✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 07 ऑक्टोबर 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1Hy19ofyyY/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :- • १९१९: महात्मा गांधींनी नवजीवन हे वृत्तपत्र सुरू केले.• १९१९: के. एल. एम. (KLM) या विमान कंपनीची स्थापना झाली.• १९३३: पाच छोट्या कंपन्यांचे एकत्रीकरण करुन एअर फ्रान्स ही कंपनी स्थापण्यात आली.• १९७१: ओमानचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.• १९९६: फॉक्स न्यूज चॅनलचे प्रसारण सुरू🎂 जन्म :- • १८६६: मराठी काव्याचे प्रवर्तक कृष्णाजी केशव दामले तथा केशवसुत यांचा जन्म. (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९०५)• १९०७: गुजराथी नाटककार व लेखक, नेहरू पुरस्कार व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रागजी डोस्सा यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट १९९७)• १९१४: गझल, दादरा आणि ठुमरी गायिका बेगम अख्तर यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑक्टोबर १९७४)• १९१७: कवी आणि बालकुमार-साहित्यिक विनायक महादेव तथा वि. म. कुलकर्णी यांचा जन्म. (मृत्यू: १३ मे २०१० – पुणे)• १९६०: शास्त्रीय गायिका आश्विनी भिडे-देशपांडे यांचा जन्म.• १९७८: भारतीय जलदगती गोलंदाज जहीर खान यांचा जन्म.🌹 मृत्यू :- • १७०८: शिखांचे १० वे गुरू गुरू गोबिंद सिंग यांचे निधन. (जन्म: २२ डिसेंबर १६६६)• १९७५: कन्नड कवी व विचारवंत देवनहळ्ळी वेंकटरामनय्या गुंडप्पा तथा डी. व्ही. जी. यांचे निधन. (जन्म: १८ जानेवारी १८८९ – मुळबागल, कोलार, कर्नाटक)• १९९८: महाराष्ट्राचे महसूलमंत्री, काँग्रेसचे नेते, पद्मश्री भाऊसाहेब वर्तक यांचे निधन.• १९९९: साहित्यिक, वाचकप्रिय वीणा या दर्जेदार मासिकाचे संपादक, बालसाहित्यकार उमाकांत निमराज ठोमरे यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १९२९ – अहमदनगर)• १९९२: भारतीय उद्योगपती आणि राजकारणी बाबू करम सिंग बल यांचे निधन• २०२२: भारतीय अभिनेते अरुण बाली यांचे निधन (जन्म: २३ डिसेंबर १९४२)••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*पर्यटकांनी जबाबदारीने वागावे*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *ठाणे : उलवे येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 8 ऑक्टोबर रोजी होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आमदारांच्या खर्चाला चाप, विधिमंडळ समित्यांचे सर्व दौरे रद्द ; सचिवालयाकडून आदेश जारी, अतिवृष्टीचे कारण केले पुढे*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नाशिकजवळ साकारणार भव्य चित्रपटनगरी, इगतपुरी येथे गोरेगावच्या धर्तीवर चित्रपट सृष्टी उभारणार, अजित पवारांच्या बैठकीत छगन भुजबळांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नगरपरिषद, नगरपालिकांची सोडत जाहीर, 17 नगरपरिषदा SC, 34 नगरपरिषदा OBC, तर 68 नगरपरिषदा खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *MPSC कडून 938 जागांसाठी नवी जाहिरात, महाराष्ट्र गट-क सेवेची पूर्व परीक्षा 04 जानेवारी2026 रोजी होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बिहारमध्ये दोन टप्प्यात विधानसभा निवडणुका, 6 आणि 11 नोव्हेंबर रोजी मतदान, 14 नोव्हेंबरला निकाल; 40 दिवसांत निवडणूक प्रक्रिया*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारतीय महिला संघाची अभिमानास्पद कामगिरी, विश्व कपच्या स्पर्धेत पाकिस्तानला 88 धावाने हरविले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 दीपाली सावंत, उपक्रमशील शिक्षिका 👤 दत्तात्रय देवकत्ते👤 साईनाथ सावंत 👤 योगेश गाडे👤 सुदर्शन कदम 👤 सायारेड्डी चाकरोड 👤 रवींद्र शेळके 👤 अभिषेक निकम *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 93*रात्री येतो चांदीचा गोळा**ताऱ्यांबरोबर करतो खेळा**सूर्य गेला की मीच राजा**सांगा पाहू मी कोण भला ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - बंदूक ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्याच्याजवळ धैर्य आहे व जो मेहनत करायला घाबरत नाही, अशा हिम्मतवानाची सफलता दासी असते.-- दयानंद सरस्वती*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**जि. प. प्रा. शाळा झरी ता. लोहा जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) तृतीयपंथीय समुदायाच्या सबलीकरणासाठी देशातील पहिले रेशन दुकान कोठे सुरू होत आहे ?२) भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानुने नार्वेच्या फोडे येथे सुरू असलेल्या वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक जिंकले ?३) कोणत्या मोसमी वाऱ्यांमुळे भारतात ८५% पाऊस पडतो ?४) कृत्रिम दात बनविण्यासाठी कोणत्या प्लास्टिकचा वापर करतात ?५) चितगाव बंदर कोणत्या देशात आहे ? *उत्तरे :-* १) कोल्हापूर २) रौप्यपदक ३) नैऋत्य ४) ॲक्रेलिक रेझिन ५) बांगलादेश*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 विषुववृत्त 📙 पृथ्वीचा अप्रतिम फोटो (उपग्रहातून काढलेला) एका कार्यक्रमात स्लाइड प्रोजेक्टरमधून दाखवला गेला. ते विलोभनीय दृश्य पाहून अनेकजण भारावून गेले होते. निरनिराळ्या छटांतून फोटोमधील काय भाग व्यक्त होतो, याचे यथार्थ वर्णनही केले जात होते. एवढ्यात एकाने उठून शंका विचारली, "फोटो छानच आहे, पण त्यावर व विषुववृत्त - ते कुठे कसे दिसत नाही ? अक्षांश व रेखांश यांच्याशिवाय ही पृथ्वी कशी म्हणायची ?"प्रत्येकाच्या मनातील पृथ्वीची आकृती व पृथ्वीचा गोल हा असा ठसलेला असतो. पृथ्वीवर प्रत्यक्षात अक्षांश, रेखांश वा वृत्ते नाहीतच, तर त्या काल्पनिक रेषा आहेत, हे लक्षातच राहत नाही. अशीच काही फसगत बोटीवरून प्रथम विषुववृत्त ओलांडणाऱ्यांची होते. प्रत्येक बोटीवर विषुववृत्त ओलांडण्याचा एक सोहळा अावर्जून पार पाडला जातो. पृथ्वीच्या एका गोलार्धातून दुसऱ्या गोलार्धात जाणे हे जरा कौतुकाचेच नाही काय ? निदान पुर्वी तरी तसे समजले जायचे. डेकवर सगळे जमून जेव्हा विषुववृत्त 'पार' करतात - म्हणजे नेव्हिगेटर तसे सांगतो - तेव्हा हा सोहळा साजरा केला जातो. नव्याने बोटीवर आलेला कॅडेट मात्र डोळे फाडफाडून विषुववृत्ताची रेषा शोधायचा व या सोहळ्याचा संदर्भ सापडायचा प्रयत्न करत असतो. त्याच्या पुढच्या खेपेला मात्र तो नवीन दाखल झालेल्या कॅडेटला विषुववृत्त पार करायच्या सोहळ्याचे वर्णन आधीपासून सांगू लागतो.तर असे हे विषुववृत्त म्हणजे पृथ्वीची मध्यभागी बरोबर दक्षिण व उत्तर गोलार्धात फोड करणारी काल्पनिक रेषा आहे. विषुववृत्तावर पृथ्वीचा परीघ ४०,०७७ किलोमीटर भरतो. मुख्यतः २१ मार्च व २३ सप्टेंबर या दिवशी दुपारी बारा वाजता सूर्य बरोबर विषुववृत्तावर असतो, तर या दोन तारखांच्या दरम्यान जवळपासच असतो. त्यामुळे या प्रदेशात तापमान नेहमीच चांगले उष्ण असते. अनेक विषुववृत्तीय प्रदेशात दुपारी भरपूर हवा तापत जाते व सायंकाळच्या वेळी एखादी पावसाची सर येऊन हवेत गारवा येतो. भरपूर ऊन, भरपूर पाऊस यामुळे सर्व विषववृत्तीय प्रदेश दाट जंगलांनी भरलेला आहे.विषुववृत्ताची आठवण विमानातून पृथ्वी प्रदक्षिणेचे उच्चांक करायला जाणाऱ्यांनाही हमखास होत असते.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तो हा भक्तांचे तोडरीं । वाचे उच्चारितां हरी ॥१॥काम होऊनि निष्काम । काम भावभक्ति प्रेम ॥२॥तो हा पूर्ण काम होय । अखंडित नाम गाय ॥३॥काम निष्काम झाला मनीं । वंदी नाचे दासी जनी ॥४॥संत जनाबाई ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गंमत बघणारे आणि गंमत करणाऱ्यामध्ये खूप फरक असतो. कारण गंमत करणारा कधी काळी दु:खात असणाऱ्या व्यक्तीला कसं हसवता येईल या प्रयत्नात असतो आणि गंमत बघणारा व्यक्ती, एखाद्याचे वाटोळे कधी होईल आणि ते सर्व होताना बघून आनंद कशाप्रकारे घेता येईल याची वाट बघत असतो. अशा विचारसरणीमुळे अनेकांची वाट लागत असते म्हणून कोणाला हसवता येत नसेल तर कोणाची गंमत बघण्यात आनंद घेऊ नये.आपली कधी, कोण गंमत बघणार आहे ती वेळ कधीच सांगून येत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *थोडं-फार येतं* ━━━━━━━━━*आधी न कळवता आजारी बिरबलाला पाहण्यासाठी अचानक बादशहा त्याच्या घरी गेला. घरापुढील अंगणात प्रवेश करता-करता, बिरबलच्या तिथेच खेळत असलेल्या दहा-बारा वर्षांच्या मुलीस बादशहाने उर्दूत विचारले, ''बेटी, तुझे वडील घरात आहेत का ?'' बादशहाच्या याच नाही, तर आणखी दोन-तीन उर्दूत विचारलेल्या प्रश्नांना बिरबलच्या त्या चुणचुणीत मुलीने अगदी योग्य अशी समर्पक उत्तरे उर्दूतूनच दिली. *ती उत्तरं ऐकून त्याने तिला विचारले, ''बेटी, तुला उर्दू बोलता येतं वाटतं?''**त्यावर बिरबल कन्या म्हणाली, ''थोडं-फार येतं.''**तेव्हा बादशहानं विचारलं*, *''थोडं-फार म्हणजे किती?''**यावर बिरबलाची मुलगी म्हणाली, ''महाराज, ज्यांना उर्दू फार येतं त्यांच्याशी तुलना केली तर मला 'थोडं, येतं आणि ज्या लोकांना ते अगदीच 'थोडं' येतं, त्यांच्याशी तुलना केली तर, मला ते फार येतं.'' बापाचे चातुर्य बेटीतही सहीसही उतरलेले पाहून* *बादशहाने कौतुकाने तिची पाठ थोपटली.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment