✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04 ऑक्टोबर 2025💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1DUqigpKCn/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :- • १८२४: मेक्सिकोने नवीन राज्यघटना अंगीकारली आणि ते प्रजासत्ताक बनले.• १९२७: गस्टन बोरग्लम याने माऊंट रशमोअर चे शिल्प कोरण्यास सुरुवात केली.• १९४०: ब्रेनर पास येथे अॅडॉल्फ हिटलर व बेनिटो मुसोलिनी यांची भेट झाली.• १९४३: दुसरे महायुद्ध – अमेरिकेने सॉलोमन बेटे ताब्यात घेतली.• १९५७: सोविएत रशियाने स्पुटनिक-१ हा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडून अंतराळयुगाचा प्रारंभ केला.• १९५९: सोविएत रशियाच्या ल्युनिक-३ या अंतराळयानाने चंद्राला प्रदक्षिणा घालून चंद्राच्या पृथ्वीवरुन न दिसणार्या भागाची छायाचित्रे घेतली.• १९८३: नेवाडामधील ब्लॅक रॉक डेझर्ट येथे रिचर्ड नोबल याने आपली थ्रस्ट – २ ही गाडी ताशी १०१९ किमी वेगाने चालवून विश्वविक्रम प्रस्थापित केला.• २००६: ज्युलियन असांज यांनी विकिलीक्स सुरू केले.🎂 जन्म :- • १८८४: भारतीय इतिहासकार आणि लेखक रामचंद्र शुक्ला यांचा जन्म. (मृत्यू: २ फेब्रुवारी १९४१)• १९१३: शास्त्रीय गायिका सरस्वतीबाई राणे यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑक्टोबर २००६)• १९१६: अर्थशास्त्रज्ञ व प्राध्यापक धनसुखलाल तुलसीदास लाकडावाला यांचा जन्म.• १९२८: अमेरिकन पत्रकार व लेखक ऑल्विन टॉफलर यांचा जन्म.• १९३५: मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते, तबलावादक, गायक आणि हार्मोनियमवादक अरुण सरनाईक यांचा जन्म. (मृत्यू: २१ जून १९८४)• १९९७: भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंत यांचा जन्म• १९६१: जपानी लेखक आणि चित्रकार, युगीओहचे निर्माते काझुकी ताकाहाशी यांचा जन्म (मृत्यू : ४ जुलै २०२२)• १९४५: भारतीय राजकारणी, खासदार सेदापट्टी मुथिया यांचा जन्म (मृत्यू : २१ सप्टेंबर २०२२)🌹 मृत्यू :- • १८४७: महाराष्ट्रातील एक सद्गुणी, प्रजाहितदक्ष पण दुर्दैवी राजे प्रतापसिंह भोसले यांचे निधन. (जन्म: १८ जानेवारी १७९३)• १९०४: स्टॅच्यू ऑफ लिबर्टी चे रचनाकर फ्रेडेरीक ऑगस्टे बर्थॉल्ड यांचे निधन. (जन्म: २ ऑगस्ट १८३४)• १९२१: गायक, नट केशवराव भोसले यांचे निधन. (जन्म: ९ ऑगस्ट १८९०)• १९४७: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ मॅक्स प्लँक यांचे निधन. (जन्म: २३ एप्रिल १८५८)• १९६६: सत्यकथा चे संपादक अनंत अंतरकर यांचे निधन. (जन्म: १ डिसेंबर १९११)• १९८२: मराठी कवी सोपानदेव चौधरी यांचे निधन. (जन्म: १६ ऑक्टोबर १९०७)• १९८९: संगीतकार, गायक व नट संगीतभूषण पं. राम मराठे यांचे निधन. (जन्म: २३ ऑक्टोबर १९२४)• १९९३: अभिनेते जॉन कावस यांचे निधन.• २००२: वृत्तपट निवेदक भाई भगत यांचे निधन.• २०१५: भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता एडिडा नागेश्वर राव यांचे निधन. (जन्म: २४ एप्रिल १९३४)• २०२२: भारतीय लेखक शेखर जोशी यांचे निधन (जन्म: १० सप्टेंबर १९३२)••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*ठेविले अनंते तैसेचि राहावे*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मंत्रीमंडळाने देशभरात 57 नवीन केंद्रीय विद्यालये सुरू करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे एकूण 142 केंद्रीय विद्यालये कार्यरत होतील.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई : कच्च्या तेलाच्या दरात घट झाल्याने लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *जिल्हा परिषद आरक्षणाची सोडत 13 ऑक्टोबरला, नगरपरिषदांच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी होणार जाहीर, दिवाळीनंतर निवडणुका होण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *देशात बालविवाहाच्या घटनांमध्ये 6 पट वाढ, आसाममध्ये सर्वाधिक प्रकरणे; 16,000 हून अधिक मुलींचे लग्नासाठी अपहरण झाले*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *महाराष्ट्रातील तीन विमानतळांची नावे बदलली, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव, मुख्यमंत्र्यांकडून लवकरच अधिकृत घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अहमदाबाद - भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पहिल्या कसोटी मालिकेत केएल राहुल, ध्रुव जुरेल व रवींद्र जडेजाचे धमाकेदार शतक, भारताकडे 248 धावाची आघाडी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संगीता भांडवले, शिक्षिका व लेखिका, धाराशीव 👤 सुरेंद्र माणिकराव गाडेकर 👤 विजय पळशीकर 👤 ओमप्रकाश येवतीवाड👤 लक्ष्मण पंढोरे 👤 साईनाथ पोरडवार 👤 धनराज शेट्टीवार 👤 साई पांचाळ *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 91*बारीक असते लांब पण असते**तरीही मी काठी नाही**दोन तोंडे आहेत मला, तरीही मी गांडूळ नाही**श्वास घेते मी पण तुम्ही नाही**ओळखा पाहू मी आहे तरी कोण…?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात. प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे. -- स्वामी विवेकानंद*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) '२०२५ वर्ल्ड्स बेस्ट स्कूल प्राइज कम्युनिटी चॉईस अवार्ड'साठी जगातील कोणत्या शाळेची निवड झाली ?२) ब्रिटनस्थित 'टी4 एज्युकेशन संस्थे'ने जाहीर केलेल्या जगातील सर्वोत्कृष्ट शाळा जालिंदरनगर जि. पुणे या शाळेचे मुख्याध्यापक कोण ?३) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केव्हा झाली ?४) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० वर्षात किती सरसंघचालक लाभले ?५) राज्यसभेच्या खासदारांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ? *उत्तरे :-* १) जि. प. प्राथ. शाळा जालिंदरनगर ता. खेड, जि.पुणे २) दत्तात्रय वारे गुरुजी ३) २७ सप्टेंबर १९२५ ४) सहा ५) ६ वर्षे*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *दूरचित्रवाणी (Television)* 📙**************************दूरचित्रवाणीचे भारतात आगमन खूपच उशिरा झाले. केवळ दिल्लीपुरते 'दूरदर्शन' अनेक वर्षे वापरात होते. पण तेही 'दूरचित्रवाणी'च्या जागतिक वापरानंतर २० वर्षांनी १९५६ साली सुरू झाले. अन्य सर्व शहरात तर दूरदर्शनची सेवा १९७२ पासून मिळू लागली. आज बऱ्याच भागांत हे जाळे पसरले आहे व त्याने आता उपग्रहाद्वारे स्वतःचे हातपाय पक्के रोवायला सुरुवात केली आहे.१९२६ साली जॉन बर्ड याने टेलिव्हिजन हा प्रकार शोधला. १९३६ साली लंडनमध्ये बीबीसीने त्याचे कार्यक्रम सुरू केले, तर पहिले रंगीत प्रक्षेपण १९५१ मध्ये अमेरिकेत झाले. खरे म्हणजे रेडिओ सिग्नल्सद्वारेच प्रकाशचित्रे पण पाठवता येतील, याचा अंदाज शास्त्रज्ञांना १९०० सालीच आला होता. कल्पना वास्तवात यायला हा काळ जावा लागला. नेहमीच्या कॅमेऱ्यासारखा कॅमेरा. पण त्यात फिल्म न घालता प्रतिमा प्रकाशाला संवेदनक्षम अशा एका पृष्ठभागावर पडते. हा पृष्ठभाग वरपासून खालपर्यंत एका इलेक्ट्रॉन्सच्या झोताने न्याहाळला जातो. ही क्रिया होतानाच त्यातून ज्या रेडिओलहरी निर्माण होतात, त्यात जे बदल होतात, त्यासकट त्यांचे प्रक्षेपण केले जाते. याची पद्धत अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी माॅड्युलेशन (UHF) या नावाने ओळखली जाते. या लहरी थेट सरळ प्रवास करतात. म्हणूनच टीव्हीचा अँटेना व प्रक्षेपण मनोरा हे समोरासमोर असून मध्ये अडथळा चालत नाही. अर्थातच मनोऱ्याची उंची खूपच उंच असावी लागते. मुंबईचा वरळीचा मनोरा तीनशे मीटर उंच आहे, तर पुण्याचा सिंहगडावरच आहे. जगातील सर्वात उंच मनोरा आहे ६२८ मीटर उंचीचा, फार्गो, नॉर्थ डकोटा येथे अमेरिकेत.हे रेडिओ सिग्नल्स आपल्या घरातील अँटेना गोळा करतात. त्यांचे रूपांतर पिक्चर ट्युबमुळे पुन्हा इलेक्ट्रॉन झोतामध्ये होते. हा झोत फॉस्फरसचा थर दिलेल्या टीव्ही पडद्यावर आतून पडतो. ज्या ठिकाणी झोत पडेल तो भाग प्रकाशाने उजळून निघतो. ही क्रिया सतत झिगझॅग पद्धतीने चालू असते. त्यामुळे पडद्यावरील चित्र पूर्ण होऊन डोळ्यांना दिसते. पडद्यावरील चित्र हे आडव्या बारीकबारीक रेघांद्वारे आपल्यासमोर येते. प्रत्येक केंद्र स्वतःचे चित्र किती रेघांद्वारे प्रक्षेपित करायचे, ते ठरवते. अर्थात हा झाला त्याचा तांत्रिक भाग. तसेच दर सेकंदाला किती चित्रे प्रक्षेपित करायची, हेही प्रमाण एखाद्या चलतचित्राप्रमाणे ठरवले जाते. त्यामुळे समोरची स्थिर चित्रेच आपल्याला हालचाल करताना दिसू लागतात.१९८२ सालच्या एशियाडपासून रंगीत दूरचित्रवाणी 'दूरदर्शन' मार्फत भारतात आली. मूळ रंगा तीन. लाल, निळा, हिरवा यांचा वापर करून सर्व रंग बनतात, हे तत्त्व रंगीत टीव्ही वापरतो. पिक्चर ट्यूबमधून तीन प्रकारचे इलेक्ट्रॉन झोत पडद्यावर टाकले जातात. यांच्या मिश्रणातून आपल्याला परीपूर्ण रंगीत चित्र दिसू लागते. यात सर्व रंगांचे सुखद मिश्रण असते. नको असलेले रंगझोत टाळण्यासाठी पडद्यामागे एका विशिष्ट प्रकारची जाळी (shadow grid) असते. त्यामुळे नेमक्या जागी नेमका रंग हे मिश्रण साधले जाते. रंगीत प्रक्षेपणाच्या कॅमेऱ्यातून केलेले चित्रण कृष्णधवल टीव्हीवरही कृष्णधवल रंगात पाहता येते. दूरचित्रवाणीचा कॅमेरा हा चित्रण करताना त्यामागे बसवलेल्या छोट्या टीव्हीवर प्रत्यक्ष चित्रण कसे दिसेल, याचे स्वरुप जसेच्या तसे दाखवत असतो. त्यामुळे कॅमेरामन झटपट बदल करू शकतात. तसेच एका प्रसंगाचे चित्रण दोन वा अधिकही कॅमेरे करतात. त्यांतील नेमक्या कोणत्या चित्राचे प्रक्षेपण करायचे, ते संकलक ठरवतो. त्याच्यासमोर या सर्वांचे प्रक्षेपण एकाच ओळीत लावलेल्या पडद्यांवर दिसत असते. त्यामुळेच कधी जवळून, कधी वरून, कधी संपूर्ण दृश्याचे असे चित्रण आपण बघू शकतो. टीव्ही पडदा खूप मोठा करून एखाद्या ऑलिम्पिक स्टेडियममध्ये लावणे हे आता नवीन नाही. ऑलिम्पिक स्टेडियममधील प्रत्येक कार्यक्रम तेथील लोक प्रत्यक्ष व मोठ्या पडद्यावर ब्लोअप केलेला असाही बघू शकतात. पिक्चर ट्यूब व तिच्यामधून होणाऱ्या पडद्यावरच्या इलेक्ट्रॉन माऱ्यामुळे टीव्हीची जाडी वाढते. भिंतींवर तसबिरीप्रमाणे टांगता येणारा टीव्ही बनवायला त्यामुळे सतत अडचणी येत होत्या. पण आता जेमतेम तीन इंच जाडीचा तसबिरीसारखा टीव्हीपण वापरात आला आहे. स्टँडवरचा वा टिपाॅयवरचा टीव्ही आता भिंतीवरही जाऊ शकेल. फ्लॅट स्क्रीन, २१ इंच ते ७२ इंच या दरम्यानचे अनेक आकारांतील पडदे असलेले टीव्ही आता उपलब्ध आहेत. थेट एलसीडी प्रोजेक्टरचा वापर करून घरातील भिंतीवरही आपण चित्र पाहू शकतो. टीव्ही सुरू करणे, बंद करणे, कार्यक्रम संपल्यावर आपोआप बंद होणे व जागेवरूनच या गोष्टी घडवणे हेही रिमोट कंट्रोलमुळे शक्य झाले आहे. इन्फ्रारेड किरणांद्वारे टीव्हीच्या नियंत्रकाला दिलेल्या सूचना पाळल्या जाऊन या गोष्टी घडतात.टीव्ही हे करमणुकीचे माध्यम आहेच; पण खरे म्हणजे उत्कृष्ट शैक्षणिक व लोकजागृतीचे माध्यम आहे. सध्या विविध प्रकारच्या वाहिन्यांवरील विशिष्ट प्रकारचे कार्यक्रम देत आहेत. वार्तांकन, क्रीडा, करमणूक, सिनेमा, कार्टून, विनोदी, विज्ञान, प्राणीजगत अशा विविध कार्यक्रमांतून प्रेक्षक निवड करू शकतात. तेही त्यांच्या स्वतःच्या भाषेतून.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••यारे नाचू प्रेमानांदे, विठ्ठल नामाचिया छंद || धृ ||जाऊ म्हणती पंढरीची वाटे, कळीकाळा भयं वाटे || १ ||चंद्रभागे घडले स्नान, याम लोकी पडली हान || २ ||झाली पुंडलिक भेटी, पूर्वज आनंदले वैकुंठी || ३ ||आता राऊळासी जाता, झाली जीवाची मुक्तता || ४ ||विष्णुदास नामा म्हणे, आता नाही येणे जाणे || ५ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सुखात असतात कोणाची आठवण येत नाही. आणि दु:खात असताना मात्र आपल्या माणसांची पदोपदी आठवण येत असते. कारण त्यावेळी सुख महत्वाचे वाटत नाही तर आपल्या माणसांच्या साथीची आवश्यकता वाटत असते म्हणून सुखात असो किंवा दु:खात आपल्या माणसांना कधीच विसरू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कुंभाराचे प्रेम स्वरूप*आज मदन लाकूड तोडण्यासाठी इकडे तिकडे फिरला, पण त्याला एकही सुकलेले झाड सापडले नाही. त्याला निसर्गाची इतकी ओढ होती की त्याने कुऱ्हाडीच्या वाराने हिरवीगार झाडे तोडली नाहीत. त्यांनी झाडे आणि वनस्पतींना पुत्र मानले आणि मनुष्य कधीही पुत्राला मारू शकत नाही. मदन खूप गरीब होता, घरात वृद्ध आई-वडील, पत्नी आणि दोन लहान मुले होती. त्यांचा उदरनिर्वाह मदनच्या कामावरच चालत असे. मदन दिवसभर जंगलात फिरून लाकूड गोळा करायचा आणि संध्याकाळपर्यंत बाजारात विकायचा आणि खाण्यापिण्याचे पदार्थ घरी आणायचा. त्यामुळे संपूर्ण घराला दोन वेळची भाकरी खायला मिळत होती. न जाणो तो असा कोणता दिवस होता की आज त्याला एकही सुकलेले लाकूड किंवा वाळलेले झाड सापडले नाही. दमून तो एका जागी बसला.आज घरी नेण्यासाठी इतर पाण्याची व्यवस्था होऊ शकली नाही याचे त्याला खूप वाईट वाटले. विचार करता करता तो बेशुद्ध झाला आणि तिथेच पडून राहिला. निसर्ग नेहमीच माणसाचे रक्षण करतो, मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि निसर्गाच्या पुत्राप्रमाणे माणसाचे पालनपोषण करतो. मदनची अशी अवस्था पाहून प्रकृतीतही दुःखाचे वातावरण होते. मग अचानक एक विचित्र घटना घडते, झाडांवरून थंड वारा वाहू लागतो. मदनला अचानक जाग आली तेव्हा त्याला त्याच्या जवळ कपड्यांचे बंडल दिसले. झाडांवरून वाहणाऱ्या वाऱ्याने हा बंधारा मदनात आला. या पोतलीचे रहस्य असे होते – काही दिवसांपूर्वी जंगली डाकू एका भल्या माणसाला लुटून पळून जात असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तो डोंगरातील दुर्गम दरीत पडला, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पडताना हा गठ्ठा दरोडेखोरांच्या हातातून निसटला आणि झाडाला लटकला. आज गरजेच्या वेळी मदनला त्या पैशातून मदत करता आली.नैतिक – जेव्हा तुम्ही एखाद्याला मदत करता तेव्हा निष्पाप लोकांना त्रास देऊ नका तेव्हा निसर्ग देखील तुम्हाला मदत करतो. जेव्हा तुम्ही निसर्गाची हानी करता तेव्हा निसर्गही तुमची हानी करतो, ही हानी दीर्घकालीन असते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment