोट्या मोठ्या किड्यांचा खाण्यासाठी उपयोग करतो. सरपटणारे, उडू शकणारे अनेक कीटक आपल्या नांगीवजा सोंडेत पकडून मारून खाल्ले जातात. खेकड्यांची आठवण यावी अशा या नांग्या असल्या तरी विंचवाचे अस्त्र म्हणजे त्यांची मागची लांबुडकी अर्धगोलाकार शेपटी. हिच्या टोकाला अणकुचीदार पण पोकळ नांगी व तिच्यातून विष पाठवता येईल अशी रचना असलेली विषाची पिशवी अशी रचना असते. क्षणार्धात ही नांगी भक्ष्यावर मारून किंवा एखाद्या धोकादायक प्राण्याला मारून विंचू स्वतःचे संरक्षण करतो. ज्या क्षणी नांगी भक्ष्याच्या शरीरात प्रवेश करते, त्याच क्षणी होणाऱ्या स्नायूंच्या आकुंचनातून पिशवीतील विष प्राण्यांच्या शरीरात ओतले जाते. विंचवाचे हे विष छोट्या प्राण्याला मारू शकेल इतके तीव्र असते. काही विंचवाचे विष हे माणसाला पण धोकेदायक असते.विंचवाचे विष हे मुख्यत: मज्जासंस्थेवर आघात व परिणाम करते. त्यामुळे तीव्र वेदना, त्या भागात बधिरता किंवा अल्पकाळ हालचाल होऊ न शकणे अशा तक्रारी उद्भवतात. काळइंगळी या जातीचा विंचू माणसाचा सहज बळी घेऊ शकतो. अन्य जातीचा विंचु डसल्यास दोन ते तीन दिवस त्या जागी तीव्र वेदना होत राहतात.विषारी प्राणी म्हणून मानवाने साप व विंचवांचा खूपच धसका घेतला आहे. त्यामुळे दोघांपैकी कोणताही प्राणी समोर आला, तरी माणूस प्रथम त्याची हत्या करण्याचा प्रयत्न करतो. साप सहसा मानवी वस्ती सोडून लांब पळतो, तर विंचू मात्र मानवी घरांच्या आडोशाला धरूनही राहतो. येथे पोटभरीसाठी अनेक प्रकारचे किडे तर त्याला मिळतातच, पण मुख्यत: आडोसा व ऊब याही गोष्टी अनायासे मिळतात. रात्री निवांत झोपलेल्या माणसाच्या अंगावर छपराच्या वळचणीतून जाणारा विंचू खाली पडून चावून त्रास होणे हे कोकणभागात आजही आढळते.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आधी रचिली पंढरी | मग वैकुंठ नगरी || १ ||जेव्हा नव्हते चराचर | तेव्हा होते पंढरपूर चंद्राभागेच्या तटी | धन्य पंढरी गोमटी || २ ||जेव्हा नव्हत्या गोदा गंगा | तेव्हा होती चंद्रभागाचंद्राभागेच्या तटी | धन्य पंढरी गोमटी || ३ ||नामा म्हणे बा श्री हरी, ते म्या देखिली पंढरी चंद्राभागेच्या तटी | धन्य पंढरी गोमटी || ४ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या विषयी चांगले सांगताना एकाकी कोणी नावं ठेवत नाही. पण तेथेच दुसऱ्यांच्या विषयी नको ते, सांगताना मात्र ऐकणारे कान लावून ऐकत असतात. जी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीविषयी एवढे काही सांगू शकते तर स्वतः किती चांगली असेल यावर ऐकणारे विचार करत असतात. त्यावेळी ती व्यक्ती मनातून उतरुन जाते पण, सांगणाऱ्या व्यक्तीच्या मात्र लक्षात येत नाही. एका अर्थाने माणसात असलेली ही सर्वात मोठी वाईट सवय असते. या सवयीमुळे अनेकांचे जीवन उद्धस्त होते म्हणून याप्रकारची सवय लावून स्वतःचेही नुकसान करू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विश्वासाला तडाएका लोककथेनुसार राम नावाच्या एका माणसाकडे एक उमदा आणि सुंदर घोडा होता. तो त्या घोड्याची काळजी घ्यायचा. त्यामुळे त्या दोघांचेही एकमेकावर प्रेम जडलेले होते. शाम नावाच्या एका घोड्याच्या व्यापा-याने तो घोडा पाहिला आणि त्याला तो घोडा फारच आवडला. शामने तो घोडा मिळविण्याचे कारस्थान रचले. शामने रामच्या रोजच्या येण्याजाण्याच्या रस्त्यावर भिका-याचे सोंग घेतले व आजारी असल्याचे नाटक करत बसला. दुसरीकडून राम घोड्यावर बसून येत होता तेव्हा शाम जोरजोराने विव्हळू लागला, गयावया करू लागला. रामने ते पाहिले व तो शामपाशी थांबला. शाम रामला म्हणाला,’’मी आजारी आहे मला तुझ्या घोड्यावरून पुढच्या गावापर्यंत नेशील का,’’ रामला त्याची दया आली, त्याने त्याला घोड्यावर बसविले, आणि स्वतः पायी चालू लागला. थोडे पुढे जाताच शाम त्याचा घोडा घेऊन पुढे गेला व त्याने पुढील गावी जाऊन तो घोडा विकून टाकला. दुस-या दिवशी शाम रामकडे आला व म्हणाला,’’ अरे मी तुझा घोडा जर विकत मागितला असता तर तू मला तो दिला नसतास म्हणून मला आजारी भिका-याचे सोंग घ्यावे लागले.’’ यावर राम शांतपणे शामला म्हणाला,’’ मित्रा, मी तुला मदत केली होती ही गोष्ट तू इथून पुढे कोणालाही सांगू नकोस कारण तुझी ही गोष्ट ऐकल्यावर जगात कोणीच गरीबांना, गरजूंना मदत करणार नाही. विश्वासघात करणे महापाप आहे’’तात्पर्यः- गरजूला मदत करण्यापूर्वी तो खरेच गरजवंत आहे याची खात्री करणे सूज्ञपणाचे ठरते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment