✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 30 ऑगस्ट 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - *तुझी जात कंची ?* https://www.facebook.com/share/p/zpmUgRkrUgcrGFGj/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟠 *_ या वर्षातील २४३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟠 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟠••••••••••••••••••••••••••••••••• *१९७९: सुमारे दहा लाख हायड्रोजन बॉम्बच्या स्फोटांएवढी ऊर्जा निर्माण करुन ’हॉवर्ड-कुमेन-मायकेल्स’ हा धूमकेतू सूर्याच्या पृष्ठबागावर आदळला. सूर्याच्या पृष्ठभागावर धूमकेतू आदळण्याची मानवी इतिहासातील ही पहिली नोंद आहे.**१९७५: पहिले बालकुमार साहित्य संमेलन पुणे येथे भा.रा.भागवत यांच्या अध्यक्षतेखाली भरले**१९४५: दुसरे महायुद्ध - ब्रिटिश सैन्याने हाँगकाँगची जपानच्या अधिपत्यातुन सुटका केली.**१८३५: अमेरिकेतील ह्युस्टन शहराची स्थापना झाली.**१८३५: ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहराची स्थापना झाली.*🟠 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟠•••••••••••••••••••••••••••••••••*१९९१: गुररंजोत सिंग रंधावा-- भारतीय गायक, गीतकार आणि संगीतकार**१९७७: अनंत ढवळे -- गझलकार**१९७३: डॉ.कल्पना मनोहर नरांजे-- लेखिका**१९७०: प्रा.डॉ.मधुकर विठोबाजी नंदनवार- लेखक**१९६९: दिलीप सीताराम पाटील-- कवी* *१९६७: प्रा. डॉ. म .सु. पगारे -- विचारवंत, साहित्यिक, संशोधक**१९६५: विजयकुमार दळवी -- लेखक , पत्रकार**१९५८: दिलिप भाऊराव पाटील-- कवी, लेखक,अनुवादक* *१९५६: विजय सीताराम सोनारघरे -- लेखक* *१९५३:गौरी माहुलीकर -- संस्कृततज्ज्ञ, संशोधक, लेखिका**१९५३: अरविंद रामचंद्र बुधकर -- लेखक* *१९३७: शुभा खोटे-- मराठी अभिनेत्री* *१९३६: जमुना -- भारतीय अभिनेत्री, दिग्दर्शक आणि राजकारणी( मृत्यू: २७ जानेवारी २०२३ )* *१९३४: बाळू गुप्ते – लेग स्पिन गोलंदाज (मृत्यू: ५ जुलै २००५ )**१९३०: दशरथ पुजारी – संगीतकार (मृत्यू: १३ एप्रिल २००८ )**१९३०: वॉरन बफे – अमेरिकन उद्योगपती आणि दानशूर**१९२३: शंकरदास केसरीलाल ऊर्फ ’शैलेन्द्र’ – गीतकार (मृत्यू: १४ डिसेंबर १९६६ )**१९१८: म. म. बाळशास्त्री हरदास -- लेखक, ज्ञानक्षेत्रातील भाष्यकार (मृत्यू: ११ऑगस्ट१९६७ )**१९१७: आत्माराम पांडुरंग नारायणगावकर --गायक व लेखक (मृत्यू: २३ ऑक्टोबर २००१ )**१९०४: नवल होर्मुसजी टाटा – उद्योगपती, पद्मभूषण [१९६९](मृत्यू: ५ मे, १९८९ )**१९०३: भगवतीचरण वर्मा – हिन्दी कथाकार, कादंबरीकार,कवी,एकांकिकाकार, पटकथाकार व नाटककार (मृत्यू: ५ आक्टॊबर १९८१ )**१८९८: अनंत सदाशिव आळतेकर -- प्राचीन भारतीय इतिहासाचे जागतिक कीर्तीचे संशोधक (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९५९ )**१८८३: जगन्नाथ गणेश गुणे तथा स्वामी कुवलयानंद – योगविद्येचे पुरस्कर्ते व शारीरिक शिक्षणतज्ञ (मृत्यू: १८ एप्रिल १९६६ )**१८७१: अर्नेस्ट रुदरफोर्ड – नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: १९ आक्टोबर १९३७ )**१८५०: काशिनाथ त्र्यंबक तेलंग – प्राच्यविद्या संशोधक,न्यायमूर्ती, ्समाजसुधारक,मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू (१८९२),भगवद्गीतेचा त्यांनी इंग्रजीत अनुवाद केला.(मृत्यू:१ सप्टेंबर १८९३ )**१५६९: जहांगीर – ४ था मुघल सम्राट (मृत्यू: २८ आक्टोबर १६२७ )* 🟠 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟠••••••••••••••••••••••••••••••••• *२०२२: मिखाईल सेर्गेयेविच गोर्बाचेव -- माजी सो सोव्हिएत संघाचा राष्ट्रप्रमुख(जन्म: २ मार्च १९३१ )**२०२१: सदाशिव साठे (भाऊ साठे)-- भारतीय शिल्पकार(जन्म: १७ मे १९२६ )**२०२१: वासुदेव जगन्नाथ परांजपे -- भारतीय क्रिकेटपटू (जन्म: २१ नोव्हेंबर १९३८ )**२०१६: विनायक गजानन कानिटकर (ग्यानबा.रा.म.शास्त्री)-- मराठी विचारवंतलेखक (जन्म: २६ जानेवारी १९२६ )* *२००३: चार्ल्स ब्रॉन्सन – अमेरिकन अभिनेता (जन्म: ३ नोव्हेंबर १९२१ )**१९९८: नरहर वामन तथा ’नरुभाऊ’ लिमये – स्वातंत्र्यसैनिक, निर्भिड पत्रकार व काँग्रेसचे तत्त्वनिष्ठ नेते (जन्म: ८ नोव्हेंबर १९०९ )**१९९४: शंकर गोपाळ तथा शं. गो. तुळपुळे – प्राचीन मराठी भाषेचे गाढे व्यासंगी,संत वाङ्मयाचे अभ्यासक व संशोधक, पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख (जन्म: ५ फेब्रुवारी १९१४ )**१९८५: न्या. राम केशव रानडे -- अध्यात्माचे अभ्यासक, होते,न्यायमूर्ती (जन्म: २२ फेब्रुवारी १९०८ )**१९८१: जयंत पांडुरंग तथा ’जे. पी.’ नाईक – शिक्षणतज्ञ, ’इंडियन इन्स्टिट्युट ऑफ एज्युकेशन’चे संस्थापक, ’नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग’चे संस्थापक (जन्म: ५ सप्टेंबर १९०७ )**१९४७: नारायण मुरलीधर गुप्ते ऊर्फ ’कवी बी’ – त्यांची ‘चाफा बोलेना, चाफा चालेना ...‘ ही कविता खूप प्रसिद्ध आहे.(जन्म: १ जून १८७२ )**१९४०: सर जे. जे. थॉमसन –इलेक्ट्रॉनच्या शोधाबद्दल १९०७ चे नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १८ डिसेंबर १८५६ )**१८७७: तरुलता दत्ता (जोतोरू दत्त) -- भारतीय बंगाली कवी आणि अनुवाद (जन्म: ४ मार्च१८५६ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुझी जात कंची ?*जात अशी आहे की, काही केल्या जात नाही. तिचेच नाव जात आहे............... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *देशभरात 5 दिवस पासपोर्ट सेवा पोर्टल राहणार बंद, 2 सप्टेंबरपर्यंत सुविधा बंद, तांत्रिक देखभालीमुळं निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *छत्रपती शिवरायांची एकदा नव्हे 100 वेळा माफी मागायला कमीपणा वाटणार नाही, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, शिवरायांचा मजबूत, भक्कम आणि भव्य पुतळा पुन्हा उभारणार मुख्यमंत्र्यांचा निर्धार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचे 29 सप्टेंबरपासून पुन्हा उपोषण, फडणवीसांचे 113 आमदार पाडण्याचा निर्धार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यातील 7 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या ; मनीषा आव्हाळेंवर पुण्यात मोठी जबाबदारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सर्वांसाठी परवडणारी घरं बनवणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शब्द, म्हाडाची घरं 10 ते 15 लाखांनी स्वस्त !*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नाशिक-नगरकरांनी सोडला नि:श्वास ! जायकवाडी धरणानं ओलांडली 65 टक्क्यांची पातळी, समन्यायी पाणीवाटपाचा तेढ सुटला*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *मुंबई क्रिकेटच्या पंढरीत रमाकांत आचरेकरांचे स्मृतीशिल्प उभारण्यास मान्यता; सचिन तेंडुलकर भावूक, राज्य सरकारचे मानले आभार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••'झाले बहू... होतील बहू...' छत्रपती शिवाजी महाराजांचा अंश असलेली मराठमोळी नावेछत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. महाराजांच्या जीवनाचा प्रभाव हा प्रत्येकाच्या जीवनावर आहे. असं असताना ही परंपरा आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी, महाराज पुढच्या पिढीला कळावी असं प्रत्येकाला वाटत असतं. अशावेळी अनेकजण महाराजांच्या नावावरुन आपल्या मुलांची नावे ठेवू इच्छितात. अशा व्यक्तींसाठी महाराजांच्या नावातून निर्माण झालेली नवीन युनिक अशी नावे. यामध्ये महाराजांच्या नावावरुन मुलींची नावे आणि मुलांची नावे असे युनिक नावे सांगितले आहेत. शिवांश- 'शिव' आणि 'अंश' या नावातून शिवांश हे नाव तयार झालं आहे. या नावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा झळकते. राजशिव - राज म्हणजे राजा. शिव म्हणजे शिव शंकर. या दोघांच्या नावातून हे 'राजशिव' हे नाव तयार झालं आहे.वीरशिव - वीर असा या नावात उल्लेख आहे. वीर म्हणजे शूर आणि शिव म्हणजे शिव शंभो. छत्रपती शिवाजी महाराज हे शिव शंकराचे भक्त होते. त्यांच्याप्रमाणे विरता आणि शूरता तुमच्या बाळामध्ये असावी असा या नावाचा अर्थ आहे. शिवराज - शिवराज हे अतिशय मराठमोळ पारंपरिक नाव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा रुबाब या नावामध्ये पाहायला मिळतो. शिवांग - शिवाचा अंग असा तो शिवांग. शिवाजी महाराजांसोबत असलेले डिवाइन कनेक्शनयामध्ये पाहायला मिळतं. राजमुद्रा - राजमुद्रा हे नाव महाराजांच्या जीवनाशी जोडलेले असे आहे. मुद्रा, शिवाजी महाराजांच्या काळातील एक शिक्कामोर्तब. शिवेंद्र - शिव आणि इंद्र असा याचा उल्लेख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी निगडीत हे नाव मुलासाठी निवडा. राजयश - राज्य हे छत्रपतींच्या काळातील म्हणजे खऱ्या अर्थाने गोकुळ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील नियम असा या नावाचा अर्थ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची आणखी काही नावे मुलांसाठीशिवाजी, स्वराज, शिवांश, शिवबा, शिवांक, शिवेंद्र, शिवम, शिवतेज, शिवशंकर, शिवानंद, शिवजित, शिवराज, शिवाक्ष, शिवशंभू, शिवार्थ, शिवंकरछत्रपती शिवाजी महाराजांची मुलींसाठी नावे हिंदवी, शिवश्री, शिवानी, शिवांजली, शिवांगी, शिवजा, शिवन्या, शिविका*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्याच्या सोबतीला सुंदर विचार असतात तो कधीच एकटा नसतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) शाळेची बस ही पिवळ्या रंगाचीच का असते ?२) जगातील सर्वात वयोवृद्ध महिला कोण ?३) कोणत्या देशाने 'राईट टू डिस्कनेक्ट कायदा' पास केला आहे ?४) 'निर्जन' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) ICC चे अध्यक्ष म्हणून बिनविरोध कोणाची निवड झाली आहे ? *उत्तरे :-* १) सावधानतेचा इशारा, मोटार वाहन नियम १९७८ च्या नियम १७८ नुसार, आनंद व उत्साहाचा प्रतीक २) तोमिको इतुका ( जपान, ११६ वर्ष ९९ दिवस ) ३) ऑस्ट्रेलिया ४) ओसाड ५) जय शाह, भारत *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 नागभूषण मॅकावाड, येवती👤 दिलीप झरेकर, शिरूर👤 माधुरी हतनुरे, धर्माबाद👤 नीरज नागभूषण दुर्गम, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पर्वताप्रमाणे पातक करणें । वज्रलेप होणें अभक्तासी ॥१॥ नाहीं ज्यांसी भक्ति ते पतित अभक्त । हरिसी न भजत दैवहत ॥२॥ अनंत वाचाळ बरळती बरळ । त्यां कैंचा दयाळ पावे हरि ॥३॥ ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान । सर्वांघटीं पूर्ण एक नांदे ॥४॥ ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन जगत असताना एकटे पडल्यावर जास्त दु:खी होऊ नये. कारण शेवटपर्यंत कोणीच, कोणाचे आधार नसतात. भलेही आपल्यापाशी सर्व काही असेल तरी वेळ प्रसंगी कामी पडत नाही म्हणून आपले काहीच नसते. मनुष्य प्राण्याचे जीवन मिळाले यातच सर्व काही बघण्याचा प्रयत्न करावा. कधी काळी सांगता येत नाही त्या केलेल्या प्रयत्नामुळे कधी नं संपणारी संपत्ती सुद्धा मिळू शकते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *संस्कारीत मुलेच यशस्वी*नैतिक मूल्यांचे शिक्षण देणा-या एका शिक्षकाने मुलांसाठी चॉकलेटस मागवली होती. त्यांनी सगळ्या मुलांना रांगेत बसवले होते. शिक्षक चॉकलेटस वाटायला सुरुवात करणार इतक्यात शाळेचा शिपाई त्या वर्गात येऊन पोहोचला व म्हणाला,''सर तुम्हाला आताच्या आत्ता प्राचार्यांनी काही महत्वाचे सांगण्यासाठी त्यांच्या कार्यालयात बोलावले आहे.'' शिक्षकांनी चॉकलेटचा डबा हातातून खाली ठेवला व मुलांना म्हणाले,'' मुलांनो मला काही कामासाठी प्राचार्यांकडे जावे लागत आहे. खरेतर ही चॉकलेटस मला माझ्या स्वत:च्या हाताने तुम्हाला द्यायची खूप इच्छा होती. परंतु मला जावे लागणार आहे. पाहिजे तर तुम्ही हाताने चॉकलेटस घेऊ शकता. अन्यथा मी परत आल्यावर तुम्हाला देईन'' ही चांगली संधी आहे. असा काही विद्यार्थ्यांनी विचार केला व त्यांनी चॉकलेटस स्वत:च्या हाताने घेऊन खाल्ली तर काही विद्यार्थ्यांनी शिक्षकांची वाट बघण्यात वेळ घालविला. शिक्षक परत आले व त्यांनी मुलांना विचारले,'' मुलांनो ज्यांनी ज्यांनी स्वत:च्या हाताने चॉकलेटस खाल्ली त्यांनी आपले हात वर करा'' ज्यांनी चॉकलेटस खाल्ली होती त्यांनी हात वर केले. मग शिक्षकांनी उरलेल्या मुलांना प्रेमाने चॉकलेटस वाटली. काही वर्षानंतर त्या शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांची माहिती मिळविली तेव्हा त्यांना असे दिसून आले की ज्या मुलांनी स्वत:च्या हाताने चॉकलेटस घेतले होते ती मुले सामान्य स्वरूपातील कामे करून उदरनिर्वाह करत होते तर ज्यांना शिक्षकांनी चॉकलेटस दिली ते सर्व विद्यार्थी उच्च पदावर काम करत होते. ही सर्व संस्कारांची देणगी होती.तात्पर्य :- संस्काराने माणूस घडतो. मिळालेली संधी आणि तिचा योग्य वापर करणे हे मानवाच्या हाती आहे. चुकीच्या मार्गाने गेल्यास व संयम न पाळल्यास योग्य संधी मिळूनही तिचा वापर करता येत नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 29 ऑगस्ट 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/gyK8N8cAfV5fgtUp/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟤 *_राष्ट्रीय क्रीडा दिन_* 🟤••••••••••••••••••••••••••••••🟤 *_ या वर्षातील २४२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟤 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟤•••••••••••••••••••••••••••••••••*१९७४: चौधरी चरणसिंग यांनी ’भारतीय लोक दल’ या राजकीय पक्षाची स्थापना केली.**१९४७: डॉ. बाबासाहेब आंबेडकर घटना समितीचे अध्यक्ष झाले.**१९१८: लोकमान्य टिळक यांनी मुंबई येथे काँग्रेसचे विशेष अधिवेशन बोलावले.**१८३३: युनायटेड किंगडमने आपल्या साम्राज्यात गुलामगिरीवर बंदी घातली.**१८३१: मायकेल फॅरेडे याने विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा शोध लावला.**१८२५: पोर्तुगालने ब्राझिलच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.**१४९८: वास्को द गामाने कालिकतहुन पोर्तुगालला परतण्याचा निर्णय घेतला.* 🟤 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*🟤•••••••••••••••••••••••••••••••••*१९८७: प्रा.ऋषिकेश ऊर्फ गणेश नंदकुमार खारगे -- कवी**१९८२: डॉ. मिलिंद भिवाजी कांबळे -- कथा, कादंबरी व समीक्षण करणारे मराठी लेखक**१९७४: नेताजी रामदास सोयाम -- कवी* *१९७४: रिचा शर्मा-- भारतीय पार्श्वगायिका तसेच भक्ती गायिका**१९७०: डॉ. श्रीराम यशवंत गडेकर -- प्रसिद्ध लेखक, समीक्षक* *१९६९: कल्याणी विजय मादेशवार-- कवयित्री, लेखिका* *१९६६: अनंत वासुदेव माळवे -- लेखक, कवी* *१९६०: संजय वासुदेव कठाळे -- लेखक* *१९५९: अक्किनेनी नागार्जुन उर्फ नागार्जुन -- भारतीय दक्षिणात्य तसेच हिंदी चित्रपट अभिनेता, निर्माता* *१९५८: मायकेल जॅक्सन – अमेरिकन पॉप गायक, गीतलेखक, संगीतकार, निर्माता, अभिनेता (मृत्यू: २५ जून २००९ )**१९५७: मकरंद साठे-- मराठी नाटककार, लेखक व नाट्यदिग्दर्शक**१९५४: शिरीष पुरुषोत्तम मोराणकर -- कवी, लेखक**१९५३: वासुदेव वामन बापट -- धार्मिक विषयांवर लेखन करणारे मराठी लेखक (मृत्यू: १५ नोव्हेंबर २०१५)**१९५०: लीना चन्दावरकर - हिन्दी चित्रपटातील अभिनेत्री**१९४७: शोभा अनिल भागवत -- बाल आणि पालक शिक्षण तज्ञ, लेखिका संचालिका, गरवारे बालभवन**१९४४: डॉ. मृणालिनी भालचंद्र फडनाईक -- कथाकार, कवयित्री, लेखिका**१९२९: गो. मा. पुरंदरे -- कादंबरीकार* *१९२३:रिचर्ड अॅटनबरो – इंग्लिश निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते**१९१५: इन्ग्रिड बर्गमन – स्वीडीश अभिनेत्री (मृत्यू: २९ ऑगस्ट १९८२ )**१९०५: मेजर ध्यानचंद – प्रसिद्ध भारतीय हॉकीपटू (मृत्यू: ३ डिसेंबर १९७९ )**१९०१: पद्मश्री विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील – सहकारमहर्षी (मृत्यू: २७ एप्रिल १९८०)**१८८०: लोकनायक माधव श्रीहरी तथा 'बापूजी' अणे-विदर्भातील सामाजिक, राजकीय, संस्कृतिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व (मृत्यू: २६ जानेवारी १९६८ )* *१८६३: गिदुगु वेंकट रामामूर्ती -- तेलुगू लेखक आणि ब्रिटिश राजवटीत सर्वात प्राचीन प्राचीन तेलुगू भाषा आणि सामाजिक द्रष्टे होते. रामा मूर्ती यांचा जन्मदिवस "तेलगू दिवस" म्हणून साजरा केला जातो ( मृत्यू: २२ जानेवारी १९४० )*🟤 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟤••••••••••••••••••••••••••••••••• *२०२१: जयंत पवार-- पत्रकार, मराठी नाटककार आणि नाट्यसमीक्षक (जन्म: २२ फेब्रुवारी १९६० )* *२००८: जयश्री गडकर – अभिनेत्री (जन्म: २१ फेब्रुवारी १९४२ )**२००७: बनारसी दास गुप्ता – स्वातंत्र्यसैनिक व हरयाणाचे मुख्यमंत्री (जन्म: ५ नोव्हेंबर १९१७ )**२०००: विजया साने -- बालसाहित्यिक, लेखिका (जन्म: ५ ऑक्टोबर १९२३ )* *१९८६: गजानन श्रीपत तथा ’अण्णासाहेब’ खेर – पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक (जन्म: १५ जून १८९८ )**१९७६: काझी नझरुल इस्लाम – स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक व हिंदु मुस्लिम ऐक्याचे समर्थक असलेले बंगाली कवी. (जन्म: २५ मे १८९९ )**१९७५: इमॉन डी व्हॅलेरा – आयर्लंड प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म: १४ आक्टोबर १८८२ )**१९६९: मेहबूब हुसेन पटेल ऊर्फ ’शाहीर अमर शेख’ – लोकशाहीर (जन्म: २० ऑक्टोबर १९१६ )**१९०६: बाबा पद्मनजी मुळे – ख्रिस्ती धर्मप्रसारक, ग्रंथकार व मराठी ख्रिस्ती वाङमयाचे जनक (जन्म: मे १८३१ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सोशल मीडिया आणि आधार*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *प्रधानमंत्री जनधन योजना यशस्वी अंमलबजावणीला एक दशक पूर्ण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *वाहनांच्या गर्दीने सीईओंवर पायी चालण्याची वेळ, हिंगोली जिल्हा परिषदेत वाहने उभी करण्यापासून शिस्तीला सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *भारताच्या आर्थिक विकासात स्टार्टअप्सचे भरीव योगदान, आनंद गानू पिंपरी चिंचवड विद्यापीठ आणि गर्जे मराठी ग्लोबल इनक्युबेशन सेंटरचे उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय, महाराष्ट्रातील दिघीसह देशभरात 12 औद्योगिक स्मार्ट शहरे उभारणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करा, ऑल इंडिया सोनार फेडरेशनची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राज्य सरकारच्या विरोधात मविआचं 01 सप्टेंबर पासून आंदोलन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशियाई चॅम्पियन ट्रॉफीसाठी भारतीय हॉकी संघाची घोषणा, 14 सप्टेंबर ला पाकिस्तानशी होणार सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *आहार कसा असावा ?*शरीराच्या कष्टाच्या मानाने व प्रकृतीनुसार पुरेसा व समतोल आहार आवश्यक आहे. आहाराचे प्रमाण, प्रकार, वेळा इत्यादींवर आरोग्य ब-याच अंशी अवलंबून असते. तिखट मसालेदार पदार्थ जेवणात कमी प्रमाणात असावेत. हॉटेलमध्ये खाणे शक्यतो टाळावे. पचायला साधा हलका ताजा आहार, भूक असेल तेव्हाच जेवणे, थोडी भूक ठेवून खाणे हे साधे नियम आहेत.आयुर्वेदाप्रमाणे गोड, आंबट, खारट, तिखट, कडू आणि तुरट अशा सहा चवींचे पदार्थ असतात. या प्रत्येक चवीचा आपल्या खाण्यात समावेश असावा. एकाच चवीचे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले तर त्याचाही त्रास होण्याची शक्यता असते.आहार पचण्याची एक चांगली खूण म्हणजे शौचास घाण वास न येणे. तसेच जेवणानंतर सात-आठ तासानंतरही खाल्लेल्या पदार्थाचा वास ढेकरांतून येणे ही अपचनाची खूण आहे.ऋतुमानाप्रमाणे आहारात बदल व्हावेत. पावसाळयात, उन्हाळयात भूक मंद असते म्हणून पचायला हलका, कमी आहार घेणे आवश्यक ठरते. याउलट हिवाळयात जड पदार्थही चांगले पचतात. चातुर्मासाची कल्पना यादृष्टीने योग्य आहे. आहारात त्या त्या ऋतूतले पदार्थ (ताजे) घेणे पोषणाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.आहाराचा विचार करताना जास्त प्रक्रिया केलेले पदार्थ हे कनिष्ठ असतात हे लक्षात ठेवावे. उदा. त-हेत-हेच्या मिठाईपेक्षा साधे ताजे दूध आहारशास्त्राच्या दृष्टीने चांगले असते.स्निग्ध पदार्थांमध्ये वनस्पती तूप (सर्व प्रकारचे) हे तर अपायकारक आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने मात्र गावठी तूप (गाईचे साजूक) आहारात असणे आवश्यक आहे. ‘पुफा’ गटातली तेले चांगली.प्रत्येक व्यक्तीला विशिष्ट पदार्थ कमी अधिक सोसतो. या अनुभवावरून प्रत्येकाने आपल्या आहाराचे नियोजन केले पाहिजे. आयुर्वेदातला आहार विचार यासाठी मार्गदर्शक आहे.आहारासंबंधी आणखी एक नियम म्हणजे उपवास. निदान तिशीनंतर आठवडयातून एक दिवस पूर्णवेळ किंवा एकवेळ उपास करणे आवश्यक आहे. पचनसंस्थेच्या आणि इतर एकंदर आरोग्यासाठी हे आवश्यक आहे. जैन धर्मियांकडून उपासांचे शास्त्र शिकण्यासारखे आहे. निरनिराळया खिचडया व पदार्थ खाऊन केलेला उपास म्हणजे केवळ रूचिपालट असतो, उपवास नाही. *संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आयुष्यात अडचणी सोडविण्यास समर्थ असते तेच शिक्षण होय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *एग्नेस गोक्झा बोजाक्झिऊ* हे नाव असणाऱ्या व्यक्तीस आपण कोणत्या नावाने ओळखतो ?२) युक्रेनला कोणत्या देशाद्वारे मानवतावादी मदत म्हणून 04BHIMA CUBE देण्यात आले ?३) केंद्राची युनिफाईड पेन्शन योजना लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे ?४) 'नारळ' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) २०२४ मध्ये कोणता ग्लोबल फूड ब्रँड रँकिंगमध्ये जगातील सर्वात मजबूत अन्न आणि दुग्धजन्य ब्रँड ठरला ? *उत्तरे :-* १) मदर तेरेसा २) भारत ३) महाराष्ट्र ४) श्रीफळ, नारिकेल ५) AMUL*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सौ. योगिता रामानंद रामदिनवार, नांदेड👤 रवी शिंदे, इंग्रजी विषय तज्ञ, कुंडलवाडी👤 रवींद्र केंचे, क्रियाशील शिक्षक, अहमदनगर👤 गणेश येडमे👤 शिवराज पाटील चोळाखेकर, अ. भा. छावा तालुकाध्यक्ष, धर्माबाद👤 सचिन बावणे👤 ईश्वर शेटीये, ब्रह्मपुरी, चंद्रपूर👤 गणेश राऊत👤 विनायक कुंटेवाड👤 अनिरुद्ध खांडरे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••साधुबोध झाला तो नुरोनियां ठेला । ठायींच मुराला अनुभवें ॥१॥ कापुराची वाती उजळली ज्योति । ठायींच समाप्ति झाली जैसी ॥२॥ मोक्षरेखे आला भाग्यें विनटला । साधूंचा अंकिला हरिभक्त ॥३॥ ज्ञानदेवा गोडी संगति सज्जनीं । हरि दिसे जनीं वनी आत्मतत्वीं |4| ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकमेकांची काळजी घेतली पाहिजे असे बरेचजण म्हणत असतात. हा एक समाजसंकेत आहे. पण त्याच वेळेला आपण आपल्याच घरातील माणूस आजारी असताना त्याची का बरं काळजी घेत नाही. ..? हा एक प्रश्नच आहे. एकदा तो माणूस बरा झाल्यावर मात्र वेळात, वेळ काढून दिखावूपणा करुन काळजी घेण्यात काय अर्थ...? म्हणून काळजी करायची असेल किंवा सेवा करायची असेल तर आपल्या मनात आपुलकी व त्या माणसासाठी वेळ असणे आवश्यक आहे आणि आज ती अत्यंत काळाची गरज आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••धर्मएकदा एका राजाने दवंडी पिटवली की जो कोणी मला सर्वश्रेष्ठ धर्माचे महत्व समजावून सांगेल त्याला मी मोठे बक्षीस देईन व तो धर्म मी स्वीकारेन. ही वार्ता ऐकताच सगळीकडे मोठमोठे धर्मगुरु, धर्मोपदेशक, आचार्य राजाला आपल्या धर्माचे महत्व समजावून सांगण्यासाठी येऊ लागले. ते सर्वच जण एकच गोष्ट आठवणीने करत होते की स्वत:च्या धर्माचे महत्व सांगताना मात्र दुस-याला धर्माला कमी लेखत होते. दुस-याच्या धर्माची निंदानालस्ती करत होते. यातून एकच झाले की, राजाला काहीच कळेना की कोणता धर्म सर्वश्रेष्ठ आहे व त्यामुळे तो दु:खी होत होता. पण त्याने शोध सुरुच ठेवला. वर्षानुवर्षे हाच क्रम चालू राहिला. राजा वृद्ध होत चालला. शेवटी राजा एका साधूच्या दर्शनास गेला. तेथे गेल्यावर त्याने साधूला नमस्कार केला व म्हणाला,''साधूमहाराज, मी सर्वश्रेष्ठ धर्माच्या शोधात आहे पण आजपर्यंत मला सर्वश्रेष्ठ धर्म कोणता हेच कळाले नाही.'' साधूने राजाकडे पाहिले व म्हणाले,''सर्वश्रेष्ठ धर्म तर जगात अस्तित्वातच नाहीत. जगात एकच धर्म आहे आणि बाकी सगळे हे त्या धर्माला फुटलेले अहंकार आहेत. धर्म तर तोच असतो जिथे व्यक्ती निष्पक्ष असतो, पक्षपात करणा-या मनात धर्म राहूच शकत नाही.'' साधूचे हे बोलणे ऐकून राजा प्रभावित झाला. साधू पुढे जाऊन राजाला म्हणाला,''राजन, चला आपण नदी पार करून पलीकडे जाऊया'' नदीतीरावर दोघे पोहोचले, त्यांनी तिथे अनेक सुंदर नावा (होडया) पाहिल्या. साधू राजाला म्हणाले,'' राजे, चला आपण एका सर्वश्रेष्ठ नावेतून पैलतीर गाठूया'' प्रत्येक नावेपाशी जाताच साधू त्या नावेबद्दल काही ना काही चुक दाखवित असे व पुढे जात असे. असे करता करता दुपार झाली. राजाला भूक लागली व त्रासून राजाने साधूला म्हटले,''महाराज आपल्याला नावेतून फक्त पलीकडे जायचे आहे, अहो इतकी छोटी नदी आहे की पोहूनसुद्धा आपण पटकन पलीकडे पोहोचून जाऊ मग त्याची इतकी चर्चा कशाला'' साधूने राजाकडे पाहिले व म्हणाले,'' राजन, हेच तर मला तुम्हाला सांगायचे आहे. धर्माला नाव नसतेच, धर्म आपल्याला स्वत:ला पोहून पार करायचा असतो. दुसरा कोणी आपल्याला धर्मापलिकडे पोहोचवू शकत नाही. आपल्यालाच जावे लागते.'' राजा सर्व काही समजून चुकला.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28 ऑगस्ट 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/t5Uhv2YGSPqxqKn9/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟡 *_ या वर्षातील २४१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟡 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟡•••••••••••••••••••••••••••••••••*१९९०: इराकने कुवेत हा आपलाच एक प्रांत असल्याचे जाहीर केले.**१९३७: ’टोयोटा मोटर्स’ ही स्वतंत्र कंपनी बनली.**१९३१: फ्रान्स आणि सोविएत युनियनने शस्त्रसंधी करार केला.**१९१६: पहिले महायुद्ध – इटालीने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.**१९१६: पहिले महायुद्ध – जर्मनीने रोमानियाविरुद्ध युद्ध पुकारले.**१८४५: ’सायंटिफिक अमेरिकन’ मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.* 🟡 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟡•••••••••••••••••••••••••••••••••*१९८७: सौमेन नंदी -- प्रसिद्ध तबला वादक**१९८४: मिलिंद परसराम कंधारे-- कवी, लेखक**१९८३: सेपरमाडू लसिथ मलिंगा -- श्रीलंकेचा प्रसिद्ध क्रिकेटपटू**१९८१: प्रा. डॉ. गणपतराव रामदास ढेंबरे -- लेखक**१९७७: शिल्पा शिंदे -- हिंदी अभिनय क्षेत्रात काम करणारी मराठी अभिनेत्री* *१९७५: लता सभरवाल -- भारतीय फ़िल्म तथा टेलीविज़न अभिनेत्री* *१९७५: अभय अरुण इनामदार-- लेखक**१९७३: संतोष शामराव देसाई लेखक -- व्याख्याते**१९७०: आनंदराव रामचंद्र पवार -- लेखक**१९६८: सुधाकर वासुदेव इनामदार -- कवी, गदिमा व गाडगेबाबा यांचे वरील पोवाडे लेखन व सादरीकरण* *१९६५: संजय नारायण चौधरी -- प्रसिद्ध कवी* *१९६३: प्रा.पी.जी. भामोदे -- प्रसिद्ध लेखक, कवी, प्रतिज्ञाकार, नाटककार,वक्ते**१९६१: दीपक तिजोरी -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेता* *१९५७: अनंत जोग --भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेता* *१९५५: जीवन केशवराव राजकारणे -- कवी**१९५२: गौरी सुभाष गाडेकर -- प्रसिद्ध लेखिका* *१९५२: प्रमोद मनोहर कोपर्डे -- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९५१: स्वाती शशिकांत सुरंगळीकर -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका**१९४८: बाळकृष्ण कुडे -- कवी, लेखक**१९४८: जयदेव सुब्बराव हट्टंगडी -- मराठीतले एक नामवंत नाट्यदिग्दर्शक आणि नाट्यपरीक्षक (मृत्यू: ५ डिसेंबर २००८ )**१९४१: डॉ.श्रावण किसनजी उके -- लेखक**१९३४: सुजाता मनोहर – सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षा**१९२८: उस्ताद विलायत खाँ – सतारवादक (मृत्यू: १३ मार्च २००४ )**१९१८: राम कदम – संगीतकार (मृत्यू: १९ फेब्रुवारी १९९७ )**१९१०: गोगिया पाशा --- महान जादूगर व अभिनेते (मृत्यू: १९७६ )**१९०८: विनायक माधव तथा ’विमादी’ पटवर्धन दीक्षित – विनोदकार**१९०६: नटवर्य चिंतामणी गोविंद तथा ’मामा’ पेंडसे (मृत्यू: १९९१ )**१९०३: उमाकांत केशव आपटे उपाख्य बाबासाहेब आपटे -- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक व लेखक (मृत्यू: २६ जुलै १९७२ )**१८९६: रघुपती सहाय ऊर्फ फिराक गोरखपुरी– ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू शायर – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू शायर (मृत्यू: ३ मार्च १९८२ )**१८९३: रघुनाथ दामोदर करमरकर -- लेखक, व्याख्याते, संशोधक (मृत्यू: २८ नोव्हेंबर १९६५ )**१८७१: श्रीधर विष्णू परांजपे -- टीकाकार, चरित्रकार व समीक्षक (मृत्यू: १८ नोव्हेंबर १९५४ )**१७४९: योहान वूल्फगाँग गटें – जर्मन महाकवी, लेखक, कलाकार आणि राजकारणी (मृत्यू: २२ मार्च १८३२ )* 🟡 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟡••••••••••••••••••••••••••••••••• *२०२१: राॅबी डिसिल्वा -- आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार ( जन्म: १२ फेब्रुवारी १९३०)**२०२०: कविता विश्वनाथ नरवणे -- जेष्ठ लेखिका (जन्म: १२ मार्च १९३३ )* *२०१०: डॉ.सुहासिनी यशवंत इर्लेकर -- कवयित्री,लेखिका,संत साहित्याच्या अभ्यासक(जन्म: १७ फेब्रुवारी १९३२ )* *२००१: व्यंकटेश दिगंबर माडगूळकर – सुप्रसिद्ध लेखक,चित्रकार,पटकथाकार,शिकारी (जन्म: ६ जुलै १९२७ )**१९६९: रावसाहेब पटवर्धन -- स्वातंत्र्य लढ्यातील झुंजार नेते थोर विचारवंत (जन्म: १५ जुलै १९०३ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मराठी सिनेमा काल आज आणि उद्या*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *जर्मन भाषेचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम शालेय शिक्षण विभागाने हाती घेतला असून मुंबईमध्ये १५ केंद्रांवर असे प्रशिक्षण मिळणार असल्याची माहिती, मुंबई प्रादेशिक विद्या प्राधिकरणच्या प्राचार्य मनीषा पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *काय योग्य व काय अयोग्य याची शिकवण मुलांना देण्याची गरज असल्याचे उच्च न्यायालयाने केले मत व्यक्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *रवनीत सिंह बिट्टू व जॉर्ज कुरियन यांची राज्यसभा पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नायगाव - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सुप्रिया सुळे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल, 'राज्यातील ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेला राज्याचे गृहमंत्री जबाबदार'*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचे पुण्यात निधन, सिंघम त्यांचा शेवटचा चित्रपट*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *जागतिक क्रिकेटमध्ये भारताचा दबदबा, जय शाह यांची ICC चे नवीन अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्कूल चले हम... शाळेच्या बस पिवळ्याच रंगाच्या का असतात ?*शाळेत विद्यार्थ्यांना नेण्यासाठी किंवा सोडण्यासाठी आलेल्या या बसचा रंग पिवळाच असतो, हे तुम्ही पाहिलं असेलच. मात्र, शाळेची बस पिवळीच का असते, असा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय का? आज ते जाणून घेऊ.रस्त्यावरुन पिवळ्या रंगाचे वाहन जात असल्यास ते दुरूनही तुमच्या डोळ्यांना दिसते, कमी सूर्यप्रकाशातही आणि उजेडातही हा रंग लवकर डोळ्यांना दिसतो. त्यातून ही बस स्कूल बस असल्याचे सहजच लक्षात येते.पिवळा रंग हा एक इशाराही देतो, रस्त्यावरुन धावणाऱ्या इतर वाहनधारकांना हा रंग सावधानतेचा इशारा देतो. एक शाळेची बस समोरुन किंवा पाठिमागून येत आहे, असा संकेत इतर वाहनांना मिळतो. त्यामुळे, काळजी घेतली पाहिजे हे त्यांच्या लक्षात येते.तसेच, पिवळा रंग हा आनंद आणि उत्साहाचा प्रतिक मानला जातो. लहान शाळकरी मुलांसाठी त्यांची बस ही आनंदाची सफारी असते, त्यांच्या मित्रांसह ही बस त्यांना शाळेत घेऊन जाते. म्हणून हा रंग पिवळा असतो.मोटार वाहन नियम, 1978 च्या नियम 178 नुसार शैक्षणिक संस्थेच्या नावाने नोंदणी केलेली सर्व वाहने हायवे पिवळ्या रंगात रंगविली जावीत आणि “स्कूल बस” किंवा “कॉलेज बस” हे शब्द गडद रंगात लिहिलेले असावेत.शाळेच्या बसमधून जाणाऱ्यां विद्यार्थ्यांसाठी आपली बस खास असते. या बसमधून शाळेची सफर करताना त्यांच्या चेहऱ्यावर निश्चितच आनंद दिसतो.ही माहिती तुम्हाला कशी वाटली संयोजकांना नक्की कळवा*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आळसाला आजचा दिवस दिला की तो उद्याचा दिवस चोरतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) अंतराळात जाणारे एकमेव भारतीय अंतराळवीर कोण ?२) भारताने आतापर्यंत किती जणांना अंतराळात पाठविले ?३) जगात अंतराळवीरांना सर्वाधिक अंतराळात पाठविणारा देश कोणता ?४) अमेरिकेने आतापर्यंत किती जणांना अंतराळात पाठविले ?५) 'भारताचे ७५ महान क्रांतिकारक' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ? *उत्तरे :-* १) राकेश शर्मा २) एक ३) अमेरिका ४) ३७९ अंतराळवीर ५) भीम सिंह*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संजय बंटी पाटील, अध्यक्ष, शिवा संघटना, धर्माबाद👤 अशोक मामीडवार, उमरी👤 रवी राजमाने, साहित्यिक, सांगली👤 चिं. अव्युक्त अभिजित लखमावाड, धर्माबाद👤 तिरुपती अंगरोड, धर्माबाद👤 आनंद आवरे👤 साईनाथ गोणारकर👤 गणेश घुले👤 सुनिता महाडिक, मुंबई👤 विजय दिंडे👤 D. S. P. पाटील👤 खेमशेट्टी लक्ष्मण*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••साधुबोध झाला तो नुरोनियां ठेला । ठायींच मुराला अनुभवें ॥१॥ कापुराची वाती उजळली ज्योति । ठायींच समाप्ति झाली जैसी ॥२॥ मोक्षरेखे आला भाग्यें विनटला । साधूंचा अंकिला हरिभक्त ॥३॥ ज्ञानदेवा गोडी संगति सज्जनीं । हरि दिसे जनीं वनी आत्मतत्वीं ।।४।। ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुसऱ्यांचा अपमान करून आपल्याला आनंद मिळत असेल तर येणाऱ्या प्रत्येक वेळ,प्रसंगाशी जुळून रहावे व आलेल्या त्या वेळ, प्रसंगाचे त्याचप्रमाणे आनंदीत होऊन स्वागत करण्याची तयारी ठेवावी. कारण वेळ, प्रसंग प्रत्येकांवरच एक ना एक दिवस येत असतो. वेळ, प्रसंगाला कोणतेही आमत्रंण देण्यासाठी मुहूर्त बघावे लागत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎀 *कोल्हा व लांडगा* 🎀*एक कोल्हा एकदा एका लांडग्याला* म्हणाला, 'मित्रा माझी स्थिती किती वाईट आहे याची तुला कल्पना नाही. एखादा म्हातारा कोंबडा किंवा मरायला टेकलेली अशक्त कोंबडी यांच्या मांसावर मला उदरनिर्वाह करावा लागतो. त्यामुळे मी अगदी कंटाळल्यासारखा झालो आहे. शिवाय भक्ष्य मिळवताना आपला जीव धोक्यात घालण्याचा प्रसंग तुला क्वचित येत असेल. मला भक्ष्याच्या शोधासाठी गावठाणात लपतछपत फिरावं लागतं. तुझं तसं नाही. तू आपलं भक्ष्य रानात; कुरणात मिळवू शकतोस. ही तुझी विद्या मला शिकवशील तर बरं होईल. तुझ्या हाताखाली शिक्षणासाठी राहिल्याने कोल्ह्याच्या वंशात जन्म घेऊन पहिल्याने मेंढी मारून खाण्याचा मान मिळेल, अशी माझी अपेक्षा आहे. तू मला शिकवलंस तर आपले श्रम फुकट गेले असं म्हणायची वेळ तुझ्यावर नक्कीच येणार नाही.' लांडगा म्हणाला, 'ठीक आहे, मी प्रयत्न करून पाहतो. प्रथम तू पलिकडच्या शेतात माझा भाऊ मरून पडला आहे त्याच कातडं पांघरून ये.' तसं करताच लांडग्याने त्याला निरनिराळे धडे शिकवले. गुरगुरणे, चावणे, लढाई करणे, मेंढ्याच्या कळपावर तुटून पडणे, एखादी मेंढी उचलून नेणे या गोष्टीचे शिक्षण कोल्ह्याला दिले. सुरुवातीला हे सगळे कोल्ह्याला लवकर जमेना. पण तो मुळातच हुषार असल्याने ते सगले तो लवकरच व्यवस्थित करू लागला. त्याची हुशारी पाहून लांडग्याला आश्चर्य वाटले, शेवटी एक मोठा मेंढ्यांचा कळप कोल्ह्याला दिसताच त्याच्यावर तुटून पडून एका क्षणात त्याने मेंढ्या, धनगर व त्याचे कुत्रे यांची अगदी दाणादाण उडवून दिली. त्याने एक मोठी मेंढी आपल्या तोंडात धरली व तिला मारणार तोच शेजारच्या शेतातून कोंबड्याचा आवाज ऐकू आला. तो ओळखीचा आवाज ऐकताच आपल्या नव्या वेषाचे त्याला भान राहिले नाही व त्याने ते लांडग्याचे कातडे फेकून दिले व गुरूचा निरोपही न घेता तो तडक त्या कोंबड्याकडे धावला.〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰🎀 *तात्पर्य : - मूळचा स्वभाव कितीही शिक्षण झाले तरी जात नाही.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 27 ऑगस्ट 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/wK9wi8xQmNRHAZUH/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌸 *_ या वर्षातील २४० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🌸 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌸•••••••••••••••••••••••••••••••••*१९९१: युरोपिअन महासंघाने इस्टोनिया, लाटव्हिया व लिथुआनियाच्या स्वातंत्र्यास मान्यता दिली.**१९९१: मोल्डोव्हाने आपण (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र असल्याचे घोषित केले.**१९६६: नाट्यसंपदा निर्मित,वसंत कानेटकर लिखित व पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित ’अश्रूंची झाली फुले’ या नाटकाचा पहिला प्रयोग गिरगाव येथील साहित्य संघ मंदिर येथे झाला.**१९५७: मलेशियाची राज्यघटना अमलात आली.**१९३९: सर फ्रँक व्हीटल आणि हॅन्स ओहायन यांनी शोध लावलेल्या Heinkel He 178 या जगातील पहिल्या टर्बो जेट विमानाचे उड्डाण झाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८०: नेहा धुपिया -- भारतीय अभिनेत्री**१९७६: अभिजीत आप्पासाहेब पाटील-- प्रसिद्ध कवी**१९७५: अनंत हनुमंत धनसरे -- कवी लेखक**१९७२: दिलीप सिंह राणा( 'द ग्रेट खली' ) -- भारतीय व्यवसायिक कुस्ती लढणारे, २००७ मध्ये डब्ल्यु डब्ल्यु ईत ते वर्ल्ड हेविवेट चॅम्पियन बनले* *१९६८: नितीन वैद्य -- लेखक संपादक**१९६७: सुजाता गुंडूराव शिंदे -- कवयित्री* *१९६६: भोजराज रतीराम लांजेवार - कवी* *१९५६: सुनिता अरळीकर -- प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका* *१९४४: नीलकंठ चिरकुटराव चव्हाण -- कवी, लेखक**१९३९: मीना प्रभू -- कवयित्री, ज्येष्ठ लेखिका, प्रवासवर्णनकार**१९३५: श्रीरंग विष्णू जोशी -- मराठी लघु कथालेखक व कवी* *१९३०: डॉ. बद्रीनारायण रामुलाल बारवाले-- भारतीय संशोधक, उद्योजक (मृत्यू: २४ जुलै २०१७ )* *१९२५: नारायण धारप – लेखक, नाटककार रहस्यकथाकार (मृत्यू: १८ ऑगस्ट २००८ )**१९२५: वसंत केशव दावतर -- लेखक समीक्षक (मृत्यू,:१८ मार्च २००४ )**१९१९: विनायक रा. करंदीकर – संतसाहित्याचे अभ्यासक (मृत्यू: १५ एप्रिल २०१३ )**१९१०: सेतू माधवराव पगडी – इतिहासकार, विचारवंत, संशोधक, लेखक, वक्ते, तत्त्वचिंतक, समीक्षक, कार्यक्षम मुलकी अधिकारी, ’गॅझेटियर्स’चे संपादक असे विविधांगी पैलू असलेले व्यक्तिमत्त्व. 'जीवनसेतू’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.(मृत्यू: १४ आक्टोबर १९९४ )**१९०९: नानासाहेब(ना.तु.) ठाकूर - कवी* *१९०८: सर डोनाल्ड ब्रॅडमन – ऑस्ट्रेलियन फलंदाज, संघनायक व विक्रमवीर. १९४९ मध्ये त्यांना 'सर’ हा किताब देण्यात आला. (मृत्यू: २५ फेब्रुवारी २००१ )**१९०८: लिंडन बी. जॉन्सन – अमेरिकेचे ३६ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: २२ जानेवारी १९७३ )**१८९९: रमाकांत पंढरीनाथ कंगले -- अनुवादक, विश्लेेषक, लेखक(मृत्यू: २७ जून १९८९ )**१८५९: सर दोराबजी टाटा – उद्योगपती व लोकहितबुद्धी (मृत्यू: ३ जून १९३२ )**१८५४: गणेश श्रीकृष्ण तथा 'दादासाहेब’ खापर्डे – प्रख्यात कायदेपंडित, विद्वान आणि राजकीय नेते, लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी,'वर्हाडचे नबाब’ (मृत्यू: १ जुलै १९३८ )* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *२०१९: कुसुम गोपीनाथ शेंडे -- किराणा घराण्याच्या गायिका व नाट्यअभिनेत्री ( जन्म: १२ डिसेंबर १९२९ )* *२००६: हृषिकेश मुकर्जी – चित्रपट दिग्दर्शक (जन्म: ३० सप्टेंबर १९२२ )**२०००: मनोरमा वागळे – रंगभूमी, चित्रपट व मालिकांमध्ये विविध भूमिका केलेक्या अभिनेत्री (जन्म: १९२८ )**१९९८: दादासाहेब पोतनीस( दतात्रेय शंकर पोतनीस) -- स्वतंत्र सेनानी 'गावकरी' या मराठी भाषिक वृत्तपत्राचे संपादक ,पत्रकार (जन्म: २२ नोव्हेंबर १९०९ )**१९७९: लॉर्ड लुई माउंटबॅटन – भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल (जन्म: २५ जून १९०० )**१९७६: मुकेश चंद माथूर तथा ‘मुकेश‘ – पार्श्वगायक. तीस वर्षांच्या फिल्मी कारकिर्दीत त्यांनी १०,००० हून अधिक गीतांना आवाज दिला. ऊर्दू, पंजाबी, तमिळ, बंगाली, मराठी, गुजराथी या भाषांतही त्यांनी गाणी गायली. (जन्म: २२ जुलै १९२३ )**१९५५: जगन्नाथ रघुनाथ आजगावकर – संतचरित्रकार,१९०७ ते १९३५ या काळात त्यांच्या 'महाराष्ट्र कविचरित्र’ या ग्रंथाचे नऊ खंड प्रकाशित (जन्म: १६ ऑगस्ट १८७९ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••फेसबुक आणि व्हाट्सअप्प ची स्थिती म्हणजे*एक ना धड भाराभर चिंध्या*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *लडाख या केंद्रशासित प्रदेशात 5 नव्या जिल्ह्याची स्थापन करण्याचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *जम्मू काश्मीरमध्ये भाजपकडून आधी 44 उमेदवार जाहीर, मग तासाभरात उमेदवार यादी रद्द, नव्याने 15 उमेदवारांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *विधानसभेला महायुतीचा प्रमुख चेहरा एकनाथ शिंदे, पण मुख्यमंत्री निवडणुकीनंतर ठरणार, अशोक चव्हाणांचं महत्त्वाचं वक्तव्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *गणपतीपूर्वी गोवा हायवेवरची वाहतूक सुरळीत करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना, खड्डे बुजवण्यासाठी हार्डनरच्या वापराचं प्रात्याक्षिक*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सिंधुदुर्ग किल्ल्यावर वर्षभरापूर्वी पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी पुतळा कोसळला*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नांदेड लोकसभेचे विद्यमान खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन, हैदराबादमधील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास, ते 71 वर्षाचे होते. आज नायगाव येथे शासकीय पद्धतीने होणार अंतीम संस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *राज्यातील सर्व शाळांमध्ये अत्याधुनिक पॅनिक बटण बसवणार - शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गोपाळकाला*दहीहंडीचे महत्त्व*दहीहंडीची प्रक्रिया अत्यंत मजोशीर असते. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी याचे आयोजन केले जाते. या दिवशी मातीच्या मडक्यात दही, लोणी, मिठाई, फळे इत्यादी भरुन एका उंच ठिकाणी हे मडके टांगले जाते. याला फोडण्यासाठी विविध तरुण मंडळी प्रयत्न करतात. दहीहंडी फोडण्यासाठी विविध मंडळातील तरुण एक दुसऱ्याच्या पाठीवर चढून मानवी मनोरा तयार करतात. या मनोऱ्याच्या सर्वात वरच्या थरावर असतो तो गोविंदा. तो आपला तोल सांभाळत हंडी फोडतो. हंडी फोडणाऱ्या मंडळांना विविध भेटवस्तू देऊन गौरविण्यात येते. मुंबईत गोविंदांसह गोपिकाही या उत्सवात सहभागी होतात. अनेक मंडळे अशी आहेत, ज्यात केवळ मुलीच आहेत. या मुली मुलांप्रमाणेच धाडस दाखवत थरांवर थर लावून हंडी फोडतात. या उत्सवात सेलिब्रिटी देखील हजेरी लावतात आणि अनेक मोठी मंडळी या उपक्रमात सहभागी होत तरूणांना प्रोत्साहन देत उत्साह वाढवतात.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चांगले विचार मनात फार वेळ टिकत नाहीत म्हणून ते मनात येताच कृती करा.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केंद्र शासनाने १४० कोटी जनतेसाठी कोणती संकल्पना राबविण्याचा निर्धार केला आहे ?२) भारतात किती ठिकाणी नोटांची छपाई केली जाते ?३) "गब्बर" या टोपण नावाने कोणता भारतीय क्रिकेटपटू परिचित आहे ?४) 'चौफेर' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) भगवान श्री कृष्ण यांचे आई - वडिलांचे नांव सांगा ?*उत्तरे :-* १) एक पेड मेरी माँ के नाम २) चार - महाराष्ट्रात नाशिक, मध्यप्रदेशात देवास, कर्नाटकात म्हैसूर, पश्चिम बंगालमध्ये सालबोनी ३) शिखर धवन ४) चहूकडे, सर्वत्र, भोवताली ५) देवकी - वसुदेव*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 नागभूषण दुर्गम, शिक्षक नेते, नांदेड👤 दत्तप्रसाद सुरुकुटवार, नांदेड👤 ज्योती आळंदकर, लातूर👤 अतुल वैद्य, पेण, रायगड👤 प्रशांत रुईकर, लातूर👤 दिगंबर सोळंके👤 विकास गायकवाड, नांदेड👤 विश्वनाथ आडेराव, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••योगयागविधि येणें नोहे सिद्धी । वायांचि उपाधि दंभ धर्म ॥१॥ भावेंविण देव न कळे नि:संदेह । गुरुविण अनुभव कैसा कळे ॥२॥ तपेंवीण दैवत दिधल्याविण प्राप्त । गुजेंविण हित कोण सांगे ॥३॥ ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात । साधूचे संगती तरणोपाय ॥४॥ ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकमेकांची काळजी घेतली पाहिजे असे बरेचजण म्हणत असतात. हा एक समाजसंकेत आहे. पण त्याच वेळेला आपण आपल्याच घरातील माणूस आजारी असताना त्याची का बरं काळजी घेत नाही. ..? हा एक प्रश्नच आहे. एकदा तो माणूस बरा झाल्यावर मात्र वेळात, वेळ काढून दिखावूपणा करुन काळजी घेण्यात काय अर्थ...? म्हणून काळजी करायची असेल किंवा सेवा करायची असेल तर आपल्या मनात आपुलकी व त्या माणसासाठी वेळ असणे आवश्यक आहे आणि आज ती अत्यंत काळाची गरज आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वडिलांना मदत*भगवान बुद्ध त्या काळात आपल्या शिष्यगणांसह गावोगावी जात होते. एका गावाच्या वेशीवर एक वृद्ध आपल्या मोठ्या टोपलीतून भाजी विकण्यास बसला होता.ती टोपली जड होती व त्याला तेथून दुसरीकडे जायचे होते म्हणून येणार्या - जाणार्या वाटसरुंना तो आपल्या डोक्यावर टोपली ठेवण्यास मदत करण्याची याचना करत होता. पण कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नव्हते. ते शिष्यगणही मजा बघत होते. हे पाहताच भगवान बुद्ध स्वतः पुढे झाले व त्यांनी वृद्धाच्या डोक्यावर टोपली उचलून दिली. त्या वृद्धाने त्यांना ओळखले होते.तो म्हणाला, सार्या जगाच्या दृष्टीने ते कोणीही असोत, पण माझ्या दृष्टीने माझ्या मुलासारखे आहेत ! त्याचे बोलणे ऐकून शिष्य आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले, हे कसे शक्य आहे ? तो वृद्ध उत्तरला, जगात प्रत्येक मुलगा हा आपल्या मातापित्यांचा आधार असतो. त्यांचे कष्ट उपसण्यास नेहमीच मदत करत असतो. आज त्यांनीही मला मदत केली आहे. माझे कष्ट हलके केले आहेत. मग ते माझ्या मुलासमानच नाहीत का ? सार्या शिष्यांनी त्या वृद्धाचे पाय धरले व क्षमा मागितली.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 26 ऑगस्ट 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/p3EbER57WmGFfmD9/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔶🔶 *_श्रीकृष्ण जन्माष्टमी_* 🔶🔶 •••••••••••••••••••••••••••••••••••🌸 *_आंतरराष्ट्रीय श्वान दिन_*🌸•••••••••••••••••••••••••••••••••🌸 *_महिला समानता दिवस_* 🌸••••••••••••••••••••••••••••••••🌸 *_ या वर्षातील २३९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🌸 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌸•••••••••••••••••••••••••••••••••*१९९६: दक्षिण कोरियात १९७९ मध्ये झालेल्या लष्करी कटाबद्दल माजी अध्यक्ष चुन दू वान यांना मृत्यूदंडाची तर त्यांचे उत्तराधिकारी प्रो ताय वू यांना साडेबावीस वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.**१९९४: लोन टेनिसपटू रमेश कृष्णन आणि मध्यम पल्ल्याचा धावपटू बहादूर प्रसाद यांना के. के. बिर्ला फांउंडेशनचा पुरस्कार जाहीर**१९७२: पश्चिम जर्मनीतील म्युनिच येथे २० व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**१९४४: दुसरे महायुद्ध - चार्ल्स द गॉलने पॅरिसमधे प्रवेश केला.**१८८३: डच इंडीज (सध्याचे इंडोनेशिया) बेटावरील क्राकाटाऊ ज्वालामुखीच्या उद्रेकात १३५ गावे भस्मसात होऊन सुमारे ३६,००० लोकांचा बळी गेला.**१७६८: कॅप्टन जेम्स कूक एच.एम.एस. एन्डेव्हर या जहाजातुन आपल्या पहिल्या सफरीवर निघाला.**१४९८: मायकेल अँजेलो याने ’पिएटा’ या जगप्रसिद्ध शिल्पकृतीच्या कामास सुरूवात केली.* 🌸 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🌸•••••••••••••••••••••••••••••••••*१९९०: इशिता दत्ता शेठ -- अभिनेत्री**१९८२: नचिकेत सतीश क्षीरे -- लेखक**१९७९: सोनाली नवांगुळ -- प्रसिद्ध लेखिका,मूळ तामिळ लेखिका सलमा यांची कादंबरी ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ या नावांनी मराठीत अनुवादित केली.अनुवादित कादंबरीला मराठी साहित्य अकादमीचा पुरस्कार**१९७७: दिनेश कृष्णाजी चव्हाण -- कवी**१९७६: प्रा. निर्मला रणजित शेवाळे -- कवयित्री, लेखिका**१९७५: अंजली धानोरकर -- उपजिल्हाधिकारी तथा प्रसिद्ध लेखिका**१९७३: इंदर कुमार. -- भारतीय अभिनेता (मृत्यू: २८ जुलै २०१७ )**१९७१: अनिता पिरन खैरनार - कवयित्री**१९७१: राजेश मनोहरराव चौधरी -- कवी**१९६८: मधुर भांडारकर -- भारतीय चित्रपटदिग्दर्शक, निर्माता, पटकथालेखक**१९६६: संगिता सुहास अरबुने -- प्रसिद्ध कवयित्री,लेखिका**१९६५: प्रा. भगवंत केशव शोभणे -- कवी, लेखक* *१९६२: विलास कृष्णाजी नाईक -- मराठी साहित्यिक**१९५६: प्रकाश गव्हाणे -- प्रसिद्ध कवी तथा लेखक**१९५६: मनेका गांधी -- माजी केंद्रीय मंत्री**१९५५: पुरुषोत्तम बोरकर -- कादंबरीकार* *१९५५: प्रा. लक्ष्मण काशिनाथराव मोहरीर -- लेखक, व्याख्याते* *१९५५: डॉ. सुजाता जोशी-पाटोदेकर -- नेत्रतज्ज्ञ तथा लेखिका**१९५२: छाया विजय नाईक -- लेखिका, संपादिका* *१९४८: अरुण यशवंत ताम्हणकर -- कादंबरीकार* *१९४८: डॉ.आशा अरविंद सावदेकर -- ज्येष्ठ समीक्षक, कादंबरीकार (मृत्यू: २२ एप्रिल २०२१ )* *१९४४: अनिल अवचट – लेखक,सामाजिक कार्यकर्ते, चित्रकार आणि पत्रकार (मृत्यू: २७ जानेवारी २०२२ )**१९३९: ताराचंद खांडेकर -- प्रसिद्ध विचारवंत,समीक्षक**१९२८: नारायण हरी पालकर -- चरित्रकार (मृत्यू: १ मार्च १९७६ )**१९२७: बालकृष्ण विठ्ठलदास दोशी -- भारतीय वास्तुविशारद (मृत्यू: २४ जानेवारी २०२३ )**१९२६: प्राचार्य दिनकर विष्णू जोशी -- कादंबरीकार, कथाकार* *१९२२: ग. प्र. प्रधान – समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ, राजकारणी, लेखक, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती. (मृत्यू: २९ मे २०१० )**_१९१०: मदर तेरेसा – भारतरत्न व नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका (मृत्यू: ५ सप्टेंबर १९९७ )_**१७४३: अॅन्टॉइन लॅव्हाझिये – फ्रेन्च रसायनशास्त्रज्ञ, आधुनिक रसायनशास्त्राचा जनक (मृत्यू: ८ मे १७९४ )* 🌸 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🌸 ••••••••••••••••••••••••••••••••• *२०२३: देव कोहली -- भारतीय हिंदुस्थानीकवी आणि गीतकार (जन्म: २ नोव्हेंबर १९४२)* *२०१२: ए. के. हंगल – चित्रपट अभिनेते व स्वातंत्र्यसैनिक (जन्म: १ फेब्रुवारी १९१७ )**२००१: आनंद चिंतामणी दिघे -- शिवसेना पक्षाचे नेते (जन्म: २७ जानेवारी १९५१ )**२०००: मनोरमा वागळे - मराठी चित्रपटांतील अभिनेत्री (जन्म: ३०ऑगस्ट१९२८ )**१९७४: चार्ल्स ऑगस्टस लिंडबर्ग – धाडसी अमेरिकन वैमानिक. १९२७ मध्ये त्यांनी पॅरिस ते न्यूयॉर्क या ५,८०० किलोमीटरच्या विनाथांबा विमानोड्डाण स्पर्धेत भाग घेऊन साडे तेहतीस तासांत ती स्पर्धा जिंकली. वैमानिकी जीवनाच्या अनुभवांवरील त्यांच्या ’द स्पिरीट ऑफ सेंट लुईस’ या पुस्तकास पुलित्झर पुरस्कार मिळाला. (जन्म: ४ फेब्रुवारी १९०२ )**१९४८:कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर – ख्यातनाम नाटककार व पत्रकार, ’केसरी’चे संपादक, 'नवाकाळ’चे संस्थापक (जन्म:२५ नोव्हेंबर १८७२)**१७२३: अँथनी व्हॉन लीवेनहॉक – डच सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (जन्म: २४ आक्टोबर १६३२ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शालेय अभ्यासक्रमात खेळाचे महत्व*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महिलांवर अत्याचार अक्षम्य अपराध, तो करणारा कोणीही सुटता कामा नये ; मुलींवरील अत्याचाराच्या घटनेनंतर जळगाव येथील लखपती दीदी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे परखड भाष्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नेपाळमधील बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पुण्यातील खडकवासला धरणातून विसर्ग सुरू; भिडे पूल पाण्याखाली, पुलाची वाडी परिसरात घरांमध्ये शिरलं पाणी, सतर्कतेच्या सूचना*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबई : यंदाही गणेशोत्सवासाठी धावणार ‘मोदी एक्सप्रेस’ ; चाकरमान्यांचा होणार मोफत प्रवास !*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना पगाराच्या ५० टक्के निवृत्ती वेतनाची दिली हमी, यासाठी मोदी सरकारने एकीकृत निवृत्ती वेतन योजना केली जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *आदीपुरुष चित्रपटातील शबरीची भूमिका केलेल्या आशा शर्मा यांचे वयाच्या 88 व्या वर्षी झाले निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *रावळपिंडीच्या मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानची हार, बांगलादेशचा मोठा विजय, दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने घेतली आघाडी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कृष्ण जन्माष्टमी*श्रीकृष्ण जयंती आणि गोकुळाष्टमी यासह विविध नावांनी कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. गुजरातमध्ये याला सतम अठम (Satam Atham) असं संबोधले जाते, तर दक्षिण भारतात, विशेषत: केरळमध्ये या सणाला अष्टमी रोहिणी असं म्हणतात. भारतात आणि जगभरातील हिंदूंद्वारे जन्माष्टमी उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी केली जाते.मथुरा, उत्तर प्रदेशातील वृंदावनभगवान कृष्णाचे जन्मस्थान मथुरेला जन्माष्टमीच्या वेळी विशेष महत्त्व आहे, कारण यादिवशी कृष्णभक्त दिवसभर उपवास करतात, मध्यरात्रीपर्यंत जागरण करतात, जे कृष्णाच्या जन्माचे प्रतीक असल्याचे मानलं जातं. मध्यरात्रीची पूजा ही एक खास गोष्ट आहे, ज्या दरम्यान कृष्णाच्या मूर्तीला विधीपूर्वक स्नान करून नवीन कपडे घातले जातात. मथुरेतील लोकं कृष्णाच्या जन्माची कथा दर्शविणारी पालखी तयार करतात, ज्याला झांकी असेही म्हणतात. कृष्णाच्या जीवनामधील आणखी एक महत्त्वाचे स्थान वृंदावन, कृष्णाच्या बालपणाचं आणि किशोरवयीन वर्षांशी आणि त्यांच्या प्रसिद्ध रास लीलांशी संबंधित आहे. जवळपास १० दिवस अगोदर वृंदावनात जन्माष्टमीचा उत्सव सुरू होतो. ज्या दिवशी कृष्णाचे जीवन रास लीलांद्वारे, झांकीस अभिषेकसह पुन्हा निर्माण केले जाते, त्या दिवशी कृष्णाचे भव्य विधीवत स्नान केले जाते.तसेच पुणे, मुंबई आणि उत्तरप्रदेश च्या गोकुळ मध्ये ही हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जसे प्रकाशाच्या साह्याशिवाय वस्तू दिसत नाही, तसे विचाराशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोणत्या देशाने *सोफिया* या पहिल्या यंत्रमानवास नागरिकत्व बहाल केले ?२) भारतातील पहिले डिजिटल गाव कोणते ?३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मॅट्रीक परीक्षा उत्तीर्ण झाले तेव्हा त्यांना बुद्धचरित्र हे पुस्तक कोणी दिले ?४) 'नृप' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) महात्मा फुले यांच्या आईचे नाव काय होते ? *उत्तरे :-* १) सौदी अरेबिया २) अकोदरा, गुजरात ३) कृष्णाजी अर्जून केळुस्कर ४) राजा, भूप, भूपती, भूपाळ, नरेश, महीपती ५) चिमणाबाई फुले *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 नारायण शिंदे, उपक्रमशील शिक्षक, रत्नागिरी👤 संदीप आवरे, धर्माबाद👤 दिगंबर खपाटे बन्नाळीकर👤 प्रशांत ईबीतवार👤 प्रशांत कोकने👤 मधुकर बोईनवाड, साधनव्यक्ती, धर्माबाद👤 दत्ता बोडलवाड👤 सुमेध भंडारे👤 संदीप सोनकांबळे👤 मारोती ताकलोर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भावेंवीण भक्ति भक्तिविण मुक्ति । बळेंवीण् शक्ति बोलु नये ॥१॥ कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित । उगा राहें निवांत शिणसी वायां ॥२॥ सायासें करिसी प्रपंच दिननिशीं । हरिसी न भजसी कवण्या गुणें ॥३॥ ज्ञानदेव म्हणें हरिजप करणें । तुटेल धरणें प्रपंचाचें ॥४॥ ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बुध्दीवान व्यक्ती खऱ्या अर्थाने बुध्दीवान असतो. समोरचा माणूस कोणत्या शब्दात बोलत आहे आणि का म्हणून बोलत आहे याचं एक प्रकारे परीक्षण करत असतो. अशी व्यक्ती वाचाळ नसते. आपल्या मुखातून कोणतेही शब्द न काढता शांत राहण्यातच स्वतःला धन्य समजते. अशी व्यक्ती शांतपणे आपले संस्कार, मानसन्मान, पद, प्रतिष्ठा जपत असते. कारण एवढे सारे मिळविण्यासाठी किती संघर्ष करावा लागला हे, फक्त त्याच व्यक्तीला माहीत असते. अशी व्यक्ती कळत न कळत लोकांसाठी श्रध्देचे स्थान बनत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• " खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका जंगलात एक लांडगा राहत होता. तो लांडगा मस्त मजेत शिकार करून खात असे. शिकार खात असताना अचानक एक हाड त्याच्या घशामध्ये अडकते. घशामध्ये अडकलेल्या हाडामुळे लांडग्याला त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याला खाता येत नव्हते .त्याला कोणीही मित्र नव्हता की, जो त्याला ते हाड काढण्यासाठी मदत करू शकेल. तो शेजारून जाणाऱ्यांना विनंती करू लागला की, माझ्या घशातील हाड काढून द्या. मग तो सगळ्यांना म्हणतो की, जो कोणी माझ्या घशातील हाड काढून देईन त्याला तो म्हणेल ते बक्षीस देईन पण लांडग्याच्या भीतीने कोणीच आले नाही.शेवटी एक सारस पक्ष्याला लांडग्याने न मारण्याचे आश्वासन दिल्यानंतर हाड काढण्यास त्या पक्षानं होकार दिला. सारसने लांब चोचीने लांडग्याच्या घशातले हाड बाहेर काढले. लांडग्याने सुटकेचा नि:श्वास सोडला. तेव्हा सारस त्याला म्हणाला , " तू मला या मदतीच्या मोबदल्यात काय देणार ? "लांडग्याने दुष्टपणे हसत म्हटले, " मी तुझा जीव वाचविला नाही का ? जेव्हा तू तुझी चोच माझ्या तोंडात घातली तेव्हाच मी तुला मारून टाकू शकत होतो." सारस पक्षी लांडग्याचे असे बोलणे ऐकून नाराज झाला आणि जाता जाता विचार करू लागला की, हा लांडगा पण किती पटकन उपकार विसरणारा निघाला. मी त्याची मदत करायला नको होती.*तात्पर्य - उपकाराची फेड आपकाराने करू नये ."*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 24 ऑगस्ट 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/RVC9ihzERVQ3Ywfr/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟣 *_ या वर्षातील २३७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟣 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟣•••••••••••••••••••••••••••••••••*१९९१: युक्रेनने स्वत:ला (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र घोषित केले.**१९६६: रशियन बनावटीचे लूना-११ हे मानवविरहित यान चांद्रमोहिमेवर निघाले**१९५०: एडिथ सॅम्पसन हा संयुक्त राष्ट्रात जाणारा पहिला कृष्णवर्णीय अमेरिकन प्रतिनिधी ठरला.**१८९१: थॉमस अल्वा एडिसनने चलचित्र कॅमेर्याचे पेटंट घेतले.**१६०८: ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीचा पहिला प्रतिनिधी सुरत येथे दाखल झाला.* 🟣 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*🟣 •••••••••••••••••••••••••••••••••*१९९७: दीप्ती भगवान शर्मा -- भारतीय महिला क्रिकेटपटू**१९७७: नागराज पोपटराव मंजुळे -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते, आणि मराठी कवी**१९७६: हंसराज मधुकर देसाई -- बालकवी* *१९७४: बिपिन सिध्देश्वरराव देशपांडे -- लेखक, पत्रकार* *१९६९: मुकेश तिवारी -- भारतीय अभिनेता**१९६६: बापू सोपानराव दासरी -- कवी, लेखक**१९६२: सुरेश मारोतराव चोपणे- लेखक, कवी* *१९५७: अनिल गोविंद मुनघाटे -- लेखक, कवी**१९५४: सतीश कुलकर्णी -- मराठी चित्रपट निर्माते**१९५१: अनुराधा अरुण नेरुरकर -- कवयित्री, लेखिका* *१९४७: प्रा. डॉ. लक्ष्मण माधवराव शिवणेकर -- प्रसिद्ध कवी, लेखक, शिक्षणतज्ज्ञ, अनुवादक, संपादक* *१९४७: पॉलो कोहेलो – ब्राझिलियन लेखक**१९४७: प्रा. डॉ. अनिल नागेश सहस्रबुद्धे -- जेष्ठ मराठी साहित्यिक* *१९४४: संयुक्ता पाणिग्रही – ओडीसी नर्तिका (मृत्यू: २४ जून १९९७ )**१९३२: रावसाहेब गणपराव जाधव – मराठी वाङ्मयातील सर्व प्रवाहांचे खुल्या मनाने स्वागत करणारे ज्येष्ठ समीक्षक-कवी, माजी संमेलनाध्यक्ष (मृत्यू: २७ मे २०१६ )**१९२९: यासर अराफत – नोबेल पारितोषिक विजेते पॅलेस्टाईनचे नेते (मृत्यू: ११ नोव्हेंबर २००४ )**१९२४: जनार्दन अमृत जोशी -- कवी, लेखक**१९२३: होमी नुसेरवानजी सेठना -- भारतीय अणुशास्त्रज्ञ आणि रासायनिक अभियंता (मृत्यू: ५ सप्टेंबर २०१० )**१९२१: नामदेव लक्ष्मण व्हटकर - प्रसिद्ध नाटककार, कादंबरीकार**१९१८: सिकंदर बख्त – माजी केन्द्रीय परराष्ट्रमंत्री, केरळचे राज्यपाल व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते (मृत्यू:ज्ञ२३ फेब्रुवारी २००४ )**१९१७: पं. बसवराज राजगुरू -- कानडी-मराठी शास्त्रीय संगीत गायक (मृत्यू: २१ जुलै १९९१ )**१९०८: शिवराम हरी 'राजगुरू' – क्रांतिकारक (मृत्यू: २३ मार्च १९३१ )**१८९३: कृष्णचंद्र डे -- भारतीय संगीतकार, संगीतकार, गायक, अभिनेता (मृत्यू: २८ नोव्हेंबर १९६२ )**१८८८: बाळ गंगाधर तथा ’बाळासाहेब’ खेर – स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री, भारताचे ब्रिटनमधील उच्चायुक्त (मृत्यू: ८ मार्च १९५७ )**१८८०: बहिणाबाई चौधरी – कवयित्री. त्या शिकलेल्या नसतानाही त्यांच्यापाशी जीवंत काव्यरचनेची प्रतिभा होती. शेतीकाम आणि घरकाम करता करता त्या उत्स्फुर्तपणे ओव्या रचून गात असत. (मृत्यू: ३ डिसेंबर १९५१ )**१८७२: साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण तथा ’तात्यासाहेब’ केळकर – श्रेष्ठ मराठी साहित्यिक, संपादक लोकमान्य टिळक तुरुंगात असल्यामुळे त्यांनी १८९७ पासून ‘केसरी‘ व ‘मराठा‘चे संपादन केले.(मृत्यू: १४ आक्टोबर १९४७ )**१८३३: नर्मदाशंकर दवे ऊर्फ ’नर्मद’ – गुजराथी लेखक व समाजसुधारक, त्यांनी गुजराथी भाषेचा शब्दकोश सर्वप्रथम तयार केला. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १८८६ )*🟣 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟣 •••••••••••••••••••••••••••••••••*२०२३: सीमा देव-- मराठी अभिनेत्री (जन्म: २७ मार्च १९४२)**२०२२: प्रभाकर गणपतराव तल्लारवार -- कवी,लेखक (जन्म: २१ नोव्हेंबर१९३५ )**२०१९: अरुण जेटली -- अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात कायदेमंत्री आणि जलवाहतूकमंत्री (जन्म: २८ डिसेंबर १९५२ )**२०१८: विजय चव्हाण -- मराठी रंगभूमीवरचे कलाकार (जन्म: २ मे१९५५ )**२०१६: अनुराधा शशिकांत वैद्य -- कथा, कादंबरी, कविता, नाटक, निबंध, ललित लेख, सदर असे लेखनाचे वेगवेगळे प्रकार त्यांनी हाताळले (जन्म: ९ जुलै १९४४ )**२००६: यज्ञेश्वर माधव कस्तुरे (यज्ञेश्वरशास्त्री) -- वेदान्ततीर्थ, संपादक, संस्कृत आचार्य, लेखक(जन्म: ३ मार्च १९०८ )* *२०००: कल्याणजी वीरजी शाह – सुमारे तीन दशके रसिकांवर आपल्या सुरावटीची मोहिनी घालणार्या ’कल्याणजी-आनंदजी’ या संगीतकार द्वयीतील ज्येष्ठ बंधू (जन्म: ३० जून १९२८ )**१९९३: शतायुषी क्रिकेटमहर्षी प्रा. दिनकर बळवंत तथा दि. ब. देवधर – भारत सरकारतर्फे त्यांना पद्मश्री (१९६५) व पद्मविभूषण (१९९१) या पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. (जन्म: १४ जानेवारी १८९२ )**१९२५: सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर – संस्कृत पण्डित, प्राच्यविद्या संशोधक, भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक व समाजसुधारक (जन्म: ६ जुलै १८३७ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com~~~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बुवाबाजीला वेळेवर ओळखा*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी कोर्टाच्या निर्णयानंतर महाराष्ट्र बंद मागे घेण्याचं केलं आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नागपूर येथे 31 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेच्या टप्पा-2 चे आयोजन:50 लाख पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार थेट रक्कम*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण:प्रत्येक जिल्ह्यात होणार एक ‘मधाचे गाव’*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे 200 ते 225 जागेवर निवडणूक लढणार - राज ठाकरे*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *प्रधानमंत्री जनजाती आदिवासीन्याय महा अभियान 10 सप्टेंबर 2024 पर्यंत चालू राहणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुख्यमंत्री पदासाठी आमच्या पक्षात कुणाचाही रस नाही - शरद पवार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *25 ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम, 26 ऑगस्टपासून उष्णतेचा पारा वाढणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आरोग्यदायी सवयी*निरोगी राहण्यासाठी नेमके काय करावे यावर खूप चर्चा होते पण काही तज्ज्ञांनी आरोग्याच्या अशा दहा सवयी सांगितल्या आहेत की, ज्या अंगी बाणवायला सोप्या आहेत आणि परिणामकारक आहेत. या सवयी म्हणजे जीवन पद्धतीतला बदल आहे. उदा. अन्न नीट चावून खा. असे खाण्याने ते पचनास सुलभ होते. आपली पचनाची क्रिया पोटातच होते असे नाही. ती दातांपासून सुरू होत असते. या आहार तज्ञांनी साखर आणि मीठ यांना पांढरी विषे म्हटले आहे. ती विषे असली तरीही त्यांना खाण्यातून बाद करता येत नाही. साखर बरीच बाद करता येते पण मीठ बाद न करता त्याचा मर्यादित वापर केला पाहिजे. कारण साखरेने मधुमेह बळावतो आणि मिठाने रक्तदाब वाढतो. हे दोन विकार अनेक विकारांच्या मुळाशी असतात आणि ते कायमचे कधीच दुरुस्त होत नाहीत.चहाच्या बाबतीतही हे तज्ज्ञ असाच इशारा देतात पण चहा बाद करता येत नाही. आपला नेहमीचा चहा नाकारून आपण ग्रीन टी प्राशन करू शकतो. त्यात अनेक रोगप्रतिबंधक गुण आहेत. दूध हे आपण निरोगी समजतो पण त्याच्या बाबतही हे लोक इशारा देत आहेत. पाणी हे तर आपण पीतच असतो पण ते किती आणि कधी प्राशन करतो याला फार महत्त्व आहे. सकाळी उठल्याबरोबर पाणी प्यावे. जेवताना किंवा काहीही खाताना पाणी पिऊ नये. खाणे संपल्यावर ४५ मिनिटे किंवा जमल्यास एक तास पाणी पिणे टाळावे. विशेषत: पोट सुटलेल्या लोकांना ही सवय फार उपयोगी पडते. नेहमी प्रवास करणारांनी रोजचा व्यायाम चुकवू नये. प्रवासात खाण्याच्या वेळा चुकवू नयेत. घरून निघताना जेवून निघावे.बैठी कामे करणारांनी आपल्या कामातला वेळ काढून जमेल तसा व्यायाम करावा. हात पाय हलवावेत. पायांना ताण द्यावा. संगणकावर नजर लावावी लागत असेल तर अधुन मधून झाडांकडे पहावे. एकदाच जास्त न खाता चार पाच वेळा थोडे थोडे खावे आणि प्रत्येक खाण्यानंतर निदान दहा मिनिटे तरी चालावे. इतर व्यायामाला वेळ मिळत नसला तरी हे चालणेच निदान पाऊण तासाचे होते आणि फिटनेस टिकतो. शेवटची सूचना म्हणजे झोप. लवकर झोपावे आणि लवकर उठावे पण झोपेची वेळ नीट निवडावी. रात्रीचे जेवण आणि झोपेची वेळ यात किमान दोन तासांचे अंतर असावे. असे केल्याने झोप चांगली लागते. अन्यथा पोटात अन्न पचलेले नसते आणि ते आपल्याला शांत झोपू देत नाही.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पालकांनी दिलेले संस्कार हे मुलांचे जीवन सुंदर बनवतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणारा भारतीय व्यक्ती कोण आहे ?२) युक्रेन या देशाची राजधानी कोणती ?३) महात्मा फुले यांनी पहिली शाळा केव्हा व कोठे काढली ?४) 'नवनीत' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) भारताचा राष्ट्रीय ग्रंथ कोणता ? *उत्तरे :-* १) विराट कोहली ( २७१ मिलियन ) २) कीव ३) १८४८ ( भिडेवाडा, पुणे ) ४) लोणी ५) भारतीय संविधान*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 श्याम ठाणेदार, स्तंभलेखक, पुणे👤 सावित्री कांबळे, शिक्षिका तथा साहित्यिका, पुणे👤 श्रीकांत भुजबळ, नायब तहसिलदार,👤 हणमंत बोलचेटवार, धर्माबाद👤 गोपाळ ऐनवाले, सेवानिवृत्त शिक्षक, धर्माबाद👤 भाऊराव शिंदे, धर्माबाद👤 संजय पाटील, पुणे👤 रमेश भोसले, नांदेड👤 सुनील बावसकर👤 मारोती बोंबले, बिलोली👤 ऋषिकेश शिंदे, धर्माबाद👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••त्रिगुण असार निर्गुण हें सार । सारासार विचार हरिपाठ ॥१॥ सगुण निर्गुण गुणाचें अगुण । हरिवीणें मन व्यर्थ जाय ॥२॥ अव्यक्त निराकार नाहीं ज्या आकार । जेथुनि चराचर हरिसी भजें ॥३॥ ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं । अनंत जन्मांनी पुण्य होय ॥४॥ ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या घरात असलेल्या प्रत्येक निर्जीव वस्तूंसोबत आपली माया जुळलेली असते. व त्या वस्तू विषयी आपुलकी निर्माण होत असते.पण, एखाद्या वेळी चालताना चुकून पाय दुसरीकडे पडल्यावर मात्र जीव लावलेल्या त्याच वस्तूंपासून इजा होण्याची शक्यता असते. आणि मग त्या वस्तूंचा राग यायला लागतो. म्हणून कोणतेही काम करताना आपले लक्ष पूर्णपणे त्याच कामाकडे असले पाहिजे. तेव्हाच ठरवलेल्या लक्षापर्यत जाण्याचा मार्ग मिळत असतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मन माणसाचे अन डोके...* एका माणसाला काही कामानिमित्त आपल्या गावातून शहराकडे जायचे होते. तो बेरोजगार होता व गावात त्याला काही काम उपलब्ध नव्हते. त्यामुळे त्याने शहरात जाऊन काम करण्याचे ठरवले होते. जवळ पैसे नसल्याने गावापासून शहरापर्यंतचा प्रवास तो पायीच करणार होता. त्याला ज्या रस्त्याने जायचे होते तो रस्ता जंगलातून जाणारा होता. त्यामुळे त्याला जंगली श्वापदांची भीती वाटत होती. परंतु दुसरा काही मार्ग नसल्याने त्याने धाडस करून जंगलात प्रवेश केला. काही अंतर गेल्यावर त्याला झाडावर एक माकड दिसले. त्याला पाहताच माकडाने झाडावरून त्याच्या पुढ्यात उडी मारली. परंतु माकडाने त्याला काही इजा केली नाही. उलट त्याने माणसाला त्याच्याबाबत माहिती विचारली. त्यावर माणसाने बरीच मोठी पाल्हाळीक कथा त्याला ऐकवली. ती ऐकल्यावर माकडाने त्याला पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले. पण त्यासाठी त्याला एक अटही घातली, तू मला क्षणभरही कामाशिवाय मोकळे सोडायचे नाही. नाही तर मी तुला मारून टाकीन. माणसाने त्या माकडाची अट मान्य केली. माकड त्या दिवसापासून माणसाची सर्व कामे करू लागले. माणसाची सर्व कामे करून माकड त्याच्यासोबत चांगलेच रुळले. परंतु माणसाच्या मनात मात्र, सुरुवातीला हा आपल्याला मारणार तर नाही ना? अशी धास्ती वाटत होती. पण नंतर त्याला एक युक्ती सुचली. माकडसाठी जेव्हा काहीच काम नसे तेव्हा माणूस एक शिडी लावून त्यावर माकडाला चढ - उतार करण्यास सांगत असे. हळूहळू माकडाला त्याची सवय झाली. माणसाचीघ सर्व कामे ते करू लागले. *_तात्पर्य_ ::~*माकड हे मानवी मेंदूचे प्रतिक आहे. आपण मेंदूला सदैव विविध कार्यात गुंतवून ठेवले पाहिजे. तरच ते सदैव रचनात्मक विचांरानी प्रेरित होऊन सकारात्मक योगदान देत राहिल. परंतू त्याला काही काम नसेल तर ,ते नकारात्मक विचार करू लागेल,हिंसक होईल, भरकटेल. त्यामूळेच म्हटले जाते की,रिकामा मेंदू हा सैतानाचे घर असते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 23 ऑगस्ट 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/eVXfbHvfhWeP3jk2/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟢 *_जागतिक वडा पाव दिवस_* 🟢•••••••••••••••••••••••••••••••••••🟢 *_ या वर्षातील २३६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟢 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟢•••••••••••••••••••••••••••••••••*२०१२: राजस्थानात अतिवृष्टीमुळे ३० जण ठार!**२०११: लीबीयातील हुकुमशहा मुअम्मर गडाफीची सत्ता उलथण्यात आली.**२००५: कविवर्य विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान**१९९७: हळदीच्या पेटंटबाबतचा अमेरिकेशी चालू असलेला कायदेशीर लढा भारताने जिंकला. एखाद्या विकसनशील देशाने अमेरिकन पेटंटला आव्हान देऊन तो जिंकण्याची ही पहिलीच घटना आहे.**१९९०: आर्मेनियाने आपण (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र असल्याचे जाहीर केले.**१९६६: ‘लूनार ऑर्बिटर-१‘ या मानवरहित अंतराळयानाने चंद्रावरून पहिल्यांदाच पृथ्वीची छायाचित्रे काढली.**१९४२: दुसरे महायुद्ध – स्टालिनग्राडची लढाई सुरू**१९४२: मो. ग. रांगणेकर यांच्या ’कुलवधु’ नाटकाचा पहिला प्रयोग झाला.**१९१४: पहिले महायुद्ध – जपानने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.**१८३९: युनायटेड किंगडमने हाँगकाँगचा ताबा घेतला.* 🟢 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*🟢 ••••••••••••••••••••••••••••••••• *२००४: अभिषेक रामकृष्ण भंडारे -- कवी**१९८९: आशा नेगी -- भारतीय अभिनेत्री* *१९८८: वाणी कपूर -- भारतीय अभिनेत्री* *१९८४: संदीप परसराम जगताप -- कवी, लेखक* *१९७३: मलाईका अरोरा-खान – मॉडेल व अभिनेत्री**१९६६: संजय बच्छाव -- प्रसिद्ध लेखक, अनुवादक, निवेदक**१९६३: डॉ. राजेंद्र झुंजारराव -- कवी* *१९६२: प्रा. डॉ. वेंकटलक्ष्मी नारायण पुरणशेट्टीवार -- सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका**१९६२: अनंत देविदास बोरसे -- लेखक**१९५९: नंदू परदेशी-- कवी, लेखक**१९५८: राजीव गजानन पुजारी -- लेखक* *१९५१: प्रा.लीला शिंदे -- प्रसिद्ध लेखिका* *१९४४: सायरा बानू – प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री**१९३८: मधुराणी श्रीराम भागवत -- कादंबरीकार व कथालेखिका (मृत्यू: २२ नोव्हेंबर २०२२ )**१९३१: दत्ता तन्नीरवार-- इतिहास लेखक (मृत्यू: १४ फेब्रुवारी २०२४ )**१९२६: दादा देशकर -- लेखक* *१९२५: नारायण बाळकृष्ण मराठे -- लेखक, संपादक* *१९२३: महादेव रामचंद्र बडवे -- लेखक* *१९२३: बलराम जाखर -- माजी लोकसभेचे अध्यक्ष आणि मध्य प्रदेशचे राज्यपाल (मृत्यू: ३ फेब्रुवारी २०१६ )**१९२३: वसंत दिगंबर कुलकर्णी -- समीक्षक (मृत्यू: २५ ऑगस्ट २००१ )**१९२२: सदाशिव अंबादास डांगे -- संशोधक, कोशकार, लेखक(मृत्यू: २५ ऑक्टोबर १९९९ )**१९१८: अण्णा मणी -- भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आणि हवामानशास्त्रज्ञ (मृत्यू: १६ ऑगस्ट २००१ )**१९१८: गोविंद विनायक तथा 'विंदा' करंदीकर – लेखक, कवी, लघुनिबंधकार व टीकाकार. देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा एकोणचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना ’अष्टदर्शने’ या साहित्यकृतीसाठी प्रदान करण्यात आला.(मृत्यू: १४ मार्च २०१० )**१९१५: बळवंत चिंतामण सहस्रबुद्धे-- विनोदी कवितांच्या व वात्रटिकांच्या संग्रहामुळे ‘वात्रटिकाकार’ म्हणूनही प्रसिद्ध (मृत्यू: ३१ मे १९९१ )* 🟢 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟢••••••••••••••••••••••••••••••••• *१९९४: आरती साहा – इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतणपटू (जन्म: २४ सप्टेंबर १९४० )**१९७५: पं. विनायकराव पटवर्धन – नामवंत शास्त्रीय गायक, गुरू, संगीतप्रसारक व अभिनेते. १९३२ मध्ये त्यांनी पुण्यात गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली.(जन्म: २२ जुलै १८९८ )**१९७४: डॉ.शंकर दामोदर पेंडसे – मराठी ग्रंथकार आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक. पंढरपूर येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे (१९५५) ते अध्यक्ष होते.(जन्म: २८ फेब्रुवारी १८९७ )**१९७१: रतन साळगावकर ऊर्फ हंसा वाडकर – मराठी व हिन्दी चित्रपट अभिनेत्री ’सांगत्ये ऐका’ नावाचे त्यांचे आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे. (जन्म: २४ जानेवारी १९२४ )**१८०६: चार्ल्स कुलोम – फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १४ जून १७३६ )* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लघुकथा - कुलदीपक*..... पूर्ण कथा वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोलंडचे पंतप्रधान यांच्यात वॉर्सा येथे प्रतिनिधीस्तरीय द्विपक्षीय चर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *IAS अधिकारी इक्बालसिंह चहल यांची बदली, मुख्यमंत्र्यांकडून आता देवेंद्र फडणवीसांच्या खात्याची धुरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश, MPSC ने संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलली; तरीही विद्यार्थी आंदोलनावर ठाम म्हणाले, आयोगाने पुढे ढकलण्यात आलेल्या परिक्षेत कृषी विभागाच्या 258 जागांचा समावेश करावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *प्रविण मसालेवाले ट्रस्टच्या वतीने पुरस्कारांचे वितरण, अर्णवाझ दमानिया यांना सुहाना कमल जीवनादर्श पुरस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *छत्रपती संभाजीनगर : ऑनलाइन दंड बंद करा, ऑटोरिक्षा चालक - मालकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने, पंतप्रधानांना पाठवले निवेदन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अमूलच्या शिरपेचात मानाचा तुरा, जगातील सर्वात मजबूत फूड ब्रँड म्हणून मान्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आयसीसीच्या क्रमवारीत भारतीय खेळाडूंचा दबदबा, कसोटी क्रिकेटमध्ये फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि अष्टपैलू जाडेजाही प्रथम क्रमांकावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आयुर्वेद म्हणजे काय?आयुर्वेद ही औषधाची एक नैसर्गिक पद्धत आहे जी भारतात 5000 वर्षांपूर्वी उगम पावली. हा निरोगीपणाचा एक समग्र दृष्टीकोन आहे जो आपल्या अस्तित्वाच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक पैलूंचा समतोल राखतो. आयुर्वेदाला "जीवनाचे विज्ञान" देखील म्हटले जाते, तुमचे शरीर आणि आरोग्य सुधारू शकते. आयुर्वेदात 'आयुर' म्हणजे जीवन, आणि 'वेद' म्हणजे विज्ञान किंवा ज्ञान. हे मानते की मानवी शरीरात विश्वातील पाच घटक असतात: अवकाश, वायू, अग्नि, पाणी आणि पृथ्वी, जे तीन महत्त्वपूर्ण ऊर्जा किंवा दोष तयार करतात: वात, पित्त आणि कफ. या दोषांचे संतुलन उत्तम आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. जेव्हा ते सुसंवाद साधतात तेव्हा ते चैतन्य आणि आरोग्याकडे नेत असतात आणि त्यांच्यातील असंतुलनामुळे आजार किंवा आरोग्य समस्या उद्भवू शकतात.आदर्श आरोग्य संतुलन राखण्यासाठी आयुर्वेदिक आरोग्य टिप्सध्यान : तणाव आपल्या आरोग्यासाठी चांगला नाही. आपल्या मानसिक तंदुरुस्तीवर परिणाम करण्याव्यतिरिक्त, आपल्या शारीरिक आरोग्यावर त्याचा परिणाम होतो, आणि तणाव कमी करण्याचा आणि मन शांत करण्याचा ध्यानाचा सराव करण्यापेक्षा दुसरा कोणताही चांगला मार्ग नाही. योगासारख्या सरावांमुळे लवचिकता आणि सामर्थ्य सुधारू शकते. हे तणाव कमी करते, मानसिक स्पष्टता वाढवते आणि संपूर्ण आरोग्यासाठी एक महत्त्वाची आयुर्वेद पद्धत आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वत:ला कधीही कमी लेखू नका ; तुमच्या आत्मविश्वासाने अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होऊ शकतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर कोणत्या ताऱ्याचे चिन्ह आहे ?२) महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ कोणत्या साली लिहिला ?३) प्राण्यांचे वर्गीकरण प्रथम कोणी केले ?४) 'नजराणा' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) NDA चा full form काय आहे ? *उत्तरे :-* १) पंचकोनी तारा २) १ एप्रिल १८८९ ३) Aristotle ४) भेट, उपहार ५) National Defence Academy*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 लक्ष्मी पुरणशेट्टीवार, साहित्यिक, नांदेड👤 सुनील भेंडे, वसमत👤 सचिन बोरसे, जर्मनी ( नांदेड )👤 यादव ढोणे👤 रामदास पेंडपवार, निझामाबाद, तेलंगणा👤 आनंद यादव, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण । अठराही पुराणें हरिसी गाती ॥१॥ मंथुनी नवनीता तैसें घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्गु ॥२॥एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तू दुर्गमा न घाली मन ॥३॥ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥४॥।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••केलेल्या चांगल्या, वाईट कर्माची फळ ज्यांनी, ज्यांनी कशाप्रकारे भोगले आहेत त्यांच्याकडे बघून सुद्धा आजचा माणूस पूर्णपणे जागा होत नाही व आपल्यातील वाईट विकार सोडत नाही आणि चांगल्या विचारांना आत्मसात करत नाही. ही सत्यता नाकारता येत नाही. या भूमीवर माणूस म्हणून जन्म मिळाला आहे निदान त्या मिळालेल्या मानवी जीवनाचे कशाप्रकारे सार्थक करता येईल यासाठी थोडा प्रयत्न करून बघावा.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *राजा आणि मंत्री*एका सम्राटाला झोप येत नव्हती, ते फेरफटका मारत असताना आपल्या कक्षाबाहेर आले तर मंत्री महोदय आपल्या हिशोबाच्या वह्या काढून हिशोब तपासत आहेत असे त्यांच्या लक्षात आले. मंत्र्याच्या चेहऱ्यावर कसली तरी चिंता आहे हे महाराजांच्या अनुभवी नजरेने हेरले. महाराजांनी त्यांना या चिंतेचे कारण विचारले तेंव्हा मंत्री म्हणाले, "महाराज ! मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी कर अधिक जमा झाला आहे. पण त्याचे कारण मला समजले नाही" सम्राट म्हणाले,"अहो! हिशोबात काही चूक असेल." मंत्री म्हणाले,"हिशोब अचूक आहे. मी स्वततपासला आहे." सम्राट म्हणाले," रात्र जास्त झाली आहे. हि समस्या उद्या सकाळी सोडवा." परंतु मंत्री म्हणाला," उत्पन्न अशा प्रकारे वाढणे साम्राज्यासाठी चिंतेचे कारण आहे. कराची कमतरता सहन करणे शक्य आहे पण अन्यायाची एक पै तिजोरीत जास्त आली तर तिच्यामुळे साम्राज्याला तळतळाट लागू शकतो. महाराज ! कुणा गरीबाचा तळतळाटाचा पैसा चुकून जरी आपल्या तिजोरीत पडला तर तुम्हाला आणि मला आपल्या दोघांना आवडणार नाही. यामुळे मी तो हिशोब तपासत आहे." आता सम्राटही गंभीर झाला आणि मंत्राच्या समोर बसला. बराच वेळ विचार केल्यावर मंत्री म्हणाला ,"महाराज! उन्हाळा जास्त झाल्याने नदीची पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे काठावरच्या जमिनीला शेतकऱ्यांनी कुंपण घातले. शेतकऱ्यांनी पिके कमी घेतली पण सरकारचा कर बुडवायचा कसा? या विचाराने त्यांनी सरकारात धन जमा केले. त्यामुळे जास्त धन गोळा झाले." यावर राजा म्हणाला,"जर दुष्काळाची परिस्थिती असेल तर त्या गरीब शेतकऱ्यांनी जमा केलेला कर आपल्या तिजोरीमध्ये ठेवून मला पापाचा धनी व्हायचे नाही. गरीब शेतकऱ्यांना शेतीसाठी मदत म्हणून तोच पैसा परत करा." सम्राटाच्या आज्ञेचे पालन करण्यात आले. पुढील वर्षी त्या राज्यात भरपूर पाऊस झाला. जनतेचे आशीर्वाद फळाला आले.*तात्पर्य :- सर्वांचे हित जाणणारा, प्रेम, आत्मीयता व कठीण प्रसंगात योग्य साथ देणारी व्यक्तीच योग्य प्रकारे सत्ता चालवू शकते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 22 ऑगस्ट 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/oUSHev1wvsCQ5Ev4/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🛑 *_ या वर्षातील २३५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🛑 *_महत्त्वाच्या घटना:_* 🛑•••••••••••••••••••••••••••••••••*१९७२: वर्णद्वेषी धोरणाबद्दल र्होडेशिया (झिम्बाब्वे) ची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीतुन हकालपट्टी करण्यात आली.**१९६२: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स द गॉल यांची हत्या करण्याचा कट फसला.**१९४४: दुसरे महायुद्ध – सोविएत युनियनने रोमानिया जिंकले.**१९४२: दुसरे महायुद्ध – ब्राझिलने जर्मनी व इटालीविरुद्ध युद्ध पुकारले.**१९४१: दुसरे महायुद्ध – जर्मन सैन्याने लेनिनग्राडला वेढा घातला.**१९०२: कॅडिलॅक मोटर कंपनीची स्थापना**१८४८: अमेरिकेने न्यू मेक्सिको हा प्रांत ताब्यात घेतला.* 🛑 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*🛑 •••••••••••••••••••••••••••••••••*१९८६: अविनाश सचदेव -- भारतीय अभिनेता* *१९८५: देवोलिना भट्टाचार्जी -- भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री* *१९८४: मंगेश पुंडलिक जनबंधू -- लेखक**१९८४: प्रज्ञा सदाशिव वझे -- लेखिका**१९६६: विजयकुमार मेश्राम -- लेखक, कवी* *१९६६: प्रा. डॉ. प्रल्हाद वावरे -- लेखक, समीक्षक, संपादक* *१९६५: महेंद्र सीतारामजी गायकवाड-- लेखक, कवी* *१९६४: मॅट्स विलँडर – स्वीडीश टेनिस खेळाडू**१९६२: सुनील महादेव सावंत -- कवी, लेखक**१९५८: मानसी मागीकर -- मराठी अभिनेत्री* *१९५५: सुरेश मारोतराव आकोटकर -- प्रसिद्ध कथाकार* *१९५५: चिरंजीवी – सुप्रसिद्ध अभिनेते* *१९५४: खुशालदास तुकारामजी कामडी -- कवी, गीतकार* *१९५४: माणिकराव गोविंदराव ठाकरे -- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यमंत्री* *१९५१: अशोक कोठावळे -- मॅजेस्टिक' प्रकाशनाचे प्रमुख**१९४८: कंवरजीत पेंटल -- भारतीय अभिनेता आणि विनोदी कलाकार* *१९४७: उज्ज्वल वामनराव कुलकर्णी -- कथाकार**१९४६: सुधीर शंकर सुखठणकर -- प्रसिद्ध विनोदी लेखक**१९४६: प्रल्हाद सोनवणे -- लेखक**१९४६: मा. विकास शिरपूरकर -- सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती**१९४२: डॉ. भवान महाजन -- लेखक**१९३५: पंडित गोपीकृष्ण – कथ्थक नृत्यशैलीचे बनारस घराण्याचे नर्तक, नृत्यदिग्दर्शक व अभिनेते.(मृत्यू: १८ फेब्रुवारी १९९४ )**१९३४: अच्युत पोतदार -- भारतीय अभिनेते, ज्यांनी १२५ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे**१९२६: एन. सी. सिप्पी -- भारतीय चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक (मृत्यू: २५ नोव्हेंबर २००१ )**१९२५: गणपत दत्तोबा बारवाडे -- कथा कादंबरी व नाट्य लेखक**१९२२: इंदुमती श्रीपाद केळकर -- कादंबरी व चरित्र लेखिका**१९२०: नारायण यशवंत देऊळगावकर (अण्णासाहेब) -- पटकथालेखक (मृत्यू: ३ जून २००८ )**१९२०: डॉ. डेंटन कूली – ह्रुदयरोपण शस्त्रक्रियेचा पाया घालणारे अमेरिकन शल्यविशारद**१९१९: गिरीजाकुमार माथूर – हिन्दी कवी (मृत्यू: १० जानेवारी १९९४ )**१९१८: डॉ.बानू कोयाजी – कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात सलग साठ वर्षे कार्य करणार्या सामाजिक कार्यकर्त्या. त्यांना पद्मभूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार (मृत्यू: १५ जुलै २००४ )**१९१६: मधुकर रामराव यार्दी-- पूर्व केंद्रिय वित्त सचिव,संस्कृत अभ्यासक (मृत्यू: २० ऑगस्ट २००१ )**१९१५: शंभू मित्रा – बंगाली रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक व नाटककार (मृत्यू: १९ मे १९९७ )* 🛑 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🛑 ••••••••••••••••••••••••••••••••• *२०१४: उडुपी राजगोपालाचार्य अनंतमूर्ती -- कन्नड भाषेतील भारतीय समकालीन लेखक आणि समीक्षक( जन्म: २१ डिसेंबर १९३२ )**२००१: शरद तळवलकर -- चित्रपटांतील अभिनेते (जन्म: १ नोव्हेंबर १९१८ )* *१९९९: सूर्यकांत मांडरे – मराठी चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते, पद्मश्री (१९७३).(जन्म: २ जून १९२६ )**१९९५: पंडित रामप्रसाद शर्मा – संगीतकार, ट्रम्पेट व व्हायोलिनवादक. ‘लक्ष्मीकांत-प्यारेलाल‘ या जोडीतील प्यारेलाल यांचे ते वडील होत.* *१९८९: पं. कृष्णराव शंकर पंडित – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक. राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी त्यांचा ’राष्ट्रीय गायक’ म्हणून गौरव केला होता.(जन्म: २६ जुलै १८९३ )**१९८२: एकनाथजी रामकृष्ण रानडे – क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक व कन्याकुमारी येथील विवेकानंद शिला स्मारकाचे शिल्पकार. (जन्म: १९ नोव्हेंबर १९१४ )**१९८०: किशोर साहू -- चित्रपट अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक बँकॉक विमानतळावर विमानात चढत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन (जन्म: २२ नोव्हेंबर १९१५ )**१९७८: जोमो केन्याटा – केनियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म: २० आक्टोबर १८९३ )**१९७०: डॉ. मुरलीधर गजानन पानसे -- लेखक, संशोधक, संपादक (जन्म: ९ सप्टेंबर १९१८ )**१९७०: विठ्ठल गोपाळ खोबरेकर -- लेखक, पुराभिलेख संशोधक, संपादक(जन्म: २० जुलै१९२३ )**१८१८: वॉरन हेस्टिंग्ज – भारताचा पहिला गव्हर्नर जनरल (जन्म: ६ डिसेंबर १७३२ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मोठं मन*..... पूर्ण कविता वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *विमानतळावर पोलंड सरकारचे प्रतिनिधी लष्कर प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे केले स्वागत*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यातल्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिले जातील हेक्टरी पाच हजार रुपये*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्याच्या विकासात सहकार आणि शिक्षण क्षेत्राचं मोठं योगदान - उपमुख्यमंत्री अजित पवार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्ड मध्ये सलग दुसऱ्या वर्षी A+ ग्रेड मिळाल्याबद्दल RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *हमीभाव कायदा करा अन्यथा देशव्यापी संप पुकारू 250 पेक्षा जास्त शेतकरी संघटनेच्या नेत्यांचा सरकारला इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पाकिस्तान व बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तान 4 गडी बाद 158 धावा केल्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्रावण महिन्यातील आहारश्रावण महिन्यात फळांचे सेवन जरूर करा. दररोज कमीत कमी एक वाटी फळं खाल्ल्याने तुमचा अशक्तपणा तर दूरच राहतो, पण तुमचे शरीर दिवसभर ऊर्जावान राहते. अशा परिस्थितीत सफरचंद, केळी, द्राक्षे, डाळिंब आणि पपई हे चांगले पर्याय आहेत. भरपूर फायबर असल्याने या गोष्टी खाल्ल्याने तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते.संध्याकाळी उपवास सोडताना तुम्ही तुमच्या आहारात मूठभर सुक्या मेव्याचाही समावेश करू शकता. त्यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि अनेक पोषक घटक असतात, जे तुम्हाला थकवा आणि अशक्तपणापासून वाचवण्यात मोठी भूमिका बजावतात. अशा परिस्थितीत तुम्ही काजू, बदाम, अक्रोड आणि अंजीर यासारख्या गोष्टींचे सेवन करू शकता.उपवासात साबुदाणा खूप आवडतो. त्याच्या मदतीने, तुम्ही चविष्ट पदार्थ तयार करू शकत नाही. या साबुदाण्यात फायबर आणि अनेक आवश्यक पोषक तत्वांचे भांडार देखील आहे. संध्याकाळी उपवास सोडताना तुम्ही त्याची खिचडी किंवा कमी तेलात केलेली टिक्कीही खाऊ शकता.उपवास दरम्यान सर्वात लोकप्रिय पदार्थांपैकी एक म्हणजे शिंगाड्याचे पदार्थ. याचे सेवन केल्याने केवळ चयापचय वाढतो असे नाही, तर ऑक्सिडेटिव्ह तणावापासूनही तुमचे संरक्षण होते. हे खाल्ल्याने शरीराला अनेक आवश्यक अँटीऑक्सिडंट्स मिळतात आणि पचनसंस्थाही निरोगी राहते.श्रावण मासात उपवासाच्या वेळी तुम्ही तुमच्या आहारात नारळाचाही अनेक प्रकारे समावेश करू शकता. शरीराला हायड्रेट ठेवण्यासोबतच जेवणाची चवही वाढवते आणि याच्या सेवनाने पोट दीर्घकाळ भरलेले राहते.या गोष्टी टाळा -श्रावण महिन्यात जास्त मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. यामुळे केवळ पोटात जळजळ आणि ॲसिडिटी होत नाही तर रक्तदाबही वाढू शकतो. याशिवाय तुम्ही जास्त कार्ब असलेल्या पदार्थांचे सेवन टाळावे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••" वाचनाने मनुष्याला आकार येतो, सभेमुळे तो प्रसंगावधानी, तत्पर होतो आणि लिखाणामुळे तो सर्वांगिण होतो."*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) संयुक्त राष्ट्रामध्ये भारताचे राजदूत व स्थायी प्रतिनिधी म्हणून कोणाची निवड झाली आहे ?२) कोणता देश प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घालणारा पहिला देश ठरला आहे ?३) राज्यघटनेतील कितव्या अनुच्छेद नुसार केवळ एकाच जागेवर खासदार म्हणून राहता येते ?४) 'नगर' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर कोणते आहे ? *उत्तरे :-* १) हरीश पर्वतनेनी २) न्युझीलंड ३) अनुच्छेद १०१ ४) शहर, पूर, पुरी ५) किली मांजरो, उंची - ५८९५ मी.*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शंकरराव हामद, केंद्रप्रमुख, बिलोली👤 शंकर गंगूलवार, धर्माबाद👤 आशिष देशपांडे, पत्रकार, कुंडलवाडी👤 नागराज येम्बरवार, किनवट👤 शिवा गैनवार, धर्माबाद👤 कु. पूजा गुरुपवार, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥ हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा।पुंण्याची गणना कोण् करी ॥२॥असोनि संसारीं जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥ ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवांघरीं ॥४॥।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मन हे, हवे पेक्षा वेगवान तसेच चंचल असते,असे अनेकजण म्हणतात. कदाचित हे खरे असू शकते म्हणूनच आपण एका जागी असताना सुद्धा मन आपल्याला एका क्षणात कोसोदूर घेऊन जात असते फिरवून आणत असते. पण,एक गोष्ट अवश्य लक्षात ठेवावी प्रत्येक वेळी आपले मन चांगल्याच मार्गाने नेईलच असेही नाही म्हणून जरा त्यापासून थोडे सावधगिरी बाळगावी. ते आपल्यासाठी व इतरांसाठी सुद्धा भल्याचे राहील.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*करढोक व मासे*-करढोक नावाचा एक पक्षी नदीकाठी राहून व पाण्यात बुड्या मारून मासे धरून खातो. या जातीचा एक पक्षी म्हातारा झाल्याने त्याला पाण्यातले मासे दिसेनासे झाले. त्यामुळे काहीतरी ढोंग करून आपला चरितार्थ चालवण्याचा त्याने विचार केला, 'तो ज्या कालव्याजवळ बसला होता, त्यातला एक मासा पाण्याच्या पृष्ठभागावर आला असता, तो म्हातारा करढोक त्याला म्हणाला, 'अरे, तुला तुझ्या स्वतःच्या नि तुझ्या भाऊबंदांच्या जिवाबद्दल जर थोडी-बहुत काळजी वाटत असती तर कालव्याचा मालक एकदोन दिवसात कालव्यातलं सगळं पाणी बाहेर सोडणार आहे, याकरता तुम्ही आपले जीव वाचविण्यासाठी काहीतरी उपाय करा.' हे ऐकून तो मासा पाण्याच्या तळाशी गेला आणि सगळ्या माशांची सभा भरवून तो करढोकाचा निरोप त्याने सांगितला. तो ऐकताच आपल्यावर येणार्या संकटाची सूचना देणार्या त्या करढोकाचे आभार मानण्याचा व या संकटातून मुक्त होण्यासाठी उपाय सुचविण्याविषयी त्याला विनंती करण्याचा ठराव त्यांनी केला व तो त्या करढोकास कळविण्याचे काम त्या निरोप घेऊन येणार्या माशावर सोपविले. त्याप्रमाणे त्याने करढोकास जाऊन आपला ठराव त्याला कळविला. तो ऐकताच करढोक त्याला म्हणाला, 'या संकटातून वाचण्याचा एकच मार्ग आहे. तुम्ही सर्वांनी पाण्याच्या पृष्ठभागावर यावं म्हणजे मी तुम्हाला माझ्या घराशेजारच्या तलावात नेऊन पोहचवीन. ती गोष्ट माशांनी कबूल केली. मग करढोकाने त्यांना एका उथळ पाण्याच्या तलावात नेऊन सोडले व थोड्याच दिवसात त्या सर्वांना गट्ट केले.*तात्पर्य*-शत्रूच्या गोड शब्दावर विश्वास ठेवून त्याच्या जाळ्यात सापडणे हा मूर्खपणा होय.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 20 ऑगस्ट 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/VHe5kDQz9RVFcAy1/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••☀️ *_सदभावना दिन_* ☀️••••••••••••••••••••••••••••••••• ☀️ *_अक्षय ऊर्जा दिवस_* ☀️•••••••••••••••••••••••••••••••••☀️ *_ या वर्षातील २३३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• ☀️ *_महत्त्वाच्या घटना:_* ☀️•••••••••••••••••••••••••••••••••*२००८: भारताचा कुस्तीगीर सुशीलकुमार याला बिंजिंग ऑलिंपिकमध्ये ब्राँझ पदक मिळाले.**१९८८: इराण इराक युद्ध – सुमारे ८ वर्षांच्या युद्धानंतर युद्धबंदी करार झाला.**१९६०: सेनेगलने आपण (मालीपासुन) स्वतंत्र असल्याचे जाहीर केले.**१९४१: दुसरे महायुद्ध – फ्रान्समधील भुमिगत चळवळ उखडून काढण्याच्या उद्देशाने जर्मनांनी एका दिवसात ५० हजार नागरिकांना अटक केली**१९२०: डेट्रॉइट, मिशिगन येथे जगातील पहिले व्यावसायिक नभोवाणी केंद्र सुरू झाले.**१९१४: पहिले महायुद्ध – जर्मन फौजांनी ब्रुसेल्स शहराचा ताबा घेतला.**१८९७: सर रोनाल्ड रॉस यांनी (भारतात) हिवतापाच्या जीवाणूचा शोध लावला. आल्मोडा येथे मलेरियावर केलेल्या संशोधनासाठी त्यांना १९०२ मध्ये नोबेल पुरस्कार देण्यात आला.**१८२८: राजा राम मोहन रॉय यांनी महाराजा द्वारकानाथ टागोर (ठाकूर), कालिनाथ रॉय आणि मथुरानाथ मलिक या तीन मित्रांच्या साहाय्याने कोलकाता यथे ब्राम्हो सभेची स्थापना केली. या सभेलाच पुढे 'ब्राम्हो समाज’ म्हणू लागले.*☀️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ☀️ •••••••••••••••••••••••••••••••••*१९८३: दत्तात्रय भानुदास जाधव (दत्ता जाधव) -- लेखक**१९७६: रणदीप हुडा -- भारतीय अभिनेता**१९६६: शुभंकर बॅनर्जी -- फारुखाबाद परंपरेतील भारतीय संगीतकार आणि तबला वादक(मृत्यू:२५ऑगस्ट २०२१)**१९६४: दीपक गणपतराव ढोले -- कवी, लेखक**१९६३: डॉ. आनंद देशपांडे -- प्रसिद्ध लेखक**१९५९: सरोज शरद भरभडे -- प्रसिद्ध लेखिका**१९५२: प्रा. विश्वास प्रभाकरराव वसेकर -- लेखक, कवी, संपादक, बालकुमार साहित्य चळवळीतील कार्यकर्ते* *१९४६: एन. आर. नारायण मूर्ती – ’इन्फोसिस’चे सहसंस्थापक**१९४५: चंद्रकांत संतराम मस्के -- प्रसिद्ध कवी (मृत्यू: २० मे २०२१)**१९४४: सलमा बेग (बेबी नाझ) -- भारतीय अभिनेत्री (मृत्यू: १९ ऑक्टोबर १९९५ )**१९४४: राजीव गांधी – भारताचे ६ वे पंतप्रधान,भारतरत्न (१९९१) मरणोत्तर (मृत्यू: २१ मे १९९१ )**१९४२: जगदीश अभ्यंकर -- प्रसिद्ध लेखक (मृत्यू: ५ एप्रिल २००१ )**१९३७: प्रतिभा पंढरीनाथ रानडे -- प्रसिद्ध कथाकार, कादंबरीकार**१९२३: शांता विनायक परांजपे -- चरित्र लेखिका**१९२२: प्रभाकर गोविंद अत्रे -- कथा, कादंबरीकार**१९१९: विष्णू श्रीधर जोशी -- मराठी लेखक आणि इतिहाससंशोधक (मृत्यू: २५ एप्रिल २००१ )**१९१५: पांडुरंग (पांडबा) गोपाळ जाधव -- नाट्यलेखक* *१८३३: बेंजामिन हॅरिसन – अमेरिकेचे ३३वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १३ मार्च १९०१ )**१७७९: जेकब बर्झेलिअस – स्वीडीश रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: ७ ऑगस्ट १८४८ )* ☀️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ☀️••••••••••••••••••••••••••••••••• *२०१३: डॉ. नरेन्द्र दाभोळकर -- विज्ञानवादी, समाजसुधारक, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, थोर समाजवादी विचारवंत व साधना साप्ताहिकाचे संपादक ( जन्म: १ नोव्हेंबर १९४५ )**२०१३: जयंत साळगावकर –मराठी ज्योतिषतज्ज्ञ, लेखक, पत्रकार व उद्योजक (जन्म: १ फेब्रुवारी १९२९ )**२००१: मधुकर रामराव तथा एम. आर. यार्दी – प्राच्यविद्येचे गाढे अभ्यासक, केंद्रीय वित्त सचिव, भारतीय विद्या भवनच्या पुणे केंद्राचे अध्यक्ष (जन्म: २२ऑगस्ट१९१६ )**२०००: प्राणलाल मेहता – चित्रपट निर्माते (किनारा, किताब, बेजुबान, मरते दम तक, पुलिस पब्लिक )* *१९९७: प्रा.चंद्रहास जोशी -- लेखक (जन्म: १९२७ )**१९९७: प्रागजी डोस्सा – गुजराथी नाटककार व लेखक, नेहरू पुरस्कार व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते (जन्म: ७ आक्टोबर १९०७ )**१९८८: माधवराव शिंदे – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व संकलक. ’कन्यादान’, ’धर्मकन्या’ या त्यांच्या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले तर ’शिकलेली बायको’ या चित्रपटाला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला.(जन्म: ३ आक्टोबर १९१७ )**१९८५: अकाली दलाचे अध्यक्ष हरचंदसिंग लोंगोवाल यांची शेरपूर येथे एका गुरूद्वारात गोळ्या घालुन हत्या करण्यात आली. (जन्म: २ जानेवारी १९३२ )**१९८४: अविनाश व्यास -- गुजराती चित्रपटांचे भारतीय संगीतकार, गीतकार आणि गायक(जन्म: २१ जुलै १९१२ )**१९८४: रघुवीर भोपळे ऊर्फ ’जादूगार रघुवीर’ – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जादूगार (जन्म: २४ मे १९२४ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*श्रद्धा आणि अंधश्रद्धा*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी २३ ऑगस्टला युक्रेनला जाणार, ३० वर्षानंतर भारतीय पंतप्रधान करणार दौरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मराठा आरक्षण कायद्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोलाची भूमिका - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *आमदार भावना गवळी यांनी बांधली पंतप्रधान मोदींना राखी, मोदी देशातील कोट्यवधी बहिणींचे भाऊ असल्याची प्रतिक्रिया*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *काश्मीरच्या उधमपूर येथे अतिरेक्यांना घेरुन मारताना केंद्रीय राखीव पोलीस दलाचा अर्थात सीआरपीएफचा निरीक्षक हुतात्मा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पॅरिस येथे आयोजित पॅराऑलिम्पिक स्पर्धेतल्या सहभागी खेळाडूंशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधून दिल्या शुभेच्छा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अर्ध्या तासाच्या पावसाने नाशिक जलमय, पुण्यातही जोरदार हजेरी; यवतमाळमध्ये दुचाकी गेली वाहून*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *तीन दिवसात 40 विकेट्स, द. आफ्रिकेकडून वेस्ट इंडिजचा धुव्वा, द. आफ्रिकेचा सलग 10 कसोटी मालिकामध्ये वेस्ट इंडिजवर विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *रेणू* 📙 मूलद्रव्याच्या लहानात लहान कणाला अणू म्हणतात. अणूची रचना काहीशी सूर्यमालेसारखी असते. अणूचे बहुतेक सर्व वस्तुमान अणूकेंद्रात असते. धनविद्युतभारित प्रोटॉन आणि तेवढ्याच वस्तुमानाचे पण विद्युतभार नसलेले न्यूट्रॉन यांनी अणुकेंद्र बनते. त्याच्याभोवती विविध कक्षांत इलेक्ट्रॉन घिरट्या घालीत असतात. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन यांची संख्या समान म्हणून अणू मात्र विद्युतभाराच्या दृष्टीने किंवा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो.चांदी, सोने इत्यादी अशा प्रकारची धातूरूप मुलद्रव्ये वगळता सृष्टीतील बाकी सर्व पदार्थ हे रेणूंनी बनलेले असतात. रेणू म्हणजे दोन किंवा अधिक अणू एकत्र गुंफून झालेली रचना. ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन ही मुलद्रव्ये त्यांच्या रेणूंची बनलेली असतात. त्यांच्या प्रत्येक रेणूत दोन अणू असतात. पाणी हे संयुग. ऑक्सिजनचा एक अणू आणि हायड्रोजनचे दोन अणू एकत्र आले की, पाण्याचा एक रेणू बनतो. नित्याच्या आढळतील बहुसंख्य पदार्थ संयुग स्वरूपातच असतात. शिवाय अनेक मुलद्रव्येही त्यांच्या रेणूंचीच बनलेली असल्यामुळे आपल्या पर्यावरणातील सारे विश्व रेणूंचे बनले आहे असे म्हणता येईल.रेणूंचे काही गुणधर्म विलक्षण आहेत. ऑक्सिजन आणि हायड्रोजन एकत्र येऊन बनणाऱ्या पाण्याचे गुणधर्म त्याच्या घटक मूलद्रव्यांच्या गुणधर्माहून किती वेगळे ! साखर तर हायड्रोजन, ऑक्सिजन आणि कार्बन यांनी बनते. परीक्षानळीत साखर तापवली की खाली काळा साका आणि नळीच्या तोंडाशी पाण्याचे बारीक थेंब मिळतात. कितीतरी प्रकारचे अणू एकत्र येऊन प्रचंड रेणू बनू शकतात. अमिनो आम्ले, प्रथिने, डीएनए हे सर्व गुंतागुंतीच्या रचनांचे रेणूच आहेत. मात्र तरीही रेणू खूप लहान असतो, हे विसरायचे नाही. घोटभर पाण्यात सहावर तेवीस शून्य इतके रेणू असतात !असे असंख्य रेणू एकत्र येऊन पदार्थ बनतो. हे रेणू एकमेकांशी कसे गुंफलेले आहेत, यावर पदार्थाचे भौतिक गुणधर्म ठरतात. गुंफण घट्ट असेल, तर पदार्थ घन असतो. अगदी शिथिल असेल, तर द्रवरूप आणि प्रत्येक रेणू सुटा असेल तर पदार्थ वायुरूप असतो. रेणूची हालचाल तापमानावर अवलंबून असल्याने उष्णता देऊन पदार्थ वितळता येतो आणि द्रवाचे वायूत रूपांतर करता येते.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्यांना अन्यायाकडे डोळे झाक करायची सवय असते. त्यांना प्रकाशाची कुस कधीच कुरवाळता येत नाही. - बाबा आमटे*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी* कोणता ?२) 'हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे' ह्या गीताचे रचनाकार कोण ?३) प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घालणारे पहिले राज्य कोणते ?४) 'धनुष्य' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) भालाफेकपटू नीरज चोप्रा हा कोणत्या राज्यातील खेळाडू आहे ? *उत्तरे :-* १) हरियाल २) सेनापती बापट ३) हिमाचल प्रदेश ४) चाप, कोदंड, धनू, तीरकमठा ५) हरियाणा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 हरीश बुटले, संस्थापक व अध्यक्ष, डीपर, पुणे👤 इरेश्याम झंपलकर, शिक्षक, बिलोली👤 महेश कुडलीकर, साहित्यिक, देगलूर👤 विजय दिंडे, शिक्षक, धर्माबाद👤 गणेश येवतीकर, येवती, धर्माबाद👤 साई मोहन👤 विवेक सारडे👤 दीपक पाटील👤 सतीश दिंडे👤 कांतीलाल घोडके👤 प्रमोद मुधोळकर👤 जयपाल दावणगीरकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन यौवन राजमद अविचल रहा न कोई।जा दिन जाये सत्संग में जीवन का फल सोए॥ 50॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येकांपाशी बळ असते. मग ते बळ पैशाचे असो किंवा जबरदस्त संगतीचे असो किंवा अफाट धन संपत्तीचे. त्या बळामुळे माणूस मनाप्रमाणेच सर्वच काही कमावू शकतो, वाटू शकतो. पण, ज्याच्याकडे खऱ्या दर्जेदार शब्दांची व सत्य समजून घेण्याची ताकद असते ती ताकद मात्र ह्या सर्व, व्यर्थ ताकद पेक्षा कितीतरी महान असते. ही ताकद पैशाने विकत मिळत नाही तर संघर्षातून अनुभव आल्यानेच येत असते. म्हणून तिचा उपयोग चांगल्या कार्यासाठी करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मासा आणि हंस*एका सरोवरात एक मासा राहत होता. तिथेच एक हंस येत असे. त्या दोघांची घनिष्ट मैत्री होती. दोघेही एकमेकांशी भरपूर गप्पा मारत असत. रात्र झाल्यावर मासा सरोवराच्या तळाला जात असे तर हंस जवळच्या झाडावर झोपत असे. सकाळ झाल्यावर हंस कुठेतरी जात असे आणि परत माशाला भेटावयास येत असे. एकेदिवशी माशाने हंसाला विचारले,"तू रोज सकाळी इथून उडून जातो हे मी पाहतो. पण तू कुठे जातो हे तू मला कधीच सांगितले नाहीस" हंस म्हणाला,"अरे मित्रा ! मी समुद्राकडे जात असतो. कारण समुद्रात भरपूर शिंपले असतात. त्या शिंपल्यातून निघणारे मोती मला हवे असतात. कारण माझे अन्नच मोती आहे. मी हंस आहे मी फक्त मोतीच खातो. त्यामुळे मला रोजच समुद्रावर जावे लागते." हे ऐकून मासा म्हणाला,"मित्रा ! मलाही एकदा समुद्र बघायचा आहे." मित्राची अशी इच्छा पाहून हंस म्हणाला,"येथून थोडे पुढे गेल्यावर एक नदी आहे, ती समुद्राला मिळते, तू त्या पोहोच." त्यावर्षी प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, सरोवराचे पाणी जावून नदीला मिळाले तसा मासाही नदीच्या पाण्यात पोहोचला. नदीचा प्रवाह फार जोरात असल्याने मासा अतिशय वेगाने समुद्राकडे वाहून गेला. माशाला समुद्रात त्याच्यासारखेच लाखो मासे दिसले, पण कुणीच तो आल्याची न दखल घेतली न कुणी बोलले. तो त्या समुद्रात एकटा पडला.त्याला राहून राहून आपल्या हंस मित्राची आठवण येत होती. पण आता पर्याय नव्हता. तेथून परतणे शक्यच नव्हते आणि आलेल्या प्रसंगाला तोंड देणे हेच त्याच्या प्रारब्धात लिहिले होते.*तात्पर्य*मोठ्या गोष्टी मिळवण्याच्या नादात आपण आपल्याला आनंद देणाऱ्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. त्याने आपल्याला मोठ्या गोष्टीही मिळत नाहीत आणि छोट्या गोष्टी आपण सोडलेल्या असतात.📚📚📚📚📚📚📚📚📚•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 19 ऑगस्ट 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/LnKSErtU13Su99ME/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔵 *_जागतिक छायाचित्रण दिन_* 🔵••••••••••••••••••••••••••••••••🔵 *_ या वर्षातील २३२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🔵 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔵•••••••••••••••••••••••••••••••••*१९९९: बेलग्रेड, युगोस्लाव्हिया येथे हजारो सर्बियन लोकांनी राष्ट्राध्यक्ष स्लोबोदान मिलोसेव्हिच यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन केले.**१९४५: हो ची मिन्ह व्हिएतनामच्या सत्तेवर आले.**१९१९: अफगाणिस्तानला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९०९: इंडियानापॉलिस मोटर स्पीडवे येथे मोटारींची पहिली शर्यत झाली.**१८५६: गेल बॉर्डन या शास्त्रज्ञाला दुधाच्या शीतकरण प्रक्रियेचे पेटंट मिळाले.* 🔵 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🔵•••••••••••••••••••••••••••••••••*१९९८: आकाश हरिभाऊ भोरडे -- कवी, लेखक**१९८९: शेल्डन कॉट्रेल -- वेस्ट इंडीजचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट**१९८३: जगदीशचंद्र शरदचंद्र पाटील-- लेखक, निर्माता, व्याख्याते**१९८०: सुनील प्रभाकर पांडे -- प्रसिद्ध मराठी लेखक* *१९७२: पंडित कल्याणजी गायकवाड -- गायक व संगीतकार**१९७२: मोहन कुंभार -- लेखक कवी* *१९७१: उत्तम निवृत्ती सदाकाळ -- लेखक कवी**१९७०: विठ्ठल बापूराव भोसले -- लेखक**१९६५: किसन एकनाथ पिसे -- लेखक, कवी**१९६५: हेमंत बिर्जे -- भारतीय अभिनेता**१९५९: प्रा. रेखा अशोक कुलकर्णी -- कवयित्री, लेखिका संपादिका* *१९५६: प्रा. डॉ. राजकुमार पुरुषोत्तम खर्चे -- कवी, लेखक**१९५५: डॉ. अशोक नरहरराव देव -- लेखक, संपादक* *१९५०: पंडित चंद्रकांत लिमये -- भारतातील हिंदूस्थानीशास्त्रीय गायक**१९५०: सुधा कुळकर्णी-मूर्ती -- प्रसिद्ध भारतीय सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका* *१९४६: बिल क्लिंटन – अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष**१९४६: प्रा. मधुकर गोपाळ देशपांडे -- मराठवाड्यातील सुप्रसिद्ध साहित्यिक**१९४३: शरद सांभराव देऊळगावकर -- मराठवाड्यातील सुप्रसिद्ध लेखक* *१९२२: बबनराव नावडीकर (मूळ नाव: श्रीधर यशवंत कुलकर्णी) -- मराठी गायक, कवि, लेखक व कीर्तनकार (मृत्यू: २८ मार्च २००६ )**१९१८: शंकरदयाळ शर्मा – भारताचे ९ वे राष्ट्रपती व ८ वे उपराष्ट्रपती (मृत्यू: २६ डिसेंबर १९९९ )**१९०८: उस्ताद अब्दुल रशीद खान -- हिंदुस्थानी संगीताचे भारतीय गायक (मृत्यू: १८ फेब्रुवारी २०१६)**१९०७: हजारी प्रसाद द्विवेदी -- हिंदी कादंबरीकार, साहित्यिक इतिहासकार, निबंधकार, समीक्षक आणि अभ्यासक (मृत्यू: १९ मे १९७९ )**१९०७: सरदार स्वर्ण सिंग – माजी केन्द्रीय मंत्री (मृत्यू: ३० आक्टोबर१९९४ )**१९०६: प्राचार्य गणेश हरि पाटील -- प्रसिद्ध मराठी कवी, शिक्षणतज्ज्ञ आणि बालसाहित्यिक (मृत्यू: १ जुलै १९८९ )**१९०५: वामन भार्गव पाठक -- कवी, कादंबरीकार, समीक्षक (मृत्यू: २७ जानेवारी १९८९ )**१९०३: गंगाधर देवराव खानोलकर – लेखक व चरित्रकार, ‘अर्वाचीन मराठी वाड़्मय सेवक’ या कोशाचे सात खंड त्यांनी प्रकाशित केले. (मृत्यू: ३० सप्टेंबर १९९२ )**१८८६: मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर – स्वातंत्र्यसैनिक, टिळकांच्या विचारसरणीचे मध्य प्रांताचे नेते,वकील (मृत्यू: २ जानेवारी १९३५ )* 🔵 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🔵•••••••••••••••••••••••••••••••••*२०२०: डॉ. मधुकर अनंत मेहेंदळे -- पारशी धर्मग्रंथाचे अभ्यासक, प्रकांड पंडित (जन्म : १४ फेब्रुवारी १९१८ )**२०१९: खय्याम (मोहम्मद जहूर खय्याम हाश्मी) -- भारतीय चित्रपटांचे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक (जन्म: १८ फेब्रुवारी १९२७ )**२०१९: प्रा. मोतीराज राठोड -- विमुक्त भटक्या चळवळीचे लढवय्ये नेतृत्व, अभ्यासक, साहित्यिक, संशोधक( जन्म: २ सप्टेंबर १९४७ )* *१९९४: लिनस कार्ल पॉलिंग – रसायनशास्त्रज्ञ आणि अण्वस्त्रांच्या विरोधात लढणारे सामाजिक कार्यकर्ते, नोबेल पारितोषिकाचे दोनदा विजेते [१९५४ - रसायनशास्त्र, १९६२ - शांतता] (जन्म: २८ फेब्रुवारी १९०१ )**१९९३: उत्पल दत्त – रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही माध्यमात आपला ठसा उमटवणारे कलाकार (जन्म: २९ मार्च १९२९ )**१९९०: रा. के. लेले – पत्रकार, संशोधक आणि मराठी वृत्तपत्रांच्या इतिहासाचे लेखक**१९८५: श्रीकृष्ण दामोदर पानवलकर -- प्रभावी कथाकार (जन्म: १३ फेब्रुवारी १९२८)**१९७५: डॉ. विनायक विश्वनाथ तथा ’अप्पासाहेब’ पेंडसे – शिक्षणतज्ञ, देशभक्त, तत्त्वज्ञ, कुशल संघटक, लेखक, पत्रकार आणि ’ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक (जन्म: १७ ऑगस्ट १९१६ )**१९४७: विनायक दामोदर कर्नाटकी ऊर्फ ’मास्टर विनायक’ – अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते. त्यांनी २२ चित्रपटातून भूमिका केल्या तर २९ चित्रपट दिग्दर्शित केले.(जन्म: १९ जानेवारी१९०६ )**१६६२: ब्लेझ पास्कल – फ्रेन्च गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ (जन्म: १९ जून १६२३ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*वडील ही वात्सल्यसिंधू*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा, 25 ऑगस्ट रोजी जळगावमध्ये लखपती दीदी कार्यक्रम*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महिलांचा आत्मसन्मान वाढविला तर राज्याचा विकास होतो, देश पुढे जातो - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पंढरपूरला जाणारी रेल्वे आटपाडीमार्गेच जाईल, दिल्लीत प्रयत्न ; खासदार विशाल पाटलांचा भरसभेत शब्द*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शिवप्रतिष्ठानकडून सांगली जिल्ह्यात 25 ऑगस्ट रोजी बंदची हाक; संभाजी भिडेंकडून घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *भाविकांना आषाढीतही मिळणार केवळ 2 तासात दर्शन, 110 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचं निधन, संरक्षणमंत्र्यांकडून श्रद्धांजली*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्सची मोठी घोषणा, क्रिकेटमधून अचनाक घेतला ब्रेक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *वावटळ* 📙 *****************फार मोठ्या प्रदेशावर पसरलेल्या, अनेक दिवस हिंडत धुमाकूळ घालणाऱ्या चक्रीवादळापेक्षा वावटळ कधीकधी अधिक विध्वंस घडवून आणते. हरिकेन वा टायफून याही नावाने ओळखल्या जाणाऱ्या या वादळी प्रकाराला आपण 'वावटळ' म्हणतो. वावटळीचेसुद्धा एक केंद्र असतेच. या केंद्राभोवती प्रचंड वेगाने फिरणारे वारे घोंगावतात, त्यावेळी मध्ये सापडणाऱ्या कशाचीच धडगत नसते. चक्रीवादळाचा वेग बहुधा मोजता येतो, सांगता येतो; पण वावटळीत अनेकदा वेग मोजायची यंत्रे पार मोडून जातात. ब्युफोर्ट स्केल या प्रकारात बारा हा आकडा सर्वात धोकादायक समजला जातो. या पद्धतीने वाऱ्याचा वेग हे स्केल दाखवते. वावटळ येणार आहे वा येऊन गेली म्हणजे हा बाराचाच आकडा व्यक्त करायची पद्धत पडली आहे. अंदाजे अडीचशे ते चारशे किलोमीटर वेगाने वावटळ येऊन धडकते. वावटळ निर्माण होण्याचे कारण म्हणजे समुद्रावर कमी दाबाचा पट्टा गरम हवेमुळे निर्माण होतो, हेच. या पट्टय़ाकडे धाव घेणारी हवा बाष्पही ओढून आणते. बघता बघता हे वायूचे प्रवाह वेग घेत स्वतःभोवती फिरू लागतात. सुमारे तीनशे चारशे किलोमीटर एवढ्याच प्रदेशात या घडामोडी झपाटय़ाने घडतात. वावटळीचे केंद्र पाच ते पंचवीस किलोमीटर एवढे असू शकते. वावटळ बघता बघता किनाऱ्याकडे सरकू लागते. जमीन तापल्यामुळे भर दुपारी या भागात कमी दाब असतो. सुरुवातीला ज्या किनाऱ्याकडे वावटळ जाते तेथे एकदम हवेचा दाब कमी झाल्याचे जाणवू लागते. हवेमध्ये एक प्रकारचा सन्नाटा जाणवतो आणी काही वेळातच भीषण स्वरूपात द्वारे धिंगाणा घालू घालतात. सोसाटय़ाचा, पावसाचा वारा या दरम्यान चालू असतोच. पॅसिफिकमध्ये नेहमीच वावटळी उद्धवतात. उत्तर अमेरिकेचा संपूर्ण पश्चिम किनारा वर्षाकाठी आठ दहा वेळा या वावटळींना सामोरा जातो. नांगरलेली बोट नांगर उखडून कलंडणे किंवा महाकाय लाटेबरोबर किनाऱयावर फेकली जाणे यासारखे अविश्वासार्ह गोष्ट वावटळीत सहज घडते. अमेरिकेत एका वावटळीत रस्त्यावरील मोटार उचलून गरगरत एका घराच्या छपरावर विसावली होती. रस्त्यात उघड्यावर माणसे कधी थांबतच नाहीत; पण चुकून कोणी सापडला, तर रस्त्यातल्या पाचोळ्याबरोबर तोही इकडेतिकडे भिरकावला जातो. झाडे उन्मळून पडणे, घरे पिळवटून वेडीवाकडी होणे, हेही खास वावटळीचेच तांडव. अनेकदा हे भीषण वारे स्वतःबरोबर महाकाय लाटा आणतात. कित्येक फूट उंचीच्या लाटा सारा किनारा उद्ध्वस्त करतात. हा सारा काही तासांचा खेळ आटोपला की पुन्हा आभाळ पूर्ण निरभ्र होते; जसे काही घडलेच नव्हते, असा सूर्यप्रकाश पुन्हा पडतो. अटलांटिकवरील 'हरिकेन', हिंदी महासागरातील चक्रीवादळ हेही वावटळीचेच प्रकार.आजकाल या वावटळी उपग्रहाद्वारे आधी समजू शकतात. त्यांची दिशा कळते. त्या भागातील लोकांना तातडीचे इशारे देऊन जागे करता येते. जे मच्छीमार समुद्रावर निघाले असतील, त्यांना थांबवणे व समुद्रावरील लोकांना परतायची सूचना देणे या स्थानिक रेडिओवरून तातडीने केल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत. ज्या कोणी वावटळी पाहिल्या आहेत, अनुभवल्या आहेत, त्यांना त्या विसरणे आयुष्यात कधीच शक्य होत नाही.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कला ही जीवनाची दासी आहे, तिचे कार्य जीवनाची सेवा करणे हे आहे.- रवींद्रनाथ टागोर*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) हिम बिबट्याला राष्ट्रीय चिन्ह म्हणून कोणत्या देशाने घोषित केले आहे ?२) कोळी बांधव मासेमारी करायला समुद्रात कोणत्या सनापासून सुरूवात करतात ?३) UPI पेमेंट स्वीकारणारा पहिला परकीय देश कोणता ?४) ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला ?५) प्रादेशिक भाषेत निकाल देणारे भारतातील पहिले न्यायालय कोणते ? *उत्तरे :-* १) किर्झिस्थान २) नारळी पौर्णिमा ३) भूतान ४) वाळवी ५) केरळ *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शिवकुमार टाले, मुख्याध्यापक, नांदेड👤 उत्तम सदाकाळ, बाल साहित्यिक, जुन्नर👤 मोहन शिंदे👤 प्रीती माडेकर दरेकर, यवतमाळ👤 संदीप राजे गायकवाड, मुख्याध्यापक, बिलोली👤 संतोष कडवाईकर👤 योगेश मठपती👤 मन्मथ चपळे👤 विशाल वाघमारे👤 महेश हातझडे👤 संभाजी वैराले पाटील👤 कवयित्री अंतरा*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मूल ध्यान गुरु रूप है मूल पूजा गुरु पाव।मृलनाम गुरु बचनहै सत्य मूल सत भाव॥ 49॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणामुळे कोणाचेच अडत नाही असे, अनेकदा ऐकण्यात येते. म्हणजेच कोणाचे अडत नसावे. पण जेव्हा वेळ आल्यावर कोणीच जवळ नसतात त्यावेळी मात्र ती आलेली वेळच सर्व काही सांगत असते. म्हणून गर्वाच्या भोवऱ्यात अडकून चुकीचे पाऊल उचलू नये कारण चिखलातून बाहेर काढणारे कमी दिसतात आणि त्याच खोलवर चिखलात गाडणारे जास्त मिळत असतात हे सदैव लक्षात असू द्यावा.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आयुष्याची खरी किंमत*एका नातवाने आपल्या आजोबांना प्रश्न विचारला " आयुष्याची खरी किंमत कायअसते हो ? " आजोबांनी त्याला एक दगड दिला आणि म्हणाले " ह्या अगोदर तू ह्या दगडाची खरी किंमत कळावी अशी माझी इच्छा आहे. दगडाची फक्त किंमत काढून ये, विकू नकोस. " सर्वप्रथम नातवाने एका फळवाल्याला त्या दगडाची किंमत विचारली. तो त्या चकाकणाऱ्या दगडाला बघून म्हणाला, " या दगडाचा मोबदला म्हणून मी तुला एक डझन सफरचंदे देऊ शकतो." नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला. वाटेत त्याला एक भाजीवाला दिसला आणि त्याने त्याला त्या चकाकणाऱ्या दगडाची किंमत विचारली, " मी तुम्हाला याच्या बदल्यात एक पूर्ण पोते भरून बटाटे देऊ शकतो." पुन्हा एकदा नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला. आता त्याला एका सराफाचे दुकान लागले. आत जाऊन त्याने तो चमकणारा दगड सराफाला दाखवून त्याची किंमत विचारली. आपल्या भिंगातून त्या खड्याचे निरीक्षण करताच तो सराफ उत्तरला, " या खड्यासाठी मी तुम्हाला दश लक्ष रुपये देऊ शकतो." नातवंडाला फार आश्चर्य वाटले पण नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला. थोडे पुढे आल्यावर त्याला अतिशय दुर्मिळ रत्न आणि मणी विकणारे दुकान दिसले. त्याने तो दगड तिथल्या रत्नपारख्यास दाखवला. तो रत्नपारखी ह्या विषयात अतिशय निष्णात होता. त्याने अलगद तो दगड एका मखमली कापडावर ठेवला. त्या दगडाच्या अवती भोवती प्रदक्षिणा घालत तो म्हणाला, " अहो, एवढा अमूल्य दुर्मिळ अनघड हिरा तुम्ही कुठून बरे आणला ? मी माझे अख्खे दुकान जरी विकले तरी सुध्दा ह्या हिऱ्याची किंमत तुम्हाला देऊ नाही शकणार ."आता मात्र नातू अतिशय चकित झाला आणि गोंधळलेल्या मनःस्तिथीत तो आजोबांकडे परतला. त्याचे सर्व अनुभव ऐकून आजोबा म्हणाले, " मला वाटते फळवाला, भाजीवाला, सराफ आणि रत्नपारखी ह्यांच्या उत्तरावरून तुला आयुष्याच्या मोलाविषयी कळले असेल. तुम्ही जरी अतिशय दुर्मिळ अमूल्य हिरा असलात तरी सुध्दा लोक तुमची किंमत त्यांच्या सीमित समजुती, आकलनशक्ती, हेतू आणि कुवतीनुसारच करणार." त्यामुळे आयुष्यात स्वतःची किंमत जाणून घेणे सर्वात महत्वाचे असते. स्वतःचा आदर करा. इतरांबरोबर कोण्यात्याही निरर्थक तुलने मध्ये गुंतू नका. कारण तुम्ही या विश्वातील एक अभिनव आणि अद्वितीय निर्मिती आहेत. तुमच्या सारखे फक्त तुम्हीच आहात. हीच तुमच्या आयुष्याची खरी किंमत आहे .*आपल्या सर्वांनाही स्वतःची खरी किंमत कळून स्वतःवर प्रेम करायला शिकू....*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 17 ऑगस्ट 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://m.tarunbharat.com/article/value-education-through-geography-2/1411567••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌼 *_ या वर्षातील २३० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🌼 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌼•••••••••••••••••••••••••••••••••*१९९७: उस्ताद अली अकबर खाँ यांना अमेरिकेचा ’नॅशनल हेरिटेज’ पुरस्कार जाहीर**१९८२: पहिली सी.डी. (Compact Disk) जर्मनीमधे विकण्यात आली.**१९८८: पाकिस्तानचे ६ वे राष्ट्राध्यक्ष मुहम्मद झिया उल हक आणि अमेरिकेचे पाकिस्तानातील राजदूत अर्नॉल्ड रॅफेल विमान अपघातात ठार झाले.**१९५३: नार्कोटिक्स अॅनॉनिमस या संस्थेची पहिली सभा दक्षिण कॅलिफोर्नियात झाली.**१८३६: जन्मलेल्या प्रत्येक बालकाचा जन्म नोंदवला गेलाच पाहिजे, अशी सक्ती करणारा 'रजिस्ट्रेशन ऑफ बर्थस अॅंक्ट' ब्रिटिश संसदेने मान्यता दिल्याने अमलात आला. पुढे हा सर्व ब्रिटिश वसाहतींना लागू करण्यात आला आणि १८३७ पासुन त्याची अंमलबजावणी सुरू झाली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *१९८७: स्वप्निल कोकाटे --- कवी**१९८४: अंकिता भार्गव पटेल (अंकिता करण पटेल)-- टेलिव्हिजन अभिनेत्री* *१९७८: दिशा वकानी-- भारतीय थिएटर, चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेत्री* *१९७५: बालाजी मदन इंगळे. -- मराठी कवी, कादंबरीकार* *१९७०: जिम कुरिअर – अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू**१९६८: रेखा शिरीष चवरे -- लेखिका**१९६७: सुप्रिया पिळगांवकर -- भारतीय अभिनेत्री**१९६३: शंकर षणमुगम (एस. शंकर) -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक, चित्रपट निर्माता आणि पटकथा लेखक**१९६१: राधा भावे -- कवयित्री, लेखिका* *१९६०: गिरीश ओक -- चित्रपट अभिनेते, संपादक, कवी**१९५८: स्मिता ठाकरे -- भारतीय सामाजिक कार्यकर्त्या आणि चित्रपट निर्मात्या**१९५७: सचिन पिळगांवकर -- प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते, निर्माते**१९५०: मीना खोंड-- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका**१९५०: भरत सक्सेना-- चित्रपट अभिनेते**१९४९: निनादराव बेडेकर – प्रसिद्ध इतिहास संशोधक (मृत्यू: १७ मे २०१५ )**१९४८: डॉ. शेषराव मोरे -- प्रसिद्ध मराठी लेखक आणि वक्ते* *१९४७: सुखदेव ढाकणे -- प्रसिद्ध कवी, कादंबरीकार, समीक्षक* *१९४४: प्रा.पुरुषोत्तम दत्तात्रय देशमुख-- लेखक, अनुवादक* *१९३८: प्रा.रमेशचंद्र गोकुळप्रसाद दीक्षित-- कवी, लेखक* *१९३६: शांताराम पवार -- प्रसिद्ध चित्रकार,हकवी (मृत्यू: ९ऑगस्ट २०१८ )**१९३२: व्ही. एस. नायपॉल – नोबेल पारितोषिक विजेते त्रिनिदादी-भारतीय लेखक (मृत्यू: ११ ऑगस्ट २०१८ )**१९३२: रेखा कामत -- भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेत्री (मृत्यू: ११ जानेवारी २०२२ )**१९२५: लक्ष्मीदास कृष्ण बोरकर -- कथाकार कादंबरीकार पत्रकार**१९२३: बाळ बापट ऊर्फ श्रीकृष्ण बापट -- मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेले छायाचित्रकार**१९१६: डॉ. विनायक विश्वनाथ तथा ’अप्पासाहेब’ पेंडसे – शिक्षणतज्ञ, देशभक्त, तत्त्वज्ञ, कुशल संघटक, लेखक, पत्रकार आणि ’ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक (मृत्यू: १९ ऑगस्ट १९७५ )**१९१६: अमृतलाल नगर -- प्रमुख हिंदी लेखक (मृत्यू: २३ फेब्रुवारी १९९० )**१९१०: चिंतामण गणेश काशीकर -- वेदशास्त्र अभ्यासक, लेखक (मृत्यू: २८ डिसेंबर २००३ )**१९०८: दत्तप्रसन्न नारायण कारखानीस -- कवी (मृत्यू: १९८६ )**१८९३: मे वेस्ट – हॉलिवूडमधील अभिनेत्री, गायिका, संवादलेखिका व सौंदर्यवती (मृत्यू: २२ नोव्हेंबर १९८० )**१८९०: सीताराम शिवराम लोटलीकर-- कादंबरीकार,चरित्रकार (मृत्यू: ११ऑक्टोबर१९३६ )**१८८८: गुरुवर्य बाबूराव गणपतराव जगताप – बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी झटणारे कार्यकर्ते, श्री शिवाजी मराठा हायस्कूलचे संस्थापक,पुण्याचे महापौर (१९६२)(मृत्यू: १ऑक्टोबर १९७८ )**१८७३: नरहर गोपाळ सरदेसाई --प्राच्यविद्या अभ्यासक (मृत्यू: २२ जून १९४३ )**१७६१: पं. विल्यम केरी – अर्वाचीन बंगाली व मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारे धर्मप्रसारक (मृत्यू: ९ जून १८३४ )* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०२०: पंडित जसराज -- भारतातील प्रसिद्ध शास्त्रीय गायक (जन्म: २८ जानेवारी १९३० )* *२०२०: निशिकांत कामत -- भारतीय चित्रपट निर्माता आणि अभिनेता(जन्म:१७ जून १९७०)**२०१९: नीलम शर्मा -- भारतीय अँकर दूरदर्शनच्या संस्थापक अँकर म्हणून प्रसिद्ध (जन्म: ७ मार्च १९६९ )* *१९८८: मुहम्मद झिया उल हक – पाकिस्तानचे ६ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १२ ऑगस्ट १९२४ )**१९०९: भारतमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक कर्नल विल्यम कर्झन वायली यांची हत्या करणारे क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा यांना फाशी देण्यात आली.(जन्म: १८ फेब्रुवारी १८८३ )**१८५०: जोस डे सान मार्टिन--पेरू देशाचे पहिले अध्यक्ष (जन्म: २५ फेब्रुवारी १७७८ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तरुण भारत मधील दिलीप व. बेतकेकर यांचा लेख *भूगोलातून मूल्यशिक्षण*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *झारखंड आणि महाराष्ट्र या दोन राज्यातील निवडणुका जम्मू काश्मीर आणि हरियाणा राज्यातील निवडणुका पार पडल्यावर होतील असे निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत स्पष्ट सांगितले आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक केले जाहीर, काश्मीरमध्ये तीन टप्यात होणार मतदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *रक्षाबंधनापूर्वी मला ओवाळणी मिळाली, राज्यभरातील भगिनींनी आपल्या मुख्यमंत्री भावाकडे व्यक्त केली भावना.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडी, प्रहार जनशक्ती, भारत आदिवासी पार्टी पक्षांना निवडणूक चिन्ह वाटप*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प ( VMDDP ) च्या दुसऱ्या टप्प्यास १४९ कोटींचा निधी मंजूर:दूध खरेदीपोटी २००० कोटी रुपयांचा मोबदला थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये कांतारा फेम ऋषभ शेट्टी सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय अभिनेता तर परेश मोकाशींचा 'वाळवी' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारतीय क्रिकेट संघातील यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनची बुची बाबू स्पर्धेत दमदार शतकी खेळी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *ऑक्टोपस म्हणजे काय ?* 📙 ************************ऑक्टोपस या अष्टपाद जलचराबद्दल त्याने घातलेल्या वेढ्याबद्दल अनेक दंतकथा जगभर प्रचलित आहेत. एखाद्या सिनेमाचा हिरो पाण्यात गेल्यावर त्याला याने घातलेला विळखा व त्यातून त्याने करून घेतलेली सुटका हाही अनेक वेळा सुरस व चमत्कारिकपणे दाखवला गेलेला प्रकार आहे. जमिनीवरचा साप हा प्राणी व पाण्यातला ऑक्टोपस या दोन्हींबद्दल असा टोकाचा दृष्टिकोन मानवाने भीतीपोटी घेतलेला आढळतो. खरे म्हणजे दोन्ही प्राणी विषारी जरूर आहेत; पण मानवाला त्यांच्यापासून मुद्दाम होऊन क्वचितच इजा होते. ऑक्टोपस हा मृदूकाय (Molluse) प्रकारचा प्राणी आहे. त्याला कसलेही कवच नसते. याचे शरीर जेमतेम वीतभर असते पण भुजा मात्र फूटभर लांब असतात. याचे तोंड डोक्याच्या आतील बाजूस बंद केले जाते. डोक्यावर टपोरे डोळे असतात. त्याची दृष्टी तीक्ष्ण असते. त्यामुळे भक्ष्य शोधणे व हल्लेखोरापासून पळ काढणे या दोन्ही गोष्टी त्याला छान जमतात. यासाठी त्याला त्याच्या शरीराच्या ठेवणीची खूपच मदत होते. एखाद्या चेंडूसारखी शरीराची वळकटी करून एखाद्या कपारीत शरीर लोटून दिले की त्याच्यावर हल्ला होऊच शकत नाही. याउलट एखाद्या भक्ष्यावर हल्ला करताना हा तोंडातून पाणी ओढून घेऊन ते शरीरातील एका विशिष्ट नळीवाटे वेगाने बाहेर फेकतो. एखाद्या जेटप्रमाणे बघता बघता हा भक्ष्याजवळ जाऊन पोहोचतो व त्याला आपल्या भुजांनी वेढून टाकतो. याच वेळी त्याच्या तीक्ष्ण दातांनी लहानसा चावा घेऊन थोडेसे विष त्या भक्ष्याला टोचले जाते. भुजांची ताकद व विषामुळे येणारी गुंगी यांमुळे एखादे बळकट भक्ष्यही हा सहज पकडतो व गट्टम करतो. याचे आवडते भक्ष्य म्हणजे समुद्री खेकडे. अर्थातच खेकडे समुद्राच्या किनाऱ्याजवळील ज्या भागात उथळ पाण्यात, कपारीत राहतात तेथेच याचेही वास्तव्य असते.ऑक्टोपस जगभर उथळ पाण्यात आढळतात. याच्या दीडशे जाती आहेत. वीतभर आकारापासून खरोखर अजस्त्र म्हणावा असा पॅसिफिक महासागरात आढळणारा ऑक्टोपस चक्क वीस ते बावीस फूट लांबीच्या भुजा असलेला आढळतो. पण याचेही धड व डोके जेमतेम दीडदोन फुटांचेच असते. अस्ताव्यस्त पसरलेल्या भुजांमुळे हा मोठा वाटतो. ऑक्टोपस हा निशाचर जलचर आहे. खास करून अंधारात हा उदरभरणाला बाहेर पडतो. दिवसा कुठेतरी कपारीत झोपा काढणे याला आवडते. या त्याच्या सवयीमुळेच माणसाशी त्याचा फारसा संबंध खरे म्हणजे येतच नाही. फक्त खास करून ऑस्ट्रेलिया किनाऱ्यावर आढळणारे ऑक्टोपस विषारी डंखाने मानवी मृत्यूला कारणीभूत ठरतात. हा डंखही झाल्याचे कळत नाही, इतका नाजूक असतो. डंख पोहोचणारा माणूस काठावर आला की काही काळाने हृदयक्रिया बंद पडून त्याचा मृत्यू ओढवतो. वांब जातीचा सापासारखा मासा मात्र ऑक्टोपस खाण्यात पटाईत आहे. हा मासाही खूप मोठा म्हणजे सहज आठ दहा फूट लांब व लहान मुलाच्या मांडीएवढा जाड असतो. तीक्ष्ण दातांनी तो बघताबघता याचा फडशा पाडतो. अगदी उथळ पाण्यात, पण डोंगरकपारी असलेल्या भागात मासेमारी करणाऱ्यांना सटीसमासी जाळ्यात अाॅक्टोपस सापडतात. अर्थात एखाद्या जलसंग्रहालयात त्यांची पाठवणी करण्याचा मासेमार प्रयत्न करतात; पण फारच क्वचित हे प्रयत्न यशस्वी होतात. जमिनीवरील काही प्राणी रंग बदलतात. तीच कला ऑक्टोपसच्या काही जातींनाही साध्य आहे. त्याच्या कातडीत असलेल्या काही रंगद्रव्याचा पाण्यातील प्रकाशाप्रमाणे रंग बदलत जातो. त्यामुळे अनेकदा याचे अस्तित्व ओळखणे अन्य प्राण्यांना कठीण होत जाते. ऑक्टोपसची मादी माशांप्रमाणेच कपारीमध्ये अंडी घालते. एका वेळी घातलेल्या अंड्यांची संख्या किती असावी ? एक ते दीड लाख अंडी अगदी सूक्ष्म स्वरूपात एकत्रित करून घातली जातात. पण यातून होणाऱ्या नवनिर्मितीचे प्रमाण मात्र खूपच कमी असते, कारण ही अंडी अनेक जलचरांकडुन नष्ट होतात.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मनुष्य विचारी असेल तर तत्त्वज्ञानी बनतो व विकारवश असेल तर तो बेताल बनतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पाकिस्तानचा पहिला सुवर्ण पदक विजेता भालाफेकपटू कोण ?२) महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने राज्यांतील नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचा कालावधी अडीच वर्षावरून किती वर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे ?३) देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांची यादीत कोणती संस्था प्रथम स्थानावर आहे ?४) 'देव या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाचा २०२४ चा 'गानसम्राज्ञी लता मंगेशकर' पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ? *उत्तरे :-* १) अर्शद नदीम ( पॅरिस ऑलिम्पिक २०२४ ) २) ५ वर्ष ३) IIT चेन्नई ४) सुर, ईश्वर, ईश, परमेश ५) अनुराधा पौडवाल *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 मीना खोंड, लेखिका, हैद्राबाद👤 बालाजी मदन इंगळे, शिक्षक तथा साहित्यिक, उमरगा👤 मा. राजेश कुंटुरकर, संचालक, NDCC बँक, नांदेड👤 रवींद्र धुप्पे, नांदेड👤 अरुणा राजीव भोसले, शिक्षिका, कोल्हापूर👤 सचिन एडके, धर्माबाद👤 बालाजी बरडे, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पंडित पढि गुनि पचि मुये गुरु बिन मिलै न ज्ञान ।ज्ञान बिना नहि मुक्ति है सत्य शब्द प्रमान ॥ 48 ॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्पष्ट व खरे बोलताना आपल्याला साथ देणारे खूप कमी मिळतील. आणि खोटे बोलून गोड शब्दात बोलणारे कोसो दूरचे असंख्य भेटतील पण,जेव्हा आपल्यावर वेळ, प्रसंग येईल त्यावेळी मात्र गोड बोलणारे सुद्धा अनोळखी होऊन जातील. हजार विरोधक निर्माण झाले तरी चालेल पण,खरे व स्पष्ट शब्दात बोलणे सोडू नये. भलेही त्यावेळी कोणी साथ नाही दिली तरी चालेल पण,स्वतः कडूनच मिळालेली साथ खूप मोठी असते म्हणून स्वतः वर पूर्ण विश्वास असू द्यावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *एकीचे बळ* एकदा एक कबुतराचा मोठा थवा आकाशात अन्नाच्या शोधासाठी उडत होता. ते एका घनदाट जंगलात गेले. एक कबुतर आपल्या बाकीच्या सहकाऱ्यांना बोलले ‘मित्रांनो, आपण खूप लांबच्या अंतरावरून येत आहोत. आपल्यातील सर्वच खूप थकलेले आहेत. तर, आपण थोडा वेळ येथे आराम करू या.’पण मध्यम वयीन कबुतर बोलला ‘तू जे बोलत आहेस ते खरे आहे, पण आपण सर्व भूकेलो आहोत.’ आणि जर आपण उशीर केला तर आपल्याला अन्न मिळणार नाही. बाकीच्या कबुतरांचे पण तेच म्हणणे होते. सर्व कबुतर बरोबर उडायला लागले. त्यांनी बघितले की जमिनीवर धान्य पसरलेले होते.ज्या कबुतराला आराम हवा होता तो बोलला ‘बघा! आपले धान्य! चला आपण ते वेचूया.’ सर्व कबुतर धान्य वेचण्यासाठी खाली उतरले. तिथे भरपूर प्रमाणात धान्य होते. सर्वात जास्त वयस्कर कबुतर बोलतो की ‘या, या लवकरात लवकर धान्य उचला व खा.’जेव्हा सर्व कबुतर धान्य खात होते तेव्हा अचानक एक जाळी त्यांच्या अंगावर येऊन पडली. सर्व त्यामध्ये अडकले.‘आता आपण काय करायचे?’ सर्व रडायला लागले. एक शिकारी झाडावर बसलेला होता त्याच्याकडे धनुष्य व बाण होते. त्यामुळे एक कबुतर बोलला ‘मित्रांनो, माझी एक युक्ती आहे आपण सर्व जण मिळून ताकद लावून एकाच वेळेस जाळीसह वरती उडू या व आपण सहजपणे यातून सुटू शकतो.’सर्व कबुतरांनी त्यांची सर्व ताकद पणाला लावून जाळीसह वरती उडायला लागले व ते खूप उंचावर उडले आणि त्यांची अवघड परिस्थितीतून सुटका झाली.हे बघून तो शिकारी आश्चर्य चकित होऊन व स्तब्ध झाला.एक कबुतर बोलला ‘आपण शिकाऱ्यापासून सुटलो आहोत, आता आपण आपल्या उंदिर मित्राकडे जाऊ तो आपल्याला मदत करेल.’ते कबुतर पुन्हा आपली शक्ती एकत्र करून उडायला लागतात व डोंगराच्या पायथ्याजवळ जातात. तेथील बिळात राहणाऱ्या उंदराला ते मदतीसाठी बाहेर बोलवतात. उंदिर त्यांना मदत करायला तयार होतो, व काही मिनिटांतच तो आपल्या तीक्ष्ण दातांनी ती जाळी कुरतडून टाकतो व कबुतरांची जाळीतून मुक्तता करतो.शेवटी कबुतर उंदराचे आभार मानून आपल्या घरी जातात.*तात्पर्य - एकतेतच बळ असते. एकतेमुळे अवघडातल्या अवघड परिस्थितीमधून आपली सुटका होऊ शकते. "*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 16 ऑगस्ट 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.loksatta.com/sampadkiya/features/india-s-educational-evolution-from-post-independence-commissions-to-modern-reforms-psg-98-4538127/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌼 *_ या वर्षातील २२९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🌼 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌼•••••••••••••••••••••••••••••••••*२०१०: जपानला मागे टाकुन चीन ही जगातली दुसर्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली.**१९९४: बांगलादेशातील लेखिका तस्लिमा नसरीन यांना स्वीडीश पेन क्लबतर्फे ’कुर्ट टुचोलस्की साहित्य पुरस्कार’ जाहीर**१९६०: सायप्रसला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९४६: कोलकात्यात वांशिक दंगल उसळुन ७२ तासात सुमारे ४,००० जण ठार झाले.**१९१३: स्त्रियांना प्रवेश देणारे तोहोकू विश्वविद्यालय हे जपानमधील पहिले विश्वविद्यालय बनले.* 🌼 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🌼 ••••••••••••••••••••••••••••••••• *१९८५: प्रा.सुरेश आडके -- कथा व कादंबरीकार लेखक**१९७८: संजय नाना गोरडे -- कवी,लेखक* *१९७४: शिवनारायण चंद्रपॉल-- प्रशिक्षक आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचे माजी कर्णधार* *१९७२: संदीप बाळासाहेब वाकचौरे -- लेखक* *१९७०: मनीषा कोईराला – नेपाळी-भारतीय अभिनेत्री**१९७०: सैफ अली खान – अभिनेता**१९६७: नरेंद्र भगवंतराव नाईक -- प्रसिद्ध कादंबरीकार, कवी* *१९५९: मंगेश विश्वासराव -- जेष्ठ पत्रकार, मराठी साहित्यिक* *१९५८: महेश मांजरेकर-- आघाडीचे भारतीय चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, कथाकार व निर्माते**१९५८: मॅडोना – अमेरिकन गायिका, गीतलेखिका, अभिनेत्री, दिग्दर्शिका, निर्माती, नर्तिका आणि उद्योजिका**१९५७: रावसाहेब रामराव पाटील ऊर्फ आर.आर.पाटील- माजी उपमुख्यमंत्री म.रा ( मृत्यू: १६ फेबुवारी २०१५ )**१९५४: हेमलता – पार्श्वगायिका**१९५२: कीर्ती शिलेदार – गायिका व अभिनेत्री**१९५१: डेव्हिड धवन -- हिंदी चित्रपटांचे प्रसिद्ध भारतीय दिग्दर्शक**१९५०: जेफ थॉमसन – ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज**१९४९: अच्युत वझे -- रंगकर्मी, लेखक* *१९४४: प्रा.तुकाराम पाटील -- प्रसिद्ध मराठी साहित्यिक* *१९४३: गिरीश घाणेकर -- मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक, तसेच मराठी चित्रपट व जाहिरातपट निर्माते (मृत्यू: २३ सप्टेंबर १९९९ )**१९३७: प्रा. आर. व्ही. मुदलियार -- लेखक**१९३४: विष्णुपंत गोपाळराव ब्रह्मनाथकर -- लेखक**१९३४: वसंत पेंढारकर -- जीवनाचे प्रतिबिंब असलेल्या कविता करणारे कवी (मृत्यू: ३१ जुलै २००८ )* *१९३२: नारायण आठवले -- मराठी भाषेतील पत्रकार, साहित्यिक, स्वातंत्र्यसैनिक आणि माजी खासदार (मृत्यू: २८ एप्रिल २०११ )**१९२६: वसंत रामराव रत्नपारखी -- लेखक**१९२६: मनोरमा -- जुन्या काळातील अभिनेत्री (मृत्यू: १५ फेब्रुवारी २००८ )**१९१३: मेनाकेम बेगीन – इस्त्रायलचे ६ वे पंतप्रधान व नोबेल पारितोषिकविजेते (मृत्यू: ९ मार्च १९९२ )**१९०४: सुभद्राकुमारी चौहान – हिन्दी कवयित्री (मृत्यू: १५ फेब्रुवारी १९४८ )**१९०१: श्रीपाद रामचंद्र टिकेकर-- लेखक, संशोधक (मृत्यू: १९७९ )**१८७९: जगन्नाथ रघुनाथ आजगावकर – संतचरित्रकार, १९०७ ते १९३५ या काळात त्यांच्या 'महाराष्ट्र कविचरित्र’ या ग्रंथाचे नऊ खंड प्रकाशित झाले होते.(मृत्यू: २७ ऑगस्ट १९५५ )* 🌼 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🌼•••••••••••••••••••••••••••••••••*२०२०: चेतन चौहान -- माजी क्रिकेटर(जन्म: २१ जुलै १९४७ )* *२०१८: अटलबिहारी वाजपेयी- माजी भारतीय पंतप्रधान आणि प्रसिद्ध हिंदी कवी, भारतरत्न (२०१४) (जन्म: २५ डिसेंबर १९२४ )**२०१०: नारायण गंगाराम सुर्वे – प्रसिद्ध कवी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित (जन्म: १५ आक्टोबर १९२६ )**२०००: रेणू सलुजा – ’परिंदा’, ’धारावी, ’सरदार’ आणि ’गॉडमदर’ इ. चित्रपटांच्या संकलनासाठी चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट संकलक (जन्म: ५ जुलै १९५२ )**१९९७: अनेक देशांत भारतीय संस्कृती व अध्यात्म यांचा प्रसार करणारे पं. वसंतशास्त्री विष्णुशास्त्री उर्फ आबाजी पणशीकर यांचे निधन**१९९७: नुसरत फतेह अली खान – कव्वालीला जागतिक परिमाण मिळवून देणारे पाकिस्तानी गायक (जन्म: १३ आक्टोबर १९४८ )**१९७७: एल्व्हिस प्रिस्टले – अमेरिकन गायक, गिटारवादक, अभिनेता आणि ’किंग ऑफ द रॉक अँड रोल’ (जन्म: ८ जानेवारी १९३५ )**१७०५: जेकब बर्नोली – स्विस गणितज्ञ (जन्म: २७ डिसेंबर १६५४ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••लेखिका संगीता पाखले यांचा लोकसत्ता मधील लेख*स्वातंत्र्योत्तर काळातील शैक्षणिक टप्प्यांचा…*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *'लाडकी बहीण योजना' अंतर्गत ८० लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांना मिळाले पैसे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्पाचा शुभारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सर्व महापालिकांनी त्यांच्या क्षेत्रात एक लाख झाडे लावावीत, मुख्यमंत्र्यांचे निर्देश !*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पद्मशाली पंच कमिटी पुणे शहर (भवानी पेठ) यांच्यावतीने श्री क्षेत्र आळंदी देवाची येथे नुतन पद्मशाली समाज धर्मशाळेचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते उद्घाटन *•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांना शंभर टक्के सौर उर्जेद्वारे वीज पुरवठा करण्याची महावितरणची तयारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *प्रतिभावान लेखक, कवी, रंगकर्मी डॉ. शंतनू अभ्यंकर यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *बांगलादेश विरुद्ध च्या कसोटी सामन्यातून जसप्रीत बुमराहला विश्रांती मिळण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *विजेचे उत्पादन व वाटप* 📙 आपण अलीकडे क्वचित वर्तमानपत्रात वाचतो, 'काल साऱ्या महाराष्ट्रात वीज गेली होती.' आता मनात येते की, महाराष्ट्र तर एवढा मोठा, तिथे कितीतरी वीजकेंद्रे आहेत. औष्णिक आहेत, जलविद्युत आहेत, आण्विक आहेत. मग सगळीच्या सगळी बंद पडून अख्खा महाराष्ट्र अंधारात कसा जातो ? फार पूर्वी असे नव्हते. कोयनेची वीज मुंबईला जाई. भुसावळ कोराडीचे उत्तर महाराष्ट्राला जाई. तर पुण्याला स्वतःचेच वीजकेंद्र काम करत होते. या पद्धतीत त्या त्या गावापुरते वीजनिर्मिती पुरवठा करण्याचे काम सोपवलेले असे.पण ही पद्धत महागडी होती, अनिश्चित होती. गाव वाढेल, तसतशी ही पद्धत अपुरी पडत असे. मग तेथील पुरवठा नेहमीसाठीच कमी पडे.यावर उपाय म्हणून अख्ख्या महाराष्ट्रातील सर्व मोठी केंद्रे एकमेकांना प्रथम थेट जोडली गेली. याला 'इलेक्ट्रिक ग्रिड' किंवा 'विद्युतकेंद्रांची साखळी' असे म्हणतात. मग या साखळीतून पुढे प्रत्येक गावांकडे फाटे काढून पुरवठा केला गेला.आता समजा, तुम्ही एकमेकांचे हात धरून साखळीची शिवाशिवी खेळत आहात आणि एकाचा पाय दुसऱ्याच्या पायात अडकला. सर्वच मुले बदाबद पडतात की नाही ? अगदी हाच प्रकार या ग्रीडमुळे वीजकेंद्राच्या बाबतीत होतो.एखाद्या केंद्रात काही बिघाड झाला की, ते बंद पडते. पण दुसऱ्याच्या पायात पाय घालून ते दुसऱ्यालाही ओढते. पण हा प्रकार येथेच थांबावा, यासाठी तात्काळ त्या केंद्राशी असलेला जोड आपोआप काम करण्याचे थांबवतो. याच पद्धतीत सर्व जोड काम करेनासे होतात. सर्व महाराष्ट्रात अंधार पडतो, तो असा.पण मूळ केंद्रातील बिघाड थोड्या वेळात दुरुस्त केला जातो. ते सुरू झाले की, ओळीने सर्व जोड पुन्हा काम करू लागतात. अंधारात विझत गेलेले जाळे पुन्हा उजेडात प्रकाशू लागते. संपूर्ण भारतात आता नॅशनल ग्रिडचे जाळे जोडले गेले आहे.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चांगुलपणाचा मार्ग काटेरी असला, तरी त्याची फळे गोड असतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) विदर्भातील एकमेव गिरिस्थान कोणते ?२) देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ कोणते ठरले आहे ?३) २०२८ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहेत ?४) 'दैन्य' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार २०२४ कोणाला जाहीर झाला आहे ? *उत्तरे :-* १) चिखलदरा, अमरावती २) ISI बंगळुरू ३) अमेरिका ४) दारिद्र्य ५) डॉ. रघुनाथ माशेलकर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 निखिल देवेंद्र खराबे, कुही, नागपूर👤 प्रसाद कामुलवार, परभणी👤 रमेश बारसमवार👤 सुभाष पालदेवार, धर्माबाद👤 अशपाक सय्यद👤 मिथुन बिजलीकर👤 प्रवीण खुमसे, MIT, अंबाजोगाई👤 सदानंद वतपलवाड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कह कवीर दरगाह सो जेहि उतरी है भार ।सोइ करै गुरुआइया झकि २ मरे गँवार ॥ 47 ॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या मनात काय चालू आहे ते फक्त आपल्यालाच माहीत असते. दुसऱ्यांच्या मनात काय चालले आहे या विषयी आपल्याला कल्पना सुद्धा नसते. कारण प्रत्येकाची मानसिकता वेगळी असते.प्रत्येकांचे मन, स्वभाव, बोलीभाषा, आपुलकी ही वेगवेगळी असते. म्हणून कोणाविषयी उगाचच बोलून स्वतःचे समाधान करू घेवू नये. कारण असे केल्याने आपल्याही वाटेत काटे पेरणारे टपून बसलेले असतात.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *गाढवाचा गैरसमज* एकदा एका पाथरवटाने दगडांच्या चांगल्या सुंदर मूर्त्या बनवल्या व त्या बाजारात विकायला न्यायला सुरवात केली.नेण्यासाठी एक गाढव आणले ,दगडाचे ते देव पोत्यात भरले .व रस्त्याने चालू लागले लोकांना ते देव पाहून लोक हात जोडु लागले .हे सर्व गाढवाच्या लक्षात आले कि ,माणसे आपल्याला हात जोडत आहे .मग गाढव एका जागेवर उभे राहले .गाढव का बर चालत नाही याचे कारण काही पाथरवटाला समजले नव्हते ,पण जेव्हा त्याला माहिती झाले की गाढव लोकांचा मान स्वीकार करण्यासाठी उभे आहे .तेंव्हा त्यावर दोन काडी चे फटके दिले व म्हणाला ,आता चालतो नीट की परत देऊ मुर्खा हा जो नमस्कार आहे तुला नव्हे तर त्या देवांना आहे .*तात्पर्य :- खोट्या अहंकाराचे फजितीची वेळ येते*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15 ऑगस्ट 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/38MvdaxSoBALiuHu/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🇮🇳 *_भारताचा स्वातंत्र्य दिन_* 🇮🇳•••••••••••••••••••••••••••••••••🇮🇳 *_ या वर्षातील २२८ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••• 🇮🇳 *_महत्त्वाच्या घटना:_* 🇮🇳•••••••••••••••••••••••••••••••••*१९८८: पंतप्रधान राजीव गांधी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणानंतर ‘मिले सुर मेरा तुम्हारा‘ हे गाणे दूरदर्शनवरुन पहिल्यांदाच प्रसारित करण्यात आले.**१९८२: भारतात रंगीत दूरचित्रवाणीच्या प्रसारणास सुरूवात झाली.**१९७५: बांगला देशात लष्करी उठाव होऊन बांगला देशाचे संस्थापक शेख मुजीबूर रहमान व त्यांच्या कुटुंबीयांची हत्या करण्यात आली.**१९७१: अमेरिकन डॉलरचे सोन्याशी असलेले संधान खंडित झाले.**१९४७: ब्रिटिश राजवट संपून भारत स्वतंत्र झाला. देशाची फाळणी झाली. पश्चिम पंजाब, सिंध,बलुचिस्तान, वायव्य सरहद्द प्रांत व पूर्व बंगाल हे पाकिस्तानात समाविष्ट झालेले प्रदेश सोडून संस्थाने वगळता राहिलेला प्रदेश स्वतंत्र भारत म्हणून अस्त्त्त्वात आला.**१९४७: भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पं. जवाहरलाल नेहरू यांनी सूत्रे हाती घेतली.**१९४७: पाकिस्तानचे निर्माते मुहम्मद अली जिना यांचा पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून कराची येथे शपथविधी झाला.**१९४५: दुसरे महायुद्ध – जपानने शरणागती पत्करली.**१९२९: ग्राफ झेपेलिन हा संशोधक ’झेपेलिन’ बलूनमधून जगप्रवासासाठी रवाना**१९१४: पनामा कालव्यातुन एस. एस. अॅनकॉन हे पहिले व्यापारी जहाज पार झाले.**१८६२: मद्रास उच्च न्यायालयाची स्थापना**१५१९: पनामा सिटी शहराची स्थापना झाली.* 🇮🇳 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*🇮🇳 •••••••••••••••••••••••••••••••••*१९८२: संदीप काळे -- न्यूझ चॅनलचे अँकर, लेखक आणि कवी**१९७७: वर्षा मारुती भिसे -- कवयित्री, लेखिका**१९७१: प्रमोद श्रीपाद पंत -- कवी, कथाकार**१९६९: भारत गणेशपुरे -- मराठी चित्रपट अभिनेता**१९६९: डॉ.संतोष खेडलेकर -- लेखक, पत्रकार* *१९६८: लोकराम केशव शेंडे -- कवी**१९६६: डॉ. मथू सुरेश सावंत -- प्रसिद्ध लेखिका* *१९५९: प्रा. विजया मारोतकर-- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका, विविध पुरस्कारांनी सन्मानित* *१९५८: सिंपल कपाडिया – अभिनेत्री आणि वेशभूषाकार (मृत्यू: १० नोव्हेंबर २००९ )**१९५७: मृणालिनी चितळे -- प्रसिद्ध लेखिका* *१९५५: नीना कुलकर्णी -- भारतीय अभिनेत्री**१९५४: जीवन साळोखे -- लेखक**१९५३: प्राचार्य डॉ. अमरसिंग राठोड -- प्रसिद्ध लेखक* *१९५१: प्रा. डॉ. रावसाहेब चोले -- कवी लेखक* *१९५०: अच्युत गोडबोले -- तंत्रज्ञ,समाजसेवक आणि मराठीतील लेखक आणि वक्ते* *१९४९: अनुराधा गोरे -- प्रसिद्ध मराठी लेखिका**१९४९: ललित बहल -- भारतीय अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि लेखक(मृत्यू: २३ एप्रिल २०२१)**१९४७: राखी गुलजार – प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री**१९४७: अरुणा खनगोरकर -- कवयित्री* *१९४४: पुरुषोत्तम पंडित क-हाडे-- लेखक**१९४४: अनिल किणीकर -- लेखक, अनुवादक, संपादक* *१९४२: डॉ. श. भा. चांदेकर -- लेखक,संस्कृत साहित्याचे व संत साहित्याचे गाढे अभ्यासक तथा निवृत्त शिक्षण संचालक* *१९३८: उषा टाकळकर -- प्रसिद्ध लेखिका, संपादिका* *१९३८: प्राण कुमार शर्मा -- चाचा चौधरीचे निर्माता व भारतीय चित्रकार (मृत्यू: ५ ऑगस्ट २०१४ )**१९३६: डॉ. माधव गोडबोले -- माजी केंद्रीय गृहसचिव तथा लेखक**१९३३: सीमाताई साखरे-- समाजसेविका, लेखिका* *१९२९: उमाकांत निमराज ठोमरे – संपादक, बालसाहित्यकार (मृत्यू: ७ आक्टोबर १९९९ )**१९२६: शिवराम दत्तात्रेय जोशी -- अर्वाचीन भाषाशास्त्रज्ञ, राष्ट्रीय संस्कृत पंडित (मृत्यू: २९ जुलै २०१३ )**१९२२: वामन(वामनदादा) तबाजी कर्डक -- मराठी शाहीर, कवी आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते (मृत्यू: १५ मे २००४ )**१९१७: सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी –ललित, वैचारिक, नाट्य, काव्य आदी विविध प्रकारांत मोठ्या प्रमाणावर लेखन करणार्या लेखिका.(मृत्यू: १३ नोव्हेंबर २००१ )**१९१५: इस्मत चुगताई – ऊर्दू कथा व पटकथा लेखिका (मृत्यू: २४ आक्टोबर १९९१ )**१९१३: भगवान रघुनाथ कुळकर्णी ऊर्फ 'फुलारी' ऊर्फ 'बी. रघुनाथ' – लेखक व कवी (मृत्यू: ७ सप्टेंबर १९५३ )**१९१२: ’सूर रंग’ उस्ताद अमीर खॉं – इंदौर घराण्याचे संस्थापक व गायक (मृत्यू: १३ फेब्रुवारी १९७४ )**१९०७: भगवंत दिनकर गांगल -- कथालेखक कादंबरीकार (मृत्यू: ३० सप्टेंबर १९९७ )**१९०६:पद्मश्री रामसिंग भानावत-- बंजारा समाजाचे समाजसेवक (मृत्यू: १० जून २००२)**१९०५: शंकर गणेश दाते -- मराठी लेखक, सूचिकार (मृत्यू: १० डिसेंबर १९६४ )**१८९४: विनायक गोविंद साठे -- कवी, लेखक**१८८५: विठ्ठल सिताराम गुर्जर- प्रसिद्ध लेखक (मृत्यू: १९ सप्टेंबर १९६२ )**१८७२: योगी अरविंद घोष – क्रांतिकारक, तत्त्वचिंतक,योगी व कवी(मृत्यू: ५ डिसेंबर १९५० )**१८६७: गणपतराव जोशी – रंगभूमीवरील असामान्य अभिनेते, शेक्सपियरच्या नाटकांतील त्यांच्या भूमिका अतिशय गाजल्या होत्या (मृत्यू: ७ मार्च १९२२ )**१७६९: नेपोलिअन बोनापार्ट – फ्रान्सचा सम्राट,असामान्य सेनापती आणि कर्तबगार प्रशासक (मृत्यू: ५ मे १८२१ )* 🇮🇳 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🇮🇳•••••••••••••••••••••••••••••••••*२०१९: विद्या सिन्हा - भारतीय चित्रपट अभिनेत्री (जन्म: १५ नोव्हेंबर १९४७ )* *२०१८: अजित लक्ष्मण वाडेकर -- भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू (जन्म: १ एप्रिल १९४१)**२००४: अमरसिंग चौधरी – गुजरातचे माजी मुख्यमंत्री (जन्म: ३१ जुलै १९४१ )**१९७५: शेख मुजीबुर रहमान – बांगलादेशचे संस्थापक व पहिले राष्ट्राध्यक्ष यांची लष्करातील सैनिकांनी त्यांच्या प्रासादावर हत्या केली. (जन्म: १७ मार्च १९२० )**१९४२: महादेव देसाई – स्वातंत्र्य लढ्यातील नेते आणि महात्मा गांधींचे स्वीय सहाय्यक (जन्म: १ जानेवारी १८९२ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल : 9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*फ्रेश मॉर्निंग बुलेटिन दहाव्या वर्षात पदार्पण*15 ऑगस्ट 2015 रोजी सुरू झालेल्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिन या सेवेला आज नऊ वर्ष पूर्ण होत असून दहाव्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यानिमित्ताने या सेवेचा घेतलेला आढावा ........... पूर्ण वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आज भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन, पीएम मोदी लाल किल्ल्यावरून जनतेला संबोधित करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पुणे : जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय ठरवून प्रयत्न करा- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *लाडकी बहीण योजनेचे 3 हजार रुपये महिल्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्याच्या हरित महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी १४ हजार कोटींची गुंतवणूक योजना*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *इतिहासातून पोवाड्याचे महत्व कळते, एअर मार्शल भूषण गोखले यांचे मत; सृजनसभा प्रस्तुत कलासाधक सन्मान व संवाद कार्यक्रम*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मराठा आरक्षणाकडे तातडीने लक्ष द्या, मराठा मावळा संघटनेच्या लोटांगण आंदोलनाने वेधले सर्वांचेच लक्ष*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *क्रीडा लवादाने आता विनेश फोगटची याचिका फेटाळली असून तिला कोणतेही पदक मिळणार नसल्याचे आता समोर आले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भारताला १५ ऑगस्ट १९४७ याच दिवशी स्वातंत्र्य बहाल करण्याचा निर्णय ब्रिटिश सरकारने का घेतला?आज स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी देश सज्ज झाला आहे. मात्र, भारताला १५ ऑगस्ट १९४७ याच दिवशी स्वातंत्र्य बहाल करण्याचा निर्णय ब्रिटिश सरकारने का घेतला, याची माहिती इतिहासाच्या पोटात दडलेली आहे. प्रत्यक्षात, भारताचे तत्कालीन व्हॉइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांच्या आग्रहामुळे देशाची या ऐतिहासिक दिवशी पारतंत्र्यातून सुटका झाली आहे. गुजरातमधील दिवंगत व निवृत्त सनदी अधिकारी तसेच इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. के. सी. सगर यांनी केलेल्या नोंदीतून या बाबीवर प्रकाश पाडला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले, त्या वर्षी डॉ. सगर गुजरात प्रांताचे महसूल सचिव होते. सनदी कामकाज करताना इतिहासात रुची असल्याने ते रोज घडणाऱ्या परंतु, महत्त्वाच्या घटनांची नोंद करून ठेवत असत. त्यांच्या या अनोख्या सवयीमुळेच देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या तारखेमागील गूढ उकलले गेले आहे. डॉ. सगर यांनी केलेल्या नोंदीनुसार, लॉर्ड माऊंटबॅटन यांनी भारतात येण्यापूर्वी १९४५ मध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या महायुद्धात ब्रिटन आणि मित्रराष्ट्रांकडून जपानवर करण्यात आलेल्या लढाईचे नेतृत्व केले होते. जपानला १५ ऑगस्ट याच दिवशी चारीमुंड्या चीत करण्यात त्यांना यश आले होते. या विजयानंतर त्यांच्या आयुष्याला नवीन दिशाच मिळाली. त्यामुळे ते १५ ऑगस्ट या तारखेला "लकी' दिवस मानत. दुसऱ्या महायुद्धानंतर भारतातील नेत्यांनी स्वातंत्र्यासाठीचा लढा अधिक तीव्र केला. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल या नेत्यांशी चर्चा झाल्यानंतर देशाला स्वातंत्र्य देण्याबाबत ब्रिटिश सरकार तयार झाले. मात्र, तारीख निश्चिचत होत नव्हती. लॉर्ड माऊंटबॅटन यांनी १५ तारीख ठरवली आणि ती भारतातील ज्येष्ठ नेत्यांना कळविली. या तारखेची कहाणी इथेच संपत नाही. लॉर्ड माऊंटबॅटन यांच्या या निर्णयाला देशातील नेत्यांनी विरोध केला नाही. मात्र, पश्चि म बंगालच्या कोलकत्यातील त्या वेळचे प्रसिद्ध ज्योतिषशास्त्रज्ञ स्वामी मदनानंद यांनी आक्षेप घेतला होता. त्याच्या म्हणण्यानुसार, १५ ऑगस्ट १९४७ हा "अशुभ' दिवस आहे. या दिवशी देशाला स्वातंत्र्य देण्यात येऊ नये. ब्रिटिशांनी १६ ऑगस्टला स्वातंत्र्य द्यावे, असेही त्यांनी लॉर्ड माऊंटबॅटन यांना सुचविले होते. तसे पत्रही त्यांनी पाठविले होते. १५ ऑगस्टला देशाला स्वातंत्र्य मिळाल्यास अनेक संकटे निर्माण होऊ शकतील, असे भाकीत स्वामी मदनानंद यांनी वर्तविले होते. स्वातंत्र्यानंतर देशात उसळलेला जातीय हिंसाचार, दुष्काळ, पाकिस्तान आणि चीनशी झालेले युद्ध अशी अनेक संकटे देशावर कोसळली. या सर्व संकटांचे मूळ त्या तारखेत असल्याचे मत स्वामी मदनानंद यांनी मानल्याचे डॉ. सगर यांनी नोंदविले आहे.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वातंत्र्यता घेण्याचे नाही तर देण्याचे नाव आहे – नेताजी सुभाषचंद्र बोस*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) १५ ऑगस्ट २०२४ ला आपण कितवा *स्वातंत्र्य दिन* साजरा करत आहोत ?२) ऑलिम्पिकमधील सर्वोच्च पुरस्कार कोणता ?३) ऑलिम्पिकमधील विशेष योगदानासाठी भारताच्या कोणत्या खेळाडूला प्रतिष्ठेच्या 'ऑलिम्पिक ऑर्डर' ने सन्मानित करण्यात आले ?४) 'धवल या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) डेंग्यू हा आजार कशामुळे होते ? *उत्तरे :-* १) ७८ वा २) ऑलिम्पिक ऑर्डर ३) अभिनव बिंद्रा, नेमबाज ( २००८ बीजिंग ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता ) ४) पांढरे, शुभ्र ५) इडिस नावाची मादा डास चावल्याने*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 मा. खासदार वसंतराव चव्हाण साहेब, नांदेड लोकसभा मतदार संघ👤 डॉ. आदर्श बाबुराव जाधव👤 अरविंद कुलकर्णी, साहित्यिक, पुणे👤 युसूफ शेख, शिक्षक, कंधार👤 शिवानंद सुरुकुटवार, सामाजिक कार्यकर्ते, नांदेड👤 बळवंत भुतावले👤 अशोक ढवळे👤 राजाराम मोरे👤 डॉ. आदर्श बाबुराव जाधव*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अवर्ण वरण अमूर्ति जो कहौं ताहि किन पेख ।गुरू दयाते पावई सुरति निरति करि देख ॥ 45 ॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या मनात काय चालू आहे ते फक्त आपल्यालाच माहीत असते. दुसऱ्यांच्या मनात काय चालले आहे या विषयी आपल्याला कल्पना सुद्धा नसते. कारण प्रत्येकाची मानसिकता वेगळी असते.प्रत्येकांचे मन, स्वभाव, बोलीभाषा, आपुलकी ही वेगवेगळी असते. म्हणून कोणाविषयी उगाचच बोलून स्वतःचे समाधान करू घेवू नये. कारण असे केल्याने आपल्याही वाटेत काटे पेरणारे टपून बसलेले असतात.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*ज्ञानार्जनासाठी* *एका साधूला पितळेच्या धातूचे सोन्यात रूपांतर करण्याची कला अवगत होती. पण याचा उपयोग तो गरजुंना करण्यासाठीच करत होता. एकेदिवशी एक गरीब ब्राह्मण त्याच्याकडे आला. त्याला मुलीच्या लग्नासाठी पैशांची आवश्यकता होती. साधूने त्याची अडचण ओळखून त्याला एका पितळेच्या भांड्याचे रूपांतर सोन्यात करून दिले. ब्राह्मण सोनाराकडे गेला. सोनाराला त्याच्याकडे सोन्याचे भांडे पाहून मनात संशय आला. सोनार राजाकडे गेला. राजाने त्याची चौकशी केली केली तेव्हा ब्राह्मणाने खरी घटना सांगितली. राजाच्या मनात लोभाची भावना उत्पन्न झाली. त्याने साधूला ती विद्या शिकविण्याचे फर्मान काढले. साधूने राजाला ठामपणे नकार सांगितला. राजाने साधूला 15 दिवसांची मुदत दिली अन्यथा फासावर लटकावेन अशी धमकी दिली. राजा त्याच्याकडून काय उत्तर येते यासाठी दूत पाठवित असे पण साधू काही होकार देईना. हे पाहून राजाने वेश पालटला व तो साधूच्या येथे राहून त्याची सेवा करू लागला. साधूने राजाच्या सेवेवर प्रसन्न होऊन त्याला पितळापासून सोने तयार करण्याची विद्या शिकविली. राजा महालात परतला. पंधराव्या दिवशी साधूला बोलावून त्याला विद्या शिकविण्याची आज्ञा केली. साधूने परत नकार दिला. तेव्हा राजा गर्वाने म्हणाला,’’ साधू तू मला कला शिकवली नसती हे मी जाणून होतोच पण मी ही हट्टी आहे. मी पण तुझ्याजवळ राहून ती कला शिकून तयार झालो आहे.’’ साधू म्हणाला,’’महाराज तुम्ही माझी सेवा करून ती कला शिकला आहात, धमकी देऊन नाही. *_🌀तात्पर्य_ ::~ * ज्ञानासाठी गुरुची मर्जी सांभाळावी लागते.’’*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 14 ऑगस्ट 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://kathamaala.blogspot.com/2019/05/blog-post_67.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💮 *_ या वर्षातील २२७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 💮 *_महत्त्वाच्या घटना:_* 💮•••••••••••••••••••••••••••••••••*२०१०: पहिल्या ’युवा ऑलिम्पिक स्पर्धा’ सिंगापूरमधे घेण्यात आल्या.**२००६: श्रीलंकेच्या वायुदलाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात चेन्चोलाई येथे ६१ तामिळ मुली ठार झाल्या.**१९७१: बहारीनला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९५८: ’एअर इंडिया’ ची दिल्ली - मॉस्को विमानसेवा सुरू झाली.**१९४७: भारताच्या घटनासमितीने सत्ता स्वीकारण्याचा ठराव मंजूर केला आणि लॉर्ड माऊंटबॅटन यांची स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक केली.**१९४७: पाकिस्तानला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१८९३: मोटर वाहनांची नोंदणी सुरू करणारा फ्रान्स हा पहिला देश बनला.**१८६२: मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना**१८६२: कलकत्ता उच्च न्यायालयाची स्थापना**१६६०: मुघल फौजांनी संग्रामगड (चाकणचा किल्ला) ताब्यात घेतला.*💮 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 💮••••••••••••••••••••••••••••••••• *१९८३: सुनिधी चौहान -- भारतीय गायिका* *१९८०: ज्ञानेश्वर अर्जुन सूर्यवंशी (ज्ञानेश) -- कवी* *१९७७: हंसराज पूर्णानंदन बनसोड -- लेखक**१९७३: प्रा.डॉ.गिरीश नारायणराव सपाटे -- कवी, समीक्षक* *१९६८: प्रवीण आम्रे – क्रिकेटपटू**१९६४: संजय सोनवणी -- मराठी साहित्यिक, कथा, कादंबरी, कविता, तत्वज्ञान, इतिहास संशोधन असे चौफेर लेखन**१९६१: मोहनीश बहल -- भारतीय चित्रपट उद्योग आणि भारतीय दूरदर्शनवर काम करणारा भारतीय अभिनेते**१९५७: डॉ.श्याम हिराचंद मोहरकर -- लेखक* *१९५७: जॉन प्रकाश राव जनुमला ऊर्फ ’जॉनी लीवर’– विनोदी अभिनेता**१९५३: डॉ.सर्जु काटकर -- अनुवादक* *१९४८: यशवंत बाबुराव कदम -- लेखक, कवी**१९४५: जयश्री रंगनाथ नायडू -- लेखिका**१९३९: शांता गोखले -- लेखिका, पत्रकार, अनुवादक आणि नाट्यसमीक्षक,साहित्य अकादमी पुरस्कारांनी सन्मानित**१९३५: वीणा चिटको--- लेखिका,कवयित्री, गीतकार आणि संगीत दिग्दर्शक (मृत्यू: १९ सप्टेंबर २०१५ )**१९२५: जयवंत दळवी – साहित्यिक, नाटककार व पत्रकार.कथा, कादंबरी, नाटक, प्रवासवर्णन, विनोदी लेख असे विविध प्रकार त्यांनी हाताळले. (मृत्यू: १६ सप्टेंबर १९९४ )**१९१५: सिंधू गाडगीळ -- कादंबरीकार कथाकार* *१९१०: डॉ.गणेश त्र्यंबक देशपांडे -- मराठी व संस्कृत लेखक (मृत्यू: १६ नोव्हेंबर १९८९ )* *१९०७: गोदावरी परुळेकर – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका.'जेव्हा माणूस जागा होतो’ हे त्यांचे पुस्तक वेगळ्या जगाची ओळख करुन देणारे आहे.(मृत्यू: ८ आक्टोबर १९९६ )**१८९८: सदाशिव कानोजी पाटील (स.का. पाटील ) -- महाराष्ट्रातील काँग्रेसचे माजी नेते, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, अभ्यासक आणि वक्ते(मृत्यू: २४ मे १९८१)**१७७७: हान्स क्रिस्टियन ओरस्टेड – डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ९ मार्च १८५१ )* 💮 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 💮••••••••••••••••••••••••••••••••• *२०२२: विनायक तुकाराम मेटे-- पूर्व विधान परिषद सदस्य शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख (जन्म: ३० जून १९६३ )**२०२०: पंडित सुधीर माईणकर -- ज्येष्ठ तबलावादक, संशोधक, लेखक, संगीततज्ज्ञ (जन्म: १६ मे १९३७ )**२०१२: विलासराव देशमुख – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री (जन्म: २६ मे १९४५ )**२०११: शम्मी कपूर – सुप्रसिद्ध हिन्दी चित्रपट अभिनेता व निर्माता (जन्म: २१ आक्टोबर १९३१ )**२०१०: बाबूराव गोविंदराव शिर्के -- मराठी बांधकाम व्यावसायिक (जन्म: १ ऑगस्ट१९१८ )**१९८८: एन्झो फेरारी – रेस कार निर्माते आणि ड्रायव्हर (जन्म: १८ फेब्रुवारी १८९८ )**१९८४: कुस्तीगीर खाशाबा दादासाहेब जाधव – १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमधे वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय, शिवछत्रपती पुरस्कार [मरणोत्तर] (जन्म: १५ जानेवारी १९२६ )**१९५८: जीन फ्रेडरिक जोलिओट – मूलद्रव्याच्या समस्थानिकांच्या (Isotopes) शोधाबद्दल नोबेल पारितोषिक (१९३५) मिळवणारा फ्रेन्च पदार्थवैज्ञानिक (जन्म: १९ मार्च १९०० )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त एक देशभक्ती पर लघुकथा*व्यर्थ न हो बलिदान*सकाळी सकाळी रेडिओ ऑन केल्या बरोबर ती बातमी कानावर पडली आणि सविताच्या काळजाचे ठोके वाढले होते. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 भारतीय सैनिक मारल्या गेल्याची ती बातमी होती. सविताने लगेच फोन हातात घेतला आणि एक नंबर डायल करायला लागली. आपने डायल किया हुआ नंबर अबी बंद है, थोडी देर बाद प्रयास करे वारंवार हेच वाक्य तिच्या कानी पडत होता. जशी जशी वेळ जात होता तशी तशी तिची बैचेनी................ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *15 ऑगस्टला डॉ. मनमोहन सिंग यांना मागे टाकणार पीएम नरेंद्र मोदी, लाल किल्ल्यावर 11 व्या वेळी तिरंगा फडकावून रचणार विक्रम, पं नेहरू यांनी 17 वेळा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकविला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नगराध्यक्षांचा कालावधी ५ वर्ष करण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत घेतला निर्णय; नगराध्यक्षपदाची स्वप्ने पाहणाऱ्या नगरसेवकांची घोर निराशा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पत्रकारांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांची सरकारकडे मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *22 ऑगस्ट रोजी नवी मुंबईत संभाजी ब्रिगेडचे राज्यस्तरीय अधिवेशन, महाराष्ट्र धर्म जागवण्यासाठी सर्वांनी सहभागी होण्याचे प्रवीण गायकवाड यांचे आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय, लाखो नागरिकांना लाभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर, सन २०२४ चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान बॉर्डर गावसकर ट्रॉफीचे पाच सामने होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *सांधे का दुखतात ?* 📙************************ सांधेदुखीचे अनेक कारणे आहेत. 'सांधे आहेत म्हणून ते दुखतात !' असे उत्तर माझ्या आजोबांनी त्यांच्या मित्राला दिल्याचे मला अजून आठवते.दोन हाडे एकमेकांना जोडण्यासाठी सांधे असतात. सांधे असल्यामुळेच शरीराची हालचाल होऊ शकते. सांध्यांमध्ये असलेल्या हाडांच्या टोकांभोवती एक कुर्चा असते. तसेच सांध्यांच्या पोकळीत एक द्रवपदार्थ असतो, जो वंगणासारखे काम करतो. म्हातारपणात हा द्रव कमी होतो. हाडे एकमेकांवर घासली जाऊ नयेत यासाठी ही रचना असते. वृद्धापकाळात या कुर्चेची झीज होते व हाडांची टोके एकमेकांवर घासून सांधे दुखायला लागतात. काही वेळा सांध्याच्या पोकळीत जंतूसंसर्गामुळे किंवा दुखापतीमुळे द्रव गोळा होतात व सूज येते. यामुळेही सांधे दुखायला लागतात. गाऊटसारख्या रोगात काही रासायनिक पदार्थांचे स्फटिक सांध्याच्या पोकळीत जमा होतात. साहजिकच सांधे दुखतात. लहान मुलांमध्ये हृदयाच्या आजारातही सांधे दुखतात. रोगप्रतिकारक संस्थेच्या काही रोगांमध्येही सांधेदुखी होते. सांधेदुखीच्या कारणानुरूप त्यावर उपचार करायला हवेत. काही सर्वसाधारण उपचार लक्षात घेऊ. विश्रांती घेतल्याने सांधेदुखी कमी होते. दुखणाऱ्या सांध्यांना विश्रांती दिल्याने दुखणे कमी होते. सांध्यांना शेकून काढण्यानेही वेदना कमी होतात. ॲस्पिरिनसारख्या वेदनाशामक गोळ्यांनी वेदना कमी होते, तसेच सूजही कमी होते. वृद्धापकाळातील सांधेदुखीसाठी प्रत्येक सांध्यासाठीचे साधेसाधे व्यायाम नियमितपणे करायला हवेत, म्हणजे सांध्यांच्या हालचालींवर पडलेल्या मर्यादा दूर होतील. अशी सांधेदुखी पुर्णपणे बरी होत नसल्याने निदान दैनंदिन व्यवहार करणे तरी रुग्णाला शक्य होईल व आयुष्य सुखकर होईल.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माता, पिता, गुरु आणि स्वदेश यांची सेवा म्हणजेच परमेश्वराची सेवा.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) आंध्रप्रदेश राज्याचा राज्यपक्षी कोणता ?२) डोमिनिका या देशाचा राष्ट्रीय पक्षी कोणता ?३) पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली ?४) 'दुर्धर' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये पदकतालिकेत भारत कितव्या क्रमांकावर आहे ? *उत्तरे :-* १) पोपट २) पोपट ३) सहा ( सुवर्ण - ०, रजत - १, कांस्य - ५ ) ४) कठीण, गहन ५) ७१ व्या*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शंकर कळसकर, शिक्षक, देगलूर👤 गजानन गंगाधरराव रामोड, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद👤 पवन लिंगायत वाळंकी👤 प्रवीण संगमकर काळे👤 किरण मुधोळकर, फोटोग्राफर, देगलूर👤 गजानन पाटील👤 राम दिगंबर होले👤 सुनील गुडेवार👤 राजू टोम्पे👤 गणेश ईबीतवार, येवती, धर्माबाद👤 मुनेश्वर सुतार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गुरु बतावै साधुको साधु कहै गुरु पूज ।अरस परसके खेलमें भई अगमकी सूज ॥ 43 ॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• पाण्याची असो किंवा चांगल्या माणसाची योग्य त्याच वेळेत किंमत करावे. तहान लागल्यावर जशी पाण्याची आठवण येते तशीच आठवण आपण अडचणीत किंवा दु:खात असताना आपल्या जवळच्या चांगल्या माणसाची आठवण होते म्हणून त्यांचे महत्व जाणून आपल्यात माणुसकी कायम ठेवावे. या जगात सर्वच काही पैशाने विकत घेता येते पण, आपले दु:ख समजून मदतीला धावून येणारा व आपुलकीच्या नात्याने साथ देणारा माणूस एकदा दूर निघून गेल्यावर मनाने तर काय पण, त्याला पैशाने सुद्धा विकत घेता येत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*गोड बोलणाऱ्यापासून सावधान* "एका शेतकऱ्याने एकदा आपल्या कोंबड्याला हाका मारायला सुरुवात केली असता तो कोंबडा पळून जाऊ लागला.त्याच शेतकऱ्याने पिंजऱ्यात एक ससाणा पाळला होता. तो त्या कोंबड्याला म्हणाला, 'अरे वेड्या, मालक एवढ्या प्रेमाने तुला हाका मारत आहे, आणि तू असा पळून का जातोस ? एवढ्या प्रेमाने जर त्याने मला हाक मारल्या असत्या, तर मी मोठ्या आनंदाने त्याच्याकडे गेलो असतो.'यावर तो कोंबडा म्हणाला, 'अरे ससाण्या, आजवर माझ्या अनेक नातेवाइकांना या मालकाने अशाच प्रेमाने जवळ बोलावून, त्यांच्या माना कापताना मी पाहिले आहे. त्याची प्रेमळ हाक ऐकताच मी त्याच्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न करीत आहे. तुझी गोष्ट अगदी निराळी आहे. त्याच्या दृष्टीने तुझे मांस रुचकर नसल्याने, तुला त्याच्याकडून कापले जाण्याचे भय नाही.'*तात्पर्य* : प्रेमळ बोलणाऱ्यांच्या मनात प्रेम असतेच असे नाही."•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 13 ऑगस्ट 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/Q771Lzsni1kyuKUB/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 💢 *_आंतरराष्ट्रीय डावखुरे दिन_* 💢•••••••••••••••••••••••••••••••••••💢 *_ या वर्षातील २२६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 💢 *_महत्त्वाच्या घटना:_* 💢•••••••••••••••••••••••••••••••••*२००४: ग्रीसमधील अथेन्स येथे २८ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**१९९१: कन्नड साहित्यिक प्रा. विनायक कृष्ण गोकाक यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर**१९६१: आपल्या नागरिकांचे पश्चिम जर्मनीत होणारे स्थलांतर रोखण्यासाठी पूर्व जर्मनीने आपल्या सीमा बंद केल्या. बर्लिनची भिंत बांधण्यास सुरूवात झाली.**१९५४: रेडिओ पाकिस्तान वरुन ’कौमी तराना’ हे पाकिस्तानचे राष्ट्रगीत प्रथमच प्रक्षेपित करण्यात आले.**१८९८: कार्ल गुस्ताव्ह विट याने 433 Eros या पृथ्वीजवळच्या पहिल्या लघुग्रहाचा शोध लावला.**१६४२: क्रिस्टियन हायगेन्स या शास्त्रज्ञाने मंगळाच्या दक्षिण धृवावरील बर्फाच्या टोप्यांचा शोध लावला.* 💢 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 💢 •••••••••••••••••••••••••••••••••*१९९५: नेहा खान -- भारतीय मॉडेल आणि अभिनेत्री**१९९५: प्रभाकर देविदास दुर्गे -- लेखक**१९९०: अमृता कदम नारायणकर -- लेखिका, कवयित्री* *१९८८: माधव श्रीकांत किल्लेदार -- लेखक**१९७६: मनोहर विश्वनाथ इनामदार --- कवी, लेखक**१९६३: अनिता राज खुराना-- भारतीय अभिनेत्री**१९६३: श्रीदेवी -- प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेत्री (मृत्यू: २४ फेब्रुवारी २०१८ )**१९६१: डॉ.अलका संजय इंदापवार -- लेखिका* *१९६१: प्रा. नंदकुमार कुलथे -- प्रसिद्ध लेखक**१९६१: महेश आनंद -- भारतीय अभिनेता, नर्तक आणि मार्शल आर्टिस्ट खलनायकाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध (मृत्यू: ९ फेब्रुवारी २०१९ )**१९५६: रामदास गायधने -- कवी, लेखक**१९५३: डॉ. विजया शशिकांत फडणीस -- मानसतज्ञ/समुपदेशक, लेखिका* *१९५२: फादर वेन्सी डिमेलो एस. जे. - कवी, लेखक* *१९५२: प्रज्ञा रत्नाकर मराठे -- कवयित्री**१९३९: डॉ. अनिल गुलाबचंद गांधी -- कुशल सर्जन, प्रसिद्ध लेखक* *१९३८: प्रा. डॉ. राम घोडे -- लेखक* *१९३६: वैजयंतीमाला बाली ऊर्फ ’वैजयंतीमाला ’ – चित्रपट अभिनेत्री**१९३२: उषा सदाशिव दातार -- प्रसिद्ध लेखिका**१९२६: फिडेल कॅस्ट्रो – क्यूबाचे १५ वे राष्ट्राध्यक्ष**१९१५: माधव श्रीपाद सातवळेकर -- सुप्रसिद्घ महाराष्ट्रीय चित्रकार व महाराष्ट्र शासनाचे भूतपूर्व कलासंचालक(मृत्यू: १६ जानेवारी २००६ )**१९१३: चंद्रकांत मांडरे -- प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते व लेखक (मृत्यू: १७ फेब्रुवारी २००१ )**१९०६: विनायक चिंतामण तथा विश्राम बेडेकर – लेखक व दिग्दर्शक (मृत्यू: ३० आक्टोबर १९९८ )**१८९९: सर अल्फ्रेड हिचकॉक – चित्रपट दिग्दर्शक (मृत्यू: २९ एप्रिल १९८० )**१८९८: प्रल्हाद केशव तथा आचार्य अत्रे – लेखक, कवी, शिक्षणतज्ञ, संपादक, राजकीय नेते, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक,पटकथालेखक आणि वक्ते (मृत्यू: १३ जून १९६९ )**१८९६:कृष्णराव व्यंकटेश गजेंद्रगडकर-- अनुवादक (मृत्यू:१९८१)**१८९०: त्र्यंबक बापूजी ठोंबरे तथा ’बालकवी’ – १९०७ साली जळगाव येथे भरलेल्या पहिल्या कविसंमेलनात वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी केलेल्या कवितावाचनाने प्रभावित होऊन संमेलनाचे अध्यक्ष कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी त्यांना ’बालकवी’ ही उपाधी देऊन त्यांचा गौरव केला. (मृत्यू: ५ मे १९१८ )**१८८८: जॉन लोगे बेअर्ड – स्कॉटिश अभियंता आणि दूरचित्रवाणी (Television) चे संशोधक (मृत्यू: १४ जून १९४६ )**१८५४: वासुदेव गणेश टेंबे ऊर्फ वासुदेवानंद सरस्वती ऊर्फ टेंबे स्वामी -- दत्तोपासना या विषयावर संस्कृत-मराठी रचना करणारे कवी व लेखक (मृत्यू: २४ जून १९१४ )* 💢 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 💢 •••••••••••••••••••••••••••••••••*२०१८: जयवंत नाडकर्णी -- ज्येष्ठ नाट्यकर्मी* *२०१८: सोमनाथ चटर्जी -- भारतीय राजकारणी, माजी लोकसभा अध्यक्ष (जन्म: २५ जुलै १९२९ )**२०००: नाझिया हसन – पाकिस्तानी पॉप गायिका (जन्म: ३ एप्रिल १९६५ )**१९८८: गजानन जागीरदार – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया’चे (FTII) पहिले संचालक (जन्म: २ एप्रिल १९०७ )**१९८०: पुरुषोत्तम भास्कर तथा पु. भा. भावे – अष्टपैलू आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक (जन्म:१२ एप्रिल १९१० )**१९७७: पारुल घोष -- भारतीय पार्श्वगायिका (जन्म: १९१५)**१९६३: शांताराम विष्णू आवळसकर -- मराठी लेखक (जन्म: ९ नोव्हेंबर १९०७ )* *१९१०: आधुनिक शुश्रूषा शास्त्राचा (नर्सिंग) पाया घालणार्या ब्रिटिश परिचारिका फ्लॉरेन्स नायटिंगेल यांचा जन्म. १९०७ मधे त्यांना ’ऑर्डर ऑफ मेरिट’ हा किताब बहाल करण्यात आला. ’नोटस ऑफ नर्सिंग’ हा त्यांचा ग्रंथ नावाजलेला आहे.(जन्म: १२ मे १८२० )**१९४६: एच. जी. वेल्स – विज्ञानकथांसाठी प्रसिद्ध असलेले इंग्लिश लेखक (जन्म: २१ सप्टेंबर १८६६ )**१९३६: मॅडम भिकाजी रुस्तुम कामा – या भारतीय क्रांतिकारक महिला व परदेशातील भारतीय क्रांतिकारकांच्या आधारस्तंभ होत्या. (जन्म: २४ सप्टेंबर १८६१ )**१९१७: एडवर्ड बकनर – आंबवण्याच्या प्रक्रियेसंबंधी केलेल्या संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक (१९०७) मिळवणारे जर्मन रसायनशास्त्रज्ञ (जन्म: २० मे १८६० )**१७९५: महाराणी अहिल्याबाई होळकर – देशातील अनेक महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रातील देवळांचा त्यांनी जीर्णोद्धार केला. (जन्म: ३१ मे १७२५ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*विचार बदला ; देश बदलेल*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *बारावीच्या परीक्षांना ११ फेब्रुवारीपासून, तर दहावीच्या परीक्षांना २१ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार, शिक्षण विभागाकडून प्रसिद्धी पत्रक जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *गोखले इन्स्टिट्यूटची लीड नॉलेज इन्स्टिट्यूट म्हणून नेमणूक, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी केली सामंजस्य करारावर केल्या स्वाक्षरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *अण्णाभाऊंना भारतरत्न मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार - शरद पवारांची ग्वाही ; विश्वास पाटलांच्या 'अण्णा भाऊ दि अपहोल्डर दलित अँड विमेन लिटरेचर' पुस्तकाचे प्रकाशन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *छगन भुजबळांचं आव्हान स्वीकारण्याची चिन्हं,मनोज जरांगे निवडणूक लढवण्याचा निर्णय 29 ऑगस्ट रोजी जाहीर करणार!*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मानधन वाढीसाठी अंगणवाडी सेविकांचा पुन्हा ठिय्या; आझाद मैदानात उतरला लाखोंचा समुदाय!*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *स्वातंत्र्य दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी कापशी रोड गावच्या सरपंच वेणूताई उमाळे यांना निमंत्रण*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *सप्टेंबरमध्ये बांगलादेशच्या क्रिकेट संघाचा भारत दौरा, दोन कसोटी व तीन T20 सामने होणार आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 काही जण रंगाने गोरे, तर काही जण काळे का असतात ? 📕माणसाच्या रंगावर काही अवलंबून नसते. हे खरे असले, तरी काळ्या रंगाच्या लोकांना गोन्या व्यक्ती सुंदर वाटत असतात; तर गोऱ्या व्यक्तींना काळे लोक तरतरीत. स्मार्ट वाटत असतात. एकूण काय स्वत जवळ जे आहे. त्यापेक्षा दुसऱ्याकडचे जास्त आवडणे हा माणसाचा स्वभाव आहे. पण काहीजण गोरे का असतात आणि काही जण काळे का असतात, हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. विशेषतः एकाच आईच्या पोटी जन्म घेणाऱ्या दोन मुलांचे रंगही वेगळे असतात, हे तुम्ही पाहिलेच असेल. असे का ते आता समजून घेऊ.त्वचेची रचना दोन घरांमध्ये असते. यातला वरचा किंवा बाहेरचा घर (बाह्यत्वचा) पेशींच्या पाच थरांनी बनलेला असतो. यापैकी सर्वात खालच्या पेशीथरातून पेशी सतत निर्माण होत असतात व त्या हळूहळू वर सरकतात. या बाह्यत्वचेमध्ये रक्तपुरवठा किंवा मज्जातंतू नसतात. पोषण आणि संवेदना या दोन्हींसाठी त्याला खालच्या बराबर अवलंबून राहावे लागते. बाह्यत्वचेच्या पेशीथरांमध्ये मेलॅनीन नावाचे रंगद्रव्य असते. मेलॅनोसाईट नावाच्या पेशीपासून संप्रेरकाच्या नियंत्रणाखाली या द्रव्याची निर्मिती होत असते. मेलॅनिनचे प्रमाण हे आनुवंशिकता, वातावरण, स्त्री पुरुष भेद, वय इ. विविध गोष्टींवर अवलंबून असते. आणि या रंगद्रव्याच्या प्रमाणावरूनच त्वचेचा काळे-गोरेपणा ठरतो. त्यामुळे निग्रोची मुले सामान्यत: काळ्या रंगाची असतात. ऊन्हात काम करणारे लोक काळवंडतात, तर शरीराच्या ज्या भागाला ऊन लागत नाही तो भाग इतर भागांपेक्षा उजळ दिसतो. लहान मुले वयस्कर लोकांपेक्षा जास्त गोरी दिसतात. “आमचा राहूल लहानपणी फारच गोरापान होता हो, आताच काळवंडलाय...'' असं तुमची आई म्हणते ते खरेच असते! अर्थात त्वचेचा रंग मुख्यत्वे मेलॅनीनमुळे ठरत असला, तरीही इतर दोन रंगद्रव्येही महत्त्वाची असतात. एक म्हणजे त्वचेखालच्या चरबीतले पिवळे द्रव्य कॅरोटीन आणि दुसरे म्हणजे त्वचेच्या रक्तप्रवाहातील हिमोग्लोबीन हे रक्तद्रव्य. यावरून तुमच्या लक्षात आले असेल की, आपला रंग मेलॅनीन, कॅरोटीन व हिमोग्लोबीन या तीन द्रव्यांवरून ठरतो.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्ञानसंग्रह करण्याचे प्रबळ साधन म्हणजे वाचन होय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पी. आर. श्रीजेश यांनी नुकतेच हॉकीमधून निवृत्तीची घोषणा केली आहे, ते कोणत्या राज्याचे खेळाडू आहेत ?२) डॉ. मोहम्मद युनूस यांनी कोणत्या देशाच्या हंगामी पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे ?३) पालघर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी देशातील सर्वात मोठे बंदर उभारण्यात येणार आहे ?४) 'दुर्दशा' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) महाराष्ट्रातील पहिले रेन वॉटर हार्वेस्टिंग गाव कोणते ? *उत्तरे :-* १) केरळ २) बांगलादेश ३) वाढवण ४) दुरवस्था, दुःस्थिती ५) हिवरे बाजार, अहमदनगर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुयोग पेनकर, CFO विद्यालांकर क्लासेस, मुंबई👤 डॉ. प्रशांत सब्बनवार, कुंडलवाडी, बिलोली👤 चंद्रकांत पाटील, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, धर्माबाद👤 योगेश येवतीकर, धर्माबाद👤 नरेंद्र रेड्डी, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद👤 गणेश धाकतोडे👤 नागेश गुर्जलवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जब मै था तब हरी नहीं अब हरी है मै नाहीं।सब अधियारा मिट गया जब दीपक देखा माहि ॥ 42 ॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुसऱ्यांची लायकी काढणारी व्यक्ती, स्वतः मधील लायकी संधी मिळेल तेव्हा, तेव्हा आपली योग्यता दाखविण्याचा प्रयत्न करत असते. कदाचित त्याकडे भरपूर वेळ असू शकते. पण,जी व्यक्ती कोणाचीही लायकी काढत नाही किंवा कोणतेही भेदभाव करत नाही ती व्यक्ती किती लायक असते हे अनेकांना तर काय निसर्गाला सुद्धा माहीत असते. म्हणून कोणाचीही लायकी काढण्यात वेळ वाया घालवू नये. आपण माणूस प्राणी आहोत निदान एवढे तरी विसरु नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *❃ एकाग्रता ❃* *एकदा एक स्वामीजी काही मुलांचे निरीक्षण करत होते*. ती मुले पुलावर उभे राहून नदीवर तरंगत जाणार्या अंड्याच्या टरफलावर बंदुकीने नेम साधण्याचा प्रयत्न करत होती. पाण्यामुळे ती टरफले वर-खाली होत होती. मुलांना त्यांच्यापैकी एकही टरफलावर नेम धरता आला नाही. त्यांनी अनेक वेळेला बंदूक झाडली पण प्रत्येकवेळी त्यांचा नेम चुकत राहिला. त्यांच्याकडे बराच वेळ स्वामीजींचे लक्ष होते. मुलेही हे पाहत होती. मुलांनी स्वामीजींना म्हटले," तुम्ही नुसतेच आमच्याकडे काय पाहत आहात? का आम्हाला नेम धरता येत नाही असे तुम्हाला वाटते? आणि असे असेल तर तुम्ही नेम धरून ती टरफले फोडून दाखवा. तुम्हाला जर असे वाटत असेल की तुम्हाला आमच्यापेक्षा अधिक चांगले जमते असे वाटते का?" स्वामीजी हसले आणि म्हणाले," मी प्रयत्न करून पाहतो." मुले म्हणाली," तुम्हाला वाटते तितके ते सोपे नाहीये." स्वामीजींनी बंदूक हातामध्ये घेतली आणि त्या अंड्याच्या टरफलावर नेम धरला, काही मिनिटे निश्चल राहिले, मग त्यांनी बंदूक चालवली, त्यांनी बारावेळा गोळ्या झाडल्या आणि बारावेळेला अंड्यांची टरफले उडविण्यात स्वामीजींना यश आले. त्या मुलांना फारच आश्चर्य वाटले,"एखादा माणूस पाण्यातील वाहणार्या अंड्याच्या टरफलावर इतका अचूक कसा नेम साधू शकतो?" असा प्रश्न त्यांना पडला. स्वामीजींनी मुलांच्या मनातील हे ओळखले, त्यांना ती मुले आवडली होती. ते म्हणाले,’’ जे काही तुम्ही करत होता त्यावर तुमचं मन एकाग्र करा. नेमबाजी करा किंवा अन्य काही. तुमचं लक्ष फक्त लक्ष्यावरच पाहिजे. तुमचा नेम कधीच चुकणार नाही. एकाग्रतेने बरेच काही साध्य करता येते. अवघड वाटणा-या गोष्टीसुद्धा या एकाग्रतेने सहजसाध्य होतात.’’ मुले स्वामींजींपुढे नतमस्तक झाली. *_🌀तात्पर्य_ :~*ध्येय प्राप्ती साठी एकाग्रता फार महत्वाची आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 12 ऑगस्ट 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://surveyheart.com/form/66ad9d9e311b89197db7723b••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔅 *_आंतरराष्ट्रीय युवा दिन_* 🔅••••••••••••••••••••••••••••••🔅 *_आंतरराष्ट्रीय हत्ती दिन_* 🔅••••••••••••••••••••••••••••••🔅 *_भारतीय ग्रंथपाल दिवस_* 🔅•••••••••••••••••••••••••••••••••🔅 *_ या वर्षातील २२५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🔅 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔅•••••••••••••••••••••••••••••••••*२००५: श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री लक्ष्मण कादिरमगार यांची तामिळ अतिरेक्यांनी हत्या केली.**२००२: १२ वर्षे ७ महिने वयाचा सर्गेई कार्जाकिन हा युक्रेनचा खेळाडू जगातील सर्वात लहान वयाचा बुद्धीबळातील ग्रँडमास्टर बनला.**२०००: प्रसिद्ध पर्यावरणवादी कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची गांधी सेवा पुरस्कारासाठी निवड**१९९८: सचिन तेंडुलकर यांना ‘राजीव गांधी खेल रत्न‘ पुरस्कार जाहीर**१९९५: जागतिक मैदानी स्पर्धेत अमेरिकेच्या मायकेल जॉन्सनने २०० मी आणि ४०० मी अशा दोन्ही धावण्यांच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवले. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच पुरुष धावपटू आहे.**१९८९: कुसूमाग्रज यांच्या अध्यक्षतेखाली पहिली 'जागतिक मराठी परिषद’ मुंबई येथे सुरू झाली.**१९८२: परकीय कर्जाचे हप्ते चुकवता येत नसल्यामुळे मेक्सिकोने दिवाळे काढले. त्यामुळे दक्षिण अमेरिका व तिसर्या जगातील देशांमधे आर्थिक आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली.**१९८१: आय. बी. एम. कंपनीचा पहिला पर्सनल कॉम्प्युटर बाजारात आला.**१९७७: श्रीलंकेत झालेल्या वांशिक दंगलीत ३०० हुन अधिक तामिळ ठार झाले.**१९६४: वंशभेद केल्याबद्दल दक्षिण अफ्रिकेची ऑलिम्पिक स्पर्धांमधुन हकालपट्टी झाली.**१९५०: अमेरिकन युद्धकैद्यांना उत्तर कोरियन सैन्याने ठार मारले.**१९४८: लंडनमधे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने हॉकीमधे सुवर्णपदक मिळवले.**१९४२: चले जाव चळवळ – पुण्यातील अप्पा बळवंत चौकात रणगाडे आणून गोळीबार, २ ठार १६ जखमी**१९२२: राम गणेश गडकरी यांच्या निधनानंतर जवळजवळ ४ वर्षांनी त्यांनी लिहीलेल्या ’राजसंन्यास’ नाटकाचा पहिला प्रयोग झाला.**१९२०: शिवराम महादेव परांजपे यांनी ’स्वराज्य’ नावाचे साप्ताहिक सुरू केले.**१८५१: आयझॅक सिंगरला शिवणाच्या मशीनचे पेटंट मिळाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* 🔅•••••••••••••••••••••••••••••••••*१९९५: सारा अली खान -- चित्रपट अभिनेत्री**१९६२: सुरेश वांदिले -- एक बहुआयामी, पथदर्शी,भविष्यवेधी लेखक तथा पूर्व संचालक माहिती व जनसंपर्क विभाग* *१९५९: गुरुनाथ तेंडुलकर -- कथाकार* *१९५९: प्रवीण महादेव ठिपसे -- 'ग्रॅंडमास्टर किताब मिळवणारे पहिले भारतीय बुद्धिबळ खेळाडू**१९५६: चित्रा जगदीश शर्मा-- लेखिका, कथाकार* *१९५३: कांताराम गंगाराम सोनवणे -- कवी, लेखक,पत्रकार* *१९५२: अनंत सामंत -- प्रसिद्ध मराठी लेखक**१९४८: फकिरा मुंजाजी तथा ’फ. मुं.’ शिंदे – प्रसिद्ध कवी, समीक्षक व अनुवादक**१९४४: मिलिंद श्रीपती येरमाळकर -- कवी लेखक**१९३४: वसंतराव आजगावकर -- मराठी भावगीत गायक आणि संगीतकार* *१९२६: बी. आर. तथा अप्पासाहेब खेडकर – गणेशमुर्तीकार ते शिल्पकार (मृत्यू: १३ ऑगस्ट २०१६ )**१९२४: मुहम्मद झिया उल हक – पाकिस्तानचे ६ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १७ ऑगस्ट १९८८ )**१९१९: डॉ. विक्रम साराभाई – भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार (मृत्यू: ३१ डिसेंबर १९७१ )**१९१४: तेजी हरिवंशराय बच्चन -- भारतीय सामाजिक कार्यकर्ता (मृत्यू: २१ डिसेंबर २००७ )**१९०६: लेफ्टनंट जनरल शंकरराव पांडुरंगराव (पाटील) तथा एस. पी. पी. थोरात -- संयुक्त राष्ट्रसंघाने शांतता प्रस्थापनेसाठी कोरियात पाठवलेल्या शांतिसेनेचे ते सेनापती होते. कीर्तिचक्र, पद्मश्री, सावरकर पुरस्कार असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले होते. (मृत्यू: १० ऑगस्ट १९९२ )**१८९२: एस. आर. रंगनाथन – भारतीय गणितज्ञ व ग्रंथालयशास्त्रतज्ञ (मृत्यू: २७ सप्टेंबर १९७२ )**१८८७: आयर्विन श्रॉडिंगर – नोबेल पारितोषिक विजेता ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ४ जानेवारी १९६१ )**१८८१: सेसिल डी मिल – अमेरिकन चित्रपट अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक (मृत्यू: २१ जानेवारी १९५९ )**१८८०: बाळकृष्ण गणेश खापर्डे – चरित्रकार, वाड्मयविवेचक ( मृत्यू: १९६८ )**१८०१: जॉन कॅडबरी – ब्रिटिश उद्योगपती व ’कॅडबरी’ चे संस्थापक (मृत्यू: १२ मे १८८९ )* *_ मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन _*🔅••••••••••••••••••••••••••••••••• *२०२२: माधव गरड --ज् येष्ठ कवी, ललित लेखक (जन्म: २५ ऑक्टोबर १९६० )* *२००५: लक्ष्मण कादिरमगार – श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री, मुत्सद्दी, वकील व तामिळ नेते (जन्म: १२ एप्रिल १९३२ )**१९९७: गुलशन कुमार दुआ -- संगीत निर्माता व कॅसेट इंडस्ट्रीज लिमिटेड (टी-सीरीज) चे संस्थापक (जन्म: ५ मे १९५१ )**१९८२: हेन्री फोंडा – अमेरिकन अभिनेते (जन्म: १६ मे १९०५ )**१९७३: दयानंद बाळकृष्ण ऊर्फ ’भाऊसाहेब’ बांदोडकर – गोव्याचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे संस्थापक, उद्योगपती आणि दानशूर (जन्म: १२ मार्च १९११ )**१९६४: इयान फ्लेमिंग – दुसर्या महायुध्दातील गुप्तहेर, लेखक, पत्रकार आणि ’जेम्स बाँड’चा जनक (जन्म: २८ मे १९०८ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दिनांक 15 ऑगस्ट 2015 रोजी प्रारंभ झालेल्या *फ्रेश मॉर्निंग बुलेटिन* ला पाहता पाहता नऊ वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने पालक, शिक्षक व विद्यार्थी यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी एक प्रयत्न म्हणून google फॉर्म तयार केला आहे. तरी ते भरून भरून आपले अमूल्य प्रतिक्रिया कळवावे. ही नम्र विनंती..... प्रतिक्रिया नोंद करण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नांदेडमध्ये काँग्रेसची आढावा बैठक संपन्न, काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांनी गाजविली सभा.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सोलापुरातील कुर्डूवाडीत शरद पवारांची गाडी मराठा आंदोलकांनी रोखली, मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कितीही पैसा लागू दे, जसं होतं तसंच केशवराव भोसले नाट्यगृह उभं करा; अजितदादांकडून स्पष्ट निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *हिंगोलीत आज मराठवाड्यातील सर्वात मोठी कावड यात्रा, मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह मंत्र्यांची उपस्थिती राहणार; 50 हजार भाविकांची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *जुनी पेन्शन योजना संदर्भांत राज्य सरकारी कर्मचारी संघटना कृती समिती 29 ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *उपचारांसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन, पैलवान विजय डोईफोडेच्या उपचारांसाठी ‘पुनीत बालन ग्रुप’कडून 5 लाखांची मदत*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *नोकरीसाठी नव्हे, तर सुवर्ण पदकांसाठी खेळतो, नेमबाज मनू भाकर आणि सरबज्योत सिंग हरियाणा सरकारची नोकरीची ऑफर नाकारली*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *वसाहती अंतराळातील* 📙 विज्ञानकथाकारांना आकर्षक वाटणारी अंतराळ वसाहतींची कल्पना आता मुर्त ठरू पाहत आहे. १९५७ साली स्पुटनिकने अंतराळ तंत्रज्ञानाची सुरुवात झाली. १९६९ मध्ये मानव चंद्रावर गेला. तर १९८०-९० सालच्या दशकात अंतराळवीरांनी पृथ्वीभोवती चक्कर मारणार्या स्पेस शटलसदृश यानात जास्त वेळ राहण्याचे विक्रम सुरू केले. अंतराळ वसाहत म्हणजे अशाच पद्धतीने पृथ्वीभोवताली फिरणारी वसाहतच, जी अंतराळात मानवी जीवनासाठी लागणार्या सर्व सुविधा पुरवू शकेल.अंतराळातील वसाहतीत पृथ्वीपेक्षा सर्वात मोठा जाणवणारा फरक म्हणजे तेथील अतिसूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा. पृथ्वीच्या आकर्षणामुळे प्रत्येक वस्तूला वजन असते. आपल्या शरीराला, मेंदूला, मनाला ह्या वजनाची सवय झालेली असते. अमुक वजन पेलता यावे म्हणून स्नायूंचे गठन झाले असते. अंतराळात गुरुत्वाकर्षण जवळजवळ नसल्याने आपण वसाहतीत तरंगू, तसेच वर खालीचा फरक नाही ! पेल्यातला द्रव पेला उघडा केला तर खाली पडत नाही. तो झटकून काढला की, गोळ्याच्या स्वरूपात तरंगतो. अर्थात हे विचित्र अनुभव आपल्याला खातापिताना आणि देहधर्मांसाठी येणार ! अाणि अशा स्थितीत सतत राहिल्याने मानसिक परिणाम काय होतील, ते सतत अभ्यासले जात आहेत.अंतराळात वसाहत उभी करणे वाटते तितके अवघडही नाही; कारण 'वजन' हा गुण नसल्याने सिमेंट काँक्रीटचे भव्य प्रासाद बांधायची सूर नाही, हलके साहित्य चालेल. अशा घरबांधणीचे अर्थातच नवे शास्त्र असेल. शिवाय गुरुत्वाकर्षणाचा अभाव असल्याने द्रव ठेवायला पेला नको, तसेच दोन द्रवांचे मिश्रण अधांतरी करता येईल. अशा स्थितीचा फायदा घेऊन काही अतिशुद्ध औषधे बनवता येतील, ज्यांना भांड्याचा संसर्ग नाही. धातूंची मिश्रणे (नव्या प्रकारची) करणेसुद्धा अंतराळात शक्य होईल. गुरुत्वाकर्षणविरहित अवस्थेतील वैज्ञानिक प्रयोग इथे करता येतील.एकूण अंतर वसाहत हे आता स्वप्न राहिले नसून विज्ञान तंत्रज्ञानाच्या विकासातील एक संभाव्य टप्पा आहे. केवळ पृथ्वीवर जागा नाही म्हणून अंतराळात राहावे, असे कोणी म्हणणार नाही. उलट तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन लोकसंख्या काबूत आणणे अधिक व्यवहार्य आहे. परंतु जे औद्योगिक आणि वैज्ञानिक प्रकल्प गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवर राबवणे शक्य नाही, ते अशा वसाहतीत करता येतील, हे त्यांचे वैशिष्ट्यच. शिवाय अंतराळात जवळजवळ पोकळी असल्याने वसाहतीबाहेरच्या पोकळीतदेखील वेगळे प्रयोग करता येतील. त्यांच्यासाठी पृथ्वीवर कृत्रिम पोकळी निर्माण करणे खर्चाचे असेल.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्याची चांगुलपणावर श्रद्धा आहे त्याला कशाचेही भय वाटत नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २०२४ या वर्षाचा रसायनशास्त्राचा शांती स्वरूप भटनागर पुरस्कार ( राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार ) कोणाला जाहीर झाला आहे ?२) भारतातील कोणता पुरस्कार हा नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो ?३) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना फिजी या देशाच्या कोणत्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?४) 'दुनिया' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) फिजी या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता ? *उत्तरे :-* १) विवेक पोलशेट्टीवार, वैज्ञानिक २) शांती स्वरूप भटनागर पुरस्कार ३) कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी ४) जग ५) कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 जेष्ठ कवी फ. मुं. शिंदे, छत्रपती संभाजीनगर👤 वसंत हंकारे, व्याख्याते व प्रबोधनकार, सांगली👤 रवीकुमार येळवीकर, नांदेड👤 पोतन्ना लखमावाड, पत्रकार, धर्माबाद👤 चंद्रकांत गायकवाड, शिक्षक तथा साहित्यिक, मुखेड👤 मंगेश पापनवार, वसमत👤 दीपक कोकरे👤 आशिष अग्रवाल👤 श्रीनिवास बिचकेवार, धर्माबाद👤 पांडुरंग गायकवाड👤 बालाजी घायाळ*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गुरु सो भेद जो लीजिये शीश दीजिये दान।बहुतक भोंदू बहि गये गखि जीव अभिमान ॥ 41 ॥ ।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपले जर विचार सकारात्मक असतील आणि त्याच प्रकारचे जगणे असेल तर कोणाच्या समोर खोटे बोलून स्वतः चा समाधान करण्याची आवश्यकता पडत नाही. कारण ज्या प्रकारचे विचार असतील त्या प्रकारच्या वागण्यातून आपोआप दिसत असते.फरक एवढेच की, सकारात्मक विचार करुन जगणारे खोट्याला कधी साथ देत नाही व खोटे बोलणारे सत्य स्वीकार करायला तयार नसतात म्हणून शेवटी ते, नको त्या वाटेने जाऊन पश्चातापात पडत असतात. म्हणून अशी वेळ आपल्यावर येऊ नये यासाठी नेहमीच सकारात्मक विचारांना आत्मसात करुन जगण्याचा प्रयत्न करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सिंह आणि उंदीर*" उन्हाळ्याच्या दिवसात, एक सिंह, एका आंब्याच्या थंड छायेत सुस्त निजला होता; तिथे एक उंदीर येतो. तो उंदीर सिंहला खूप त्रास देतो. त्यामुळे जागा होऊन, सिंहने पंजात उंदीरला धरला आणि त्यास आता फाडून टाकणार इतक्यात, त्या उंदराने त्याची प्रार्थना केली, ‘महाराज, आपण थोर, सर्व श्वापदांचे राजे, मी आपल्यापुढे केवळ रंक, माझ्या रक्ताने आपले हात विटाळू नयेत. मला जीवदान दयावे, हेच आपणास उचित आहे.’ ते ऐकून सिंहास त्याची दया आली आणि त्याने त्यास सोडून दिले.पुढे एके दिवशी सिंह अरण्यात फिरत असताना आंब्याच्या झाडाजवळ जातो, त्याच आंब्याजवळ पारध्याने जाळे मांडले होते, त्यात सिंह सापडतो. त्यावेळी त्याने आपले सगळे बळ खर्चून फार धडपड केली. पण त्याची सुटका होईना. तेव्हा तो निराश झाला आणि मोठमोठयाने ओरडू लागला. ती ओरडणं ऐकून तो उंदीर त्या ठिकाणी आला आणि सिंहास म्हणाला, ‘राजा, भिऊ नको, स्वस्थ रहा. ’ इतके बोलून, त्याने आपल्या दातांनी ते जाळे कुरतडले व सिंहाची सुटका केली.*तात्पर्य:-*जे मोठे आहेत त्यांचेही एखादे मोठे काम लहानाच्या हातून, एखादे वेळी होते. यासाठी, कोणास क्षुद्र समजून त्याचा उपहास करू नये किंवा त्यास दुखवू नये. लहानाच्या हातूनही उपकार होऊ शकतात, हे लक्षात ठेवावे. वैभव कायम राहीलच, असा नेम नाही, यासाठी आपल्या चालत्या काळी, मनुष्याने लोकांवर उपकार करून ठेविले, तर पडत्या काळात तेच "•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 10 ऑगस्ट 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/rw6VVBFxftZ9eYgx/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟥 *_ आंतरराष्ट्रीय बायोडीज़ल दिवस_* 🟥••••••••••••••••••••••••••••••••••••🟥 *_जागतिक सिंह दिवस_* 🟥••••••••••••••••••••••••••••••••••🟥 *_ या वर्षातील २२३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟥 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟥•••••••••••••••••••••••••••••••••*१९९९: औषधांच्या दुकानांत विकल्या जाणार्या औषधांत प्राणिज पदार्थ असल्यास त्याचा उल्लेख वेष्टणावर करणे अनिवार्य असल्याचा केंद्रसरकारच्या सामाजिक न्याय खात्याचा निर्णय.* *१९९९: ’इंडियन फिजिक्स असोसिएशन’ तर्फे देण्यात येणारा ’डॉ. मो. वा. चिपळोणकर स्मृती पुरस्कार’ डॉ. निवास पाटील व डॉ. प्रकाश तुपे यांना जाहीर**१९९०: मॅगेलान हे अंतराळयान शुक्रावर पोचले.**१९८८: दुसर्या महायुद्धात बेकायदेशीरपणे बंदिवासात टाकलेल्या किंवा हद्दपार केलेल्या जपानी वंषशाच्या अमेरिकन नागरिकांना राष्ट्रपती रोनाल्ड रेगन यांनी प्रत्येकी २०,००० डॉलर भरपाई देण्याचे कबूल केले.**१८२१: मिसुरी हे अमेरिकेचे २४ वे राज्य बनले.**१८१०: ’स्मिथसोनियन इन्स्टिट्युशन’ ची स्थापना झाली.* 🟥 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟥 ••••••••••••••••••••••••••••••••• *१९९१: प्रदीप दत्ताराम बडदे -- कवी* *१९६६: आशा वेलणकर -- मराठी अभिनेत्री**१९६५: ज्योत्स्ना प्रदीप राजपूत - कवयित्री* *१९६२: निर्मल पांडे -- चित्रपट अभिनेते (मृत्यू::१८ फेब्रुवारी २०१० )**१९६०: देवांग मेहता – भारताच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रणी व्यक्तिमत्त्व आणि नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्विस कंपनीज (NASSCOM) चे अध्यक्ष (मृत्यू: १२ जुलै २००१ )**१९५८: प्रा. डॉ. तरुजा भोसले वळसंगकर -- प्रसिद्ध लेखिका, कवयित्री**१९५७: डॉ. सत्यपाल श्रीवास्तव -- हिंदी व मराठी मध्ये लेखन करणारे लेखक**१९५५: प्रा. डॉ. कुमार शास्त्री -- प्रसिद्ध लेखक, वक्ते* *१९५१: अजित वाच्छानी -- भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन वरील चरित्र अभिनेते (मृत्यू: २५ ऑगस्ट २००३ )**१९३९: हरिहर बाबाराव खंडारे -- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९३४: डॉ. सुधीर नरहर रसाळ -- सुप्रसिद्ध समीक्षक,संपादक* *१९३२: सुरमणी' पंडित रघुनाथ पाणिग्रही -- संगीतकार आणि संगीत दिग्दर्शक (मृत्यू: २५ ऑगस्ट २०१३ )**१९३१: कृष्णचंद्र पंत -- माजी केंद्रीय मंत्री (मृत्यू: १५ नोव्हेंबर २०१२)**१९३०: मनोहर दत्तात्रेय आपटे -संस्थापक (मृत्यू: ६ मे २००२ )**१९२४: राम कृष्ण जोशी -- कथा,कादंबरीकार व बालसाहित्यिक* *१९२०: मधुसूदन बालकृष्ण वर्धे -- कथा, कादंबरी लेखन व संपादक* *१९१७: प्रेम आदिब -- भारतीय अभिनेते (मृत्यू: २५ डिसेंबर १९५९)**१९१६: वसंत साठे --पटकथाकार व 'बॉम्बे पब्लिसिटी सर्व्हिस'चे पार्टनर (मृत्यू: १२ जुलै १९९४ )**१९१५: नारायण धबाडू पाटील -- कवी लेखक**१९१३: डॉ.अमृत माधव घाटगे – संस्कृत व प्राकृत विद्वान (मृत्यू: ८ मे २००३ )**१९०२: नॉर्मा शिअरर – कॅनेडियन - अमेरिकन अभिनेत्री (मृत्यू: १२ जून १९८३ )**१८९४: व्ही. व्ही. गिरी – भारताचे चौथे राष्ट्रपती,लोकसभा सदस्य आणि केंद्रीय मंत्री (मृत्यू: २३ जून १९८० )**१८७४: हर्बर्ट हूव्हर – अमेरिकेचे ३१ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: २० आक्टोबर १९६४ )**१८६०: पं.विष्णू नारायण भातखंडे – संगीतशास्त्रकार, हिन्दुस्थानी संगीताचे प्रसारक, संशोधक व गांधर्व महाविद्यालयाचे एक संस्थापक (मृत्यू: १९ सप्टेंबर १९३६ )**१८५५: ’गान सम्राट’ उस्ताद अल्लादियाँ खाँ – जयपूर -अत्रौली घराण्याचे संस्थापक व कोल्हापूर दरबारचे प्रसिद्ध गायक (मृत्यू: १६ मार्च १९४६ )* 🟥 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟥•••••••••••••••••••••••••••••••••*२०२१: डॉ.बालाजी तांबे-- आयुर्वेद, योग व संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ (जन्म: २८ जून १९४० )* *२०१२: सुरेश दलाल – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गुजराथी कवी, लेखक आणि संपादक (जन्म: ११ आक्टोबर १९३२ )**२०११: पदिंजरेथलाकल चेरियन अलेक्झांडर -- महाराष्ट्राचे माजी राज्यपाल (जन्म: २० मार्च १९२१ )* *२००३: पं.गंगाधर वामन पिंपळखरे -- पुण्यातील जेष्ठ संगीत गुरू (जन्म: १२ जून १९११ )**१९९७: नारायण पेडणेकर – कवी व नाट्यसमीक्षक* *१९९२: लेफ्टनंट जनरल शंकरराव पांडुरंग पाटील (SPP) थोरात -- संयुक्त राष्ट्रसंघाने शांतता प्रस्थापनेसाठी कोरियात पाठवलेल्या शांतिसेनेचे ते सेनापती होते. कीर्तिचक्र, पद्मश्री, सावरकर पुरस्कार असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले होते. (जन्म: १२ ऑगस्ट १९०६ )**१९८६: जनरल अरुणकुमार वैद्य -- १९६५ आणि १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात अतुलनीय शौर्य गाजवल्याबद्दल त्यांना ’महावीरचक्र’ मिळाले होते. त्यांच्या लष्करप्रमुखपदाच्या काळातच ’ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ची कारवाई झाली होती. (जन्म: २७ जानेवारी १९२६ )**१९८२: मनाली कल्लट तथा एम. के. वैणू बाप्पा – भारतीय खगोलशास्त्रज्ञ. तार्यांची प्रत आणि त्यांच्या वर्णपटातील परस्परसंबंधांची उकल केली. (जन्म: १० एप्रिल १९२७ )**१९७७: श्यामलाल गुप्ता -- भारतीय कवी आणि गीतकार (जन्म: ९ सप्टेंबर १८९६ )**१९५०: खेमचंद प्रकाश – संगीतकार (जन्म:१२ डिसेंबर १९०७ )**१९४२: हुतात्मा शिरीषकुमार (जन्म: २८ डिसेंबर १९२६ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*हिंदूंचा पवित्र महिना - श्रावण*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *घरोघरी तिरंगा अभियानाचे रूपांतर आता लोकचळवळीत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *ST आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आज अधिवेशन, सकल धनगर समाजाच्या वतीने राज्यव्यापी अधिवेशनाचे आयोजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *12 ऑगस्ट पर्यंत चालणारे अधिवेशन गुंडाळले, दोन्ही सभागृह अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *"जय सेवा, जय बिरसा मुंडा'च्या जयघोषाने दुमदुमले गोंदिया, आदिवासी नृत्य ठरले आकर्षणाचे केंद्र*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *NEET PG परीक्षा 11 ऑगस्टलाच होणार, परीक्षा पुढे ढकलण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाला ग्रामपंचायतीकडून जप्तीची नोटीस, कर थकवल्याने कारवाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकलं; पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं पदकांचा दुष्काळ संपवला, सुवर्ण जिंकत रचला इतिहास*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *अमीबा म्हणजे काय ?* 📙 **************************साऱ्या जगात किमान दहा लाख प्रकारचे प्राणी सापडतात. पण प्राणीशास्त्राबद्दल चर्चा सुरू झाली किंवा अभ्यास करायचे ठरवले की सर्वप्रथम नाव निघते ते अमीबाचेच. एकपेशीय प्राणी हे त्याचे वैशिष्ट्य.१६६५ साली रॉबर्ट हुक या इंग्लिश निसर्गप्रेमी शास्त्रज्ञाने पेशी (Cell) हा शब्द प्रथम वापरला. बुचाच्या अभ्यासामध्ये त्याला आढळलेल्या पेशींचे वर्णन त्याने त्यावेळी करून ठेवले आहे. त्यानंतर मायक्रोस्कोपखाली सर्वच गोष्टी न्याहाळल्या जाऊ लागल्या. स्वतंत्रपणे जगू शकणारा. पुनरुत्पादनाची क्रिया स्वतंत्रपणेच करणारा एकपेशीय असा हा अमीबा त्यानंतर प्रसिद्ध पावला. अमीबा दिसण्यासाठी मायक्रोस्कोपची तशी गरज नसते. काही प्रकारचे अमीबा अर्धा मिलिमीटरएवढे मोठे असतात. ते नुसत्या डोळ्यांनीही पाण्याच्या थेंबात दिसतात. साधे भिंग वापरले, तर त्यांची हालचालही न्याहाळता येऊ शकते. काही जाती मात्र अगदी सूक्ष्मदर्शक यंत्राखाली पाहाव्या लागतात. जेलीचा एखादा गोळा कसा असावा, तसा हा प्राणी सतत स्वतःचा आकार पालटत हालचाल करत असतो. भक्षाच्या शोधात भटकंती करताना अंगाची वेटोळी लांबुडकी पसरत हा भक्षाच्या दिशेने सरकतो. भक्ष्य आवाक्यात आले की त्याला चहूबाजूंनी प्रथम तो गुरफटून टाकतो. अर्थातच याचे भक्ष्य म्हणजे त्याच्या जीवाच्या आकारास साजेसेच असते. छोटे जीवाणू, प्राणिज व वनस्पती शैवाळ सतत गट्टम करत जाणे हा त्याचा नित्यक्रम.भक्ष्य गुरफटून मग पेशीतील पेशीद्रव्यामध्ये विरघळवण्याची क्रिया सुरू होते. यावर नियंत्रण असते पेशीकेंद्राचे. गरजेप्रमाणे पाणीपण शोषले जात असतेच. पचन पूर्ण झाल्यावर नको असलेला भाग व तत्सम द्रव्ये बाहेर टाकली जातात.साध्या पेशीविभाजन पद्धतीने यांची वाढ होत असल्याने यांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर वाढत असते. पाणी, मग ते कसलेही असो, अमीबाचा वावर तेथे आढळणारच. त्यातल्या त्यात साचलेले पाणी, डबकी, चिखल यांमध्ये यांची वाढ चांगली होते. वाहत्या पाण्यात त्या मानाने अमीबा कमी सापडतात. अमीबा या प्राण्याबद्दल माणसाला सतत जागरूक राहावे लागते. पिण्याच्या पाण्यातून माणसाच्या शरीरात अमीबाचा एकदा का प्रवेश झाला की त्याच्या शरीरात सर्वत्र संचार सुरू होतो. वाढही छान होते. सर्व पचनसंस्था पोखरून काढण्याची ताकद या एकपेशीय प्राण्यात आहे. पोटाचे विविध आजार, पोटदुखी, मोठ्या आतड्याचे आजार, यकृताची गंभीर दुखणी या अगदी लहान प्राण्यामुळे होतात. जेमतेम ३० वर्षांपूर्वी या दुखण्यांसाठी फारसे खात्रीचे उपायही नव्हते. आजकाल मात्र यांवर खात्रीची औषध उपलब्ध आहेत. जगाच्या पाठीवर सर्वत्र आढळ असलेला हा अमीबा भारतीय हवामानात सर्व प्रांतांत त्याचे राज्य पसरून आहे.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••" जेव्हा आम्ही नम्रतेने लहान होतो, तेव्हा आम्ही महानतेच्या निकट जातो."*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २०२४ या वर्षाचा *पहिला विज्ञानरत्न पुरस्कार* कोणाला जाहीर झाला आहे ?२) भारतीय विज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता ?३) गोंदियाचे नवे पोलीस अधिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ?४) 'दीन' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) अणुबॉम्बचे जनक कोणाला म्हटले जाते ? *उत्तरे :-* १) गोविंदराजन पद्मनाभन, प्रख्यात बायोकेमिस्ट २) विज्ञानरत्न पुरस्कार ३) गोरख भामरे ४) गरीब ५) ज्युलियस रॉबर्ट, अमेरिकन भौतिक शास्त्रज्ञ*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अशोक मगरे, साहित्यिक, नांदेड👤 राहुल मगरे, नांदेड👤 गणेश मोहिते👤 शुभांगी पवार, साहित्यिक👤 व्यंकटेश पुलकंठवार, आरोग्य विभाग, नांदेड👤 तुकाराम यनगंदलवाड, पुणे👤 हेमंत पापळे, शिक्षक तथा साहित्यिक, कारंजा, वाशिम👤 संतोष येवतीकर, येवती, धर्माबाद👤 यशवर्धन पवार👤 माधव परसुरे👤 नागराज आहिरे👤 दिगंबरराव भीमराव सावंत👤 गोविंदराव शिवशेट्टे👤 सचिन सुरबुलवाड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गुरु पारस गुरु परस है चन्दन बास सुबास |सतगुरु पारस जीवको दीना मुक्ति निवास ॥ 40 ॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आठवण त्यांची काढावी ज्यांनी जग दाखवले, आठवण त्यांची काढावी ज्यांनी चिखलातून वर काढले, आठवण त्यांची काढावी ज्यांनी माणूस बनून माणसाची जाणीव करुन दिली, आठवण त्यांची काढावी जे, फुकटात प्राणवायू देतात आणि आठवण त्यांची काढावी जे, वेळात, वेळ काढून कोणतेही बहाणे न करता मदत केली हे सर्वच त्यागी व नि:स्वार्थी होते आणि आजही आहेत म्हणूनच स्वतः पेक्षा दुसऱ्यांसाठी जगून दाखवले. या सर्वांना क्षणभरासाठी सुद्धा विसरु नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*प्रयत्न* " एकदा एक व्यापारी त्याच्या काही नोकरांबरोबर दुसऱ्या देशात व्यापार🏇🏇🏇 करण्यासाठी जात असतो जाताना त्यांना रस्त्यात वाळवंट लागते. वाळवंटात चालून चालून त्याच्या काही नोकरांना पाण्याविना चक्कर यायला लागते. उन्हामुळे आणि जवळ कोठेही पाणी नसल्यामुळे🚱🚱 नोकर कासावीस होऊ लागतात . 🏖🏖त्यांची अवस्था पाहून व्यापारी मनात विचार करतो जर मीच माघार घेतली तर माझे नोकर पण माघार घेतील. मला माघार घेऊन चालणार नाही. मला आशावादी राहायला हवे. व्यापारी इकडे तिकडे पाहू लागतो त्याला जवळच एक हिरवे झुडूप दिसते. ☘☘☘व्यापारी विचार करतो 🤔🤔कि जर पाणी नाही तर हिरवे झुडूप कसे आले? म्हणजे नक्कीच येथे पाणी असावे . व्यापाऱ्याला हायसे वाटते. 🙂🙂व्यापार्याने नोकरांना तेथे खोदायला सांगितले त्याचे नोकर खोदतात पण खाली दगडच दिसतात. पाणी लागतच नाही व्यापारी म्हणतो आणखी खोल खोदा व्यापारी दगडांना आपले कान लावतो त्याला जमिनी खालील पाण्याच्या प्रवाहाचा आवाज ऐकू येतो. व्यापारी त्या दगडांवर एक हातोडा मारतो. आणि काय आश्चर्य जमिनीतून पाण्याचे कारंजे उडू लागते. ते पाणी पिउन सर्वाना खूप आनंद होतो. त्यांच्या कष्टाचे सार्थक होते.*तात्पर्य – प्रयत्न केला तर यश मिळते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 09 ऑगस्ट 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/u5i7VDgSY7y6EN5t/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🟩 *_ऑगस्ट क्रांतिदिन_* 🟩🟩 *_जागतिक आदिवासी दिन_* 🟩•••••••••••••••••••••••••••••••••🟩 *_ या वर्षातील २२२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०००: भाभा अणूसंशोधन केन्द्राचे (BARC) संचालक डॉ. अनिल काकोडकर यांना दिल्ली येथील ’इन्स्टिट्युट ऑफ इंडस्ट्रियल रिसर्च’ या संस्थेचा सुवर्णमहोत्सवी गौरव पुरस्कार जाहीर**१९९३: छोडो भारत चळवळीच्या सुवर्णजयंती सांगता समारंभा निमित्ताने ’सरहद गांधी’ खान अब्दुल गफार खान यांच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन**१९७५: पंतप्रधानांच्या विरुध्द कोर्टात जाण्यास मनाई करणारे विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले. या वेळी बरेच विरोधी पक्षनेते तुरुंगात होते.**१९६५: मलेशियातुन बाहेर काढल्यामुळे सिंगापूर हा देश स्वतंत्र झाला. आपल्या इच्छेविरुद्ध स्वतंत्र झालेला हा जगातील एकमेव देश आहे.**१९४५: अमेरिकेने जपानच्या नागासाकी शहरावर ’'फॅटबॉय’ हा अणूबॉम्ब टाकला. यात ३९,००० लोक तत्क्षणी म्रुत्यूमुखी पडले तर हजारो लोकांना पुढील अनेक वर्षे किरणोत्सर्गाचे परिणाम भोगावे लागले. प्रथम हिरोशिमा व नंतर नागासाकी या शहरांवर टाकलेल्या अणूबॉम्बमुळे जपानने शरणागती पत्करली आणि दुसरे महायुद्ध संपुष्टात आले.**१९४२: ’चले जाव’ चा नारा दिल्याबद्दल महात्मा गांधींना अटक करण्यात आली.**१९२५: भारतीय स्वातंत्र्यलढा – लखनौजवळ काकोरी येथे रेल्वेवर दरोडा* 🟩 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟩••••••••••••••••••••••••••••••••• *१९९१: हंसिका मोटवानी – अभिनेत्री व मॉडेल**१९९०: ओंकार राऊत -- भारतीय अभिनेता* *१९८३: व्यंकटेश उत्तमराव कल्याणकर -- कवी, लेखक* *१९८०: सुहास खामकर -- जागतिक कीर्तीचे शरीरसौष्ठवपटू* *१९७८: आबिद मन्सूर शेख--- गझलकार**१९७५: महेश बाबू -- दक्षिणात्य चित्रपटातील आघाडीचा अभिनेता**१९७०: अजय बाळकृष्ण कांडर -- प्रसिद्ध कवी, पत्रकार* *१९७०: अपर्णा संत -- गायिका**१९६९: विवेक मुशरन -- भारतीय हिंदी चित्रपट व दूरदर्शन अभिनेता**१९६८: गौरव कुमार आठवले-- जेष्ठ गझलकार (मृत्यू: १३ जानेवारी २०२४ )**१९६७: डॉ. वंदना रवीन्द्र घांगुर्डे -- संगीत नाटकांत काम करणाऱ्या मराठी गायिका व लेखिका* *१९६६: गोविंद पाटील -- कवी**१९६६: अर्जुन धोंडबाजी मेश्राम -- कवी* *१९६२: उस्ताद तौफिक कुरेशी -- भारतीय शास्त्रीय संगीतकार, तालवादक**१९५९: मेधा आलकरी -- लेखिका, अनुवादक**१९५४: गौतम सखारामपंत सूर्यवंशी -- कवी, लेखक* *१९५४: प्रा. बाबुराव दत्तात्रय गायकवाड -- कादंबरी, कथा लेखन करणारे धारवाड येथील लेखक* *१९५२: समीर खक्कर-- चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेते (मृत्यू: १५ मार्च २०२३ )**१९४९: प्रा. रवीचंद्र माधवराव हडसनकर -- कवी, गीतकार, लेखक**१९४७: रमेश पतंगे -- ज्येष्ठ विचारवंत,प्रसिद्ध लेखक पद्मश्री पुरस्कार(२०२२)**१९३६: सावनकुमार टाक -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि गीतकार (मृत्यू: २५ऑगस्ट२०२२ )**१९३३: मनोहर श्याम जोशी -- हिंदी लेखक, पत्रकार आणि पटकथा लेखक (मृत्यू: ३० मार्च २००६ )**१९२०: कृ. ब. निकुम्ब – ‘घाल घाल पिंगा वार्या, माझ्या परसात‘ या कवितेमुळे परिचित असलेले भावकवी. त्यांचे अनेक कवितासंग्रह व ‘सायसाखर‘ हे खंडकाव्य प्रसिद्ध आहे.(मृत्यू: ३० जून १९९९ )**१९०९: डॉ. विनायक कृष्ण गोकाक – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक, शिक्षणतज्ञ व इंग्रजी वाङ्मयाचे गाढे अभ्यासक (मृत्यू: २८ एप्रिल १९९२ )**१८९०: ’संगीतसूर्य’ केशवराव भोसले – ’संगीत सौभद्र’ मधील धैर्यधराच्या भूमिकेत गाजलेले गायक अभिनेते.(मृत्यू: ४ आक्टोबर १९२१ )**१८१९: विष्णूदास अमृत भावे – मराठी रंगभुमीचे जनक, त्यांची पन्नासहून अधिक नाट्याख्याने ‘नाट्य्कवितासंग्रह‘ या नावाने प्रसिद्ध झाली आहेत.(मृत्यू: ९ऑगस्ट१९०१ )**१७७६: अॅमेडीओ अॅव्होगॅड्रो – इटालियन रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: ९ जुलै १८५६ )**१७५४: पिअर चार्ल्स एल्फांट – वॉशिंग्टन शहराचे रचनाकार फ्रेन्च अमेरिकन वास्तुविशारद आणि स्थापत्य अभियंता (मृत्यू: १४ जून १८२५ )* 🟩 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟩••••••••••••••••••••••••••••••••• *२०२३: हरी रामचंद्र नरके -- मराठी लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते (जन्म: १ जून १९६३ )**२०२२: प्रदीप पटवर्धन --लोकप्रिय मराठी अभिनेता (जन्म: १ जानेवारी १९५८ )**२०१९: प्रा. राम कोलारकर -- साहित्यिक आणि संपादक (जन्म:२३ जून १९३७ )**२०१७: प्रा. शांताराम पवार -- चित्रकार, कवी (जन्म: १७ ऑगस्ट १९३६ )**२००२: शांताबाई दाणी – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी (जन्म: १ जानेवारी १९१८ )**१८९२: वामन शिवराम आपटे -- कोशकार, संस्कृतचे गाढे अभ्यासक (जन्म: १ जानेवारी १८५८ )**१९७६: जान निसार अख्तर – ऊर्दू शायर व गीतकार (जन्म: १४ फेब्रुवारी १९१४ )**१९०१: विष्णूदास अमृत भावे – मराठी रंगभुमीचे जनक, त्यांची पन्नासहून अधिक नाट्याख्याने ‘नाट्य्कवितासंग्रह‘ या नावाने प्रसिद्ध झाली आहेत. (जन्म: ९ऑगस्ट १८१९ )* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी, नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नागपंचमी सणानिमित्त एक रचनाआपल्या डोळ्याला दिसला कुठे सापदचकून सारेच म्हणतात बाप रे बाप !.................. पूर्ण कविता वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मोदी सरकारने लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक २०२४ केले सादर, विधेयक सभागृहाच्या सहमतीने संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्यात आले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर, रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही, गृहकर्ज, वाहन कर्जाचे हप्ते जैसे थे*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *घरकुल योजनेतून लाभार्थ्यांना चार लाख रुपयांची रक्कम द्या, खासदार नीलेश लंके यांची मागणी; घर बांधण्याचा खर्च महागल्याचा आरोप*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुण्यात झिकाचा विळखा! एकाच दिवशी आढळले 7 रुग्ण; सहा गर्भवती महिलांचा समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *हिंगोली विधानसभा मतदारसंघातून मनसेचा उमेदवार जाहीर, भाजप विरोधात बंडू कुटे मैदानात*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगाटचा कुस्तीला अलविदा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पॅरिस : भारताने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकताना स्पेनवर २-१ असा दमदार विजय साकारला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *सलाईन लावण्याचे काय फायदे होतात ?* *************************'डागदर साहेब, दोन तरी सलाईन लावा बघा' किंवा 'एक बाटली सलाईन तरी लावावीच लागेल' अशी रुग्ण डॉक्टरांची वाक्ये नेहमीच ऐकायला मिळतात. सामान्य लोकांना सलाईन म्हणजे जणू संजीवनीच आहे असे वाटायला लागले आहे आणि साध्या इंजेक्शनपेक्षा सलाईन लावल्यावर जास्त पैसे मिळत असल्याने वैद्यक व्यावसायिकही सलाईनचा वापर सढळ हाताने करू लागले आहेत.सलाईन लावावे असे रुग्णांना व डॉक्टरांना दोघांनाही वाटत असले, तरी पण खरेच का सलाईन आवश्यक असते ? सलाईन म्हणजे सोडियम क्लोराइडचे मिठाचे पाण्यातील द्रावण ! हे शिरेतून द्यावे लागते. त्यामुळे ते लगेच रक्तात मिसळले जाते, एवढ्यात त्याचा फायदा. याउलट ते पोटातून दिले, तर रक्तात शोषण व्हायला एक ते दीड तास लागतो. मग सलाईन केव्हा द्यावे लागते ? संडास वा उलट्या जास्त झाल्यास शरीरातील पाणी खूप कमी होते. व्यक्ती बेशुद्धही होतो. अशा काही वेळेला सततच्या मळमळ व उलट्यांमुळे तोंडाने काहीच देता येत नाही. पोटाच्या शस्त्रक्रियेनंतरही तोंडावाटे काही काळ काहीच देता येत नाही. अशा काही विशिष्ट परिस्थितीमध्येच सलाइन लावणे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असते. इतर वेळी मात्र तोंडावाटे द्रवपदार्थ देणेच चांगले. कारण शिरेतून काहीही दिल्यास काही जणांना ताप येऊ शकतो. गंभीर वावड्याने रिअॅक्शन येऊ शकते. तसेच सुई वगैरे निर्जंतुक केलेली नसल्यास कावीळ, एड्स यासारखे रोगही होऊ शकतात. त्यामुळे होता होईस्तोवर सलाईन न घेणेच चांगले. सलाईन म्हणजे शिरेतून दिली जाणारी कोणतेही द्रवरूपातील औषधे असा साधारणत: अर्थ लोक घेतात पण प्रत्यक्षात सलाईनचा अर्थ मिठाचे पाणी असाच आहे ! सलाईन लावणे काही अवस्थांमध्ये प्राण वाचवू शकते, हे जरी खरे असले तरी उठसूट सलाईन लावणे आर्थिक दृष्ट्या पडण्याजोगी नसते व कधी कधी ते जीवावरही बेतू शकते.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आयुष्य हे एक सुंदर प्रवास आहे; प्रत्येक दिवसाला एक नवीन अध्याय मानून जगा.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) विशाळगडावर कंदील पुष्प वर्गातील सापडलेल्या नवीन वनस्पतीला कोणते नाव देण्यात आले आहे ?२) राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ?३) अमेरिकेने जपानच्या नागासाकी या शहरावर कोणत्या दिवशी अणुबॉम्ब टाकला ?४) 'दिन' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) शेख हसीना यांनी नुकतेच कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे ? *उत्तरे :-* १) सेरोपेजिया शिवरायीना २) उपराष्ट्रपती ३) ९ ऑगस्ट १९४५ ४) दिवस, वासर, अह ५) बांगलादेश*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शिवा अंबुलगेकर, शिक्षक तथा साहित्यिक, मुखेड👤 विलास कोळनुरकर, शिक्षाक तथा साहित्यिक, उमरी👤 समाधान बोरुडे, शिक्षक, जालना👤 विलास पाटील करखेलीकर👤 बुधभूषण कांबळे, साहित्यिक, लातूर👤 नवाब पाशा शेख, गटसाधन केंद्र, बिलोली👤 गणेश पांचाळ👤 बालाजी तेलंग👤 विलास पानसरे👤 सुशीलकुमार भालके👤 विनायक कुंटेवाड👤 ऋषिकेश जाधव*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अहम अग्नि निशि दिन जरे गुरु सोचा है मान ।ताको यम नेवता दियो होहु हमार मेहमान ॥ 39 ॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणामुळे कोणाचे भले होते तर कोणामुळे कोणाचे जीवन उद्धस्त होते. त्यात असणारे सुद्धा माणसेच असतात. फरक एवढेच की, प्रत्येकांची विचारसरणी ही वेगवेगळी प्रकारची असते.म्हणून आपल्यामुळे एखाद्याचे जीवन उद्धस्त होणार नाही या प्रकारची विचारसरणी तसेच वागणूक ठेवण्याचा प्रयत्न करावा. भलेही त्यातून काहीच मिळत नसेल तरी जे काही मिळत असते ते, कधीच मिटत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💐 *अच्छा सोचें अच्छा ही होगा*💐 एक राजा की केवल एक टाँग और एक आँख थी। इसके बावज़ूद राजा बहुत बहादुर और बुद्धिमान होने के कारण न केवल अपने राज्य वरन दूसरे राज्यों में भी लोकप्रिय था। एक दिन राजा ने अपनी तस्वीर बनवाने का विचार किया।फिर क्या था, देश विदेश से सुविख्यात चित्रकारों को बुलवाया गया। राजा ने उन सभी से अपनी सुन्दर तस्वीर बनाने के लिए आग्रह किया। सभी चित्रकार सोचने लगे, कि राजा तो एक टाँग और एक आँख से विकलांग है फिर उसकी तस्वीर को बहुत सुन्दर कैसे बनाया जा सकता है? *"असम्भव!"*और यदि तस्वीर सुन्दर नहीं बनी तो राजा गुस्सा होकर दंड देगा।यही सोचकर सभी चित्रकारों ने तस्वीर बनाने से कोई न कोई बहाना बनाते हुए इन्कार कर दिया।तभी पीछे से एक चित्रकार ने अपना हाथ खड़ा किया और बोला,"मैं आपकी बहुत सुन्दर तस्वीर बनाऊँगा जो आपको निश्चय ही पसंद आएगी।" राजा ने भी उसे तुरन्त स्वीकृति दे दी।अब चित्रकार जल्दी से राजा की आज्ञा लेकर तस्वीर बनाने में जुट गया।काफी देर बाद उसने एक तस्वीर बना दी जिसे देखकर राजा बहुत प्रसन्न हुआ और सभी चित्रकारों ने अपने दातों तले उंगली दबा ली। चित्रकार ने एक ऐसी तस्वीर बनायी जिसमें राजा एक टाँग मोड़कर जमीन पर बैठा एक आँख बंद करअपने शिकार पर निशाना लगा रहा है।राजा यह देखकर बहुत प्रसन्न हुआ कि उस चित्रकार ने राजा की कमजोरियों को छिपा कर कितनी चतुराई से सुन्दर तस्वीर बनाई है। राजा ने उसे ढेर सारा इनाम देकर सम्मान से विदा किया।~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 09 ऑगस्ट 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/u5i7VDgSY7y6EN5t/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🟩 *_ऑगस्ट क्रांतिदिन_* 🟩🟩 *_जागतिक आदिवासी दिन_* 🟩•••••••••••••••••••••••••••••••••🟩 *_ या वर्षातील २२२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०००: भाभा अणूसंशोधन केन्द्राचे (BARC) संचालक डॉ. अनिल काकोडकर यांना दिल्ली येथील ’इन्स्टिट्युट ऑफ इंडस्ट्रियल रिसर्च’ या संस्थेचा सुवर्णमहोत्सवी गौरव पुरस्कार जाहीर**१९९३: छोडो भारत चळवळीच्या सुवर्णजयंती सांगता समारंभा निमित्ताने ’सरहद गांधी’ खान अब्दुल गफार खान यांच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन**१९७५: पंतप्रधानांच्या विरुध्द कोर्टात जाण्यास मनाई करणारे विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले. या वेळी बरेच विरोधी पक्षनेते तुरुंगात होते.**१९६५: मलेशियातुन बाहेर काढल्यामुळे सिंगापूर हा देश स्वतंत्र झाला. आपल्या इच्छेविरुद्ध स्वतंत्र झालेला हा जगातील एकमेव देश आहे.**१९४५: अमेरिकेने जपानच्या नागासाकी शहरावर ’'फॅटबॉय’ हा अणूबॉम्ब टाकला. यात ३९,००० लोक तत्क्षणी म्रुत्यूमुखी पडले तर हजारो लोकांना पुढील अनेक वर्षे किरणोत्सर्गाचे परिणाम भोगावे लागले. प्रथम हिरोशिमा व नंतर नागासाकी या शहरांवर टाकलेल्या अणूबॉम्बमुळे जपानने शरणागती पत्करली आणि दुसरे महायुद्ध संपुष्टात आले.**१९४२: ’चले जाव’ चा नारा दिल्याबद्दल महात्मा गांधींना अटक करण्यात आली.**१९२५: भारतीय स्वातंत्र्यलढा – लखनौजवळ काकोरी येथे रेल्वेवर दरोडा* 🟩 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟩••••••••••••••••••••••••••••••••• *१९९१: हंसिका मोटवानी – अभिनेत्री व मॉडेल**१९९०: ओंकार राऊत -- भारतीय अभिनेता* *१९८३: व्यंकटेश उत्तमराव कल्याणकर -- कवी, लेखक* *१९८०: सुहास खामकर -- जागतिक कीर्तीचे शरीरसौष्ठवपटू* *१९७८: आबिद मन्सूर शेख--- गझलकार**१९७५: महेश बाबू -- दक्षिणात्य चित्रपटातील आघाडीचा अभिनेता**१९७०: अजय बाळकृष्ण कांडर -- प्रसिद्ध कवी, पत्रकार* *१९७०: अपर्णा संत -- गायिका**१९६९: विवेक मुशरन -- भारतीय हिंदी चित्रपट व दूरदर्शन अभिनेता**१९६८: गौरव कुमार आठवले-- जेष्ठ गझलकार (मृत्यू: १३ जानेवारी २०२४ )**१९६७: डॉ. वंदना रवीन्द्र घांगुर्डे -- संगीत नाटकांत काम करणाऱ्या मराठी गायिका व लेखिका* *१९६६: गोविंद पाटील -- कवी**१९६६: अर्जुन धोंडबाजी मेश्राम -- कवी* *१९६२: उस्ताद तौफिक कुरेशी -- भारतीय शास्त्रीय संगीतकार, तालवादक**१९५९: मेधा आलकरी -- लेखिका, अनुवादक**१९५४: गौतम सखारामपंत सूर्यवंशी -- कवी, लेखक* *१९५४: प्रा. बाबुराव दत्तात्रय गायकवाड -- कादंबरी, कथा लेखन करणारे धारवाड येथील लेखक* *१९५२: समीर खक्कर-- चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेते (मृत्यू: १५ मार्च २०२३ )**१९४९: प्रा. रवीचंद्र माधवराव हडसनकर -- कवी, गीतकार, लेखक**१९४७: रमेश पतंगे -- ज्येष्ठ विचारवंत,प्रसिद्ध लेखक पद्मश्री पुरस्कार(२०२२)**१९३६: सावनकुमार टाक -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि गीतकार (मृत्यू: २५ऑगस्ट२०२२ )**१९३३: मनोहर श्याम जोशी -- हिंदी लेखक, पत्रकार आणि पटकथा लेखक (मृत्यू: ३० मार्च २००६ )**१९२०: कृ. ब. निकुम्ब – ‘घाल घाल पिंगा वार्या, माझ्या परसात‘ या कवितेमुळे परिचित असलेले भावकवी. त्यांचे अनेक कवितासंग्रह व ‘सायसाखर‘ हे खंडकाव्य प्रसिद्ध आहे.(मृत्यू: ३० जून १९९९ )**१९०९: डॉ. विनायक कृष्ण गोकाक – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक, शिक्षणतज्ञ व इंग्रजी वाङ्मयाचे गाढे अभ्यासक (मृत्यू: २८ एप्रिल १९९२ )**१८९०: ’संगीतसूर्य’ केशवराव भोसले – ’संगीत सौभद्र’ मधील धैर्यधराच्या भूमिकेत गाजलेले गायक अभिनेते.(मृत्यू: ४ आक्टोबर १९२१ )**१८१९: विष्णूदास अमृत भावे – मराठी रंगभुमीचे जनक, त्यांची पन्नासहून अधिक नाट्याख्याने ‘नाट्य्कवितासंग्रह‘ या नावाने प्रसिद्ध झाली आहेत.(मृत्यू: ९ऑगस्ट१९०१ )**१७७६: अॅमेडीओ अॅव्होगॅड्रो – इटालियन रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: ९ जुलै १८५६ )**१७५४: पिअर चार्ल्स एल्फांट – वॉशिंग्टन शहराचे रचनाकार फ्रेन्च अमेरिकन वास्तुविशारद आणि स्थापत्य अभियंता (मृत्यू: १४ जून १८२५ )* 🟩 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟩••••••••••••••••••••••••••••••••• *२०२३: हरी रामचंद्र नरके -- मराठी लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते (जन्म: १ जून १९६३ )**२०२२: प्रदीप पटवर्धन --लोकप्रिय मराठी अभिनेता (जन्म: १ जानेवारी १९५८ )**२०१९: प्रा. राम कोलारकर -- साहित्यिक आणि संपादक (जन्म:२३ जून १९३७ )**२०१७: प्रा. शांताराम पवार -- चित्रकार, कवी (जन्म: १७ ऑगस्ट १९३६ )**२००२: शांताबाई दाणी – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी (जन्म: १ जानेवारी १९१८ )**१८९२: वामन शिवराम आपटे -- कोशकार, संस्कृतचे गाढे अभ्यासक (जन्म: १ जानेवारी १८५८ )**१९७६: जान निसार अख्तर – ऊर्दू शायर व गीतकार (जन्म: १४ फेब्रुवारी १९१४ )**१९०१: विष्णूदास अमृत भावे – मराठी रंगभुमीचे जनक, त्यांची पन्नासहून अधिक नाट्याख्याने ‘नाट्य्कवितासंग्रह‘ या नावाने प्रसिद्ध झाली आहेत. (जन्म: ९ऑगस्ट १८१९ )* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी, नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नागपंचमी सणानिमित्त एक रचनाआपल्या डोळ्याला दिसला कुठे सापदचकून सारेच म्हणतात बाप रे बाप !.................. पूर्ण कविता वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मोदी सरकारने लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक २०२४ केले सादर, विधेयक सभागृहाच्या सहमतीने संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्यात आले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर, रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही, गृहकर्ज, वाहन कर्जाचे हप्ते जैसे थे*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *घरकुल योजनेतून लाभार्थ्यांना चार लाख रुपयांची रक्कम द्या, खासदार नीलेश लंके यांची मागणी; घर बांधण्याचा खर्च महागल्याचा आरोप*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुण्यात झिकाचा विळखा! एकाच दिवशी आढळले 7 रुग्ण; सहा गर्भवती महिलांचा समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *हिंगोली विधानसभा मतदारसंघातून मनसेचा उमेदवार जाहीर, भाजप विरोधात बंडू कुटे मैदानात*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगाटचा कुस्तीला अलविदा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पॅरिस : भारताने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकताना स्पेनवर २-१ असा दमदार विजय साकारला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *सलाईन लावण्याचे काय फायदे होतात ?* *************************'डागदर साहेब, दोन तरी सलाईन लावा बघा' किंवा 'एक बाटली सलाईन तरी लावावीच लागेल' अशी रुग्ण डॉक्टरांची वाक्ये नेहमीच ऐकायला मिळतात. सामान्य लोकांना सलाईन म्हणजे जणू संजीवनीच आहे असे वाटायला लागले आहे आणि साध्या इंजेक्शनपेक्षा सलाईन लावल्यावर जास्त पैसे मिळत असल्याने वैद्यक व्यावसायिकही सलाईनचा वापर सढळ हाताने करू लागले आहेत.सलाईन लावावे असे रुग्णांना व डॉक्टरांना दोघांनाही वाटत असले, तरी पण खरेच का सलाईन आवश्यक असते ? सलाईन म्हणजे सोडियम क्लोराइडचे मिठाचे पाण्यातील द्रावण ! हे शिरेतून द्यावे लागते. त्यामुळे ते लगेच रक्तात मिसळले जाते, एवढ्यात त्याचा फायदा. याउलट ते पोटातून दिले, तर रक्तात शोषण व्हायला एक ते दीड तास लागतो. मग सलाईन केव्हा द्यावे लागते ? संडास वा उलट्या जास्त झाल्यास शरीरातील पाणी खूप कमी होते. व्यक्ती बेशुद्धही होतो. अशा काही वेळेला सततच्या मळमळ व उलट्यांमुळे तोंडाने काहीच देता येत नाही. पोटाच्या शस्त्रक्रियेनंतरही तोंडावाटे काही काळ काहीच देता येत नाही. अशा काही विशिष्ट परिस्थितीमध्येच सलाइन लावणे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असते. इतर वेळी मात्र तोंडावाटे द्रवपदार्थ देणेच चांगले. कारण शिरेतून काहीही दिल्यास काही जणांना ताप येऊ शकतो. गंभीर वावड्याने रिअॅक्शन येऊ शकते. तसेच सुई वगैरे निर्जंतुक केलेली नसल्यास कावीळ, एड्स यासारखे रोगही होऊ शकतात. त्यामुळे होता होईस्तोवर सलाईन न घेणेच चांगले. सलाईन म्हणजे शिरेतून दिली जाणारी कोणतेही द्रवरूपातील औषधे असा साधारणत: अर्थ लोक घेतात पण प्रत्यक्षात सलाईनचा अर्थ मिठाचे पाणी असाच आहे ! सलाईन लावणे काही अवस्थांमध्ये प्राण वाचवू शकते, हे जरी खरे असले तरी उठसूट सलाईन लावणे आर्थिक दृष्ट्या पडण्याजोगी नसते व कधी कधी ते जीवावरही बेतू शकते.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आयुष्य हे एक सुंदर प्रवास आहे; प्रत्येक दिवसाला एक नवीन अध्याय मानून जगा.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) विशाळगडावर कंदील पुष्प वर्गातील सापडलेल्या नवीन वनस्पतीला कोणते नाव देण्यात आले आहे ?२) राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ?३) अमेरिकेने जपानच्या नागासाकी या शहरावर कोणत्या दिवशी अणुबॉम्ब टाकला ?४) 'दिन' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) शेख हसीना यांनी नुकतेच कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे ? *उत्तरे :-* १) सेरोपेजिया शिवरायीना २) उपराष्ट्रपती ३) ९ ऑगस्ट १९४५ ४) दिवस, वासर, अह ५) बांगलादेश*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शिवा अंबुलगेकर, शिक्षक तथा साहित्यिक, मुखेड👤 विलास कोळनुरकर, शिक्षाक तथा साहित्यिक, उमरी👤 समाधान बोरुडे, शिक्षक, जालना👤 विलास पाटील करखेलीकर👤 बुधभूषण कांबळे, साहित्यिक, लातूर👤 नवाब पाशा शेख, गटसाधन केंद्र, बिलोली👤 गणेश पांचाळ👤 बालाजी तेलंग👤 विलास पानसरे👤 सुशीलकुमार भालके👤 विनायक कुंटेवाड👤 ऋषिकेश जाधव*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अहम अग्नि निशि दिन जरे गुरु सोचा है मान ।ताको यम नेवता दियो होहु हमार मेहमान ॥ 39 ॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणामुळे कोणाचे भले होते तर कोणामुळे कोणाचे जीवन उद्धस्त होते. त्यात असणारे सुद्धा माणसेच असतात. फरक एवढेच की, प्रत्येकांची विचारसरणी ही वेगवेगळी प्रकारची असते.म्हणून आपल्यामुळे एखाद्याचे जीवन उद्धस्त होणार नाही या प्रकारची विचारसरणी तसेच वागणूक ठेवण्याचा प्रयत्न करावा. भलेही त्यातून काहीच मिळत नसेल तरी जे काही मिळत असते ते, कधीच मिटत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💐 *अच्छा सोचें अच्छा ही होगा*💐 एक राजा की केवल एक टाँग और एक आँख थी। इसके बावज़ूद राजा बहुत बहादुर और बुद्धिमान होने के कारण न केवल अपने राज्य वरन दूसरे राज्यों में भी लोकप्रिय था। एक दिन राजा ने अपनी तस्वीर बनवाने का विचार किया।फिर क्या था, देश विदेश से सुविख्यात चित्रकारों को बुलवाया गया। राजा ने उन सभी से अपनी सुन्दर तस्वीर बनाने के लिए आग्रह किया। सभी चित्रकार सोचने लगे, कि राजा तो एक टाँग और एक आँख से विकलांग है फिर उसकी तस्वीर को बहुत सुन्दर कैसे बनाया जा सकता है? *"असम्भव!"*और यदि तस्वीर सुन्दर नहीं बनी तो राजा गुस्सा होकर दंड देगा।यही सोचकर सभी चित्रकारों ने तस्वीर बनाने से कोई न कोई बहाना बनाते हुए इन्कार कर दिया।तभी पीछे से एक चित्रकार ने अपना हाथ खड़ा किया और बोला,"मैं आपकी बहुत सुन्दर तस्वीर बनाऊँगा जो आपको निश्चय ही पसंद आएगी।" राजा ने भी उसे तुरन्त स्वीकृति दे दी।अब चित्रकार जल्दी से राजा की आज्ञा लेकर तस्वीर बनाने में जुट गया।काफी देर बाद उसने एक तस्वीर बना दी जिसे देखकर राजा बहुत प्रसन्न हुआ और सभी चित्रकारों ने अपने दातों तले उंगली दबा ली। चित्रकार ने एक ऐसी तस्वीर बनायी जिसमें राजा एक टाँग मोड़कर जमीन पर बैठा एक आँख बंद करअपने शिकार पर निशाना लगा रहा है।राजा यह देखकर बहुत प्रसन्न हुआ कि उस चित्रकार ने राजा की कमजोरियों को छिपा कर कितनी चतुराई से सुन्दर तस्वीर बनाई है। राजा ने उसे ढेर सारा इनाम देकर सम्मान से विदा किया।~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 08 ऑगस्ट 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/cYUnUt5Nq9XMW2jG/?mibextid=xfxF2i••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟫 *_भारत छोडो दिन_* 🟫••••••••••••••••••••••••••••••••••••••🟫 *_ या वर्षातील २२१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟫 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟫•••••••••••••••••••••••••••••••••*२००८: चीनमधील बिंजिंग येथे येथे २९ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**२०००: महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा ’महाकवी कालिदास संस्कृत-साधना पुरस्कार’ पुण्याचे वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी यांना जाहीर**१९९८: संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) सात प्रयोगशाळा औद्योगिक क्षेत्रासाठी खुल्या झाल्या.**१९९४: पुणे येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने फक्त महिलांसाठीच असलेले देशातील पहिले वास्तुशास्त्र महाविद्यालय (Dr. Bhanuben Nanavati College of Architecture for Women) सुरू केले.**१९८५: भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे ’ध्रुव’ ही भारताची सहावी व आतापर्यंतची सर्वात मोठी संशोधनपर अणुभट्टी कार्यान्वित झाली.**१९७४: वॉटरगेट प्रकरण – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी राजीनामा दिला.**१९६७: इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाइन्स, सिंगापूर व थायलँड यांनी ASEAN ची स्थापना केली.**१९६३: इंग्लंडमधे १५ जणांचा टोळीने रेल्वेवर दरोडा टाकुन २६ लाख पौन्ड पळवले.**१९४२: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर (ऑगस्ट क्रांति मैदान) झालेल्या अधिवेशनात ’चले जाव’ चा ठराव मंजुर केला. याप्रसंगी महात्मा गांधींनी ’करेंगे या मरेंगे’ हा संदेश दिला.* 🟫 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟫 ••••••••••••••••••••••••••••••••• *१९८१: रॉजर फेडरर – स्विस लॉन टेनिस खेळाडू**१९७९: जास्मिन रमजान शेख -- कवयित्री, लेखिका, समुपदेशक* *१९७२: छाया बेले --- कवयित्री लेखिका**१९७०: शिवाजी निवृत्ती राव घुगे -- कवी लेखक* *१९६९: डॉ. आशुतोष राराविकर -- अर्थशास्त्रज्ञ व प्रसिद्ध मराठी साहित्यिक* *१९६७: डॉ. मोना मिलिंद चिमोटे -- समीक्षक, संशोधक आणि लेखिका* *१९६४: विवेक दत्तात्रय जोशी -- प्रसिद्ध कवी* *१९५८: अशालता अशोक गायकवाड -- कवयित्री, लेखिका**१९५५: श्याम खांबेकर -- गीतकार व कवी* *१९५१: अरुण वि. देशपांडे --लेखक, कवी, बाल साहित्यिक, समीक्षक**१९४८: प्रा. डॉ. रमेश जाधव -- इतिहास संशोधक**१९४८: कपिल सिब्बल -- प्रसिद्ध भारतीय वकील आणि राजकारणी**१९४७: सुरेशचंद्र वारघडे -- लेखक* *१९४०: दिलीप सरदेसाई –क्रिकेटपटू (मृत्यू: २ जुलै २००७ )**१९३९: डॉ. रंगनाथ नाथराव जोशी-- गीतकार, लेखक* *१९३५: डॉ.लक्ष्मण रामदास नसिराबादकर -- संत साहित्याचे गाढे अभ्यासक (मृत्यू: ४ डिसेंबर २०१८ )**१९३४: डाॅ. माधव आत्माराम चितळे -- जागतिक कीर्तीचे मराठी जलतज्ज्ञ**१९३२: दादा कोंडके – सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते,दिग्दर्शक,संवादलेखक (मृत्यू: १४ मार्च १९९८ )**१९३१: सुमन माटे -- ज्येष्ठ गायिका**१९२६: शंकर पाटील – साहित्यिक, चित्रपट कथालेखक, ग्रामीण कथालेखक, भारतीय चित्रपट महामंडळाचे संस्थापक सचिव आणि ’बालभारती’चे संपादक.(मृत्यू: ३० जुलै १९९४ )**१९२५: डॉ. वि .ग. भिडे – शास्त्र व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु, केंद्र सरकारचे वैज्ञानिक सल्लागार,पद्मश्री (मृत्यू: जून २००६ )**१९२४: यूजीन मेरिल डीच -- अमेरिकन चित्रकार, ॲनिमेटर , कॉमिक्स कलाकार, आणि चित्रपट दिग्दर्शक (मृत्यू: १६ एप्रिल २०२०)**१९२०: उषा श्रीपाद पंडित -- कथालेखिका* *१९१६: सदाशिव रामचंद्र गाडगीळ -- संशोधक, समीक्षक (मृत्यू: ९ ऑक्टोबर २००८ )* *१९१२: बंगळुरू वेंकट तथा बी. व्ही. रमण – जागतिक कीर्तीचे फलज्योतिषी (मृत्यू: २० डिसेंबर १९९८ )**१९१२: तुकाराम केरबा ऊर्फ टी. के. अण्णा वडणगेकर – कोल्हापूरची कलापरंपरा जपणारे चित्र व शिल्पकलेतील दिग्गज (मृत्यू: ३१ मार्च २००४ )**१९०८: सिद्धेश्वरी देवी -- हिंदुस्तानी संगीत शैलीत गाणाऱ्या,वाराणसी येथील गायिका(मृत्यू: १८ मार्च १९७७ )**१९०६: परशुराम महादेव बर्वे -- विज्ञान विषय लेखन करणारे लेखक* *१९०२: पॉल डायरॅक – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: २० आक्टोबर १९८४ )**१८९८: गजानन विश्वनाथ केतकर --निबंधकार, विचारवंत,गीतेचे अभ्यासक ( मृत्यू:१५ जुलै १९८० )* 🟫 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟫••••••••••••••••••••••••••••••••• *२०२१: अनुपम श्याम ओझा -- भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेता(जन्म: २० सप्टेंबर १९५७ )**२०२१: मखराम पवार -- बहुजन महासंघाचे संस्थापक,सह आयुक्त तथा माजी मंत्री म.रा.(जन्म: १ मार्च१९३९ )**२०१७: डॉ.भीमराव गस्ती -- देवदासी प्रथा नष्ट व्हावी म्हणून आयुष्यभर संघर्ष करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक (जन्म: १०मे १९५० )* *२०१३: जयमाला शिलेदार -- हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका आणि नाट्य अभिनेत्री (जन्म : २१ऑगस्ट १९२६ )**१९९९: गजानन नरहर सरपोतदार – चित्रपट निर्माते व दिग्दर्शक (जन्म: २३ एप्रिल १९४०)**१९९८: डॉ.सुमती क्षेत्रमाडे – वैद्यकीय व्यवसाय सांभाळुन साहित्यिक अभिरुची जोपासणार्या लेखिका व कादंबरीकार.(जन्म: ७ मार्च १९१३ )**१८९७: व्हिक्टर मेयर – जर्मन रसायनशास्त्रज्ञ (जन्म: ८ सप्टेंबर १८४८ )**१८२७: जॉर्ज कॅनिंग – ब्रिटनचे पंतप्रधान (जन्म: ११ एप्रिल १७७० )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*देशाची 'युवा भारत' म्हणून ओळख निर्माण करू या ....!*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मंत्रिमंडळ निर्णय ! महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण राबविणार ; 5 वर्षात 30 हजार कोटींचे उत्पन्न, 5 लाख नोकऱ्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *100 पटाच्या विद्यार्थी संख्येला मुख्याध्यापक पद ग्राह्य धरणार, शिक्षणमंत्री दीपक केसरकर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यसभेच्या बारा जागांसाठी पोटनिवडणूक, ३ सप्टेंबर रोजी होईल मतदान. मतदान संपल्यानंतर लगेच मतमोजणी होणार आहे. यात महाराष्ट्रातील दोन जागांचा समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *रक्षाबंधनपूर्वीच बहिणींना मिळणार ओवाळणी ! लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता 17 ऑगस्टला मिळण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *विना परवानगी झाड तोडल्यास आता भरावा लागणार पन्नास हजाराचा दंड, मंत्रीमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पॅरिस ऑलिम्पिक २०२४च्या फायनलला पोहोचलेली भारताची पैलवान विनेश फोगाट अपात्र; 50 किलो वजनी गटात 100 ग्रॅम वजन जास्त भरल्याने कारवाई, भारताला मोठा धक्का*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *श्रीलंकेने भारताचा 110 धावानी केला पराभव, 2-0 ने सिरीज जिंकली*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *कोमा म्हणजे काय ?* 📙 ************************रॉबीन कूकच्या 'कोमा' या कादंबरीवर 'कोमा' हा चित्रपट निघाला. तो अनेकांनी पाहिला असेल. त्यानंतर निघालेल्या बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्येही आपला आवडता नायक, नायिका व त्यांचे मायबाप कोमात गेल्याचे (बिचारे!) तुम्ही बघितले असेल. अधूनमधून 'अमुक तमुक राजकीय पक्षाचे वयोवृद्ध नेते कोमात' अशी बातमीही तुम्ही वाचली असेल. कोमा म्हणजे नेमके काय ? - हा प्रश्न तेव्हापासून तुम्हाला सतावत असेल. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर काही अशी गाढ झोप आहे ज्यातून माणसाला कितीही वेदना होणारे उद्दीपन दिले तरी तो जागा होऊ शकत नाही. झोप वा कोमा यांतील याखेरीच महत्त्वाचा फरक म्हणजे झोपेतला माणूस ठरावीक काळात झोपत असल्याने त्याच्या पोषणाचा प्रश्न निर्माण होत नाही; पण कोमातील माणसाला जर शिरवाटे पोषण पुरवले नाही तर तो जिवंत राहणार नाही.मेंदूचे कार्य काही प्रमाणात बंद पडणे म्हणजे माणूस कोमात जाणे, असे म्हणता येईल. यात मेंदूतील सर्व अत्यंत महत्त्वाच्या केंद्रांचे काम बंद पडते. मेंदूच्या वा त्यावरील आवरणांच्या आजारांमुळे, मेंदुला होणाऱ्या दुखापतींमुळे, अफू व दारू यांच्या विषबाधेमुळे तसेच मधुमेहात व मूत्रपिंडाच्या गंभीर आजारामुळे रुग्ण कोमात जाऊ शकतो. व्यक्तीचा मृत्यू हा मेंदूतील श्वसन, रक्ताभिसरण इत्यादी गोष्टींचे नियंत्रण करणारी केंद्रे निकामी झाल्याने होतो. कोमा हा आजार नसून आजारांमुळे होणारा परिणाम आहे. आजकाल कृत्रिम उपायांनी लंबमज्जा, मज्जारज्जू तसेच सर्व शरीराचा रक्तपुरवठा सुरळीत चालू ठेवता येतो. त्यामुळे कोमात गेलेल्या अशा व्यक्ती बराच काळ जिवंत राहू शकतात. अर्थात त्या शुद्धीवर येणे जवळपास अशक्य असते.भारतीय कायद्याने आता 'मेंदूचा मृत्यू म्हणजे मृत्यू' ही कल्पना मान्य केली आहे. ज्या व्यक्तींच्या मेंदूच्या कार्याचा विद्युत प्रवाहांचा आलेख हा ५ मिनिटे घेतला तरी सरळ रेषेत दाखवतो अशी व्यक्ती मृत झाल्याचे घोषित करून तिच्या शरीरातील मृत्रपिंड, हृदय असे अवयव इतर रुग्णांसाठी वापरता येतात.*डॉ. जगन्नाथ दीक्षित डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन फुलासारखे असू द्या, पण ध्येय मात्र मधमाशीसारखे ठेवा.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पॅरिस ऑलिम्पिक समारोप सोहळ्यात भारताचा ध्वजवाहक कोण असणार आहे ?२) पश्चिम घाटाचा विस्तार किती राज्यात आहे ?३) भारताची युपीआय सेवा स्वीकारणारा पहिला युरोपीय देश कोणता ?४) 'दागिना' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते ? *उत्तरे :-* १) मनू भाकर, शूटर २) सहा ( केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात ) ३) फ्रान्स ४) अलंकार, भूषण ५) राज्यसभा *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अरुण वि. देशपांडे, साहित्यिक, परभणी👤 अवधूत पाटील सालेगावकर👤 चंदू नागुल, नांदेड👤 योगेश ढगे पाटील👤 ऋषिकेश सोनकांबळे👤 लक्ष्मण खमशेट्टी👤 नागेश कानगुलवार👤 रावजी मारोती बोडके👤 संतोष वाढवे👤 रवी वाघमारे👤 गजानन सावंत👤 सौ. रेखा बालाजी सुंकेवार, देगलूर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गुरु सीढ़ी ते ऊतरै शब्द बिहूना होय।ताको काल घसीटि हैं राखि सकै नहिं कोय || 38 || ।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••खेळ कोणताही असो त्यात हार आणि जीत हे दोन्ही कायम असते त्या दोन्ही शिवाय खेळाला महत्व येत नाही. पण, त्यात कोणाची हार झाली असेल त्यावर विचारमंथन केले जाते व जीत झाली असेल त्यात आनंद उत्सव साजरे होताना बऱ्याच ठिकाणी बघायला मिळत असते. पण एक गोष्ट अवश्य लक्षात ठेवावी जेथे हार झाली बघून स्वतःचा समाधान करण्यासाठी कोणावर मोठ्याने हसू नये. तसेच जीत झाली बघून आपला स्वाभिमान कोणत्याही परिस्थितीत तेथे विकू नये कारण, असे केल्याने आपलीच कधी हार होईल हे, आपल्या लक्षात सुद्धा येणार नाही.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *❃ देवाचा मित्र ❃* ••◆•◆•◆★◆•◆•◆•• एक छोटा मुलगा रणरणत्या उन्हात फुलांचे गजरे विकत होता. ऊन खूप होते. तो मुलगा घामाघूम झाला होता. त्याचे अनवाणी पाय भाजत होते. सारखा तो पाय वर-खाली करत होता. तरीही चिकाटी न सोडता तशा रखरखत्या उन्हात पाय भाजत असताना तो गजरे विकत होता. त्याचे भाजणारे पाय बघून एका सज्जन माणसाला फारच वाईट वाटले. त्याने समोरच असलेल्या दुकानातून त्या मुलासाठी एक चप्पल खरेदी केली आणि त्या मुलाला दिली. त्या मुलाला तो म्हणाला ही चप्पल घाल. तुला मी भेट देतोय. यामुळे तुझे पाय भाजणार नाहीत. मुलगा लहान होता. त्याला त्याचे अप्रूप वाटले. त्याने लगेचच चप्पल घालून बघितली. त्याला खूप छान वाटले. तो आनंदी झाला. आनंदात त्या मुलाने त्या माणसाचा हात धरला व त्याला म्हणाला, ""काका, तुम्ही देव आहात का?‘‘ या प्रश्नावर तो सज्जन गृहस्थ आपले दोन्ही हात कानाला लावून म्हणाला, ""अरे नाही रे बाबा, मी देव नाही.‘‘ मुलगा पुन्हा तसाच निरागस हसला म्हणाला, ""काका - तुम्ही देव नाही मग नक्कीच देवाचे मित्र असणार.‘‘ मी कालच देवाला प्रार्थना केली होती. माझे पाय खूप भाजतात. मला चप्पल हवीय. देवानेच तुम्हाला पाठवले. तुम्ही देवाचे मित्रच असणार, हे वाक्य ऐकताच त्या सज्जन माणसाने त्या मुलाला जवळ घेऊन दोन वाक्ये बोलून तेथून त्या मुलाचा निरोप घेतला. संपूर्ण वाटेत त्या सज्जन माणसाच्या मनात एवढाच विचार घोळत होता, आपल्याला देव होता येत नाही; पण देवाचा मित्र होणे मात्र सहज शक्य आहे. खरोखर मित्रांनो आपल्यापैकी कुणीही देवाचा मित्र होऊ शकतो.*स्वामी विवेकानंद म्हणायचे ज्याला चालत्या-बोलत्या माणसातला देव कळत नाही, त्याला दगडातला देव काय कळणार? म्हणून "शीवभावे जीवसेवा "करा व देवाचा मित्र व्हा*"जे का रंजले गांजले -त्यासी म्हणे जो आपुले | तोची साधु ओळखावा -देव तेथेची जाणावा" || •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 07 ऑगस्ट 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/NET7WcxhCvELexv6/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🟪 *_राष्ट्रीय हॅंडल्युम दिवस_* 🟪•••••••••••••••••••••••••••••••••••••••••🟪 *_राष्ट्रीय भाला फेक दिवस_* 🟪••••••••••••••••••••••••••••••••••••••🟪 *_ या वर्षातील २२० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟪 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟪•••••••••••••••••••••••••••••••••*२०००: ब्रिटिश बुद्धिबळ स्पर्धेत नऊ वर्षाखालील गटात भारताच्या संकल्प मोदवलने संयुक्त विजेतेपद मिळवले.**१९९८: अतिरेक्यांनी दार-ए-सलाम, टांझानिया व नैरोबी, केनिया येथील अमेरिकन वकिलातींवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात २१२ लोक ठार झाले.**१९९७: चित्रपट निर्माते गौतम घोष यांना इटालियन दिग्दर्शक सिका यांच्या नावाने दिला जाणारा 'व्हिट्टोरिओ डी सिका’ हा सन्मान जाहीर**१९९१: जमिनीवरुन हवेत मारा करणार्या ’पृथ्वी’ या क्षेपणास्त्राची श्रीहरिकोटा येथे तिसर्यांदा यशस्वी चाचणी**१९८१: सलग १२८ वर्षे प्रकाशित झाल्यावर ’द वॉशिंग्टन स्टार’ हे वृत्तपत्र बंद पडले.**१९८५: भारताचा गीत शेठी याने नवी दिल्ली येथे झालेली बिलियर्ड्स चॅम्पियन स्पर्धा जिंकली**१९४७: मुंबई महानगरपालिकेने ’बेस्ट’ (Bombay Electricity Supply and Transport) कंपनी आपल्या ताब्यात घेतली.**१९४७: थोर हायरडल व त्याच्या सहकाऱ्यांनी बाल्सा लाकडापासुन तयार केलेल्या ’कॉन टिकी’ या तराफ्यातुन १०१ दिवसात पॅसिफिक महासागरात ७,००० किमी प्रवास केला.**१९४२: दुसरे महायुद्ध – प्रशांत महासागरातील ’ग्वाडेल कॅनाल’ येथे अमेरिकन सैन्य उतरले व दुसर्या महायुद्धातील एक भीषण लढाई खेळली गेली. या घटनेतुनच जपानच्या माघारीस सुरुवात झाली.*🟪 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* 🟪•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९१: शेखर खंडेराव फराटे -- लेखक* *१९७८: महावीर चिंतामणी भोमाज -- लेखक* *१९७४: श्रीनिवास दादाराव मस्के -- कवी**१९७२: प्रा. डॉ. शैलेंद्र धर्मदास लेंडे -- लेखक* *१९६४: मनीषा निवास कुलकर्णी -- कवयित्री, लेखिका* *१९६४: माधवी गोगटे -- ज्येष्ठ अभिनेत्री (मृत्यू: २१ नोव्हेंबर २०२१ )**१९६२: मिलिंद मधुकर दिवाकर -- लेखक तथा संचालक पालवी फाउंडेशन* *१९५९: प्रा. डॉ. दत्ता नागोराव डांगे -- प्रसिद्ध कवी, लेखक, संपादक* *१९५५: चेतन दळवी -- मराठी चित्रपटांमधील आणि रंगभूमीवरील अभिनेता**१९५५: सुरेश ईश्वर वाडकर -- मराठी गायक**१९५४: कलीम खान - कवी, गझलकार, लेखक (मृत्यू: १ मे २०२१ )**१९५३: डॉ. प्रतिभा गुरुदत्त देशपांडे -- प्रसिद्ध लेखिका* *१९५१: सरोज चंद्रकांत देशपांडे -- प्रसिद्ध कथालेखिका* *१९५०: प्रा. डॉ. प्रकाश गजानन जोशी -- इतिहास संशोधक व लेखक* *१९४८: ग्रेग चॅपेल – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू व प्रशिक्षक**१९४७: डॉ. यशवंतराव शंकरराव पाटील -- वैचारिक लेखन करणारे लेखक* *१९४६: चित्रा बेडेकर -- मराठी लेखिका होत्या. वैज्ञानिक, सामाजिक, राजकीय विषयांवर लेखन (मृत्यू: १९ डिसेंबर २०१८ )**१९४३: रवींद्र घवी -- लेखक,संपादक (मृत्यू: ५ ऑगस्ट२०१६ )**१९४२: सूर्यनारायण माणिकराव रणसूभे -- हिंदी आणि मराठी साहित्याचे अभ्यासक, समीक्षक* *१९४०: शामसुंदर दत्तात्रय मुळे -- प्रसिद्ध लेखक* *१९३९: प्रभाकर मुरलीधर बागले -- समीक्षक, संपादक* *१९३५: श्रीकांत लागू -- विविध विषयांवर लेखन करणारे मराठी लेखक आणि लागू बंधू मोतीवाले पेढीचे संचालक(मृत्यू :७ मे २०१३)**१९३४: दत्ता हलसगीकर ऊर्फ गणेश तात्याजी हलसगीकर -- कवी, समीक्षक, संपादक (मृत्यू: ९ जून २०१२ )* *१९२५: डॉ.मनकोम्बू साम्बसिवन तथा एम. एस. स्वामीनाथन –भारतातील कृषी शास्त्रज्ञ, भारतीय शेतीतज्ञ, आणि केन्द्रीय कृषी मंत्री**१९२५: केश्तो मुखर्जी -- भारतीय अभिनेता आणि विनोदी कलाकार (मृत्यू:३ मार्च १९८२)**१९१२: केशवराव कृष्णराव दाते – हृदयरोगतज्ञ (मृत्यू: २२ एप्रिल, १९८३ )**१९११: प्राचार्य नारायण वासुदेव कोगेकर -- प्रसिद्ध विज्ञानलेखक**१८९०: काशिनाथशास्त्री वासुदेवशास्त्री अभ्यंकर -- संस्कृत व्याकरणशास्त्राचे गाढे पंडित (मृत्यू: १ डिसेंबर १९७६ )**१८७१: अवनींद्रनाथ टागोर – जलरंगचित्रकार, रविंद्रनाथ टागोर यांचे काका, जलरंगातील त्यांचे वेगळे निर्मितीतंत्र हा आधुनिक भारतीय कलेच्या सुरुवातीच्या काळातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. (मृत्यू: ५ डिसेंबर १९५१ )* 🟪 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन_* 🟪•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१९: जे. ओमप्रकाश -- प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक (जन्म: २४ जानेवारी १९२६ )**२००९: गुलशन कुमार मेहता उर्फ गुलशन बावरा -- प्रसिद्ध भारतीय गीतकार आणि हिंदी चित्रपट अभिनेते (जन्म: १२ एप्रिल १९३७ )**२००८: मधुसूदन नरहर देशपांडे --- भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे माजी महानिदेशक, कलेतिहासतज्ज्ञ आणि पुरावास्तूंचे जतनकार(जन्म: ११ नोव्हेंबर १९२० )**१९७४: अंजनीबाई मालपेकर – भेंडीबाजार घराण्याच्या शास्त्रीय गायिका (मृत्यू: २२ एप्रिल १८८३ )**१९४१: रविंद्रनाथ टागोर – कवी, लेखक, कलावंत, तत्त्वचिंतक आणि शिक्षणतज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते भारतीय लेखक. ’जन गण मन ...’ हे भारताचे राष्ट्रगीत त्यांनी लिहिले आहे. (जन्म: ७ मे १८६१ )**१८४८: जेकब बर्झेलिअस – स्वीडीश रसायनशास्त्रज्ञ (जन्म: २० ऑगस्ट १७७९ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*राष्ट्रीय हातमाग उद्योग दिनानिमित्त प्रासंगिक लेख*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *शेख हसीना यांचा भारतातील मुक्काम वाढण्याची शक्यता, नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांच्या हाती बांगलादेशची धुरा जाण्याची चिन्हं*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *काँग्रेसचा उलटा गेम, विधानसभेसाठी उमेदवारांची नावं जाहीर करण्याऐवजी तिकीट कापणाऱ्या उमेदवारांची नावं जाहीर!*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मावळमधील आंध्र धरणाचा पाणीसाठा 100 टक्के, धरणातून 1572 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुणे शहरात झिकाचा वाढला धोका, शहरात झिका विषाणूचे एकूण 66 रुग्ण सापडले आहेत*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *विविध मागण्यांसाठी शिक्षकांचा सोलापुरात निघाला मोर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *विधानसभा निवडणुकीत मतदारांची संख्या लक्षात घेता वाढवण्यात येणार 2 हजार पोलिंग बूथ*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पॅरिस ऑलिम्पमकमध्ये भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने अंतिम फेरीत धडक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कर्तुत्वाची भरारी माणसाला अमरत्व मिळवून देते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) आगामी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी कोणत्या ठिकाणाची निवड करण्यात आली आहे ?२) 'मोसाद' ही गुप्तचर संघटना कोणत्या देशाची आहे ?३) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष कोण आहेत ?४) 'दानव या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) देशातील पहिली कौशल्य जनगणना कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे ?*उत्तरे :-* १) नवी दिल्ली २) इस्त्राईल ३) थॉमस बाख ४) राक्षस, दैत्य, असुर ५) आंध्रप्रदेश *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 श्री दत्ता डांगे, संपादक, इसाप प्रकाशन, नांदेड👤 श्रीनिवास मस्के, साहित्यिक, नांदेड👤 मोहन हडोळे👤 मनोज रापतवार, धर्माबाद👤 रवींद्र चातरमल, फोटोग्राफर, धर्माबाद👤 तुकडेदास दुमलवाड👤 मंगेश पेटेकर👤 शिवाज्ञा कृष्णा साकोरे, देहू गाव, पुणे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गुरु हैं बडे गोविन्द ते मनमें देख विचार |हरि सुमरै सो वार है गुरु सुमरे सो पार ॥ 37 ॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणाच्या समाधानासाठी आपण कितीही चांगले काम केले किंवा त्याच प्रकारची वागणूक ठेवून जरी जगून दाखवले तरी समोरच्या व्यक्तीला समाधान होईलच असे नाही. कारण प्रत्येकांकडेच समाधान या नावाची संपत्ती नसते. म्हणून आपल्याला काय वाटते आपणच ठरवावे. दुसऱ्यांचे समाधान करताना थोडे स्वतः च्या विषयी विचार करावे शेवटी स्वतःलाच जगावे लागते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *सिंह आणि उंदीर*" उन्हाळ्याच्या दिवसात, एक सिंह, एका आंब्याच्या थंड छायेत सुस्त निजला होता; तिथे एक उंदीर येतो. तो उंदीर सिंहला खूप त्रास देतो. त्यामुळे जागा होऊन, सिंहने पंजात उंदीरला धरला आणि त्यास आता फाडून टाकणार इतक्यात, त्या उंदराने त्याची प्रार्थना केली, ‘महाराज, आपण थोर, सर्व श्वापदांचे राजे, मी आपल्यापुढे केवळ रंक, माझ्या रक्ताने आपले हात विटाळू नयेत. मला जीवदान दयावे, हेच आपणास उचित आहे.’ ते ऐकून सिंहास त्याची दया आली आणि त्याने त्यास सोडून दिले.पुढे एके दिवशी सिंह अरण्यात फिरत असताना आंब्याच्या झाडाजवळ जातो, त्याच आंब्याजवळ पारध्याने जाळे मांडले होते, त्यात सिंह सापडतो. त्यावेळी त्याने आपले सगळे बळ खर्चून फार धडपड केली. पण त्याची सुटका होईना. तेव्हा तो निराश झाला आणि मोठमोठयाने ओरडू लागला. ती ओरडणं ऐकून तो उंदीर त्या ठिकाणी आला आणि सिंहास म्हणाला, ‘राजा, भिऊ नको, स्वस्थ रहा. ’ इतके बोलून, त्याने आपल्या दातांनी ते जाळे कुरतडले व सिंहाची सुटका केली.*तात्पर्य:-*जे मोठे आहेत त्यांचेही एखादे मोठे काम लहानाच्या हातून, एखादे वेळी होते. यासाठी, कोणास क्षुद्र समजून त्याचा उपहास करू नये किंवा त्यास दुखवू नये. लहानाच्या हातूनही उपकार होऊ शकतात, हे लक्षात ठेवावे. वैभव कायम राहीलच, असा नेम नाही, यासाठी आपल्या चालत्या काळी, मनुष्याने लोकांवर उपकार करून ठेविले, तर पडत्या काळात तेच "•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 06 ऑगस्ट 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/hKSJgmomTG47KavR/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟧 *_अणूबॉम्ब निषेध दिन : हिरोशिमा दिन_*🟧 •••••••••••••••••••••••••••••••••••🟧 *_ या वर्षातील २१९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟧 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟧•••••••••••••••••••••••••••••••••*१९९७: कोलंबो येथे भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने ६ बाद ९५२ अशी विक्रमी धावसंख्या उभारली. त्यात सनत जयसूर्या याने ३४० धावा केल्या.**१९९४: डॉ. शिवराम कारंथ यांना राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते ’इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कार’ प्रदान**१९९०: कुवैत बळकावल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांनी इराकवर व्यापारी बंधने लादली.**१९६२: जमैकाला (इंग्लंडपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९६०: अमेरिकेने घातलेल्या व्यापारबंदीला प्रत्युत्तर म्हणून क्युबाने अमेरिकन बँकांसह सर्व परदेशी बँकाचे राष्ट्रीयीकरण केले.**१९४५: अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा या शहरावर अणूबॉम्ब टाकला. यात ७०,००० जण तात्काळ मृत्यूमुखी पडले तर पुढील अनेक वर्षे लोकांवर किरणोत्सर्गाचा परिणाम झाला.**१९४०: सोविएत युनियनने इस्टोनियाचा बेकायदेशीरपणे ताबा घेतला.**१९२६: जेरट्रूड एडर्ले ही इंग्लिश खाडी पोहुन जाणारी पहिली महिला बनली.**१९१४: पहिले महायुद्ध - सर्बियाने जर्मनीविरुद्ध तर ऑस्ट्रियाने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.* 🟧 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟧 ••••••••••••••••••••••••••••••••• *१९८७: आदित्य नारायण झा -- भारतीय गायक, होस्ट आणि अभिनेता**१९८३: प्रा. डॉ. विजय हरीराम रैवतकर-- लेखक* *१९७४: प्रा. डॉ. ललित अधाने -- कवी**१९७२: डॉ.अनुजा दत्तात्रेय जोशी -- कवयित्री, संपादिका* *१९७२: गजानन इंदूशंकर देशमुख -- कवी, लेखक**१९७०: एम. नाईट श्यामलन – भारतीय वंशाचे अमेरिकन चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक**१९६७: तुषार दळवी -- भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेता* *१९६५: नितीन चंद्रकांत देसाई --- भारतीय कला दिग्दर्शक , प्रॉडक्शन डिझायनर आणि चित्रपट आणि दूरदर्शन निर्माता (मृत्यू: २ ऑगस्ट २०२३)**१९५९: राजेंद्र सिंग -- भारतीय जलसंधारणवादी आणि पर्यावरणतज्ज्ञ , "वॉटरमॅन ऑफ इंडिया" म्हणूनही ओळखले जाते**१९५८: अनंत बागाईतकर. --ज्येष्ठ पत्रकार**१९५४: नदीम अख्तर सैफी -- नदीम-श्रवण भारतीय संगीत दिग्दर्शक जोडीतील संगीतकार* *१९५०: बाहरु सोनावणे -- लेखक* *१९४९: श्रद्धा मधुकर पराते -- कवयित्री**२९४८: प्रा.बाळासाहेब हणमंतराव कल्याणकर -- कवी, लेखक, संपादक* *१९४७: अजित सोमण -- प्रसिद्ध बासरीवादक, संगीतज्ञ, संहितालेखक, जाहिरातलेखक आणि इंग्रजी भाषेचे प्राध्यापक (मृत्यू:२ फेब्रुवारी २००९ )**१९४२: अपर्णा मोहिले -- केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाच्या (सेन्सॉर बोर्ड) माजी अध्यक्षा व ज्येष्ठ लेखिका (मृत्यू: २७ जुलै २०२२ )**१९३९: मधुकर रामचंद्र गोसावी -- संत साहित्याचे ज्येष्ठ लेखक आणि कवी(मृत्यू: १६ एप्रिल २०१९ )* *१९२६: वसंत राजाराम जोशी -- कथालेखक**१९२६: प्रा. डॉ. सुमन गोविंद वैद्य -- इतिहास विषयक लेखन करणाऱ्या लेखिका**१९२५: योगिनी जोगळेकर – प्रसिद्ध कवयित्री, लेखिका (मृत्यू: १ नोव्हेंबर २००५ )**१९२०: गोपाळकृष्ण अनंत भोबे -- संगीत विषयक ललितलेखन करणारे लेखक (मृत्यू: १४ फेब्रुवारी १९६८ )**१९०९: बाळकृष्ण मार्तंड दाभाडे -- कवी, निबंधकार कला समीक्षक (मृत्यू: २२ मे १९७९ )**१८८१: अलेक्झांडर फ्लेमिंग – नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ (मृत्यू: ११ मार्च १९५५ )**१८०९: लॉर्ड टेनिसन – इंग्लिश कवी (मृत्यू: ६ आक्टोबर १८९२ )* 🟧 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟧 ••••••••••••••••••••••••••••••••• *२०२०: बाबा शिंगोटे-- 'दैनिक पुण्यनगरी'चे संस्थापक-संपादक (जन्म: ७ मार्च १९३८ )**२०१९: सुषमा स्वराज -- माजी परराष्ट्रमंत्री (जन्म: १४ फेब्रुवारी, १९५२ )**२०१५: लक्ष्मण बाळकृष्ण लोंढे -- विज्ञानकथाकार, कादंबरीकार, प्रवासवर्णनकार (जन्म: १३ आक्टोबर १९४४ )**२०१४: स्मिता तळवलकर -- मराठी चित्रपट,नाट्य आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री, निर्मात्या आणि दिग्दर्शक (जन्म: ५ सप्टेंबर १९५५ )**२०१३: महामहोपाध्याय डॉ. ब्रह्मानंद श्रीकृष्ण देशपांडे -- मराठी इतिहास संशोधक, प्रसिद्ध वक्ते आणि महानुभाव पंथाचे अभ्यासक (जन्म : १३ जून १९४० )**१९९९: कल्पनाथ राय – माजी केन्द्रीय मंत्री, काँग्रेसचे नेते (जन्म: ४ जानेवारी १९४१ )**१९९७: वीरेन्द्रकुमार भट्टाचार्य – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आसामी साहित्यिक (जन्म: १४ आक्टोबर १९२४ )**१९६५: वसंत पवार – प्रसिद्ध संगीतकार (जन्म:१९२७ )* *१९२५: सुरेंद्रनाथ बॅनर्जी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक आणि त्यातील जहाल गटाचे नेते, ’राष्ट्रगुरू’ (जन्म: १० नोव्हेंबर १८४८ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शिक्षण : जीवन विकासाचे साधन*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नाशिक : शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना किमान दहा हजार वेतन द्यावे, यासह विविध प्रलंबित मागण्यासाठी पोषणआहार कर्मचारी आक्रमक*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पुजा खेडकरची युपीएससीच्या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *आज सुप्रीम कोर्टात शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *गणेश मंडळांना सरसकट पाच वर्षांची मंडप परवानगी द्या, पालिका आयुक्तांना पत्र*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *भारत-बांगलादेश सीमेवरील परिस्थितीवर बारकाईने लक्ष, बीएसएफकडून पत्रक जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज 10 व्या दिवशी भारताच्या पदरी निराशा, बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचं कांस्य पदक हुकलं*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *उजनीत पाणी वाढलं, पंढरपूरला पुराचा धोका, आमदाराने घेतली तातडीची बैठक; 18 वर्षांपूर्वीच्या पुराची आठवण*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *पोलिओने पाय लुळा का होतो ?* 📕 पोलिओ हा विषाणूंमुळे होणारा एक रोग आहे. तीन प्रकारच्या विषाणूंमुळे हा रोग होतो. या रोगाचे जंतू रुग्णाच्या विष्ठेतून पिण्याच्या पाण्यात मिसळले जातात व निरोगी लोकांना हा रोग होतो. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची सुरक्षित व्यवस्था व मलमूत्र विसर्जनाची विल्हेवाटीची व्यवस्था नसलेल्या देशांमध्ये हा रोग मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. भारतात या सुविधांचा अभाव असल्याने पोलिओ आढळून येतो. पाच वर्षांखालील मुलांना हा रोग प्रामुख्याने होतो. दरवर्षी दर लाख लोकसंख्येमागे १५ जण पोलिओमुळे लुळे होतात.पोलिओचे विषाणू दूषित पाण्यातून तोंडावाटे शरीरात प्रवेश करतात. पचनसंस्थेत प्रवेश केल्यानंतर सौम्य प्रकारचा आजार होतो (यात ताप, उलट्या व जुलाब ही लक्षणे असतात) व बऱ्याचदा तो आपोआप बरा होतो. अशा रुग्णांपैकी क्वचित एखाद्याच्याच आतड्यातून हे विषाणू रक्तात जातात. रक्तातून स्नायूत व मग मज्जासंस्थेत रतात. मज्जासंस्थेच्या ज्या भागावर वा नसेवर विषाणू हल्ला करून तिला निकामी करतात, त्यानुसार त्या नसेशी संबंधित असे स्नायू लुळे पडतात. सामान्यपणे पाय लुळा पडतो, कधी कधी हात, तर कधी हात व पाय वा शरीर लुळे पडू शकते.रक्तात वा स्नायूत विषाणू असल्यास रुग्णाला जर इंजेक्शन दिले गेले, तर हातपाय लुळे पडण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्याच्या काळात व विशेषत: पोलिओची साथ चालू असल्यास ताप, हगवण झाल्यास चुकूनही इंजेक्शन देऊ नये.पोलिओ टाळण्यासाठी महत्त्वाचा उपाय म्हणजे सर्व लहान मुलांना पोलिओची लस पाजणे. जन्माच्या दिवशी पहिली लस दिली जाते. त्यानंतर दीड, अडीच, साडेतीन महिने वय असताना व नंतर दीड वर्ष वय असताना परत ही लस पाजली जाते. ही लस दिल्यास पोलिओ होत नाही. दूरगामी प्रतिबंध करण्यासाठी राहणीमानाचा दर्जा उंचावणे, सुरक्षित पाण्याचा पुरवठा करणे व मलमूत्र विसर्जन विल्हेवाटीसाठी सुयोग्य व्यवस्था करणे, हे आवश्यक ठरते.पोलिओने पाय लुळा पडल्यास भौतिकोपचार तसेच कॅलीपर (पायाचा आधार) वगैरे वापरून शक्ती परत आणण्याचा प्रयत्न करता येतो. काही वेळा शस्त्रक्रियेचाही उपयोग होतो. अर्थात, हे सर्व करण्यापेक्षा लसीकरण करून रोग टाळणे, हेच योग्य ठरेल.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कला ही जीवनाची दासी आहे, तिचे कार्य जीवनाची सेवा करणे हे आहे.- गुरुदेव रवींद्रनाथ टागोर*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारताचे रेल्वेमंत्री कोण आहेत ?२) राज्यातील पहिले *सौरग्राम* कोणते ?३) भूतकाळातील घटनांचा शास्त्रशुद्धपणे केलेला अभ्यास म्हणजे काय ?४) 'दारा' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 'मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजने'चा प्रारंभ कोठून झाला ? *उत्तरे :-* १) अश्विनी वैष्णव २) मान्याचीवाडी, ता. पाटण, जि. सातारा ३) इतिहास ४) बायको, पत्नी ५) सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 हर्ष पाटील👤 इरेश वंचेवाड👤 गणेश धुप्पे👤 गंगाधर दगडे, बिलोली👤 सुदर्शन पाटील जोगदंड, शिक्षक, धर्माबाद👤 दीपक पाटील हिवराळे👤 नरसिंह पावडे देशमुख👤 राजेंद्र पोकलवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सुखिया सब संसार है खाये और सोए।दुखिया दास कबीर है जागे और रोए ॥36॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मन हे मनोव्यापाराचे केंद्र आहे.आपल्या मनात अनेक विचार येत असतात. असेच विचार इतरांच्या मनात देखील येत असतातच.आपल्या मनात काय चालले आहे हे फक्त आपल्यालाच माहित असते. इतरांच्या मनात काय चालले आहे त्या विषयी मात्र माहीत नसते. पण, काही का असेना त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव मात्र आपोआप दिसून येतात. त्यावेळी कोणी दु:खात असेल तर कोणी आनंदी असेल पण, त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील भाव ओळखून माणुसकीच्या नात्याने आपण मदत करावा किंवा सांत्वना देण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे आपल्याला सुखद समाधान मिळाल्याचा विशेष आनंद होईल. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• " एका जंगलात एक हरीण रहात होते. त्या हरणाला सोनेरी शिंगे होती त्यमुळे त्या हरणाला शिंगाचा खूप गर्व होता. पण तो कधीही आनंदी नसे. कारण त्याला वाटे की, आपले पाय खूप काटकुळे व विद्रूप आहेत. जेव्हा तो शिंगाकडे पाही तेव्हा तो खूप खूष असे. पण जेव्हा त्याचे आपल्या पायाकडे लक्ष जाई तेव्हा त्याला त्याचा खूप राग येत असे.एक दिवस हरिण जंगलातील एका झऱ्यावर पाणी पीत होते. पाणी पिता पिता त्याला पाण्यात त्याची सोनेरी शिंगे दिसली. सुंदर सोनेरी शिंगे पाहून त्याला खूप आनंद झाला. तेवढ्यात त्याला कसलातरी आवाज ऐकू आला आणि मागे वळून पाहतो तर समोरच त्याला एक शिकारी दिसला. शिकारी त्याच्यावर निशाणा साधत होता. शिकाऱ्याला पाहून हरिण घाबरले आणि जोरजोरात पाळायला लागले.शिकारी त्याचा पाठलाग करू लागला. हरणाचे पाय त्याला उत्तम साथ देत होते. त्या पायांमुळे तो इतका जोरात पळत होता. परंतु पळता पळता हरणाची शिंगे एका झाडाच्या फांद्यामध्ये अडकली. हरिण खूप प्रयत्न करतो पण शिंगे काही निघत नव्हती. शेवटी शिकारी आला आणि हरणाला पकडून घेऊन गेला.हरणाला रडायला येते आणि ती स्वत: शीच पुटपुटतो,अरे माझी सुंदर शिंगेच माझ्यासाठी आज संकट बनली. त्यांच्यामुळे शिकाऱ्याने आज मला पकडले*तात्पर्य-* फक्त सौंदर्यच सर्व काही नसते. कुठल्याही गोष्टीचे गुण-दोष पण पारखले पाहिजेत ."•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 05 ऑगस्ट 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://surveyheart.com/form/66ad9d9e311b89197db7723b••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟦 *_ या वर्षातील २१८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟦 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟦•••••••••••••••••••••••••••••••••*२०१६: ब्राझिलमधे रिओ-डी-जानिरो येथे ३१ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात होणार आहे.**१९९७: रशियाच्या दोन अंतराळवीरांना घेऊन ’सोयूझ-यू’ हे अंतराळयान ’मीर’ अंतराळस्थानकाकडे रवाना**१९९७: फ्रेन्च खुल्या लॉनटेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात विजेतेपद मिळवणार्या महेश भूपतीला क्रीडा खात्यातर्फे २ लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर**१९९४: इंडियन नॅशनल सायन्स अॅकेडमी (INSA) तर्फे दिला जाणारा ’होमी जहांगीर भाभा पुरस्कार’ राष्ट्रीय पदार्थविज्ञान प्रयोगशाळेले (NPL) संचालक प्रा. इरोड सुब्रमणियन राजगोपाल यांना प्रदान**१९६५: पाकिस्तानी सैन्याने साध्या वेषात घुसखोरी केल्यामुळे भारत पाकिस्तान युद्धाला सुरूवात झाली.**१९६२: नेल्सन मंडेला यांना तुरुंगात टाकण्यात आले. यानंतर १९९० मधे त्यांची सुटका झाली.**१८६१: अमेरिकन सैन्यातील चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा बंद करण्यात आली.*🟦 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟦••••••••••••••••••••••••••••••••• *१९८७: जेनीलिया डिसूझा -- भारतीय चित्रपट अभिनेत्री**१९८०: वत्सल शेठ -- भारतीय अभिनेता, आणि उद्योजक**१९७५: काजोल – प्रसिद्ध अभिनेत्री**१९७३: डॉ. सोनिया कस्तुरे -- कवयित्री**१९६९: डी. के. शेख (दिलावर कादर शेख)-- प्रसिद्ध कवी, संपादक* *१९६९: वेंकटेश प्रसाद – जलदगती गोलंदाज**१९६८: सुचिता गोपालराव कुनघटकर -- कवयित्री**१९६५: रेखा कुलकर्णी-देशपांडे -- कवयित्री**१९६४: राजू रामचंद्रन डहाके -- कवी**१९६३: विठ्ठल तात्या संधान -- कवी**१९५८: भारती दिलीप सावंत -- कवयित्री ,लेखिका**१९५८: राजाराम गो.जाधव -- मंत्रालयातील निवृत्त सहसचिव तथा प्रसिद्ध कवी, लेखक**१९५६: प्रा. डॉ. श्रृतिश्री बडगबाळकर-- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका* *१९४९: प्रा. ज. रा. गवळीकर -- कवी* *१९४४: पद्माकर दराडे -- प्रसिद्ध कादंबरीकार**१९४४: उत्तरा बावकर -- भारतीय रंगमंच, चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेत्री (मृत्यू : १२ एप्रिल २०२३)**१९३३: विजया राजाध्यक्ष – लेखिका व समीक्षिका, ७४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा**१९३०: नील आर्मस्ट्राँग – चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव (मृत्यू: २५ ऑगस्ट २०१३ )**१९२८: राघोबाजी वामनराव गाणार -- कथाकार* *१९२२: प्रा.भगवंत गोविंदराव देशमुख -- लेखक, संपादक* *१९२२: नरेश भिकाजी कवडी -- भाषातज्ञ, कथाकार, समीक्षक, ज्ञानेश्वरीचे चिकित्सक अभ्यासक आणि अनुवादक (मृत्यू: ४ एप्रिल २००० )**१९१०: डॉ. रामचंद्र ज. जोशी -- लेखक* *१८९०: महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार – इतिहासकार, लेखक, वक्ते आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू [१९६१-१९६४], टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू [१९४८], पद्मविभूषण, मराठी शुद्धलेखन महामंडळाचे अध्यक्ष, प्राचीन मराठी इतिहास आणि मराठ्यांचा इतिहास यांचे व्यासंगी अभ्यासक (मृत्यू: ६ आक्टोबर १९७९ )**१८६९: नारायण गोविंद ऊर्फ नानासाहेब चाफेकर -- ऐतिहासिक विषयावर लिहिणारे एक भाषातज्ज्ञ संशोधक लेखक, समीक्षक व कोशकार (मृत्यू: ५ मार्च १९६८ )**१८५८: वासुदेव वामन तथा ’वासुदेवशास्त्री’ खरे – इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी (मृत्यू: ११ जून १९२४ )*🟦 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟦•••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:शांता दत्तात्रेय गणोरकर-- कवयित्री, लेखिका (जन्म:२४ मे १९२५)**२०२०: शिवाजीराव पाटील निलंगेकर- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री (जन्म :९ फेब्रुवारी १९३१ )* *२०१४: भारतीय-इंग्रजी इतिहासकार चापमॅन पिंचर यांचे निधन. (जन्म: २९ मार्च १९१४ )**२००१: ज्योत्स्ना भोळे – संगीत रंगभूमीला नवचैतन्य देणार्या गायिका आणि अभिनेत्री. संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९७६), अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले.(जन्म: ११ मे १९१४ )**२०००: लाला अमरनाथ भारद्वाज – भारतीय क्रिकेटचे भीष्माचार्य, स्वतंत्र भारताच्या पहिल्या क्रिकेट संघाचे कर्णधार व स्वतंत्र भारताचे पहिले शतकवीर (मृत्यू: ११ सप्टेंबर १९११ )**१९९२: अच्युतराव पटवर्धन – स्वातंत्र्यसैनिक, ४२ च्या चळवळीतील अग्रणी नेते, भारतीय समाजवादी पक्षाचे एक संस्थापक, विचारवंत, तत्त्वचिंतक व सामाजिक कार्यकर्ते (जन्म:५ फेब्रुवारी १९०५ )**१९९१: सोइचिरो होंडा -- होंडा कंपनीचे संस्थापक जपानी अभियंता आणि उद्योगपती ( जन्म: १७ नोव्हेंबर १९०६)**१९८४: रिचर्ड बर्टन – अभिनेता (जन्म: १० नोव्हेंबर १९२५ )**१९६२: अमेरिकन अभिनेत्री मेरिलीन मन्रो यांनी गोळी झाडुन घेऊन आत्महत्या केली. (जन्म: १ जून १९२६ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दिनांक 15 ऑगस्ट 2015 रोजी प्रारंभ झालेल्या *फ्रेश मॉर्निंग बुलेटिन* ला पाहता पाहता नऊ वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने पालक, शिक्षक व विद्यार्थी यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी एक प्रयत्नवरील google फॉर्म भरून आपले अमूल्य प्रतिक्रिया कळवावे. ही नम्र विनंतीसंयोजक :- नासा येवतीकर, 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *वक्फ बोर्डाच्या मुद्द्यावरुन एनडीएच्या मित्रपक्षात बिघाडी? नितीश कुमारांच्या जेडीयूचा केंद्राला सल्ला*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *विद्यार्थ्यांनो, जीवनात दूरदृष्टी ठेवून कष्ट करा, प्रसिद्ध अंध उद्योजक डॉ. भावेश भाटीया यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुख्यमंत्री अचानक दिल्ली दौऱ्यावर!:मराठवाड्यातील आमदारांची फडणवीसांच्या बंगल्यावर बैठक; राजकीय वर्तुळातील मोठी घडामोड*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सात दशकांनंतर आगामी साहित्य संमेलन होणार राजधानी दिल्लीत !*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुण्यात भीषण अपघातात 2 ठार; नाशिकमध्येही बस-कारची धडक, 2 महिलांचा मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ऑलिम्पिकमध्ये हॉकी संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री, शुटआऊटमध्ये 4-2 ने विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा पराभव ; 32 रन्सने श्रीलंकेने दिली मात*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 रेनवॉटर हार्वेस्टिंग : पाण्याची साठवण व पुनर्भरण 📙 सर्व मोठ्या गावांचे शहरीकरण झाले. शहरांचे काँक्रिटीकरण झाले. काँक्रिटच्या जंगलाला डांबराच्या रस्त्यांची जोड मिळाली. मग या साऱ्या शहरावर पडणारे पाणी जमिनीत मुरणार कसे ? ते झपाट्याने वाहून जाणार. गटारांतून नालीमध्ये, नालीतून नदीकडे वाहणार. पुन्हा या शहरी वस्तीला पाणी पुरवायचे कुठून ? नळाद्वारे पुरवायला पाणी आणायचे कुठून ? यासारख्या गंभीर प्रश्नांची उत्तरे शोधताना जगातील अनेक ठिकाणी रेनवॉटर हार्वेस्टिंगची कल्पना प्राधान्याने मांडली गेली. जेथे पाऊस जास्त पडतो, तो कालावधी अल्प असतो. पडलेला पाऊस स्वतःबरोबर बहुमोल मातीचा थर घेऊन जातो. ती माती गाळा रूपाने नदीतून वाहत धरणांच्या भिंतीजवळ साचते व धरणे हळूहळू निकामी होतात. तसेच डोंगरावरची माती वाहून गेल्याने डोंगर बोडके, खडकाळ होतात व पावसाचे प्रमाण कमी होऊ लागते. हा झाला उघड्या जमिनीसंदर्भातला प्रश्न. दुसरा प्रश्न काँक्रिटच्या जंगलातला वर उल्लेखलेला. दोन्ही प्रश्नांना उत्तर एकच. ते म्हणजे जमेल तसे, जमेल तितके पाणी आडवा, जमवा व जिरवा. पाणी अडवायचे उपाय शहरात सोपे. छपरावरचे, गच्चीवरचे, पावसाचे पाणी पन्हाळीद्वारे एकत्रित करून इमारतीच्या शेजारी वा पोटात बांधलेल्या टाकीत साठवायचे. पावसाळा संपल्यावर त्याचाच वापर पिण्याखेरीज लागणाऱ्या अन्य वापरासाठी करायचा. आसाम, मेघालय, नागालँड या उतारावरच्या टेकड्यांच्या प्रदेशात ही पद्धत गेली अनेक वर्षे घराघरांतून वापरली गेली आहे. टाकी पाण्याने भरली, तर जास्तीचे पाणी जवळच खणलेल्या एका खड्डावजा कुपनलिकेत सोडायचे. आठ ते दहा सेंटीमीटर व्यासाचा दोन तीन मीटर खोलीचा खड्डाही या कामी उपयोगी पडतो. भूजलपातळी वाढण्यासाठी त्याचा जरूर उपयोग होतो. शहरात, गावात कूपनलिका खणल्या जातात, पण अनेकदा पाणी लागत नाही. अशा कूपनलिकांमध्येही असे जवळपासचे पाणी भू उदरात भरण्यासाठी सोडता येते. दहा हजार चौरस मीटरच्या सर्वसामान्य इमारतीच्या गच्चीवरचे पाणी साठवल्यास किमान तीन महिने त्या इमारतीत राहणाऱ्या सर्वांना पावसाळ्यात व त्यानंतरचे दोन महिने साठवलेल्या पाण्याचा पुरेसा पुरवठा होऊ शकतो. महानगरांमधून इमारतीचे नकाशे मंजूर करून तिला परवानगी देताना अशी रचना करणे आता गरजेचे वाटू लागले आहे. पुणे महानगरपालिकेने स्वतःच्या विस्तीर्ण इमारतीत तशी रचना करायला सुरुवातही केली आहे. 'पाणी अडवा, पाणी जिरवा' या एका वाक्यात अन्य ठिकाणच्या रेनवॉटर हार्वेस्टिंगचा सारा अर्थ सामावतो. उतारावर, डोंगरावर समतल बांधांची रचना यासाठी केली जाते. कंटूरबंडिंग या नावाने ती ओळखली जाते. पावसाचे पाणी या विविध बांधांना अडते, जिरते, माती वाहून नेणे थांबते. याशिवाय मोठ्या पावसात वाहणारे पाणी पाझर तलाव बांधून अडवले जाते. पावसाळा ऑक्टोबरमध्ये संपला की, त्यानंतर शेती, जनावरे, पक्षी यांना या पाण्याचा अगदी मार्चपर्यंतही उपयोग होतो. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाझर तलावाचे पाणी जमिनीत मुरल्याने त्या परिसरातल्या व खालच्या भागातल्या विहिरींची भूजलपातळी उंचावते. महाराष्ट्रातील भूजलपातळी १९५० साली होती, त्याच्या दुपटीने खोलवर गेली आहे. याचाच अर्थ ६ मीटरवर विहिरीला बारा महिने पाणी असायचे, तिथे आता २० मीटरपर्यंत खोल जावे लागते. कुपनलिकांची अवस्था याहूनही वाईट आहे. अनेक ठिकाणी दोनशे फुटांपेक्षा जास्त खोल गेल्याशिवाय पाणी लागत नाही. गावाच्या शिवारात पडलेल्या पावसाच्या पाण्यापैकी किमान पन्नास टक्के पाणी या पद्धतीने अडवणे, जिरवणे शक्य असते, असे प्रयोगाअंती अनेकांनी सिद्ध केले आहे. अण्णासाहेब हजारे यांनी राळेगण सिद्धी येथे, तरुण भारत संघाच्या राजेंद्रसिंह यांनी राजस्थानमध्ये, विलासराव साळुंके यांनी पुरंदर जिल्ह्यातील केलेल्या प्रयोगांतून या गावांची पाण्याची गरज भागू लागली आहे. गावात हिरवाई निर्माण झाली आहे, गरज आहे अशा प्रयोगांतून अन्य गावातील गावकऱयांनी प्रेरणा घेण्याची. शेताच्या खोलगट भागात चर खणून शेततळी घेण्याचे प्रयोगही यशस्वी झाले आहेत. पण सार्वत्रिक प्रयोगातून सारा परिसर हिरवागार करण्याचे प्रयत्न मात्र कमी पडत आहेत.छोट्या नदीमध्ये, ओढ्यांमध्ये ठराविक अंतरावर बंधारे घालण्याच्या सरकारी पातळीवरच्या प्रयत्नांनासुद्धा यश येत आहे. ओढ्याच्या पात्रातली दगड, वाळू सिमेंटच्या रिकाम्या पोत्यात भरून व्यवस्थित बंधारा बांधता येतो. असे बंधारे आठ ते दहा वर्षे चांगले टिकतात.इस्रायलसारख्या देशात जेमतेम सहा ते दहा इंच वार्षिक पाऊस पडतो. याउलट भारताच्या अनेक भागांत सरासरी चाळीस ते पन्नास इंच पाऊस पडतो. महाराष्ट्रातील अगदी दुष्काळी भागातसुद्धा पावसाचे वार्षिक प्रमाण वीस इंच एवढे आहे. इस्रायलने पाण्याचा प्रत्येक थेंब उपयोगात आणण्याचा गेली पन्नास वर्षे प्रयत्न केला आहे. याउलट भारतातील पावसाचे पाणी आजही बहुतांश वाहून जाते. पावसाळ्यानंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अक्षरश: भेडसावू लागतो.यावरचा एकमेव उपाय म्हणजे रेनवॉटर हार्वेस्टिंग म्हणजेच पाण्याचे पुनर्भरण, पुनर्वापर करण्याचा आहे.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अहंकार माणसाला फुलवतो; परंतु त्याला कधीही आधार देत नाही.- रस्किन*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोणता देश श्रीरामाचे टपाल तिकिट जारी करणारा जगातील पहिला देश ठरला आहे ?२) महाराष्ट्रातील पहिले पाणलोट क्षेत्र विकासाचे गाव कोणते ?३) वर्ल्ड अग्रिकल्चर फोरमचा वैश्विक कृषी पुरस्कार २०२४ कोणत्या राज्याला जाहीर करण्यात आला आहे ?४) 'दास' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) जगातील पहिला थोरियम आधारित न्युक्लिअर पॉवर प्लांट कोणत्या देशात स्थापन करण्यात येत आहे ?*उत्तरे :-* १) लाओस २) राळेगण सिद्धी, अहमदनगर ३) महाराष्ट्र ४) चाकर, नोकर ५) चीन*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 श्रीराम पाटील जगदंबे, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद👤 भारती सावंत, साहित्यिक, मुंबई👤 अभिनंदन प्रचंड, विषय शिक्षक, धर्माबाद👤 मनोज मानधनी, धर्माबाद👤 विकास कांबळे👤 शेख वाजीद👤 दत्तात्रय सीतावार, कराटे प्रशिक्षक, धर्माबाद👤 किरण सोनकांबळे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गुरु मानुष करि जानते ते नर कहिये अन्ध ।यहां दुखी संसारमें आगे यमके बन्ध ॥ 34 ॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तेल आणि तूप जरी भिन्न असतील तरी त्यांना बनण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो फक्त त्यांनाच माहीत असते. म्हणूनच ते दीर्घकाळ टिकून राहताना दिसत असतात. सोबतच त्यांची जागा सुद्धा योग्य ठिकाणी बघायला मिळत असते. या दोघांमधून आजच्या माणसाला खूप काही शिकण्यासारखे आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*इमानदारीचेे फळ*------------$$$$-------------एक राजकुमार विवाह करण्याच्या वयात असतो, त्यासाठी स्वतःचे स्वयंवर तो स्वतःच घोषित करतो. राज्यातील इच्छुक तरुणींना दरबारात ठराविक दिवशी हजर राहण्याची दवंडी सर्वत्र दिली जाते.गावोगावच्या सुंदर आणि धनिकांच्या तरुणी सज्ज होतात ! त्या राजकुमाराच्या राजवाड्यावर एक नोकर असतो त्याच्या मुलीचे त्या राजकुमारावर प्रेम जडलेले असते. मनातून ती त्याला पूजत असते. स्वयंवराची दवंडी ऐकून ती गरीब मुलगी घरी आईला म्हणते, "मी पण जाणार त्यादिवशी दरबारात"आई समजावते कि, "तिथे खूप मोठ्या घरच्या मुली येणार, तुझी निवड कशी होईल ? तू दिसायलाही फार सुंदर नाहीस"मुलगी म्हणते, "ते मलाही माहित आहे, पण या निमित्ताने मला राजकुमारजवळ थोडा वेळ तरी जाता येईल. जवळून पाहता येईल. इतकेही मला पुरेसे आहे"ठरलेल्या दिवशी शंभरेक सुंदर तरुणी दरबारात हजर होतात. त्यात ही नोकराची मुलगी देखील साधेच कपडे घालून उभी असते. दरबार भरतो. राजकुमार येतो. राजकुमार प्रत्येक मुलीजवळ जातो आणि जवळच्या थैलीतील एक "बी" काढून देतो. सर्वाना बिया देऊन झाल्यावर, राजकुमार सांगतो, "हे बी तुम्ही घरी जाऊन कुंडीत लावा. त्याची देखभाल करून तीन महिन्यांनी पुन्हा इथे कुंडीसह या. जिच्या कुंडीतल्या झाडाचे फुल सर्वात जास्त सुंदर असेल, तिच्याशी मी लग्न करेन "सगळ्याजणी ते बी घेऊन घरी जातात. नोकराची मुलगीही घरी येते. एका कुंडीत ते बी पेरते. रोज काळजीने त्याला खत, पाणी वगैरे देते. पण दोन महिने झाले तरी त्यातून काहीच उगवत नाही. मुलगी हार मानत नाही. एका हुशार माळ्याकडे जाऊन काही टिप्स घेते. त्यानुसार पुन्हा प्रयत्न करते. पण कुंडीतून काहीच उगवत नाही. यातच तीन महिन्याची मुदत संपत येते. शेवटी ती निराश होते. तीन महिन्यांनी सर्व सुंदर तरुणी आपापल्या कुंड्या घेऊन दरबारात येतात. प्रत्येकीच्या कुंडीत सुंदर फुल असते. ती नोकरांची मुलगीही स्वतःची कुंडी घेऊन आलेली असते, ज्यात काहीच उगवलेले नसते. सगळ्याजणी तिला हसतात. इतक्यात राजकुमार हजर होतो. तो सर्व कुंड्याचे निरीक्षण करतो आणि शेवटी त्या नोकराच्या मुलीकडे निर्देश करून जाहीर करतो कि, "ती मुलगी मी निवडली आहे, "सगळा दरबार चकित होतो. काही सुंदर मुली चिडतात. त्यातली एक धिटाईने पुढे येऊन विचारते, "जिच्या कुंडीत काहीच उगवले नाही, तिची निवड का ? उलट माझ्या कुंडीत पहा, किती सुंदर गुलाब फुलला आहे. मग माझी निवड का नाही ?"राजकुमार हसून उत्तर देतो, "फक्त ती (नोकराची मुलगी) या पदासाठी योग्य आहे. कारण तिनेच एकटीने "इमानदारीचे" फुल फुलवले आहे. मी तुम्हा सगळ्यांना ज्या बिया दिल्या होत्या त्या निर्जीव होत्या. त्यातून फुल तर सोडाच पण काहीही उगवणार नव्हतेच."सगळ्या दरबारात टाळ्यांचा कडकडाट होतो ! आणि त्या नोकराच्या मुलीच्या डोळ्यात नकळत आनंदाश्रू पाझरू लागतात. *तात्पर्य* : इमानदारी हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किंमती आणि मौल्यवान आहे ! तो ज्याच्याकडे आहे, तो आयुष्यात यशस्वी नक्की होतो !! मग भोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले तरी !! म्हणून महत्वाची *इमानदारी, सलाम करेल दुनियादारी !!•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 03 ऑगस्ट 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/uKjwW3NMPZfuD7Vy/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••⚪ *_ या वर्षातील २१६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• ⚪ *_महत्त्वाच्या घटना:_* ⚪•••••••••••••••••••••••••••••••••*२००४: राज्यपाल महंमद फझल यांच्या हस्ते सोलापूर विद्यापीठाचे औपचारिक उद्घाटन झाले. १ ऑगस्ट २००४ रोजी या विद्यापीठाची स्थापनाझाली होती.**२०००: मल्याळी दिग्दर्शक शाजी एन. करुण यांना फ्रेन्च सरकारने ’नाईट ऑफ आर्टस अँड लेटर्स’ पुरस्काराने सन्मानित केले.**१९९४: संगीतकार अनिल विश्वास यांना मध्य प्रदेश सरकारचा ’लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर**१९९४: सहज सोप्या व गोड कविता आणि सूक्ष्म व मार्मिक वर्णनात्मक लेख यांद्वारे हिन्दी साहित्याची अमूल्य सेवा करणारे डॉ. हरिवंशराय बच्चन यांना उत्तर प्रदेश सरकारतर्फे विषेश पुरस्कार जाहीर.**१९६०: नायजरला (फ्रान्सकडून) स्वातंत्र्य मिळाले.**१९४८: भारतीय अणूऊर्जा आयोगाची (Indian Atomic Energy Commission) स्थापना झाली.**१९३६: आंतरमहाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक ही स्पर्धा आयोजित करणार्या ’महाराष्ट्रीय कलोपासक’ या संस्थेची हौशी आणि प्रायोगिक नाट्यसंस्था सुरू झाली. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार या संस्थेचे पहिले अध्यक्ष झाले.**१९१४: बव्हेरियाचे राजे लुडविक यांच्याकडे आपणांस सैन्यात दाखल करून घ्यावे असा हिटलरने अर्ज केला आणि त्याची सैन्यात नियुक्तीझाली.**१९००: ’द फायरस्टोन टायर अँड रबर कंपनी’ ची स्थापना झाली.**१७८३: जपानमधील माउंट असामा ज्वालामुखीचा उद्रेक होऊन सुमारे ३५,००० जण मृत्यूमुखी पडले.* ⚪ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ⚪••••••••••••••••••••••••••••••••• *१९९२: रसिका सुनील ( धबडगांवकर) -- अभिनेत्री**१९८४: सुनील छेत्री -- भारतीय व्यावसायिक फुटबॉलपटू* *१९८१: मनीष पॉल -- भारतीय अभिनेता, टीव्ही होस्ट, अँकर, मॉडेल आणि गायक**१९७७: सुनील ग्रोव्हर. --- भारतीय विनोदी अभिनेता* *१९६७: बिपिन मयेकर -- लेखक**१९६५: प्रा. डॉ. शुभांगी रामचंद्र परांजपे (डोरले)-- कवयित्री, लेखिका* *१९६०: ईश्वर विठ्ठलराव मगर -- कवी,लेखक समाज प्रबोधन**१९५९: अजय बिरारी -- अहिराणी व मराठी कवी,गझलकार व अभिनेता* *१९५६: विजया सुकाळे. -- लेखिका* *१९५६: बलविंदरसिंग संधू – १९८३ च्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील क्रिकेटपटू**१९५६: प्रकाश शंकरराव जंजाळ-- लेखक* *१९४९: रमेश भाटकर -- मराठी चित्रपट, रंगमंच आणि टीव्ही अभिनेता(मृत्यू: ४ फेब्रुवारी २०१९ )**१९४२: अनु आगा -- भारतीय उद्योगपती आणि सामाजिक कार्यकर्त्या**१९३६: पंडित छन्नूलाल मिश्रा -- बनारसमधील प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय गायक**१९३४: डॉ. गो. बं. देगलूरकर -- मूर्तिशास्त्राचे अभ्यासक**१९३३: माणिक कामिनी कदम -- कामिनी कदम या नावाने प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री (मृत्यू: १८ जून २००० )**१९३२: भा.ल.महाबळ -- मराठी साहित्यातील प्रसिद्ध विनोदी लेखक**१९२४: लिऑन युरिस – अमेरिकन कादंबरीकार (मृत्यू: २१ जून २००३ )**१९१८: जयदेव (जयदेव वर्मा )-- हिंदी चित्रपटांतील संगीतकार (मृत्यू: ६ जानेवारी १९८७ )**१९१७: मनहर देसाई -- अभिनेते (मृत्यू: २५ फेब्रुवारी १९९२ )**१९१६: शकील बदायूँनी – गीतकार आणि शायर (मृत्यू: २० एप्रिल१९७० )**१९००: क्रांतिसिंह नाना पाटील – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, ’पत्री सरकार’चे (प्रति सरकार) संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार (मृत्यू: ६ डिसेंबर १९७६ )**१८९८: उदयशंकर भट्ट – आधुनिक हिंदी नाटककार, एकांकिकाकार, कवी आणि कादंबरीकार.(मृत्यू:२८ फेब्रुवारी १९६६ )**१८८७: श्रीकृष्ण नीलकंठ चापेकर-- कवी, जुन्या पिढीतील महत्वाचे समीक्षक (मृत्यू: १७ डिसेंबर १९४२ )* *१८८६: मैथिलिशरण गुप्त – हिन्दी कवी. त्यांचे सुमारे ४० स्वतंत्र ग्रंथ आणि ६ अनुवादित ग्रंथ प्रसिद्ध झाले. त्यांच्या ’भारतभारती’ या काव्यग्रंथामुळे त्यांना राष्ट्रकवी म्हणून मान्यता मिळाली. (मृत्यू: १२ डिसेंबर १९६४ )**१८६३: सालोमन शालोम आपटेकर -- नाटककार व किर्तनसंहिता- लेखक (मृत्यू: २१ हे १९५७ )* ⚪ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ⚪ ••••••••••••••••••••••••••••••••• *२०२३: नामदेव धोंडो (ना .धो.) महानोर -- प्रसिद्ध मराठी कवी आणि गीतकार (जन्म : १६ सप्टेंबर १९४२)**२०२२: मिथिलेश चतुर्वेदी --भारतीय चित्रपट आणि थिएटर अभिनेता (जन्म : १५ऑक्टोबर१९५४)**२०२०: जॉन ह्यूम - आयरिश नोबेल पीस पुरस्कार विजेते राजकारणी (जन्म: १८ जानेवारी १९३७ )* *२००७: सरोजिनी वैद्य – प्रसिद्ध लेखिका (जन्म: १५ जून १९३३ )**१९९३: स्वामी चिन्मयानंद सरस्वती – अध्यात्मिक गुरू (जन्म: ८ मे १९१६ )**१९५७: देवदास गांधी – पत्रकार, ‘हिन्दुस्तान टाइम्स‘चे संपादक, महात्मा गांधींचे चिरंजीव (जन्म: २२ मे १९०० )**१९३०: व्यंकटेश बापूजी केतकर – विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद (जन्म: १२ जानेवारी १८५४ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*नजर हटी ; दुर्घटना घटी*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महिला सक्षमीकरणामुळेच देश महासत्ता होईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ तर मराठा आंदोलकांकडून काळे झेंडे दाखवत निषेध*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतराला विरोध करणारी याचिका फेटाळली, नामांतरप्रकरणी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; नाव बदललं की काही लोक समर्थनार्थ आणि विरोधात असणारच, सुप्रीम कोर्टाचे निरीक्षण*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शेतकऱ्यांना मोठा दिलासा, पीक नुकसान भरपाईसाठी ५९६ कोटींचा निधी मंजूर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *एस टी कर्मचाऱ्यांचा पगार होणार वेळेवर, कर्मचाऱ्यांनी दिला होता आंदोलनाचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्याच्या प्रशासकीय कामकाजात ‘महिला राज’; शोमिता बिश्वास ठरल्या पहिल्या महिला वनबल प्रमुख*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *हरमनप्रीत सिंहच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाचा 3-2 असा पराभव केला. भारतीय हॉकी संघासाठी हा विजय विशेष महत्त्वाचा ठरलाय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *श्रीलंकेविरुद्धच्या पहिला एकदिवसीय सामना अनिर्णित, दोघांच्या धावा झाल्या समान*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *जंतूचा शोध कोणी लावला ?* 📙 १८६० च्या आधी कोणालाच जंतू म्हणजे काय याची माहिती नव्हती. रोग कशामुळे होतात, याबद्दलचे अनेक समज प्रचलित होते. देवाचा कोप, भूत-प्रेत यांची बाधा, जादूटोणा अशा अनेक कारणांचा यात समावेश होता. त्यामुळे रोगांवरचे उपाय हे देवाची आराधना करणे, बळी देणे, मांत्रिकाकडून भूत उतरवणे, गळ्यात ताईत गंडे बांधणे आणि गावातच कुणाला औषधी वनस्पतींबद्दल माहिती असेल तर त्यांच्याकडून उपचार करून घेणे, या प्रकारचे असत. आपल्या देशातील आयुर्वेद उपचार पद्धतीतील त्रिदोष संकल्पनेनुसार खूप पूर्वीपासून उपचार केले जात. सर्वप्रथम १८६० मध्ये लुई पाश्चर या फ्रेंच सूक्ष्म जीवशास्त्रज्ञाने हवेत जीवाणू असतात हे दाखवून दिले. त्यामुळे रोग का होत असावेत याचा नवीन विचार सुरू झाला. पाश्चरने रोगजंतूंमुळे रोग होतात या संकल्पनेचा विकास व पाठपुरावा केला. रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाने १८७७ मध्ये अँथ्रॅक्स हा रोग जीवाणूपासून होतो हे दाखवून दिले. यानंतर सुक्ष्म जीवशास्त्राचे सुवर्णयुग सुरू झाले. व एकामागे एक अनेक जीवजंतूंचा शोध लागला. या जंतुंचे जिवाणू (Bacteria) व विषाणू (Virus) हे दोन प्रकार पडतात. यापैकी विषाणू केवळ इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक खालीच दिसू शकतात. जीवाणू मात्र साध्या सूक्ष्मदर्शक यंत्राखाली सुद्धा दिसतात. आकारातील बदला खेरीच त्यांच्यात पुष्कळ फरक असतात. कॉलरा, टायफॉइड, क्षयरोग हे जिवाणूंमुळे होणारे रोग आहेत; तर पोलिओ, कावीळ, गोवर, गालफुगी हे रोग विषाणूंमुळे होतात. जिवाणूंना मारणारी प्रभावी औषधे आजकाल उपलब्ध आहेत, पण विषाणूंना मारतील अशी प्रभावी औषध आजही उपलब्ध नाहीत.*महत्त्वाच्या जंतुंचा शोध* -जंतू -- साल -- शास्त्रज्ञ गोनोकोक्कस -- १८७९ -- निसरक्षयरोग -- १८८२ -- रॉबर्ट कॉककुष्ठरोग -- १८७४ -- हॅन्सनन्युमोकोक्कस -- १८८६ -- फ्रेंकेलघटसर्प -- १८८४ -- लोफ्लरकॉलरा -- १८८३ -- रॉबर्ट कॉकगोवर -- १९५४ -- एंडर्स, पीबलसइन्फ्यूएंझा -- १९३३ -- स्मिथ, ॲन्ड्र्यूज र्हायनो व्हायरस (सर्दीपडशाचा विषाणू) -- १९६० -- टूरेल व इतर*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अनुभव हा महान शिक्षक आहे , पण तो मोबदला मात्र फार घेतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) देशात कोणते राज्य कीटकनाशक वापरण्यात प्रथम क्रमांकावर आहे ?२) भारताचे प्रथम नागरिक कोण असतात ?३) अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था ( आर्टी ) च्या कार्यालयाचे उद्घाटन कोठे होणार आहे ?४) 'दंडवत' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) 'टायगर प्रोजेक्ट' हा उपक्रम कोणत्या पंतप्रधानांच्या कार्यकाळात सुरू करण्यात आले होते ? *उत्तरे :-* १) उत्तरप्रदेश २) राष्ट्रपती ३) मुंबई ४) नमस्कार ५) इंदिरा गांधी *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अजय बिरारी, साहित्यिक, नाशिक👤 रमेश करपे, शिक्षक, कुंडलवाडी👤 प्रदिप कारले👤 पोतन्ना चिंचलोड, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गुरु मानुष करि जानते ते नर कहिये अन्ध ।यहां दुखी संसारमें आगे यमके बन्ध ॥ 34 ॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपण किती खरे बोलतो आणि किती खोटे बोलतो हे,फक्त आपल्यालाच सर्वांत जास्त माहित असते. कारण, दुसऱ्याला कितीही खोटे सांगून स्वतः चा समाधान करण्यासाठी भलेही प्रयत्न असेल तरीही अंतर्मनाला सर्व काही माहित असते त्यामुळे प्रयत्न करून सुद्धा स्वतःला पाहिजे तो समाधान मिळत नाही. म्हणून असेही वागू नये की, तीच सवय लागून जगण्याची वेळ आपल्यावर येईल.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्वतःची किंमत* "एकदा एक श्रीमंत माणूस नदी काठावरील मंदिरात देवदर्शनासाठी गेला. अचानक त्याच्या मनात आले, नदीत जाऊन हात-पाय धुवावेत व मग मंदिरात देवदर्शनासाठी जावे. तो नदीवर गेला. हात-पाय धूत असताना त्याच्या तोल गेला आणि तो नदीत पडला. त्याला पोहता येत नव्हते. त्याची धडपड सुरू झाली. तो ओरडू लागला पण त्याला वाचविण्यासाठी कुणीही पुढे येईना. अखेर, एका साधूने नदीत उडी घेतली. त्या साधूने त्याला वाचविले. काठावर आणले. काही वेळाने, तो श्रीमंत गृहस्थ भानावर आला. त्याने खिशातून खूप नोटा बाहेर काढल्या. पण त्यातील फक्त एक रूपयाची नोट साधूच्या हातावर ठेवली.हे पाहून काठावर जमलेले लोक संतापले. चिडून त्यांना थांबविले. त्यांनी त्या व्यापार्याला उचलले व नदीत टाकणार इतक्यात साधूने त्यांना थांबविले. साधू म्हणाला, 'थांबा, त्यांने स्वत:चा किंमतीएवढेच बक्षिस दिले आहे. यात त्याची काय चूक? त्याची किंमत एवढीच आहे.'*तात्पर्य :- माणसाची खरी किंमत प्रसंगानेच कळते. उपकारकर्त्याचे उपकार स्मरणे हेच माणसाचे कर्तव्य आहे."*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 02 ऑगस्ट 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/KagHN9Fs8UmWSC66/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟠 *_ या वर्षातील २१५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟠 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟠•••••••••••••••••••••••••••••••••*२००१: ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील विजेता पुल्लेला गोपीचंद याची भारतीय क्रीडाक्षेत्रातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी निवड.**१९९६: अटलांटा ऑलिंपिक स्पर्धेत अमेरिकेच्या मायकेल जॉन्सनने दोनशे आणि चारशे मीटरच्या शर्यतीत, एकाच ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदके पटकावून ऑलिंपिकच्या इतिहासातील पहिला खेळाडू होण्याचा मान पटकवला.**१९९०: इराकने कुवेतवर आक्रमण केले.**१९७९: नगर जिल्ह्यातील डॉ. रजनीकांत आरोळे व त्यांच्या पत्नीला मॅगसेसे पुरस्कार जाहीर**१९५४: दादरा व नगर हवेली हा प्रांत भारतीयांनी पोर्तुगीजांकडुन ताब्यात घेतला.**१९२३: काल्व्हिन कूलिज अमेरिकेचे ३० वे राष्ट्राध्यक्ष बनले. हे अतिशय मोजके बोलण्यासाठी प्रसिद्ध होते.**१७९०: अमेरिकेत पहिली जनगणना सुरू झाली.*🟠 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟠 •••••••••••••••••••••••••••••••••*२००१: चिन्मय मोघे -- कवी, नाटककार**१९७९: प्रशांत देशमुख-- लेखक, प्रसिद्ध व्याख्याते**१९७४: सिद्धार्थ रॉय कपूर -- भारतीय चित्रपट निर्माता आणि रॉय कपूर फिल्म्सचा संस्थापक**१९६७: गजानन यशवंत देसाई -- कादंबरीकार* *१९६७: प्रा.डॉ.गजानन गोपाळराव हेरोळे -- कवी, लेखक, संपादक* *१९६६: सुनील ओवाळ -- कवी, लेखक**१९६१: प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले -- लेखक, कवी, वक्ते* *१९५८: अविनाश धर्माधिकारी-- भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी अधिकारी, विचारवंत, लेखक**१९५८: अर्शद अयुब – भारतीय क्रिकेटपटू आणि व्यवस्थापक**१९४७: मा. रमेश बैस -- महाराष्ट्राचे माजी राज्यपाल**१९४१: ज्यूल्स हॉफमन – नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च जीवशास्त्रज्ञ**१९३८: गोविंद पुरुषोत्तम देशपांडे -- नाटककार, कवी आणि निबंधलेखक ( मृत्यू:२६ आक्टोबर २०१३)**१९३५: डॉ. रमेश शास्त्री-- कवि आणि गीतकार (मृत्यू: ३० एप्रिल २०१० )**१९२८: दत्तात्रय गंगाधर कुलकर्णी (दत्ताजी कुलकर्णी) -- लेखक* *१९२३: विष्णुपंत श्रीनिवासराव सुभेदार-- लेखक, संपादक* *१९१८: दादा जे.पी.वासवानी –आध्यात्मिक गुरू,सिंधी धर्मीयांतील गुरुतुल्य व्यक्तिमत्त्व,(मृत्यू: १२ जुलै, २०१८ )**१९१०: पुरुषोत्तम शिवराम रेगे – कादंबरीकार, नाटककार, कवी आणि समीक्षक (मृत्यू: १७ फेब्रुवारी १९७८ )**१८७७: श्रीकृष्ण नीलकंठ चापेकर -- कवी आणि समीक्षक (मृत्यू: १७ डिसेंबर १९४२ )**१८७६: पिंगाली वेंकय्या – भारतीय तिरंग्याचा रचनाकार (मृत्यू: ४ जुलै १९६३ज्ञ)**१८६१: आचार्य प्रफुल्लचंद्र रे – भारतीय रसायनशास्त्रज्ञ, देशातील वैज्ञानिक चळवळीचे प्रणेते, (मृत्यू: १६ जून १९४४ )**१८३५: अलीशा ग्रे – वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीचे एक संस्थापक (मृत्यू: २१ जानेवारी १९०१ )**१८२०: जॉन टिंडाल – ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ४ डिसेंबर १८९३ )* 🟠 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟠 ••••••••••••••••••••••••••••••••• *२०२३: नितीन चंद्रकांत देसाई -- भारतीय कला दिग्दर्शक , प्रॉडक्शन डिझायनर आणि चित्रपट आणि दूरदर्शन निर्माता (जन्म: ६ ऑगस्ट १९६५ )**२०२१: प्रभाकर लक्ष्मण गावडे-- जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत (जन्म: २० जून १९२४ )**२०२०: पंडित गोविंद भिलारे -- अंतरराष्ट्रीय ख्यातीचे पखवाज वादक (जन्म: ८ जून १९७४)**२०१३: बाबासाहेब केदार--विदर्भातील ज्येष्ठ नेते आणि माजी ग्रामविकास मंत्री (जन्म: १५ मे १९२८ )**२०१०: कमल कपूर -- भारतीय अभिनेता आणि निर्माता (जन्म: २२ फेब्रुवारी १९२० )**२००८: चेतन दातार -- मराठी नाटककार, अभिनेते आणि नाट्यरंगकर्मी (जन्म: १९६४)**१९७९: करण दिवाण -- हिंदी चित्रपटांमधील चित्रपट अभिनेता (जन्म: ६ नोव्हेंबर १९१७ )**१९३४: पॉल फॉन हिन्डेनबर्ग – जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २ आक्टोबर १८४७ )**१९२२: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल – स्कॉटिश - अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक, टेलिफोनचा संशोधक (जन्म: ३ मार्च १८४७ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मैत्री दिन - 04 ऑगस्ट त्यानिमित्ताने *जिंदगी का नाम दोस्ती ....*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; SC,ST मध्ये उपवर्ग तयार करण्यास मंजुरी, आरक्षणाचा लाभ फक्त पहिल्या पिढीला मिळावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मराठा समाजाच्या आर्थिक परिस्थितीकडे अपवादात्मक दृष्टीनं पाहणं गरजेच; राज्य मागास प्रवर्ग आयोगाचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *भिवंडी महानगरपालिकेकडून स्वच्छता अभियान मोहीम, आठशे विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *PSI परीक्षेत अमोल घुटुकडे राज्यात पहिला, सातारकरांसाठी अभिमानाची गोष्ट; MPSCचा निकाल जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश:सातारा जिल्ह्यातील धबधबे आणि सर्व पर्यटनस्थळे 5 ऑगस्टपर्यंत बंद राहणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या नेमबाज स्वप्नील कुसाळे यांना राज्य सरकारकडून एक कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टी20 मालिका विजयानंतर आता टीम इंडिया श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज, प्रेमदासा स्टेडियम मध्ये आज होणार पहिला एकदिवसीय सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सागरगड*अलिबागपासून ७ किमी.अंतरावर डोंगरावर हा शिवकालीन किल्ला आहे. हा समुद्रसपाटीपासून सुमारे १३५७ फूट उंचावर आहे. येथे जाण्याकरीता अलिबाग - पेण मार्गावरील खंडाळा गावातून रस्ता आहे. गावाच्या पूर्वेला डोंगर दिसतो. त्याच्या पाठीमागे सागरगड लपलेला आहे. खंडाळा गावातून फलवाटेने गडावर जावे लागते. गडाच्या निम्म्या उंचीवर सिध्देश्वर मंदिर आहे. या मंदिराजवळच आश्रम तसेच विहीर आहे. येथे विश्रांतीची सोय होऊ शकते. पावसाळयाच्या दिवसात मंदिराजवळच एक धबधबा वहात असतो. श्रारावणी सोमवारी येथे बरेच भाविक हजेरी लावतात. या आश्ररमाच्या थोडं अलिकडेच एक वाट डावीकडे वर सागरगडाकडे जाते. सिध्देश्वरपासून साधारणत फन ते एक तासात आपण सागरगडावर येवून पोहचतो. सागरगडाच्या मुख्य दरवाजा पूर्णपणे ढासळलेला आहे. परंतू त्याच्या बाजूचे दोन बूरूज पडक्या अवस्थेत अस्तत्त्वात आहेत. या प्रवेशारातून गडावर प्रवेश करायचा. माची व बालकिल्ला अशा स्वरूपात गडाची रचना आहे. बालेकिल्लेवर एक लहानसं तळं मंदिर तसेच एका पडक्या इमारतीचे अवशेष आहेत. गडावर एक बारमाही पाण्याचे कुंड (पांडवकुंड) आहे.माचीवर सतीची माळ नावाची जागा आहे. तिथं नऊ थडगी आहेत. या बाजूच्या टोकाला एक सुळका आहे त्यास वानरटोक असे म्हटले जाते. गडावर इतर कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नाहीत.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पुस्तके व मित्र हे थोडकेच असावेत पण ते चांगले असावेत.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'मेरी झाशी नही दुंगी'* ही घोषणा कोणाची आहे ?२) २०२४ चा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' कोणाला जाहीर झाला ?३) लोकसभा खासदारांना त्यांच्या मतदारसंघात खर्च करण्यासाठी किती रुपये निधी दिला जातो ?४) 'दंत' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) स्वतंत्र भारताकडून एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके मिळवणारी पहिली खेळाडू कोण ठरली ?*उत्तरे :-* १) राणी लक्ष्मीबाई २) डॉ. सुधा मूर्ती ३) ५ कोटी रुपये ४) दात ५) मनू भाकर, शूटर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 जी. पी. मिसाळे, सेवानिवृत्त शिक्षक तथा पत्रकार, धर्माबाद👤 काशिनाथ उशलवार, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद👤 कैलास चंदोड, सामाजिक कार्यकर्ते, येताळा👤 दुर्गा डांगे👤 प्रतिक गाडे👤 आनंद पाटील धानोरकर👤 शिवानंद गायकवाड👤 रवींद्र वाघमारे, शिक्षक, नांदेड👤 दयानंद भुत्ते👤 दिगंबर वाघमारे, संपादक, कंधार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्ञान समागम प्रेम सुख दया भक्ति विश्वास।गुरु सेवा ते पाइये सतगुरु चरण निवास ॥ 33 ॥ ।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जेथे पिकते तेथे विकत नाही असे, अनेकदा ऐकण्यात आले आहे. तरीही पिंकाची असो किंवा आपल्या विचारांची पेरणी करायचे थांबवू नये. समाजात आजही बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या पिंकाची आवश्यकता आहे तीच आवश्यकता विचारांची सुद्धा आहे. कारण समाजात राहणारे सर्वच लोक एक सारखे नसतात. काही लोक दु:खी असतात तर काहींच्या बाबतीत विचार करणे सुद्धा अवघड जाते. म्हणून ज्या प्रकारे होईल त्या प्रकारे पिकांची असो किंवा आपल्या विचारांची आवर्जून पेरणी करावी. ती पेरणी करण्याचा सर्वांनाच अधिकार आहे तो, अधिकार आपण कोणत्याही परिस्थितीत गमावू नये. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अति शहाणा त्याचा बैल रिकामा* " एके काळाची गोष्ट आहे. एक गाढव होते. दुसरे प्राणी नेहमी त्याची थट्टा करत. तो दुसऱ्या प्राण्यांचे असे वागणे पाहून कंटाळला होता. तो नेहमी विचार करत असे की, त्याच्या जवळ सुध्दा ताकात,सौंदर्य किवा गोड आवाज असता तर दुसऱ्या प्राण्यांनी त्याची थट्टा केली नसती.एकदा गाढव असाच कुठे तरी जात होता. वाटेत त्याला सिंहाचे कातडे पडलेले दिसले. प्रथम गाढवाने त्याचाकडे दुर्लक्ष केले आणि पुढे तो चालू लागला. मग त्याला अचानक एक युक्ती सुचली. त्याने ते सिंहाचे कातडे घेतले आणि अंगावर टाकले. त्याला वाटले आता सगळ्या प्राण्यांना वाटेल कि, मी सिंह आहे आणि ते माझा आदर करतील .सिंहाचे कातडे अंगावर पांघरून गाढव पुढे निघाला. वाटेत तो एका गिधाडाजवळ पोहचला. गिधाडाने त्याला सिंहच समजले आणि तो घाबरून तेथून पळून गेला. गाढवाला हे सर्व पाहून खूप मजा आली. आता त्याला वाटले कि, तो आता सहज जंगलात राजा बनेल. त्यानंतर तर जो कोणी कातडे पांघरलेल्या गाढवाला पाहत असे ते घाबरून पळून जायचे. गाढवाला या खेळामध्ये खूप मजा वाटायला लागली.थोड्याच वेळात गाढव एका कोल्हीनी शेजारी येउन थांबला. गाढव तिला घाबरावायला जातो. कोल्हीन त्याचा आवाज ऐकते .कोल्हीन त्याला म्हणाली ,जर मी तुझा रेकण्याचा आवाज ऐकला नसता तर मी पण तुला घाबरले असते. गाढव बिचारा एवढंस तोंड करून निघून गेला. सिंहाचं कातडे पण त्याचा बावळटपणा लपू शकला नाही.*तात्पर्य - अति शहाणा त्याचा बैल रिकामा "*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 02 ऑगस्ट 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/KagHN9Fs8UmWSC66/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟠 *_ या वर्षातील २१५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟠 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟠•••••••••••••••••••••••••••••••••*२००१: ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील विजेता पुल्लेला गोपीचंद याची भारतीय क्रीडाक्षेत्रातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी निवड.**१९९६: अटलांटा ऑलिंपिक स्पर्धेत अमेरिकेच्या मायकेल जॉन्सनने दोनशे आणि चारशे मीटरच्या शर्यतीत, एकाच ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदके पटकावून ऑलिंपिकच्या इतिहासातील पहिला खेळाडू होण्याचा मान पटकवला.**१९९०: इराकने कुवेतवर आक्रमण केले.**१९७९: नगर जिल्ह्यातील डॉ. रजनीकांत आरोळे व त्यांच्या पत्नीला मॅगसेसे पुरस्कार जाहीर**१९५४: दादरा व नगर हवेली हा प्रांत भारतीयांनी पोर्तुगीजांकडुन ताब्यात घेतला.**१९२३: काल्व्हिन कूलिज अमेरिकेचे ३० वे राष्ट्राध्यक्ष बनले. हे अतिशय मोजके बोलण्यासाठी प्रसिद्ध होते.**१७९०: अमेरिकेत पहिली जनगणना सुरू झाली.*🟠 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟠 •••••••••••••••••••••••••••••••••*२००१: चिन्मय मोघे -- कवी, नाटककार**१९७९: प्रशांत देशमुख-- लेखक, प्रसिद्ध व्याख्याते**१९७४: सिद्धार्थ रॉय कपूर -- भारतीय चित्रपट निर्माता आणि रॉय कपूर फिल्म्सचा संस्थापक**१९६७: गजानन यशवंत देसाई -- कादंबरीकार* *१९६७: प्रा.डॉ.गजानन गोपाळराव हेरोळे -- कवी, लेखक, संपादक* *१९६६: सुनील ओवाळ -- कवी, लेखक**१९६१: प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले -- लेखक, कवी, वक्ते* *१९५८: अविनाश धर्माधिकारी-- भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी अधिकारी, विचारवंत, लेखक**१९५८: अर्शद अयुब – भारतीय क्रिकेटपटू आणि व्यवस्थापक**१९४७: मा. रमेश बैस -- महाराष्ट्राचे माजी राज्यपाल**१९४१: ज्यूल्स हॉफमन – नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च जीवशास्त्रज्ञ**१९३८: गोविंद पुरुषोत्तम देशपांडे -- नाटककार, कवी आणि निबंधलेखक ( मृत्यू:२६ आक्टोबर २०१३)**१९३५: डॉ. रमेश शास्त्री-- कवि आणि गीतकार (मृत्यू: ३० एप्रिल २०१० )**१९२८: दत्तात्रय गंगाधर कुलकर्णी (दत्ताजी कुलकर्णी) -- लेखक* *१९२३: विष्णुपंत श्रीनिवासराव सुभेदार-- लेखक, संपादक* *१९१८: दादा जे.पी.वासवानी –आध्यात्मिक गुरू,सिंधी धर्मीयांतील गुरुतुल्य व्यक्तिमत्त्व,(मृत्यू: १२ जुलै, २०१८ )**१९१०: पुरुषोत्तम शिवराम रेगे – कादंबरीकार, नाटककार, कवी आणि समीक्षक (मृत्यू: १७ फेब्रुवारी १९७८ )**१८७७: श्रीकृष्ण नीलकंठ चापेकर -- कवी आणि समीक्षक (मृत्यू: १७ डिसेंबर १९४२ )**१८७६: पिंगाली वेंकय्या – भारतीय तिरंग्याचा रचनाकार (मृत्यू: ४ जुलै १९६३ज्ञ)**१८६१: आचार्य प्रफुल्लचंद्र रे – भारतीय रसायनशास्त्रज्ञ, देशातील वैज्ञानिक चळवळीचे प्रणेते, (मृत्यू: १६ जून १९४४ )**१८३५: अलीशा ग्रे – वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीचे एक संस्थापक (मृत्यू: २१ जानेवारी १९०१ )**१८२०: जॉन टिंडाल – ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ४ डिसेंबर १८९३ )* 🟠 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟠 ••••••••••••••••••••••••••••••••• *२०२३: नितीन चंद्रकांत देसाई -- भारतीय कला दिग्दर्शक , प्रॉडक्शन डिझायनर आणि चित्रपट आणि दूरदर्शन निर्माता (जन्म: ६ ऑगस्ट १९६५ )**२०२१: प्रभाकर लक्ष्मण गावडे-- जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत (जन्म: २० जून १९२४ )**२०२०: पंडित गोविंद भिलारे -- अंतरराष्ट्रीय ख्यातीचे पखवाज वादक (जन्म: ८ जून १९७४)**२०१३: बाबासाहेब केदार--विदर्भातील ज्येष्ठ नेते आणि माजी ग्रामविकास मंत्री (जन्म: १५ मे १९२८ )**२०१०: कमल कपूर -- भारतीय अभिनेता आणि निर्माता (जन्म: २२ फेब्रुवारी १९२० )**२००८: चेतन दातार -- मराठी नाटककार, अभिनेते आणि नाट्यरंगकर्मी (जन्म: १९६४)**१९७९: करण दिवाण -- हिंदी चित्रपटांमधील चित्रपट अभिनेता (जन्म: ६ नोव्हेंबर १९१७ )**१९३४: पॉल फॉन हिन्डेनबर्ग – जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २ आक्टोबर १८४७ )**१९२२: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल – स्कॉटिश - अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक, टेलिफोनचा संशोधक (जन्म: ३ मार्च १८४७ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मैत्री दिन - 04 ऑगस्ट त्यानिमित्ताने *जिंदगी का नाम दोस्ती ....*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; SC,ST मध्ये उपवर्ग तयार करण्यास मंजुरी, आरक्षणाचा लाभ फक्त पहिल्या पिढीला मिळावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मराठा समाजाच्या आर्थिक परिस्थितीकडे अपवादात्मक दृष्टीनं पाहणं गरजेच; राज्य मागास प्रवर्ग आयोगाचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *भिवंडी महानगरपालिकेकडून स्वच्छता अभियान मोहीम, आठशे विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *PSI परीक्षेत अमोल घुटुकडे राज्यात पहिला, सातारकरांसाठी अभिमानाची गोष्ट; MPSCचा निकाल जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश:सातारा जिल्ह्यातील धबधबे आणि सर्व पर्यटनस्थळे 5 ऑगस्टपर्यंत बंद राहणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या नेमबाज स्वप्नील कुसाळे यांना राज्य सरकारकडून एक कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टी20 मालिका विजयानंतर आता टीम इंडिया श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज, प्रेमदासा स्टेडियम मध्ये आज होणार पहिला एकदिवसीय सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सागरगड*अलिबागपासून ७ किमी.अंतरावर डोंगरावर हा शिवकालीन किल्ला आहे. हा समुद्रसपाटीपासून सुमारे १३५७ फूट उंचावर आहे. येथे जाण्याकरीता अलिबाग - पेण मार्गावरील खंडाळा गावातून रस्ता आहे. गावाच्या पूर्वेला डोंगर दिसतो. त्याच्या पाठीमागे सागरगड लपलेला आहे. खंडाळा गावातून फलवाटेने गडावर जावे लागते. गडाच्या निम्म्या उंचीवर सिध्देश्वर मंदिर आहे. या मंदिराजवळच आश्रम तसेच विहीर आहे. येथे विश्रांतीची सोय होऊ शकते. पावसाळयाच्या दिवसात मंदिराजवळच एक धबधबा वहात असतो. श्रारावणी सोमवारी येथे बरेच भाविक हजेरी लावतात. या आश्ररमाच्या थोडं अलिकडेच एक वाट डावीकडे वर सागरगडाकडे जाते. सिध्देश्वरपासून साधारणत फन ते एक तासात आपण सागरगडावर येवून पोहचतो. सागरगडाच्या मुख्य दरवाजा पूर्णपणे ढासळलेला आहे. परंतू त्याच्या बाजूचे दोन बूरूज पडक्या अवस्थेत अस्तत्त्वात आहेत. या प्रवेशारातून गडावर प्रवेश करायचा. माची व बालकिल्ला अशा स्वरूपात गडाची रचना आहे. बालेकिल्लेवर एक लहानसं तळं मंदिर तसेच एका पडक्या इमारतीचे अवशेष आहेत. गडावर एक बारमाही पाण्याचे कुंड (पांडवकुंड) आहे.माचीवर सतीची माळ नावाची जागा आहे. तिथं नऊ थडगी आहेत. या बाजूच्या टोकाला एक सुळका आहे त्यास वानरटोक असे म्हटले जाते. गडावर इतर कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नाहीत.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पुस्तके व मित्र हे थोडकेच असावेत पण ते चांगले असावेत.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'मेरी झाशी नही दुंगी'* ही घोषणा कोणाची आहे ?२) २०२४ चा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' कोणाला जाहीर झाला ?३) लोकसभा खासदारांना त्यांच्या मतदारसंघात खर्च करण्यासाठी किती रुपये निधी दिला जातो ?४) 'दंत' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) स्वतंत्र भारताकडून एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके मिळवणारी पहिली खेळाडू कोण ठरली ?*उत्तरे :-* १) राणी लक्ष्मीबाई २) डॉ. सुधा मूर्ती ३) ५ कोटी रुपये ४) दात ५) मनू भाकर, शूटर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 जी. पी. मिसाळे, सेवानिवृत्त शिक्षक तथा पत्रकार, धर्माबाद👤 काशिनाथ उशलवार, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद👤 कैलास चंदोड, सामाजिक कार्यकर्ते, येताळा👤 दुर्गा डांगे👤 प्रतिक गाडे👤 आनंद पाटील धानोरकर👤 शिवानंद गायकवाड👤 रवींद्र वाघमारे, शिक्षक, नांदेड👤 दयानंद भुत्ते👤 दिगंबर वाघमारे, संपादक, कंधार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्ञान समागम प्रेम सुख दया भक्ति विश्वास।गुरु सेवा ते पाइये सतगुरु चरण निवास ॥ 33 ॥ ।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जेथे पिकते तेथे विकत नाही असे, अनेकदा ऐकण्यात आले आहे. तरीही पिंकाची असो किंवा आपल्या विचारांची पेरणी करायचे थांबवू नये. समाजात आजही बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या पिंकाची आवश्यकता आहे तीच आवश्यकता विचारांची सुद्धा आहे. कारण समाजात राहणारे सर्वच लोक एक सारखे नसतात. काही लोक दु:खी असतात तर काहींच्या बाबतीत विचार करणे सुद्धा अवघड जाते. म्हणून ज्या प्रकारे होईल त्या प्रकारे पिकांची असो किंवा आपल्या विचारांची आवर्जून पेरणी करावी. ती पेरणी करण्याचा सर्वांनाच अधिकार आहे तो, अधिकार आपण कोणत्याही परिस्थितीत गमावू नये. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अति शहाणा त्याचा बैल रिकामा* " एके काळाची गोष्ट आहे. एक गाढव होते. दुसरे प्राणी नेहमी त्याची थट्टा करत. तो दुसऱ्या प्राण्यांचे असे वागणे पाहून कंटाळला होता. तो नेहमी विचार करत असे की, त्याच्या जवळ सुध्दा ताकात,सौंदर्य किवा गोड आवाज असता तर दुसऱ्या प्राण्यांनी त्याची थट्टा केली नसती.एकदा गाढव असाच कुठे तरी जात होता. वाटेत त्याला सिंहाचे कातडे पडलेले दिसले. प्रथम गाढवाने त्याचाकडे दुर्लक्ष केले आणि पुढे तो चालू लागला. मग त्याला अचानक एक युक्ती सुचली. त्याने ते सिंहाचे कातडे घेतले आणि अंगावर टाकले. त्याला वाटले आता सगळ्या प्राण्यांना वाटेल कि, मी सिंह आहे आणि ते माझा आदर करतील .सिंहाचे कातडे अंगावर पांघरून गाढव पुढे निघाला. वाटेत तो एका गिधाडाजवळ पोहचला. गिधाडाने त्याला सिंहच समजले आणि तो घाबरून तेथून पळून गेला. गाढवाला हे सर्व पाहून खूप मजा आली. आता त्याला वाटले कि, तो आता सहज जंगलात राजा बनेल. त्यानंतर तर जो कोणी कातडे पांघरलेल्या गाढवाला पाहत असे ते घाबरून पळून जायचे. गाढवाला या खेळामध्ये खूप मजा वाटायला लागली.थोड्याच वेळात गाढव एका कोल्हीनी शेजारी येउन थांबला. गाढव तिला घाबरावायला जातो. कोल्हीन त्याचा आवाज ऐकते .कोल्हीन त्याला म्हणाली ,जर मी तुझा रेकण्याचा आवाज ऐकला नसता तर मी पण तुला घाबरले असते. गाढव बिचारा एवढंस तोंड करून निघून गेला. सिंहाचं कातडे पण त्याचा बावळटपणा लपू शकला नाही.*तात्पर्य - अति शहाणा त्याचा बैल रिकामा "*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Posts (Atom)