✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 09 ऑक्टोबर 2025💠 वार - गुरुवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1AJwupQfXR/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :- • १९४६: भारतीय परराष्ट्र सेवा (Indian Foreign Serives, IFS) - सुरवात.• १९६०: विद्याधर गोखले यांच्या पंडितराज जगन्नाथ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.• १९७०: भारतीय वायू सेना - भारतीय बनावटीचे पहिले मिग लढाऊ विमान हवाईदलाकडे सुपुर्द.• २००६: उत्तर कोरिया - देशाने पहिली आण्विक चाचणी घेतली.• २००७: २००८ आर्थिक मंदी - डाऊ जोन्स औद्योगिक सरासरीने १४,१६४पॉइंट्सच्या सर्वकालीन उच्चांक गाठला, त्यानंतर लावकरच २००८ ची आर्थिक मंदी येणार होती.🎂 जन्म :- • १८९१: उद्योजक, साहित्यिक व चित्रकार शंकरराव वासुदेव किर्लोस्कर यांचा जन्म. (मृत्यू: १ जानेवारी १९७५)• १९२२: संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जैवभौतिक शास्त्रज्ञ गोपालसमुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन तथा डॉ. जी. एन. रामचंद्रन यांचा जन्म. (मृत्यू: ७ एप्रिल २००१ – चेन्नई, तामिळनाडू)• १९२४: भारतीय कवि आणि स्कॉलर थिरूनलूर करुणाकरन यांचा जन्म. (मृत्यू: ५ जुलै २००६)• १९२६: जबरदस्त आवाजाने संवादफेक करून प्रेक्षकांना खूष करणारा हिन्दी चित्रपट अभिनेता कुलभूषण पंडित तथा राजकुमार ऊर्फ जानी यांचा जन्म. (मृत्यू: ३ जुलै १९९६)• १९३५: द फ्लाइंग सिख मिल्खा सिंग यांचा जन्म.• १९६०: नेटफ्लिक्स चे सहसंस्थापक रीड हेस्टिंग्स यांचा जन्म.• १९९३: पशुवैद्यक डॉ. काजल तांबे यांचा जन्म.• १९९७: अमेरिकन अभिनेत्री बेला थोर्न यांचा जन्म.• १९६८: भारतीय राजकारणी, खासदार अंबुमणी रामदोस यांचा जन्म• १९६६: इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरुन यांचा जन्म• १९४५: भारतीय शास्त्रीय सरोद वादक - पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री अमजद अली खान यांचा जन्म• १९२४: भारतीय सैनिक, स्वातंत्र्य सैनिक, नागरी हक्क कार्यकर्ते इमानुवेल देवेन्द्रर यांचा जन्म (मृत्यू : ११ सप्टेंबर १९५७)• १९०६: सेनेगल देशाचे पहिले राष्ट्रपती लेओपोल्ड सेडर सेघोर यांचा जन्म (मृत्यू : २० डिसेंबर २००१)• १८९७: भारतीय राजकारणी, मद्रास राज्यचे ४थे मुख्यमंत्री एम. भक्तवत्सलम यांचा जन्म (मृत्यू : १३ फेब्रुवारी १९८७)• १८७७: भारतीय समाजसुधारक आणि स्वातंत्र्यसेनानी गोपबंधु दास यांचा जन्म (मृत्यू : १७ जून १९२८)• १८७६: भारतीय बौद्ध धर्माचे अभ्यासक पंडित धर्मानंद कोसंबी यांचा जन्म (मृत्यू : ४ जून १९४७)🌹 मृत्यू :- • १८९२: पत्रकार, समाजसुधारक व इतिहासकार रावबहादूर गोपाळ हरी देशमुख यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी १८२३)• १९१४: बालवाङ्‌मयकार विनायक कोंडदेव ओक यांचे निधन. (जन्म: २५ फेब्रुवारी १८४०)• १९५५: हार्मोनियम वादक, अभिनेते व संगीतकार, नाट्यसंगीताचे पहिले शिल्पकार, पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक, संगीत क्षेत्रातील पहिले सौंदर्य मीमांसक, संगीतिकांचे प्रवर्तक गोविंदराव टेंबे यांचे निधन. (जन्म: ५ जून १८८१)• १९८७: कथकली नर्तक गुरू गोपीनाथ यांचे निधन. (जन्म: २४ जून १९०८)• १९९८: छायालेखक (Cinematographer) जयवंत पाठारे यांचे निधन.• १९९९: नारद मुनींच्या भूमिकेद्वारे नाट्यरसिकांच्या सदैव स्मरणात असलेले रंगभूमीवरील रंगकर्मी मा. अनंत दामले तथा नूतन पेंढारकर यांचे निधन.• २००६: भारतीय वकील आणि राजकारणी कांशी राम यांचे निधन. (जन्म: १५ मार्च १९३४)• २०१५: भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक रवींद्र जैन यांचे निधन. (जन्म: २८ फेब्रुवारी १९४४)• २०२२: भारतीय कवी आणि लेखक टेमसुला एओ यांचे निधन (जन्म: २५ ऑक्टोबर १९४५)• २०२२: भारतीय राजकारणी, राजस्थानचे आमदार भंवरलाल शर्मा यांचे निधन (जन्म: १७ एप्रिल १९४५)• २०१३: भारतीय अभिनेते श्रीहरी यांचे निधन (जन्म: १५ ऑगस्ट १९६४)••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मतदार जागृती आवश्यक*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन, एक टर्मिनल आणि एक धावपट्टी असलेल्या पहिल्या टप्प्याची क्षमता दरवर्षी दोन कोटी प्रवाशांना हाताळण्याची क्षमताl*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *देशात 35 ते 40 टक्के चालकांची कमतरता, चालकांना प्रशिक्षित करण्यासोबतच त्यांच्या संरक्षणासाठी कायदा आणणार - केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *महावितरण कर्मचाऱ्यांचा 9 ते 11 ऑक्टोबर असा तीन दिवसीय संप बेकायदेशीर, 'मेस्मा' कायदा लागू, वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी पर्यायी यंत्रणा सज्ज*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिलासा, परीक्षा शुल्क होणार माफ, राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *बँकांनी कर्ज वितरणाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडींचे जिल्हा सल्लागार समिती बैठकीत निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *एसटी महामंडळाचा मोठा निर्णय, दिवाळीसाठी पुणे विभागातून 598 जादा बस गाड्या सोडणार, पिंपरी-चिंचवडमधून प्रथमच विशेष सेवा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ICC रँकिंग - भारताचा जसप्रीत बुमराह नंबर 1 कसोटी गोलंदाज, सिराज 12 वा, कुलदीपची 7 स्थानांनी झेप, फलंदाजांत जयस्वालची घसरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 नागेश अशोक धावडे 👤 हणमंत सावंत *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 95*पाणी पिऊन पोट भरतं**तरीपण जेवणात दिलं जातं**ते नसे फळ की नसे भाजी**माझी ओळख सांगा पाहू !*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••संकटसमयी तुम्ही हिम्मत ठेवाल तर अर्धी लढाई तुम्ही आधीच जिंकाल. -- फ्लाटस*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**जि. प. प्रा. शाळा झरी ता. लोहा जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २०२५ चा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?२) जागतिक टपाल दिवस केव्हा साजरा केला जातो ?३) MSRTC ची पहिली महिला चालक बनण्याचा मान कोणाला मिळाला ?४) 'रविवार'चे जुने नाव काय होते ?५) भारतीय हवाई दलाची स्थापना केव्हा झाली ? *उत्तरे :-* १) मेरी ई. ब्रुंको, फ्रेड रॅम्सडेल ( दोन्ही अमेरिका ), शिमोन साकागुची ( जपान ) २) ९ ऑक्टोबर ३) अर्चना आत्राम ४) आदित्यवार ५) ९ ऑक्टोबर १९३१*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *शिंका का येतात ?* 📙हिवाळ्यात किंवा गार वाऱ्यात फिरून आल्यावर तुम्हाला फटाफट शिंका आल्या असतील. काहीतरी बोलायला तोंड उघडावे आणि तेवढ्यात शिंका येऊन बोलता येऊ नये, असेही कधी झाले असेल. सर्दी पडसे झाल्यावर शिंका येतात. विशेषत: वावड्यामुळे सर्दी आली असेल, तर शिंका जास्तच येतात. धुळीत गेल्यास, विशिष्ट फूल हुंगल्यास, किंवा अत्तराचा, उदबत्तीचा वास आल्यास वावडे असलेल्या लोकांना शिंका येतात आणि सर्दी होते. काय म्हणता तुम्हाला शिंका येत नाहीत ? मग एक काम करा. आजोबांच्या कोटाच्या खिशातली तपकिरीची डबी घ्या आणि एक चिमूटभर नाकात सोडा! काय आता आल्या का शिंका ? शिंका येणे शुभ की अशुभ ? काहीजण म्हणतात एक शिंक येणे वाईट, पण दोन शिंका येणे चांगले. अर्थात या सर्व अंधश्रद्धा बरं का ! पण शिंका का येतात, ते पाहू.खोकला आणि शिंका यात बरेच साधर्म्य आहे. आपल्या श्वसन नलिकेत काही त्रासदायक पदार्थ आला तर खोकला येतो. आपण खोकतो म्हणजे काय करतो ? सर्वात आधी आपण दीर्घ श्वास घेतो. त्यानंतर एपिग्लाॅटीस नावाचा पडदा श्वासनलिकेवर दाबला जातो. त्यानंतर आपण जोराने श्वास सोडतो. सहाजिकच खोकताना हवा दाबाखाली बाहेर पडते व श्वास नलिकेतील घाण, जिवाणू बेडक्याच्या रूपाने बाहेर टाकले जातात. आता शिंकेविषयी नाकातील हवा जाण्याच्या मार्गात जर काही अपायकारक, त्रासदायक असे पदार्थ आले तर शरीर खोकल्याप्रमाणेच प्रतिसाद देते. नाकातील ही संवेदना मेंदूपासून निघणाऱ्या पाचव्या नसेमार्फत मेंदुच्या मेड्युला या भागात जाते. येथील पेशींमध्ये संवेदनेचे विश्लेषण होऊन शिंक येण्याची प्रक्रिया होण्याचा आदेश दिला जातो. यात सुरुवातीचे दीर्घ श्वास, नंतर एपिग्लाॅटीसचे श्वासनलिकेवर येणे व नंतर जोरात उच्छवास हे खोकल्याप्रमाणेच असते, मात्र जोरात श्वास सोडताना पडजीभ खाली पडते व त्यामुळे हवा तोंडातून बाहेर न पडता नाकातून बाहेर पडते. नाकातील अपायकारक पदार्थ यामुळे बाहेर पडतो.वावड्यामुळे वा जंतूसंसर्गामुळे नाकातील आवरण हुळहुळे होते व त्यामुळे वारंवार शिंका येतात. एव्हीलसारखी गोळी देऊन वावड्यामुळे येणाऱ्या शिंका कमी करता येतात. तसेच ज्या पदार्थांमध्ये आपल्याला वावडे आहे त्यापासून दूर राहून स्वतःचे संरक्षण करणे जास्त योग्य होय.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••संतकृपा झाली । इमारत फळा आली ।।१।।ज्ञानदेवें रचिला पाया । उभारिलें देवालया ।।२।।नामा तयाचा किंकर । तेणें रचिलें तें आवार ।।३।।जनार्दन एकनाथ । खांब दिधला भागवत ।।४।।तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ।।५।।बहिणी म्हणे फडकती ध्वजा । निरूपणा केलें बोजा ।।६।।संत बहिणाबाई••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••काट्यातून फुलणारा गुलाब बघून आपल्याला खूप आनंद होत असतो. क्षणात आपण आपल्या स्वार्थासाठी त्याला तोडून घेत असतो. तरीही त्या गुलाबाला आपल्या रूपाचा गर्व आणि अभिमान नसतो तसेच तोडणाऱ्याचा सुद्धा त्याला राग येत नाही. पण एखादी व्यक्ती सुंदर असेल तर त्या व्यक्तीला आपल्या सुंदरतेविषयी अफाट घमंड आणि अभिमान असतो. अशा व्यक्तींनी त्या निसर्गाच्या सान्निध्यात व संघर्षातून फुललेल्या गुलाबाकडून शिकून घेण्याचा प्रयत्न करावा. कारण सुंदरता कितीही असेल तरी काही वेळात किंवा वयानुसार कमी होत जाते. सुंदर दिसण्यासाठी काही साधनाचा कितीही उपयोग करून सुंदरता तात्पुरतासाठी मिळवता येऊ शकते पण कायमस्वरूपी नाही. म्हणून सुंदरता ठेवायची असेल तर मनाची तसेच विचाराची असायला पाहिजे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *तर तुमच्या जागी माझे नाव घालीन**एक सौदागर अकबर बादशहाकडे गेला. त्याने नेलेले उत्कृष्ट जातीचे दाहीच्या दाही घोडे बादशहाला अतिशय आवडल्याने, त्याने ते खरेदी केले, आणि तशाच तऱ्हेचे आणखी दहा घोडे आणण्यासाठी त्या सौदागराला दहा हजार रुपये दिले. बिरबल हा प्रकार निमूटपणे पाहत होता. सौदा झाल्यावर तो सौदागर तिथून निघून गेला आणि अकबर व बिरबल यांच्यात इतर गप्पागोष्टी सुरु झाल्या. गप्पांच्या ओघात दिल्लीच्या एका मूर्ख माणसाच्या मुर्खपणाचा विषय निघाला असता बादशहा म्हणाला, 'बिरबल, आपल्या राज्यातल्या अशा वेचक मुर्ख माणसांची यादी तुला सवडीप्रमाणे करुन ठेवता येणे शक्य आहे का ?'**बिरबल म्हणाला, 'का नाही तयार करता येणार ? अवश्य येईल. त्यातून मी तर म्हणतो अशा म्हत्त्वाच्या गोष्टीला विलंब कशाला लावायचा ? मी आत्ताच त्या कामाला हात घालतो.' असं म्हणून व एक कागद व लेखणी घेऊन बिरबलानं विचार करुन सुचतील ती विस पंचवीस नावं लिहून काढली. उत्कंठेपोटी बादशहानं ती यादी पाहिली असता, त्याला आपले नाव पहिल्या क्रमांकावर झळकत असल्याचे दिसले. रागानं लालबूंद होऊन बादशहानं विचारलं, 'बिरबल, या मुर्खांच्या यादीत माझं नाव आणि तेही पहिल्या क्रमांकावर लिहिण्याचं काय कारण ?'**बिरबल म्हणाला, 'तो घोडे विकायला आलेला सौदागर कोण, कुठुन आला, त्याचं नाव व पत्ता काय, त्याला इथे ओळखणारे कुणी आहे की नाही, यापैकी कशाकशाचीही चौकशी न करता, त्याला आपण आणखी दहा घोडे आणून देण्यासाठी दहा हजार रुपये दिलेत, म्हणून या यादीत मानाचं पहिलं स्थान आपल्याला दिलंय.' या उत्तरानं खजील झालेल्या अकबरानं विचारलं, 'पण असं समज, की त्याने दहा घोडे मला आणून दिले तर ?'**बिरबल म्हणाला, ' ती शक्यता नाही खाविंद. त्यातूनही त्याने ते आणून दिलेच, तर या यादीतील आपलं नाव खोडून, त्या जागी मी माझं नाव लिहिन.'*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment