✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 08 ऑक्टोबर 2025💠 वार - बुधवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1CHQkmHHUf/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :- • १९५९: स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुणे विद्यापीठाने सन्माननीय डी-लिट पदवी घरी येऊन दिली.• १९६२: नाट्य निकेतन निर्मित, आचार्य अत्रे लिखित व प्रभाकर पणशीकर दिग्दर्शित तो मी नव्हेच या नाटकाचा पहिला प्रयोग दिल्ली येथील आयफॅक्स थिएटर येथे झाला.• २००५: काश्मीर मध्ये झालेल्या ७.६ रिश्टर भूकंपा मुळे सुमारे ८६,००० – ८७,५०० लोक मृत्युमुखी पडले, ६९,०००- ७२,५०० जण जखमी झाले आणि २.८ दशलक्ष लोक बेघर झाले.🎂 जन्म :- • १८९१: उद्योजक, साहित्यिक व चित्रकार शंकरराव वासुदेव किर्लोस्कर यांचा जन्म. (मृत्यू: १ जानेवारी १९७५)• १९२४: भारतीय कवि आणि स्कॉलर थिरूनलूर करुणाकरन यांचा जन्म. (मृत्यू: ५ जुलै २००६)• १९२६: जबरदस्त आवाजाने संवादफेक करून प्रेक्षकांना खूष करणारा हिन्दी चित्रपट अभिनेता कुलभूषण पंडित तथा राजकुमार ऊर्फ जानी यांचा जन्म. (मृत्यू: ३ जुलै १९९६)• १९९३: पशुवैद्यक डॉ. काजल तांबे यांचा जन्म.🌹 मृत्यू :- • १८८८: कवी व संस्कृतचे प्राध्यापक महादेव मोरेश्वर कुंटे यांचे निधन. (जन्म: १ ऑगस्ट १८३५ – माहुली, सांगली, महाराष्ट्र)• १९३६: हिन्दी साहित्यिक धनपतराय श्रीवास्तव ऊर्फ मुन्शी प्रेमचंद यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १८८०)• १९७९: स्वातंत्र्यसैनिक व सर्वोदयी नेतेलोकनायक जयप्रकाश नारायण यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १९०२)• १९९८: देवरुख येथील मातृमंदिर संस्थेच्या संस्थापिका, कोकणच्या मदर तेरेसा इंदिराबाई हळबे ऊर्फ मावशी यांचे निधन.• २०१२: केन्द्रीय मंत्री व गुजरातचे राज्यपाल नवल किशोर शर्मा यांचे निधन. (जन्म: ५ जुलै १९२५)• २०१२: पत्रकार व पार्श्वगायिका वर्षा भोसले यांचे निधन.• २०२२: भारतीय वंशाचे ब्रिटिश वंशवाद विरोधी प्रचारक आणि व्याख्याते अवतार सिंग जौहल यांचे निधन (जन्म: २ नोव्हेंबर १९३७)••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*गरज तेथे मदत करा* ..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांकडून तब्बल ३१,६२८ कोटींची मदत ; २५३ तालुक्यांना सरसकट मदत देणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *ऐतिहासिक वारसा जपा! स्मारके, समाधीस्थळांचे संवर्धन करा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश; संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचा पुनर्विकास*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पोलिसांच्या गणवेशात लवकरच महत्त्वपूर्ण बदल होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *दगडूशेठ ट्रस्टकडून पूरग्रस्तांना 1 कोटींची मदत, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी धनादेश सुपूर्द, अनेक संस्थांकडूनही लाखोंची मदत*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरूच, नाशिक, जळगावसह अनेक जिल्ह्यांत नवीन कलेक्टर; सात जिल्हाधिकाऱ्यांची बदली*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *एसटी कामगारांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक, परिवहन मंत्री सरनाईक यांची माहिती, म्हणाले - एसटीला आर्थिक दृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *केंद्रीय मंत्रिमंडळाची 24,634 कोटींच्या 4 नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी, वर्धा-भुसावळ दरम्यान तिसरी-चौथी लाईन टाकली जाईल*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 जगदीश पाटील कळसकर👤 साईनाथ पोतलोड, येवती 👤 शांतीलाल कुमावत 👤 सारिका गांधी 👤 कैलास बागले*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 94*असे कोण आहे, ज्याच्याकडे झोपण्यासाठी पलंग नाही, राहण्यासाठी महाल नाही, आणि विशेष म्हणजे त्याच्याकडे एक रुपया देखील नाही तरी तो राजा आहे ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - चंद्र ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••लक्ष्याशिवाय मार्ग नाही, ध्येयाशिवाय जीवन नाही. -- शुची*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**जि. प. प्रा. शाळा झरी ता. लोहा जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'भारतीय वायुसेना दिवस' केव्हा साजरा केला जातो ?२) जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात येणार आहे ?३) 'शेष भारत' संघाचा पराभव करून विदर्भाने कितव्यांदा 'इराणी चषका'वर आपले नाव कोरले ?४) केंद्रीय निवडणूक आयुक्त कोण आहेत ?५) मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कोण आहेत ? *उत्तरे :-* १) ८ ऑक्टोबर २) सनाए ताकाईच ३) तिसऱ्यांदा ४) ज्ञानेश कुमार ५) मिलिंद जोशी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 वेधशाळा 📙वेधशाळांची बांधणी, वापर, जागा यांत गेली काही शतके सतत बदल होत आहेत. सध्या आकाशाचा वेध घेण्यासाठी विविध साधने वापरली जातात. त्यामुळे पारंपरिक वेधशाळा जशी शक्यतो उंच डोंगरावर, कोरड्या हवामानात, गजबजाटापासून दूर असायची, तशी आताची परिस्थिती राहिलेली नाही.आकाश वा अवकाशाचा वेध घेण्यासाठी पृथ्वीतलावरून मुख्यत: दोन प्रकारचे निरीक्षण चालते. एक म्हणजे डोळे व दुर्बिणीसारखी साधने वापरून चालणारे निरीक्षण व दुसरे म्हणजे रेडिओलहरींद्वारे केले जाणारे निरीक्षण. दोन्ही निरीक्षणांमध्ये एक साम्य मात्र आहे. जास्तीत जास्त मोठा आकार व विस्तार असलेली साधने वापरण्याची चढाओढ दोन्ही निरीक्षणांत चालते.दृश्य प्रकाशाने केल्या जाणाऱ्या निरीक्षणात विविध आकारांच्या दुर्बिणी वापरल्या जातात. अगदी हातभर लांबीच्या व दोन इंच व्यासाच्या दुर्बिणीपासून दहा ते बारा फूट व्यासाचा रिफ्लेक्टिंग टेलिस्कोपपर्यंत साधने आज वापरली जातात. या अवाढव्य किंवा अतिलांब टेलिस्कोपची मांडणी एखाद्या उंच इमारतीच्या घुमटामध्ये केलेली असते. रात्री या घुमटातील खिडक्यांतून आकाशाचा वेध घेतला जातो. काही वेळा ही सर्व घुमटाची रचनाच सभोवताली फिरविण्याची व्यवस्था केलेली असते. रात्रीच्या वेळी प्रथम या घुमटातील अंधारात डोळे सरावल्यानंतरच आकाशनिरीक्षण सुरू केले जाते. हा सारा प्रकार क्वचित एखाद्या दिवशी मजा म्हणून करणाऱ्याला गमतीचा वाटत असेल; पण अंधाऱया रात्री उंच जागेवर वाहणारे झोंबणारे वारे, थंडी व तासनतास चिकाटीने केले जाणारे निरीक्षण यामध्ये मात्र गेल्या पन्नास वर्षात विशेष बदल घडत गेले आहेत. निरीक्षणाची जागा काही ठिकाणी कॉम्प्युटरनियंत्रित असते. यामुळे वातानुकूलित खोलीत बसून निरीक्षणाचे सर्व नियंत्रण व नोंदीकरण करणेही शक्य होते. अर्थातच हौशी खगोलशास्त्रज्ञांना या सुखसोयी आजही उपलब्ध नाहीत. त्यांचीच संख्या जगभर फार मोठी असावी.रेडिओलहरींद्वारे केल्या जाणाऱ्या निरीक्षण प्रकाराच्या वेधशाळा या मुख्यतः साखळी प्रकारात किंवा एकाच मोठ्या तबकडीद्वारे काम करतात. साखळी प्रकाराची वेधशाळा ही अनेक सलग ताबकड्यांचा वापर करते. विविध रेडिओलहरी पकडून त्यांचे सतत विश्लेषण करून त्यावर अवकाशातील ताऱ्यांच्या आणि आकाशगंगांच्या घडणाऱ्या घडामोडी व नवीन वस्तूंचा शोध घेणे खगोलशास्त्रज्ञ चालू ठेवतात. जॉड्रेल बँक वेधशाळा व पुण्याजवळील खोडद येथील प्रकल्प हे या प्रकारचे जगातील मोठे प्रकल्प आहेत. या प्रकारात ढगांचा, वातावरणाचा, उजेडाचा कसलाही अडथळा येत नाही. दिवसा व पावसाळी हवेतही वेध घेणे चालू राहते. या वेधशाळा सोयीच्या जागी उभारता येतात. अर्थातच तेथे खूप खगोलशास्त्रज्ञ सोयीनुसार काम करू शकतात.हवाई बेटावरील निद्रिस्त ज्वालामुखी मॉनाकिया शिखरांवरील, अमेरिकेतील किट पिरू अॅरिझोना येथे, दक्षिण ऑस्ट्रेलियामधील वेल्स, दक्षिण अमेरिकेत चिली देशात सेरो टोलोलोतील पारंपरिक वेधशाळा महत्त्वाचे काम बजावतात. सध्याचा काळ उपग्रहांचा आहे. वातावरणाचा अडथळा दूर करून उंच उपग्रहावरच एखादी वेधशाळा असली, तर उत्तम, या विचाराने अनेक प्रयोग झाले आहेत. त्यातील एक महत्त्वाकांक्षी प्रयोग म्हणजे हबल टेलिस्कोपचा. हबल टेलिस्कोप १९९० साली कक्षेत पाठविल्यापासूनच शास्त्रज्ञांच्या अपेक्षा खूप वाढल्या. मात्र त्याचा प्रमुख आरसा योग्य प्रकारे ग्राइंड झाला नव्हता. त्यामुळे तो नीट काम करीत नव्हता. डिसेंबर १९९३ मध्ये स्पेस शटल एंडेव्हर मिशन एस टी एस ६१ मधील अंतराळवीरांनी अंतराळातच त्याची दुरुस्ती केली. नंतर २००२ पर्यंत अशा तीन मोहिमा झाल्या. आता अव्वल टेलिस्कोप मूळ योजनेपेक्षा अधिक कार्यक्षमतेने अंतराळाचे निरीक्षण करतो आहे. त्यातून मूल्यवान माहिती पृथ्वीकडे पाठवतो आहे. तसेच जेव्हा ग्रहणांचा वेध घ्यायचा असतो. तेव्हा ग्रहणकाळ एका जागी निरीक्षण केल्यास मोजकाच उपलब्ध होतो. म्हणून वेगवान विमानातून या स्वरूपाची निरीक्षणे केली जातात. सलग केल्या जाणाऱ्या छायाचित्रण पद्धतीने काही निर्मनुष्य प्रकारची वेधशाळाकेंद्रेही हल्ली वापरात आणली जातात.येत्या काळात अंतराळातूनच म्हणजे विविध अंतराळस्थानकांतून खगोल निरीक्षण करणार्या वेधशाळा अस्तित्वात येतील, असे वाटते. पृथ्वीभोवतालच्या वातावरणाचा अडथळा टाळून हे निरीक्षण जास्त कार्यक्षमपणे होऊ शकेल, असा विश्वास व्यक्त केला जातो. कदाचित या वेधशाळेतील सतत केल्या जाणाऱ्या नोंदी चित्रफितीद्वारे पृथ्वीवरील केंद्रात प्रक्षेपित केल्या जाऊन त्यांच्याविषयी निष्कर्ष काढले जातील; कारण दरवेळी नोंदी करण्यासाठी तज्ज्ञ तेथे उपलब्ध असेल हजार असेल, असेही नाही. पण क्ष-किरण, इन्फ्रारेड, अल्ट्रावॉयोलेट व गॅमारेजच्या वेधशाळा पृथ्वीतलावर असू शकत नाहीत. बाह्य प्रकाश पृथ्वीतलावर येताना शोषला जातो. म्हणूनच या वेधशाळांचे महत्त्व आहे. वेधशाळेच्या बाबतीत एक गोष्ट आजही महत्त्वाची आहे. यंत्रापेक्षा यंत्रामागे काम करणारे डोळे व मेंदू हे अधिक महत्त्वाचे असतात.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वनमाळी वनमाळी वनमाळीराधे तुला बोलावितो वनमाळी || धृ ||वेणी फुलाची जाई जुईची, वर मोत्याची माळ || १ ||साडी जरीची चोळी बुटयाची, नेसुनी चंद्रावर || २ ||एका जनार्दनी पूर्ण कृपेने, भक्ती माझी भोळी || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हवा अंगाला स्पर्शून जातो आणि त्याच्यामुळे आपण जिवंत आहोत. तरीही आपण त्याला बघू शकत नाही. कारण त्याला बघण्यासाठी आपल्याकडे तशी दूरदृष्टी नसते. तसंच समोर दिसणाऱ्या व्यक्तीच्या प्रती आपल्या मनात किती आदर, सन्मान आहे हे जाणून न घेता कोणाच्या सांगण्यावरून त्याचा अपमान करणे आपल्याला सहजपणे जमत असते.ही आजची वास्तविकता आहे. जसं वाऱ्याला बघण्यासाठी आपल्याकडे दूरदृष्टी नसते तशीच दूरदृष्टी त्या व्यक्तीला जाणून घेण्याची नसते.हीच कमतरता आपल्यातील काही गुणांचा अंत करत असते. म्हणून जीवन जगत असताना आपल्यातही तेवढीच सत्यात ठेवणे गरजेचे आहे कारण, सत्याच्या वाटेवर चालणारी व्यक्ती कोणाचाही अपमान करत नाही हेच त्याच्यात महत्वाचे गुण असते🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *गुरुंची शिष्याला साधनेत पुढे नेण्याची तळमळ* ━━━━━━━━━*एक शिष्य गुरूंनी त्याला दिलेली सेवा विनम्रपणे आणि सेवाभावाने आज्ञापालन म्हणून करत असतो. त्यामुळे गुरु त्या शिष्याला स्वतःचा उत्तराधिकारी नेमतात. या नवीन सेवेतही त्याची सेवेची तळमळ आणि सेवाभाव पूर्वीसारखाच असतो.* *काही कालावधीनंतर दुसरा एक कुशाग्र बुद्धीचा युवक या गुरूंचे शिष्यत्व पत्करतो आणि अल्प कालावधीतच तो गुरूंचे मन जिंकतो. त्याच्या बुद्धीला चालना मिळावी; म्हणून गुरु उत्तराधिकारपदी असलेल्या पूर्वीच्या शिष्याला स्वयंपाकगृहातील सेवेचे दायित्व देतात आणि या नवीन शिष्याला त्यांचे उत्तराधिकारी नेमतात. तरीही पूर्वीच्या शिष्याच्या मनात कोणताही विकल्प न येता तो दिलेली सेवा गुरूंना आवडेल, अशी करत असतो.* *काही दिवसांनतर उत्तराधिकारी केलेल्या शिष्याचा अहंकार वाढतो. परिणामी सहसाधक त्याच्या ऐवजी स्वयंपाकगृहात सेवा करणाऱ्या त्या पूर्वीच्या शिष्याकडून शंकांचे निरसन करून घेऊ लागले. हे पाहून त्या उत्तराधिकारी शिष्याच्या मनात पहिल्या शिष्याविषयी द्वेषभावना निर्माण होते.* *एक दिवस तो गुरूंकडे जाऊन ती द्वेषभावना व्यक्त करतो. त्या वेळी गुरु त्याला म्हणाले, त्या शिष्याला मी उत्तराधिकारीपदावरून काढून ते तुला दिले; कारण मला तुला यातून शिकवायचे होते, सेवा कोणती करतो, यापेक्षा गुर्वाज्ञा शिरसावंद्य मानून जो भावपूर्ण सेवा करतो, तोच गुरूंचे ख-या अर्थाने मन जिंकू शकतो. आजपासून तू आता स्वयंपाकघरात सेवेला असणार आणि तो शिष्य माझा उत्तराधिकारी असेल.* *यानंतर काही दिवसांनी हा दुसरा शिष्य गुरूंना घरी जाण्याची अनुमती मागतो. तेव्हा श्रीगुरु शांत रहातात. त्यांना या शिष्याने या काळात घरी जाणे अपेक्षित नसते; परंतु हा शिष्य गुरूंची अनुमती नसतांनाही घरी जातो. बऱ्याच काळानंतर तो परत येतो आणि गुरूंसमोर उभा राहतो. त्या वेळी गुरूंच्या डोळ्यांत पाणी येते आणि ते त्याच्याकडे केवळ पहातात; पण दुसऱ्याच क्षणी कठोरपणे त्यांच्या उत्तराधिकारी शिष्याला आज्ञा देतात याच्यासाठी आश्रमाचे दरवाजे बंद झाले आहेत. याने येथून चालते व्हावे.* *काही वेळाने उत्तराधिकारी शिष्य न रहावून गुरूंना विचारतो की, आपण त्या शिष्याला एवढा कठोर निर्णय दिला; पण आपले नेत्र का पाणावले होते ? त्यावर गुरु सांगतात, त्याची साधनेत पुढे जाण्याची पुष्कळ क्षमता होती; पण तो घरी गेला आणि वाईट संगतीमुळे साधनेचे सर्व वैभव गमावून आज भिकारी होऊन आला. ही गोष्ट वाचल्यावर माझ्या डोळ्यांत भावाश्रू आले.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment