✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 13 ऑक्टोबर 2025💠 वार - सोमवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/18XoJk62FL/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :- • १९२९: पुण्यातील पर्वती देवस्थान दलितांना खुले झाले.• २०१३: मध्य प्रदेश मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ११५ जण ठार आणि ११० जण जखमी झाले.• १९७६: इबोला - या विषाणूचा पहिला इलेक्ट्रॉन मायक्रोग्राफ घेण्यात आला.🎂 जन्म :- • १८७७: स्वातंत्र्यसेनानी होमरुल चळवळीतील कार्यकर्ते भुलाभाई देसाई यांचा जन्म. (मृत्यू: ६ मे १९४६)• १९११: चित्रपट अभिनेते अशोक कुमार गांगुली ऊर्फ दादामुनी यांचा जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर २००१)• १९२४: भारतीय राजकारणी मोतीरु उदयम यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मार्च २००२)• १९३६: भारतीय वीणा वादक आणि संगीतकार चित्ती बाबू यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९९६)• १९३०: भारतीय लेखक सय्यद मुस्तफा सिराज यांचा जन्म (मृत्यू : ४ सप्टेंबर २०१२)🌹 मृत्यू :- • १९११: स्वामी विवेकानंदांच्या शिष्या मार्गारेट नोबल भगिनी निवेदिता यांचे निधन. (जन्म: २८ ऑक्टोबर १८६७)• १९८७: पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, आभिनेता व पटकथालेखक आभास कुमार गांगुली तथा किशोर कुमार यांचे निधन. (जन्म: ४ ऑगस्ट १९२९)• १९९५: हिन्दी साहित्यिक डॉ. रामेश्वर शुक्ल तथा अंचल यांचे निधन. (जन्म: १ मे १९१५ - किशनपूर, फतेहपूर, उत्तर प्रदेश)• २००१: कुष्ठरोगतज्ज्ञ, नामवंत शल्यचिकित्सक डॉ. जाल मिनोचर मेहता यांचे निधन.• २०१८: भारतीय सुरबहार (बास सितार) वादक - पद्म भूषण अन्नपूर्णा देवी यांचे निधन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्वागत करू या स्त्री जन्माचे*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *केरळ पुन्हा एकदा देशासाठी आदर्श, अत्यंत गरिबी निर्मूलन, असे करणारे दक्षिण आशियातील पहिले राज्य; 73,000 सूक्ष्म योजना विकसित केल्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अमरावती विद्यापीठाचे अकाेल्यात उपकेंद्र‎, 3 अधिकाऱ्यांची समिती देणार आराखडा; उच्च व तंत्र शिक्षण मं‌त्र्यांचा आदेश‎*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *बिहारमध्ये NDA ने जागावाटपाची घोषणा केली, भाजप-101, जेडीयू- 101, एलजेपीआर- 29, आरएलएम आणि एचएएमला प्रत्येकी 6 जागा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *'शिका आणि कमवा' सामाजिक चळवळ व्हावी, चंद्रकांत पाटील यांचे कौशल्ययुक्त तरुणांसाठी आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गाझा शांतता करारसाठी इजीप्त मध्ये जागतिक नेत्यांची शिखर परिषद*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *थकीत 4 हजार कोटींची रक्कम द्या, विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांची गैरसोय होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशिया कप - ऑस्ट्रेलिया समोर ठेवले 330 धावाचे लक्ष्य, भारतीय महिला क्रिकेट खेळाडू स्मृती मानधना बनली 5000 धावा करणारी दुसरी खेळाडू*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🄷🄰🄿🄿🅈 🄱🄸🅁🅃🄷 🄳🄰🅈 *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 नागोराव कमलाकर, पदवीधर शिक्षक, धर्माबाद 👤 अजय त्रिभुवन, साहित्यिक 👤 किशोर यमेवार, धर्माबाद 👤 सतिश शहा, उद्योजक, मुंबई 👤 नरेश पत्राळे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 98*मी आहे अत्यंत मौल्यवान**मी असतो प्रत्येकाच्या गळ्यात**महिला मला घेऊन मिरवतात**पुरुष मात्र शौकाने घालतात**मी कोण ओळखा पाहू*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - फुगा••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विवेक हाती धरून घेतलेलं काम अखेरपर्यंत करीत राहण यात जीवनाची सार्थकता आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**जि. प. प्रा. शाळा झरी ता. लोहा जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••१) २०२५ चा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?२) ३८ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे ?३) भारताचा सर्वात श्रीमंत युट्युबर्स कोण आहे ?४) 'मंगळवार'चे जुने नाव काय होते ?५) सप्तखंजरीवादक सत्यपाल महाराज कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत ? *उत्तरे :-* १) मारिया कोरीना मचाडो, व्हेनेझुएला २) प्रवीण सिंह परदेशी, अध्यक्ष BNHS ३) तन्मय भट्ट ४) भौमवार ५) सामाजिक प्रबोधन*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *धुके कसे तयार होतात ?* 📙 *******************************थंडीची चाहूल धुक्याने लागते. धुळे पांघरलेली पहाट उजाडली म्हणजे पावसाळा संपला. असे मानले जाते. दाट धुके पडले की पहाटेपर्यंत त्याचे दवाबिंदूत रूपांतर होते. धुक्यामुळे गव्हाची पेरणी केलेला शेतकरी आनंदीत होतो; कारण दवामुळे पीक चांगले येणार अशी त्याची खात्री पटलेली असते. धुक्यामध्ये आपण कधी प्रवास केला तर काही अंतर गेल्यावर असे लक्षात येते की आपले कपडे ओलसर झाले आहेत. याचे कारण म्हणजे हवेतील बाष्पाचे घनरूप म्हणजेच धुके. पाण्यातून निघणारी वाफ आपण नेहमीच बघत असतो. पण ही वाफ ढगांपर्यंत पोहोचेतोवर सहसा घनरूप होत नाही. थंडीच्या दिवसांत जेव्हा तापमान खाली येते तेव्हा मात्र हवेतील या वाफेचे लहान लहान पाण्याचे थेंब बनतात. थेंब म्हणायचे, पण असतात अगदी सूक्ष्मकणच. हे सूक्ष्मकण म्हणजेच धुके. उत्तर भारतात याला कोहरा म्हणतात. या धुक्याचा म्हणजेच सूक्ष्म कणांचा थर सभोवताली पसरला की आसपासचे कमी दिसू लागते. जे दिसते ते अस्पष्ट असते. दाट धुक्याच्या थरांमध्ये अनेकदा दृश्यमानता चार पाच फुटांपर्यंतही कमी होते. यामुळे रस्त्यांवर वाहने चालवणे, विमानतळावर विमान उतरवणे, उघड्यावरील नेहमीची कामे करणे अशक्य होऊन बसते. अपघातांचे प्रमाण यामुळे खूपच वाढू शकते. भारतात धुके हा प्रश्न काही दिवसांपुरताच असतो. फारतर उत्तर भारतातील हिमालयाचा उतार व काश्मीरचे खोरे येथे धुक्याची शाल पांघरल्याने जनजीवन ठप्प होऊ शकते; पण परदेशात धुके हा नित्याचा त्रासदायक भाग ठरतो. उपनगरांतून पन्नास किलोमीटरवर कामाच्या जागी पोहोचताना वर्षांचे सहा महिने जर धुके त्रास देणार असेल, तर पंचाईतच. पण यावर निसर्गत:च एक उतारा दिला आहे गेला आहे. वारा पडला असला, सूर्यप्रकाश नसला, तर धुके टिकून राहते, नाहीतर वाऱ्याबरोबर धुकेही जाते व सूर्यप्रकाशाच्या उष्णतेने हे घनीभूत बाष्प पुन्हा वायुरूप होऊ लागते. धुक्याला मानवी हातभार मात्र काही ठिकाणी लागतो. चहूबाजूंना डोंगर, वाऱ्याला अटकाव, शहरांतील असंख्य वाहनांचा धूर व कारखान्यांच्या धुराड्यांतील रासायनिक धुर यांचे एकत्रित मिश्रण खरोखरच त्रासदायक ठरू लागते. यालाच स्माॅग (स्मोक व फॉग मिळून बनलेले) असाही शब्द तेथे वापरला जातो. दिल्लीमध्ये थंडीच्या दिवसात या स्माॅगचा फटका गेली अनेक वर्षे दिल्लीकर खात आहेत. या स्माॅगचे वजन धुक्यापेक्षा थोडे जास्त असल्याने याचा ढग स्थिरावल्यासारखा