✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 10 ऑक्टोबर 2025💠 वार - शुक्रवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link -https://www.facebook.com/share/p/17Qf9h3aGL/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :- • १९५४: श्यामची आई चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळाले.• १९६०: विद्याधर गोखले यांच्या ’सुवर्णतुला’ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.• १९९८: आदर्श सेन आनंद भारताचे २९ वे सरन्यायाधीश.• २००७: शेख मुस्झाफर शुकोर - पहिले मलेशियन अंतराळवीर बनले.🎂 जन्म :- • १८४४: रा. काँग्रेसचे ३रे अध्यक्ष बद्रुद्दिन तैय्यबजी यांचा जन्म.• १८७१: निष्ठावान समर्थभक्त, समर्थ वाङ्मयाचे आणि संप्रदायाचे अभ्यासक व प्रकाशक शंकर श्रीकृष्ण देव यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल १९५८)• १८९९: भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक व कामगार पुढारी, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचा जन्म. (मृत्यू: २२ मे १९९१)• १९०२: कन्नड लेखक, सामाजिक कार्यकर्ते, चित्रपट निर्माते के. शिवराम कारंथ यांचा जन्म. (मृत्यू: ९ डिसेंबर १९९७)• १९०६: इंग्रजी भाषेतून लेखन करणारे भारतीय लेखक रासीपुरम कृष्णस्वामी नारायणस्वामी तथा आर. के. नारायण यांचा जन्म. (मृत्यू: १३ मे २००१)• १९०९: क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक क्रीडा महर्षी प्रिं. नोशीरवान दोराबजी तथा एन. डी. नगरवाला यांचा जन्म. (मृत्यू: ११ सप्टेंबर १९९८ – पुणे, महाराष्ट्र)• १९१०: हिंदी-चिनी मैत्रीचे प्रतीक डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचा जन्म.• १९१२: भारतीय कवी आणि समीक्षक राम विलास शर्मा यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे २०००)• १९१६: सामाजिक कार्यकर्त्या डॉ. लीला मूळगावकर यांचा जन्म.• १९५४: चित्रपट अभिनेत्री रेखा यांचा जन्म.• १९६६: झाई झिगांग - स्पेसवॉक करणारे पहिले चीनी व्यक्ती• १९४६: भारतीय मुस्लिम विद्वान सलमान मझिरी यांचा जन्म (मृत्यू : २० जुलै २०२०)• १९१५: भारतीय नौसेनाधिपती सरदारिलाल माथादास नंदा यांचा जन्म (मृत्यू : ११ मे २००९)• १८९९: भारतीय इतिहासकार, अभ्यासक आणि समीक्षक बलदेव उपाध्याय यांचा जन्म (मृत्यू : १० ऑगस्ट १९९९)🌹 मृत्यू :- • १८९८: अष्टपैलू लेखक मणिलाल नथुभाई त्रिवेदी यांचे निधन. (जन्म: २६ सप्टेंबर १८५८)• १९११: जॅक डॅनियल चे संस्थापक जॅक डॅनियल यांचे निधन.• १९६४: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते गुरू दत्त यांचे निधन. (जन्म: ९ जुलै १९२५)• १९८३: मूकपटांच्या जमान्यातील अभिनेत्री रुबी मायर्स ऊर्फ सुलोचना यांचे निधन• २००६: शास्त्रीय गायिका सरस्वतीबाई राणे यांचे निधन. (जन्म: ४ ऑक्टोबर १९१३)• २००८: कथ्थक नर्तिकारोहिणी भाटे यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १९२४)• २०११: गझल गायक जगजित सिंग यांचे निधन. (जन्म: ८ फेब्रुवारी १९४१)• २०२२: भारतीय लेखक आणि कथाकार सुब्बू अरुमुगम यांचे निधन (जन्म: १२ जुलै १९२८)• २०२२: उत्तर प्रदेशचे १५वे मुख्यमंत्री मुलामसिंह यादव यांचे निधन (जन्म: २२ नोव्हेंबर १९३९)• २०२१: भारतीय-पाकिस्तानी भौतिकशास्त्रज्ञ, रसायनशास्त्रज्ञ आणि अभियंते अब्दुल कादीर खान यांचे निधन (जन्म: १ एप्रिल १९३६)• २०१५: भारतीय अभिनेत्री आणि गायिका - पद्मश्री मनोरमा यांचे निधन (जन्म: २६ मे १९३७)• १९९७: भारतात जन्मलेले अमेरिकन सैद्धांतिक रसायनशास्त्रज्ञ मायकेल जेम्स स्टुअर्ट देवर यांचे निधन (जन्म: २४ सप्टेंबर १९१८)••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *जीवन सुंदर आहे*या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. हे गीत ऐकत असताना मन एका वेगळ्याचं विश्वात जातं. ज्याचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असेल त्याला हे जीवन सुंदरच दिसेल............... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *भारत आणि जर्मनी यांचा एकमेंकावर विश्वास, पंतप्रधान मोदींच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे संबंध आणखी मजबूत झाले- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पुण्यात २ नोव्हेंबरला 'पुणे रन फॉर युनिटी' महामॅरेथॉन, सरदार पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजन, केंद्रीय मंत्री मोहोळ यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यात ई-बस प्रवास होणार अधिक परवडणारा, प्रवाशांसाठी मासिक व त्रैमासिक पास योजना सुरु, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *'कवयित्री शांता शेळके साहित्य गौरव पुरस्कार' जाहीर, कवी ललित अधानेंच्या 'माही गोधडी छप्पन भोकी' या कवितासंग्रहाची निवड*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली मनोज जरांगेंची भेट, अंतरवाली सराटीत बंद दाराआड चर्चा, भेटीचे कारण अद्याप अस्पष्ट*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात 15 टक्के वाढ, 50 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना लाभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *महिला विश्वचषक- ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला 107 धावांनी हरवले, बेथ मुनीने शतक ठोकले, 9 व्या विकेटसाठीची सर्वोच्च भागीदारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 राजेश्वर भुरे, नांदेड 👤 सतिश बोधनकर, धर्माबाद 👤 संतोष खेडकर, शिक्षक, धर्माबाद 👤 ओमेश पांचाळ 👤 वसंत पाटील कदम 👤 विठ्ठल धुळेवार 👤 कैलास सांगवीकर 👤 प्रभू पाटील कदम 👤 शरद गुबे 👤 प्रमोद यादव 👤 तानाजी पाटील 👤 शंकर बत्तीनवार 👤 रामा गायकवाड 👤 विनोद लोणे 👤 रोहित हिवरकर 👤 गंगाधर पपुलवार 👤 सतिश बड्डेवाड 👤 विशाल अन्नमवार, देगलूर 👤 श्याम देसाई *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 96*मी आहे पांढराशुभ्र, पण उन्हात गेलं की मी विरघळतो. मी कोण?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - सूप••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आत्मविश्वास हे वीरत्वाचे सार आहे. -- एमर्सन*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**जि. प. प्रा. शाळा झरी ता. लोहा जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २०२५ चा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?२) कोणत्या औषधामुळे मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील १४ बालके दगावली ?३) कोणत्या प्रक्रियेने एखाद्या वस्तूचे वय काढणे शक्य आहे ?४) जगप्रसिद्ध खजुराहो मंदिर कोणत्या राज्यात आहे ?५) प्रसिद्ध फुटाळा तलाव कोठे आहे ? *उत्तरे :-* १) जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट, जॉन मार्टिनिस ( तिन्ही अमेरिका ) २) कोल्डरिफ ३) कार्बन डेटिंग ४) मध्यप्रदेश ५) नागपूर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *'इस्त्रो' चे कार्य काय ?* 📙 ************************आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक क्षेत्रांमध्ये सध्या संशोधन सुरू आहे. जगाच्या बरोबरीने भारताची वाटचाल ज्या क्षेत्रामध्ये आहे ते क्षेत्र म्हणजे अंतराळ. चंद्रावर २००८ साली 'मून इम्पॅक्ट प्रोब' तर २०१४ साली पहिल्याच प्रयत्नात यशस्वीपणे मंगळावर 'मंगळयान' पाठविणारा पहिला देश ठरण्यात भारत यशस्वी झालेला आहे. सन १९६२ मध्ये स्थापन झालेल्या 'भारतीय अंतराळ संशोधन संस्था' अर्थात 'Indian Space Reasearch organisation' (इस्रो) या संस्थेचे प्रमुख प्रवर्तक डॉक्टर विक्रम साराभाई होते. या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट उपग्रह आणि अग्निबाण यांची निर्मिती करणे, उपग्रह वाहकांची तसेच प्रक्षेपकांची निर्मिती करणे हे आहे. त्रिवेंद्रम जवळील थुंबा येथे भारताचे पहिले अग्निबाण प्रक्षेपण स्थळ कार्यान्वित झाले. भारताने १४ एप्रिल १९७५ रोजी रशियाच्या भूमीतून 'आर्यभट्ट' हा तीनशे साठ किलो वजनाचा पहिला उपग्रह अंतराळात सोडला आणि अंतराळयुगास प्रारंभ केला. 'भास्कर १' हा प्रायोगिक स्वरूपाचा उपग्रह पृथ्वीच्या निरीक्षणासाठी ७ जानेवारी १९७९ रोजी अंतराळात सोडण्यात आला. दूरदर्शनचे कार्यक्रम प्रक्षेपित करण्याचा मुख्य हेतू डोळ्यासमोर ठेवून 'इन्सॅट १ए' उपग्रह १० एप्रिल १९८२ रोजी अंतराळात सोडण्यात आला. पण सप्टेंबर १९८२ मध्येच तो निकामी झाला. त्यानंतर 'इन्सॅट १बी', 'इन्सॅट १सी', आयआरएनएसएस इत्यादी उपग्रह सोडण्यात आलेले आहेत. चंद्र आणि मंगळ भारतीयांच्या कवेत आलेलाच आहे आता फक्त वेध आहेत इतर ग्रह ताऱ्यांचे. त्यासाठी इस्त्रो विविध मोहिमांमध्ये गुंतलेली आहे. भूस्थिर उपग्रह पाठवणे किंवा इतर ग्रहांकडे यान पाठवण्यासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानाची कमतरता भरून काढण्यासाठी LVM3 या अंतराळ वाहकाच्या मोहिमेमध्ये इस्रोचे वैज्ञानिक सध्या गुंतलेले आहेत. रशियाच्या मदतीने २ एप्रिल १९८४ रोजी राकेश शर्मा हा अंतराळात जाणारा पहिला भारतीय अंतराळवीर ठरला. त्याच्या बरोबर दोन रशियन अंतराळवीर सुद्धा होते. अंतराळयान भारतावरून जात असताना त्यावेळच्या भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राकेश शर्मा यांचे बरोबर संपर्क साधला आणि विचारणा केली की 'आपको भारत कैसा दिखता है ?' त्यावेळी राकेश शर्मा यांचे उद्गार होते, 'सारे जहाँ से अच्छा'. आज प्रांतवाद, धर्मवाद, जमातवादाची भाषा करणारी, दंगलीच्या माध्यमातून माणसा माणसांतील अंतर वाढवणारी, संघटित आणि प्रस्थापित झालेली व्यक्तिमत्त्वे, आपण सर्व भारतीय म्हणून विचार करणार आहेत की नाही ? हा मुख्य मुद्दा आहे.भारतीय वंशाची परंतु अमेरिकेची नागरिक असलेली कल्पना चावला २००३ मध्ये नासाच्या मदतीने अंतराळात गेली. परंतु १ फेब्रुवारी २००३ मध्ये कोलंबिया यानातून पृथ्वीवर परत येत असताना दुर्घटना घडली. कल्पना चावलासहीत सात अंतराळवीर मृत्युमुखी पडले. अंतराळात जाणे जीवावर सुद्धा बेतू शकते याची प्रचिती या निमित्ताने आली. अमेरिकेने सर्व अंतराळवीरांच्या स्मृतीप्रित्यर्थ अशनींना नाव दिलेली आहेत. त्यातीलच एका अशनीचे नाव आहे 'अशनी ५१८२ कल्पना चावला'. भारत सरकारने हवामान संशोधनासाठी वापरण्यात येणाऱ्या उपग्रहाला 'कल्पना १' आणि 'कल्पना २' ही नावे देऊन तिचा उचित सन्मान केला आहे. दिनांक ९ डिसेंबर, २००६ मध्ये भारतीय वंशाची परंतु अमेरिकेच्या नागरिक असलेल्या सुनीता विल्यम्सने अंतराळात जाण्याचा मान पटकावला. अंतराळात जास्त काळ राहणारी (जवळपास १९५ दिवस), बोस्टन मॅरेथॉनमध्ये अंतराळातच भाग घेणारी, अंतराळात जास्त काळ चालणारी महिला, अशा विविध वैशिष्ट्यांनी तिला सन्मानित करण्यात आलेलं आहे. जलद शतक काढणारा, एका षटकात जास्त धावा काढणारा, जास्त धावा देणारा, जास्त षटकार मारणारा, जास्त शतके काढणारा, रटाळ खेळणारा, असल्याच वैशिष्ट्यांचा मारा प्रसार माध्यमांच्याद्वारे सहन करणाऱ्या भारतीय समाजाकडून सुनीता विल्यम्सची वैशिष्ट्ये उपेक्षित राहणे स्वाभाविकच आहे. पहिली भारतीय महिला अंतराळवीर म्हणून कल्पना चावलाचे नाव बहुतांश वेळेला घेतले जाते. पण कल्पना चावला अथवा सुनीता विल्यम्स या अमेरिकेच्या अंतराळवीर आहेत. कारण त्या अमेरिकेच्या नागरिक आहेत. पहिली भारतीय महिला अंतराळवीर होण्याचा बहुमान अजून कोणीही पटकावलेला नाही. त्यामुळे शालेय अथवा महाविद्यालयीन युवतींना अजूनही संधी उपलब्ध आहे. परंतु त्यासाठी साचेबद्ध शिक्षणव्यवस्थेतून बाहेर पडून संशोधनात्मक वृत्ती जोपासण्याची गरज आहे. स्थिर विश्वनिर्मितीच्या सिद्धांताचे १९९३ मध्ये फ्रेड हाॅएल, जेफरी बर्बीज आणि डॉक्टर जयंत नारळीकर यांनी पुनरुज्जीवन केले आणि नवीन सिद्धांत मांडला 'स्थिरवत स्थितीचे विश्व' या नावाने. पुण्यामध्ये कार्यरत असलेल्या 'आयुका' या संशोधन संस्थेचे संस्थापक कार्याध्यक्ष असलेल्या डॉक्टर जयंत नारळीकर यांचे खगोल विज्ञानाच्या प्रसारामध्ये आणि संशोधनांमध्ये अत्यंत मोलाचे योगदान आहे. 'चंद्रशेखर मर्यादा' किंवा Chandrashekhar Limit' या नावाने अजरामर झालेल्या अनिवासी भारतीय डॉक्टर एस चंद्रशेखर यांचेही योगदान खगोलविज्ञानामध्ये उल्लेखनीय आहे. श्वेतबटू ताऱ्यांचे वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या १.४४ पट झाले की तारे आकुंचन पावण्यास सुरुवात होते आणि शेवटी या ताऱ्याचे न्यूट्रॉन ताऱ्यांमध्ये अथवा कृष्णविवरामध्ये रूपांतर होते. यालाच चंद्रशेखर मर्यादा म्हणतात. या त्यांच्या संशोधनाला १९८३ सालचे नोबेल पारितोषिक मिळाले होते. अशा या भारतीय खगोल वैज्ञानिकांचा वारसा पुढे चालवायचा असेल तर मात्र प्रामाणिकपणे इस्रोच्या टीममध्ये सामील होण्याची आवश्यकता आहे.*डाॅ. नितीन शिंदे**'अंतराळ समजून घेताना' या पुस्तकातून*👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नाम घेता उठाउठी,होय संसाराची तुटी || धृ ||ऐसा लाभ बांधा गांठीविठ्ठल पायी मिठी || १ ||नामापरते साधन नाहीजें तू करिसी आणिक कांही || २ ||हाकरोनी सांगे तुकानाम घेता राहो नका || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकता किंवा ऐक्य ही एखाद्याचे किंवा समाजाचे हीत ठेवून चांगले करण्यासाठी असेल तर त्याला सत्कर्म म्हणता येईल. पण, हीच एकता वाईट कार्य करण्याच्या हेतूने एकत्र येत असतील तर ते दुष्कृत्य ठरत असते. आजपर्यंत ज्यांनी, ज्यांनी असे दुष्कर्म केले आहेत ते वंदनीय झाले नाही. म्हणून कोणाचे चांगले व्हावे किंवा चांगले झालेले बघून आनंद होत नसेल तर त्या आनंदात सहभागी होऊ नये.पण, त्याचे वाईट करण्याआधी एकदा विचार करून बघावा. कारण जी व्यक्ती परिस्थितीवर मात करून घडत असते ती व्यक्ती, स्वंयम प्रकाशित असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *एकीचे बळ**एका जातक कथेतील वर्णनानुसार वाराणसीलगत एका गावातील एक सुतार रोज जंगलात जात असे. एकदा त्याने खड्ड्यात पडलेल्या जंगली कुत्र्याच्या पिलाचा जीव वाचवला तेव्हापासून त्याला त्या पिलाचा लळा लागला. ते पिलू त्याला तेथे भेटत होते. ते पाहून इतरही जंगली कुत्रे त्याच्याजवळ येत असत. परंतु त्यांना सर्वांना एका वाघाने फार त्रस्त करून सोडले होते. तो रोज त्यांच्यावर हल्ले करत होता. सुताराने एक योजना बनविली. नेहमीप्रमाणे वाघ डोंगराच्या माथ्यावर आला. सर्व कुत्री वेगवेगळ्या ठिकाणी थांबून त्याच्यावर भुंकु लागली. वाघाने चवताळून एका कुत्र्यावर झेप घेतली तसा तो कुत्रा खाली बसला. वाघाची उडी थेट त्या कुत्र्याच्या मागे असणा-या एका मोठ्या खड्ड्यात पडली. सगळ्या कुत्र्यांनी त्याच्यावर धाव घेतली व त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केले.**तात्पर्य-एकीचे बळ खूप मोठे असते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment