✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 14 ऑक्टोबर 2025💠 वार - मंगळवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1Fm7XAqTUU/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :- • १८८२: भारतात (सध्याच्या पश्चिम पाकिस्तान) पंजाब विद्यापीठ सुरु झाले.• १९२०: ऑक्सफर्ड विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रमास स्त्रियांना प्रवेश दिला.• १९५६: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सुमारे ३,८०,००० अनुयायांसह दीक्षाभूमी, नागपूर येथे बौद्ध धर्मात प्रवेश केला.• १९९८: विख्यात अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना नोबेल पुरस्कार जाहीर.🎂 जन्म :- • १९२४: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आसामी साहित्यिक वीरेन्द्रकुमार भट्टाचार्य यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑगस्ट १९९७)• १९२७: जेम्स बाँडच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध इंग्लिश अभिनेता रॉजर मूर यांचा जन्म.• १९३१: मैहर घराण्याचे सतारवादक निखिल बॅनर्जी यांचा जन्म. (मृत्यू: २७ जानेवारी १९८६)• १९३६: लेखक सुभाष भेंडे यांचा जन्म. (मृत्यू: २० डिसेंबर २०१०)• १९४०: भारतीय-गायक-गीतकार आणि अभिनेते क्लिफ रिचर्ड यांचा जन्म.• १९८१: भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर यांचा जन्म.🌹 मृत्यू :- • १९४७: साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण तथा तात्यासाहेब केळकर यांचे निधन. (जन्म: २४ ऑगस्ट १८७२)• १९५३: संततिनियमन आणि लैंगिक शिक्षणसाठी विचारप्रवर्तन व प्रत्यक्ष कार्य करणारे विचारवंत र. धों. कर्वे यांचे निधन. (जन्म: १४ जानेवारी १८८२)• १९९३: वालचंद उद्योगसमूहाचे अध्यक्ष लालचंद हिराचंद दोशी यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर १९०४)• १९९४: इतिहासकार, विचारवंत, संशोधक सेतू माधवराव पगडी यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट १९१०)• २००४: स्वदेशी जागरण मंच, मजदूर संघ व कामगार संघ यांचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी यांचे निधन. (जन्म: १० नोव्हेंबर १९२०)• २०१३: केन्द्रीय मंत्री व सामाजिक कार्यकर्ते मोहन धारिया यांचे निधन. (जन्म: १४ फेब्रुवारी १९२५)• २०१५: भारतीय नौसेनाधिपती राधाकृष्ण हरिराम तहिलियानी यांचे निधन. (जन्म: १२ मे १९३०)• २०२२: भारतीय-अमेरिकन गणितज्ञ एन. यु. प्रभु यांचे निधन (जन्म: २५ एप्रिल १९२४)• २०२२: भारतीय राजकारणी, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे आमदार केदार सिंग फोनिया यांचे निधन (जन्म: ६ ऑक्टोबर १९३०)••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आपली कामे आणि आपण*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 2025-26 शैक्षणिक वर्षाच्या दहावी आणि बारावी परीक्षाचे वेळापत्रक जाहीर, बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारीपासून होणार सुरु*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अखेर भारतीय बनावटीचं 'तेजस' शुक्रवारी आकाशात झेपावणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *दीपक ठाकूर हिंदुजा रिन्यूएबल्स एनर्जीचे नवे MD आणि CEO, अक्षय ऊर्जेत 30 वर्षांचा अनुभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शेती हा केवळ व्यवसाय नाही तर आपल्या संस्कृतीचा श्वास, कृषी पदवीधरांनी शास्त्रीय शेतीचा आदर्श निर्माण करावा - कृषिमंत्री दत्तात्रय भरणे*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुण्याला 1000 ई-बसेस मिळण्याच्या प्रक्रियेला गती, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अवजड उद्योगमंत्र्यांशी चर्चा केली*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड !कर्मचाऱ्यांना 6 हजार रुपये सानुग्रह अनुदान, 12500 रुपयांची सण उचल देखील मिळणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत वि. वेस्ट इंडिज कसोटी सामना - भारत विजयापासून 58 रन दूर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🄷🄰🄿🄿🅈 🄱🄸🅁🅃🄷 🄳🄰🅈 *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 डॉ. भास्कर पेरके, जिल्हा वैद्यकीय अधिकारी, नांदेड 👤 मिलिंद जाधव,, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक, नांदेड 👤 मुरलीधर थोटे, कंधार 👤 गणेश सिरमेवार, शिक्षक, धर्माबाद 👤 डॉ. भास्कर पेरके, जिल्हा वैद्यकीय अधिकारी, नांदेड 👤 अमोल मोरे 👤 रत्नाकर सोनवणे 👤 शिवशंकर संगमवार 👤 सतिश उशलवार *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 99*लोक मला खाण्यासाठी विकत घेतात**पण ते मला कधीही खात नाहीत**ओळखा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - सोन्याचे हार ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपले अंत:करण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत कशाचीही भीती बाळगण्याची जरुरी नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**जि. प. प्रा. शाळा झरी ता. लोहा जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २०२५ चा साहित्याचा नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?२) रशियाच्या दिग्गज खेळाडू गॅरी कास्पारोव्ह कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?३) व्हाट्सअपद्वारे प्रशासन सेवा सुरू करणारे जगातले पहिले राज्य कोणते ?४) आत्मनिर्भर भारत अंतर्गत भारताने अलीकडेच आफ्रिकेतील कोणत्या देशात पहिला परदेशी संरक्षण प्रकल्प उघडला आहे ?५) 'बुधवार'चे जुने नाव काय होते ? *उत्तरे :-* १) लास्टझलो क्रास्नाहोरकाई, हंगेरी २) बुद्धिबळ ३) आंध्रप्रदेश ४) मोरोक्को ५) सौम्यवार*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌥 उंचावरची हवा थंड का असते ? 🌥आपण सहसा पाहतो, की थंड हवेच्या ठिकाणाची उंची समुद्रसपाटीपासून जास्त असते. जसजशी ही उंची वाढते तसतसं तिथलं हवामानही त्याच्याजवळच, पण कमी उंचीवर असलेल्या ठिकाणाहून अधिक थंड होतं. आपल्या ओळखीच्या महाबळेश्वरचंच उदाहरण घ्या ना. सहय़ाद्रीच्या माथ्यावर ते वसलेलं आहे. त्याच डोंगरकड्याच्या पायथ्याशी असलेल्या वाईपासून त्याचं अंतर केवळ काही किलोमीटरचंच असेल; पण वाईचं तापमान उष्ण, तर महाबळेश्वरचं थंड असतं. सगळीकडेच आपल्याला असा अनुभव येतो. साहजिकच उंचावरची हवा थंड का असते, असा सवाल मनात उभा राहतो.त्याचं उत्तर दोन्ही ठिकाणच्या हवेच्या गुणधर्मात दडलेलं आहे. कोणत्याही वायूवर असणारा दाब आणि त्याचं तापमान त्याचं सरळ नातं असतं. वायूवरचा दाब जास्त असेल तर त्याचं तापमानही वाढीव असतं. उलटपक्षी जर तो दाब कमी असेल तर तापमानही घटलेलं असतं. सायकलच्या चाकात जेव्हा हवा भरण्यासाठी आपण पंपातला दाब वाढवतो तेव्हा त्या हवेचं तापमान वाढत जातं. ती तापलेली असते. परिणामी, तो पंपही तापतो; पण त्याच टायरमधून आपण हवा सोडून तिला दाब कमी केला की त्याचं तापमान उतरतं.रेफ्रिजरेटरमध्ये वायूच्या याच गुणधर्माचा वापर केलेला असतो. त्या यंत्रांमध्ये फ्रिऑन नावाचा वायू भरलेला असतो. जेव्हा तो रेफ्रिजरेटरच्या बाहेर असतो तेव्हा त्याच्यावर दाब देऊन त्याच्यातील उष्णता का काढून टाकली जाते. तो जेव्हा रेफ्रिजरेटरच्या आत असतो तेव्हा त्याच्यावरचा दाब कमी करत तो थंड केला जातो. त्यामुळे आतली उष्णता त्याच्याकरवी शोषली जाते व ती बाहेर का टाकली जाते. हवा ही अशीच निरनिराळ्या वायूंची बनलेली असते, त्यामुळे तिच्या ठायीही वायूंचा हाच गुणधर्म प्रस्थापित होतो. उंचावरची हवा विरळ असते, त्यामुळे तिथला हवेचा दाबही कमी असतो. लडाखसारख्या अतिशय उंचीवरच्या ठिकाणी गेल्यावर लवकर थकवा येतो, याचं कारणही हेच आहे. तिथली हवा इतकी विरळ आणि त्यातलं ऑक्सिजनचं प्रमाण इतकं कमी असतं की आपल्या नेहमीच्या श्वासोच्छवासातून हवा तितका ऑक्सिजन आपल्याला मिळत नाही. इतक्या विरळ हवेचा दाबही साहजिकच कमी असतो. त्यापायी त्या हवेचं तापमानही घसरतं. अशा ठिकाणच्या जवळच, पण समुद्रसपाटीपासून फारश्या उंचीवर नसलेल्या ठिकाणची हवा विरळ नसते. ती तुलनेने दाट असते. त्यामुळे तिचा दाबही जास्त असतो. साहजिकच त्या हवेचं तापमानही जास्त असतं. उंचावरच्या ठिकाणाइतकं थंड नसतं. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आज सोनियाचा दिनू | वर्षे अमृताचा धनु || १ ||हरी पहिला रे हरी पहिला रे |सबाह्यअभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी || २ ||दृढविटे मन मुळी | विराजित वनमाळी || ३ ||बरवा संतसमागमू | प्रगटला आत्मारामु || ४ ||कृपासिंधु करुणाकरू | बणररखुमादेवीवरू || ५ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मनात नको त्या विकारांचा ओझा धरून फिरत राहल्याने नेहमीच अस्वस्थता, चिंता जाणवत असते आणि एक सेंकद सुध्दा मनमोकळ्या पणाने जगता येत नाही. अशा प्रकारच्या परिस्थितीत व्यक्तीला समाधान मिळत नाही. म्हणून जीवन जगत असतांना कितीही दुःख, संकटे आले तरी हसतमुखाने रहावे व मनमोकळेपणाने जगणे स्वीकारावे. कारण हसत राहल्याने चेहरा खुलून दिसतो सोबतच मनावरचा ताण, तणाव कमी होतो.म्हणून म्हणतात की, हसणे सुद्धा एकप्रकारचे जीवन आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अहंकारी राजाला धडा*एक अहंकारी राजा होता. त्याला आपल्या ऐश्वर्याचा आणि राज्याचा गर्व होता. तसेच आपली शक्ती आणि रूपावरही तो अहंगंड बाळगून असायचा. आपल्या बुद्धीचा टेंभा मिरवायचा. युद्धात जय मिळाला की त्याला गर्व चढायचा. आपल्यासमोर तो इतरांना तुच्छ लेखत असे. कोणाचा मुलाहिजा न बाळगता त्याचा तो अपमान करत असे. दुस-याला कमी लेखण्याचा त्याचा प्रयत्न असायचा. या कारणांमुळे लोक त्याच्यावर नाराज असायचे. त्याच राज्यात एका विद्वान पंडीताने त्याला वठणीवर आणण्याचे ठरविले. एके दिवशी तो पंडीत राजाच्या दरबारात गेला आणि राजाला प्रणाम केला. राजाने उद्दामपणे प्रतिनमस्कारही केला नाही उलट त्याने पंडीताला गर्वाने विचारले, ’’बोला पंडीत महाराज, तुम्हाला काय मदत पाहिजे. काय मागायचे असेल ते मागून घ्या, दान पाहिजे असेल तर दान घ्या किंवा धन पाहिजे, सोनेनाणे, जमीन, धान्य जे काही मागायचे ते तुम्ही माझ्याकडून मागून घ्या’’ पंडीतजीने राजाकडे एकवार पाहिले व तो मोठमोठ्याने हसू लागला. राजाला व दरबारातील लोकांना पंडीताच्या हसण्याचे कारण काही कळेना, हसण्याचा भर ओसरल्यावर पंडीत म्हणाला, ’’राजन, तुम्ही मला काय दान देणार कारण तुमच्याकडे मला देण्यासारखे काहीच नाही.’’ पंडीताचे हे बोलणे ऐकताच राजा संतापून लालबुंद झाला, राजाचे सैनिक पंडीताला मारायला धावून आले पण सेनापतीने सैनिकांना आवरले व पंडीताला पुढे काही बोलण्याची इच्छा आहे काय असे विचारले. त्यावर पंडीतजी म्हणाले, ’’ महाराज, जरा थंड डोक्याने विचार करा, तुमचा जन्मच मुळी तुमच्या इच्छेने झाला नाही, मग रूप, सौंदर्य आणि पराक्रम हे गुण तुम्हाला कोठून मिळाले असते. आईवडीलांनी तुम्हाला जन्म दिला म्हणून तुम्ही जन्माला आलात. तुमचे धान्यभांडार हे धरतीमातेचे देणे आहे. तिने पिकवून तिच्या लेकरांसाठी अन्न पुरविले म्हणून तुम्ही ते सांभाळत आहात आणि खजिन्याचे म्हणाल तर धन हे करातून आलेले म्हणजेच प्रजेचे देणे आहे, राज्य हे तुम्हाला वाडवडीलांकडून मिळालेले वरदान आहे. राहता राहिले शरीरातील प्राण पण तेही तुमचे नाहीत ते सुद्धा ईश्वराची कृपा आहे हे सगळेच जर तुम्हाला दुस-याने दिलेले असेल तर तुम्ही मला काय म्हणून देणार आणि दिलेल्या गोष्टीचा काय म्हणून गर्व बाळगणार.’’ एवढे बोलून पंडीताने राजदरबार सोडला व राजाने त्यादिवसापासून गर्व पण सोडून दिला.तात्पर्य :- जे आपले नाही त्यावर गर्व बाळगणे व्यर्थपणाचे आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment