✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 30 मार्च 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/JdKrJqvPkP3Js49M/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील ९० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९४४:दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी सोफिया, बल्गेरिया येथे तुफानी बॉम्बवर्षाव केला.**१९२९:भारत व इंग्लंडदरम्यान हवाई टपालसेवा सुरू झाली.**१८५६:पॅरिसचा तह झाल्याने क्रिमियन युद्ध संपले**१८४२:अमेरिकन शल्यविशारद डॉ. क्रॉफर्ड लाँग यांनी शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी इथर या द्रव्याचा प्रथमच वापर केला.**१७२९:थोरले बाजीराव पेशवे यांनी जैतपूर येथे महंमदशहा बंगश याचा पराभव केला.**१६६५:पुरंदर किल्ल्यावर दिलेरखानाशी लढताना वीर मुरारजी धारातीर्थी पडला* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९६७:नागेश कुकुनूर--भारतीय चित्रपट दिग्दर्शक,निर्माता,पटकथा लेखक**१९६५:फ़िरोज़ ए.नाडियाडवाला-- भारतीय फिल्म निर्माता**१९६०:राजन लाखे -- प्रसिद्ध लेखक व कवी* *१९५१:पं.भीमराव पांचाळे-- सुप्रसिद्ध मराठी गजलगायक मराठी गजलकारांना प्रोत्साहन मिळण्यासाठी ते गजलसागर संमेलने आणि गजल कार्यशाळांचे आयोजन**१९४७:प्रा.दिलीप परदेशी--नाटककार व साहित्यिक(मृत्यू:४ नोव्हेंबर २०११)**१९४६:ए.के.शेख -- प्रसिद्ध गझलकार,कवी संपादक**१९४२:वसंत आबाजी डहाके – प्रसिद्ध भाषातज्ज्ञ,कोशकार,सुप्रसिद्ध लेखक आणि कवी,फेब्रुवारी २०१२ च्या चंद्रपूर येथे झालेल्या ८५ व्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष**१९४१:अशोक परांजपे--महाराष्ट्रातील लोककला संशोधक,गीतकार,नाटककार.(मृत्यू:९ एप्रिल २००९)**१९४०:अशोक महादेव जोशी-- कृषिलेखक, बालसाहित्यिक (मृत्यु:मार्च २०१४)**१९३०:ॲड.एकनाथ पांडुरंग साळवे-- चंद्रपूरचे माजी आमदार,‘एन्काऊंटर’कार, ज्येष्ठ समाजसेवक (मृत्यू:१४ मार्च २०२१)**१९३०:मधुकर श्रीपाद माटे-- पुरातत्त्व, इतिहास,वास्तुशास्त्र आणि वास्तुशिल्प ह्या विषयांचे अभ्यासक(मृत्यू:२३ एप्रिल २०१९)**१९२८:डॉ.दत्ता वाळवेकर-- भारतीय मराठी गायक आणि संगीत दिग्दर्शक,लेखक (मृत्यू:१६ मार्च २०१०)**१९०८:देविका राणी – अभिनेत्री (मृत्यू:९ मार्च १९९४)**१९०६:जनरल कोडेन्डेरा सुबय्या तथा के.एस.थिमय्या – भारतीय भूदलाचे ६ वे सरसेनापती,पद्मभूषण (मृत्यू:१७ डिसेंबर १९६५)**१८९९:शरदेंन्दू बंदोपाध्याय – बंगाली लेखक (मृत्यू:२२ सप्टेंबर १९७०)**१८९८:काशिनाथ रघुनाथ वैशंपायन--शिक्षक, लेखक (मृत्यू:८ नोव्हेंबर १९८५)**१८९५:निकोलाय बुल्गानिन – सोविएत युनियनचे अध्यक्ष (मृत्यू:२४ फेब्रुवारी १९७५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२००६:मनोहर श्याम जोशी-- हिंदी लेखक, पत्रकार आणि पटकथा लेखक(जन्म:९ ऑगस्ट,१९३३)* *२००२:आनंद बक्षी – सुप्रसिद्ध गीतकार (जन्म:२१ जुलै १९२०)**१९९३:साबानंद मोनप्पा अर्थात एस.एम.पंडित -- चित्रकार (जन्म:२५ मार्च१९१६)**१९८९:गजानन वासुदेव तथा ’ग.वा.’बेहेरे – 'सोबत' साप्ताहिकाचे संस्थापक,संपादक व साहित्यिक (जन्म:२४ सप्टेंबर १९२२)**१९७६:रघुवीर मूळगावकर – चित्रकार (जन्म:१४ नोव्हेंबर १९१८)**१९६९:वासुदेव गोविंद मायदेव – कवी व समाजसेवक (जन्म:२६ जुलै १८९४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आज डॉक्टर डे त्यानिमित्ताने प्रासंगिक लेख *डॉक्टर : देव की दानव*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *भर निवडणुकीत खातं गोठवलेल्या काँग्रेसला पुन्हा आयकर विभागाची नोटीस, तब्बल 1700 कोटींचा दंड!*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *श्रीनिवास पाटलांची सातारच्या रिंगणातून माघार, शशिकांत शिंदे, सुनील माने, बाळासाहेब पाटील यांची नावं चर्चेत; साताऱ्याचा उमेदवार दोन ते तीन दिवसांत जाहीर करणार, शरद पवारांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीचा तुरुंगात मृत्यू, घातपाताचा संशय; उत्तर प्रदेश पोलीस अलर्ट मोडवर!*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रात तापमानाचा पारा हा 40 ते 42 डिग्री से. राहण्याची शक्यता आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *MHT CET 2024 - लोकसभा निवडणुकीमुळे सीईटी परीक्षेच्या तारखेत पुन्हा बदल*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सत्तेत आल्यास सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण देणार, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महिला आरक्षणाबाबत केली मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL T20 - KKR ने RCB ला 7 विकेटने हरविले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 फिजिओथेरपी 📙एकविसाव्या शतकात 'फिजिओ'ला म्हणजे फिजिओ-थेरेपिस्टला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. सचिन तेंडुलकरचे लंगडणे असो, शोएब अख्तरचा खांदा दुखावणे असो किंवा बेकहॅमची पाठ दुखावणे, तात्काळ थेट ग्राऊंडवर येऊन खेळाडूला काही पाच मिनिटात खेळता येणारा हा थेरपिस्ट आपण थेट दूरचित्रवाणीवरही पाहतो. वेळेची प्रचंड निकड असलेल्या घाईगर्दीच्या जमान्यात आजारपणानंतरची विश्रांती, हाडांच्या वा स्नायूंच्या दुखापतीनंतरचा आराम हा प्रकारच नाहीसा होत चालला आहे. डॉक्टरी इलाज चालू असताना किंवा ते संपल्यावर शरीरातील विविध सांधे, स्नायू वा आवश्यक हालचाली संतुलितरित्या करवून घेणे व त्यामुळे कमजोर झालेल्या स्नायूंना बळकटी आणून पूर्ववत बनवणे हे फिजिओथेरपिस्टचे काम असते. शास्त्रशाखेतील बायोलॉजी घेऊन बारावी झालेल्या विद्यार्थ्यांना पूर्ण चार वर्षांचे शिक्षण घेऊन फिजिओथेरपिस्ट बनता येते. शरीररचना, शरीरक्रिया, स्नायू हाडे, मज्जासंस्था व मेंदू या संदर्भातील बारकावे समजून घेतल्यावर मग फिजिओथेरपीचे प्रशिक्षण प्रत्यक्ष सुरू होते. विविध वैद्यकीय तपासण्यांचे अहवाल वाचणे व त्यांचा अर्थ लावणे हाही भाग त्यात येतोच.एखादे हाड मोडल्यानंतर त्यावरचे उपचार जरी अस्थिरोगतज्ज्ञ करत असले, तरी त्या दरम्यान व त्यानंतर या रुग्णास स्वतःचे व्यवहार आधाराने, वॉकरच्या साहाय्याने, कुबडी व काठीच्या सहाय्याने करायला शिकवणे शरीरातील स्नायूंची कमजोरी सुरू होण्याच्या आतच तिला प्रतिबंध करणे महत्त्वाचे असते. हे काम फिजिओ करीत असतो. गंमतीची गोष्ट म्हणजे आपल्या खांद्याचे महत्त्वाचे स्नायू म्हणजे डेल्टॉइड याचा वापर जेमतेम पाच ते सहा दिवस न झाल्यास त्याचा आकार व गोलाई कमी होऊन तो रोडावू लागतो. यालाच 'मसल वेस्टिंग' असे म्हणतात. असाच प्रकार पायाच्या गुडघ्यावरील चतुरस्क स्नायूच्या बाबतीतही तिव्रतेने होतो. त्यामुळे हात मोडला म्हणून गळ्यात अडकवला वा पायाच्या इजेमुळे गुडघ्यांच्या हालचाली थांबल्या तर हे वाळत गेलेले स्नायू पूर्ववत व्हायला काही आठवडे लागतात. प्लॅस्टर असतानाही किंवा काढल्यावर यासाठी व्यायाम फिजिओ करवून घेतो.न्यूमोनियाच्या रुग्णाला छातीतील कफ बाहेर काढण्यासाठी प्रवृत्त करण्याचे व्यायाम, मेंदूच्या आजारामुळे विविध स्नायूंवरील गेलेले नियंत्रण परत मिळवणे अर्धांगवायू झालेल्याला स्वतःच्या हालचाली करायला शिकवणे इत्यादी गोष्टी या अभ्यासक्रमात येतात. प्रगत अभ्यासक्रमात ऑक्युपेशनल म्हणजेच विविध व्यवसायांशी संबंधित आजाराच्या संदर्भातील उपचार, विविध खेळासंदर्भातील दुखापतींवर उपचार, बालकांच्या अनियंत्रित हालचालींवर उपचार अशा निरनिराळ्या उपशाखांत विशेष प्रशिक्षण मिळते.सध्या फिजिओ अनेक प्रकारच्या यंत्रांचाही वापर करीत असतो. पूर्वापार चालत आलेली शरीरातील विविध स्नायूंकडुन हालचाली करून घेणारी, ताण देणारी यंत्रे वा उपकरणे आता कमी वजनाची, सहज घरीही हाताळता येणारी अशी झाली आहेत. पण त्याचबरोबर प्रगत अशा अल्ट्रासॉनिक वेव्हज, मसल स्टिम्युलेटर्स, शॉर्टवेव्ह डायाथर्मी, मज्जासंस्थेतील संवेदनाचा वेग व व्याप्ती मोजणारी यंत्रे अशांची मदत घेऊन उपचार केले जातात.आधुनिक उपचारपद्धतीत ज्यावेळी रुग्ण तीनपेक्षा जास्त दिवस रुग्णालयात मुक्काम वाढवतो, तेंव्हा फिजिओथेरपिस्ट बहुधा त्याच्या संपर्कात येतो. खाटेवर पडून राहणे, शरीराने नको तितका आराम करणे आधुनिक वैद्यकशास्त्र तब्येतीला घातक समजते, हेच त्यामागचे कारण आहे.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्ञान ही वारसा हक्काने मिळणारी इस्टेट नाही, ते अभ्यास व कष्ट करूनच मिळवावे लागते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'निर्मानोंके के पावन युग में'* या हिंदी कवितेचे कवी कोण आहेत ?२) बाघ व वैनगंगा या दोन नद्यांचा संगम कोठे झाला आहे ?३) जगभरात एकूण किती भाषा बोलल्या जातात ?४) 'अमृत' या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा.५) मानवी शरीराच्या बाहेरच्या त्वचा आवरणास इंग्रजीत काय म्हणतात ?*उत्तरे :-* १) अटल बिहारी वाजपेयी २) काटी, गोंदिया ३) ७,१०२ भाषा ४) पीयूष, सुधा, संजीवनी ५) एपिडर्मीस *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 उत्कर्ष देवणीकर, उमरगा👤 अनिल पवार👤 गुरुनाथ तुकाराम यादव, नांदेड👤 लक्ष्मीकांत बेंकट, करखेली👤 वैभव कण्हेरकर, अमरावती👤 रजनीश सिंग👤 दुष्यंत सोनाळे, मा. नगरसेवक, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एका जिवें आतां जिणें जालें दोहीं । वेगळीक कांहीं नव्हे आतां ॥१॥नारायणा आम्हां नाहीं वेगळीक । पुरविली हे भाक सांभाळिली ॥२॥तुका म्हणे जालें सायासाचें फळ । सरली ते वेळ काळ दोन्ही ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखादी व्यक्ती स्वतः चा विचार न करता सत्याच्या वाटेवर चालत इतरांसाठी जगत असेल तर तिला पूर्णपणे समजून न घेता लावारिस, लोफर, खोटारडा, बिनकाम्या, मूर्ख अशा अनेक शब्दांनी त्याची प्रतारणा करणे हे कितपत योग्य आहे. ? अभिव्यक्तीचा इतका स्वैराचार कोणीही करु नये. विचारांची मर्यादा माणसाने ओलांडू नये.जी, व्यक्ती दुसऱ्याला त्या शब्दात बोलून मोकळी होऊन जाते तेव्हा खऱ्या अर्थाने तीच व्यक्ती स्वतः मधील माणुसकी विसरलेली असते. म्हणून इतरांकडे बघण्याचा दृष्टीकोन हा नेहमीच सकारात्मक असावा तर सर्वच चांगले दिसून येईल.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *निर्मळता*गुरु शिष्य भ्रमंतीला निघाले होते. फिरता फिरता ते एका जंगलात येवून पोहोचले. जंगलात काही अंतरावर एक झरा वाहत होता. गुरुजींना तहान लागली होती. त्यांनी शिष्याच्या हाती कमंडलू दिले आणि त्याला पाणी घेवून येण्यास सांगितले. शिष्य झऱ्या पाशी गेला आणि त्याला असे दिसले कि तेथून नुकतेच बैल गाड्या गेल्या आहेत, बैल पाण्यातून गेल्याने पाणी खूप गढूळ झाले आहे. पाण्यात झाडाची पाने पडलेली आहेत. त्याने विचार केला असे घाण झालेले पाणी गुरूंसाठी नेणे योग्य नाही. तो तसाच परत गुरूंकडे गेला आणि म्हणाला,"गुरुजी, पाणी खूप गढूळ आहे, आपल्याला दुसरी काही तरी व्यवस्था पहावी लागेल." गुरुजी म्हणाले," अरे त्यापेक्षा तू असे कर पुन्हा त्या झऱ्यापाशी जा आणि पुन्हा पाणी आणण्याचा प्रयत्न कर." शिष्य गेला, त्याला पुन्हा पाणी गढूळ दिसले, तो परत आला, गुरुनी त्याला परत पाठवले, असे चार पाच वेळेला झाले. शेवटी शिष्य कंटाळला, त्याच्या चेहऱ्यावर नाराजीचे आणि कंटाळलेले भाव दिसू लागले पण शिष्य गुरुज्ञा मोडायला तयार नव्हता. गुरुनी त्याला परत पाणी आणायला पाठवले. आताच्या वेळी त्याला मात्र आश्चर्य वाटले कारण या वेळी पाणी अगदी नितळ, स्वछ नि निर्मळ होते. त्याने ते पाणी कमंडलू मध्ये भरले आणि गुरूंसाठी घेवून आला. गुरुनी पाणी प्राशन केले आणि शिष्याला म्हणाले,"वत्सा ! आपल्या मनात सुद्धा असेच कुविचारांचे बैल धिंगाणा घालत असतात. ते मनाची निर्मळता कमी करून मनाला मलिन करण्याचा प्रयत्न करतात. पण आपण त्यापासून सावध राहिले पाहिजे. कुविचारांचा प्रभाव आपल्या मनावर होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे. मनाच्या झरयातील पाणी शांत होण्याची प्रतीक्षा जर आपण केली तर मनात कायम स्वच्छ, चांगले विचार येतील. भावनेच्या भरात कधीही निर्णय घेवू नये."*तात्पर्य- भावनेच्या भरात कोणतेही निर्णय घेऊ नयेत. मनात कायम स्वच्छ, चांगले विचार कसे येतील हेच पाहावे.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28 मार्च 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/seeQPxsVALxnWC8G/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील ८८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* ••••••••••••••••••••••••••••••••*१९९८:’सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग’ (C-DAC) या संस्थेने विकसित केलेला ’परम-१००००’ हा महासंगणक विधिपूर्वक देशाला अर्पण करण्यात आला.**१९९२:उद्योगपती जे.आर.डी.टाटा यांना राष्ट्रपती आर.वेंकटरमण यांच्या हस्ते ’भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला**१९७९:अमेरिकेतील ’थ्री माईल आयलंड’ या बेटावर असलेल्या अणूभट्टीतून किरणोत्सारी पदार्थांची गळती झाली.**१९४२:रासबिहारी बोस यांनी टोकियो येथे ’इंडियन इंडिपेन्डन्स लीग’ची स्थापना केली**१९३०:तुर्कस्तानमधील कॉन्स्टँटिनोपाल आणि अंगोरा शहरांची नावे बदलुन अनुक्रमे इस्तंबुल आणि अंकारा अशी करण्यात आली**१८५४:क्रिमियन युद्ध – फ्रान्सने रशियाविरुद्ध युध पुकारले.**१७३७:बाजीराव पेशव्यांनी दिल्लीवर हल्ला करुन मोगलांचा पराभव केला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८८:भरत बलवल्ली--स्वराधीश,एक युवा दिग्गज शास्त्रीय गायक* *१९८२:प्रा.तात्यासाहेब शिवाजी काटकर -- लेखक**१९७५:अक्षय खन्ना--भारतीय अभिनेता**१९७१:प्रा.डॉ.अजय दिनकरराव कुलकर्णी-- लेखक,संपादक* *१९६८:नासिर हुसैन – इंग्लिश क्रिकेटपटू**१९६६:डॅा.संध्या राजन अणवेकर-- कवयित्री, लेखिका* *१९६३:राजकुमार सुदाम बडोले-- माजी मंत्री तथा लेखक* *१९५४:मून मून सेन-- भारतीय अभिनेत्री**१९४९:प्रा.डॉ.विजय पांढरीपांडे -- जेष्ठ साहित्यिक,विचारवंत,अनेक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित* *१९४४:भारती पांडे-- प्रसिद्ध लेखिका**१९३५:श्रीनिवास हवालदार-- जेष्ठ कवी लेखक* *१९२७:विना मजुमदार-- भारतीय शैक्षणिक व सामाजिक कार्यकर्त्या(मृत्यू:३० मे २०१३)**१९२६:पहलान रतनजी " पोली " उमरीगर-- भारतीयक्रिकेट खेळाडू(मृत्यू:७ नोव्हेंबर २००६)**१९२५:राजा गोसावी – अभिनेता (मृत्यू:२८ फेब्रुवारी १९९८)**१९०३:बाळकृष्ण मोरेश्वर कानिटकर -- पुराण वांड्:मय,शैक्षणिक व विज्ञानविषयक लेखन(मृत्यू:४ ऑक्टोबर १९७१)**१८६८:मॅक्झिम गॉर्की – रशियन लेखक (मृत्यू:१८ जून १९३६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२००६:बबनराव नावडीकर (मूळ नाव: श्रीधर यशवंत कुलकर्णी)--मराठी गायक,कवि,लेखक व कीर्तनकार(जन्म:१९ऑगस्ट, १९२२)* *२०००:शांताराम द्वारकानाथ तथा राम देशमुख**१९९२:आचार्य सम्राट आनंदऋषीजी – स्थानकवासी जैनांचे सर्वश्रेष्ठ धर्मगुरू(जन्म:२४ नोव्हेंबर १८७७)**१९८८:श्री नाथ त्रिपाठी--भारतीय संगीतकार(जन्म:१४ मार्च १९१३)* *१९८४:विष्णू प्रभाकर लिमये--प्राच्यविद्या अभ्यासक,लेखक,संपादक(जन्म:२८ एप्रिल १९००)**१९४१:व्हर्जिनिया वूल्फ – ब्रिटिश लेखिका (जन्म:२५ जानेवारी १८८२)**१५५२:गुरू अंगद देव – शिखांचे दुसरे गुरू (जन्म:३१ मार्च १५०४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जुनी चालीरिती आणि आजची परिस्थिती*कोरोना काळात जुन्या चालीरीती ची पुन्हा एकदा ओळख झाली. त्यावर टाकलेला प्रकाश ........... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची आठ उमेदवारांची पहिली यादी केली जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यात अकोला सर्वाधिक हॉट! आज 41.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत उष्णतेचा पारा चाळीशीपार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नागपुरात उमेदवारी अर्ज भरण्याआधी नितीन गडकारींचे जोरदार शक्तिप्रदर्शन, विजयाची हॅटट्रिकचा केला निर्धार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यात पहिल्यांदाच डॉक्टरांना निवडणुकीच्या कामाला जुंपणार, मुंबईतील सुमारे 500 डॉक्टरांना लागली इलेक्शन ड्युटी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *देहूमध्ये संत तुकाराम महाराज यांच्या त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी बीज सोहळानिमित्त विविध कार्यक्रम*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी सदानंद वसंत दाते यांची राष्ट्रीय तपास संस्थेच्या महासंचालकपदी नियुक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *SRH ने रचला IPL च्या इतिहासातील सर्वोत्तम 277 धावसंख्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌪 *एल निनोमुळे काय होतं ?* 🌪 ************************शब्दश: एल निनो म्हणजे तान्हुलं बाळ. बाल ख्रिस्ताला उद्देशून हा शब्दप्रयोग केला जातो. पण नाताळच्या सुमारास होणाऱ्या हवामानातील बदलाला उद्देशून आता तो जगभर वापरला जातो. दक्षिण पॅसिफिक महासागराच्या विषुववृत्तीय विभागातील पाण्याचं तापमान सरासरीपेक्षा वाढतं. ही वाढ अर्धा अंश सेल्सियसहून अधिक असते. याच्याच जोडीला त्या भागातील हवेच्या दाबातही वाढ होते. या दोन्हींना मिळून वैज्ञानिक परिभाषेत 'एल निनो सदर्न ऑसिलेशन्स' असं भरभक्कम नाव आहे. पण सामान्यजनांच्या भाषेत या नैसर्गिक आविष्काराला 'एल निनो' असंच म्हटलं जातं. साधारण दर पाच वर्षांनी अशी परिस्थिती उद्भवते; पण काही वेळा ती दोन वर्षांतच परत उत्पन्न झालेलीही दिसून आली आहे, तर काही वेळा तीनं पुनरागमनासाठी तब्बल सात वर्ष घेतल्याचंही दिसून आले आहे. याउलट जेव्हा याच भागातील समुद्राच्या पाण्याचं सरासरी तापमान घटतं आणि त्याच्या जोडीला तिथल्या हवेच्या दाबातही घसरण होते तेव्हा त्याला 'ला निना' असे म्हणतात. एल निनो आणि ला निना यांचं अस्तित्व जरी जगाच्या एका अतिशय आडबाजूच्या कोपऱ्यात जाणवत असलं तरी त्याचे परिणाम मात्र जगभराच्या हवामानावर होत असतात. सगळीकडचं हवामान पार बदलून जातं. सामान्यत: जिथं भरपूर पाऊस पडतो तिथं एल निनोच्या प्रभावापोटी अवर्षण होतं, तर कोरडवाहू प्रदेशात पूर येतात. हवामानाच्या या लहरीपणापासून कोणत्याही खंडाची सुटका होत नाही.आपल्या देशाची अर्थव्यवस्था शेतीवर आणि शेती मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. एल निनोचा प्रभाव मान्सूनच्या पावसावरही जाणवेल इतका पडतो. एल निनोच्या प्रतापापोटी मान्सूनच्या व पावसाच्या सरासरीत लक्षणीय घट होते. अलीकडच्या काळातील जवळजवळ प्रत्येक दुष्काळाचं उत्तरदायित्व आपण एल निनोच्या पदरात टाकू शकतो. उलटपक्षी जेव्हा ला निनाची सद्दी असते तेव्हा सरासरीइतका किंवा त्याहूनही अधिक पाऊस पडतो. मात्र ला निनाच्या काळात वादळांचं प्रमाणही वाढतं. उलट एल निनो वादळांना अटकाव करतो. एरवीच्या वादळग्रस्त प्रदेशांमध्ये शांततेचा अंमल सुरू असतो.एल निनोचा प्रभाव सहसा सात ते नऊ महिनेच टिकतो. त्यामुळे साधारणत: एकाच वर्षीच्या मान्सूनवर त्याचा अनिष्ट परिणाम होतो. लागोपाठ दोन वर्षे दुष्काळाची परिस्थिती क्वचितच उद्भवते. पण काही वेळा हा दोन दोन वर्षेही टिकून राहिल्याचे दिसून आले आहे. त्याच्या या अनियमित वागणुकीमुळे त्याच्याविषयी कसलंही भाकीत करणं अशक्य झालं आहे.*बाळ फोंडके यांच्या 'काय ?' या पुस्तकातून*👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्राण्यांना रोख रकमेची गरज नसते, परंतु अशीच तळमळ माणसाला प्राणी बनवते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *न संपणारे ऊर्जा स्त्रोत* कोणते आहे ?२) यकृत हा अवयव शरीरातील कोणत्या संस्थेशी संबंधित आहे ?३) महर्षी कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे ?४) 'अत्याचार' या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा.५) ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे सातारा जिल्ह्यातील मूळ गाव कोणते ?*उत्तरे :-* १) सौर ऊर्जा २) पचनसंस्था ३) आत्मवृत्त ४) अन्याय, जुलूम ५) कन्हेरखेड*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 जयश्री पाटील, शिक्षिका तथा लेखिका, वसमत👤 स्वानंद बेदरकर, निवेदक, नाशिक👤 अब्राहम खावडिया👤 नामदेव पांचाळ, धर्माबाद👤 श्री पाटील, नांदेड👤 जयवर्धन भोसीकर, रिपोर्टर, नांदेड👤 किरण कदम, धर्माबाद👤 प्रल्हाद धडे, अहमदपूर👤 रमेश राजफोडे, धर्माबाद👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्षणभरी आम्ही सोसिलें वाईट । साधिलें अवीट निजसुख ॥१॥सांडी मांडी मागें केल्या भरोवरी । अधिक चि परी दुःखाचिया ॥२॥तुका म्हणे येणें जाणें नाहीं आतां । राहिलों अनंताचिये पायीं ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चुलीवर शिजवत ठेवलेले मग ते कोणतेही पदार्थ असोत. शिजत असताना वेळोवेळी त्यांचा वेगवेगळ्या प्रकारचा वास यायला लागतो. वेळात जर त्यांच्याकडे काळजीपूर्वक लक्ष दिले तर ते खमंग पदार्थ खायला मिळतात. जर त्यांच्याकडे आपण वेळात लक्ष नाही दिले तर मात्र जळलेले पदार्थ हाती लागते.माणसाचेही तसंच आहे जर वेळेवर चांगल्या गोष्टीकडे लक्ष दिले तर जीवनाचे सार्थक होते. पण त्याच चांगल्या विचाराकडे व सत्याकडे दुर्लक्ष करून भलत्याच वाटेला गेल्याने जीवनाची माती होत असते. त्या चुलीवर शिजत असलेल्या पदार्थांकडून आपण शिकून घेण्याचा प्रयत्न करावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *आनंदाची गोष्ट*लहान मुलाला काजु फार आवडत असल्याने एकदा काजुच्या बरणीत हात घालुन त्याने मुठ भरली. पण बरणीचं तोंड निमुळतं असल्याने हात काही बाहेर निघेना.. त्याने बराच प्रयत्न केला पण तरीही निघेना, त्याची ही धडपड बघणारी आजी त्याला सांगु लागली, *बाळा ती मुठ भरली आहेस ना ती सोड*, काजु बरणीत टाकुन दे, मग आपोआप हात बाहेर निघेल.. त्या लहान मुलाचा आजीवर खूप विश्वास आणि आपली आजी जे सांगेल ते बरोबर ह्या भोळ्या मनाने त्याने ते ऐकले आणि हातातली काजु सोडुन दिले. आणि खरंच आजीने सांगितल्याप्रमाणे त्याचा अडकलेला हात बाहेर निघाला.. आणि त्याचा चेहरा आनंदाने खुलला.. ही गोष्ट मला बरंच काही सुचवून गेली.. *किती गोष्टी धरून ठेवल्यात आपण, दुःख, राग, लोभ , क्रोध, मत्सर.. जुन्या कडु आठवणी* पण आपण धरुन बसलेलो आहोत.. आणि त्या मुला सारखंच स्वतःला अडकवुन बसलोय..तेव्हा लक्षात आलं की जीवनात दुःख असं नाहीच आहे.. *आपण धरुन ठेवलंय सगळ* ... हे तर लक्षातच घेतलं नाही कधी की अरे, फक्त सोडायचा अवकाश.... *आहे तो सगळा आनंदच आनंद..!* 😊😊😊😊😊😊😊😊 *जीवन हे एकदाच आहे*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 26 मार्च 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2022/12/indian-scientist.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक संगीतोपचार दिन_* *_ या वर्षातील ८६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०१३:त्रिपूरा उच्च न्यायालयाची स्थापना**२०००:ब्लादिमिर पुतिन यांची रशियाच्या अध्यक्षपदी निवड झाली.**१९७९:अन्वर सादात, मेनाकेम बेगिन आणि जिमी कार्टर यांनी वॉशिंग्टन (डी. सी.), येथे इस्त्रायल-इजिप्त शांतता करारावर सह्या केल्या**१९७४:गढवालमधील हेनवलघाटी येथे गौरा देवी यांच्या नेतृत्त्वाखाली ’चिपको’ आंदोलनाची सुरूवात**१९७२:नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पहिल्या जागतिक संस्कृत परिषदेस सुरूवात झाली**१९१०:लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडलच्या माळावर कारखाना उभारण्यास सुरूवात केली. हा परिसर पुढे किर्लोस्करवाडी म्हणून ऒळखला जाऊ लागला**१९०२:नेमस्त पक्षाचे अध्वर्यू नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे मध्यवर्ती कायदेमंडळात अर्थसंकल्पावर पहिले भाषण झाले. या प्रभावी भाषणामुळे त्यांचे कर्तृत्व व नेतृत्व देशमान्य झाले.**१५५२:गुरू अमर दास शिखांचे तिसरे गुरू बनले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८६:प्रतिभा सुरेश खैरनार -- कवयित्री* *१९८२:डॉ.क्षितिज कुलकर्णी-- नाट्य लेखक**१९८५:प्रॉस्पर उत्सेया – झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू**१९६५:प्रकाश राज-- भारतीय अभिनेता, प्रसिद्ध तमिळ तेलुगू खलनायक व सहनायक.राष्ट्रिय पुरस्कार विजेता अभिनेता**१९५७:सुनील शिवाजी माने-- कवी* *१९५७:हृदय बलवंत चक्रधर-- प्रसिद्ध कवी**१९५६:उमेश कदम-- कादंबरीकार**१९५४:अॅड.विलास विश्वनाथ कुळवेकर -- कवी,लेखक* *१९४३:प्रा.डॉ.यशवंत मनोहर-- सुप्रसिद्ध कवी,लेखक आणि साहित्य समीक्षक**१९३९:प्रा.पुष्पा भावे-- स्त्री चळवळीच्या खंद्या कार्यकर्त्या,ख्यातनाम समीक्षक, रंगभूमीच्या भाष्यकार(मृत्यू:३ आक्टोबर २०२०)**१९०९:बाळकृष्ण दत्तात्रेय तथा बा.द. सातोस्कर – साहित्यिक,संशोधक,’दैनिक गोमंतक’चे पहिले संपादक (मृत्यू:२७ नोव्हेंबर २०००)**१९०७:महादेवी वर्मा – हिन्दी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक,शिक्षणतज्ञ,प्रयाग महिला विद्यापीठाच्या प्राचार्या (१९३३) व कुलगुरू, ’यामा’ या काव्यसंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला. (मृत्यू:११ सप्टेंबर १९८७)**१८७५:सिंगमन र्ही – दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १९ जुलै १९६५)**१८७४:रॉबर्ट फ्रॉस्ट – अमेरिकन कवी (मृत्यू:२९ जानेवारी १९६३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:प्रा.विमलताई गाडेकर--विदर्भातील ख्यातनाम कवयित्री,लेखिका व समाजसेविका(जन्म:२ फेब्रुवारी १९५१)* *२०१२:माणिकराव गोडघाटे ऊर्फ ’ग्रेस’ – प्रसिद्ध गीतकार व कवी (जन्म:१० मे १९४०)**२०१०:अनंत पाटील -- ख्यातनाम गीतकार, नाटककार (जन्म:२२ डिसेंबर १९४१)**२००८:बाबुराव बागूल – सुप्रसिद्ध साहित्यिक (जन्म:१७ जुलै १९३०)**२००३:हरेन पंड्या-- गुजरातचे मंत्री हरेन पंड्या यांची हत्या* *१९९९:आनंद शंकर – प्रयोगशील संगीतकार (जन्म:११ डिसेंबर १९४२)**१९९७:नवलमल फिरोदिया – गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती (जन्म:९ सप्टेंबर १९१०)**१९९६:के.के.हेब्बर – चित्रकार (जन्म: १९११)**१९९६:डेव्हिड पॅकार्ड – ह्युलेट पॅकार्ड कंपनीचे एक संस्थापक (जन्म:७ सप्टेंबर १९१२)**१८२७:लुडविग व्हान बीथोव्हेन या कर्णबधिर संगीतकाराचे निधन.मी स्वर्गात नक्कीच संगीत ऐकू शकेन, (जन्म:१६ डिसेंबर १७७०)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतातील काही थोर गणितज्ञ व शास्त्रज्ञ यांची थोडक्यात माहिती*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सोलापुरात प्रणिती शिंदे विरोधात भाजपची राम सातपुते यांना उमेदवारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *देशभरात होळीचा सण उत्साहात साजरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *आयएएस अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार करणाऱ्या तक्रारकर्ते अॅड. सतीश रोठे यांना राज्यात आचारसंहिता लागू असेपर्यंत पोलीस संरक्षण देण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने पोलिसांना दिल्या आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अजितदादांच ठरलं! 28 तारखेपर्यंत राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार, राष्ट्रवादीला महायुतीत 5 पेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता *•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *बॉलीवूड क्वीन कंगना रणौतला भारतीय जनता पक्षाने मंडी लोकसभा मतदारसंघातून दिले तिकीट*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राज्यात पाण्याची भीषण परिस्थिती, धरणसाठ्यात फक्त 40 टक्के पाणीसाठा शिल्लक; तब्बल 940 टँकरने पाणीपुरवठा, मराठवाड्यात टँकर 600 पार! विभागातील 399 गावात पाणी टंचाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2024 चे उर्वरित वेळापत्रक जाहीर, चेन्नई मध्ये होईल अंतिम सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*प्रदूषणाचा भस्मासुर रोखा* स्विस संस्था आयक्युएअरने जागतिक प्रदूषणावर एक अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. हा अहवाल भारतासाठी धक्कादायक आहे कारण या अहवालात भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा प्रदूषित देश असून बिहारमधील बेगुसराई हे जगातील सर्वाधिक प्रदूषित महानगर क्षेत्र तर जगातील १३४ देशांच्या राजधानीच्या शहरांपैकी दिल्ली हे सर्वात प्रदूषित राजधानीचे शहर असल्याची नोंद या अहवालात करण्यात आली आहे. या अहवालाच्या निर्मितीसाठी वातावरणातील प्रदूषणकारी घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पीएम - २.५ कणांचे प्रमाण बारकाईने तपासण्यात आले होते. जगातील १३४ देशांमध्ये बसविण्यात आलेल्या ३० हजार ग्राउंड मॉनिटरच्या माध्यमातून ७३०० शहरांची माहिती संकलित करण्यात आली. या अहवालातील निष्कर्ष पाहिल्यानंतर भारतातील प्रदूषणाची समस्या किती गंभीर आहे हे लक्षात येईल. विशेष म्हणजे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत भारतातील दिल्ली, मुंबई, बेगुसाराई, गुवाहाटी, कोलकाता, हैदराबाद, चेन्नई यासारख्या मोठ्या आणि महत्वाच्या शहरांचा समावेश आहे. या शहरात वातावरणातील प्रदूषणकारी घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पीएम - २.५ कणांचे प्रमाण ५३.३ मायक्रोग्राम क्यूबिक मीटर या पातळीवर आले असून ते आरोग्य संघटनेने निर्धारित केलेल्या सुरक्षेच्या पातळीपेक्षा दहापटीने अधिक असल्याचे दिसून आले. स्विस संस्थेचा हा अहवाल देशातील नागरिकांची झोप उडवणारा आहे, कारण आज देशातील सर्वच महत्वाची शहरे प्रदूषणाने गुदमरत आहेत. त्या शहरात राहणाऱ्या नागरिकांचे जीवन प्रदूषणामुळे धोक्यात आले आहे. एकीकडे २१ व्या शतकातील सुखासीन जीवनाचे मनोहरी चित्र उभे केले जात आहे. स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवले जात आहे तर दुसरीकडे याच शहरांची फुफ्फुसे प्रदूषणाने निकामी होत आहेत. प्रदूषणामुळे या शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रदूषणामुळे या शहरातील नागरिकांना फुफ्फुसाचे, हृदयाचे, रक्ताभिसरणाचे आजार मोठ्या प्रमाणावर होत आहेत. न्यूमोनिया, पक्षघात, हृदयविकार, फुफ्फुसाचा कर्करोग यासारखे मोठे आजार प्रदूषित हवेमुळेच होत आहेत. प्रदूषणामुळे दिल्लीसारख्या देशाच्या राजधानीची काय अवस्था झाली हे आपण पाहत आहोतच. प्रदूषणामुळे दिल्लीतील शाळा कॉलेजसना सुट्टी देण्याची वेळ प्रशासनावर आली होती. प्रदूषणामुळे दिल्लीत खेळला जाणारा रणजी सामना रद्द करावा लागला होता. चार वर्षांपूर्वी दिल्लीत इंग्लंड आणि भारत यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात खेळाडू चक्क मास्क लावून मैदानात उतरले होते. नंतर हा सामना देखील प्रदूषणामुळे रद्द करावा होता त्यामुळे भारताची जगात नाचक्की झाली होती. जे दिल्लीत आहे तेच मुंबईत आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई प्रदूषणाच्या बाबतीत देशाच्या राजधानीची बरोबरी करू लागली आहे. मुंबईचे प्रदूषणही उच्चतम पातळीवर पोहचले आहे. प्रदूषणामुळे लोकांना शुद्ध हवा मिळणे दुरापास्त झाले आहे. शुद्ध हवेसाठी लोकांना पैसे मोजावे लागत आहे. मुंबई - दिल्लीसारख्या मोठ्या लोकसंख्येच्या शहरात ऑक्सिजन बार सुरू करण्यात आले आहेत. एका तासाला २०० ते ५०० रुपये मोजून नागरिक ऑक्सिजन विकत घेत आहेत. इतके होऊनही आपण त्यातून बोध घेत नाही. या मोठ्या शहरात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या मोठ्या शहरात लोकसंख्येपेक्षा वाहनांची संख्या अधिक आहे. वाढत्या वाहनांमुळे प्रदूषणात भर पडत आहे. वाहनातून बाहेर पडणाऱ्या धुरात प्रदूषणाचे प्रमाण खूप असते. धूळ, कारखान्यातून निघणारा धूर, बांधकामातून पसरणारे कण, वृक्षतोड, पृथ्वीचे वाढते तापमान, प्लास्टिकचा भस्मासुर अशा अनेक कारणांमुळे प्रदूषणाचा आलेख उंचावत आहे. स्विस संस्थेने जाहीर केलेला हा अहवाल म्हणजे धोक्याची घंटा आहे. वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी वेळीच ठोस उपाय करायला हवेत. कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या धुरातून प्रदूषणकारी घटक कमी करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा. दगड खाणींवर नियंत्रण आणायला हवे. वाहनांची संख्याही कमी करायला हवी. प्रसंगी सम - विषम सारखे कठोर निर्णय घ्यायला हवेत. युरोपीय देशात प्रदूषण कमी करण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातात याचा अभ्यास करायला हवा. नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक वापर केला पाहिजे. याशिवाय कचऱ्याचे योग्य वर्गीकरण आणि विल्हेवाट तसेच सौरऊर्जेच्या वापरावर भर द्यायला हवा. वृक्षारोपण करुन ते वृक्ष जगवले पाहिजेत. शासन, प्रशासन आणि नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नांतूनच प्रदूषणाचा हा भस्मासुर रोखता येईल. *- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*९९२२५४६२९५••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समजून घेणं ही एक कला आहे आणि ही कला प्रत्येकाला जमतेच असं नाही - गौतम बुद्ध*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारताच्या कोणत्या खेळाडूचा समावेश चीनच्या *'जागतिक बिलियर्ड्स हॉल ऑफ फेम'* मध्ये झाला आहे ?२) भारताच्या अणु कार्यक्रमाचे ब्रीदवाक्य कोणते आहे ?३) ग्रामपंचायतीच्या थकबाकीची वसुली करण्याचे अधिकार कोणास आहेत ?४) नुकताच चर्चेत असणारा सी. ए. ए. कायदा म्हणजे काय ?५) तैनाती फौजेचा अवलंब इंग्रजांनी सर्वात प्रथम कोणावरती केला ? *उत्तरे :-* १) पंकज अडवाणी २) शांततेसाठी अणु ३) ग्रामसेवक ४) Citizen Amendment Act ५) हैदराबादचा निजाम*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 महेश मुटकुळे👤 श्रेयस पेंडकर, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विसरले कुळ आपुला आचार । पती भावे दीर घर सोय ॥१॥सांडिला लौकिक लाज भय चिंता । रातलें अनंता चित्त माझें ॥२॥मज आतां कोणी आळवाल झणी । तुका म्हणे कानीं बहिरी जालें ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वर्षभरात अनेक सण,उत्सव येत असतात. ते प्रत्येक सण आपल्याला काहीतरी शिकवून जात असतात. त्या शिकवणीतून थोडे तरी आपण शिकण्याचा प्रयत्न करावे. व इतरांनाही त्या विषयी सांगावे. कारण चांगले सांगितल्याने आपले नुकसान होत नाही तर त्यातून एक वेगळ्या प्रकारचे समाधान आपल्याला मिळत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *काठीची जादू*एके दिवशी, एक श्रीमंत व्यापारी बिरबलकडे आला आणि म्हणाला, माझ्या घरी कोणीतरी चोरी केली व माझे दागिने चोरले आहेत. माझ्या घरी एकूण दहा नोकर आहेत. त्यांच्यापैकीच कोणीतरी ते चोरले असल्याचा माझा संशय आहे. मी त्यांच्यापैकी सगळ्यांना विचारले, पण त्यातील एकही कबूल झाला नाही. कृपा करून तुम्ही यातून काहीतरी मार्ग काढा.बिरबल त्या श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरी गेला. त्याने त्या दहाही नोकरांना एकत्र बोलावले व त्यांना म्हणाला, की माझ्याकडे दहा जादूच्या काठया आहेत. त्या मी तुम्हाला देत आहे. या काठयांचे वैशिष्टय म्हणजे सर्व काठया समान आहेत. मी त्या तुम्हाला देत आहे. आज तुमच्याकडे ठेवा व उदया मला परत करा. ज्याने चोरी केली असेल, त्याची काठी रात्रीत एक इंचाने वाढेल.दागिने चोरणारा नोकर घाबरला. आपली चोरी पकडली जाईल म्हणून तो काठी एक इंचाने कापतो. त्याला वाटते की सकाळी ती परत एक इंचाने वाढेल व कुणाला काही कळणार नाही. दुसऱ्या दिवशी बिरबलाने नोकरांच्या हातातील काठ्या पाहिल्या. त्याला एका नोकराची काठी छोटी झाल्याचे आढळले. त्याच्याकडे बोट दाखवत बिरबल म्हणाला, 'हा नोकर चोर आहे. त्यानेच तुमचे दागिने चोरले आहे.' शेवटी, त्या नोकरानेही ते कबूल केले व त्या व्यापाऱ्याचे दागिने परत केले. तात्पर्य :- करावे तसे भरावे•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 23 मार्च 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/jadoochi_pishavi_nasa_yeotikar.pdf••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक हवामान दिन_* *_शहीद स्मृती दिन_*•••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील ८३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *_हवेचे तापमान, वातावरणातील दाब, वाऱ्याची गती व दिशा यांच्या परस्परसंबंधातून निर्माण होणारी वादळे,ढग,पाऊस,विजांचा कडकडाट आदी घटनांची कालमानानुसार बदलणाऱ्या वागणुकीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास हवामानशास्त्र असे म्हणतात. वातावरणातील या घडामोदींचे निरिक्षण करुन त्यांचा अभ्यास करणे, त्यानुसार जवळच्या आणि दूरच्या भविष्यातील हवामानाविषयी अंदाज बांधणे हे हवामानशास्त्रज्ञांचे प्रमुख काम असते. २३ मार्च हा दिवस ‘जागतिक हवामानशास्त्र दिन' म्हणून साजरा होतो._**२०१२:राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या शुभहस्ते जळगाव विमानतळाचे उदघाटन**१९९९:पं. भीमसेन जोशी व लता मंगेशकर यांना 'पद्मविभूषण' सन्मानाने गौरविेण्यात आले**१९९९:क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री सुलोचना यांना 'पद्मश्री' सन्मान प्रदान करण्यात आला**१९९८:अभिनेते दिलीपकुमार यांना ’निशान-ए-इम्तियाज’ हा पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर**१९८०:प्रकाश पदुकोण याने ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा जिंकली. ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय आहे.**१९५६:पाकिस्तान हे जगातील पहिले इस्लामी प्रजासत्ताक बनले.**१९४०:संपूर्ण स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीचा ठराव लाहोर येथील मुस्लीम लीगच्या अधिवेशनात संमत**_१९३१:भगतसिंग,सुखदेव व राजगुरू यांना लाहोरच्या तुरूंगात फाशी देण्यात आले._* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८९:आशिष अशोक निनगुरकर -- प्रसिद्ध कवी, लेखक,विविध पुरस्कारांनी सन्मानित**१९७९:प्रा.डॉ.रेखा जगनाळे(मोतेवार)-- प्रसिद्ध लेखिका,संपादिका* *१९७२:संतोष पद्माकर पवार-- कवी,संपादक**१९७२:अरमान कोहली-- भारतीय अभिनेता**१९७०:ज्योती धुतमल-पंडित -- कवयित्री, लेखिका* *१९६८:माईक अॅथरटन – इंग्लिश क्रिकेटपटू**१९५६:पं.विनोद दिग्रजकर- ज्येष्ठ शास्त्रीय गायक**१९५३:किरण मुजूमदार शॉ – भारतीय महिला उद्योजक**१९५३:प्रकाश विठ्ठलराव खंडागळे -- कवी, लेखक* *१९४९:प्राचार्य सुभाष त्र्यंबक वसेकर -- कलामहर्षी,मराठवाड्यातील बालसाहित्यिक (मृत्यू:३० सप्टेंबर २०२२)**१९४८:वसीम बारी-- माजी पाकिस्तानी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू* *१९४८:मधुवंती दांडेकर -- मराठी संगीत नाट्यसृष्टीतल्या एक अभिनेत्री* *१९३५:रमेश विठ्ठल रघुवंशी -- लेखक,प्रकाशक* *१९३५:मृणालिनी त्र्यंबक ढवळे-- लेखिका, संपादिका* *१९३३:प्रा.डॉ.सुधाकर गजाननराव देशपांडे -- लेखक* *१९३१:व्हिक्टर कॉर्चनॉय – रशियन बुद्धीबळपटू**१९२९:डॉ.गोविंद स्वरूप -- भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे जनक(मृत्यू:७ सप्टेंबर २०२०)**१९२३:सदाशिव आठवले-- मराठीभाषक संशोधक, इतिहासकार आणि लेखक(मृत्यू:८ डिसेंबर २००१)**१९२३:हेमू कलाणी – क्रांतिकारक (मृत्यू:२१ जानेवारी १९४३)**१९१७:शरयू वासुदेव रानडे -- कवयित्री, लेखिका* *१९१६:हरकिशन सिंग सुरजित – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते (मृत्यू:१ ऑगस्ट २००८)**१९१०:डॉ.राम मनोहर लोहिया – समाजवादी नेते,विख्यात संसदपटू,लोकसभेतील प्रभावी वक्ते व व्यासंगी लेखक.(मृत्यू:१२ आक्टोबर १९६७)**१८९८:नलिनीबाला देवी – आसामी कवयित्री व लेखिका (मृत्यू:२४ डिसेंबर १९७७)**१८९७:गुणवंत हनुमंत देशपांडे -- कवी, लेखक ( मृत्यू:२५ सप्टेंबर १९८५)* *१८८३:मंजेश्वर गोविंद पै तथा राष्ट्रकवी गोविंद पै – कन्नड कवी व श्रेष्ठ भाषा संशोधक, इतिहास व तत्त्वज्ञानाचे व्यासंगी,त्यांना कन्नड, कोंकणी,इंग्लिश,संस्कृत,तेलुगू,तामिळ,मराठी, कन्नड,बंगाली,पर्शियन,पाली, ऊर्दू,ग्रीक, जपानी इ. २५ भाषा अस्खलित येत असत. त्यांनी अनेक जपानी ग्रंथांचे कन्नडमध्ये भाषांतर केले. (मृत्यू:६ सप्टेंबर १९६३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१९:प्रा.डॉ.यशवंत पाठक--संत साहित्याचे अभ्यासक आणि लेखक(जन्म:१९४६)* *२०११:एलिझाबेथ टेलर – ब्रिटिश-अमेरिकन अभिनेत्री (जन्म:२७ फेब्रुवारी १९३२)**२००७:श्रीपाद नारायण पेंडसे-- प्रसिद्ध कादंबरीकार,नाटककार,आत्मचरित्रकार (जन्म:५ जानेवारी १९१३)**२००८:गणपत पाटील – मराठी चित्रपट कलाकार (जन्म:२०ऑगस्ट १९१८)**१९३१:भगत सिंग – क्रांतिकारक (जन्म:२८ सप्टेंबर १९०७)**१९३१:’सुखदेव’ थापर – क्रांतिकारक (जन्म:१५ मे १९०७)**१९३१:शिवराम हरी ’राजगुरू’ – क्रांतिकारक (जन्म:२४ ऑगस्ट १९०८)**१९२७:सरस्वतीबाई विद्याधर भिडे-- कवयित्री,(जन्म:१८७२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जागतिक पुस्तक दिनानिमित्त आजपर्यंत प्रकाशित झालेली माझी पुस्तके खालील प्रमाणेमाझी साहित्य संपदा वैचारिक लेखसंग्रह01) पाऊलवाट 02) संवेदना 03) जागृती 04) मी एक शिक्षक05) शाळा आणि शिक्षक06) रोज सोनियाचा दिनू07) हिंदू सणकथासंग्रह08) हरवलेले डोळे आणि 09) कुलदीपक10) जादूची पिशवीकवितासंग्रह11) सारीपाट 12) महापुरुषांची ओळख13) लॉकडाऊन काळातील कवितादीर्घकथा 14) ललाटरेषावरील सर्व पुस्तके वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर क्लीक करा आणि जादूची पिशवी कथासंग्रहासह इतर पुस्तकं डाउनलोड कराधन्यवाद ......!- नासा येवतीकर, धर्माबाद ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या केंद्रीय संचालक मंडळाची ६०७ वी बैठक संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचं बीड जिल्ह्यात उत्साहत स्वागत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पुष्पक - आरएलव्ही एलईएक्स- 02 लँडिंगची यशस्वी चाचणी.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *काँग्रेसचे के सी वेणुगोपाल आणि खासदार डेरीक ओब्रायन यांनी नवी दिल्लीत निवडणुक आयुक्तांची भेट घेतली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सर्वोच्च न्यायालयातून अरविंद केजरीवाल यांनी याचिका घेतली मागे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *इकबालसिंह चहल यांची मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती : निवडणूक आयोगाने मुंबई मनपा आयुक्त पदावरुन हटवले होते*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2024 - पहिल्याच सामन्यात CSK ने RCB चा 6 विकेटने केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *बायोगॅस* 📙 अनेक प्रकारचे सेंद्रिय पदार्थ टाकाऊ म्हणून आपण फेकून देत असतो. गायीगुरांचे शेण कंपोस्ट खतासाठी अनेक वर्षे वापरले जात होते. पण त्या व्यतिरिक्त त्याचा उपयोग शक्य आहे, याचा विचार मात्र गेली ४० वर्षेच केला गेला. झाडांचा पालापाचोळा, वाया जाणारे अन्नपदार्थ, खरकटे, भाजीची देठे व टरफले या साऱ्यांचा उपयुक्त वापर करण्याची कल्पना सतत मांडली जात आहे. मात्र त्याचा पाठपुरावा करून संपूर्ण वापर केले जाणे मात्र आजही घडत नाही. या साऱ्यापासून बायोगॅसची निर्मिती सहज शक्य असते. हा गॅस घरातील गॅस शेगडीसाठी जसा वापरता येतो, तसाच मोठ्या प्रमाणावर तयार केल्यास छोट्या हॉटेलला पण पूरक म्हणून उपयोगी पडू शकतो. १९७० च्या दशकात गोबरगॅस या नावाने ओळखला जाणारा हा गॅस मुख्यत: गायीगुरांचे शेण व पालापाचोळा यातून निर्माण केला जात असे. घराजवळच गोठ्यालगत विटांच्या बांधकामातून गोल हौदवजा टाकी बांधून त्यात हा कच्चा माल घातला जाई. त्यावर टोपीप्रमाणे बसणारी पण दट्ट्याप्रमाणे खालीवर होऊ शकणारी यंत्रणा बसवून आतील कच्चा माल कुजून दिला जाई. या कुजण्याला मदत म्हणून स्लरी - विशिष्ट प्रकारचे जंतू असलेले पाणी - त्यात सोडल्यावर सुमारे चाळीस दिवसांनी रोजच्या गॅसचा पुरवठा सुरू होत असे. या कुजण्यातून निर्माण झालेला गाळ व पाणी हे खत म्हणून वापरता येई.या प्रकारची गोबरगॅस संयंत्र संपूर्ण भारतात अनेकांनी बसवली. त्यासाठी ग्रामोद्योग मंडळाने प्रशिक्षण व सहाय्यसुद्धा दिले. काही वर्षांनी त्यांच्या डागडुजीची वेळ आली, तेव्हा कुचराई केल्याने अनेक ठिकाणी ही संयंत्रे बंद पडत गेली. हौदाचा गिलावा उडून होणारी गळती व लोखंडी भाग गंजणे हे त्याचे महत्त्वाचे कारण होते. या गॅसमध्ये मुख्यत: मिथेन वायू असतो. ज्वलनासाठी उपयुक्त व प्रदूषणविरहित असे त्याचे स्वरूप आहे. छोट्या गावात, दूरवरच्या वस्तीमध्ये लिक्विड पेट्रोलियम गॅसचा पुरवठा सिलिंडरद्वारे करणे कठीण असल्यास या पद्धतीचा वापर अत्यंत उपयुक्त होता. चीनमध्ये या स्वरूपाची स्थानिक संयंत्रे बसवून वापरली जात आहेत, पण आपल्याकडे मात्र हा प्रयोग मागे पडला आहे.या गोबरगॅसच्या अवाढव्य जागा व्यापणाऱ्या व शेणाची गरज असलेल्या संयंत्रात बरेच सुटसुटीत बदल करून पुणे येथील 'आरती' (अॅप्रोप्रिएट रुरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट) या संस्थेचे वैज्ञानिक डॉक्टर आनंद कर्वे यांनी बायोगॅस निर्मितीचे संयंत्र बनवले आहे. प्लास्टिकच्या एकात एक बसणाऱ्या मोठ्या पंपाचा वापर करून हे बनले आहे. गच्चीत, अंगणात कुठेही ठेवून त्याचा वापर शक्य होतो. महत्त्वाची गोष्ट यासाठी खरकटे अन्न व आसपासच्या झाडांचा, बागेचा पालापाचोळा पुरतो. शेणाची गरज लागत नसल्याने हाताळताना नकोसे वाटत नाही. याचा कसलाही वास आसपास पसरत नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्लरी घातल्यापासून जेमतेम तीन ते चार दिवसांत गॅसनिर्मिती सुरू होते. याचा खर्चही सहज परवडण्याजोगा आहे. कारण स्वस्त प्लॅस्टिकचा वापर त्यात केला आहे. या संयंत्राला 'अॅश्डेन' हे संशोधनाबद्दलचे मानाचे पारितोषिक दिले गेले आहे.उसाची चिपाडे, उसापासून साखर तयार करताना निर्माण होणारी मळी यांचा वापर करून मोठय़ा प्रमाणावर बायोगॅस तयार करावा व त्यापासून वीजनिर्मिती करावी, अशा स्वरूपाचा विचार सध्या मांडला जात आहे. अर्थातच हे प्रकल्प व्यावसायिक तत्वावरचे व प्रचंड पैसा लागणारे आहेत.स्वस्त, स्वच्छ इंधन व कचऱ्याचे प्रदूषण टाळणारे इंधन म्हणून बायोगॅसकडे आपण पाहिले तर त्याची उपयुक्तता मोलाची ठरते.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येक वस्तूत सौंदर्य असते पण ते प्रत्येकाला दिसतेच असे नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार *जगातील सर्वात आनंदी देश* कोणता ?२) माहिती अधिकार विधेयक लोकसभेत केव्हा सादर करण्यात आले ?३) भारतातील कोणत्या शहराला 'स्कॉटलंड ऑफ द ईस्ट' असे म्हणतात ?४) जगातील राजधानीच्या शहरांपैकी सर्वात प्रदूषित शहर कोणते ?५) जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते त्या ठिकाणाला काय म्हणतात ? *उत्तरे :-* १) फिनलंड ( सातव्यांदा ) २) २२ डिसेंबर २००४ ३) शिलाँग ४) दिल्ली ५) क्षितिज*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 आचार्य सूर्यकांत, सेवानिवृत्त शिक्षक👤 साईनाथ सुत्रावे, पदवीधर शिक्षक, धर्माबाद👤 संतोष गुंडेटवार, शिक्षक, नांदेड👤 सौ. रंजना सत्यजित टिप्रेसवार, नांदेड👤 नरसिंग यमेवार👤 विनायक नरवाडे👤 अशोक गड्डमवार👤 संजय मनुरे, साहित्यिक, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नाहीं काम माझें काज तुम्हांसवें । होतें गुप्त ठावें केलें आतां ॥१॥व्यभिचार माझा पडिला ठाउका । न सर ती लोकांमाजी जालें ॥२॥न धरावा लोभ कांहीं मजविशीं । जालें देवपिशी तुका म्हणे ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुसऱ्याचे मन दुखावणे खूप सोपे असते. पण एखाद्या वेळी आपले जर कोणी मन दुखावले तर ते दु:ख सहन करणे मात्र खूप कठीण होऊन जाते. म्हणून आपण किती प्रामाणिक आहोत फक्त आपल्यालाच माहीत असते. म्हणून यशाच्या शिखरावर अवश्य पोहोचावे पण,प्रामाणिकपणा कायम असू द्यावे. कारण, इतरांना आपण खूप काही सांगू शकतो पण,स्वतःमध्ये जर प्रामाणिकपणाचे लक्षणे नसतील तर सर्व काही असून सुद्धा कधीच समाधान मिळत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*इतिहासातील एक मनोरंजक घटना* स्कॉटलंड मध्ये एक अतिशय तुटपुंजी आर्थिक परिस्थिती असलेला एक शेतकरी होता. एके दिवशी नेहमी प्रमाणे त्याच्या शेतीच्या कामात व्यस्त होता तेंव्हा त्याला, एका लहान मुलाच्या किंकाळ ऐकू आल्या. जीवाच्या आकांताने ओरडत असलेल्या त्या हाका ऐकुन त्या शेतकऱ्याने हातातली अवजारे/शेतीच काम सोडून आवाजाच्या दिशेने धाव घेतली. सदर जागी जाऊन पाहतो तर एक चिमुरडा, दलदल मध्ये गळ्यापर्यंत रुतलेला दिसला. काही क्षणांचा विलंब आणि त्या मुलास जिवंत समाधी, अशी स्थिती पाहून त्या शेतकऱ्याने स्वतः चा जीव धोक्यात घालून, प्रचंड अरापिता करीत त्याच्या आजूबाजूचा गाळ काढला, आणि त्या जीवघेण्या संकटातून त्या मुलाची सुटका केली.दुसऱ्या दिवशी लवजम्या सहित एक आलिशान बग्गी त्या शेतकऱ्याच्या घरापाशी येऊन थांबली. त्या बग्गी मधून एक अतिशय धनवान व्यक्ती उतरली आणि त्या शेतकऱ्या च्या घरी गेली. त्या व्यक्तीने शेतकर्यास स्वतःचा परिचय दिला, की काल ज्या मुलाला तुम्ही मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं, त्या मुलाचा ती व्यक्ती पिता आहे, म्हणून शेतकऱ्याने केलेल्या उपकाराबद्दल धन्यवाद देणे करिता ते आले आहेत. त्यांचा वार्तालाप चालू होता, त्या धनाढ्य व्यक्तीला त्या दरम्यान जाणवलं की हा शेतकरी आर्थकदृष्टया तितका सक्षम नाही, तथापि अतिशय स्वाभिमानी आहे, हा कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत घेणार नाही.त्या शेतकऱ्याचा मुलगा, दरवाज्यातून आत येतो. त्या धनाढ्य व्यक्तीने त्या मुलाबद्दल शेतकऱ्याला चौकशी केली की हा कोणत्या शिकत आहे. शेतकऱ्याने त्यास उत्तर दिले की त्याचा मुलगा हा काही विद्यार्जन करत नसून, शेती कामात मदत करतो. यावर त्या धनाढ्य व्यक्तीने शेतकऱ्यास असे सुचविले की, की माझ्या मुलाला तुम्ही जीवनदान दिलं त्या बदल्यात तुमच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी मला घेऊ द्या, जेणेकरून मी तुमच्या मुलास उत्तम भविष्य, देऊ शकेन. यावर त्या शेतकऱ्यानं सहमती दर्शविली.त्या शेतकऱ्याच्या मुलाला इंग्लंड च्या नामांकित शिक्षण संस्थेत प्रवेश दिला गेला आणि त्या मुलाचं शिक्षण सुरू झालं. काही दिवसातच कळाल की हा मुलगा सर्वसामान्य नसून विलक्षण बुद्धिमान आहे, त्या मुलाने शिक्षण क्षेत्रात अतिशय कौशल्य दाखविले, आणि तो उच्चशिक्षण देखील घेऊ लागला. पुढे तो मुलगा संशोधन कार्यात उतरला.ही दोन्ही मुलं त्यांच्या ऐन तारुण्यात असताना, त्या धनाढ्य व्यक्तीचा मुलगा आजारी पडला. आजार वाढतच चालला होता, आर्थिकदृष्ट्या अतिशय बलवान असल्याने त्याच्या पित्याने उपलब्ध असणाऱ्या सर्व वैद्य, औषधोपचार केले, पण तरीही आजार उतरत नव्हता. त्या वेळेला त्या आजारास कोणतेही ठोस आणि खात्रीलायक औषध नव्हते. याच दरम्यान त्या शेतकऱ्याच्या मुलाने, त्याच्या संशोधन कार्यात एक जबरदस्त मजल मारली, आणि एक लस शोधून काढली, आणि नेमकी हीच लस म्हणजे त्या धनिकाच्या मुलाच्या आजारावर रामबाण औषध होती. त्या लसिमुळएच पुन्हा एकदा हा मुलगा मृत्यूच्या तोंडातून परत आला.बालपणी ज्याने जीवदान दिले, त्याच्याच मुलाने तारुण्यात पुन्हा एकप्रकारे त्याच धानिकाच्या मुलाचा जीव वाचविला होता. हा कुठेतरी प्रामाणिक पणाने, कृतज्ञ पणाने स्वतः च्या मुलाला वाचविले ची परतफेड करणे करिता केलेल्या कार्याची ही एक प्रकारे परतफेड होती.*आता ही सर्व पात्रे कोण ते सांगतो,*तो धनिक व्यक्तीचा मुलगा, म्हणजे इंग्लंडचा माजी पंतप्रधान, *विन्स्टन चर्चिल,*तो शेतकऱ्याचा मुलगा म्हणजे, थोर शास्त्रज्ञ *अलेक्झांडर फ्लेमिंग,* आणि त्याने शोधून काढलेली लस म्हणजे, *पेनिसिलीन.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 22 मार्च 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2021/03/23032021.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ जागतिक जल दिवस_* *_जागतिक मुकाभिनय दिवस_*•••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील ८२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• 💧💧💧 *_'जागतिक जल दिन' एक आंतरराष्टीय दिवस प्रत्येक वर्षी २२ मार्च रोजी हा दिवस साजरा करण्यात येतो.स्वच्छ आणि ताज्या पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांची काळजी घेणे व त्यांच्या शाश्वत संरक्षणासाठी कार्यरत राहणे याचा संदेश देणे यासाठी या दिवसाची योजना केली गेली आहे._* *१९९९:लता मंगेशकर व भीमसेन जोशी यांना ’पद्मविभूषण’**१९७१:ओरिसात राष्ट्रपती राजवट सुरू**१९७०:हमीद दलवाई यांनी पुणे येथे मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली.**१९५५:ब्रह्मदेश व भारत यांच्यात रेडिओ टेलिफोन दळणवळण सुरू झाले**१९४७:शेवटचे व्हाईसराय लॉर्ड माऊंटबॅटन यांचे भारतात आगमन**१९४५:अरब लीगची स्थापना**१७३९:नादिरशहाने दिल्ली ताब्यात घेतली* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८८:आदित्य सील-- भारतीय अभिनेता**१९८१:रणजीत नारायण पवार-- लेखक* *१९७६:विशाखा सुभेदार-- टेलिव्हिजन आणि चित्रपट अभिनेत्री**१९७२:अश्विनी एकबोटे--प्रसिद्ध नाट्य-सिने अभिनेत्री आणि नृत्यांगना(मृत्यू:२२ ऑक्टोबर, २०१६)**१९५९:सुरेश नावडकर-- प्रसिद्ध ललित लेखक* *१९५८:देवका जगन्नाथ देशमुख -- कवयित्री, लेखिका,संपादिका* *१९५१:चारुदत्त लक्ष्मण(सी.एल.) कुलकर्णी-- सुप्रसिद्ध दूरदर्शन मालिका अभिनेते तथा प्रसिद्ध चित्रकार,कवी,लेखक* *१९४९:विलास बाबूराव मुत्तेमवार-- माजी खासदार* *१९४८:लक्ष्मण ढवळू टोपले-- लेखक,कवी* *१९४३:नंदा अनंत सुर्वे- मुक्त पत्रकार तथा प्रसिद्ध लेखिका* *१९२४:मधुसूदन कालेलकर – नाटककार, कथाकार आणि पटकथाकार (मृत्यू:१७ डिसेंबर १९८५)**१९२४:पंडित अमरनाथ-- भारतीय शास्त्रीय गायक आणि चित्रपट संगीतकार(मृत्यू:९ मार्च १९९६)**१९११:देवीसिंह व्यंकटसिंह चौहान-- इतिहास या विषयाचे एक अभ्यासक(मृत्यू:डिसेंबर २००४)**१९०६:भगवंत भिकाजी सामंत-- शिक्षणतज्ञ व सूचिकार* *१८७७:सदाशिव कृष्ण फडके-- लेखक (मृत्यू:१२ ऑक्टोबर १९७१)**१८५७:शंकरशास्त्री रघुनाथशास्त्री गोखले-- लेखक (मृत्यू:२१ आक्टोबर १९०४)* *१७९७:विल्हेल्म (पहिला) – जर्मन सम्राट (मृत्यू:९ मार्च १८८८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१७:गोविंद श्रीपाद तळवलकर-- इंग्रजी-मराठीतले पत्रकार व लेखक वृत्तपत्रीय अग्रलेखांकरिता विशेषत्वाने परिचय असलेले ते एक स्तंभलेखक (जन्म:२२ जुलै १९२५)* *२००७:निसार बज्मी-- संगीतकार(जन्म:१ डिसेंबर १९२४)**२००५:रामासामी गणेशन(जेमिनी गणेशन) भारतीय अभिनेते(जन्म:१७ नोव्हेंबर १९२०)**२००४:बॅरिस्टर व्ही.एम.तथा ’भाऊसाहेब’ तारकुंडे – कायदेपंडित,स्वातंत्र्यसैनिक,मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व सर्वोच्च न्यायालयात सामाजिक समस्यांसाठी लढा देणारे झुंजार कायदेतज्ञ (जन्म:३ जुलै १९०९)**१९९१:कविवर्य यादव मुकुंद पाठक (शशिमोहन)--कवी विदर्भ साहित्य संघाचे पूर्व अध्यक्ष (जन्म:२५ जून १९०५)**१९८४:प्रभाकर आत्माराम पाध्ये --संपादक, साहित्यिक,सौंदर्यमीमांसक,समीक्षक(जन्म:४ जानेवारी १९०९)**१८३२:योहान वूल्फगाँग गटें – जर्मन महाकवी, लेखक, कलाकार आणि राजकारणी.गटें यांनी कालिदासाच्या ’शाकुंतल’चे जर्मनमधे भाषांतर केले होते. (जन्म:२८ ऑगस्ट १७४९)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जागतिक जल दिनानिमित्त प्रासंगिक लेख*जलसाक्षरता : काळाची गरज*मानवी जीवनच नव्हे तर प्रत्येक सजीवांसाठी पाणी हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जीवन जगण्यासाठी ज्याप्रकारे अन्न आणि हवा याची गरज असते अगदी त्याचप्रमाणे पाण्याचीही गरज असते. पाणी कसे तयार होते ? याविषयीच्या जलचक्रची माहिती आपणा सर्वांना ज्ञात आहेच........... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *विकसित भारत संदर्भातले संदेश त्वरित थांबविण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *रामदास आठवले यांच्या गाडीला अपघात; सातारा-मुंबई महामार्गावर कारची कंटेनरला धडक; सर्व प्रवासी सुखरूप*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पंतप्रधानांचे छायाचित्र असलेले बॅनर काढलेच नाही : हिंगोलीच्या रेल्वे स्टेशन प्रमुखांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *भावगंधर्वांनी जागवल्या लतादीदींच्या स्वरमयी आठवणी:विभावरी आपटे-जोशी यांना 'दीदी पुरस्कार' देऊन सन्मान*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *RBI च्या निर्देशांनुसार 31 मार्च 2024 अर्थात रविवारी देशभरातील सर्व बँका सुरु राहणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपरकिंग्जच्या कप्तानपदी, महेंद्रसिंह धोनीने सोडलं पद*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••⏰ *बायोलॉजिकल क्लॉक म्हणजे काय ?* ⏰ **************************'आजीच्या जवळी घडय़ाळ कसले आहे चमत्कारिक ?' असा प्रश्न छोट्या केशवकुमारांना पडला होता. आजच्या विज्ञानयुगातला मुलगा मात्र थोडासा वेगळा प्रश्न विचारेल. 'या पेशीच्या जवळी घडय़ाळ कसले आहे चमत्कारिक ?' कारण सर्व सजीवांचा मूळ घटक असलेल्या पेशींच्या अंगीही असलंच एखादं चमत्कारिक घड्याळ असावं, अशीच त्यांची वागणूक असते. नाहीतर फुलं नेहमी दिवसाच्या विशिष्ट वेळेलाच कशी फुलली असती ? फळझाडांना विशिष्ट ऋतूतच कसा मोहर आला असता ? प्राण्यांचा विणीचा हंगाम विशिष्ट दिवसांपुरताच कसा राहिला असता ? एवढंच काय पण आपल्यालाही विशिष्ट वेळेसच झोप कशी आली असती ? आणि त्या झोपेतूनही विशिष्ट वेळेसच जाग कशी आली असती ? याचं कारण आपण सगळे ज्या वातावरणात राहतो त्याचाही एक नैसर्गिक ताल असतो. दिवस रात्रीचं चक्र तर आपल्या ओळखीचं आहेच, पण निरनिराळ्या ऋतुंचंही चक्र पर्यावरणात नांदत असतं. या चक्राशी जुळवून घेण्यानंच आपलं जगणं अधिक सुसह्य होतं, हे सजीव फार पूर्वीच शिकले आहेत. उत्क्रांतीच्या ओघात ही जुळवून घेण्याची प्रक्रिया अंगी रुजली आहे. त्यामुळं आपल्या अनेक शरीरक्रियाही अशाच प्रकारे चक्राकार होत असतात. झोप, भुक यासारख्या शरीरक्रियांमधील ताल तर आपल्या माहितीचाच आहे. पण शरीराचं तापमान, रक्तदाब, संप्रेरकांचा पाझर हाही या तालानुसार होत असतो. वैज्ञानिकांनी यालाच सर्केडियन र्हीदम असं नाव दिलं आहे. दैनिक ताल. म्हणजेच एक दिवसाचं चक्र. याव्यतिरिक्त एका दिवसाहून कमी कालावधीचंही चक्र असतं. तसंच एका दिवसाहून अधिक कालावधीचंही चक्र असतं. स्त्रियांची मासिक पाळी हे या दुसर्या प्रकारच्या चक्राचं उत्तम उदाहरण आहे. हे चक्र किंवा हा ताल वातावरणातल्या काही सूचक घटकांना दाद देत असतो. दिवसचक्र हे सूर्यप्रकाशावर अवलंबून असतं. त्यामुळं दिवस आणि रात्र यावेळच्या शरीरक्रिया वेगवेगळ्या होत असतात. माणूस गुहांमध्ये राहत होता तेव्हापासून दिवसाचा प्रकाश आणि रात्रीचा अंधार यांच्याशी जुळवून घेत त्याच्या शरीरक्रियांचा ताल सुरू झाला. त्यानंतर माणसांनं दिव्याचा शोध लावून दिवस आणि रात्र यांच्यातला फरक कमी केला असला तरी हा मुळ ताल तसाच राहिला आहे. अंधारकोठडीची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना बाहेर दिवस आहे की रात्र आहे याचा पत्ताच लागत नाही. तरीही त्यांच्या झोपेच्या आणि जाग येण्याच्या वेळांमध्ये फारसा फरक पडत नसल्याचंच दिसून आलं आहे.आपल्या मेंदूमधील सुप्राकायॅस्मिक न्युक्लियस या भागाकडून या अंगभूत घड्याळाचं नियंत्रण होतं.*डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'काय ?' या पुस्तकातुन* 👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*विचार हे भांडवल आहे, उद्योग हा मार्ग आहे आणि मेहनत हाच उपाय आहे.* *संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पाचव्यांदा कोण निवडून आले आहेत ?२) सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात ?३) पंढरपूर मधील पवित्र नदीचे नाव कोणते ?४) शरीराच्या तापमानावर नियंत्रण राखण्याचे कार्य कोणती ग्रंथी करते ?५) भारताचे 'INDIA' हे इंग्लिश नाव कोणत्या शब्दापासून बनले आहे ? *उत्तरे :-* १) ब्लादिमिर पुतीन २) विस्तार अधिकारी ( पंचायत ) ३) चंद्रभागा ४) थायरॉईड ग्रंथी ५) INDUS*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सनीदेवल जाधव👤 रमेश कतुरवार, धर्माबाद👤 गणेश मैद👤 शंकर वर्ताळे👤 श्रीमंत ढवळे👤 अमित बडगे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हाचि नेम आतां न फिरें माघारी । बैसलें शेजारीं गोविंदाचे ॥१॥घररिघी जालें पट्टराणी बळें । वरिलें सांवळें परब्रम्ह ॥२॥बळियाचा अंगसंग जाला आतां । नाहीं भय चिंता तुका म्हणे ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जी व्यक्ती अपमान सहन करून सुद्धा, इतरांना मान, सन्मान, आदर देऊन प्रामाणिकपणे जगत असते त्या व्यक्तीला दुसऱ्याला मानसन्मान मागण्याची आवश्यकता पडत नाही. म्हणून आपण सुद्धा आपला स्वाभिमान कायम ठेवून जगण्याचा प्रयत्न करावे. कारण स्वाभिमान, प्रामाणिकपणा ठेवून सत्याच्या वाटेवर चालण्याची एकदा का सवय झाली की, इतर व्यर्थ गोष्टींच्या मोहात पडण्याची वेळ आपल्यावर येत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 *बोधकथा - संगत* 🚩आईनस्टाईन के ड्राइवर ने एक बार आइंस्टीन से कहा- "सर, मैंने हर बैठक में आपके द्वारा दिए गए हर भाषण को याद किया है।"आईनस्टाईन हैरान!उन्होंने कहा- "ठीक है, अगले आयोजक मुझे नहीं जानते। आप मेरे स्थान पर वहां बोलिए और मैं ड्राइवर बनूंगा।ऐसा ही हुआ, बैठक में अगले दिन ड्राइवर मंच पर चढ़ गया। और भाषण देने लगा...उपस्थित विद्वानों ने जोर-शोर से तालियां बजाईं।उस समय एक प्रोफेसर ने ड्राइवर से पूछा - "सर, क्या आप उस सापेक्षता की परिभाषा को फिर से समझा सकते हैं?"असली आईनस्टाईन ने देखा बड़ा खतरा!!इस बार वाहन चालक पकड़ा जाएगा। लेकिन ड्राइवर का जवाब सुनकर वे हैरान रह गए...ड्राइवर ने जवाब दिया - "क्या यह आसान बात आपके दिमाग में नहीं आई ? मेरे ड्राइवर से पूछिए, वह आपको समझाएगा।"शिक्षा :यदि आप बुद्धिमान लोगों के साथ चलते हैं, तो आप भी बुद्धिमान बनेंगे और मूर्खों के साथ ही सदा उठेंगे-बैठेंगे तो आपका मानसिक तथा बुद्धिमता का स्तर और सोच भी उन्हीं की भांति हो जाएगी!!!•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 21 मार्च 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/EMQKpdbbxWmoFLTc/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक वन दिवस_**_जागतिक काव्य दिन_*•••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील ८१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *_२१ डिसेंबर २०१२ रोजी संयुक्त राष्ट्रसंघ आमसभेद्वारे एक ठराव मंजूर करून दरवर्षी २१ मार्च हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय वन दिवस’ म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली._**२००३:जळगाव महानगरपालिका अस्तित्वात आली**२०००:फ्रेंच गयानातील कोअरु येथून 'एरियन ५०५' या वाहकाद्वारे भारताचा 'इन्सॅट ३ बी ' हा उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आला**१९९०:नामिबियाला दक्षिण अफ्रिकेपासून स्वातंत्र्य मिळाले.**१९८०:अमेरिकेने मॉस्को ऑलिम्पिक खेळांवर बहिष्कार टाकला.**१९७७:भारतातील आणीबाणी संपुष्टात आली**१९३५:शाह रझा पेहलवी यांनी पर्शियाचे नाव ईराण करावे असे आवाहन केले.**१८७१:ऑटो व्हॉन बिस्मार्क हा जर्मनीचा चॅन्सेलर बनला.**१८५८:इंग्रज सेनापती सर ह्यू रोझ याने झाशीस वेढा दिला.**१६८०:शिवाजी महाराजांनी कुलाबा (रायगड) किल्ल्याची बांधणी सुरू केली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८६: हेमंत ढोमे -- अभिनेता,दिग्दर्शक* *१९७८:राणी मुखर्जी – अभिनेत्री**१९७६:प्रा.डॉ.नोमेश मेश्राम -- कवी* *१९७१:प्रदीप नारायण विघ्ने-- कवी,लेखक* *१९६७:हेमंत दिवटे -- प्रसिद्ध कवी,अनुवादक* *१९६०:राजेश महाकुलकर -- कवी,लेखक* *१९४६:ॲड.राम हरपाळे -- लेखक, व्याख्याते* *१९३४:बुटासिंग-- काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री (मृत्यू:२ जानेवारी २०२१)**१९२९:श्रीपाद गंगाधर कावळे-- कवी (मृत्यू:२००१)**१९२८:राम पटवर्धन-- मराठी अनुवादक आणि संपादक(मृत्यू:३ जून २०१४)**१९२१:चंद्रकांत कल्याणदास काकोडकर-- कादंबरीकार(मृत्यू:२३ नोव्हेंबर १९८८)**१९१६:उस्ताद बिस्मिल्ला ख़ाँ-- भारतातील प्रख्यात शहनाई वादक,भारत रत्न (मृत्यू:२१ ऑगस्ट २००६)**१९१३:मनोहर महादेव केळकर-- लेखक* *१९१२:ख्वाजा खुर्शीद अन्वर-- पाकिस्तानी चित्रपट निर्माता,लेखक,दिग्दर्शक आणि संगीतकार(मृत्यू:३० ऑक्टोबर १९८४)**१८८७:मानवेंद्रनाथ रॉय – देशभक्त, क्रांतिकारक व भारतातील कम्यूनिस्ट पक्षाचे संस्थापक (मृत्यू:२६ जानेवारी १९५४)**१८४७:बाळाजी प्रभाकर मोडक – ’कालजंत्री’कार,शालिवाहन शक व तिथी आणि ख्रिस्ती सन यांचा मेळ घालण्याचे कोष्टक तयार करणारे,विज्ञानप्रसारक,लेखक (मृत्यू:२ डिसेंबर १९०६)**१७६८:जोसेफ फोरियर – फ्रेन्च गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू:१६ मे १८३०)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३:वंदन राम नगरकर--प्रसिद्ध एकपात्री कलाकार,लेखक,व्यक्तिमत्त्व विकास तज्ज्ञ (जन्म:२४ मार्च१९६१)**२०१०:पांडुरंग लक्ष्मण तथा ’बाळ’ गाडगीळ – अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक (जन्म:२९ मार्च १९२६)**२००५:दिनकर द.पाटील – चित्रपट दिग्दर्शक, पटकथा व संवाद लेखक (जन्म:६ नोव्हेंबर १९१५)**१९९२:मोरेश्वर रामचंद्र वाळंबे-- शिक्षणतज्ज्ञ व मराठी भाषेचे व्याकरणकार(जन्म:३० जून १९१२)**१९८५:सर मायकेल रेडग्रेव्ह – ब्रिटिश अभिनेता (जन्म:२० मार्च १९०८)**१९७४:श्रीधर बाळकृष्ण रानडे --मराठी कवी,रविकिरण मंडळाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक.(जन्म:२४ जून १८९२)**१९७३:यशवंत रामकृष्ण दाते – कोशकार. चिं.ग.कर्वे यांच्या साहाय्याने त्यांनी ’महाराष्ट्र मंडळ कोश’ स्थापन करून आठ खंडांचा ’महाराष्ट्र शब्दकोश’ तयार केला. (जन्म:१७ एप्रिल १८९१)**१९७३:शंकर घाणेकर--’आतुन कीर्तन वरुन तमाशा’ या नाटकाचा प्रयोग करत असतानाच नटवर्य शंकर घाणेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.(जन्म:१० फेब्रुवारी १९२६)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जागतिक काव्य दिनानिमित्त मनस्वी शुभेच्छा..... पूर्ण कविता वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून भूतानच्या दोन दिवसीय दौऱ्यावर.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत 72 लाखांची रोकड जप्त, निवडणूक अधिकाऱ्यांचा तपास सुरु*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी भूषण गगराणी यांची नियुक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचा पदभार स्वीकारला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी, पहिल्या टप्प्यातील १०२ जागांसाठी अधिसूचना, १९ एप्रिल रोजी होणार मतदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पण मी कोणाकडेही उमेदवारी मागणार नाही, मी स्वबळावर लढणार - राजू शेट्टी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2024 मधून DRS आऊट, नवीन SRS सिस्टीम, उद्यापासून IPL 2024 चा थरार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *बाळाची गर्भावस्था व पोषण* 📙 मानव 'मॅमल' या गटात मोडतात. म्हणजेच सस्तन प्राणिमात्र असल्याने एकपेशीय सुरुवातीपासून जन्म होईपर्यंत आईच्या पोटात त्यांची पूर्ण वाढ होते जाते. माणसाची गर्भावस्था ही अडतीस आठवड्यांची असते. हाच काळ छत्तीस ते चाळीस आठवडे येथपर्यंत मागे पुढे होऊ शकतो. या काळातील अवस्थेलाच 'गर्भावस्था' म्हणतात व आईच्या गर्भाशयात ही सर्व वाढ होते.गर्भाशयाला आतील बाजूने तळहाताएवढय़ा पसरट भागात जोडलेल्या अस्तराला 'प्लासेंटा' असे म्हणतात. याचे दुसरे टोक गर्भाच्या नाभीतून गर्भाला पोषणद्रव्ये रक्ताद्वारे पूरवत असते. पुरवठा करणाऱ्या रक्तनलिकांच्या या समुच्चयास 'नाळ' असे म्हणतात. बाळाची नाळ आईच्या गर्भाशयाशी आतील बाजूस जोडलेली असल्याने आईच्या रक्तातील पोषणद्रव्ये जशीच्या तशी बाळाला मिळत राहतात.दहाव्या आठवडय़ाच्या सुमारास बाळाचे अवयव स्पष्ट होऊ लागतात, बाविसाव्या आठवड्यात त्याच्या हृदयाच्या स्पंदनांचे ठोकेही ऐकू येऊ शकतात, तर बत्तीसाव्या आठवड्यात बाळ गर्भाशयात पूर्णपणे स्थिर स्थिती घेऊ शकते व या सर्व गोष्टी हल्ली अल्ट्रासाऊंड तपासणीद्वारे नीट दिसूही शकतात.गर्भावस्थेतील काही दोष असल्यास वरील तपासण्यांचा हल्ली उपयोग केला जातो. त्यावरून बाळाची वाढ, आकारमान यांचा नक्की पत्ता लागू शकतो. पूर्ण वाढ झाल्यावर अडतिसाव्या आठवड्यात एके दिवशी गर्भाशयाचे आकुंचन सुरू होते व गर्भावस्थेतील बाळ योनीमार्गे आईच्या पोटातून जगात जन्म घेते. बाळाचा जन्म झाल्यावर लगेच त्याची नाळ बांधून कापून टाकतात. याच जागी बाळाची बेंबी व नाभी काही दिवसांनी तयार होते.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वेगापेक्षा दिशा महत्वाची आहे, जर दिशा योग्य नसेल तर वेगाचा काहीच उपयोग नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*७२४६)* जगात प्रदूषणात भारताचा कितवा क्रमांक लागतो ?*७२४७)* १८७०साली पुणे येथे पहिली शिवजयंती कोणी साजरी केली ?*७२४८)* ओरिसाच्या किनारी भागास काय म्हणतात ?*७२४९)* महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात पाण्याची बँक स्थापन करण्यात आली आहे ?*७२५०)* भारतातील सर्वात प्राचीन पर्वत कोणते ? *उत्तरे :-* *७२४६)* तिसरा *७२४७)* महात्मा फुले *७२४८)* उत्कल *७२४९)* सोलापूर *७२५०)* अरवली*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 साहेबराव कदम, बाभळी, धर्माबाद👤 शिवा जी. गुडेवार👤 पी. अनिल, तेलंगणा👤 स्नेहलता कुलथे, साहित्यिक👤 प्रवीण बडेराव👤 हर्षल जाधव👤 संतोष खोसे, उस्मानाबाद👤 गणेश धुप्पे👤 विलास सोनकांबळे👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आधिल्या भ्रतारें काम नव्हे पुरा । म्हणोनि व्यभिचारा टेकलियें ॥१॥रात्रंदिस मज पाहिजे जवळी । क्षण त्यानिराळी न गमे घडी ॥२॥नाम गोष्टी माझी सोय सांडा आतां । रातलें अनंता तुका म्हणे ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आधी देणारे कमी होते पण,घेणारे मात्र जास्त होते.आज त्याही पेक्षा घेणाऱ्यांची संख्या जास्त वाढताना दिसत आहे. म्हणून कधी घेणाऱ्यांना पुजले जाते का. ..? या विषयी विचार करण्याची गरज आहे. कारण, देणाऱ्यांनाच दाता म्हणतात घेणाऱ्याला नाही. घेण्यासाठी तर आपल्याकडे संपूर्ण आयुष्य पडले आहे. माणसाचा जन्म मिळाला हेच सर्वांत श्रेष्ठ समजून देण्यासाठी वेळ, आपले हात,नि:स्वार्थ भावना व मन स्वच्छ, असणे आवश्यक आहे. घेण्यासाठी कुठेही वणवण भटकावे लागणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*समाधान* एकदा काही कोळिणींना बाजारातून गावी परतण्यास वेळ झाला. अंधार पडला म्हणून वाटेत एका फुलबागेकच्या शेजारी झोपडीजवळ त्या विश्रांतीसाठी थांबल्या. माळी म्हणाला, "बायांनो ! रात्र खूप झाली आहे, या गरीबाच्या झोपडीत रात्र काढा आणि पहाटेस निघा." कोळिणींना ते पटले, त्या सार्याजणी त्या वृद्ध माळीबाबांच्या झोपडीत मुक्कामास राहिल्या. पण त्यांना त्या झोपडीत जराही झोप लागली नाही. त्या रात्रभर इकडून तिकडे, या कुशीवरून त्या कुशीवर वळत राहिल्या. त्या खोलीतील एका कोपऱ्यात चमेलीच्या फुलांनी भरलेली करंडी होती. त्या फुलांचा सुगंध असह्य झाल्यानेच कोळिणींना झोप येत नव्हती. काही वेळाने एक कोळीण उठली. म्हणाली, "हा दुर्गंध काही जात नाही. वाढतोच आहे." असे म्हणून तिने आपल्या मासळीच्या टोपलीवर थोडे पाणी टाकले. ती टोपली उशाशी घेताच तिला गाढ झोप लागली. *तात्पर्य :* कोणाला कशाने समाधान लाभेल, हे ज्याच्या त्याच्या सवयीवर अवलंबून असते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 20 मार्च 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~समुहात add होण्यासाठी Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक चिमणी दिन_*•••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील ८० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* ••••••••••••••••••••••••••••••••*१९५६:ट्युनिशियाला (फ्रान्सकडून) स्वातंत्र्य मिळाले**१९१७:महाडचा ’चवदार तळे’ सत्याग्रह**१९१६:अल्बर्ट आइन्स्टाईनने सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडला.**१८५४:रिपब्लिकन पार्टी ऑफ अमेरिका या पक्षाची स्थापना झाली. या पक्षाला ’ग्रँड ओल्ड पार्टी’ असेही म्हणण्यात येते.**१८५८:झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांनी इंग्रजाविरुद्ध लढा पुकारताच सेनापती सर ह्य रोज यांनी झाशीच्या किल्ल्याला वेढा दिला.**१६०२:डच इस्ट इंडिया कंपनीची स्थापना* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८०:पुष्पलता युवराज मिसाळ -- कवयित्री* *१९७२:संजय दयाराम तिजारे-- कवी* *१९६६:प्रवीण दशरथ बांदेकर-- मराठी साहित्यिक**१९६६:अलका याज्ञिक – प्रसिद्ध भारतीय गायिका**१९५८:अशोक लोटणकर-- ललित कथाकार, कवी,समीक्षक**१९५५:दया मित्रगोत्री-- कवयित्री**१९५२:आनंद अमृतराज-- भारताचा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा टेनिस खेळाडू**१९५१:मदनलाल उधौराम शर्मा-- माजी क्रिकेटपटू**१९५०:डॉ.भारती जयंत सुदामे -- प्रसिद्ध लेखिका,मराठी व हिंदी भाषेमध्ये लेखन व अनुवाद* *१९४७:प्रा.वसंत केशव पाटील-- ललित लेखक,कथाकार,कवी,गझलकार आणि राष्ट्रीय स्तरावरील भाषांतरकार साहित्यक* *१९३९:सुधीर दळवी -- भारतीय अभिनेता, मनोज कुमारच्या शिर्डी के साई बाबा या वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटात साईबाबाची भूमिका साकारली**१९२४: राम नारायण गबाले -- मराठी चित्रपट दिग्दर्शक,निर्माते,पटकथालेखक, संवादलेखक(मृत्यू:९ जानेवारी २००९)**१९२४:ईश्वर बगाजी देशमुख-- संस्थापक, सामाजिक कार्यकर्ते (मृत्यू:६ फेब्रुवारी २००६)**१९२१:पी.सी.अलेक्झांडर-- भारतातील मल्याळी राजकारणी व मुलकी सेवेतील माजी अधिकारी,महाराष्ट्राचे माजी राज्यपाल (मृत्यू:१० ऑगस्ट२०११)**१९२०:वसंत कानेटकर – नाटककार (मृत्यू:३१ जानेवारी २०००)**१९११:माधव मनोहर --समीक्षक,नाटककार, लेखक(मृत्यू:१६ मे,१९९४)**१९०८:सर मायकेल रेडग्रेव्ह – ब्रिटिश अभिनेता (मृत्यू:२१ मार्च १९८५)**१८२८:हेन्रिक इब्सेन – नॉर्वेजियन नाटककार,दिग्दर्शक आणि कवी (मृत्यू:२३ मे १९०६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१५:कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे-- मराठी लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध(जन्म:३ सप्टेंबर, १९२३)**१९५६:बा.सी.मर्ढेकर – मराठी नवकाव्याचे प्रणेते (जन्म:१ डिसेंबर १९०९)**१९२५:लॉर्ड कर्झन–ब्रिटिश मुत्सद्दी आणि भारताचे व्हॉइसराय(जन्म:११ जानेवारी १८५९)**१७२७:सर आयझॅक न्यूटन – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला.गणितातील ‘कॅल्क्युलस’ या शाखेचे जनक (जन्म:२५ डिसेंबर १६४२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••।। जागतिक चिमणी दिवस ।।आमच्या लहानपणी दिसणाराकुठे गेला लहानसा चिमणाचिवचिव आवाज झाला गायबकोणी खाईना अंगणातला दाणाबाळाला खाऊ घालतांनाआई बोलावित असे चिऊलाबाळ ही मिटकावून खात असेबघत बघत लहानश्या चिऊला- नासा येवतीकर, 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुंबई उच्च न्यायालयाची माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानी पक्षाच्या खासदारांची बैठक संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *भाजपा महायुतीचे उमेदवार म्हणून प्रचार करेल - आशिष शेलार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसच्या ७ लोकसभा मतदारसंघांसाठी दिला पाठिंबा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *बंगळुरू मधल्या नागरथ भागात १४४ कलम लागू.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *चीनच्या प्रवक्त्यानं अरुणाचलप्रदेशाबद्दल केलेल्या विधानाचा प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी घेतला समाचार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने WPL मध्ये पहिले विजेतेपद पटकावले:दिल्ली कॅपिटल्सचा 8 गडी राखून पराभव, श्रेयंका पाटीलने घेतल्या 4 विकेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *बायोमास* 📙 झाडेझुडपे, पालापाचोळा, काटक्या, कोळसा, शेण्या, गोवऱ्या, कुजलेले शेवाळे हे सर्व बायोमास या प्रकारात मोडतात. सूर्याची ऊर्जा मिळून त्यांची निर्मिती झालेली असते. या बायोमासचे ज्वलन करून तीच ऊर्जा पुन्हा उष्णतेच्या स्वरूपात बाहेर पडते. ग्रामीण जीवनात या बायोमासला फार महत्त्व आहे.रोजची चूल पेटण्याचा संबंध प्रथम कोरडे जळण मिळवण्यापासून सुरू होतो. झाडे तोडून लाकडे मिळवण्याचे दिवस कमी होत चालले आहेत. काट्याकुटक्या, झाडोर्याच्या फांद्या झपाट्याने नाहीशा होत चालल्या आहेत. पालापाचोळा शेकोटीला वा पाणी तापवायला उपयोगी पडतो; पण भाकऱ्या भाजणे व स्वयंपाक करणे यासाठी त्याचा उपयोग होत नाही. पुर्वापारची पद्धत म्हणजे शेणाच्या गोवऱ्या थापणे. जनावरांचे म्हणजे गायीगुरांचे शेण, त्यात थोडीशी कोळशाची पावडर घालून मळायचे. त्याचा गोल गोवऱ्या थापायच्या व भिंतीला लावून वाळवत ठेवायच्या. ग्रामीण जीवनाचे हे एक अविभाज्य अंग आहे.याच गोवर्या वाळल्या की मग पावसाळ्याच्या दिवसांतील जळणाची पंचाईत कमी होते. काहीजण या गोवऱ्या तयार करताना वाळका कडबासुद्धा बारीक चुरून वापरतात. दोन चार गोवर्या व एखादे मोठे लाकूड यांवर एक वेळचा स्वयंपाक कसाबसा पार पाडता येतो. चुलीची आचही चांगली राहते. धुर कमी होतो.या पद्धतीचे जळण वापरायची प्रथा जिथे गुरे हा जीवनाचा अविभाज्य अंग आहे तिथे कायम आहे. भारतातील सर्व ग्रामीण भागात कुठेही गेलात तरी गोवऱ्यांची चळत वळचणीला लावून रचलेली दिसेल व परसदारी भिंतीला गोवर्या थापून वाळवत लावलेल्या दिसतीलच. एवढेच नव्हे तर रानात गुरे चरायला जातात त्या वेळी त्यांच्यामागे जाणारी लहान मुले एखादी पाटी घेऊन शेण गोळा करायला कधीही विसरत नाहीत. जमेल तेवढे पाटीभर शेण घरी आणले की जळणाची सोय होते, हे त्यांना जणू बाळकडूच मिळालेले असते. गोवऱ्यांचा आणखी एक उपयोग आहे. घरातील वृद्ध म्हातारे माणूस रागाने म्हणताना कधी ऐकले आहे ? 'गेल्या आहेत माझ्या गौवऱ्या मसणात,' म्हणून ! अगदी बरोबर. अंत्यसंस्कार करताना अनेक ठिकाणी अजूनही भरपूर गोवऱ्या वापरतात. बहुमूल्य अशा लाकडाची ही त्यात बचत होते. हेही महत्त्वाचे नाही काय ?‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••साधेपणाने कर्तव्य करताना भीतीचे कारण नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) देशातील पाण्याखालून जाणाऱ्या पहिल्या मेट्रोचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले ?२) रशियाच्या अवकाश संशोधन संस्थेचे नाव काय आहे ?३) घटक राज्यांमधील संविधानिक यंत्रणा बंद पडल्यास त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची आणीबाणी लागू केले जाते ?४) कोडाई कॅनॉल हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?५) भारताची अर्थव्यवस्था सध्या जगात कितव्या क्रमांकाची आहे ? *उत्तरे :-* १) पंतप्रधान नरेंद्र मोदी २) रॉसकॉसमॉस ३) राष्ट्रपती राजवट ४) तामिळनाडू ५) पाचव्या*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 नागेश चिंतावार, शिक्षक, नांदेड👤 योगेश राजापूरकर, शिक्षक, उमरी👤 गणेश गुरुपवार, नांदेड👤 रमेश कोंडेकर👤 सर्जेराव ढगे👤 मनोहर किशनराव राखेवार, नांदेड👤 रामदयाल राऊत*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वाळो जन मज म्हणोत शिंदळी । परि हा वनमाळी न विसंबें ॥१॥सांडूनि लौकिक जालियें उदास । नाहीं भय आस जीवित्वाची ॥२॥नाइकें वचन बोलतां या लोकां । म्हणे जालों तुका हरिरता ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दोन शब्द आपल्यासोबत कोणी हसून बोलत असतील तर आपल्याला आनंद होत असतो .पण आपल्याला कोणी कठोर शब्दात बोलले तर मात्र त्या शब्दांचा राग येत असतो. या दोन्ही मध्ये खूप फरक आहे. पण,थोडे विचार करून बघावे कधी,कधी हसून बोललेल्या शब्दात जे काही दडलेले असते त्याबद्दल आपल्याला पुरेपूर माहिती नसते व जे कोणी कठोर शब्दात बोलून मोकळे होतात. कधीकाळी ते आपल्या भल्यासाठीही असू असते म्हणून त्या दोन्ही मधील फरक आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *शासन*महाभारताच्या शांतीपर्वातील ही गोष्ट. शंख व लिखित नावंचे दोघे भाऊ यज्ञोपवित संस्कार झाल्यावर गुरूगृही विद्याध्यानासाठी गेले. संपूर्ण वेद वेदांगाचा अभ्यास करून गुरूची परवानगी घेऊन हे दोघे घरी परत आले. दोघांनीही दोन वेगवेगळया ठिकाणी आपले आश्रम बांधले. तिथे त्यांचे अध्यापनाचे काम सुरू झाले. बरेच दिवस झाले दोन्ही भावांची भेट नव्हती. लिखिताने शंखाकडे भेटीला जाण्याचे ठरवले. त्याप्रमाणे तो गेला पण शंख कामानिमित्त बाहेर गेला होता. निराश झालेला लिखित परत निघाला. दुपारी बाराची वेळ भूक लागली होती. समोर शंखाच्या आश्रमातील आंब्याच्या झाडाला खूप आंबे लागले होते. एक छानसा पिकलेला आंबा लिखिताने तोडला व पुढे चालू लागला.तेवढयात समोरून येणार्या शंखाने ते पाहिले व विचारले. 'आंबा कुठे मिळाला ?' शंख सहज म्हणाला 'अरे ! तुझ्याच झाडाचा छान पिवळा धम्मक दिसला तोडला'. शंख शांतपणे म्हणाला 'म्हणजे लिखिता तू चोरी केलीस झाडाच्या मालकाला न विचारता आंबा तोडलास' लिखिताला आपली चूक कळली. शरमेने त्याची मान खाली झुकली. 'शंखा माझ्या गुन्ह्याबद्दल मला हवी ती शिक्षा कर' 'काहीं गरज नाहीं त्याची जा आता पुन्हा असे घडणार नाही ह्याची खबरदारी घे' शंख एवढे बोलून निघून गेला.लिखित राजाकडे गेला. घडलेली सर्व हकीगत सांगितली. 'राजा मला शिक्षा कर' लिखित म्हणाला. ह्या विचित्र मागणीचे राजाला आश्चर्य वाटले. राजा म्हणाला 'लिखिता तू म्हणतोस ते खरंही असेल पण चोरीची फिर्याद कुणीच केलेली नाही. गुन्हा शाबीत झाला तर शिक्षा'. 'राजे पण गुन्हा शाबीत झाला तर ह्या गुन्ह्याला शिक्षा कोणती ?' लिखिताने विचारले, 'चोरी करणार्याचा हातच आम्ही कापतो' राजा म्हणाला. राजाच्या समोरच लिखिताने राजा शासन करत नाहीं म्हणून आपणच आपला हात कापून टाकला'.स्वत:च स्वत:ला शिक्षा करून घेणारी प्रजा उत्कृष्ट राज्य शासनाचे प्रतीक आहे.*📝 संकलन* 📝•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 18 मार्च 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2022/11/power-of-one-vote.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ७८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००१:सरोदवादक अमजद अली खान यांना ’गंधर्व पुरस्कार’ तर तर बंगाली अभिनेत्री सावित्री चटर्जी यांना ’अप्सरा पुरस्कार’ जाहीर**१९४४:नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने ब्रह्यदेशमार्गे प्रवेश करुन भारताच्या ईशान्य सीमेवर ब्रिटिशांचा पाडाव करुन तिरंगा फडकावला**१९४०:अमळनेर येथे साने गुरुजींनी सुरू केलेल्या 'काँग्रेस'या साप्ताहिकाचा शेवटचा अंक निघाला**१९२२:महात्मा गांधींना असहकार आंदोलनाबद्दल ६ वर्षे तुरूंगवास**१८५०:हेन्री वेल्स आणि विल्यम फार्गो यांनी ’अमेरिकन एक्सप्रेस’ची स्थापना केली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७४:प्रा.डॉ.उद्धव भाले-- लेखक**१९७०:देवेंद्र गावंडे--निवासी संपादक लोकसत्ता विदर्भ आवृत्ती तथा प्रसिद्ध लेखक* *१९६८:प्रा.डॉ.शंतनू रामचंद्र कुळकर्णी -- प्रसिद्ध कवी* *१९५९:मंगला मधुकर रोकडे -- प्रसिद्ध कवयित्री,लेखिका,संपादिका* *१९५७:रत्ना पाठक शाह-- भारतीय अभिनेत्री आणि दिग्दर्शिका* *१९५६:वासंती वर्तक--दूरदर्शनच्या प्रतिभावंत वृत्तनिवेदिका व लेखिका* *१९५५:संजय श्रीकृष्ण पाठक-- प्रसिद्ध विज्ञान लेखक* *१९५५:अरुण बुधाजी सोनवणे-- गझलकार* *१९४८:एकनाथ सोलकर – अष्टपैलू क्रिकेटपटू (मृत्यू:२६ जून २००५)**१९४६:नवीन निश्चल-- भारतीय अभिनेता(मृत्यू:१९ मार्च २०११)**१९४३: विंग कमांडर अशोक प्रभाकर मोटे-- भारतीय वायुसेनेचे अधिकारी ऐतिहासिक अशा कारगिलसह तीन प्रमुख युद्धांमध्ये सहभाग (मृत्यू:२५ डिसेंबर २०२०)**१९३८:बलबीरराज पृथ्वीराज कपूर तथा ’शशी कपूर’ – अभिनेता(मृत्यू:४ डिसेंबर २०१७)**१९३४:दशरथ तोंडवळकर-- कलावैभव'चे सर्वेसर्वा,ज्येष्ठ नाट्यनिर्माते (मृत्यू:७ आगस्ट २०१०)**१९३२:तुळशीराम माधवराव काजे-- प्रतिभावंत कवी(मृत्यू:१४ सप्टेंबर २०१८)* *१९२६:अक्कितम अच्युथन नंबूथिरी-- भारतातील मल्याळम भाषेतील कवी, 'अक्कितम' या नावाने प्रसिद्ध,त्यांनी रचलेल्या बालीदर्शनम या काव्यसंग्रहासाठी १९७३ मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित(मृत्यू:१५ ऑक्टोबर, २०२०)**१९२१:एन.के.पी. साळवे – भारतीय राजकारणी,माजी केंद्रीय मंत्री व बी.सी.सी. आय.चे अध्यक्ष (मृत्यू:१ एप्रिल २०१२)**१९१९:इंद्रजित गुप्ता – माजी केन्द्रीय गृहमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते (मृत्यू:२० फेब्रुवारी २००१)**१९०५:मालती बेडेकर ऊर्फ ’विभावरी शिरुरकर’ – लेखिका (मृत्यू:७ मे २००१)**१९०४:लक्ष्मणराव सरदेसाई-- कोंकणी व मराठी भाषेतील लेखक(मृत्यू:४ फेब्रुवारी१९८६)**१९०१:कृष्णाजी भास्कर तथा ’तात्यासाहेब’ वीरकर – शब्दकोशकार,अनेक शैक्षणिक संस्थांचे संस्थापक* *१८८१:वामन गोपाळ तथा ’वीर वामनराव’ जोशी – स्वातंत्र्यसैनिक,पत्रकार,’राष्ट्रमत’ आणि ’स्वतंत्र हिन्दुस्तान’चे संपादक,लेखक व नाटककार (मृत्यू:३ जून १९५६)**१८६९:नेव्हिल चेंबरलेन – इंग्लंडचे पंतप्रधान (मृत्यू:९ नोव्हेंबर १९४०)**१८६७:महादेव विश्वनाथ धुरंधर – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार व पोस्ट कार्ड आर्टिस्ट(मृत्यू:१ जून १९४४)**१८५८:रुडॉल्फ डिझेल – डिझेल इंजिनचा संशोधक (मृत्यू:२९ सप्टेंबर १९१३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२०:अशोक शेवडे --प्रख्यात मुलाखतकार , लेखक (जन्म:२४ जानेवारी १९४४)* *२०१६:आशा अनंत जोगळेकर-- प्रसिद्ध नृत्यांगना (जन्म:१० सप्टेंबर १९३६)**२०११:दिनकर निलकंठराव देशपांडे-- मराठीतले पत्रकार आणि साहित्यिक(जन्म:१७ जुलै १९३३)**२००४:वसंत केशव दावतर- समीक्षक (जन्म:२७ ऑगस्ट १९२५)**२००१:विश्वनाथ नागेशकर – चित्रकार (जन्म: १९१०)**१९७५:हरी रामचंद्र दिवेकर--स्त्री-शिक्षणाचे पुरस्कर्ते,संस्कृत लेखक(जन्म:५ नोव्हेंबर १८८५)**१९०८:सर जॉन इलियट – भारतातील हवामानशास्त्रविषयक कार्यामुळे प्रसिद्धी पावलेले ब्रिटिश हवामानशास्त्रज्ञ. १८८७ ते १८९३ या कालावधीत ते भारत सरकारच्या हवामान खात्याचे प्रमुख होते. (जन्म:२५ मे १८३१)**१८९४:रावबहादुर शंकर पांडुरंग पंडित-- वेदाभ्यासक,उत्तम प्रशासक(जन्म:१ जानेवारी १८४०)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*एका वोट ची किंमत*ज्या ज्या वेळी आपण मतदार म्हणून निवडणुकीला तोंड द्यावे लागते त्या त्यावेळी आपल्या समोर एकच प्रश्न पडतो की, मतदार म्हणून मी काय करावे ? कोणत्या व्यक्तीला किंवा कोणत्या पक्षाला मतदान करावे ? आपण एक जागरूक मतदार असाल तर नक्कीच या प्रश्नाचे निराकरण स्वतःच्या मनाशी विचारून नक्की करू शकता. त्यासाठी स्वतः मतदार यांनी सर्वप्रथम कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये............ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *19 व्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला, महाराष्ट्रात पाच टप्यात होणार मतदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा मुंबईत समारोप, या सभेला महाविकास आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *'जय जय महाराष्ट्र माझा...' हे राज्यगीत आता शाळांमध्ये गायले आणि वाजविले जाणार असल्याचे परिपत्रक राज्य सरकारने काढले आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *निर्भय व निष्पक्ष निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज:संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केला विश्वास*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अमृतवाहिनीच्या डॉ. विजय गडाख यांना भारत सरकारचे पेटंट:कुरडया बनवण्याची नवीन मशीन, एका मिनिटात पाच कुरडया तयार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुण्यात दोन दिवसीय काव्य महोत्सव संपन्न:साहित्यदीप प्रतिष्ठानतर्फे आयोजित संमेलनात दिग्गज कवीयत्रींनी उलगडला 'वारसा साहित्यीकांचा'*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *T20 World Cup 2024 : विराट कोहलीचं स्थान निश्चित, रोहित शर्माची मध्यस्थी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📒 स्टेनलेस स्टीलला गंज का चढत नाही ? 📒साध्या पोलादाला गंज चढतो. तो त्या धातूला कुरतडत राहतो. कालांतरानं त्याचा भुगाच करतो. हे असं का होत ? हवेतल्या किंवा पाण्यातल्या ऑक्सिजनशी त्याची जी रासायनिक प्रक्रिया होते त्यातून तयार होणारी संयुगं साध्या लोखंडावर किंवा पोलादावर गंजाची पुटं चढायला कारणीभूत असतात. ही संयुगं पोलादाच्या पृष्ठभागावर एक परत तयार करतात. ही आयर्न ऑक्साईड किंवा हायड्रॉक्साईडची पुटं अस्थिर असतात. हवेतल्या, पाण्यातल्या ऑक्सिजनशी त्यांचा सतत संपर्क येतच राहतो. एवढंच काय, पण या पुटांमधून शिरकाव करून घेत पुढं पुढं जात त्यांच्या खालच्या पोलादाशीही तो संधान साधतो. आणखी संयुगं तयार करतो. त्यामुळे इतर काही उपाययोजना केली नाही तर मग या पुटांची जाडी वाढत राहते. डोळ्यांना सहज दिसेल इतकी ती वाढते. यालाच आपण गंज म्हणतो. त्यातील संयुगांच्या तपकिरी रंगामुळं तर ती अधिकच सहजपणे दिसून येतात.त्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलादात क्रोमियम, सिलिकॉन, मँगेनीज, कार्बन हे धातू मिसळून त्यापासून मिश्रधातू तयार करण्यात येतो. यालाच स्टेनलेस स्टील म्हणतात. काही स्टेनलेस स्टीलमध्ये निकेल किंवा मॉलिब्डेनम हे धातूही मिसळलेले असतात. जेव्हा असं स्टेनलेस स्टील हवेतल्या किंवा पाण्यातल्या ऑक्सिजनच्या संपर्कात येतं तेव्हा त्याची प्रक्रिया त्या मिश्रधातूतल्या लोखंडाशी होण्याआधी क्रोमियम किंवा निकेल यांसारख्या धातूंबरोबर होते. त्यांच्या संयुगामुळंही गंजाची एक रेण्वीय जाडीची परत तयार होते पण ती स्थिर असते. तिच्यामधून शिरकाव करून घेत खालच्या लोहाशी प्रक्रिया करणं ऑक्सिजनला शक्य होत नाही. त्यामुळे लोहाची संयुगं तयार होत नाहीत. एवढंच नाही, तर जे काही थोडंफार क्रोमियम किंवा निकेल उरलं असेल त्याच्याशीही ऑक्सिजन प्रक्रिया करू शकत नाही. त्यामुळे जे काही गंजाचं अतिशय पातळ पुट तयार झालं असेल, त्याची जाडीही वाढत नाही. ते अतिशय पातळ म्हणजे केवळ एका रेणूच्या जाडीएवढंच असल्यामुळं आणि त्याचा रंगही तपकिरी नसल्यामुळं डोळ्यांना ते दिसत नाही. म्हणजे स्टेनलेस स्टीललाही गंज चढतो पण तो अतिशय मामुली स्वरूपातला असल्यामुळं आणि त्याची वाढ होत नसल्यामुळं त्या धातूचं नुकसान मर्यादित राहतं. सतत वाढत जाऊन ते मूळ धातूला कुरतडत खाऊन टाकत नाही.या सर्वात कळीची भूमिका बजावली जाते ती क्रोमियमकडून. त्यामुळेच इतर धातू असोत-नसोत, स्टेनलेस स्टीलमध्ये क्रोमियमचा समावेश निश्चित असतो. किंबहुना, किमान दहा टक्के क्रोमियमचा अंतर्भाव केलेला असल्याशिवाय अशा धातूला स्टेनलेस स्टील असल्याचं प्रमाणपत्र दिलं जात नाही.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अंधारातच प्रकाशाची खरी किंमत कळते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगात वेगवेगळ्या कारणांनी इंटरनेट बंद करण्यात अव्वल देश कोणता ?२) जगात शस्त्रे खरेदी करणाऱ्या देशांच्या यादीत प्रथम क्रमांक कोणत्या देशाचा लागतो ?३) निवडणूक आयोगाकडून मतदारांना ई - ओळखपत्र देण्यास सुरूवात कोणत्या वर्षी झाली ?४) देशात फुलपाखरांच्या एकूण किती प्रजातींची नोंद आहे ?५) जगातील घनदाट जंगल कोणते ? *उत्तरे :-* १) भारत २) भारत ३) सन २०२१ ४) १४०० प्रजाती ५) अमेझोन*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 बालाजी आगोड👤 इरफान शेख, धर्माबाद👤 लक्ष्मण नरवाडे👤 सुहास भंडारे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कर कटावरी तुळसीच्या माळा । ऐसें रूप डोळां दावीं हरी ॥१॥ठेविले चरण दोन्ही विटेवरी । ऐसें रूप हरी दावीं डोळां ॥ध्रु.॥कटीं पीतांबर कास मिरवली । दाखवीं वहिली ऐसी मूर्ती ॥२॥गरुडपारावरी उभा राहिलासी । आठवें मानसीं तें चि रूप ॥३॥झुरोनी पांजरा होऊं पाहें आतां । येईं पंढरीनाथा भेटावया ॥४॥तुका म्हणे माझी पुरवावी आस । विनंती उदास करूं नये ॥५॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपली वाट जर सत्याची असेल आणि त्या वाटेत आपल्याला अपमान, बदनाम करून स्वतः चे समाधान करून घेणारे मिळत असतील तर ते, आपले सर्वात मोठे भाग्य समजावे. व तो, आपल्याला मिळालेला मौल्यवान सन्मान समजावा. कारण, ते सर्व सहन करण्याची व त्या वाटेवर चालण्याची प्रत्येकात ताकद नसते.म्हणून जीवनात कितीही प्रसंग आले तरी आपण निवडलेल्या योग्य त्या वाटेवर चालत रहावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बिल गेट्स पेक्षा श्रीमंत कोण आहे ?कुणीतरी बिल गेट्सना विचारलं, की तुमच्या पेक्षा श्रीमंत कुणी आहे का?ते म्हणाले, हो एकच आहे.बर्याच वर्षांपूर्वी माझी नोकरी गेली होती आणि त्यानंतर मी न्यूयॉर्क विमानतळावर गेलो. मी तेथे वृत्तपत्रांचे शीर्षक वाचले. मला त्यापैकी एक आवडले आणि मला ते विकत घ्यायचे होते. पण माझ्याकडे सुटे पैसे नव्हते. मी सोडून दिले, अचानक, एक सावळा मुलगा मला बोलावून म्हणाला, "आपल्यासाठी हे घ्या वृत्तपत्र." मी म्हणालो, पण माझ्याकडे सुटे पैसे नाहीत. तो म्हणाला, "काही हरकत नाही, मी तुला हे मोफत देतो आहे"योगायोगाने ३ महिन्यांनंतर मी पुन्हा तिथे गेलो. ती गोष्ट पुन्हा अगदी तशीच घडली आणि त्याच मुलाने पुन्हा एकदा मला आणखी एक वृत्तपत्र मोफत दिले.मी म्हणालो, मी स्वीकारू शकत नाही. परंतु तो म्हणाला, "मी हे तुला माझ्या नफ्यातून देतोय"१९ वर्षांनंतर जेंव्हा मी श्रीमंत झालो तेंव्हा मी त्या मुलाला शोधण्याचा निर्णय घेतला. सुमारे दीड महिन्यानंतर मी त्याला शोधले. मी त्याला विचारले, तू मला ओळखलेस? तो म्हणाला, "होय, आपण प्रसिद्ध बिल गेट्स आहात."मी म्हणालो, तु खूप वर्षांपूर्वी मला दोनदा मोफत वृत्तपत्र दिले होतेस. आता मला ते भरुन काढायचे आहे. मी तुला जे पाहिजे ते सर्व देईन. सावळा तरुण माणूस म्हणाला, "आपण ते भरपाई करू शकत नाही!"मी म्हणालो, का? तो म्हणाला, "मी तुम्हाला स्वतः गरीब असताना जे दिले, ते तूम्ही स्वतः श्रीमंत झाल्यावर मला कसे परत देऊ शकता?"बिल गेट्स म्हणाले, मला वाटते की तो सावळा तरुण माझ्यापेक्षा श्रीमंत आहे.*आपल्याला दान करण्यासाठी श्रीमंत असण्याची किंवा श्रीमंत होण्याची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी आपल्यात दानत असायला हवी*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 16 मार्च 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/JNN4WNgxUoQAENsi/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ७६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०१२:सचिन तेंडुलकर यांचे क्रिकेट मध्ये शतकांचे शतक* *२००१:नेल्सन मंडेला यांना राष्ट्रपती के.आर. नारायणन यांच्या हस्ते 'गांधी शांतता पुरस्कार' प्रदान**२०००:हॉकीपटू धनराज पिल्ले आणि मध्य अंतराची धावपटू ज्योतिर्मय सिकदर यांना ’के. के.बिर्ला पुरस्कार’ जाहीर**१९९२:ज्येष्ठ चित्रपट निर्माते व दिग्दर्शक सत्यजित रे यांना ऑस्कर अवार्ड प्रधान**१९७६:इंग्लंडचे पंतप्रधान हेरॉल्ड विल्सन यांनी राजीनामा दिला.**१९६६:अमल कुमार सरकार यांनी भारताचे ८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९४५:दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने तुफानी बॉम्बफेक करून जर्मनीच्या वुर्झबर्ग शहराचा २० मिनीटांत विनाश केला.**१९४३:’प्रभात’चा ’नई कहानी’ हा चित्रपट रिलीज झाला.**१५२८:फत्तेपूर-शिक्री येथे राणा संग व बाबर यांचे घनघोर युद्ध होऊन राणा संग याचा पराभव झाला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७१:राजपाल यादव-- हिंदी चित्रपटांमधील विनोदी अभिनेता**१९६८:अनन्या खरे-- भारतीय टेलिव्हिजन आणि चित्रपट अभिनेत्री**१९६२:बाळू विठोबा श्रीराम-- कवी,लेखक* *१९६२:हरि सखाराम गोखले-- मराठी कवी आणि पुस्तक प्रकाशक**१९६१:किरण वसंत पुरंदरे-- पक्षितज्ज्ञ, निसर्ग अभ्यासक व लेखक* *१९५८:जनरल बिपीन रावत-- भारतीय लष्करातील 'फोर स्टार रँक' धारक जनरल,भारतीय लष्कराचे २६ वे लष्कर प्रमुखदेखील होते.२०२२ साली त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला(मृत्यू:८ डिसेंबर २०२१)**१९४६:मुकुंद धाराशिवकर --ज्येष्ठ लेखक विज्ञान प्रचारक(मृत्यू:१४ फेब्रुवारी २०१६)**१९३९:वामनराव तेलंग-- तरूण भारतचे माजी ज्येष्ठ संपादक,लेखक (मृत्यू:११ जून २०२०)**१९३६:प्रभाकर बर्वे -- आधुनिक भारतीय चित्रकलेचे प्रणेते(मृत्यू:६ डिसेंबर १९९५)* *१९३६:भास्कर चंदावरकर – संगीतकार (मृत्यू:२६ जुलै २००९)**१९३५:प्राचार्य बजरंग शामराव सरोदे -- प्रसिद्ध लेखक* *१९३५:शशिकांत यशवंत गुप्ते -- लेखक* *१९२१:फहाद – सौदी अरेबियाचा राजा (मृत्यू:१ ऑगस्ट २००८)**१९१४:भानुदास श्रीधर परांजपे-- कवी नाटककार(मृत्यू:१९ जानेवारी १९८५)**१९१३:पंढरीनाथ गंगाधर नागेशकर-- हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील ख्यातनाम तबलावादक(मृत्यू:२६ मार्च २००८)**१९०१:प्र.बा.गजेंद्रगडकर – भारताचे ७ वे सरन्यायाधीश (मृत्यू:१२ जून १९८१)**१८७२:काशीनाथ हरी मोडक( माधवानुज)-- केशवसुत संप्रदायातील मराठी कवी(मृत्यू: २ मार्च१९१६)* *१७८९:जॉर्ज ओहम – जर्मन गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू:६ जुलै १८५४)**१७५१:जेम्स मॅडिसन – अमेरिकेचे चौथे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू:२८ जून १८३६)**१७५०:कॅरोलिन हर्षेल – जर्मन-ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ(मृत्यू:९ जानेवारी १८४८)**१६९३:मल्हारराव होळकर – इंदूरच्या राज्याचे संस्थापक,मराठेशाहीतील पराक्रमी सेनापती व मुत्सद्दी (मृत्यू:२० मे १७६६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१३:ॲड.ज्ञानेश्वर महादेव कुलकर्णी-- नामवंत वकील,इतिहासाचे गाढे अभ्यासक, लेखक (जन्म:१३ जून १९३०)* *२०१०:डॉ.दत्ता वाळवेकर-- भारतीय मराठी गायक आणि संगीत दिग्दर्शक(जन्म:३० मार्च१९२८)**२००७:मंजुरूल इस्लाम – बांगला देशचा क्रिकेटपटू (जन्म:४ मे १९८४)* *१९९९:कुमुदिनी पेडणेकर – प्रसिद्ध गायिका* *१९९०:वि.स.पागे – स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी कार्यकर्ते,संत वाङ्मयाचे अभ्यासक, महाराष्ट्र विधानसभेचे सभापती,रोजगार हमी योजनेचे जनक (जन्म:२१ जुलै १९१०)**१९८५:वसंत श्यामराव वरखेडकर-- कादंबरीकार,नाटककार(जन्म:१० सप्टेंबर १९१८)**१९४६:’गान सम्राट’ उस्ताद अल्लादियाँ खाँ – जयपूर -अत्रौली घराण्याचे संस्थापक व कोल्हापूर दरबारचे प्रसिद्ध गायक (जन्म:१० ऑगस्ट १८५५)**१९४५:गणेश दामोदर तथा 'बाबाराव' सावरकर – ’अभिनव भारत’ संघटनेचे संस्थापक (जन्म:१३ जून १८७९)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अंधश्रद्धा कशी नष्ट होईल ?*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यातील सर्व शिक्षकांना आता ड्रेसकोड अनिवार्य, शिक्षणमंत्री केसरकर यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सर्वोच्च न्यायालयाने सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर येत्या शुक्रवारी १९ मार्च रोजी होणार सुनावणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सर्व शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातील प्रत्येक शनिवारी ‘आनंददायी शनिवार’ हा उपक्रम राबविण्याबाबत शालेय शिक्षण विभागामार्फत परिपत्रक जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा झटका, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाची दोन मोठी टेंडर केली रद्द*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबई : राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान निधीत अकरा हजारावरून वीस हजार रुपये अशी भरीव वाढ करण्याचा राज्य शासनाने घेतला निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ज्येष्ठ लेखिका डॉ. अरुंधती खंडकर यांचे निधन : वयाच्या 92 व्या वर्षी सिंगापुरात घेतला अखेरचा श्वास*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *'बारावी फेल' सर्वोत्कृष्ट चित्रपट तर विक्रांत सर्वोत्कृष्ट अभिनेता ; क्रिटिक्स चॉईस पुरस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्टीफन हॉकिंग यांच्या 10 प्रेरणादायी विचारातुन दिवसाची मस्त सुरूवात करूया...स्टीफन हॉकिंग हे जगभरातील अभ्यासकांचे प्रेरणास्ञोत होते. हॉकिंग बोलणारे एक-एक वाक्य हे प्रेरणादायी विचार म्हणून नोंदवल गेल.1) गमती नसतील आयुष्य एक शोकांतिका ठरेल.2) जरी मी हालचाल करू शकत नसलो, मला बोलण्यासाठी काॅम्प्युटरची मदत घ्यावी लागत असली, तरीही मी माझ्या मनातुन मुक्त आहे. 3) नेहमी आकाशातील तार्यांकडे पहा, आपल्या पायाखाली पाहू नका. जे पाहाल त्याचा अर्थ समजण्याचा प्रयत्न करा, कुतूहल जागरूक ठेवा.4) आयुष्य कितीही कठीण असलं तरी, त्यावर तुम्ही मात करू शकताच तुम्ही यशस्वी व्हाल. 5) आपल्याला जे-जे करता येईल ते सर्व करायला हवं. माञ जे आपल्या हातात नाहीच त्याबाबत पश्चाताप करू नये.6) दिव्यांगांना माझा सल्ला आहे, तुम्ही त्या गोष्टीवर लक्ष द्या, ज्या करण्यापासून तुम्हाला तुमच अपंगत्व रोखू शकणार नाही, किंवा तुमचं अपंगत्व त्या आड येणार नाही. लक्षात ठेवा आत्मा आणि शरीर दोन्हीही अपंग होऊ देऊ नका. 7) आक्रमकता मनुष्याची सर्वात वाईट सवय आहे, आक्रमकता सभ्यतेचा नाश करते. 8) कधीही करू शकत नाही, अस काहीही नाही.9) जे आपल्या बुद्ध्यांकाबद्दल/IQ बद्दल दावा करतात, ते अयशस्वी असतात.10) ब्रम्हांडापेक्षा मोठं आणि जुन काहीच नाही..!!*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकत रहा. काय माहित जीवनात कशाची गरज पडेल ?*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) थर्मामीटरमध्ये चमकणारा पदार्थ कोणता ?२) भारतात पहिल्यांदा मतदारांना ओळखपत्रावर छायाचित्र प्रायोगिक तत्त्वावर कोणत्या वर्षी छापण्यात आले ?३) वारकरी संप्रदायाचे दुसरे नाव काय ?४) केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा CAA देशभरात लागू केलेल्या कायद्याला संसदेने कोणत्या वर्षी मंजुरी दिली होती ?५) आपल्या तोंडातील लाळेत किती टक्के क्षार असतात ? *उत्तरे :-* १) पारा २) मे १९६० ( कोलकाता दक्षिण पश्चिम मतदारसंघ पोटनिवडणूक ) ३) विठ्ठल संप्रदाय ४) सन २०१९ ५) एक ते दीड टक्के क्षार*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 डॉ. प्रा. सुरेश तेलंग, यशवंत महाविद्यालय, नांदेड👤 अनिल कांबळे, नांदेड👤 शिवराज भुसेवार, नांदेड👤 शिवम भंडारे, येवती👤 अनिलकुमार जैस्वाल, येताळा👤 कैलास राखेवार, नांदेड👤 साईनाथ बोधनपोड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ॥१॥कस्तुरीमळवट चंदनाची उटी । रुळे माळ कंठीं वैजयंती ॥ध्रु.॥मुगुट कुंडले श्रीमुख शोभलें । सुखाचें ओतलें सकळ ही ॥२॥कासे सोनसळा पांघरे पाटोळा । घननीळ सांवळा बाइयानो ॥३॥सकळ ही तुम्ही व्हा गे एकीसवा । तुका म्हणे जीवा धीर नाहीं ॥४॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मोठे कपडे धुताना जास्त वेळ लागत नाही त्यापेक्षा लहान असलेले कपडे धुवायला जरा जास्त वेळ लागत असतो. तरीही त्यांना आपण स्वच्छ धुण्याचा प्रयत्न करत असतो. तसंच आपल्यात सुद्धा काही क्षुद्र विचार असतील तर त्यांनाही धुवून काढण्याचा प्रयत्न करून बघावे. असे केल्याने आपले मनही स्वच्छ राहील व आपली वेळही वाया जाणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎯🏆 *मोटिव्हेशनल सदर* 🏆🎯 एका गावात एक ज्ञानी विद्वान पंडीत होते. देशातील अनेक हुशार व व्यासंगी पंडीतांमध्ये त्यांच्या ज्ञानाची चर्चा होत असे. शास्त्रार्थामध्ये हुशार असणारे हे पंडीत महाशय एके दिवशी आपल्या घराजवळ राहणा-या लहान मुलांसमवेत खेळत होते. हे पाहून तेथून जाणा-या एका सदगृहस्थाने त्यांना थांबवून विचारले,’’ अहो देशात ज्यांच्या ज्ञानाची चर्चा होते असे तुम्ही पंडीत असूनसुद्धा तुम्ही चक्क लहान काय खेळता आहात?’’ गृहस्थांचे हे बोलणे ऐकून पंडीतजींनी आपला खेळ बंद केला व गृहस्थांना घेऊन ते जवळच्याच एका घरात गेले. त्या घरात एका खुंटीला एक धनुष्य अडकविले होते. त्या धनुष्याकडे बोट दाखवून पंडीतजी म्हणाले, "महोदय, त्या धनुष्याच्या प्रत्यंचेची दोरी सध्या का सोडून ठेवली आहे, याचे कारण तुम्हाला माहित आहे काय? कामाव्यतिरिक्तच्या वेळेसही जर धनुष्याच्या कांबीची दोन्ही टोके जर वाकवून त्या दोरीला बांधून ठेवली तर काही दिवसांनी ती कांबी मोडेल आणि धनुष्याची दोरी खेचायची बंद होईल. परिणामी ते धनुष्य निकामी होईल. त्याचप्रमाणे अखंड लेखन, वाचन व चिंतन करत राहिल्याने बुद्धीवरही प्रचंड ताण येऊन लवकरच बुद्धि थकून ती काम देईनाशी होते. ती तशी होऊ नये म्हणून अधूनमधून मला लहान मुलांमध्ये माझे वय, हुद्दा, बुद्धी विसरून खेळावे लागते."गृहस्थांचे या उत्तराने समाधान झाले. *तात्पर्य :- बुद्धीवर येणा-या प्रचंड ताणापासून सुटका करून घेण्यासाठी थोडावेळ तरी आपल्या छंदाला किंवा परिवाराला वेळ द्यावा ज्याने आपल्या मेंदूला थोडी विश्रांती मिळेल व पुन्हा परिश्रम करण्यास मेंदू तयार होईल.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15 मार्च 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~लेखाची Link - http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_22.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक ग्राहक दिन_**_ या वर्षातील ७५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९०:सोविएत संघाने लिथुआनियाचे स्वातंत्र्य नाकारले.**१९८५:symbolics.com हे internet वरील पहिले डोमेन नेम नोंदले गेले.**१९६१:ब्रिटिश राष्ट्रकुलातून दक्षिण अफ्रिका बाहेर पडली.**१९५९:महिला गृहउद्योग संस्था (लिज्जत पापड) या संस्थेची मुंबईत गिरगाव येथे स्थापना**१९३९:दुसरे महायुद्ध – जर्मनीने झेकोस्लोव्हाकिया गिळंकृत केले.**१९१९:हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठाचे उद्घाटन**१९०६:रोल्स रॉईस (Rolls Royce) कंपनीची स्थापना झाली.**१८७७:इंग्लंड व ऑस्ट्रेलियात पहिला क्रिकेट कसोटी सामना सुरू झाला.**१८३१:मराठीतील पहिले छापील पंचांग विक्रीस उपलब्ध झाले.**१८२७:टोरांटो विद्यापीठाची स्थापना झाली**१८२०:मेन हे अमेरिकेचे २३ वे राज्य बनले**१५६४:मुघल सम्राट अकबर याने हिंदुंवरील जिझीया कर रद्द केला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९४:विक्रम मालन अप्पासो शिंदे -- कवी, लेखक,संपादक* *१९९३:आलिया भट्ट -- भारतीय सिने-अभिनेत्री* *१९८३:धर्मवीर भूपाल पाटील -- कवी, पत्रकार* *१९८३:हनी सिंग-- गायक,गीतकार आणि अभिनेता**१९८२:ऋतुजा देशमुख-- अभिनेत्री* *१९८१:स्वाती गणेश पाटील -- कवयित्री* *१९८०:प्रा.डॉ सारीपुत्र तुपेरे-- प्रसिद्ध कवी,लेखक* *१९७९:डॉ.पोर्णिमा शिरिष कोल्हे-- लेखिका* *१९७९:प्रा.प्रज्ञा मनिष पंडित--लेखिका, कवयित्री,समुपदेशक**१९७८:बबलू विनायकराव कराळे -- कवी, कथाकार* *१९६५:डॉ.अंजुषा अनिल पाटील-- लेखिका* *१९६५:पोपटराव काळे-- प्रसिद्ध काजवाकार, निवृत्त शिक्षणाधिकारी* *१९६१:गोविंद हरीभाऊ सालपे -- कवी* *१९६०:दशरथपंत नारायणराव अतकरी-- कवी* *१९५४:ईला अरुण-- अभिनेत्री,टीव्ही व्यक्तिमत्त्व आणि राजस्थानी लोकसंगीत आणि लोकसंगीत-पॉप गायिका**१९५०:डॉ.अशोक चौसाळकर -- प्रसिद्ध लेखक,संपादक* *१९४४:पुंडलिक भाऊराव गवांदे-- प्रसिद्ध विज्ञान लेखक**१९३५:लक्ष्मण त्र्य.जोशी -- प्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार,लेखक* *१९३४:कांशीराम -- भारतीय राजकारणी बहुजन समाज पक्षाचे संस्थापक (मृत्यू:९ ऑक्टोबर२००६)**१९३४:गजमल माळी-- लेखक,कवी व नाटककार(मृत्यू:२८ फेब्रुवारी २०१७)**१९२३:मीरा देव बर्मन -- भारतीय वित्त गीतकार आणि संगीतकार(मृत्यू:१५ ऑक्टोबर २००७)**१९१५:त्र्यंबक गोविंद माईणकर--भाषातज्ज्ञ, लेखक(मृत्यू:१७ सप्टेंबर १९८१)**१९१५:ह.वि.पळणीटकर-- विदर्भातील एक नाटककार,कवी व लघुकथालेखक (मृत्यू:२८ जानेवारी १९९४)**१९०१:विजयपाल लालाराम तथा ’गुरू हनुमान’ – पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते कुस्ती प्रक्षिशक (मृत्यू:२४ मे १९९९)**१८६८:हरिश्चंद्र सखाराम भातावडेकर-- ज्यांना सेव्ह दादा म्हणूनही ओळखले जाते,ते भारतात चित्रपट बनवणारे पहिले भारतीय होते(मृत्यू:२० फेब्रुवारी १९५८)**१८६०:डॉ.वाल्डेमर हाफकिन – प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लशीचा शोध लावणारे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (मृत्यू:२६ आक्टोबर १९३०)**१७६७:अँड्र्यू जॅक्सन – अमेरिकेचे ७ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू:८ जून १८४५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२०:इम्तियाज खान-- भारतीय अभिनेता(जन्म:१५ ऑक्टोबर १९४२)**२०१९:श्रीधर उपाख्य अप्पासाहेब इंदूरकर-- संगीताच्या अभ्यासकांचे ज्येष्ठ मार्गदर्शक,जेष्ठ संगीततज्ञ (जन्म:२७ मार्च)* *२०१६:नीळकंठ पुरुषोत्तम जोशी-- आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विद्वान आणि भारतीय मूर्तिशास्त्राचे गाढे अभ्यासक(जन्म:१६ एप्रिल १९२२)**२०१६:शंकर भाऊ साठे--कादंबरीकार आणि शाहीर( जन्म:१६ आक्टोबर १९२५)**२०१५:नारायणभाई महादेवभाई देसाई-- गांधी कथाकार (जन्म:१९२४)**२०१५:मधुकर अरकडे -- ज्येष्ठ कवी-गीतकार(जन्म:१५ एप्रिल १९५२)**२०१४:सुधीर मोघे -- मराठी कवी,गीतकार व संगीतकार (जन्म:८ फेब्रुवारी १९३९)**२०१३कल्लम अंजी रेड्डी_ फार्मास्युटिकल उद्योगातील एक भारतीय उद्योजक (जन्म:१ फेब्रुवारी १९३९)**१९९२:डॉ.राही मासूम रझा – हिन्दी व ऊर्दू कवी,गीतकार व शायर (जन्म:१९२५)**१९३७:व्यंकटेश बळवंत ऊर्फ बापूराव पेंढारकर – रंगभूमीवरील अभिनेते व गायक (जन्म:१० डिसेंबर १८९२)**१८६५:गोविंद नारायण माडगांवकर--- मराठी लेखक(जन्म:१८१५)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्मार्टफोनचा विळखा, वेळीच ओळखा*अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. पण कालांतराने या मूलभूत गरजामध्ये अजून कांही वस्तूची वाढ होत गेली त्यात प्रामुख्याने मोबाईलचा समावेश करणे अगत्याचे आहे. आज माणसाला एक वेळ अन्न, वस्त्र किंवा निवारा यांची कमतरता असेल तर चालून जाईल मात्र खिशात मोबाईल नसेल तर ती व्यक्ती जिवंत राहू .............. पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम स्वनिधी योजनेच्या एक लाख विक्रेत्यांना कर्ज वितरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *लोकसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून ज्ञानेश कुमार आणि बलविंदर संधू या दोन अधिकाऱ्यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *काँग्रेस पक्षाकडून शेतकऱ्यांना मोठी आश्वासनं; राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना दिली MSPकायद्यासह ५ गॅरंटी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते फुलंब्री इथं विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुण्यात शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला निलेश लंके उपस्थित*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क इथं रेल्वे टर्मिनल सेवांच्या संचालन परीक्षणाचा प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *मुंबईने रणजी चषक जिंकला, विदर्भावर मात, 42 व्या जेतेपदावर नाव कोरलं!*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 बिग बँग / महास्फोट📙 जॉर्ज एडवर्ड लेमेत्रे या बेल्जियन अॅस्ट्रोफिजिसिस्टकडे बिग बँग वा महास्फोटाची कल्पना मांडण्याचे पहिले श्रेय त्यांच्याकडे जाते. १८९४ साली जन्मलेल्या या शास्त्रज्ञांनी १९२७ मध्ये ही कल्पना मांडली. या कल्पनेबद्दल विविध विचार त्यांनंतर तब्बल १० वर्षे मांडले जात होते.'साऱ्या विश्वाची उत्पत्ती एका महास्फोटामध्ये अंदाजे वीस अब्ज वर्षांपूर्वी झाली असून सर्व विश्वात सध्या विखुरलेले मूलकण एका अंडाकृती आकारात होते. त्यांचा अचानक महाप्रचंड स्फोट झाला. या स्फोटामुळे एकत्र असलेले मूलकण विलक्षण वेगाने, विलक्षण तप्तावस्थेत चहूकडे भिरकावले गेले. जसजसा यानंतरचा काळ लोटत गेला, तसतसे हे मूलकण हळूहळू गार होत गेले. त्यातूनच प्रथम विविध तारकासमूह निर्माण होत गेले. आपली आकाशगंगा ही या अनेकांतील एक. त्यानंतर आजही विश्व पसरतच असून ही क्रिया अव्याहत चालू राहणार आहे. महास्फोटाची कल्पना थोडक्यात अशी मांडली गेली.ही कल्पना मांडली गेल्यानंतर त्यावर विविध मते मांडली जाणे ओघानेच आले. काहींना ही कल्पनाच पूर्णत: विसंगत वाटत होती, तर काहींच्या मते ठरावीक कालांतराने विश्व आकुंचन पावून पुन्हा एकदा महास्फोट होण्याची प्रक्रिया सतत चालू राहणार होती. याशिवाय विश्व हे उत्पत्तीनंतर पसरत नसून एका 'कायमस्थिती'त असल्याचीही एक उपपत्ती जोरदारपणे मांडली जात होती. निरीक्षणे व सिद्धांत या दोन्हींच्या आधारावर ही चर्चा तब्बल तीस वर्षे चालू होती.यानंतरच्या अवकाश निरीक्षण व रेडिओलहरींच्या ग्रहणानंतर विश्व अफाटपणे पसरत आहे, हे लक्षात येत आहे. डॉपलर इफेक्ट म्हणजे दृश्य प्रकाशाच्या वर्णपटातल्या रेषा लाल / निळ्या टोकाकडे सरकलेल्या दिसतात. याचाही पडताळा आता मिळत आहे. अनेक आकाशगंगा लालसर रंगाचा प्रकाशलहरींचे तरंग पाठवत असल्याने विश्व पसरतच आहे, याची खात्री पटत आहे.संपूर्ण विश्वात पसरलेल्या अणूंची एका घनमीटरमध्ये असलेली संख्या हाही एक अभ्यासाचा व निष्कर्षांचा भाग मानला गेला आहे. अलीकडेच झालेल्या एका निरीक्षणात ही घनता जेमतेम एक अणू एका घनमीटरमध्ये एवढीच आहे; पण याहून जास्त अदृश्य पदार्थ अस्तित्वात असावेत.महास्फोटानंतरच्या पहिल्या काही मिनिटांतच विश्वात पसरलेल्या मूलकणांतून हेलियमचे अणू निर्माण झाले होते, हे गणित प्रथम १९४६ साली जॉर्ज गॅमी यांनी मांडले. आज विश्वात व आपल्या आकाशगंगेतील ग्रहांभोवती असलेल्या हेलियमचे प्रमाण २३ टक्के व अन्य मुलकणांचे ७७ टक्के (यात बव्हंशी हायड्रोजन) आढळते. यावरूनही महास्फोटाची कल्पना ग्राह्य मानावी लागते.महास्फोटानंतरच्या क्षणात प्रचंड प्रमाणात (रेडिएशन) होते व त्याचे तापमान अब्जाहून जास्त होते. प्रसरणामुळे थंडावत जाऊन आज त्याची ऊर्जा कमी झाली व तापमानही पुष्कळ कमी झाले असणारच, असा तर्क राल्फ अाल्फर व रॉबर्ट हर्मन या गॅमाँच्या सहकाऱ्यांनी १९४८ मध्ये मांडला होता. त्याची पुष्टी १९६५ मध्ये आर्नो पेंझियस व रॉबर्ट विल्सन या शास्त्रज्ञांना सापडलेल्या सूक्ष्म तरंगांच्या पार्श्वभूमीतून झाली, असा महास्फोट सिद्धांताच्या समर्थकांचा दावा आहे. या तरंगांचे तापमान शून्याखाली २७० अंश सेंटीग्रेड इतके कमी आहे.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) सर्वप्रथम ओळखपत्रावर मतदारांचे छायाचित्र छापण्याचा प्रस्ताव कोणत्या साली पुढे आला ?२) सरकारी दस्तऐवजामध्ये वडीलाच्या आधी आईचे नाव लावण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने घेतला आहे ?३) DRDO ने स्वदेशी बनावटीच्या कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे ?४) पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे कोणते नाव ठेवण्यास मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आली ?५) ९६ व्या ऑस्कर पुरस्कार २०२४ मध्ये 'ओपेनहायमर' या सर्वोत्कृष्ट चित्रपटाला एकूण किती पुरस्कार मिळाले आहेत ?*उत्तरे :-* १) सन १९५८ २) महाराष्ट्र ३) अग्नि ५ ४) राजगड ५) सात*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 विलास फुटाणे, प्रकाशक, औरंगाबाद👤 राजेंद्र महाजन, सहशिक्षक, औरंगाबाद👤 गणेश गिरी, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद👤 बालाजी मामीलवाड👤 लक्ष्मीकांत धुप्पे👤 अंबादास पवार👤 लक्ष्मण चिंतावार, धर्माबाद👤 शुभम सांगळे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥१॥गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देईं मज प्रेम सर्व काळ ॥ध्रु.॥विठो माउलिये हा चि वर देईं । संचरोनि राहीं हृदयामाजी ॥२॥तुका म्हणे कांहीं न मागे आणीक । तुझे पायीं सुख सर्व आहे ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्यात असलेल्या कलागुणांनामुळे उशीरा का होईना आपली ओळख होत असेल तर चांगली गोष्ट आहे. पण,त्याच कलेचा दुरूपयोग करून नको ती वाट निवडल्याने मात्र त्या असणाऱ्या कलेचा कुठेतरी अपमान होत असतो. त्याविषयी सहसा आपल्याला कळत नाही. म्हणून असं होण्याआधीच त्या सर्वांना आधी वाचणे गरजेचे आहे. अशी व्यर्थ चूक आपल्या हातून होणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकदा सून आणि मुलगा बेडरूम मध्ये बोलत असताना आईच लक्ष जातं, मुलगा - "आपल्या job मुळेआईकडे लक्ष देता नाही येणार गं,तिचं आजारपण आणि देखभालकोण करेल......?" त्यामुळे आपण वृद्धाश्रमात ठेवलं तर तिच्याकडे लक्ष सुद्धा देतील ते "त्यावर त्याच्या बायकोचे उत्तर ऎकून आईच्या डोळ्यात पाणी आले.........सून - "पैसे कमवण्यासाठी पूर्ण जन्म बाकी आहे ऒ, पण आईंची माया किती कमवली तरी कमी आहे, त्यांना पैश्यापेक्षा आपल्यासहवासाची गरज आहे, मी जर job नाही केला तरी जास्त नुकसान होणार नाही.मी आईंजवळ थांबेन. घरी tution घेईन, त्यामुळे आईं जवळही राहता येईल. विचार करा लहानपणी बाबा नसूनही घरकाम करून तुम्हाला आईने वाढवलंय. त्यांनी तेंह्वा कधी शेजारच्या बाईकडे सुद्धा तुम्हाला ठेवल नाही, कारण तुमच्याकडे व्यवस्थित लक्ष देणार नाहीत म्हणून, आणि तूम्ही आज हे असंबोलताय...? तूम्ही कितीही म्हणा पण आई आपल्या जवळच राहतील, अगदी शेवटपर्यंत " सुनेने दिलेल्या उत्तरामुळे आई खूप रडते आणि बाहेरच्या खोलीत येउन देवा जवळ उभी राहते . . .आई देवाऱ्यापुढे उभी राहून त्याचे आभार मानते आणि म्हणते," देवा मला मुलगी नव्हती म्हणूनखूप भांडली रे मी तुझ्याशी, पण ही भाग्यलक्ष्मी दिल्याबद्दल तुझे आभार कसे मानू मी.....?" खरच देवा सार्थक केलस माझ आयुष्य अशी सुन देऊन.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 14 मार्च 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/9cWGZ4rVLAhzgEBu/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ७४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०१०:ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ.एस.एल. भैरप्पा यांच्या हस्ते 'लोकसंस्कृती'चे उपासक आणि संशोधक डॉ.रा.चिं.ढेरे यांना 'पुण्यभूषण पुरस्कार' पुण्यात देण्यात आला.**२००१:चोकिला अय्यर यांनी भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्रसचिव म्हणून सूत्रे हाती घेतली**२००१:व्ही.व्ही.एस. लक्ष्मणने ईडन गार्डन या मैदानावरील सर्वोच्च धावांचा सुनील गावसकरचा विक्रम मोडला. तसेच एका डावात ४४ चौकार मारण्याच्या डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी केली.**२०००:कलकत्ता येथील ’टेक्निशियन आय’ हा देशातील सर्वात जुना स्टुडिओ आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.**१९९५:महाराष्ट्राचे १२ वे मुख्यमंत्री म्हणून भाजपा सेना युतीचे मनोहर जोशी यांचा शपथविधी**१९९०:आकाश या क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण* *१९५४:दिल्ली येथे साहित्य अकादमीची स्थापना झाली.**१९३१:’आलम आरा’ हा पहिला भारतीय बोलपट मुंबईतील नॉव्हेल्टी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७४:रोहित शेट्टी-- यशस्वी भारतीय चित्रपट दिग्दर्शक* *१९७२:प्रा.डॉ.संगिता गणपतराव घुगे-- लेखिका**१९६५:आमिर खान _ भारतीय प्रसिद्ध अभिनेता,निर्माता व दिग्दर्शक**१९६३:पंडित रघुनंदन पणशीकर-- जयपूर घराण्याचे शास्त्रीय गायक* *१९५८:संध्या रमेश पुजारी -- कवयित्री* *१९५४:पांडुरंग डोमाजी कांबळे -- लेखक,कवी* *१९५३:अरुण कृष्णाजी कांबळे-- मराठी साहित्यातील चिकित्सक लेखक-संशोधक व साहित्याचे गाढे अभ्यासक(मृत्यू:२० डिसेंबर २००९)**१९५१:सुनील चिंचोळकर --समर्थ रामदास स्वामी यांचे विचार लेखणी आणि प्रवचनांद्वारे जनमानसांपर्यंत पोहोचवणारे(मृत्यू:२२ एप्रिल २०१८)**१९४८:प्रा.अरुणकुमार भागवत पाटील-- कवी,लेखक* *१९४६:माधव मुरलीधर देशपांडे--संस्कृत व प्राकृत भाषातज्ज्ञ**१९४२:अरुण निगवेकर-- भौतिकशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ,पुणे विद्यापीठाचे कुलगुरू,विद्यापीठ अनुदान आयोगाचे (UGC) अध्यक्ष(मृत्यू:२३ एप्रिल २०२१)**१९४०:चंद्रशेखर अर्जुन टिळेकर-- लेखक**१९३६:प्रभाकर गोविंद विद्यासागर-- लेखक* *१९३४:मीना सुधाकर देशपांडे-- आचार्य प्र.के.अत्रे यांच्या कन्या.प्रसिद्ध लेखिका(मृत्यू:६ सप्टेंबर २०२०)**१९३१:प्रभाकर पणशीकर –मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध अभिनेते,दिग्दर्शक आणि नाट्यनिर्माते (मृत्यू:१३ जानेवारी २०११)**१९१५: रामचंद्र शेवडे-- बालसाहित्यिक (मृत्यू:२ डिसेंबर २००१)**१९१३:श्रीनाथ त्रिपाठी-- भारतीय संगीतकार(मृत्यू:२८ मार्च१९८८)**१९०८:गणपत खंडेराव पवार -- कादंबरीकार,पत्रकार* *१८७९:अल्बर्ट आइनस्टाईन – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन-अमेरिकन भौतिकशात्रज्ञ (मृत्यू:१८ एप्रिल १९५५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८:स्टीफन विल्यम हॉकिंग-- सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आणि विश्वशास्त्रज्ञ(जन्म:८ जानेवारी १९४२)**२०१०:गोविंद विनायक तथा 'विंदा' करंदीकर – सुप्रसिद्ध लेखक,कवी,लघुनिबंधकार व टीकाकार.देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा एकोणचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना ’अष्टदर्शने’ या साहित्यकृतीसाठी प्रदान करण्यात आला.(जन्म:२३ ऑगस्ट १९१८)**२००३:सुरेश भट-- सुप्रसिद्ध कवी,गझल सम्राट' (जन्म:१५ एप्रिल १९३२)**१९९८:दादा कोंडके – प्रसिद्ध अभिनेते,निर्माते,दिग्दर्शक,संवादलेखक (जन्म:८ ऑगस्ट १९३२)**१९९६:इंदुमती रामकृष्ण शेवडे--कथाकार, कादंबरीकार,प्रवासवर्णनकार,संशोधक, समीक्षक(जन्म:१६ ऑक्टोबर १९१७)**१९३२:जॉर्ज इस्टमन – अमेरिकन संशोधक व इस्टमन कोडॅक कंपनीचे संस्थापक (जन्म:१२ जुलै १८५४)**१८८३:कार्ल मार्क्स – जर्मन तत्त्वज्ञ व कम्युनिझमचे प्रणेते (जन्म:५ मे १८१८)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जीवन गाणे - आनंदी तराणे*चित्रपटातील गाणे असो वा इतर कोणतेही गाणे कुणाला आवडत नाहीत. लहानापासून थोरांपर्यंत सर्वांनाच गाणे खूप आवडतात. मुळात मनुष्य लहानाचा मोठा होता ते गाणे ऐकतच. गाण्याचा आणि माणसाच्या आयुष्याचा फार जवळचा संबंध आहे. बाळाला छान झोप लागावी म्हणून आई छानशी अंगाई गीत गात असते जसे की निंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई ........... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *भाजपची दुसरी यादी जाहीर:महाराष्ट्रातील 20 उमेदवारांच्या नावांचा समावेश; बीडमधून पंकजा मुंडे, नागपूरमधून गडकरी तर नांदेडमधून चिखलीकर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अहमदनगर शहराचे तसेच जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे भूमीपूजन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ऑनलाईन उपस्थिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *येवल्यातील शेतकऱ्यांना दिलासा, 63 हजार शेतकऱ्यांना 63 कोटींची दुष्काळी मदत*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत १८७ इंटरसेप्टरचे लोकार्पण*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधींची सभा नागपूरमध्ये येत्या 15 ते 17 मार्च दरम्यान होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *हरमित सिंग ठरला 'महाराष्ट्र श्री' शरीरसौष्ठव स्पर्धेचा मानकरी तर उमेश गुप्ता ठरला उपविजेता*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••☀ *उष्माघात म्हणजे काय ?* ☀ भारतामध्ये काही भागात तापमान ४९ सेल्सियस इतके जास्त असू शकते. उन्हाळ्यामध्ये दरवर्षी अनेक लोक उष्माघाताने वा या उच्च तापमानामुळे मरण पावतात. राजस्थान, ओरिसा तसेच महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाड्यातही उष्माघाताने मृत्यू होतात. उष्माघात याचा सोपा अर्थ उष्णतेचा आघात वा त्रास असा होतो. यात खूप ताप येणे, घाम न येणे, चक्कर येणे, लघवी न होणे, बेशुद्धी येणे अशी लक्षणे दिसून येतात. प्रसंगी मृत्यूही होतो. अति उष्णतेने शरीरातील प्रथिनांवर दुष्परिणाम होतात व पेशीमधील जीवनप्रक्रिया थांबते. शरीरातील सर्व पेशींमध्ये असेच होते व बहुतेक वेळा मेंदू सूज होऊन व्यक्ती मरते. आधी रुग्णास चक्कर येते, झटके येतात व दम लागतो. कधी कधी हृदयविकाराचा झटकाही येतो.उष्माघातावर तात्काळ उपचार करणे आवश्यक ठरते. रुग्णाला सावलीत नेऊन त्याच्या अंगावर ओली चादर टाकावी व त्याला वारा घालावा. थंडगार पाण्यात त्याला उभे केले तर फारच चांगले. रक्ताभिसरण सुधारण्यासाठी त्याचे हातपाय चोळावेत. त्याला क्षार व पाणी द्यावे. (लिंबू सरबत वैगरे पदार्थ) असे उपचार लवकर सुरू झाल्यास व्यक्ती बचावते. अन्यथा मृत्यू येण्याची शक्यता खूप जास्त असते. उष्माघात टाळण्यासाठी उन्हात जास्त वेळ फिरू नये, फिरायचे असल्यास डोक्यावर टोपी घालावी व पांढरे फडके बांधावे, थंडगार पाणी वारंवार प्यावे, वारंवार तोंड गार पाण्याने धुवावे. असे केल्याने उष्माघाताची शक्यता कमी करता येईल.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन 👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी नेहमी उशिरा मिळतात... फक्त आपल्यात सहनशीलता पाहिजे.**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिल्या नॅशनल क्रिएटर अवॉर्डमध्ये *'कल्चरल अम्बेसिडर ऑफ दि अवॉर्ड'* कोणाला मिळाला आहे ?२) ऑस्कर २०२४ च्या पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे ?३) मोबाईल उत्पादनाच्या बाबतीत जगात भारत देश कितव्या क्रमांकावर आला आहे ?४) सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला उपग्रह नाहीत ?५) तापी नदीचा उगमस्थान कोणत्या ठिकाणी आहे ? *उत्तरे :-* १) मैथिली ठाकूर २) ओपेनहायमर ३) दुसऱ्या ४) बुध व शुक्र ५) मुलताई, बैतूल जिल्हा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संजय भोसले, नांदेड👤 डॉ. प्रशांत मुदकोंडवार, नांदेड👤 किरण सोनटक्के👤 उत्तम सोनकांबळे👤 पार्थ पवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥१॥तुळसीचे हार गळां कासे पीतांबर । आवडे निरंतर तें चि रूप ॥ध्रु.॥मकरकुंडलें तळपती श्रवणीं । कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥२॥तुका म्हणे माझें हें चि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जी व्यक्ती परिस्थितीवर मात करून हिंमतीने जगत असते तिला कशाचीही भीती वाटत नाही व कोणासमोरही न घाबरता परखडपणे बोलण्याचा प्रयत्न करत असते. कारण त्या परिस्थितीत असताना सुद्धा तिला जे, अनुभव आलेले असतात तेच अनुभव आधार बनून मार्गदर्शन करत असतात म्हणूनच म्हणतात ना की, अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो. आपणही त्या गुरूचे सदैव स्मरण करावे व पुन्हा एकदा नव्याने जगण्याचा प्रयत्न करावे कारण जीवन हे अनमोल आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *निश्चय*एका राजाजवळ एक हत्ती होता. तो त्याला अत्यंत प्रिय होता. तो हत्ती स्वामीभक्त असण्याबरोबरच चांगला योद्धा होता. जेंव्हा केंव्हा राजाने त्याच्यावर बसून युद्ध केले तेंव्हा राजा त्यात विजयी झाला. काही काळ लोटल्यानंतर हत्ती वृद्ध होत चालला त्यामुळे राजाने त्याला युद्धात घेवून जाणे बंद केले. मात्र राजाचे त्या हत्तीवरचे प्रेम काही कमी झाले नाही. एके दिवशी तो हत्ती सरोवरामध्ये पाणी पीत होता. सरोवरामध्ये पाणी कमी होते त्यामुळे हत्ती पुढेपुढे गेला आणि दलदलीत फसला.वृद्धावस्थेमुळे हत्तीला दलदलीतून निघणे शक्य नव्हते, त्यामुळे तो जोरजोरात ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून माहूत त्याच्याकडे धावत आले, परंतु सरोवरातून त्याला बाहेर काढणे कुणालाही जमेना. तेंव्हा त्यांनी त्याच्या शरीराला भाले टोचायला सुरुवात केली. कारण भाल्याच्या टोचण्याने तो सर्व शक्तीनिशी प्रयत्न करेल आणि बाहेर येईल, पण हत्ती बाहेर येऊ शकला नाही. भाल्याच्या टोचण्याने हत्तीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. राजापर्यंत हि वार्ता गेली. त्याने तत्काळ त्या हत्तीच्या जुन्या आणि अनुभवी माहुताला बोलावणे पाठविले. माहूत आला, राजा शेजारीच उभा होता.त्याने राजाला असा सल्ला दिला, ”महाराज! तत्काळ युद्धाचे नगारे वाजवा, सैन्य या सरोवराभोवती गोळा करा, आक्रमणाच्या घोषणा सैनिकांना द्यायला सांगा.” राजाने त्याचे म्हणणे ऐकले आणि युद्धाचे नगारे वाजविण्याचा हुकुम दिला. मग काय म्हणता, नगारे वाजू लागले, सैनिकांच्या रांगा शिस्तबद्धपणे लागल्या, आक्रमणाच्या घोषणा ऐकू येवू लागल्या. त्याबरोबर हत्तीच्या अंगात वीरश्री संचारली आणि तो त्या दलदलीतून बाहेर पडला. त्याचे मनोबल हे युद्धासाठी तयार झाले होते. राजाने जुन्या माहुताचे आभार मानले आणि बक्षीस दिले.नशीब जर काही ‘अप्रतिम’ देणार असेल तर त्याची सुरुवात ‘अशक्य’ गोष्टीने होते….!🚀•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 13 मार्च 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/ng6uEjq2Rr24Kx52/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ७३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००७:वेस्ट इंडीजमधे ९ व्या क्रिकेट विश्वकरंडक क्रिकेटस्पर्धेचे उद्घाटन झाले.**१९९९:जलाशयाच्या तळाला भोक पाडून त्यातील पाणी बोगद्याच्या साह्याने भूमिगत जलविद्युतगृअहात नेऊन त्याद्वारे वीजनिर्मिती करणार्या (Lake Tapping) आशिया खंडातील पहिल्या प्रयोगाच्या कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याचे उद्घाटन**१९९७:मदर तेरेसा यांचे वारस म्हणून कोलकात्यातील ’मिशनरीज ऑफ चॅरिटीज’ ने सिस्टर निर्मला यांची नियुक्ती केली.**१९६३:असामान्य क्रीडा नैपुण्यासाठी अर्जुन अवार्ड देणे सुरू* *१९४०:अमृतसर येथील जालियनवाला बाग हत्याकांडाचे समर्थन करणारे पंजाबचे गव्हर्नर मायकेल ओडवायर यांची उधमसिंग यांनी गोळया घालून हत्या केली.**१९३०:क्लाईड डब्ल्यू. टॉमबॉग या शास्त्रज्ञाने प्लूटो ग्रह शोधल्याचे हारवर्ड कॉलेज येथील वेधशाळेला कळवले. मात्र या ग्रहाचा शोध त्याला १८ फेब्रुवारी १९३० या दिवशीच लागला होता.**१९१०:पॅरिसहुन लंडनला येताच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अटक झाली.**१७८१:विल्यम हर्षेल याने युरेनसचा शोध लावला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७८:अनुषा रिझवी-- चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक**१९७४:नितीन राजेंद्र देशमुख-- प्रसिद्ध कवी, गझलकार,लेखक**१९६८:श्रीकांत पांडुरंग चौगुले-- प्रसिद्ध लेखक**१९५८:अश्विनी अनिल कुलकर्णी-- लेखिका* *१९५७:ऋतुजा चैतन्य माने -- कवयित्री, लेखिका* *१९५६:लोकनाथ यशवंत-- मराठी भाषेतील आंबेडकरवादी विचारांची प्रेरणा असलेले कवी, व दलित विश्वाचा नवा पैलू प्रकट करणारे मराठीतले लेखक**१९५१:यशोधरा पोतदार-साठे-- मराठी कवयित्री* *१९४६:जनार्दन कृष्णाजी पाटील (मगर)-- लेखक,समाजकार्य**१९४६:शकुंतला गंगाधर सोनार -- कवयित्री, लेखिका* *१९४६:अभिलाष-- सुप्रसिद्ध गीतकार 'इतनी शक्ति हमें देना दाता' (मृत्यू:२७ सप्टेंबर २०२०)**१९४६:श्रीराम विनायक साठे--ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आणि लेखक(मृत्यू:२५ सप्टेंबर २०२३)**१९४३:प्रा.वामन सुदामा निंबाळकर--कवी विचारवंत व लेखक (मृत्यू:३ डिसेंबर २०१०)**१९४०:प्रा.डॉ.हेमा साने -- लेखिका* *१९३६:डॉ.वनमाला पानसे -- कवयित्री, लेखिका* *१९३३:सुलोचना चव्हाण --- मराठी गायिका, लेखिका (मृत्यू:१० डिसेंबर २०२२)**१९२६:रविन्द्र पिंगे –ललित लेखक (मृत्यू:१७ आक्टोबर २००८)**१९२६:लीला भालचंद्र गोळे-- संतांवर परिचयात्मक पुस्तके लिहिणाऱ्या मराठी लेखिका**१९०१:केशव बाबूराव लेले -- मूर्तिकार,हलत्या चित्रांचे प्रदर्शनकार व कलाप्रसार.(मृत्यू:५ जानेवारी १९४५)**१८९३:डॉ.वासुदेव विष्णू मिराशी – महामहोपाध्याय,संस्कृत विद्वान,आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय प्राच्यविद्यासंशोधक (मृत्यू:३ एप्रिल १९८५)**१८८१:दत्तात्रय विष्णू आपटे--इतिहास संशोधक,संपादक(मृत्यू:२७ ऑक्टोबर १९४३)**१७३३:जोसेफ प्रिस्टले – इंग्लिश रसायनशास्रज्ञ (मृत्यू:६ फेब्रुवारी १८०४)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१७:प्रा.मालतीबाई किर्लोस्कर-- प्रसिद्ध लेखिका (जन्म:१९२३)**२००४:उस्ताद विलायत खाँ – सतारवादक (जन्म:२८ ऑगस्ट १९२८)**१९९६:शफी इनामदार –अभिनेते व नाट्यनिर्माते (जन्म:२३ आक्टोबर १९४५)**१९९३:डॉ.मधुकर(मधू) शंकर आपटे--ज्येष्ठ रंगकर्मी व चित्रपट अभिनेते (जन्म:१ मार्च १९१९)**१९९४:श्रीपाद यशवंत कोल्हटकर – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व 'सिटू' या कामगार संघटनेचे लढवय्ये नेते**१९६७:सर फँक वॉरेल – वेस्ट इंडिजचे क्रिकेट खेळाडू (जन्म:१ऑगस्ट १९२४)**१९५९:गंगाधर भाऊराव निरंतर-- कादंबरीकार,ललित लेखक(जन्म:१५ जून १९०६)**१९५५:वीर विक्रम शाह ’त्रिभुवन’ – नेपाळचे राजे (जन्म:२३ जून १९०६)**१९०१:बेंजामिन हॅरिसन – अमेरिकेचे ३३वे राष्ट्राध्यक्ष (जन्म:२० ऑगस्ट १८३३)**१८९९:दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ ’कवी दत्त’--अर्वाचीन मराठी कवी(जन्म:२७ जून १८७५)**१८००:बाळाजी जनार्दन भानू उर्फ 'नाना फडणवीस' (जन्म:१२ फेब्रुवारी १७४२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••* जिल्हा परिषद शाळा कात टाकतंय ...... *जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळा म्हटले की, प्रत्येकांच्या डोळ्यासमोर एक वेगळेच चित्र उभे राहते. ज्या चित्रात त्या शाळाची, तेथील परिसराची, शिक्षकांची आणि विद्यार्थ्याच्या बाबतीतचे चित्रण भयानक दिसून येते. या शाळांची स्थिती कधीच सुधारणार नाही, अशी धारणा प्रत्येकाची बनलेली आहे. या शाळांत फक्त गरिबांची मुलेच शिकतात म्हणून यास गरिबांची शाळा असे सुध्दा संबोधले जाते............ ..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंढरपुरातील विठ्ठलाचं चरणस्पर्श दर्शन दीड महिन्यांसाठी बंद, गाभाऱ्याच्या कामासाठी विठुरायाची मूर्ती अनब्रेकेबल पेटीत ठेवणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महाराष्ट्रातील पहिल्याच सभेत राहुल गांधींची गर्जना, सत्तेत आल्यास जातीय जनगणनेची हमी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचा राजीनामा, भाजप-जननायक जनता पार्टी युती तुटली, भाजपचे नायब सिंग सैनी यांची नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *दिल्लीत शिंदेंची मोठी डील; मुंबईत 6 पैकी 5 जागा भाजपच्या पारड्यात पडल्याची चर्चा, सेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकरांचा पत्ता कट होण्याची चिन्हं*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *वसंत मोरे यांचा राजीनामा, मनसेच्या फायरब्रँड नेत्याचा राज ठाकरेंना जय महाराष्ट्र!*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *करीरोडचं नाव लालबाग, सॅण्डहर्स्ट रोडचं डोंगरी, कॉटन ग्रीनचं काळाचौकी; मुंबईतील 8 रेल्वे स्थानकांची नावे बदलणार ?*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *रणजी फायनलवर मुंबईची पकड घट्ट, मुशीरचं शतक, रहाणे-अय्यरची अर्धशतकं, विदर्भापुढे 538 धावांचे आव्हान*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••☀ *उन्हात काम करणारा माणूस का काळवंडतो ?* ☀उन्हात काम करणारा माणूस, तसेच भारतासारख्या उष्ण कटिबंधातील व्यक्ती सामान्यतः सावळी वा काळी असते. मेलॅनिन नावाचे रंगद्रव्य आपल्या त्वचेत असते आणि ते व्यक्तीस सावळा, काळा, गोरा इत्यादी रंग देते. या रंगद्रव्याचे प्रमाण कमी असल्यास व्यक्ती गोरी असते. हे प्रमाण अधिक असल्यास व्यक्ती सावळी वा काळी होते. सूर्यप्रकाशातील अतिनील किरणे ही त्वचेस हानिकारक असतात. त्यामुळे या किरणांपासून संरक्षण त्वचेतील रंगद्रव्य करत असते.उन्हात काम करणाऱ्या व्यक्तीच्या त्वचेचे अतिनील किरणांपासून संरक्षण करण्यासाठी मेलॅनिन हे रंगद्रव्य वाढावयास लागते. वाढलेल्या या मेलॅनिनमुळे ती व्यक्ती पूर्वीपेक्षा काळवंडलेली दिसते आणि उन्हात वावरणे कमी झाल्यावर रंग पूर्ववत होतो.युरोप, ऑस्ट्रेलियासारख्या शीत कटिबंधातील व्यक्तींमध्ये मेलॅनिन रंगद्रव्य अत्यल्प प्रमाणात असल्याने त्यांच्यामध्ये त्वचेच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त असते. अतिनील किरणांचा प्रभाव टाळण्यासाठी म्हणूनच क्रिकेटपटू उन्हात खेळताना चेहऱ्याला संरक्षक मलम लावतात. भारत, श्रीलंका अशा उष्ण कटिबंधातील देशांमध्ये खेळायला येणारे गोरे खेळाडू अशी मलमे लावून (तोंडावर रंगरंगोटी करून !) खेळताना तुम्ही दूरदर्शनवर नक्कीच बघितले असेल.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येक प्रश्नाचे सर्वात चांगले उत्तरम्हणजे शांत राहणे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *"मेरा जीवन ही मेरा संदेश है"* असे कोणी म्हटले होते ?२) गावाच्या नोंदीचे उतारे कोण देतो ?३) भारताचे दुसरे लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?४) वाऱ्यामध्ये कोणत्या प्रकारची ऊर्जा असते ?५) पद्मनाभ स्वामी मंदिर कोणत्या राज्यात आहे ? *उत्तरे :-* १) महात्मा गांधी २) तलाठी ३) अजय खानविलकर ४) गतिज ऊर्जा ५) केरळ*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 भगवान कांबळे, नांदेडभूषण पत्रकार👤 डॉ. बालाजी खानापुरे, नांदेड👤 शेख रुस्तम, जि. प. नांदेड👤 सुरेश बोईनवाड👤 कामाजी धुतुरे👤 लक्ष्मण वडजे👤 साईनाथ बोमले*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुकजियाला भ्रांति भाविकाला शांति । साधुची ती वृत्ती लिन झाली ॥१॥लीन झाली वृत्ती ब्रह्माते मिळाले । जळांत आटले लवण जैसे ॥२॥लवण जैसे पुन्हा जळाचे बाहेरी । येत नाही खरे त्यातुनिया ॥३॥त्या सारिखे तुम्ही जाणा साधुवृत्ती । पुन्हा न मिळती मायाजाळी ॥४॥मायाजाळ त्यांना पुन्हा रे बाधेना । सत्य सत्य जाणा तुका म्हणे ॥५॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मी म्हणजेच सर्वकाही, मला सर्व येते, मला सर्वच काही जमते, माझ्याकडे कशाचीही कमी नाही, मी कोणाच्यामागे धावणार नाही, मी सर्वात श्रेष्ठ व गुणवान आहे, हा अहंभाव जेव्हा, आपल्या अंगी शिरते त्यावेळी आपल्या अंतर्मनाला विचारून बघावे. नक्कीच या सर्व प्रश्नांची उत्तरे आपोआप, आपल्याला मिळतील. कुठेही शोधाशोध करण्यासाठी जावे लागणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *शिंपले* एक 6 वर्षाचा मुलगा आपल्या 4 वर्षाच्या लहान बहिणीसोबत बाजारातून जात असतो. अचानक त्याला जाणवते की त्याची बहीण मागे राहिली आहे. तो थांबतो व मागे वळून पाहतो तर त्याला दिसते की, त्याची बहीण एका खेळण्याच्या दुकानासमोर उभी राहून अतिशय कुतूहलाने काहीतरी पहात आहे. तो मुलगा मागे जातो व तिला विचारतो, "तुला काही हवे आहे का?" ती एका बाहुलीकडे बोट दाखविते. तो मुलगा तिचा हात धरतो व एका जबाबदार मोठ्या भावा प्रमाणे तिला ती बाहुली देतो. ती बहीण अत्यानंदीत होते. हे सर्व तो दुकानदार पहात असतो व त्या मुलाचे प्रगल्भ वागणे पाहून आश्चर्यचकित होतो.इतक्यात तो मुलगा काउंटर कडे येतो व त्या दुकानदाराला विचारतो "काका, किती किंमत आहे या बाहुलीची?" दुकानदार एक शांत माणूस असतो व त्याने जीवनाचे अनेक चढ उतार पाहिलेले असतात. तो त्या मुलाला प्रेमाने व आपुलकीने विचारतो "बोल तू काय देशील?" मुलगा आपल्या खिशातील सर्व शिंपले,जे त्याने व त्याच्या बहिणीने नुकतेच समुद्रकिनाऱ्यावर गोळा केलेले असतात ते बाहेर काढतो व दुकानदाराला देतो. दुकानदार ते घेतो व जणूकाही पैसे मोजत आहे या अविर्भावात मोजायला सुरु करतो. शिंपले मोजून झाल्यावर त्या मुलाकडे पाहताच मुलगा म्हणतो " कमी आहेत का ?" दुकानदार म्हणतो " नाही नाही, हे बाहुलीच्या किमतीपेक्षा जास्त आहेत. ज्यादाचे मी परत करतो. असे म्हणून तो केवळ 4 शिंपले घेतो व बाकी सर्व शिंपले त्याला परत करतो. मुलगा एकदम आनंदात ते शिंपले आपल्या खिशात ठेवतो व बहिणीसोबत निघून जातो. हे सर्व त्या दुकानातील कामगार पहात होता. त्याने आश्चर्याने मालकाला विचारले, " मालक ! इतकी महागडी बाहुली तुम्ही केवळ 4 शिंपल्यांच्या मोबदल्यात दिलीत ?" दुकानदार एक स्मित हास्य करीत म्हणाला, "आपल्यासाठी हे केवळ शिंपले आहेत. पण, त्या मुलासाठी हे शिंपले अतिशय मौल्यवान आहेत. आणि आत्ता या वयात त्याला नाही समजणार पैसे काय असतात. पण जेंव्हा तो मोठा होईल ना, तेंव्हा नक्कीच समजेल. आणि जेंव्हा त्याला आठवेल कि आपण पैश्यांच्या ऐवजी शिंपल्यांच्या मोबदल्यात बाहुली खरेदी केली होती, तेंव्हा त्याला माझी आठवण होईल आणि तो हा विचार करेल कि हे विश्व चांगल्या माणसांनी भरलेले आहे.हीगोष्ट त्याच्यातील सकारात्मक दृष्टीकोन वाढण्यासाठी मदतीची ठरेल आणि तो सुद्धा चांगला माणूस बनण्यासाठी प्रेरित होईल." *तात्पर्य* -- " पेरावे तसे उगवते." म्हणून केवळ पैशांच्या मागे न लागता, असे काहीतरी चांगले काम करा, जे पुढच्या पिढयांना चांगले काम करण्याची प्रेरणा देईल, सकारात्मक दृष्टीकोन देईल.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 12 मार्च 20234💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~या समुहात add होण्यासाठी Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ७२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००१:राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही मूल्ये, सामाजिक आणि आर्थिक विकास या क्षेत्रांतील बहुमोल कामगिरीबद्दल देण्यात येणारा ’यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार’ ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व पर्यावरणवादी नेते सुंदरलाल बहुगुणा यांना प्रदान करण्यात आला**१९९९:सरकारी नोटांवर यापुढे महात्मा गांधींचेच चित्र असेल असा सरकारतर्फे निर्णय घेण्यात आला**१९९९:चेक प्रजासत्ताक, हंगेरी व पोलंड ’नाटो’ (NATO) मधे सामील झाले.**१९९३:मुंबई येथे झालेल्या १२ स्फोटांच्या मालिकेत ३०० हून अधिकजण ठार तर हजारो लोक जखमी**१९९२:स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २४ वर्षांनी ब्रिटिश सत्तेची सर्व जोखडे झुगारुन देऊन मॉरिशस प्रजासत्ताक बनले.**१९८६:केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देऊन शंकराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली**१९६८:मॉरिशस (इंग्लंडपासून) स्वतंत्र झाला**१९५४:साहित्य अकादमीची स्थापना**१९३०:ब्रिटिश सरकारने भारतात तयार केलेल्या मिठावर बसवलेल्या अन्यायकारक करामुळे महात्मा गांधी यांनी २०० मैलाच्या दांडीयात्रेला सुरूवात केली**१९१८:रशियाची राजधानी सेंट पीट्सबर्ग येथून मास्को येथे हलविण्यात आली.**१९१२:कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी लिहीलेल्या ’संगीत मानापमान’ या नाटकाचा पहिला प्रयोग किर्लोस्कर नाटक मंडळीने मुंबईतील रिपन नाट्यगृहात केला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८४:श्रेया घोषाल-- हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची पार्श्वगायिका**१९८२:मनोज कुलकर्णी -- लेखक* *१९८१:अनधा विनय तांबोळी-- कवयित्री, लेखिका**१९७३:राम पांडुरंग गायकवाड-- कवी* *१९६९:प्रा.कल्याण पांडुरंग राऊत-- कवी* *१९६९:फाल्गुनी पाठक--भारतीय गायिका आणि संगीतकार**१९६१:डॉ.मालिनी अनिल अंबाडेकर -- कवयित्री* *१९५६:चंदन दास-- लोकप्रिय भारतीय गझल गायक**१९४३:डॉ.अविनाश बिनीवाले-- भाषाभ्यासक आणि बहुभाषाविद् लेखक* *१९४१:प्रा.जवाहर प्रेमराज मुथा-- ज्येष्ठ कवी,प्रसिद्ध लेखक,संपादक**१९४०:डॉ.श्रीकांत वामन चोरघडे -- बालरोगतज्ज्ञ व बालमानसशास्त्रज्ञ, लेखक,संपादक**१९३३:कविता विश्वनाथ नरवणे-- जेष्ठ मराठी लेखिका (मृत्यू २८ आगस्त २०२०)*१९२६:सुमन पुरुषोत्तम बेहरे-- लेखिका**१९२३:गजानन रामचंद्र कामत-- मराठी साहित्यिक व हिंदी-मराठी चित्रपटकथालेखक (मृत्यु:६ऑक्टोबर २०१५)**१९१५:डॉ.अ.ना.देशपांडे(अच्चुत नारायण देशपांडे)-- मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचे सिद्धहस्त लेखक वाङ्मयेतिहासकार(मृत्यू:१४ आक्टोबर १९९०)**१९१३:यशवंतराव चव्हाण – भारताचे ५ वे उपपंतप्रधान,संरक्षणमंत्री व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री (मृत्यू:२५ नोव्हेंबर १९८४)**१९११:दयानंद बाळकृष्ण ऊर्फ ’भाऊसाहेब’ बांदोडकर – गोव्याचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे संस्थापक, उद्योगपती (जन्म:१२ ऑगस्ट १९७३)**१९०४:जगन्नाथ जनार्दन पुरोहित-- महाराष्ट्रातील एक प्रतिभावंत व नामवंत यशस्वी गायक व संगीताचार्य.(मृत्यू:२० ऑक्टोबर१९६८)* *१८९१:’नटवर्य’ चिंतामणराव कोल्हटकर – अभिनेते व निर्माते (मृत्यू:२३ नोव्हेंबर १९५९)**१८२४:गुस्ताव किरचॉफ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू:१७ आक्टोबर १८८७)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२०:प्रा.मधुकर शंकर वाबगावकर (म.श.)-- लेखक,समीक्षक (जन्म:३ नोव्हेंबर १९३३)**२००१:रॉबर्ट लुडलुम – अमेरिकन लेखक (जन्म:२५ मे १९२७)**१९९९:यहुदी मेनुहिन – प्रसिद्ध व्हायोलिनवादक व वाद्यवृंदसंचालक (जन्म:२२ एप्रिल १९१६)**१९६०:विठ्ठल वामन हडप-- ऐतिहासिक कादंबरीकार,नाटककार(जन्म:१८ नोव्हेंबर १८९९)**१९५९:जनार्दन सखाराम करंदीकर--संपादक (जन्म:१५ फेब्रुवारी १८७५)**१९४२:रॉबर्ट बॉश – जर्मन अभियंते आणि उद्योजक (जन्म:२३ सप्टेंबर १८६१)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *देशभरात CAA अर्थात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानतून आलेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारसी आणि ख्रिश्चन समुदायातील नागरिकांना भारताचं नागरीत्व मिळणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक, मुंबईत थीम पार्क उभारणार ; महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेटमध्ये 19 धडाकेबाज निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सर्वोच्च न्यायालयाचा SBI ला दणका, निवडणूक रोख्यांची उद्याच माहिती देण्याचे आदेश, निवडणूक आयोगालाही डेडलाईन, येत्या 15 मार्चला लोकसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा उद्या नंदूरबारमधून महाराष्ट्रात प्रवेश:17 तारखेला शिवाजी पार्कवर लोकसभा प्रचाराचा नारळ फोडणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *ऑस्कर 2024 :- सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार ‘ओपनहायमर’ या चित्रपटाने पटकावला*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटीलच्या हाती मशाल, 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश, सांगली लोकसभेतून उमेदवारी जवळपास निश्चित*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टीम इंडियानं इंग्लंडविरोधातील कसोटी मालिका जिंकल्यानंतर टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडिया अव्वल स्थानी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••👨👩👦👦 *मुले जुळी का होतात ?* 👨👩👧👧 ***************************राम-श्याम, सीता और गीता असे बरेच जुळ्यांवरचे सिनेमे आपण बघतो. त्यात उडणारा गोंधळ प्रत्यक्षातही आपण अनुभवला असेल. जुळ्या बहिणी, भावांमधील फरक आपल्याला ओळखू आला नसेल किंवा असेही झाले असेल की जुळे तर आहेत, पण दिसायला एकदम वेगळे आहेत किंवा जुळ्यातील एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे. ही अशी जुळी का बरे होत असतील. एरवी एकच मूल जन्माला येत असते.जुळ्यांचे आपण वर जे वेगवेगळे प्रकार पाहिले, त्याची भिन्नभिन्न कारणे आहेत. स्त्रीबीजाचे शुक्राणूकडून फलन झाल्यानंतर त्याचे दोन भाग, दोनाचे चार असे वाढून पेशींचा गोळा तयार होऊन एक गर्भ तयार होतो; परंतु काही वेळेस प्रथम फलन झाल्यावर स्त्रीबीजाचे जे दोन भाग होतात, ते वेगळे वेगळेच वाढायला लागून दोन गर्भ तयार होतात. असे जे जुळे असते ते दिसावयास अगदी सारखे असते आणि त्यांचे लिंगही एकच असते. म्हणजे दोन्ही मुली किंवा दोन्ही मुले. दुसऱ्या प्रकारात दोन वेगळे स्त्रीबीज दोन वेगवेगळ्या शुक्राणू फलित होऊन दोन गर्भ तयार होतात. हे जुळे मग समान लिंगाचे असू शकते किंवा भिन्न लिंगाचे. एक मुलगा व एक मुलगी अशा जोड्या तयार होतात. अशी जुळी दोन वेगळ्या स्त्रीबीजाकडून तयार झाल्याने दिसावयास सारखी नसतात. असे हे जुळ्यांचे दुखणे.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जी माणसं आपला विचार बदलू शकत नाही, ते आयुष्यात काहीही करू शकत नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *घूमर लोकनृत्य* कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?२) भारतात एकूण रामसर स्थळे किती आहेत ?३) गावातील कोतवालांची संख्या कशावरून ठरवली जाते ?४) देशातील पाण्याखाली सर्वात खोल बांधलेले मेट्रो स्टेशन कोणते ?५) जगामध्ये सर्वात प्रथम कोणत्या देशामध्ये कुटुंब न्यायालय अस्तित्वात आले ? *उत्तरे :-* १) राजस्थान २) ८० रामसर स्थळे ३) लोकसंख्या ४) हावडा मेट्रो रेल्वे स्टेशन ५) अमेरिका*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 मधुकर काठेवाडे, शिक्षक, नायगाव👤 शिवराम पेंडकर, येवती👤 माधव पाटील दिग्रसकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गेली त्याची जाण ब्रह्म तोचि झाला । अंतरी निवाला पूर्णपणे ॥१॥पूर्णपेणे झाला राहतो कैशा रीती । त्याचि स्थिती सांगतो मी ॥२॥सांगतो मी तुम्हा ऐका मनोगत । राहतो मूर्खवत जगामाजी ॥३॥जगात पिशाश्च अंतरी शहाणा । सदाब्रह्मी जाणा निमग्न तो ॥४॥निमग्न तो सदा जैसा मकरंद । अंतर्बाहय भेद वेगळाले ॥५॥वेगळाले भेद किर्ती त्या असती । ह्र्यदगत त्याची गति न कळे कवणाला ॥६॥न कळे कवणाला त्याचे हेचि वर्म । योगी जाणे वर्म खुण त्याची ॥७॥खुण त्याची जाणे जे तैसे असती । तुका म्हणे भ्रांती दुजीयाला ॥८॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्याच्यात खरी माणुसकी व, विरता असते ती व्यक्ती, कधीही कोणाशी वैरता करत नाही आणि वैरता निर्माण करण्यासाठी मुळात कोणालाही साथ देत नाही. कारण, वैरताची आपल्यात भावना ठेवल्याने व साथ देल्याने त्याचे होणारे परिणाम कसे असतात त्याविषयी त्याला भक्कम अनुभव असतो. म्हणून आपणही अशाच प्रामाणिक, नि:स्वार्थी व माणुसकी असलेल्या व्यक्तीकडून शिकण्याचा प्रयत्न करावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••असत्य जेव्हा पुनःपुन्हा कानी पडते, तेव्हा ते सत्य भासू लागते.=====================एका गावात 'मित्रशर्मा' नावाचा एक अग्निहोत्री ब्राह्मण राहात होता. एकदा यज्ञात 'बळी' देण्यासाठी त्याने बाहेरगावच्या एका ओळखीच्या माणसाकडून एक गलेलठ्ठ बोकड तसाच मिळविला व त्याला खांद्यावर घेऊन तो आपल्या गावाच्या रस्त्याला लागला.तो बोकड तीन भामट्यांच्या दृष्टीस पडला व त्यांनी त्या ब्राह्मणाला फसवून, त्या बोकडाला पळवून नेण्याचा आपपसांत बेत आखला. त्याप्रमाणे ते तिघे तो ब्राह्मण जाणार असलेल्या वाटेवर - त्याला दाद लागून न देता - थोडथोड्या अंतरावर उभे राहिले.खांद्यावर बोकड घेतलेला ब्राह्मण जरा पुढे जाताच वाटेत भेटलेला पहिला भामटा त्याला म्हणाला, 'काय भटजीबुवा, कुत्रा खांद्यावर घेऊन कुठे चाललात? अहो, याला असेच घेऊन गेलात तर तुमचे गावकरी तुम्हाला वेड्यात काढतील.''हा कुत्रा नसून बोकड आहे,' असे उत्तर त्या ब्राह्मणाने देताच तो भामटा त्याला म्हणाला, 'भटजी, कुणाला चांगलं सांगण्याची सोय नाही हेच खरं. तुम्हाला तो कुत्रा बोकड वाटतोय ना? मग वाटल्यास त्याला घरी नेऊन यज्ञात बळी द्या. मग तर झालं? माझं काय जातंय? तुमचं पाप तुम्हाला.'त्या भामट्याच्या या बोलण्याचा विचार करीत तो ब्राह्मण जरा पुढे जातो न जातो तोच, वाटेत भेटलेला दुसरा भामटा म्हणाला, 'काय हो शास्त्रीबुवा, तुम्हाला वेडबीड तर नाही ना लागलं? गायीचं मेलेलं वासरू खांद्यावर घेऊन कुठे चाललात? टाकून द्या त्याला इथंच आणि घरी जाताच गोमूत्र मिसळलेल्या पाण्यानं स्नान करून शुद्ध व्हा.'तो ब्राह्मण भांबावलेल्या मनःस्थितीत आणखी जरा पुढे जाताच तिसऱ्या भामट्याने विचारले, 'एका गाढवाच्या पोराला खांद्यावर घेऊन जाणे पंडितजी तुम्हाला शोभते का?'हे शब्द ऐकून मात्र तो ब्राह्मण मनी चरकून स्वतःशीच म्हणाला, 'ज्या अर्थी वाटेत भेटलेल्या एकाला हा माझा बोकड कुत्रा दिसला, दुसऱ्याला गाईचे मेलेले वासरू दिसले तर तिसऱ्याला गाढवाचे पिलू भासले, त्या अर्थी हा बोकड म्हणजे क्षणोक्षणी रूपे बदलणारा मायावी राक्षस असावा. तेव्हा याला घरी नेण्यात काय अर्थ? मनात असे म्हणून, त्याने त्या बोकडाला तिथेच सोडून दिले आणि तो आपल्या गावी परत गेला.तो ब्राह्मण जरा दूर जाताच त्या तीन भामट्यांनी त्या बोकडाला पळवून नेले.'•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 11 मार्च 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://googlyan.blogspot.com/2018/08/blog-post.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ७१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०११:जपानमधील सेन्डाइच्या पूर्वेला झालेल्या ८.९ रिश्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने त्सूनामीची प्रचंड लाट आली. यात जपानमधील हजारो लोक मृत्यूमुखी पडले.**२००१:बॅडमिंटनपटू पी.गोपीचंदने तब्बल एकवीस वर्षानी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद भारतास मिळवून दिले.या आधी प्रकाश पदुकोण यांनी ते मिळवले होते.**२००१:कसोटी क्रिकेटमधे हॅटट्रिक घेणारा हरभजनसिंग हा पहिला भारतीय गोलंदाज बनला.त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही कामगिरी केली**१९९३:उडिया कवी व साहित्यिक रमाकांत रथ यांना उपराष्ट्रपती के.आर.नारायणन यांच्या हस्ते 'सरस्वती सन्मान' पुरस्कार प्रदान.**१८८९:पंडिता रमाबाईंनी मुंबईत "शारदा सदन" ही विधवांसाठी व कुमारीकांसाठी शाळा सुरू केली**१८८६:अमेरिकेतील फिलाडेल्फिया विद्यापीठातून डॉक्टर होणारी पहिली भारतीय महिला आनंदीबाई गोपाळराव जोशी यांना पदवी प्रदान**१८१८:इंग्रज फौजांनी पुरंदरला वेढा घातला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९०:शुभांगी सदावर्ते-- अभिनेत्री* *१९८५:अजंता मेंडिस – श्रीलंकेचा गोलंदाज**१९८१:भावना कुलकर्णी-भालेराव-- बालकथाकार,कवियित्री**१९७७:वृषाली हरीश कुलकर्णी -- कवयित्री,कथालेखिका* *१९६६:मोहित चौहान--भारतीय गायक**१९६०:रमेश चिल्ले -- कवी,लेखक* *१९५८:पुरुषोत्तम गं.निकते -- कवी* *१९५४:विनोद दुआ-- भारतातील हिंदी टेलिव्हिजन पत्रकार आणि कार्यक्रम संचालक(मृत्यू:४ डिसेंबर २०२१)**१९५२:प्रा.डॉ.विश्वास किसन पाटील-- लेखक**१९४९:डॉ.लिना विलास मोहाडीकर -- लेखिका* *१९४५:डॉ अनधा केसकर-- कादंबरीकार,कथाकार**१९४०:दया डोंगरे-- ज्येष्ठ अभिनेत्री* *१९३८:प्रा.डॉ सुनंदा देशपांडे--लेखिका, समीक्षक* *१९२९:मालती मोरेश्वर निमखेडकर-- कवयित्री,कथाकार (मृत्यू:२०१६)**१९२२:सरोज अहंकारी-- बालसाहित्यिक कवयित्री लेखिका**१९१७:धोंडो विठ्ठल देशपांडे-- लेखक, समीक्षक (मृत्यू:१९ जुलै १९९३)* *१९१६:हॅरॉल्ड विल्सन – इंग्लंडचे पंतप्रधान (मृत्यू:२४ मे १९९५)**१९१५:विजय हजारे – क्रिकेटपटू (मृत्यू:१८ डिसेंबर २००४)**१९१२:शंकर गोविंद साठे-- मराठीतले कवी, कथालेखक आणि नाटककार(मृत्यू:२४ डिसेंबर २०००)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१३:ब्रिज मोहन व्यास-- बॉलीवूडचा एक भारतीय अभिनेता(जन्म:२२ ऑक्टोबर, १९२०)**२००६:स्लोबोदान मिलोसोव्हिच – सर्बिया व युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष (जन्म:२०ऑगस्ट १९४१)**१९९३:शाहू मोडक – हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते(जन्म:२५ एप्रिल १९१८)**१९८०:अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे--सर्वोदयी नेते व विचारवंत(जन्म:७ ऑक्टोबर १८९७)**१९७९:यशवंत कृष्ण उर्फ आप्पासाहेब खाडिलकर-- नवाकाळचे दुसरे संपादक(जन्म:१५ जानेवारी १९०५)**१९७०:अर्ल स्टॅनले गार्डनर – अमेरिकन लेखक आणि वकील (जन्म:१७ जुलै १८८९)**१९६५:गौरीशंकर गोवर्धनराम जोशी तथा ’धूमकेतू’ – गुजराथी कथाकार व कादंबरीकार. (जन्म:१२ डिसेंबर १८९२)**१९५५:अलेक्झांडर फ्लेमिंग – नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ (जन्म:६ ऑगस्ट १८८१)**१९४३:ॲड.यादव माधव उपाख्य अण्णासाहेब काळे-- विदर्भाच्या इतिहासाचाआद्याचार्य (जन्म:१८ फेब्रुवारी १८८२)**१६८९:छत्रपती संभाजी महाराज (जन्म:१४ मे १६५७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुज आहे तुजपाशी*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे:PM मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन संपन्न; धावपट्टी वाढविण्यासाठी प्रयत्न- अजित पवार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आचारसंहिता लागण्यापूर्वी जीआरचा धडाका! दोन दिवसांत तब्बल 269 शासन निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा; आगामी लोकसभा निवडणुकांची धुरा आता एकट्या राजीव कुमार यांच्या खांद्यावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *युसूफ पठाण, शत्रुघ्न सिन्हांना तिकीट, नुसरत जहाँचा पत्ता कट; बंगालसाठी ममतादीदींच्या तृणमूलची यादी जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंकडूनही उमेदवारी जाहीर करण्यास सुरुवात, मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अमोल किर्तीकर यांना उमेदवारी जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मराठा समाजाप्रमाणे धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करा, अमरावती येथे आयोजित राज्यस्तरीय धनगर समाज अधिवेशनात एकमताने ठराव*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *बीसीसीआयने टेस्ट क्रिकेटर्सची सॅलरी वाढवली; 75 टक्के कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूंना प्रत्येक सामन्यासाठी मिळतील सुमारे 45 लाख रुपये*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुम्हाला हा प्रश्न कधी पडलाय का की सातारच्या पेढ्यांना कंदी पेढे असच कां म्हणतात?*अहो मग भिडू कशा साठी आहे? आम्ही सांगायलाच बसलोय.गोष्ट आहे दीडशे वर्षापूर्वीची. भारतात ब्रिटीश राजवट सुरु होती. साताऱ्यात छत्रपतींच्या संस्थानावर देखील ब्रिटीश रिजंट बसवण्यात आले होते. हे अधिकारी इंग्लंडवरून आलेले होते. त्यांना गोड खाण्याची सवय होती. मग ते कायम वेगवगेळ्या मिठाईच्या शोधात असायचे.सातारा जिल्ह्यातील जो पाटणकडचा डोंगराळ भाग आहे तिथे त्याकाळात शेतीच प्रमाण कमी होतं. लोकांच उपजीविकेच साधन मुख्यसाधन हे पशुधन होतं. तिथल्या गायी म्हैशीच वैशिष्ट्य म्हणजे त्या रानावनात वाढलेल्या होत्या. विकतचा चारा हा प्रकार तिथे नव्हता. यामुळे त्यांचं दुध घट्ट आणि अस्सल असायचं. शिवाय ते मुबलक प्रमाणात उपलब्ध होतं होतं.हे दुध जवळच मोठ शहर म्हणून सातारला पाठवून दिल जायचं.काहींनी या दुधाला कढईत उकळून त्यात साखर किंवा गुळ टाकली. हे मिश्रण घट्ट झाल्यावर त्याचे छोटे छोटे गोळे बनवले. ते एका करंडीमध्ये भरून ब्रिटीश अधिकाऱ्यांना पेश केले. ब्रिटीशांना ही मिठाई प्रचंड आवडली.त्यांना करंडी म्हणता येत नसल्यामुळे त्यांनी त्याला कँडी म्हणायला सुरवात केली. पुढे याच कँडीच आपल्या सातारकरांनी कंदी केलं.साधारण याच काळात छत्रपतींच्या नवव्या वंशजानी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील खडकलाट या गावातून काही मिठाई बनवणाऱ्या कुटुंबाना साताऱ्यात आणून वसवलं होतं. त्यांनी बनवलेले कंदी पेढे लोकप्रिय होत गेले. पुढे त्यांनाच लाटकर अस ओळखल जाऊ लागल.कंदी पेढ्याला सातासमुद्रापार नेलं ते मात्र तुळजाराम मोदी या हलवायांनी.त्यांनी सत्तरवर्षापूर्वी विमानात, लंडनमधील सुप्रसिद्ध ठिकाणी या कंदी पेढ्यांच्या जाहिराती लावल्या. त्यामुळेच हा पेढा कानाकोपऱ्यात पोहचला.आजही एवढ्या वर्षांनी एवढी तंत्रज्ञानात सुधारणा होऊनदेखील मोदी आणि लाटकर हलवाई मात्र कंदी पेढ्याचा खवा आजही कढईतच भाजतात व प्रत्येक पेढा हातावरच वळला जातो. खव्याची भाजणी विशिष्ट प्रकारे केल्यामुळे पेढ्याची पौष्टिकता, चव व टिकाऊपणा वाढतो.म्हणूनच गेली १०० वर्ष सातारच्या कंदी पेढ्यांची चव आणि गुणवत्ता तशीच टिकून आहे.भारतात अनेक ठिकाणचे पेढे प्रसिद्ध आहेत. पेढ्याची जन्मभूमीच मथुरा ही आहे. उत्तरेतून ठाकूरराम रतन सिंह यांनी हे पेढे दक्षिणेत धारवाड येथे आणले. त्यांना धारवाडी पेढे म्हणून ओळखल जात.महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणचे पेढे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. यात कोल्हापूरचे फिक्के पेढे, कुंथलगिरीचे पेढे, वाडीचे पेढे व खूप काही. मात्र इतर पेढ्यांच्या तुलनेत सातारचे पेढे हे खवा जास्त भाजल्यामुळे भुरकट दिसतात. कमी साखर हे या पेढ्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. परिणामी हा पेढा सहा ते आठ दिवस सहज टिकतो.सातारच्या कंदी पेढ्याची सिक्रेट रेसिपी म्हणजे हे पेढे डबल भाजलेले आहेत, हे पेढे सह्याद्रीतल्या रानातला चारा खाणाऱ्या गाई म्हैशीपासून बनलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे इथल्या पेढ्यांमधेय सातारच्या माणसांचा स्वॅग मिक्स झालाय.या सगळ्या मुळे सातारच्या पेढ्याचा ब्रँड जगात फेमस झालाय.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जिथे एकमेकांची प्रगती साधली जाते तीच खरी मैत्री असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) देशातील पाण्याखालून जाणाऱ्या पहिल्या मेट्रोचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले ?२) रशियाच्या अवकाश संशोधन संस्थेचे नाव काय आहे ?३) घटक राज्यांमधील संविधानिक यंत्रणा बंद पडल्यास त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची आणीबाणी लागू केले जाते ?४) कोडाई कॅनॉल हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?५) भारताची अर्थव्यवस्था सध्या जगात कितव्या क्रमांकाची आहे ? *उत्तरे :-* १) पंतप्रधान नरेंद्र मोदी २) रॉसकॉसमॉस ३) राष्ट्रपती राजवट ४) तामिळनाडू ५) पाचव्या *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 भाऊसाहेब उमाटे, इतिहास संशोधक, लातूर👤श्री प्रलोभ माधवराव कुलकर्णी, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक जि. प. हा. वाघी जि. नांदेड.👤 विजय नागलवार, अभियंता, पुणे👤 सूर्यकांत सोनकांबळे👤 रमेश कवडेकर👤 संदीप दुगाडे👤 संतोष देवणीकर, शिक्षक, देगलूर👤 Tr. जब्बार मुलानी*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मायाजाळ नासे या नामें करुनि । प्रिती चक्रपाणि असो द्यावी ॥१॥असो द्यावी प्रिती साधूचे पायंशी । कदा किर्तनासी सोडू नये ॥२॥सोडू नये पुराणश्रवण किर्तन । मनन निदिध्यास साक्षात्कार ॥३॥साक्षात्कार झालिया सहज समाधि । तुका म्हणे उपाधी गेली त्याची ॥४॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन जगत असताना अनेक माणसं भेटत असतात. त्यातील सर्वजण एक सारखे विचाराचे असतील असेही नाही. सोबत ते आपल्याला समजून घेतीलच असेही नाही. त्यातील काही माणसं मार्गदर्शक, दिशादर्शक असतात तर काहीजण व्यावसायिक, चालाख व अति स्वार्थी व्यापारी असतात म्हणून जरा सावध रहावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *हरिण व कोल्हा*एका कोल्हयाला फिरण्याचा फार नाद होता, तो या गावाहून त्या गावाला सारखा फिरत राही, प्रवास करता करता तो एका गावाला आला. तिथे त्याला एका तलावात पाणी पीत असलेली काही हरणे दिसली. ती पाणी पितापिता मधेच अकाशाकडे पहात होती हे पाहून कोल्हयाने त्यांना असे करण्याचे कारण विचारले, तेव्हा हरणे म्हणाली, 'आम्ही देवाचे आभार मानतो देवाच्याच दयेनं हे पाणी प्यायला मिळतं आहे.' हरणांचे हे बोलणे ऐकून कोल्हयाला हसू आले व तो त्यांची टिंगल करू लागला. यावर त्यातले एक स्पष्टवक्ते हरीण कोल्हयाला म्हणाले, 'अरे कोल्होबा ज्याची त्याची श्रध्दा असते, अशी दुसऱ्याची टिंगल उडविणे वाईट आहे. आपले वागणे वाईट अशा विकृत दृष्टिकोन असलेल्या तुझ्याकडून समंजसपणाची अपेक्षा का करावी.'तात्पर्यः 'दुसऱ्याच्या श्रध्देविषयी टिंगल करणे हे असभ्यपणाचे लक्षण आहे.'•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 09 मार्च 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/nRt3vVh2JcfZL3rQ/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ६९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९२:कवी आणि लेखक डॉ. हरिवंशराय बच्चन यांना नवी दिल्ली येथे के.के.बिर्ला प्रतिष्ठानद्वारा आयोजित समारंभात पहिला 'सरस्वती पुरस्कार'उपराष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आला**१९९१:युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष स्लोबोदान मिलोसोव्हिच यांच्याविरुद्ध राजधानी बेलग्रेड मधे प्रचंड निदर्शने**१९५९:’बार्बी’या जगप्रसिद्ध बाहुलीच्या विक्रीस सुरूवात झाली.**१९५२:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांच्या हस्ते पुण्यातील पेशवे उद्यान प्राणी संग्रहालयाचे उद्घाटन**१९४५:अमेरिकेच्या बी-२९ विमानांनी जपानच्या टोकियो शहरावर बॉम्बहल्ला केला. यात १ लाखाहुन अधिक लोक मृत्युमुखी पडले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९७:दर्शील सफारी--- भारतीय अभिनेता, "तारे जमीन पर" मधील भूमिकेमुळे लोकप्रिय* *१९८८:अश्विनी रोशन दुरगकर-- लेखिका**१९८५:पार्थिव अजय पटेल-- माजी भारतीय क्रिकेटपटू यष्टिरक्षक-फलंदाज**१९८१:डॉ.अदिती टपळे-काळमेख -- कवयित्री* *१९७८:कमलेश विनायक गोसावी -- कवी, लेखक* *१९६२:प्रा.शिवाजी तुकाराम वाठोरे-- प्रसिद्ध कवी,लेखक* *१९६०:प्रा.रमेश गंगारामजी वाघमारे-- कवी, लेखक**१९५६:शशी थरूर – माजी केन्द्रीय मंत्री व अर्थतज्ञ**१९५१:उस्ताद झाकिर हुसेन – तबलावादक**१९५०:विजय रघुवीर उर्फ जादूगार रघुवीर ज्युनियर-- ज्येष्ठ जादूगार**१९४५:गणपती रामदास वडपल्लीवार-- नाट्यलेखक* *१९४३:रॉबर्ट जेम्स ऊर्फ ’बॉबी’ फिशर – अमेरिकन बुद्धिबळपटू व ग्रँडमास्टर (मृत्यू:१७ जानेवारी २००८)**१९४३:अ.शि.रंगारी-- कादंबरीकार* *१९३५:डॉ.पांडुरंग हरी कुलकर्णी-- संशोधक,लेखक* *१९३४:युरी गागारीन – पृथ्वीप्रदक्षिणा करणारा पहिला अंतराळवीर (मृत्यू:२७ मार्च १९६८)**१९३३:भिका शिवा शिंदे उर्फ आबा-- प्रसिद्ध नाटककार,साहित्यिक(मृत्यू:१० सप्टेंबर २००९)**१९३१:डॉ.करणसिंग-- माजी केंद्रीय मंत्री**१९३१:सदाशिव बाळकृष्ण क-हाडे-- समीक्षक,कादंबरीकार**१९३०:डॉ.युसुफखान महंमदखान(यू.म.) पठाण-- मराठी भाषेतील सुप्रसिद्ध लेखक व संतसाहित्याचे अभ्यासक आणि भाष्यकार* *१८९९:’राजकवी’ यशवंत दिनकर पेंढारकर (मृत्यू:२६ नोव्हेंबर १९८५)**१८९४:शंकर पुरुषोत्तम जोशी-- मराठी इतिहास संशोधक(मृत्यू:२० सप्टेंबर १९४३)**१८६३:लक्ष्मण बापूजी ऊर्फ ’भाऊराव’ कोल्हटकर – गायक नट (मृत्यू:१३ फेब्रुवारी १९०१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८:पतंगराव कदम-- माजी मंत्री, राजकारणी,भारती विद्यापीठाची स्थापना १९६८(जन्म:८जानेवारी १९४४)**२०१७:वि.भा.देशपांडे, अर्थात विश्वनाथ भालचंद्र देशपांडे--पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अनेक वर्षे पदाधिकारी, नाट्यसमीक्षक (जन्म:३१ मे १९३८)**२०१२:जॉय मुकर्जी – चित्रपट कलाकार आणि दिग्दर्शक (जन्म: २४ फेब्रुवारी १९३९)**२०००:उषा मराठे - खेर ऊर्फ ’उषा किरण’ – शंभराहून अधिक चित्रपटात व रंगभूमीवर अभिनेत्री, मुंबईच्या नगरपाल (जन्म: २२ एप्रिल १९२९)**१९९६:अख्तर उल इमान-- हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात उर्दू कवी आणि पटकथा लेखक(जन्म:१२ नोव्हेंबर १९१५)* *१९९४:देविका राणी – अभिनेत्री, पद्मश्री, दादासाहेब फाळके व सोविएत लँड नेहरू पुरस्कारांनी सन्मानित (जन्म:३० मार्च १९०८)**१९९२:मेनाकेम बेगीन – इस्त्रायलचे ६ वे पंतप्रधान व नोबेल पारितोषिक विजेते (जन्म:१६ ऑगस्ट १९१३)**१९७१:के.असिफ – हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व पटकथालेखक (जन्म:१४ जून १९२२)**१९६९:सर होर्मुसजी पेरोशॉ तथा ’होमी’ मोदी – उद्योगपती, प्रशासक व संसदपटू (जन्म:२३ सप्टेंबर १८८१)**१८८८:विल्हेल्म (पहिला) – जर्मन सम्राट (जन्म:२२ मार्च १७९७)**१८५१:हान्स क्रिस्टियन ओरस्टेड – डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ (जन्म:१४ ऑगस्ट १७७७)**१६५०:संत तुकाराम यांचा वैकुंठवास (जन्म: १५७७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••लघुकथा - टास्कशाळेतील मुलांना काही आव्हान दिल्यावर ते कशा पद्धतीने पूर्ण करतात. दिलेले आव्हान पूर्ण करतांना त्यांच्या मनाची तयारी व संस्कार कसे होतात ही सांगणारी लघुकथा ..... पूर्ण वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *रोहित पवारांच्या बारामती अँग्रोनं खरेदी केलेला कन्नड साखर कारखाना ईडीकडून जप्त, मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीची मोठी कारवाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राष्ट्रपतीनियुक्त सदस्य म्हणून इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्तींची राज्यसभेवर निवड, पंतप्रधान मोदींची ट्वीट करुन माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यात आता थंडी हळूहळू गायब होत चालली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार येणाऱ्या दिवसांत राज्यातील तापमानात वाढ होताना दिसणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मराठा आरक्षणानुसार कुठलीही भरती किंवा शैक्षणिक दाखले देताना ते कोर्टाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहतील हे ध्यानात ठेवा, असे निर्देश दिले आहेत*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *भाजप नेतृत्त्वाकडून राज्यातील भाजप खासदारांच्या कामांचा सर्व्हे, स्ट्राईक रेट समाधानकारक नसलेल्या डझनभर खासदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महाशिवरात्री निमित्त महाराष्ट्रासह देशभरातील शंकराच्या मंदिरांमध्ये भाविकांची मांदियाळी, शिवमंदिरं आकर्षक फुलं आणि विद्युत रोषणाईने सजली होती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *इंग्लंडविरोधातील पाचव्या कसोटीत टीम इंडिया भक्कम स्थितीत, रोहित- गिलचा शतकी तडाखा, देवदत्त पडिक्कल पर्दापणात चमकला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *विद्याधर गंगाधर पुंडलिक*मराठीतील एक प्रतिभावान लेखक विद्याधर पुंडलिक यांचा जन्म १३ डिसेंबर १९२८ रोजी झाला, आणि मृत्यू ९ऑक्टोबर १९८९ रोजी.पुंडलिकांच्या अश्विन नावाच्या मधल्या मुलाचा अपघातात दुर्दैवी अंत झाला. त्यानंतर पुंडलिक पूर्णपणे बदलून गेले. अश्विनच्या जाण्याचे त्यांनी 'आपल्याला अजून दोन मुले आहेत' हे विसरले असावेत असे वाटण्याइतके दु:ख केले. मराठी लेखिका मोनिका गजेंद्रगडकर या विद्याधर पुंडलिक यांच्या कन्या. 'बापलेकी' या विद्या बाळ आणि पद्मजा फाटक यांनी संपादित केलेल्या पुस्तकात, मोनिकाबाईंनी लिहिलेल्या लेखात त्यांनी त्या दिवसांबद्दल आणि त्या दुर्दैवी घटनेचा वडील-लेकीच्या नात्यावर झालेल्या परिणामांबद्दल लिहिले आहे.साहित्य संमेलनांच्या कार्यक्रमांमध्ये पुंडलिकांचा अधूनमधून सहभाग असायचा, पण संमेलनाध्यक्षपदाच्या भानगडीत ते कधी पडले नाहीत. चाहत्यांकडून त्यांना आग्रह होत नसे असे नाही. पण त्यांनी तो विषय नेहमीच हसण्यावारी नेला. आणीबाणीअखेर झालेल्या ऐतिहासिक निवडणुकांच्या प्रचारात पुंडलिकांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेल अशा पद्धतीने भाग घेतला. पण त्यांची भूमिका स्पष्ट होती. अलीकडच्या काळातील साहित्यिकांप्रमाणे राजकारण्यांची हुजरेगिरी त्यांनी कधीच केली नाही, मात्र मनापासून वाटले तेव्हा, १९८० च्या लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ समाजवादी नेते नानासाहेब गोरे यांनाही स्वच्छ पाठिंबा देणारा उत्कृष्ट ललितशैलीचा लेख त्यांनी लिहिला. अशा प्रकारे, राजकीय भूमिका घेण्याचे आणि तरीही सवंग राजकारण व राजकारण्यांपासून दूर राहण्याचे व्रत पुंडलिकांनी अखेपर्यंत जपले.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सत्याचा शेवट सुख आणि समाधानाच्या मार्गाने जातो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *स्टॅच्यू ऑफ नॉलेज* हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे ?२) देशातील पहिल्या एआय ( AI ) शिक्षिकेचे नाव काय आहे ?३) नविन शैक्षणिक धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ?४) कोणता देश हा भारताची जनऔषधी योजना स्वीकारणारा पहिला देश ठरला आहे ?५) जगातील सर्वात मोठा पुरस्कार कोणता ? *उत्तरे :-* १) लातूर २) इरीस ( तिरुवनंतपुरम येथील शाळेत ) ३) हिमाचल प्रदेश ४) मॉरिशस ५) नोबेल पुरस्कार *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शिवा वसमतकर, वसमत👤 शिवाजी साखरे👤 अरविंद फुलसिंग आडे👤 सतीश उशलवार👤 गजानन शिंदे पाटील👤 योगेश कदम*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भूती जीन व्हावे सांगावे न लगेचि । आता अहंकाराची शांती करा ॥१॥शांती करा तुम्ही ममता नसावी । अंतरी वसावी भूतदया ॥२॥भूतदया ठेवा मग काय उणे । प्रथम साधन हेचि असे ॥३॥असो हे साधन ज्यांचे चित्ती वसे । मायाजाळ नासे तुका म्हणे ॥४॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गाढ चिखलात असताना सुद्धा अफाट संघर्ष करून जे वरती येऊन फुलत असतात त्यांचा सुंगध जिकडे, तिकडे कायमस्वरूपी दरवळत असतो. व जे, दुसऱ्यांना चिखलात ढकलून, फुलत यशस्वी होतात त्यांचा सुंगध मात्र स्वतः पुरते मर्यादित असते. सुंगध नाव एकसारखे आहे मात्र त्यात खूप फरक आहे. म्हणून खऱ्या अर्थाने फुलायचे असेल तर इतरांना आधार देऊन फुलावे दुसऱ्यांना चिखलात गाडून फुलल्याने, त्या नाजूक फुलांचा अपमान होतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*हे क्षण ही निघून जातील*एका राजाला जीवनाविषयी अपार कुतूहल होते.त्याच्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक साधू, संत, फकिराला तो विचारत असे की मला एक असा छोटा मंत्र द्या की तो अगदी कुठल्याही क्षणाला मला उपयोगी पडेल.मला कायम आनंदी ठेवेल.अखेर एका फकिराने त्याला एक अंगठी दिली व सांगितले की यातील डबीत एका कागदावर मंत्र लिहिलेला आहे,पण जेव्हा जीवन-मरण असा प्रश्न तुझ्यापुढे उभा राहील तेव्हाच डबी उघड, तेव्हाच मंत्र कामाला येईल.बरीच वर्षे शांत गेल्यावर राजाचे दिवस फिरले.राज्यात बंडाळी झाली व त्याच्याच कपटी प्रधानाने त्याला तुरुंगात टाकले.पहाटेला फाशी द्यायचे ठरले.विश्वासू सेवकाने राजाला रात्री सोडवून, एक घोडा बरोबर दिला.मजल दरमजल करीत राजा सीमेपासून दूर पळाला.कळाल्यावर दुष्ट प्रधानाने सैनिकांची तुकडी राजाच्या मागावर पाठवली.राजा एका डोंगराच्या शिखरापर्यंत पोहोचला.पुढे दरी होती.घोड्याला चरायला सोडून, मोठ्या खडकाआड लपला. त्याला वाटले आता थोडया वेळात सैनिक गाठणार व आपण मरणार. त्या क्षणी त्याला फकिराच्या अंगठीची आठवण आली.ती त्याने उघडली.त्यात एकच वाक्य लिहिले होते,"This too shall pass "म्हणजे"हाही क्षण निघून जाईल"केवळ ते वाक्य वाचून राजाचे मन शांत झाले.आश्चर्य घडले.सैनिक तेथपर्यंत पोहचले.त्यांना वाटले फक्त घोडा दिसतोय म्हणजे राजा दरीत पडून मेला. ते परतले.राजाने शेजारच्या राज्याची मदत घेऊन काही दिवसांत आपले राज्य परत मिळवले. विश्वासघातकी प्रधानाचा शिरच्छेद केला. विजयाचा जंगी समारंभ चालू असताना, नवीन प्रधानाने पाहिले की महाराज कुठेही अति-उत्साहित न होता प्रशांत मुद्रेने सिंहासनावर विराजमान आहेत.त्याने अदबीने विचारले," महाराज, आपल्या आयुष्यात एवढ्या भयानक घडामोडी घडल्या व त्यातून आपण सहीसलामत बाहेर पडला, तेव्हा आपण आज आनंदाने ओसंडून जायला हवे." राजा म्हणाला, " नाही, आता मला माझ्या मंत्राचा अर्थ व सामर्थ्य कळले आहे. जगात कुठलीही गोष्ट कायमची टिकून राहत नाही.परिवर्तन जगाचा शाश्वत नियम आहे.या जगात सुख ही राहात नाही, दुःखही राहात नाही.हे मला आता समजलेले आहे.म्हणून दुःखात खचू नये, सुखात नाचू नये."This too shall pass !हे क्षणही निघून जातील.ही बोधकथा आपल्याला जगायला शिकवेल.नुसतेच जगायला नव्हे तर प्रत्येक प्रसंगात मनाची शांती अबाधित ठेवण्याची, मन स्थिर ठेवण्याची गुरुकिल्लीच इथे दिलेली आहे.ही कथा पासवर्ड आहे आनंदी आयुष्याचा.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 07 मार्च 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2024/03/world-womens-day.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक गणित दिवस_**_ या वर्षातील ६७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००९:केपलर स्पेस ऑब्झर्व्हेटरी या संशोधन संस्थेची स्थापना.**२००६:लष्कर-ए-तैय्यबा या आतंकवादी संघटनेने वाराणसी येथे बॉम्बस्फोट घडवून आणले.**२००५:महिलांना मताधिकार मिळावा म्हणून कुवेत मध्ये संसदेसमोर प्रदर्शन* *१९४७:जयप्रकाश नारायण यांनी काँग्रेस कार्यकरणीचा राजीनामा दिला**१९३६:दुसरे महायुद्ध – व्हर्सायचा तह धुडकावून जर्मनीने र्हाईनलँडमधे सैन्य घुसवले**१८७६:अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल याला टेलिफोनचे पेटंट मिळाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९२:रोहन बेनोडेकर -- लेखक* *१९८८:आदर्श आनंद शिंदे-- मराठी गायक, भीमगीतांसाठी प्रसिद्ध* *१९८४:नितीन अरुण थोरात-- प्रसिद्ध कादंबरीकार,बालसाहित्यिक,स्तंभलेखक,पत्रकार,उपसंपादक,कथालेखक* *१९७६:गणेश शिवाजी मरकड -- प्रसिद्ध कवी,लेखक तथा उपजिल्हाधिकारी* *१९६९:साधना सरगम किंवा साधना घाणेकर-- भारतीय प्रसिद्ध पार्श्वगायिका**१९६४:छाया भालचंद्र उंब्रजकर-- कवयित्री,लेखिका* *१९५८:अनिल शर्मा-- प्रसिद्ध दिग्दर्शक**१९५५:अनुपम खेर – प्रसिद्ध चित्रपट अभिनेता**१९५५:ज्योत्स्ना आफळे --कवयित्री,लेखिका* *१९५२:सर विवियन रिचर्ड्स–वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू**१९४९:गुलाम नबी आझाद-- राजकारणी माजी केंद्रीय मंत्री* *१९४२:वसंत काशिनाथ गोडबोले -- संत साहित्याचे व्यासंगी अभ्यासक,हस्ताक्षरतज्ञ* *१९४०:प्रा.वसंत सुदाम वाघमारे-- कवी* *१९३८:मुरलीधर अनंता उर्फ बाबा शिंगोटे-- दैनिक 'पुण्यनगरी'चे संस्थापक-संपादक (मृत्यू:६ आगस्ट २०२०)* *१९३४:नरी कॉन्ट्रॅक्टर – भारताचा यष्टिरक्षक**१९३३:आत्माराम कृष्णाजी सावंत-- मराठीतले लेखक,नट,नाटककार,दिग्दर्शक, पत्रकार(मृत्यू:४ मार्च१९९६)* *१९३१:प्राचार्य डॉ.मधुकर सुदाम पाटील-- समीक्षक* *१९२८:डॉ.केशव रामराव जोशी-- संस्कृत पंडित,तत्त्वचिंतक (मृत्यू:१२ जून २०१३)**१९२५:रवींद्र केळेकर-- कोकणी भाषेतील प्रसिद्ध साहित्यिक,२००६ सालच्या ज्ञानपीठ पुरस्कार विजेते(मृत्यू:२७ ऑगस्ट, २०१०)**१९१८:स्नेहलता दसनूरकर-- मराठी लेखिका, शिक्षणतज्ज्ञ (मृत्यू:३ जुलै २००३)**१९१३:डॉ.सुमती बाळकृष्ण क्षेत्रमाडे-- व्यवसायाने डॉक्टर असतानाही,मराठीत कादंबरीलेखन करणाऱ्या लेखिका(मृत्यू:८ ऑगस्ट १९९८)**१९११:सच्चिदानंद हिरानंद वात्स्यायन तथा ’अज्ञेय’ – ज्ञानपीठ पारितोषिक (१९७८) व साहित्य अकादमी पुरस्कार (१९६४) विजेते हिन्दी लेखक व वृत्तपत्रकार (मृत्यू:४ एप्रिल १९८७)**१९०३:रामचंद्रशास्त्री दत्तात्रेय किंजवडेकर-- संस्कृत पंडित (मृत्यू:२० एप्रिल १९४१)**१९०२:शंकर भास्कर जोंधळेकर-- लेखक* *१८९६:यशवंत गंगाधर लेले-- नाटककार, नाट्यसमीक्षक**१८७०:नारायण कृष्ण गद्रे-- मराठी लेखक आणि चरित्रकार ह्यांनी नाटक,कविता, कादंबरी,चरित्र,इतिहास अशा विविध साहित्यप्रकारांत लेखन केले आहे(मृत्यू:१४ जुलै १९३३)**१८४९:ल्यूथर बरबँक – महान वनस्पतीतज्ञ (मृत्यू:११ एप्रिल १९२६)**१७९२:सर जॉन विल्यम हर्षेल – ब्रिटिश गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ, रॉयल अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचा संस्थापक (मृत्यू:११ मे १८७१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१२:रवि शंकर शर्मा ऊर्फ ’रवि’ – संगीतकार (जन्म:३ मार्च १९२६)**२०००:प्रभाकर तामणे– साहित्यिक व पटकथालेखक (जन्म:२९ आक्टोबर १९३१)**१९९६:नीळकंठ जनार्दन कीर्तने-- मराठ्यांच्या इतिहासाचे आद्य टीकाकार,चिकित्सक आणि साक्षेपी संशोधक(जन्म:१जानेवारी १८४४)**१९९३:इर्झा मीर – माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक (जन्म:२६ आक्टोबर १९००)**१९६१:गोविंद वल्लभ पंत – स्वातंत्र्यसैनिक, भारताचे दुसरे गृहमंत्री व उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री,भारताचे पहाडी पुरूष,भारतरत्न (१९५७)(जन्म:१० सप्टेंबर १८८७)**१९२२:गणपतराव जोशी – रंगभूमीवरील असामान्य अभिनेते,शेक्सपियरच्या नाटकांतील त्यांच्या भूमिका अतिशय गाजल्या होत्या (जन्म:१५ ऑगस्ट १८६७)**१६४७:दादोजी कोंडदेव-- शिवाजी महाराजांचे बालपणाचे पालक, शिक्षक व मार्गदर्शक(जन्म:१५७७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जागतिक महिला दिनानिमित्त* कर्तृत्ववान महिलांची संघर्षगाथाभारतातील पहिल्या महिला न्यायाधीश - फातिमा बीबी तसेचभारतातील दुसरी महिला राष्ट्रपती - महामहिम द्रौपदी मुर्मु ..... यासह विविध लेख व कविता वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *प्रधानमंत्री पीक विमा योजनेत 56 कोटी 80 लाख शेतकऱ्यांनी केली नोंदणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात मोठी राजकीय खेळी ; महायुतीकडून मोहिनी नाईक यांना उमेदवारी देण्याबाबत जोरदार चर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुंबई : महाराष्ट्र भूषण प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या बेस्ट ऑफ आशा फोटोबायोग्राफी पुस्तकाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते प्रकाशन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *संविधानाचे रक्षण हाच आमचा जाहीरनामा:पृथ्वीराज चव्हाण यांचे प्रतिपादन; इंडिया आघाडी व समविचारी संघटनांची साताऱ्यात बैठक संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *औंढा नागनाथ येथे महाशिवरात्री निमित्त जय्यत तयारी, गुरुवारी मध्यरात्री होणार महापूजा, शुक्रवारी पहाटे दोन वाजल्या पासून मंदिर होणार खुले*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *प्रकाश आंबेडकरांनी काही जागांची अदलाबदली करावी, पवार-ठाकरेंची भूमिका; वंचितच्या प्रस्तावावर महाविकास आघाडीचा 9 मार्च रोजी निर्णय होणार, संजय राऊतांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *धर्मशालेत आजपासून भारत व इंग्लंड यांच्यातील शेवटचा पाचवा कसोटी सामना, बुमराहचे कमबॅक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••2. नाश्ता करणं टाळणे -रात्रभर न जेवल्यानंतर दिवसभर काम करण्याची ऊर्जा नाश्त्यातून मिळते. पण आपल्यापैकी बरेच जण सकाळी घाई करतात आणि नाश्त्यासारखी महत्त्वाची गोष्ट सोडून देतात. असं केल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होते, ज्यामुळे मेंदूवर परिणाम होतो. दिवसेंदिवस न्याहारी न केल्याने मेंदूचे नुकसान होते, पेशींची कार्यक्षमता कमी होते. पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे मेंदूला सामान्य क्रियाकलाप करणं कठीण जातं. म्हणून नाश्ता करणे मेंदूसाठी चांगली गोष्ट आहे. या लेखातील माहिती ही हार्वर्ड मेडिकल स्कूल आणि अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर अँड स्ट्रोक यासह विविध संशोधन अहवालांमधून एकत्रित मांडली आहे. क्रमशः *संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••यशाचे शिखर पार करणारे, जास्त वेळ विश्रांती घेत नाहीत. *संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्राचा पहिला *वनभूषण* पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले ?२) गोंदिया जिल्ह्यातील 'पुस्तकांचे गाव' म्हणून कोणत्या गावाची निवड झाली आहे ?३) पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा कोणाची निवड झाली ?४) तापी नदीच्या उपनद्या कोणत्या ?५) "महाराष्ट्र हा भारताच्या सिंहद्वाराचा प्रहरी आहे," अशा शब्दात महाराष्ट्राचा गौरव कोणी केला ? *उत्तरे :-* १) चैत्राम पवार, बारीपाडा, जिल्हा - धुळे २) नवेगावबांध, ता. अर्जूनी मोरगाव ३) शाहबाझ शरीफ ४) गिरणा, पूर्णा ५) कवयित्री महादेवी वर्मा, ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गोवर्धन शिंदे👤 विश्वनाथ स्वामी👤 मारोती लोणेकर👤 मनोज घोगरे👤 अविनाश मोटकोलू*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ओळखारे वस्तु सांडारे कल्पना । नका आडराना जावूं झणी ॥१॥झणी जाल कोठे बुडवाल हीत । विचारी मनांत आपुलिया ॥२॥आपुलिया जीवे शिवासी पहावे । आत्मसुख घ्यावे वेळोवेळा ॥३॥घ्यावे आत्मसुख स्वरुपी मिळावे । भूती लीन व्हावे तुका म्हणे ॥४॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपण करत असलेल्या नि:स्वार्थ कार्याविषयी व परखडपणे मत व्यक्त करताना आपल्या मागे, पुढे निंदा, चुगली,टिंगल, टवाळी होत असेल किंवा आपल्यावर मोठ्याने हसत असतील तर तो, आपल्यासाठी आशीर्वाद समजावा. कारण ते, सर्व कार्य करण्याची तसेच ह्या फालतू गोष्टी कडे लक्ष न देण्याची आपल्याला योग्य ती कला जमलेली असते. आणि एका अर्थाने बघितले तर..ते काम पाहिजे तेवढे सोपे नाही. आणि ती कला प्रत्येकाला जमेलच असेही नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *हरिण व कोल्हा*एका कोल्हयाला फिरण्याचा फार नाद होता, तो या गावाहून त्या गावाला सारखा फिरत राही, प्रवास करता करता तो एका गावाला आला. तिथे त्याला एका तलावात पाणी पीत असलेली काही हरणे दिसली. ती पाणी पितापिता मधेच अकाशाकडे पहात होती हे पाहून कोल्हयाने त्यांना असे करण्याचे कारण विचारले, तेव्हा हरणे म्हणाली, 'आम्ही देवाचे आभार मानतो देवाच्याच दयेनं हे पाणी प्यायला मिळतं आहे.' हरणांचे हे बोलणे ऐकून कोल्हयाला हसू आले व तो त्यांची टिंगल करू लागला. यावर त्यातले एक स्पष्टवक्ते हरीण कोल्हयाला म्हणाले, 'अरे कोल्होबा ज्याची त्याची श्रध्दा असते, अशी दुसऱ्याची टिंगल उडविणे वाईट आहे. आपले वागणे वाईट अशा विकृत दृष्टिकोन असलेल्या तुझ्याकडून समंजसपणाची अपेक्षा का करावी.'तात्पर्यः 'दुसऱ्याच्या श्रध्देविषयी टिंगल करणे हे असभ्यपणाचे लक्षण आहे.'•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 06 मार्च 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2022/12/astronomy.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_राष्ट्रीय दंतचिकित्सक दिवस_**_ या वर्षातील ६६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०००:शहर निर्वाह भत्ता (CCA), महागाई भत्ता (DA) आणि घरभाडे भत्ता (HRA) म्हणून मिळणारी रक्कम करपात्र असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब**१९९९:जगप्रसिद्ध खजुराहो मंदिर समुहाच्या सहस्राब्दी सोहळ्याचे राष्ट्रपती के.आर. नारायणन यांच्या हस्ते उदघाटन**१९९८:विख्यात गझलगायक जगजितसिंग यांना मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा ’लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर**१९९७:स्वाध्याय परिवाराचे संस्थापक पांडुरंगशास्त्री आठवले यांची टेंपलटन पुरस्कारासाठी निवड**१९९२:’मायकेल अँजेलो’ नावाचा संगणक विषाणू पसरण्यास सुरूवात झाली.**१९७५:इराण व इराक यांच्यात सीमाप्रश्नावर संधी झाली.**१९७५:मराठीतील पहिला राष्ट्रपती सुवर्णपदक विजेता चित्रपट "श्यामची आई" मुंबईत प्रदर्शित**१९५३:जॉर्जी मॅक्सिमिलानोव्हिच सोविएत रशियाचे अध्यक्ष झाले.**१९४०:रशिया व फिनलंड मधे शस्त्रसंधी झाली**१९०५:शांतिनिकेतन येथे महात्मा गांधी व रवींद्रनाथ टागोर यांची पहिली भेट**१८४०:बाल्टिमोर कॉलेज ऑफ डेंटल सर्जरी हे पहिले दंतवैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले.**१७७५:सुरत येथे राघोबादादा उर्फ रघुनाथराव पेशवे आणि इंग्रज यांच्या तह झाला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९७:जान्हवी कपूर-- हिंदी चित्रपटातील अभिनेत्री**१९८१:सौरभ गोखले-- मराठी अभिनेता**१९६८:लक्ष्मण महादेव घागस-- लेखक,कवी* *१९६६:मकरंद देशपांडे-- रंगभूमीवरचा तसेच रुपेरी पडद्यावरचा नावाजलेला कलाकार,लेखक,दिग्दर्शक**१९६५:देवकी पंडीत – शास्त्रीय गायिका**१९५९:लेविन शाहुराव भोसले -- लेखक* *१९५३:माधुरी तळवलकर-- प्रसिद्ध मराठी लेखिका**१९५२:पंडित राजाराम उर्फ राजा काळे-- भारतीय गायक,संगीतकार आणि भारतीय शास्त्रीय,आणि भक्ती संगीताचे अभ्यासक* *१९४८:राज एन.सिप्पी(राज सिप्पी)-- भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता**१९४१:डॉ.हेमंत लक्ष्मण विंझे-- व्यवसायाने डॉक्टर असलेले,कवी,लेखक* *१९३७:वासुदेव नरहर सरदेसाई-- मराठी गझलकार* *१९३६:माणिकलाल कोंडबाजी बारसागडे-- कवी,लेखक* *१९३४:डॉ.शशिकला जयंत कर्डिले-- प्रसिद्ध लेखिका,अनुवादक* *१९३४:मुरलीधर कापडी-- प्रसिद्ध दिग्दर्शक (मृत्यू:१२ऑक्टोबर २००६ )* *१९२५:नयनतारा देसाई-- लेखिका* *१९१६: वसंत अंबादासराव तुळजापूरकर-- कवी* *१९०१:डॉ.श्रीनिवास नारायण बनहट्टी (श्री.ना. बनहट्टी)-- संशोधक,समीक्षक,संपादक (मृत्यू:२२ एप्रिल १९७५)**१८९९:शिवराम लक्ष्मण करंदीकर-- चरित्र लेखक**१४७५:मायकेल अँजेलो – इटालियन शिल्पकार आणि चित्रकार (मृत्यू:१८ फेब्रुवारी १५६४)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:श्रीकांत मोघे-- भारतीय चित्रपट आणि थिएटर अभिनेता (जन्म:६ नोव्हेंबर १९२९)* *२०१८:वसंत नरहर फेणे--कथाकार, कादंबरीकार(जन्म:२८ एप्रिल १९२८)* *१९९९:सतीश वागळे – हिन्दी आणि मराठी चित्रपट निर्माते**१९९२:रणजित देसाई – सुप्रसिद्ध नामवंत मराठी साहित्यिक,’स्वामी’कार (जन्म:८ एप्रिल १९२८)**१९८६:माधवराव खंडेराव बागल-- महाराष्ट्रातील सामाजिक-सुधारणा चळवळीतील कृतीशील कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक,विचारवंत,लेखक आणि चित्रकार(जन्म:२८ मे १८९५)* *१९८२:रामभाऊ म्हाळगी – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक,जनसंघ या राजकीय पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले सरचिटणीस (जन्म:९ जुलै १९२१)**१९८२:अॅन रँड – जन्माने रशियन असलेल्या अमेरिकन लेखिका(जन्म:२ फेब्रुवारी १९०५)**१९८१:गो.रा.परांजपे – मराठीतील आघाडीचे विज्ञान प्रसारक,नामवंत शास्त्रज्ञ,’रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’चे पहिले भारतीय प्राचार्य**१९७३:पर्ल एस.बक – नोबेल पारितोषिक विजेत्या (१९३८) अमेरिकन लेखिका (जन्म:२६ जून १८९२)**१९६७:स.गो.बर्वे – कर्तबगार प्रशासक (जन्म:२७ एप्रिल १९१४)* *१९५७:अमिया चक्रवर्ती -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माता(जन्म:३० नोव्हेंबर १९१२)**१९०५:गोविंद शंकरशास्त्री बापट-- भाषांतरकार संस्कृतचे व्यासंगी पंडित (जन्म:८ फेब्रुवारी१८४४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सूर्यमाला आणि ग्रह*सूर्यमाला ही सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या भोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंनी बनलेली आहे. सूर्यमालेत आठ मुख्य ग्रह आहेत. सूर्यापासूनच्या अंतराप्रमाणे ग्रह असे आहेत - बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस (हर्षल) व नेपच्यून (वरुण). प्लूटो हा त्याच्या शोधापासून (म्हणजेच १९३० पासून) सूर्यमालेतील नववा ग्रह मानला जातो...... चित्रासह पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सात टप्प्यात मतदान होऊ शकतं.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *केंद्रीय मंत्री अमित शाह हे जळगाव दौऱ्यावर युवा संमेलनाच्या माध्यमातून हजारो तरुणांशी साधला संवाद*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींची सभा, ठाण्यात धडकणार भारत जोडो न्याय यात्रा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नागपूर : कोराडी औष्णिक विद्युत केंद्रातील कंत्राटी कर्मचारी संपावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मंत्री छगन भुजबळ यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र:नाशिक शहरातील भूसंपादन प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *यंदाची गर्मी करणार अंगाची लाही लाही; जागतिक हवामानावर एल निनोचा प्रभाव कायम, WMO ची मोठी भविष्यवाणी !*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत-पाक सामन्याचे तिकीट 1.86 कोटींवर पोहोचले : 9 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये होणार सामना, दोन्ही संघांचे सर्व सामने अमेरिकेत होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1) अपुरी झोप - अमेरिकेच्या न्यूरोलॉजी आणि वेलनेस सेंटरच्या मते, आपल्या मेंदूचं सर्वात जास्त नुकसान हे अपुऱ्या झोपेमुळं होतं.प्रौढांसाठी पुरेशी झोप म्हणजे दिवसातील 24 तासांपैकी 7 ते 8 तासांची झोप. रात्री सलग झोप घेणं अधिक प्रभावी राहातं, असं तज्ज्ञ सांगतात.झोपल्यानंतर मेंदूला विश्रांती मिळते. याशिवय झोपेच्यावेळेस मेंदू नवीन पेशी तयार करतो. परंतु जर तुम्ही 7 तासांपेक्षा कमी झोपला तर नवीन पेशी तयार होत नाहीत.परिणामी, तुम्हाला काहीही आठवत नाही. लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते. चिडचिड होते. निर्णय घेण्यास त्रास होतो. झोपेच्या कमतरतेमुळे डिमेंशिया अल्झायमरचा धोकाही वाढतो.जर तुम्हाला तुमच्या मेंदूचं संरक्षण करायचं असेल, तर एकच उपाय आहे. रोज रात्री किमान सात तासांची झोप घेणं. आठ तास झोप घेतली तर आणखी उत्तम.त्यासाठी तुम्ही झोपी जाण्याआधी किमान एक तासआधी बेडवर जायला हवं. या काळात कोणतंही गॅझेट वापरू नका.झोपेचं वातावरण तयार करण्यासाठी बेडरूम अगोदर स्वच्छ करा. खोलीतील प्रकाश कमी करा. तुमचा बेड, कपडे, खोलीचं तापमान सर्वकाही आरामदायक करा.दुसरी गोष्ट - कधीही तोंडावर पांघरुण घेऊन झोपू नका. कारण त्यामुळे आपण नाकातून ऑक्सिजन शरीरात घेतो आणि कार्बन डायऑक्साइड वायू बाहेर सोडतो. या सततच्या प्रक्रियेमुळे तुमच्या चेहऱ्याभोवती CO2 जमा होतो. परिणामी तुम्हाला रात्रीतून ऑक्सिजनची कमतरता भासू शकते.क्रमशःवरील लेखातील माहिती ही हार्वर्ड मेडिकल स्कूल आणि अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर अँड स्ट्रोक यासह विविध संशोधन अहवालांमधून एकत्रित मांडली आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्यांच्या कडून काही आशा नसतात तेच लोक अनेकदा चमत्कार करतात !*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) सातारा जिल्ह्यातील *'फुलपाखराचे गाव'* कोणते ?२) राज्य फुलपाखरू घोषित करणारे पहिले राज्य कोणते ?३) फुलपाखराचे आयुष्य किती दिवसाचे असते ?४) भारताचे राष्ट्रीय फुलपाखरू कोणते ?५) फुलपाखरे कशाचे प्रतीक आहेत ? *उत्तरे :-* १) महादरे २) महाराष्ट्र ३) १४ दिवस ४) ऑरेंज ओकलिफ ५) परिवर्तन, पुनरुत्थान, सहनशक्ती, आशा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 श्री अशोक दगडे, पत्रकार, बिलोली👤 सुरेश बावनखुळे, सहशिक्षक, माहूर👤 महेश होकर्णे, प्रेस फोटोग्राफर, नांदेड👤 मीनल आलेवार👤 श्रीकांत संतोष येवतीकर👤 अविनाश गायकवाड👤 कैलास वाघमारे👤 राजकुमार कांबळे👤 माधव गोतमवाड👤 सुरेश कटकमवार👤 राज शंकरोड, धर्माबाद👤 मनोहर कोकुलवार, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दोष हे जातील अनंत जन्मीचे । पाय त्या देवाचे न सोडावे ॥१॥न सोडावे पाय निश्चय तो करा । आळवा शारंगधरा भावबळे ॥२॥धरुनि केशव आणा भावबळे । पापियां न कळे काहि केल्या ॥३॥न कळे तो देव संत संगावाचुणी । वासना जाळोनि शुध्द करा ॥४॥शुध्द करा मन देहातित व्हावे । वस्तुती ओळखावें तुका म्हणे ॥५॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••इतरांच्या वाटेत काटे पेरणाऱ्यांनी तसेच अडथळा निर्माण करणाऱ्यांनी स्वतः किती फुलासमान कोमल हदयाचे आहेत ते, ओळखण्यासाठी स्वतः चे एकदा तरी वेळात, वेळ काढून आत्मपरीक्षण करण्याचा अवश्य प्रयत्न करून बघावे. पुढे असे कोणतेही व्यर्थ कार्य करण्याची मुळात सवय लागणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जांभूळ आख्यान ही गोष्ट आहे द्रौपदीची..तिने आपद्धर्म म्हणुन पाच पतींशी विवाह केला..पण तरीही तिला पतिव्रता हा दर्जा दिला गेला..तिच्या पाच पतींनी आणखी वेगवेगळे विवाह केलेच..पण ते पुरुष होते त्यामुळे बहुपत्नीकत्व त्यांना परंपरेने बहाल केलं होतं.तर गोष्ट आहे द्रौपदीची..कुठल्या तरी समारंभाच्या वेळी कर्ण द्रौपदीच्या नजरेस पडला..तेव्हा तो पांडव आहे हे अर्थातच तिला माहिती नसणार.पण तरीही त्याचं देखणेपण पाहुन ती क्षणभर मोहीत झाली..आख्यानकार म्हणतात,” कर्णाला पाहुन द्रौपदीचं मन पाकुळलं ( पाघळलं).आख्यानकार आणखी पुढे म्हणतात की द्रौपदीला क्षणभर वाटुन गेलं की हा देखणा युवक सहावा पांडव असता तर?????आत्ता बारा महिन्यांची जशी विषम विभागणी झाली आहे त्याऐवजी ती सहा जणात दोन दोन महिने अशी झाली असती..अंतर्ज्ञानी कृष्णाच्या ही गोष्ट लक्षात आली..द्रौपदीच्या मनात परपुरुषाचा विचार येणं ही गोष्ट पांडवांच्या दृष्टीने धोक्याची होती..कारण द्रौपदी हे पांडवांना एकत्र बांधुन ठेवणारं सुत्र होतं.मग कृष्णाने वनविहाराचा बेत आखला..वनविहार झाल्यावर सर्वांना भूक लागली म्हणुन भीम फळं शोधण्यासाठी गेला..परंतु कृष्णाने आपल्या मायेने रानातली सर्व फळं नाहिशी केली..एका वृक्षावर एकुलतं एक जांभूळ शिल्लक होतं.भीमाने तेच तोडुन आणलं..त्या वनात कोणी एक ऋषी तप करीत होते..आणि बारा वर्षाचं तप पुर्ण झाल्यानंतर खाण्यासाठी म्हणुन त्यांनी ते जांभूळ राखुन ठेवलं होतं असं शुभ वर्तमान कृष्णाने सर्वांच्या कानी घातलं..आता पांडवांच्यात घबराट पसरली..जांभूळ जाग्यावर दिसलं नाही तर ऋषींचा कोप होणार..कृष्णाने सांगितलं,की तुमच्यापैकी ज्याचं मन स्वच्छ आहे ,ज्याच्या मनात कधीच परपुरुषाचा/परस्त्रीचा विचार आलेला नसेल त्याने मनापासुन प्रार्थना करावी.जांभूळ आपोआप झाडाला जाऊन चिकटेल..म्हणजे आता तिथे द्रौपदीपेक्षा योग्य व्यक्ती नाहीच कोणी.सगळ्यांच्या नजरा आता द्रौपदीकडे..द्रौपदी मनातुन खजील.भयभीत.जांभूळ चिकटलं नाही तर तिच्या पातिव्रत्यावरच घाला..कारण काही क्षणापुरता का होईना पण कर्णाचा विचार तिच्या मनात आलाच होता..तिने मनोमन कृष्णाची करुणा भाकली,पुन्हा अशी चूक होणार नाही अशी मनोमन कबुली दिली आणि हात जोडुन प्रार्थना केली आणि काय आश्चर्य ?जांभूळ परत झाडाला चिकटलं..पण उलट्या बाजुने..द्रौपदीला तिच्या चुकीची सतत आठवण रहावी यासाठी कृष्णाने केलेली ही योजना..म्हणजे एका अर्थी उलटं जांभूळ हे पापाचं प्रतीक..म्हणुन त्याला देवाच्या पुजेत ,उपासाच्या फळामधे स्थान नाही..आख्यानकार आणखीही सांगतो, की जांभूळ खाल्लेलं लपवता येत नाही..जीभ जांभळी करुन सोडतं ते..थोडक्यात - केलेलं पाप लपत नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 05 मार्च 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~काटकसर लेख वाचण्यासाठी Link - https://nasayeotikar.blogspot.com/2024/03/katakasar.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ६५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* ••••••••••••••••••••••••••••••••*२०००:पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते कर्नाटकातील कैगा अणूवीजप्रकल्प (युनिट - २) राष्ट्राला अर्पण**१९९९:’इंडियन फिजिक्स असोसिएशन’ तर्फे देण्यात येणार्या आर. डी. बिर्ला स्मृती पारितोषिकासाठी डॉ. जयंत नारळीकर व प्रा. अशोक सेन यांची निवड**१९९८:नेहमीच्या अस्त्रांबरोबरच कमी पल्ल्याची विमानभेदी क्षेपणास्त्रे सोडू शकणार्या, रशियाकडुन घेतलेल्या ’सिंधुरक्षक’ या पाणबुडीचे मुंबई येथे आगमन**१९९७:ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या सप्तशताब्दीच्या सांगतेनिमित्त राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते ज्ञानेश्वरांची प्रतिमा असणार्या टपाल तिकिटाचे प्रकाशन* *१९६६:मैसूरचे माजी संस्थानिक जयचामराजेन्द्र वडियार यांचा बंगळूर येथील राजवाडा व त्यासभोवतालची जागा राज्य सरकारच्या ताब्यात घेण्याची परवानगी देणारे विधेयक कर्नाटक विधानसभेत संमत**१९३३:भयानक मंदीमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांनी सर्व बँका काही दिवसांसाठी बंद केल्या व आर्थिक व्यवहारांवर बंदी घातली.**१९३१:दुसर्या गोलमेज परिषदेपुर्वी गांधी-आयर्विन करार झाला.**१८५१:’जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ची (GSI) स्थापना**१६६६:शिवाजीमहाराजांनी राजगडावरून आग्र्यास प्रयाण केले.**१५५८:फ्रॅन्सिस्को फर्नांडीस याने धूम्रपानासाठी सर्वप्रथम तंबाखूचा वापर केला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७५:चंद्रकांत थावरु राठोड -- कवी, लेखक* *१९७४:हितेन तेजवानी-- दूरचित्रवाहिनी माध्यमातील भारतीय अभिनेता**१९७३:श्रीमंत सखाराम ढवळे -- कवी* *१९७२:प्रा.शर्मिला सुनील गोसावी-- कवयित्री लेखिका* *१९७०:डॉ.मिलिंद विनायक बागुल -- कवी, लेखक,संपादक* *१९६७:अंजली सत्यपाल श्रीवास्तव -- कथा लेखिका* *१९६७:प्रा.डॉ.रामनाथ गंगाधर वाढे -- लेखक,संशोधक* *१९६५:गजानन माधवराव माधसवार-- कवी, लेखक* *१९६३:सौरभ शुक्ला--भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेता,दिग्दर्शक आणि पटकथा लेखक**१९५९:शिवराजसिंह चौहान-- मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री**१९५७:संगीता बापट -- कवयित्री,गायिका, संगीततज्ञ* *१९५६:डॉ.मधुसूदन दत्तात्रेय गादेवार -- कवी, लेखक* *१९४५:गोविंद गोडबोले -- प्रसिद्ध बालसाहित्यिक* *१९२९:संतोष आनंद-- सुप्रसिद्ध भारतीय गीतकार**१९२९:राम उगावकर -- कवी,शाहीर, गीतकार (मृत्यू:५ एप्रिल २०१३)* *१९२८:अॅलिक पदमसी-- भारतीय थिएटर व्यक्तिमत्व आणि जाहिरात चित्रपट निर्माता(मृत्यू:१७ नोव्हेंबर २०१८)**१९२५:वसंत पुरुषोत्तम साठे-- पूर्व कॅबिनेट मंत्री(मृत्यू:२३ सप्टेंबर २०११)* *१९१७:आनंदीबाई विजापुरे--आत्मचरित्रकार, कथाकार,कादंबरीकार(मृत्यू:२० ऑक्टोबर १९९९)**१९१६:बिजू पटनायक – ओरिसाचे माजी मुख्यमंत्री, केन्द्रीय पोलाद, खाणकाम आणि कोळसा मंत्री (मृत्यू:१७ एप्रिल १९९७)**१९१३:गंगूबाई हनगळ – किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका (मृत्यू:२१ जुलै २००९)**१९११:सुब्रोतो मुखर्जी-- भारतीय वायुसेनेचे पहिले वायुसेना प्रमुख(मृत्यू:८ नोव्हेंबर, १९६०)**१९१०:श्रीपाद वामन काळे-- निंबंधकार. संपादक**१९०८:सर रेक्स हॅरिसन – ब्रिटिश आणी अमेरिकन रंगभूमीवरील आणि हॉलिवूड चित्रपटांतील अभिनेते (मृत्यू:२ जून १९९०)**१९०६:सुमंत मूळगावकर -- भारतीय उद्योगपती,टाटा मोटर्सचे आर्किटेक्ट(मृत्यू:१९८९)**१९०५:हरिहर वामन देशपांडे-- लेखक (मृत्यू:२० एप्रिल १९६५)**१८९८:चाऊ एन लाय – चीनचे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू:८ जानेवारी १९७६)**१८७३:लक्ष्मण नारायण जोशी--मराठीतील ऐतिहासिक आख्यायिकांचे संग्राहक,लेखक, ग्रंथसंपादक व पत्रकार(मृत्यू:१जुलै १९४७)**१८५६:राव बहाद्दुर पुरुषोत्तम बाळकृष्ण जोशी-- मुंबई इलाख्याची दर्शनिका (गॅझेटियर) तयार करण्यात सहभाग असलेले मानववंशशास्त्रज्ञ,इतिहासाचे अभ्यासक व कवी(मृत्यू:२६ मार्च, १९२९)**१५१२:गेरहार्ट मरकेटर – नकाशाकार, गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ (मृत्यू:२ डिसेंबर १५९४)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१३:ह्युगो चावेझ – व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष (जन्म:२८ जुलै १९५४)**१९९५:जलाल आगा – चरित्र अभिनेता (जन्म:११ जुलै १९४५)**१९८९:बाबा पृथ्वीसिंह आज़ाद – क्रंतिकारी स्वातंत्र्यसैनिक,गदर पार्टीचे एक संस्थापक* *१९८५:पु.ग.सहस्रबुद्धे –’महाराष्ट्र संस्कृती’कार* *१९६८:नारायण गोविंद चाफेकर – समाजशास्त्रज्ञ व ग्रंथकार (जन्म:१८६९)**१९६६:शंकरराव मोरे – समाजवादी व साम्यवादी विचाराचे व्यासंगी नेते, पुणे जिल्हा स्कूल बोर्डाचे अध्यक्ष**१९५३:जोसेफ स्टालिन – सोविएत रशियाचे राष्ट्राध्यक्ष (जन्म:१८ डिसेंबर १८७८)**१८२७:अलासांड्रो व्होल्टा – इटालियन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म:१८ फेब्रुवारी १७४५)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*काटकसर म्हणजे बचत*काटकसर म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर येते ते म्हणजे पैश्याची बचत किंवा काटकसर. फक्त पैश्याचीच बचत किंवा काटकसर करता येते अन्य दुसऱ्या कोणत्याही वस्तूची आपणांस बचत वा काटकसर करता येत नाही का ? यावर देखील विचार करायलाच हवं. आपण पावलोपावली पैश्याची बचत कशी करावी ? याविषयी इतरांना सांगतो किंवा इतरांकडून ऐकतो. म्हणूनच त्या गोष्टीवर............... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *गुगलने आपले चॅटबॉट जेमिनी मधील आर्टिफिशल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या गोंधळाबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माफी मागितली*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर भारतीयांसाठी तीर्थक्षेत्र बनेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *उद्धव ठाकरेंनी फुंकले लोकसभा निवडणुकीचे रणशिंग : मावळ लोकसभा मतदारसंघातून संजोग वाघेरे तर रायगड मधून अनंत गीते यांना उमेदवारी जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *जालना- मुंबई जनशताब्दीचा हिंगोली पर्यंत विस्तार, पहाटे 5 वाजता निघून दुपारी 2 वाजता मुंबईत पोहोचणार; खा. हेमंत पाटलांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अखेर निगडीपर्यंतच्या मेट्रोच्या भूमिपूजनाला मुहूर्त; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी होणार भूमिपूजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ऑक्टोबर १९८१ मधील गिरणी कामगारांना गृहयोजनेत सामावून घ्यावे, गिरणी कामगार कल्याणकारी संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अष्टपैलू शार्दूल ठाकूरच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर मुंबईने रणजी करंडक स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये तामिळनाडूवर एक डाव आणि ७० धावांनी मिळवला विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 कावीळ म्हणजे काय ? 📙 कावीळ किंवा कामला हा एक स्वतंत्र विकार मानण्यापेक्षा ते एक रोगलक्षण मानणे सयुक्तिक आहे. यकृतातून बाहेर जाणाऱ्या पित्तरसापेक्षा अधिक पित्तरस यकृतात तयार होऊ लागला म्हणजे कावीळ होते. जास्तीचा शिल्लक राहिलेला पित्ताचा भाग रक्तात मिसळला जातो व सर्व शरीरभर पसरतो. यातूनच डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा दिसू लागतो. त्वचेचा रंग पिवळसर होऊ लागतो. लघवी पिवळी होते व तीव्र काविळीत लालसर पिवळी दिसते. पित्त यकृतातून बाहेर पडताना पित्तनलिकेत किंवा प्रत्यक्ष यकृतांतर्गत अडथळा निर्माण झाला, तर शौचास पांढरेफिके होऊ लागते.कावीळ हे यकृतविकृतीचे किंवा रक्तातील तांबड्यापेशी जास्त नाश पावत असल्याचे चिन्ह होय. या रोगाचे निदान मुत्रपरीक्षेतून व रक्ताच्या चाचण्यांतून होते. नवजात बालकाला रक्तपेशींचे दान निसर्गाने जरा सढळपणे दिलेले असते. त्यामुळे जन्मानंतर काही दिवसांतच या जास्तीच्या पेशी नाश पावतात व मंद स्वरूपात कावीळ उद्भवते. पण ती आपोआपच थोड्याच दिवसांत नाहीशी होते. क्वचित ती तीव्र स्वरूपात व अगदी पहिल्या दुसऱ्या दिवशीच दिसल्यास त्या बालकाला फोटोथेरपी हा अल्ट्राव्हाॅयलेट किरणांचा उपचार दिला जातो. हिमोलायटिक ऍनिमिया या रक्तक्षयाच्या आजारातही रक्तपेशींचा नाश होत असल्याने कावीळ होते. मूळ कारण दूर झाल्यास ती बरी होते.आपण सहसा काविळीचा रुग्ण पाहतो, तो विषाणूजन्य पाण्यातून झालेल्या संसर्गाचा बळी असतो. तोंडावाटे पाण्यातून हे विषाणू शरीरात प्रवेश करतात व त्यामुळे यकृताला सूज येते, कार्यात अडथळा होतो. यकृताचे तांबड्या रक्तपेशी नष्ट करण्याचे काम नीट न झाल्याने कावीळ दिसू लागते. मळमळ, ओकारी, भूक मंदावणे, गुबारा धरणे, शरीराला कंड सुटणे, मलावरोध ही लक्षणे प्राधान्याने सर्वच रुग्णांत दिसतात. डोळ्यांचा, त्वचेचा व मूत्राचा रंग पिवळा होतो, तर शौचास पांढरट चिकणमातीसारखे होऊ लागते. पचनास आवश्यक पित्तरसाचा अभाव झाल्याने ही लक्षणे दिसतात. सामान्यपणे पाच ते दहा दिवसांत हा आजार बरा होतो.दुसऱ्या प्रकारच्या काविळीत म्हणजे रक्ताद्वारे संसर्ग होणाऱ्या काविळीत विषाणू एकाच्या रक्तातून दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करतात. इंजेक्शनच्या सुया, शस्त्रक्रियेच्या सुया वा रक्त यांच्याशी सतत संपर्क येणाऱ्या सिस्टर, डॉक्टर यांसारखी व्यक्ती, सर्जन यांना हा संसर्ग होण्याची शक्यता असते. ही कावीळ तीव्र स्वरूपाची असून बरी व्हायला खूप वेळ लागतो. काही वेळा यकृतदाह होऊन यकृताचे काम कायमचेच मंदावत जाते. यालाच 'लिव्हर सिर्हाॅसिस' असे म्हणतात. सिर्हाॅसिसमध्ये यकृत आक्रसत जाऊन त्याचे काम बंद पडत जाते. हा एक गंभीर रोग आहे. सध्या काविळीची लस (हेपॅटायटिस बी) टोचली जाते, ती या प्रकारच्या काविळीला प्रतिबंध करते. या प्रकारच्या काविळीवर उपचार नसल्याने प्रतिबंध हाच योग्य उपाय तर ठरतो.अंथरुणात पडून पूर्ण विश्रांती, तोंडावाटे भरपूर शर्करायुक्त पेयद्रव्ये, हलका कर्बयुक्त आहार घेतल्यास सर्वसामान्य कावीळ आपोआप नियंत्रणात येते. तीव्र लक्षणांत शिरेवाटे ग्लुकोज सलाईन देऊन रुग्णाच्या पचनसंस्थेला आराम देऊन मदत केली जाते.कावीळ हा विषाणूजन्य आजार असल्याने रुग्णाशी संपर्क आल्यास हात स्वच्छ धुणे, त्याची भांडी, अंथरूण, कपडे यांची वेगळी व्यवस्था करणे व अन्य लोकांनी पाणी उकळून पिणे हा प्रतिबंधाचा महत्त्वाचा मार्ग असतो.शेवटी पण महत्त्वाचे, काविळीची लक्षणे व प्रत्यक्ष संसर्ग होण्याची कारणे जरी दूर झाली, तरी रुग्णाच्या डोळ्यांचा रंग काही आठवडे पिवळसर राहतो व हळूहळू नेहमीसारखा होतो.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपलं अस्तित्व आपल्या कामावर अवलंबून असते, कोणाच्या दृष्टिकोनावर नाही. *संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोणत्या धातूला *'व्हाईट गोल्ड'* म्हटले जाते ?२) "महाराष्ट्र म्हणजे कार्यकर्त्यांचे मोहोळ", अशा शब्दात महाराष्ट्राची प्रशंसा कोणी केली होती ?३) महाराष्ट्रातील प्रमुख आदिवासी जमाती कोणत्या ?४) कृष्णा नदीच्या उपनद्या कोणत्या ?५) वाचनालयाची चळवळ महाराष्ट्रभर कोणी सुरू केली ? *उत्तरे :-* १) लिथियम २) महात्मा गांधी ३) वारली, गोंड, कातकरी ४) कोयना, वेण्णा, वारणा, पंचगंगा, वेरुळा ५) गोपाळ हरी देशमुख*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गंगाधर मदनुरकर, सहशिक्षक, धर्माबाद👤 भास्कर रेड्डी ऐंगोड, येताळा👤 गंगाधर नुकूलवार, सहशिक्षक, देगलूर👤 माणिक आहेर, सहशिक्षक, नाशिक👤 अशोक कहाळेकर, सहशिक्षक, नायगाव👤 रमेश मेरलवार, करखेली👤 प्रकाश पडकूटलावार👤 पोषट्टी सिरमलवार👤 रावसाहेब वाघमारे👤 उमाकांत पा. विभूते चोंडीकर👤 दिनेश चव्हाण👤 गौस पाशा शेख, सहशिक्षक, पालघर👤 गीता ढगे, सहशिक्षिका, बिलोली👤 बालाजी हेंबाडे👤 बालाजी तिप्रेसवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्याची त्याला पदवी इतरां न साजे । संताला उमजे आत्मसूख ॥१॥आत्मसूख घ्यारे उघडा ज्ञानदृष्टी । याविण चावटी करु नका ॥२॥करु नका काही संतसंग धरा । पूर्विचा जो दोहरा उगवेल ॥३॥उगवेल प्रारब्ध संतसंगे करुनी । प्रत्यक्ष पुराणी वर्णियेले ॥४॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जगात केवळ आपणच दुःखी आहोत असं नाही. या पृथ्वीतलावर अनेकजण दुःखी आहेत. प्रत्येकांचे जीवन सुखा,दु:खाने भरलेले आहे. आपणच दुःखी आहोत म्हणून त्याच विवंचनेत न राहता आपण जरा आजुबाजूचा देखील विचार करायला पाहिजे. कदाचित त्यांच्यापेक्षा आपले दु:ख कमी असू शकतात. म्हणून त्यांचे दुःख आपुलकीने समजून घेण्याचा प्रयत्न केले पाहिजे व फुल नाही तर फुलाची पाकळी देऊन त्यांची मदत केली पाहिजे हा एक प्रकारचा माणुसकी धर्म आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••संस्कारीत मुलेच यशस्वीनैतिक मूल्यांचे शिक्षण देणा-या एका शिक्षकाने मुलांसाठी चॉकलेटस मागवली होती. त्यांनी सगळ्या मुलांना रांगेत बसवले होते. शिक्षक चॉकलेटस वाटायला सुरुवात करणार इतक्यात शाळेचा शिपाई त्या वर्गात येऊन पोहोचला व म्हणाला,''सर तुम्हाला आताच्या आत्ता प्राचार्यांनी काही महत्वाचे सांगण्यासाठी त्यांच्या कार्यालयात बोलावले आहे.'' शिक्षकांनी चॉकलेटचा डबा हातातून खाली ठेवला व मुलांना म्हणाले,'' मुलांनो मला काही कामासाठी प्राचार्यांकडे जावे लागत आहे. खरेतर ही चॉकलेटस मला माझ्या स्वत:च्या हाताने तुम्हाला द्यायची खूप इच्छा होती. परंतु मला जावे लागणार आहे. पाहिजे तर तुम्ही हाताने चॉकलेटस घेऊ शकता. अन्यथा मी परत आल्यावर तुम्हाला देईन'' ही चांगली संधी आहे. असा काही विद्यार्थ्यांनी विचार केला व त्यांनी चॉकलेटस स्वत:च्या हाताने घेऊन खाल्ली तर काही विद्यार्थ्यांनी शिक्षकांची वाट बघण्यात वेळ घालविला. शिक्षक परत आले व त्यांनी मुलांना विचारले,'' मुलांनो ज्यांनी ज्यांनी स्वत:च्या हाताने चॉकलेटस खाल्ली त्यांनी आपले हात वर करा'' ज्यांनी चॉकलेटस खाल्ली होती त्यांनी हात वर केले. मग शिक्षकांनी उरलेल्या मुलांना प्रेमाने चॉकलेटस वाटली. काही वर्षानंतर त्या शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांची माहिती मिळविली तेव्हा त्यांना असे दिसून आले की ज्या मुलांनी स्वत:च्या हाताने चॉकलेटस घेतले होते ती मुले सामान्य स्वरूपातील कामे करून उदरनिर्वाह करत होते तर ज्यांना शिक्षकांनी चॉकलेटस दिली ते सर्व विद्यार्थी उच्च पदावर काम करत होते. ही सर्व संस्कारांची देणगी होती.तात्पर्य :- संस्काराने माणूस घडतो. मिळालेली संधी आणि तिचा योग्य वापर करणे हे मानवाच्या हाती आहे. चुकीच्या मार्गाने गेल्यास व संयम न पाळल्यास योग्य संधी मिळूनही तिचा वापर करता येत नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04 मार्च 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~या समुहात add होण्यासाठी Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_राष्ट्रीय सुरक्षा दिन_**_ या वर्षातील ६४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००१:पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते गुरुदासपूर येथील रणजितसागर धरण देशाला अर्पण**१९९६:चित्रकार रवी परांजपे यांना ’कॅग हॉल ऑफ फेम’ हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर**१९८०:प्रचंड बहुमताने निवडणुका जिंकून रॉबर्ट मुगाबे हे झिम्बाब्वेचे पहिले कृष्ण्वर्णीय पंतप्रधान बनले.**१९६१:१९४६ मधे इंग्लंडमधे बनवलेली युद्धनौका भारतीय सैन्यदलात दाखल झाली व तिचे ’आय.एन.एस.विक्रांत’ असे नामकरण करण्यात आले. ही भारतीय आरमारात दाखल झालेली पहिली विमानवाहू नौका होती.**१९५१:नवी दिल्ली येथे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते पहिल्या आशियाई खेळांचे उद्घाटन झाले. या खेळांत ११ देशांतील ४८९ महिला व पुरुष स्पर्धकांचा सहभाग होता.**१९३८:सौदी अरेबियात प्रथमच खनिज तेल सापडले**१८६१:अब्राहम लिंकन अमेरिकेचे १६ वे अध्यक्ष झाले.**१७९१:व्हरमाँट हे अमेरिकेचे १४ वे राज्य बनले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८०:रोहन बोपन्ना_ भारतीय टेनिस खेळाडू**१९७७:निता प्रफुल्ल अलेल्वार -- कवयित्री, लेखिका**१९७३:प्रा.डॉ.केशव पाटील-- लेखक,संपादक* *१९७२:रवींद्र केदा देवरे -- कवी* *१९७१:वैशाली गावंडे-कोल्हे -- कवयित्री,लेखिका* *१९६७:डॉ.निर्मला पी.भामोदे-- चरित्रकार, वक्त्या* *१९५९:बबन ओंकार महामुने-- कवी , कथाकार* *१९४९:प्रा.डॉ.वामनराव जगताप -- कवी, लेखक**१९४४:शरद पुराणिक-- विज्ञान लेखक**१९३९:गोविंद मोघाजी गारे--आदिवासी संस्कृती,आदिवासी साहित्य,आदिवासी कला यांचे गाढे अभ्यासक,(मृत्यू:२४ एप्रिल २००६)**१९३५:गणपती साबाजी सेलोकर- कवी* *१९३५:प्रभा राव-- राजस्थान व हिमाचल प्रदेश राज्यांच्या माजी राज्यपाल (मृत्यू:२६ एप्रिल २०१०)* *१९२९:प्रल्हाद बापूराव वडेर--कथाकार, समीक्षक**१९२२:दीना पाठक – अभिनेत्री (मृत्यू:११ आक्टोबर २००२)**१९२१:फणीश्वर नाथ 'रेणु'-- हिन्दी भाषेचे साहित्यकार(मृत्यू:११ अप्रैल १९७७)**१९०९:दामोदर अच्युत कारे-- गोमंतकीय मराठी कवी.हे बा.भ.बोरकरांचे समकालीन होते(मृत्यू:२३ सप्टेंबर १९८५)**१९०६:फिशर इलेक्ट्रॉनिक्स चे निर्माते एवेरी फिशर यांचा जन्म. (मृत्यू:२६ फेब्रुवारी १९९४)**१८९५:दत्तात्रय केशव केळकर -- समीक्षक, लेखक (मृत्यू:८ आगस्ट १९६९)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:जगन्नाथ केशव कुंटे-- लेखक (जन्म: १५ मे १९४३)* *२०१६:पूर्ण ऐजिटक संगमा(पी.ए. संगमा)-- पूर्व लोकसभा अध्यक्ष (जन्म:१ सप्टेंबर १९४७)**२०११:अर्जुन सिंग – केन्द्रीय मानव संसाधन मंत्री,३ वेळा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि पंजाबचे राज्यपाल (जन्म:५ नोव्हेंबर १९३०)**२००९:बापू वाटवे-- चित्रपटविषयक लेखन करणारे एक प्रसिद्ध मराठी लेखक व चित्रपट दिग्दर्शक(जन्म:१९२४)**२०००:गीता मुखर्जी – स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या,लोकसभा सदस्य (जन्म:८ जानेवारी १९२४)**१९९६:आत्माराम सावंत – नाटककार व पत्रकार(जन्म:७मार्च १९३३)**१९९५:इफ्तिखार – चरित्र अभिनेता (जन्म:२२ फेब्रुवारी १९२०)**१९९२:शांताबाई परुळेकर – ’सकाळ’च्या प्रकाशिका आणि सकाळ पेपर्स प्रा.लि.च्या संचालिका**१९८५:पुरूषोत्तम गणेश सहस्रबुद्धे--मराठी गंथकार आणि विचारवंत.(जन्म:१० जून १९०४)**१९७६:वॉल्टर शॉटकी – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म:२३ जुलै १८८६)**१९५२:सर चार्ल्स शेरिंग्टन – मज्जापेशीवर संशोधन करणारे नोबेल पारितोषिक विजेते (१९३२) ब्रिटिश जैवरसायनशात्रज्ञ (जन्म:२७ नोव्हेंबर १८५७)**१९२५:ज्योतिरिंद्रनाथ टागोर – थोर बंगाली साहित्यिक,नाटककार,संगीतकार,चित्रकार व संपादक,रविंद्रनाथ टागोर यांचे वडील बंधू, त्यांनी लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्याचे बंगालीत भाषांतर केले (जन्म:४ मे १८४९)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आयुष्याची संध्याकाळ .....*प्रत्येक माणसाचं एक वैशिष्ट्य असते की, आयुष्याच्या शेवटच्या क्षणावर त्याला खूप काही चांगले विचार डोक्यात येत असतात. पण त्यावेळी त्याच्या हातात ना वेळ असते ना काम करण्याची क्षमता. म्हणून जीवन जगताना आपणाला जे शक्य आहे ते काम त्याचवेळी करत राहावे. आता वेळ नाही, नंतर करतो किंवा आताच काही गरज नाही याची हे काम नंतर करतो. असे म्हणून काम पुढे ढकलू नये. गेलेली वेळ परत कधीच येत नाही म्हणून योग्य वेळी योग्य निर्णय हेच यशस्वी जीवनाचे रहस्य आहे. वेळेवर जो विजय मिळवितो तो सर्वच गोष्टीवर विजय मिळवितो. घड्याळ्यातील तीन काटे नेहमी पळत राहतात पण काही ठराविक कालावधीनंतर एकमेकांना भेटत राहतात. तसे आपण कुटुंबात व परिवारात राहणारे आई-वडील, भाऊ-बहीण, पती-पत्नी कामाच्या निमित्ताने किंवा इतर कारणांनी दिवसभर फिरत राहतो पण त्या घड्याळ्यातील काट्याप्रमाणे ठराविक कालावधीनंतर एकत्र येणे विसरून गेलोत. त्यामुळे आपले जीवन नीरस बनत चालले आहे. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धत होती. एका घरात विविध नात्यातील माणसं एकत्र राहत होती, त्यांच्यात प्रेम व श्रद्धा होती. विविध सण, समारंभ वा उत्सवाच्या निमित्ताने घराचं गोकुळ होत होते. पण कालांतराने कुटुंब पद्धत बदलत गेली. आज आम्ही दोघे राजा-राणी व दोन लेकरं, एवढाच विश्व झाल्याने माणूस एकलकोंडा होत चाललाय. सुखी जीवनाची व्याख्या बदलून गेली पण समाधान मात्र मिळालं नाही. म्हणून अंथरुणावर पडल्यावर माणसाला हे सारं आठवतं की, उभ्या आयुष्यात माझं काय काय चुकलं. पण तोपर्यंत वेळ गेलेली असते. म्हणून आयुष्यात सुखी व समाधानी राहायचं असेल तर रोज सर्वाना भेटत राहावे, सर्वांशी प्रेमाने बोलत राहावे, सर्वांची खुशाली विचारत राहावं, यातच जीवनाचे खरा सार लपलेला आहे. - नासा येवतीकर, स्तंभलेखक~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *लोकसभा निवडणूक २०२४साठी भाजपची पहिली यादी जाहीर, १९५ उमेदवारांची घोषणा; महाराष्ट्रातून एकही उमेदवाराची घोषणा नाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी पुन्हा मुस्लिम लीग ( एन ) चे जेष्ठ नेते शेहबाज शरीफ*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नगर-बीड-परळी रेल्वेला आणखी गती, पंतप्रधान मोदींच्या हस्ते आष्टी-अमळनेर टप्प्याचे ऑनलाइन लोकार्पण*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कार्यकर्त्यांच्या माध्यमातून फडणवीस मला मारू पाहतायत, असं माध्यम प्रतिनिधींशी बोलताना मनोज जरागे म्हणाले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नाशिक : MBA CET परीक्षा एक दिवस पुढे ढकलली, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत दि. ९ व १० मार्च रोजी घेतली जाणारी एमबीए / एमएमएस अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा आता दि. ९ ते ११ मार्च या कालावधीत घेतली जाणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *छ. संभाजीनगर : पाच हजारांची लाच पडली महागात, लाचखोर दुय्यम निबंधकाच्या घरी सापडली १ कोटी ३५ लाख रुपयांची रोख रक्कम*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *चाकूरजवळ झालेल्या कार अपघातात नांदेडचे चार तरुण ठार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भगवान बुध्दांनी सांगितलेले प्रकृतीचे तीन नियम *1. प्रकृतिचा पहिला नियम:*सुपीक शेतात बी पेरले नाहीतर निसर्ग अशी शेती तृण व घास-गवताने भरून टाकतो. अगदी तसेच मानवी मनात लहानपणा पासून व बुद्धीत *सकारात्मक* विचार भरले नाही तर *नकारात्मक* विचार आपोआप तयार होतात. हीच मनावरील कवचे होत.. *2. प्रकृतिचा दूसरा नियम:**ज्याच्याकडे जे आहे तो त्याचेच वाटप करतो.* सुखी *सुख* वाटतो, दुःखी *दुःख* वाटतो, ज्ञानी *ज्ञान* वाटतो,भ्रमित करणारा *भ्रम* वाटतो.घाबरणारा *भय* वाटतो, *3. प्रकृतिचा तिसरा नियम:*आपल्याला आयुष्यात जे काही मिळाले ते पचवायला शिका, त्यातच समाधानी रहा.. कारण*भोजन* जर पचले नाही तर *रोग* वाढतात,*पैसा* पचला नाही तर *देखावा* वाढतो,*बातचित* पचली नाही तर *चुगली* वाढते,*प्रशंसा* पचली नाही तर *अंहकार* वाढतो,*टिका* पचली नाही तर *दुश्मनी* वाढते,b *गोपनीयता* टिकली नाहीतर *खतरा* वाढतो,*दुःख* पचले नाही तर *निराशा* वाढते,आणि *सुख* पचले नाही तर *ऊन्मत्तपणा वाढतो...*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन हे यश आणि अपयश यांचे मिश्रण आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जपानचे राष्ट्रीय फूल कोणते ?२) भारतात अत्तराची राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते ?३) लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो ?४) All India Radio चे घोषवाक्य काय आहे ?५) हवेमधील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण किती असते ? *उत्तरे :-* १) सकुरा २) कन्नोज, उत्तरप्रदेश ३) लोकसभेचा सभापती ४) बहुजन हिताय, बहुजन सुखाय ५) ०.०३%*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤श्री गोवर्धन कोळेकर, ACP, औरंगाबाद👤 मारोती राचप्पा छपरे, माध्य. शिक्षक, जि. प. हा. धर्माबाद👤 मजहर सौदागर, सहशिक्षक 👤 साहेबराव पहिलवान, धर्माबाद👤 अनिल गडाख 👤 ज्ञानेश्वर नाटकर👤 गोविंद उपासे, सहशिक्षक👤 गोविंद कोंपलवार, सहशिक्षक👤 शिवाजी पाटील ढगे👤 शेख इस्माईल शेख लतीफ👤 लक्ष्मण बोधनकर, सहशिक्षक👤 लक्ष्मण कुमरवाड👤 सचिन पा. हंबर्डे धनंजकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जैसी गंगा वाहें जैसे त्याचे मन । भगवंत जाण तया जवळी ॥१॥त्याचे जवळी देव भक्ति भावे उभा । स्वानंदाचा गाभा तया दिसे ॥तया दिसे रुप अंगुष्ठ प्रमाण । अनुभवी खुण जाणति हे ॥३॥जाणती हे खूण स्वात्मानुभवी । तुका म्हणे म्हणे पदवी ज्याची त्याला ॥४॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मी म्हणजेच सर्वकाही,मला सर्व येते, मला सर्वच काही जमते,माझ्याकडे कशाचीही कमी नाही,मी कोणाच्यामागे धावणार नाही, मी सर्वात श्रेष्ठ व गुणवान आहे, हा अहंभाव जेव्हा,आपल्या अंगी शिरते त्यावेळी आपल्या अंतर्मनाला विचारून बघावे. नक्कीच या सर्व प्रश्नांची उत्तरे आपोआप, आपल्याला मिळतील. कुठेही शोधाशोध करण्यासाठी जावे लागणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*❃ परोपकार ❃* ••◆•◆•◆★◆•◆•◆•• "अनेक वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका गावात खूप उंदीर झाले होते. घरात, शेतात, दुकानात सगळीकडे नुसते उंदीरच उंदीर होते. त्यामुळे अन्न - धान्याचे नुकसान होत होते. कोणत्याही परिस्थितीत उंदरांचा नाश करायचा असे गावकरी ठरवतात. पण, अनेक उपाय करूनही उंदरांचा नाश होत नाही. त्यामुळे गावकरी खूप त्रस्त होतात. ही गोष्ट शेजारी राहणाऱ्या गावातील एका बासरीवाल्या मुलाला कळते. मग तो गावात येतो व गावकऱ्यांना सांगतो की, ‘मी या उंदरांचा बंदोबस्त करू शकतो पण त्या बदल्यात तुम्ही मला शंभर सुवर्णमुद्रा दयाव्यात.’ गावकरी तयार होतात. मग, तो बासरीवाला बासरी वाजवत गावात फिरू लागतो. त्याच्या बासरीच्या आवाजामुळे गावातील सर्व उंदीर त्याच्याकडे आकर्षित होतात व त्याच्यामागे धावू लागतात. तो मुलगा गावाबाहेरील नदीत जातो त्याच्याबरोबर उंदीरही पाण्यात जातात आणि पाण्यात बुडून मरतात. बासरीवाला मुलगा गावकऱ्यांकडे आपल्या कामाचा मोबदला मागतो परंतु गावकरी ठरल्याप्रमाणे त्याला शंभर सुवर्णमुद्रा दयायला नकार देतात. बासरीवाल्याला कळते की गावकरी लबाड आहेत. तो म्हणतो की, ‘आता मी तुम्हाला कशी अद्दल घडवतो ते बघा.’ तो पुन्हा गावात बासरी वाजवत फिरू लागतो. पण यावेळी बासरीच्या आवाजाने गावातील लहान मुले त्याच्याकडे आकर्षित होतात व तेही त्याच्यामागे धावू लागतात. गावकऱ्यांना भीती वाटू लागते की, बासरीवाला उंदराप्रमाणे आपल्या मुलांनाही नदीत घेऊन जाईल. त्यामुळे गावकरी त्याला थांबवतात व ठरल्याप्रमाणे शंभर सुवर्णमुद्रा देतात. *_🌀तात्पर्य_ ::~* जो आपल्यावर उपकार करतो त्याला कधीही विसरू नये. "**प्रत्येकाला त्याच्या कामाचा मोबदला मिळालाच पाहिजे*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 02 मार्च 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~या समुहात add होण्यासाठी Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ६२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९६९:फ्रेन्च बनावटीच्या ’कॉन्कॉर्ड’ या पहिल्या स्वनातीत (ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणार्या) विमानाचे यशस्वी उड्डाण**१९७८:स्वित्झर्लंडमधील दफनभूमीतुन चार्ली चॅप्लिनची शवपेटिका चोरीला गेली.**१९७०:ब्रिटनकडून स्वातंत्र्य घेऊन र्होडेशिया प्रजासत्ताक बनले.**१९५६:मोरोक्कोला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले**१९५२:पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते सिंद्री येथील खत कारखान्याचे उद्घाटन**१९४९:न्यू मिलफोर्ड,कनेक्टिकट येथे रस्त्यावरील स्वंयंचलित दिवे बसविण्यात आले.**१९४६:हो ची मिन्ह यांची उत्तर व्हिएतनामचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली.**१९३०:काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली नाशिक येथे करण्यात आला.**१९०३:’मार्था वॉशिंग्टन हॉटेल’हे फक्त महिलांसाठी असलेले जगातील पहिले हॉटेल न्यूयॉर्क मधे सुरू झाले.**१८५७:जे.जे.स्कूल ऑफ आर्टस सुरू झाले**१८५५:अलेक्झांडर (दुसरा) हा रशियाचा झार बनला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९०:टायगर श्रॉफ--भारतीय सिने-अभिनेता**१९८०:मधुराणी गोखले प्रभुलकर-- मराठी अभिनेत्री,गायिका आणि संगीतकार**१९७७:अँड्र्यू स्ट्रॉस – इंग्लिश क्रिकेटपटू**१९७६:प्रा.डॉ.आनंद शामराव बल्लाळ -- लेखक, कवी**१९७५:आत्माराम गोविंदराव हारे-- कवी**१९७४:डॉ.संजीवनी तडेगावकर-- कवयित्री लेखिका,संपादिका* *१९६६:प्रा.डॉ श्याम मु.जाधव -- लेखक* *१९५९:डॉ.उमेश शामकांत करंबेळकर-- लेखक**१९५४:हेमा सुभाष लेले-- कवयित्री, बालसाहित्यकार आणि मराठी लेखिका**१९५२:प्राचार्य बाबुराव धोंडुजी देसाई -- प्रसिद्ध मराठी,हिंदी,अहिराणी लेखक तथा अहिराणी बोली भाषेचे अभ्यासक* *१९४७:प्रा.मृणालिनी वसंत चिंचाळकर-- लेखिका,कवयित्री**१९४६:डॉ.भालचंद्र लक्ष्मण मुणगेकर-- भारतीय अर्थशास्त्रज्ञ,शिक्षणतज्ज्ञ,समाज सेवक* *१९४४:रमेश डी चव्हाण -- पत्रकार,कवी गझलकार**१९४१:डॉ.भगवान नारायण काटे -- कवी* *१९४०:हनुमंत मोरेश्वर मराठे-- मराठी पत्रकार, कादंबरीकार व कथा लेखक(मृत्यू:२ ऑक्टोबर २०१७)**१९३६:राम हरिश्चंद्र देशमुख -- लेखक* *१९३३:आनंदजी वीरजी शाह--भारतीय संगीत दिग्दर्शक**१९३१:प्राचार्य राम शेवाळकर – उत्तम कीर्तनकार आणि प्रभावी वक्ते प्रतिभावंत सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक (मृत्यू:३ मे २००९)**१९३१:मिखाईल गोर्बाचेव्ह – सोविएत संघाचे शेवटचे अध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते**१९२५:शांता जोग – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री (मृत्यू:१२ सप्टेंबर १९८०)**१९२४:गुलशन राय -- भारतीय चित्रपट निर्माता आणि वितरक (मृत्यू:११ऑक्टोबर२००४)**१९१७:पुरुषोत्तम नागेश ओक-- विद्वान इतिहासकार,इतिहास संशोधक आणि लेखक(मृत्यू:४ डिसेंबर २००७)**१९०२:लक्ष्मण गोविंद विंझे-- मराठी लेखक आणि कवी(मृत्यू:१ऑक्टोबर १९७२)**१७४२:विश्वासराव – पानिपतच्या ३ र्या युद्धात मारले गेलेले नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव (मृत्यू:१४ जानेवारी १७६१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:प्रा.डॉ.किसन महादू पाटील-- प्रसिद्ध कवी,लेखक (जन्म:१२ जून १९५३)**२०१३:सुहास भालेकर-- अभिनेते, दिग्दर्शक(जन्म:११ ऑक्टोबर१९३१)**१९८६:डॉ.काशीनाथ घाणेकर-- मराठी नाट्यअभिनेते व हिंदी-मराठी चित्रपट अभिनेते(जन्म:१४ सप्टेंबर, १९३२)**१९८२:केश्तो मुखर्जी-- भारतीय अभिनेता आणि विनोदी कलाकार(जन्म:७ ऑगस्ट १९२५)* *१९७२:नासिर रझा काझमी-- उर्दू कवी(जन्म:८ डिसेंबर १९२५)**१९४९:सरोजिनी नायडू – प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी,रौलेट कायदा, मॉन्टेग्यू - चेम्सफर्ड सुधारणा,खिलाफत चळवळ,साबरमती करार,असहकार आंदोलन यांत त्यांचा सक्रिय सहभाग होता. (जन्म:१३ फेब्रुवारी १८७९)**१९३०:डी.एच.लॉरेन्स – इंग्लिश कादंबरीकार,कवी,नाटककार,टीकाकार आणि चित्रकार (जन्म:११ सप्टेंबर १८८५)**१७००:मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांचे सिंहगडावर निधन (जन्म:२४ फेब्रुवारी १६७०)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *जीवन म्हणजे क्रिकेट*लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, थकला तो संपला असे म्हटले आहे, ते जर खोलात जाऊन विचार केलं तर नक्की वाटते की माणसाचे जीवन म्हणजे एक क्रिकेटच आहे.........आई - बाबा म्हणजे जीवनातील पंच आहेत, जे की आपल्या जीवनाला दिशा देतात, चुकत असल्यास लगेच इशारा देतात.पती - पत्नी म्हणजे पीचवर प्रत्येक चेंडूचा सामना करणारे फलंदाज. त्या पीचवर दोन खेळाडू मध्ये रनिंग बिटविन द विकेट चांगली राहणे गरजेचे असते. दोघांची एकमेकाला चांगली साथ असेल तरच धावसंख्या उभारू शकते अगदी तसेच संसारात पती - पत्नी एकमेकांना समजून घेणारे असतील तरच त्यांचे आयुष्य सुखी समाधानाचं असू शकते. जीवनातील संकटाला दोघांना देखील तोंड द्यावे लागते हे ही सत्यच आहे. मुलगा, मुलगी, जवळचे नातलग - म्हणजे मैदानावर असलेले अकरा खेळाडू. काही जण खुप जवळ असतात जसे किपर, सिली पॉईंट, गलीमधील खेळाडू म्हणजे अगदी जवळचे नातलग तर मिड ऑन किंवा मिड ऑफ म्हणजे दूरचे नातलग असे समजू या. गोलंदाजी करणारे खेळाडू म्हणजे मुलगा मुलगी. जे की आपल्या आई - बाबांना खूप कामाला लावतात. ते देखील आपल्या लेकारांसाठी प्रत्येक चेंडूचा म्हणजे संकटाचा सामना करत असतात. दूरचे नातलग देखील यांच्यावर निगराणी ठेवतात, प्रसंगी कामाला लावतात. प्रेक्षक :- म्हणजे संपूर्ण समाज जे की या परिवाराच्या बारीक बारीक गोष्टीवर आनंद आणि दुःख साजरा करतात. आपणाला जीवन जगण्यास प्रोत्साहित करतात.आहे की नाही आपलं जीवन म्हणजे क्रिकेट. शब्दांकन :- नासा येवतीकर, 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी:सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना लागू; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधिमंडळात घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *शेगावच्या गजानन महाराजांचा ०३ मार्च रोजी १४६वा प्रकटदिन, भक्तांसाठी दोन दिवस मंदिर खुले*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राहुल नार्वेकरांच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात ७ मार्चला सुनावणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यात एक लाख कोटी पेक्षा अधिक थेट परदेशी गुंतवणूक आणत महाराष्ट्र पहिल्या स्थानावर - देवेंद्र फडणवीस*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *झारखंडमध्ये ३५ हजार ७०० कोटीच्या बहुविध विकास प्रकल्पाचं पंतप्रधानांच्या हस्ते उदघाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *प्रत्येक गावातून १० जण रिंगणात,नांदेड लोकसभेला एक हजार उमेदवार, मराठा आंदोलकांची सगेसोयरेसाठी नवी रणनीती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *2027 ची जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप बीजिंगमध्ये : ग्लासगो येथे झालेल्या जागतिक ॲथलेटिक्स कौन्सिलच्या बैठकीत घेतला निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*राम शेवाळकर*कयाधू नदीच्या काठावरील शेवाळ हे राम शेवाळकरांचे मूळ गाव. तिथूनच त्यांच्या घरून शेवाळकरांकडे साहित्याचा वसा आणि वारसा आला. त्यांचे मूळचे आडनाव धर्माधिकारी. कालांतराने अचलपुरास वस्तीला आल्यावर शेवाळकर झाले. गोपिका बाळकृष्ण शेवाळकर या त्यांच्या आई. वेदशास्त्रसंपन्न रामशास्त्री शेवाळकर हे राम शेवाळकरांचे पणजोबा, बाळकृष्ण काशीनाथ ऊर्फ भाऊसाहेब शेवाळकर हे त्यांचे वडील. त्यांनी पासष्ट वर्षे कीर्तनाने लोकांना मंत्रमुग्ध केले. अशा घराण्यात जन्मल्यामुळे राम शेवाळकरांना संस्कृत साहित्याची आवड लागली. त्यांच्यावर संस्कृत महाकाव्ये, मराठी संतसाहित्याच्या माध्यमातून वाङ्मयीन संस्कार झाले.राम शेवाळकरांचा जन्म २ मार्च १९३१ रोजी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यामध्ये अचलपूर गावात झाला. पुढे त्यांनी नागपूर विद्यापीठातून संस्कृत व मराठीत एम.ए. केल्यानंतर शिक्षकी पेशा स्वीकारला. वाशीम येथे शासकीय प्रशालेत ते शिक्षक होते. पुढे यवतमाळ महाविद्यालय, नांदेडातील पीपल्स कॉलेज, वणीतील लोकमान्य टिळक महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणून शिकवले. या सुमारासच त्यांनी संस्कृती विषयक साहित्यनिर्मितीही आरंभली.१९९४ साली गोव्यात पणजी येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मराठी साहित्य महामंडळ, विश्वकोष निर्मिती मंडळ, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला, महाराष्ट्र साहित्य परिषद, साहित्य अकादमी, नाट्य परीक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ अशा संस्थांच्या कामात शेवाळकरांचा सहभाग होता.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुसऱ्याला सावली देणाऱ्या झाडाला मात्र उन्हात उभं राहावं लागतं.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्राचा *'राज्यपशू / राज्य प्राणी'* कोणता ?२) 'कवितांचे गाव' हा प्रकल्प राबविण्यासाठी प्रस्तावित असलेले मंगेश पाडगावकरांचे गाव कोणते ?३) आंतरराष्ट्रीय टी - २० क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतक कोणी ठोकले ?४) गगनयान मोहिमेसाठी भारताने किती अंतराळवीर निवडले आहे ?५) काळाराम मंदिरात अस्पृश्यांच्या प्रवेशाची चळवळ कधी झाली ? *उत्तरे :-* १) शेखरू २) उभा दांडा, वेंगुर्ला ३) जॉन निकोल लॉफ्टी एटन, नामिबिया ( ३३ चेंडूत ) ४) चार ५) ३ मार्च १९३० *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गणेश पाटील हतनुरे, लोकपत्र धर्माबाद तालुका प्रतिनिधी👤 मीनाक्षी रहाणे, पुणे👤 बालाजी धारजने👤 शेख जुनेद👤 सुरेश मिरझापुरे👤 संतोष कदम👤 चक्रधर ढगे👤 संभाजी सोनकांबळे👤 आकाश पाटील ढगे👤 अरुण भुरोड👤 सुभाष नाटकर👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हेचि थोर भक्ति आवडते देवा l संकल्पावी माया संसाराची ll १ llठेविले अनंते तैसेचि रहावे l चित्ती असो द्यावे समाधान ll २ llवाहिल्या उद्वेग दुखःची केवळ l भोगणे ते मूळ संचिताचे ll ३ llतुका म्हणे घालू तयावरी भार l वाहू हा संसार देवापाशी ll ४ ll।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वतः ची पाठ स्वतःच थोपाटून समाधान मानून घेण्यात जरी आनंद मिळत असले तरी एखाद्याच्या अंगात असलेल्या खऱ्या गुणांचा विजय होताना पाहून त्याची आपुलकीने पाठ थोपटण्याचा जो,खरा आनंद मिळतो त्यासारखं दुसरं काही मोठे नसते. ज्यावेळी त्या व्यक्तीची आपल्याकडून पाठ थोपाटली जाते त्यावेळी त्या व्यक्तीला पुढे नवीन कार्य करण्याची इच्छा निर्माण होत असते.चांगल्या कार्याची प्रशंसा व स्तुती करायलाच पाहिजे.प्रशंसा व स्तुती केल्याने नवं कार्य करायला प्रेरणा मिळत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मदत*शंकर एक गरीब घरातील मुलगा होता. एके दिवशी जंगलातून लाकडे गोळा करून तो परत येत असताना त्याला झाडाखाली एक म्हातारा माणूस बसलेला दिसला. तो खूप थकलेला आणि भुकेलेला होता. शंकरने त्याची विचारपूस केली. पण त्याच्याकडे त्या म्हातार्याला द्यायला अन्न द्यायला नव्हते. तो तसाच पुढे गेला. पुढे एक हरिण दिसले. त्याला तहान लागलेली होती. पण शंकरकडे पाणीही नव्हते. शंकरला खूप वाईट वाटले पण त्याचा नाईलाज होता. तो तसाच पुढे गेला. पुढे गेल्यावर त्याला एक माणूस भेटला. त्याला शेकोटी पेटवायची होती पण त्याच्याकडे लाकडे नव्हती. शंकरने त्याला आपल्याकडची थोडी लाकडे दिली. त्या माणसाने त्याला आपल्याकडचे थोडे अन्न आणि पाणी दिले. शंकर ते घेऊन मागे फिरला. त्याने हरणाला पाणी पाजले आणि उरलेले पाणी आणि अन्न घेऊन तो भुकेलेल्या म्हातार्या माणसाकडे आला. त्याला अन्न दिले. काही दिवस गेले. शंकर असाच लाकडे गोळा करायला जंगलात गेला. अचानक वाघ समोर आला. वाघ झेप घेणार इतक्यात एका हरणाकडे त्याचे लक्ष गेले. त्या हरणाला शंकरने पाणी पाजले होते. वाघ हरणाकडे पाहतो आहे हे पाहून शंकर उठू लागला तेवढ्यात तेथे एक वृद्ध माणूस आला. त्याने शंकरला उचलून सुरक्षित ठिकाणी नेले आणि त्याचे प्राण वाचवले*तात्पर्य -आपण दुसर्याला मदत केली की आपल्यालाही मदत मिळते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Posts (Atom)