शहरावर तरंगत राहतो. युरोपमध्ये व अमेरिकेत जेथे मोठ्या प्रमाणावर वाहने वापरली जातात अशा अनेक शहरांतून सायंकाळच्या वेळी स्मॉगचा थर शहरावर पसरणे हे नवीन राहिलेले नाही. या बाबतीत मेक्सिको सिटी व लॉस एंजेलिस या दोन शहरांचा उल्लेख नेहमीच केला गेला आहे. १९६० च्या दशकापर्यंत लंडनसुद्धा यात सामील होते. पण कोळशाचा वापर खाण कारखान्यांनी बंद केला व लंडनच्या वातावरणात फरक पडला आहे. धुक्यात अपघात घडू नयेत म्हणून खास प्रकारचे हॅलोजन लॅम्प्स वापरले जातात. या दिव्यांचा प्रकाश पिवळसर असल्याने त्यांचे वेगळेपण धुक्यातून जाणवते. विमानांच्या बाबतीत रडारच्या सहाय्याने ऑटो पायलट इन्स्ट्रक्शन्स घेऊनच आता सरसकट विमाने उतरवली जातात. तरीही अनेकदा दाट धुक्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत, अशी बातमी वाचायला मिळतेच !*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ये हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून || धृ ||नेसून शुभ्र पातळ | गळा घालून मुक्ताफळकटी कंबरपट्टा कसून | शारदे मायुरावरती || १ ||हाती घेवूनीया वीणा | करी मंजुळ गयानाये सभेमध्ये बसून शारदे मायुरावरती || २ ||तुका म्हणे ब्रम्हानंदिनी | मम हृदयी विराजुनीदे अंतजीत बसून शारदे मायुरावरती || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या व्यक्तीच्या विषयी सर्व काही माहीत असताना सुद्धा नको त्या शब्दात बोलणे तसेच त्याच ठिकाणी एखाद्या व्यक्ती विषयी माहिती नसताना किंवा त्याला न वाचता जसं तोडांला आलं त्याच शब्दात बोलून मोकळे होणे या दोघांमध्ये काहीच फरक नसतो. त्यामुळेच अशा या आपल्या विचारामुळे त्या व्यक्तीला दु:ख तर होतोच पण, समोर असलेल्या काही व्यक्ती समोर आपल्या विषयी किंवा आपल्या विचारांचा आदर असेलच असेही नाही. कारण प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या परिस्थितीतून गेलेली असते त्यामुळे माणसं ओळखण्याची कुठेतरी त्यांना दिव्यदृष्टी असतेच म्हणून कोणालाही न वाचता किंवा त्याच्याविषयी माहीती नसताना स्वतः च्या मनाचे समाधान करण्यासाठी कोणत्याही शब्दात बोलू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *विजय असो* ━━━━━━━━━━━━━━*एकदा एका गावात दोन कोंबड्यांची झुंज सुरु झाली. भांडणाचे कारणही तसे भारीच होते, एका कोंबडीशी कुणी लग्‍न करायचे यावरून त्‍या दोघांत खूप भांडणे झाली व त्‍याचे पर्यवसान झुंजीत झाले. अटीतटीच्‍या झुंजीत दोघेही एकमेकांवर प्रहार करू लागले. मारामारीत दोघांचेही अंग रक्‍तबंबाळ झाले, त्‍यातील एकाने मग रक्तबंबाळ झाल्‍याने सरळ पळून जाऊन आपल्‍या खुराड्याचा आधार घेतला व तिथूनच तो आणि ती कोंबडी बाहेर काय चालले आहे हे पाहू लागले. भांडणात खुराड्याच्‍या बाहेर असलेल्‍या कोंबड्याला हा आपला विजय वाटून त्‍याने घराचे छत गाठले व तिथून जोरजोराने त्‍या कोंबडीकडे बघून ''मी जिंकलो, मी जिंकलो'' असे ओरडू लागला, स्‍वत:चाच जयघोष करू लागला. तेवढ्या वरून एक गरूड आला व त्‍याने त्‍या ओरडणा-या कोंबड्याला उचलले व लांब जाऊन त्‍याने त्‍याला मारून खाऊन टाकले. हे पाहिल्‍यावर पराभूत झालेला कोंबडा व कोंबडी बाहेर आले तेव्‍हा तो कोंबडा कोंबडीला म्‍हणाला,''मी जर बाहेर राहिलो असतो तर त्‍या कोंबड्यासारखीच माझी हालत झाली असती. मी माझ्या जीवाला जसा जपतो तसाच तुलाही जपेन.''**तात्‍पर्य :- ज्‍याच्‍या डोक्‍यात यशाची हवा चढते तेव्‍हाच त्‍याच्‍या पराजयाची सुरुवात होते. यश पचविता येणे ही एक मोठी गोष्‍ट आहे.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment