✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 11 ऑक्टोबर 2025💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/17XsqEwh47/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्त्वाच्या घटना*२००७: प्रासंगिक लेखन करणाऱ्या बुजुर्ग ब्रिटिश लेखिका डोरीस लेसिंग यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर* *२००१: ’पोलरॉईड कार्पोरेशन’ने दिवाळखोरी जाहीर केली.**२००१: सर विद्याधर सूरजप्रकाश तथा व्ही. एस. नायपॉल यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. सुमारे १० लाख डॉलर रकमेचे हे बक्षीस आहे.**१९६४: टोकियो येथील १८व्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताला हॉकीचे सुवर्णपदक**१८५२: ’युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी’ ची स्थापना झाली. हे ऑस्ट्रेलियातील सर्वात जुने विद्यापीठ आहे.*🎂 जन्मदिवस*१९९३: हार्दिक पांड्या -- आंतरराष्ट्रीय अष्टपैलू क्रिकेट खेळाडू**१९७३: प्रा. डॉ. सुनंदा मारोतराव चरडे -- लेखिका* *१९७२: संजय बापूसाहेब बांगर -- भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेट खेळाडू**१९७०: डॉ.संजय बोरुडे -- प्रसिद्ध कवी, लेखक, संपादक**१९६८: अलका गोविंद पितृभक्त -- लेखिका**१९६८: चंद्रचूड सिंग -- भारतीय अभिनेता**१९६८: प्रा. डॉ. जगदीश सदाशिव आवटे -- प्रसिद्ध लेखक**१९६२: माधव अभ्यंकर -- मराठी चित्रपटांमधील व मालिकांमधील अभिनेता**१९५७: डॉ.अरुण गद्रे -- प्रसिद्ध पुरस्कार प्राप्त कादंबरीकार तथा स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर**१९५७: डॉ.केशव श्रीपाद साठये -- इंग्रजी व मराठी मध्ये लेखन करणारे प्रसिद्ध लेखक**१९५३: अनिल कांबळे -- नामवंत मराठी गझलकार, कवी (मृत्यू: १ ऑगस्ट २०१९ )**१९५१: मुकूल आनंद – तांत्रिक करामतीचे जादूगार म्हणून नाव कमावलेले हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक**१९४६: विजय भटकर – सुप्रसिद्ध भारतीय संगणक शास्त्रज्ञ, संगणकतज्ञ, संगणकीय विज्ञान क्षेत्रात मोलाची भर घातली आहे**१९४४: डॉ. हरिश्चंद्र प्रभाकर बोरकर --- सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक, झाडीबोलीचे अभ्यासक, संशोधक विविध पुरस्काराने सन्मानित, निवृत्त शिक्षणाधिकारी**१९४३: कीथ बॉईस – वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू (मृत्यू: ११ आक्टोबर १९९६ )**_१९४२: अमिताभ बच्चन -- सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता व निर्माता दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त_**१९३९: शरद गोविंद साटम -- कवी* *१९३८: लिलाधर महादेवराव सोनोने (ललित सोनोने)-- सुप्रसिद्ध गझलकार (मृत्यू: १ फेब्रुवारी २०२१ )**१९३२: सुरेश दलाल – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गुजराथी कवी, लेखक आणि संपादक (मृत्यू: १० ऑगस्ट २०१२ )**१९३१: सुहास भालेकर -- मराठी अभिनेते, दिग्दर्शक (मृत्यू: २ मार्च २०१३ )**१९३०: बेहराम कॉन्ट्रॅक्टर ऊर्फ ’बिझी बी’ – पत्रकार व स्तंभलेखक(मृत्यू: ९ एप्रिल २००१ )**१९३०: कमलिनी रघुनाथ देशपांडे -- कवयित्री**१९१६: चंडीकादास अमृतराव तथा नानाजी देशमुख – समाजसुधारक लोकसभा व राज्यसभा सदस्य,पद्मविभूषण.(मृत्यू: २६ फेब्रुवारी २०१० )**१९१६: रतन पेडणेकर ऊर्फ मीनाक्षी शिरोडकर – चित्रपट व नाट्य अभिनेत्री (मृत्यू: ३ जून १९९७ )**१९१३: प्र. के. तारे -- निवृत्त मुख्य न्यायाधीश तथा लेखक**१९०२: ’लोकनायक’ जयप्रकाश नारायण – स्वातंत्र्यसैनिक व सर्वोदयी नेते आणि आणीबाणीविरोधी लढ्याचे प्रेरणास्थान (मृत्यू: ८ ऑक्टोबर १९७९ )**१९८९: नारायण गंगाधर लिमये-- बालसाहित्यिक (मृत्यू: १ डिसेंबर १९७३ )**१८७६: चारुचंद्र बंदोपाध्याय – बंगाली कथालेखक व कादंबरीकार.(मृत्यू: १७ डिसेंबर १९३८ )*🌹 मृत्यू *२००२: दीना पाठक – अभिनेत्री (जन्म: ४ मार्च १९२२ )**१९९९: रमाकांत कवठेकर – ’नागीण’, ’आघात’, ’पंढरीची वारी’ यांसारख्या पारितोषिकप्राप्त चित्रपटांचे दिग्दर्शक**१९९७: विपुल कांति साहा – आंतरराष्ट्रीय पातळीवरील नावाजलेले शिल्पकार आणि ललित कला अकादमीचे सदस्य**१९९६: कीथ बॉईस – वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू (जन्म: ११ आक्टोबर १९४३ )**१९९४: दिगंबर परशुराम तथा काकासाहेब दांडेकर – उद्योगपती, कॅम्लिन उद्योगसमुहाचे संस्थापक* *१९८४: खंडेराव मोरेश्वर रांगणेकर -- भारतीय क्रिकेट खेळाडू ( जन्म: २७ जून १९१७ )**१९६८: माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ ’राष्ट्रसंत तुकडोजी महाराज’*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••8•••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*नेहमी मन प्रसन्न ठेवावे*जीवनात सुख दुःख, जय पराजय असे प्रसंग येतात. प्रत्येक चढ उतारात आपले मन नेहमी प्रसन्न ठेवणे आवश्यक आहे...... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा " धनधान्य योजना " शुभारंभ, देशातील 100 जिल्ह्याचा समावेश, राज्यातील नांदेडसह नऊ जिल्ह्याचा समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनच्या अध्यक्षपदी प्रवीणसिंह परदेशी यांची निवड ; अमरावतीमध्ये नोव्हेंबर महिन्यात आयोजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सरकार देशभरातील कफ सिरप उत्पादक कंपन्यांची चौकशी करेल, राज्यांकडून यादी मागितली; 3 सिरपच्या विक्रीवर बंदी; मध्यप्रदेशात आतापर्यंत 25 मुलांचा मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुढील दोन ते तीन दिवसात राज्यभरातून मान्सूनचा परतीचा प्रवास पार पडेल अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *भाजपाचे जेष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *त्रिभाषा धोरण 20 वर्षांसाठी; भविष्याचा वेध घेणार, समिती अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी धोरणाची दिशा स्पष्ट केली*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत वि. वेस्ट इंडिज दुसरा कसोटी सामना - युवा सलामीवीर यशस्वी जयस्वालचे शानदार दीडशतक, दिवसअखेर भारताने २ गडी गमावून ३१८ धावा केल्या.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🄷🄰🄿🄿🅈 🄱🄸🅁🅃🄷 🄳🄰🅈 *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 बाबाराव पाटील कदम, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद 👤 संदीप पिकले 👤 अजय वाघमारे 👤 विजय केंद्रे 👤 संदीप बोंबले 👤 प्रवीण वाघमारे, धर्माबाद 👤 रविकुमार सीतावार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 97*माझं वजन खूप हलकं आहे, पण मी नेहमी वर उडत असतो.**सांगा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - बर्फ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शौर्याचा अर्क म्हणजे कीर्ती.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**जि. प. प्रा. शाळा झरी ता. लोहा जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २०२५ चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?२) एकाच शहरात ( मुंबई ) दोन आंतरराष्ट्रीय विमानतळे असणारे भारतातील एकमेव राज्य कोणते ?३) GDP चा फुल फॉर्म काय आहे ?४) 'सोमवार'चे जुने नाव काय होते ?५) अमेरिकेतील कोणत्या राज्याने नुकतेच 'दिवाळी'स राज्य सणाचा दर्जा दिला ? *उत्तरे :-* १) ओमर याघी ( अमे.), सुसुमु कितागावा ( जपान ), रिचर्ड रॉबसन ( ऑस्ट्रे. ) २) महाराष्ट्र ३) Gross Domestic Product ४) चंद्रवार, इंदूवार ५) कॅलिफोर्निया ( तिसरे राज्य )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🍂 झाडांची पानं का गळून पडतात ? 🍂 निसर्ग मोठा काटकसरी आहे; आणि त्याचं नियोजनही बंदिस्त असतं. झाडांच्या पानांचं एक काम जसं प्रकाशसंश्लेषणाचं असतं तसंच ते झाडातलं अतिरिक्त पाणी बाहेर टाकून देण्याचं असतं. एक प्रकारे झाडांचा हा उच्छ्वासच असतो. जमिनीतीलं पाणी मू़ळं शोषून घेतात. त्याचा जो काही वापर आवश्यक असतो तो होत होत ते पाणी पानांपर्यंत पोहोचतं. तिथं त्याचा संयोग हवेतल्या कार्बनडायआआॅसाइडशी होतो. सूर्यप्रकाशापासून मिळणाऱ्या ऊर्जेच्या मदतीनं या संयोगातून कर्बोदकं म्हणजेच पिष्टमय पदार्थ निर्माण होऊन ते झाडांमध्ये साठवले जातात. उरलेलं पाणी मग पानाकडून बाष्पाच्या रूपात हवेत सोडलं जातं. मात्र, हिवाळा आला की सूर्यप्रकाशही कमी होतो आणि जमिनीमधून शोषल्या जाणाऱ्या पाण्याच्या मात्रेतही घट होते. सहाजिकच उपलब्ध पाण्याच्या बचतीला महत्त्व येतं. त्यामुळं मग पावलांकडून ते हवेत टाकलं जाणार नाही, याची व्यवस्था करावी लागते. पानांवर सोपवलेल्या दोन्ही कामांमध्ये आता मंदी आल्यामुळे पानांची तेवढीशी आवश्यकता आता उरत नाही. तेव्हा ती गळून पडणंच सोयीचं ठरतं. शिवाय काही काळ सतत काम करत राहिल्यामुळं पानंही 'म्हातारी' झाल्यासारखी होतात. सहाजिकच ती काढून टाकून त्यांची जागा नवी कोरी पानं घेतील अशी व्यवस्था करावी लागते. त्यासाठी मग अशी अवस्था होण्यापूर्वीच पानाच्या देठाच्या मुळाशी मऊशार पेशींची गर्दी होते. त्यातून एक विशिष्ट विकर पाझरायला लागतं. ते त्या देठाच्या खुडण्याला मदत करतं आणि पान हळुवारपणे अलगद गळून पडतं.वर्षाचे सहा सात महिने सतत काम करताना काही विषमय पदार्थही पानांमध्ये साचून राहतात. पानं गळून पडल्यानं या घातक पदार्थांचा निचरा व्हायलाही मदत होते; पण अशा प्रकारे सर्वच झाडांची पाने गळून पडत नाहीत. सदाहरित झाडांची अशी विशिष्ट ऋतूमध्येच पानगळ होत नाही. उलट त्यांच्या पानांचं नवीनीकरण सततच होत असतं. त्यामुळं वर्षभर सर्वच ऋतूंमध्ये ती हिरव्यागार पानांनी बहरलेली दिसतात.बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ब्रम्हा विष्णू आणि महेश, सामोरी बसलेमला हे दत्त गुरु दिसले || धृ ||माय उभी हि गाय होवुनी, पुढे वासरू पाहे वळूनीकृतज्ञेतेचे श्र्वान बिचारे पायावर झुकले || १ ||चरण शुभंकर फिरता तुमचे, मंदिर बनले उभ्या घराचेघुमटा मधुनी हृदय पाखरू, स्वानंद फिरले || २ ||तुम्हीच केली सारी किमया, कृतार्थ झाली माझी कायातुमच्या हाती माझ्या भवती, औदुंबर बसले || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दैनंदिन जीवनात माणसाला बऱ्याच वस्तूंची आवश्यकता पडत असते. आणि त्या वस्तू मिळाल्यानंतर गरज पूर्ण होते.पण, आवश्यकतेच्याही पलीकडे ज्यांना वारंवार वस्तू मिळतात किंवा मिळवून घेतात अशा वस्तूंची किंमत कळत नाही किंवा तिचे महत्व कमी होत असते.म्हणून अशा वस्तूंना वाया जाऊ न देता समाजात राहणाऱ्या एखाद्या व्यक्तीला आवश्यकता असेल तर ती वस्तू देऊन त्याला मदत करावी. त्यामुळे माणुसकी धर्म कायम राहील आणि समोरच्या व्यक्तीची अडचण सुद्धा दूर होऊ शकते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मनाची एकाग्रता*एकेकाळी एक वृद्ध योद्धा होता. त्याच्या काळातील तो सर्वत्र प्रसिद्ध असा योद्धा होता. त्याला कोणत्याही प्रकारच्या युद्धात कुणीच हरवू शकत नसे. त्याची ख्याती सर्वत्र पसरली होती. त्याने त्याच्या शिष्यांना व मुलांना युद्धकलेचे शिक्षण देण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी एक तरूण योद्धाही प्रसिद्ध होत होता. दिग्गज योद्धेही तरूण योद्ध्यासमोर हार मानत असत. प्रतिस्पर्ध्याचे कच्चे दुवे ओळखून त्याला सहज पराभूत करण्यात त्याचा हातखंडा होता. अतिशय कमी कालावधीत त्याने वृद्ध योद्धा सोडल्यास सर्व योद्ध्यांना पराभूत केले होते. त्याचे नाव सर्वत्र गाजू लागले. मिळणारी प्रसिद्धीचा आता त्याच्या मनात अहंकार जागृत झाला. त्याने विचार केला की या वृद्धालाही हरवून 'अजिंक्य' हे बिरूद लावून मिरवू. त्याने वृद्ध योद्ध्याला आव्हान दिले. शिष्यांनी मनाई केली तरी वृद्धाने त्याचे आव्हान स्वीकारले. तरूण योद्धा ठरलेल्या दिवशी वेळेवर रणांगणात येऊन उभा राहिला. भविष्यातील विजयाची कल्पना मनात धरून तो आनंदी होत होता. पण वृद्ध मात्र शांत आणि संयमित स्थितीमध्ये त्याच्यासमोर उभा होता. युद्ध सुरु झाले. तरूणाच्या प्रत्येक वाराला वृद्धाकडे प्रतिवार तयार होता.तरूण योद्धा हळूहळू का होईना दमू लागला आणि आपण युद्ध हरतो आहे हे लक्षात येताच त्याने वृद्धाला अपशब्द वापरण्यास सुरुवात केली. जेणेकरून वृद्धाचे लक्ष विचलित होईल पण त्याचा उपयोग झाला नाही. वृद्ध अविचल राहिला त्याचा संयम ढळला नाही. अखेरीस तरूण योद्धा पराजित झाला. त्याने स्वत:हून हार पत्करली व तेथून पराजित होऊन निघून गेला. तो गेल्यावर शिष्यांनी व वृद्धाच्या मुलांनी वृद्धाला विचारले,''बाबा, तो तरूण तुम्हाला अपशब्द वापरत होता तरी तुम्ही शांत कसे राहिलात'' तेव्हा तो वृद्ध म्हणाला मन एकाग्र करून काम केल्यास हमखास यश मिळते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment